जगभरातील पर्यटन कोकणात आणण्यासाठी प्रयत्नशील कचरा निर्मूलन, पाणी पुरवठा, नेटवर्क कनेक्टीव्हीटी, पायाभूत सुविधा मजबूत करणार - पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे सिंधुदुर्गनगरी दि.28(जि.मा.का): जगातील पर्यटन कोकणात आणू, यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत. देवगडवासियांसाठी कचऱ्याचे निर्मूलनाबाबत आणि लवकरच पाणी पुरवठा सुरु करण्यासाठी मी स्वतः लक्ष घालणार आहे. संपूर्ण कोकणात प्रत्येक किलोमीटरला मोबाईल नेटवर्कची चांगली कनेक्टव्हीटी आणि पायाभूत सुविधा मजबूत करणार, अशी ग्वाही पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. देवगड-जमसंडे नगरपंचायतीमध्ये २ कोटी २२ लाख ६५ हजार रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आज पर्यटन मंत्री श्री ठाकरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, सिंधुरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष साक्षी प्रभू, मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, अरुण दूधवाडकर, संदेश पारकर, सतीश सावंत, संजय पडते आदी उपस्थित होते. पर्यटन मंत्री श्री. ठाकरे...