Posts

Showing posts from March, 2024

टपाली मतदान सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.28 (जि.मा.का): भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 85 व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांना तसेच 40 टक्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांना कोविंड रुग्ण मतदार, निवडणूक कर्तव्यावर असलेले मतदार यांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याकरिता संबंधीत मतदाराना आवश्यक असलेल्या 12 डी नमुन्याचे वाटप सुरु झाले असून सदर नमुना परिपुर्ण भरुन निवडणूकीची अधिसुचना प्रसिध्द झाल्यानंतर 5 दिवसाच्या आत संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी / सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. मतदानाच्या दिवशी अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत मतदार व निवडणूक कर्तव्यावर असलेले मतदारांना टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे त्यासाठी आवश्यक असलेल्या 12/12 ए नमुन्यातील फॉर्म भरुन विहीत कालावधीमध्ये संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी /सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. तरी 46 रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील पात्र मतदारांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी ...

कुडाळ येथे ग्रंथोत्सवाचे आयोजन • जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते उद्घाटन • २९ आणि ३० मार्च रोजी आयोजन • ग्रंथ प्रदर्शन व विक्री

सिंधुदुर्गनगरी, दि.27 (जि.मा.का): ग्रामीण व शहरी भागातील लोकांमधील वाचन संस्कृतीमध्ये वाढ व्हावी या उद्देशाने दरवर्षी जिल्हा अथवा तालुका स्तरावर ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'ग्रंथोत्सव २०२३' चे आयोजन दि. २९ ते ३० मार्च २०२४ रोजी कुडाळ येथील रा.ब.अनंत शिवाजी देसाई वाचनालय व ग्रंथसंग्रहालय, पानबाजार येथे करण्यात आलेले आहे. शुक्रवार दि. २९ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी कुडाळ तहसीलदार विरसिंग वसावे, प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, मुंबई विभागाच्या प्रभारी सहायक ग्रंथालय संचालक मंजुषा साळवे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कविता शिंपी, साहित्यिक अनंत वैद्य, कुडाळचे को.म.सा.प.चे अध्यक्ष मंगेश मसके, कुडाळ चे रा.ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय व ग्रंथसंग्रहायल (जिल्हा ग्रंथालय) अध्यक्ष अरविंद शिरसाट आदी उपस्थिती असणार आहेत. ग्रंथोत्सव काळात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून अनेक ग्रंथ विक्रीसाठी देखील उपलब्ध असणार आहेत. कार्यक्रमाची रूपरेषा दुपारी १२ वा: व्याख्यान विषय - ...

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 निवडणूक प्रक्रिया शांततेत, निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, - निवडणूक निर्णय अधिकारी तथा रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज -जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे

सिंधुदुर्गनगरी, दि.26 (जि.मा.का): निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन निवडणूक प्रक्रिया शांततेत, निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन 46- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रत्नागिरी एम देवेंदर सिंह यांनी केले. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून मा. निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार विविध समित्यांची व पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रशिक्षण शिबींराचेही आयोजन करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली. 46- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ पुर्वतयारी आढावा बैठक नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृहात संपन्न झाली. यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर जिल्हाधिकारी रविंद्र मठपती, निवासी उपजिल्हाकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) बालाजी शेवाळे, रत्नागिरी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राहूल...

राजकीय पक्ष प्रतिनिधींना मतदान प्रक्रियेविषयी मार्गदर्शन आदर्श आचारसंहितेचे पालन करा – जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे

सिंधुदूर्ग, दि. 18 (जिमाका) लोकसभा सार्वत्रिक निवडणुक -2024 चा कार्यक्रम जाहिर झाला असून जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुका शांततेत पार पाडाव्यात या दृष्टीने सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी रवींद्र मठपती, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी प्रभाकर सावंत, रवींद्र कसालकर, संजय पडते, श्री अनावकर ,निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे,उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, सहायक खर्च निरीक्षक श्री मेश्राम, श्री खोत, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मतदार शपथ देण्यात आली. निवडणूक आयोगाकडून ज्या मार्गदर्शक सूचना राजकीय पक्षांसाठी प्राप्त झालेल्या आहेत त्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. आचारसंहिता लागू झाल्याने काय करावे, काय करु नये, नामनिर्देशनपत्र कसे भरावे, प...

नाधवडे परिसर शिवगर्जनेने दुमदुमला महानाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद आजपासून 'जाणता राजा' महानाट्याला सुरुवात

सिंधुदुर्ग नगरी दि 18 (जिमाका) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष आहे. या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन सिंधुदुर्गच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित जाणता राजा या महानाट्याचे आयोजन 18 ते 20 मार्च दरम्यान वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथे करण्यात आले आहे. महानाट्याच्या प्रयोगाच्या आज 18 मार्च रोजी पहिल्याच दिवशी नाधवडे शिवगर्जनेने दुमदुमले. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी विशाल खत्री ,मुख्य कार्यकारी अधिकारी उदय पाटील, अपर जिल्हाधिकारी रवींद्र मठपती, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी उपस्थितांना मतदानाची शपथ दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य बघण्याचा योग जाणता राजा महानाट्याच्या माध्यमातून "याची देही याची डोळा "आला. महानाट्यातील कलाकारांचे उत्...

समर्थच्या पालक व नातेवाईकांना आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.19 (जि.मा.का): बाल कल्याण समिती यांच्या आदेशाने बालक समर्थ वय 8 वर्ष 5 महिने यास शासकीय मुलांचे निरीक्षण गृह व बाल गृह, सिंधुदुर्ग, ओरोस येथे काळजी व संरक्षणासाठी दाखल करण्यात आले आहे. तरी समर्थ याचे पालक व नातेवाईकानी 30 दिवसाच्या आत नामे संस्था शासकीय मुलांचे निरीक्षण गृह व बाल गृह सिंधुदुर्ग ओरोस फोन नं 9673734455 या नंबर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी केले आहे. अन्यथा समर्थ याची जबाबदारी घेण्यास कोणीही नाही असे समजून बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार समर्थ याचे कायमचे पुनर्वसन करण्यास पूर्ण मोकळी राहील. संपर्कासाठी शासकीय मुलांचे निरीक्षण गृह व बाल गृह सिंधुदुर्ग,ओरोस 416812 फोन नंबर 9673734455, बाल कल्याण समिती, पत्ता शासकीय मुलांचे निरीक्षण गृह व बाल गृह सिंधुदुर्ग ओरोस , जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय प्रशासकीय इमार तळमजला 02362 228869 येथे संपर्क साधावा. ०००००

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 सर्व बँकांनी संशयास्पद व्यवहारांवर लक्ष ठेवावे -जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे

सिंधुदुर्गनगरी, दि.19 (जि.मा.का): भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुक -2024 चा कार्यक्रम जाहिर केला आहे. आचारसंहिता कालावधीत सर्वं बँकांनी संशयास्पद व्यवहारावर (Suspicious Transactions) लक्ष ठेवावे. एखाद्या खात्यातून संशयास्‍पद व्‍यवहार होत असल्यास त्‍याची माहिती जिल्‍हास्‍तरीय खर्च नियंत्रण समितीस दयावी. कोणताही निर्णय बॅंकांनी त्यांच्या स्‍तरावर घेवू नये असे निर्देश जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांना दिले. जिल्हादंडाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या अध्‍यक्षतेखाली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्‍या अनुषंगाने जिल्‍हाधिकारी कार्यालयात जिल्‍हयातील सर्व बॅंक अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पेालिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हा निवडणुक अधिकारी बालाजी शेवाळे, एलडीएम श्री मेश्राम आदी उपस्थित होते. श्री. तावडे म्हणाले सर्व बॅंकाच्‍या जिल्‍हा समन्‍वयक यांनी जिल्‍हयातील आपल्‍या बॅंकाच्‍या सर्व शाखांकडून एकत्रि‍त करुन जिल्‍हा अग्रणी बॅंक व्‍यवस्‍थापक यांच्याकडे सादा...

प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावणेबाबत निर्बंध जारी - जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे

सिंधुदुर्गनगरी दि.19 (जिमाका)- लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी कार्यक्रम दि. 16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे. या अनुषंगाने निवडणूकीचे प्रचार मोहीमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि कार्यकर्ते आणि हितचिंतक हे निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचे फलक लावणे, झेंडे लावणे, आदीसाठी जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी निर्बंध आदेश जारी केला आहे. यामध्ये फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजुला विंड स्क्रीन ग्लासच्या पुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या टप्पा पासून 2 फुट उंची पेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्य फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहनचालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजुने लावण्यात यावा, इतर कोणत्याही बाजुस तो लावता येणार नाही. फिरत्या वाहनांवार लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हा अध्यक्ष, उमेदवार व उमेदवाराचे निवणूक प्रतिनिधी यांनी निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अध...

कार्यालये, विश्रामगृहे परीसरात मिरवणुका काढण्यास घोषणा, सभा घेण्यास निर्बंध - जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे

सिंधुदुर्गनगरी दि.18 (जिमाका)- लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी कार्यक्रम दि. 16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे. या अनुषंगाने कार्यालये, विश्रामगृहे इ. परिसरात मिरवणुका काढण्यास, घोषणा, सभा यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये निर्बंध आदेश जारी केले आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हादंडाधिकारी/उपविभागीय अधिकारी/तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय/संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या, उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने सभा घेणे. सदरील आवाराचा वापर राजकीय कामासाठी करणे किंवा रॅली काढणे, निवडणूकी संबंधाने पोस्टर्स, बॅनर्स, पॅम्प्लेट्स, कटआऊट, पेंटींग्स, होडींग्ज लाव...

धरणे आंदोलन मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणुक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत निर्बंध - जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे

सिंधुदुर्गनगरी दि.18 (जिमाका)- लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी कार्यक्रम दि. 16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे. या अनुषंगाने धरणे आंदोलन, मार्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर सिंधुदुर्ग जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये निर्बंध आदेश जारी केले आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातारवरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हादंडाधिकारी/ उपविभागीय दंडाधिकारी/ तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालय, संस्था,शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने, व्यक्तीने, संघटनेने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने किंवा त्याच्या हितचिंतकाने धरणे आंदोलन, मार्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत दि.6 जून 2024 पर्यंत निर्बंध घातले आहेत. ०००००

सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विद्रुपता करण्यास निर्बंध - जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे

सिंधुदुर्गनगरी दि.18 (जिमाका)- लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी कार्यक्रम दि. 16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे. या अनुषंगाने कोणताही सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिर्बंध कार्यद्यांतर्गत कार्यवाहीसाठी सिंधुदुर्ग जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार निर्बंध आदेश जारी केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. काही व्यक्ती/संस्था यांचेकडून मोठ्या प्रमाणात अनाधिकृत होर्डीग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहीरात लावून शहराचे विद्रुपीकरण करण्यात आले आहे. तसेच निवडणूक कालावधीत राजकीय पक्ष अथवा पक्षाची संबंधीत व्यक्ती/ संस्था यांचेकडून होर्डीग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहिराती लावून शहराचे विद्रुपीकरण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारत निवडणूक आयोगाने मालमत्ता विरुपीत करण्यास प्रतिबंध करण्यासंबंधी दिलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सूचित केल्यानुसार नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामीण भागात निवडणूकीच्या कालावधीतमध्ये होर्डीग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहीरात...

सकाळी 6 वाजण्यापूर्वी आणि रात्री 10 वाजेनंतर फिरत्या वाहनावर ध्वनिक्षेपकास निर्बंध - जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे

सिंधुदुर्गनगरी दि.18 (जिमाका)- लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी कार्यक्रम दि. 16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांका पासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. या निवडणूकीच्या प्रचार मोहीमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास ध्वनी प्रदुषण होणे, सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील शांततेस व स्वास्थास बाधा पोहोचण्याची व उशीरा रात्री पर्यंत ध्वनीक्षेपण यंत्रणा चालु ठेवण्याची शक्यता असल्यामुळे मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (एन) अन्वये जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी जिल्ह्यात निर्बंध आदेश जारी केला आहे. यामध्ये ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिकारी यांचे परवानगी शिवाय करता येणार नाही, सकाळी 6 वाजण्यापूर्वी आणि रात्री 10 वाजेल्यानंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. दिवसा प्रचाराकरिता फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनी क्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा, ध्वनी क्षेपक...

इतर उमेदवाराचे नांव, नेमुन दिलेल्या चिन्हाची नमुना पत्रिका छापण्यास निर्बंध - जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे

सिंधुदुर्गनगरी दि.18 (जिमाका)- लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी कार्यक्रम दि. 16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे. याअनुषंगाने नमुना मतपत्रिका छपाईवर सिंधुदुर्ग जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार निर्बंध आदेश जारी केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांतेतत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने मुद्रणालयाचे मालकाने व ईतर सर्व माध्यमाव्दारे छपाई करणाऱ्या मालकाने तसेच प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापतांना खालील बाबीवर निर्बंध घालण्याची गरज आहे. इतर उमेदवारचे नाव व त्यांनी नेमुन देण्यात आलेले चिन्ह वापरणे. नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे. आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणे. वरील प्रमाणे नमुना मतपत्रिका छपाईस निवडणूक प्र...

रहदारीस अडथळा होईल अपघात होईल असे निवडणुकीचे साहित्य लावण्यास निर्बंध - जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे

सिंधुदुर्गनगरी दि.18 (जिमाका)- लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी कार्यक्रम दि. 16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे. या अनुषंगाने सार्वजनिक ईमारतीचे ठिकाणी, सार्वजनिक रत्यावर, रहदारीस अडथळा निर्माण न होवू देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (डीबी) नुसार निर्बंध आदेश जारी केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. यामुळे जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने सार्वजनिक ईमारतीचे ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर, निवडणूकी संबंधी पोस्टर्स, बैनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट्स, होडींग्ज, कमानी लावणे. तसेच निवडणूकीचे साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल अशा पध्दतीने लावण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दि.6 जून 2024 पर्यंत) निर्बंध घालीत आहे. ००००००

मालक, प्राधिकरणाच्या परवानगी शिवाय प्रचारासाठी जागा वापरण्यास निर्बंध जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांचे आदेश

सिंधुदुर्गनगरी दि.18 (जिमाका)- लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी कार्यक्रम दि. 16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे. या अनुषंगाने खाजगी व्यक्तींच्या जागेवर/ सार्वजनिक जागेवर झेंडे, भित्तीपत्रके लावण्यास सिंधुदुर्ग जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार निर्बंध आदेश जारी केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने निवडणूकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी फलक लावणे, भित्तीपत्रक लावणे, घोषणा लिहीणे, इत्यादी करीता कोणत्याही व्यक्तीची जागा, इमारत, आवार, भिंती इत्यादीवर संबंधित मालकाची परवानगी शिवाय व संबंधित परवाना प्राधिकरणाचे परवानगी शिवाय वापर करण्याण्यास निवडणुक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत (दि.6 जून 2024 पर्यंत) निर्बंध घातले आहेत. ००००००

जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी, दि.19 (जि.मा.का): जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार दिनांक 19 मार्च 2024 रोजी 00.01 वाजल्यापासून ते दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी 24.00 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला असल्याचे जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. कोकण विभागीय मंडळातर्फे मार्च 2024 मध्ये घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा - 2024 ( इ.10 वी) चे दिनांक 1/3/2024 ते दिनांक 26/03/2024 या कालावधीत लेखी परिक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक 12/3/2024 रोजीपासुन रमजान मास प्रारंभ, दि. 24/3/2024 रोजी होळी, दि. 25/3/2024 रोजी धुलिवंदन, दिनांक 28/3/2024 रोजी शिवजयंती (तिथीप्रमाणे), दिनांक 29/3/2024 रोजी गुड फ्रायडे, दिनाक 31/3/2024 रोजी इस्टर संडे असे सण उत्सव साजरे करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यापुर्वी राज्यात उत्सवाचे काल...

समर्थच्या पालक व नातेवाईकांना आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.19 (जि.मा.का): बाल कल्याण समिती यांच्या आदेशाने बालक समर्थ वय 8 वर्ष 5 महिने यास शासकीय मुलांचे निरीक्षण गृह व बाल गृह, सिंधुदुर्ग, ओरोस येथे काळजी व संरक्षणासाठी दाखल करण्यात आले आहे. तरी समर्थ याचे पालक व नातेवाईकानी 30 दिवसाच्या आत नामे संस्था शासकीय मुलांचे निरीक्षण गृह व बाल गृह सिंधुदुर्ग ओरोस फोन नं 9673734455 या नंबर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी केले आहे. अन्यथा समर्थ याची जबाबदारी घेण्यास कोणीही नाही असे समजून बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार समर्थ याचे कायमचे पुनर्वसन करण्यास पूर्ण मोकळी राहील. संपर्कासाठी शासकीय मुलांचे निरीक्षण गृह व बाल गृह सिंधुदुर्ग,ओरोस 416812 फोन नंबर 9673734455, बाल कल्याण समिती, पत्ता शासकीय मुलांचे निरीक्षण गृह व बाल गृह सिंधुदुर्ग ओरोस , जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय प्रशासकीय इमार तळमजला 02362 228869 येथे संपर्क साधावा. ०००००

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 चा कार्यक्रम जाहिर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी 07 मे रोजी मतदान तर 4 जून रोजी मतमोजणी जिल्ह्यात आजपासून आदर्श आचारसंहिता लागू -जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किशोर तावडे

सिंधुदुर्गनगरी दि.16 (जिमाका) भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुक -2024 चा कार्यक्रम जाहिर केला आहे. 46 रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी 7 मे 2024 रोजी मतदान होणार असून 4 जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. आजपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुका शांततेत पार पाडाव्यात या दृष्टीने सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी रविंद्र मठपती, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे आणि जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांच्यासह प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. तावडे म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. देशभरात सात टप्प्यात निवडणूक होणार असून या कार्यक्रमा...

अंगणवाडी मदतनीससाठी २७ मार्चपर्यंत अर्ज करा

सिंधुदुर्गनगरी दि.15 (जि.मा.का):- देवगड तालुका अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील मानधनी अंगणवाडी मदतीनीस पदासाठी संबंधित ग्रामपंचायत महसूल गावातील इच्छूक व पात्र महिला उमेदवाराकडून दिनांक १५ ते २७ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत (सार्वजनिक सुट्या वगळून) कार्यालयीन वेळेत बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प देवगड कार्यालयात अर्ज सादर करावेत. असे आवाहन देवगड एकात्मिक बालविकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी बाबली होडावडेकर यांनी केले आहे. एकूण १५ पदांसाठी ही भरती होत असून पात्र व इच्छुक उमेदवारयांनी विहीत नमुन्यातील अर्ज, स्वतःची स्वाक्षरी करून सादर करणे आवश्यक आहे. (सोबत अर्जाचा नमुना) अर्जासोबत लहान कुटुंबाबाबत प्रतिज्ञापत्र जोडणे अनिवार्य आहे. अर्जासोबत जन्म नोंदीचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र सत्यप्रत,उमेदवार त्याच महसुली गावातील कायम रहिवास असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र सोबत जोडण, पोलीस पाटील यांच्याकडील कायम रहिवास दाखला, विवाहीत असल्यास विवाह नोंदणी दाखला, जोडणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता- अंगणवाडी मदतनिस, पदासाठी इयत्ता १२ वी उत्तीर्ण...

नवभारत साक्षरता कार्यक्रम चाचणी परीक्षा 17 मार्च रोजी

सिंधुदुर्गनगरी, : केंद्रपुरस्कृत उल्लास - नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत उल्लास ॲपवर नोंदणी झालेल्या असाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी महाराष्ट्रसह संपुर्ण देशात एकाच वेळी रविवार दि. 17 मार्च 2024 रोजी ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. राज्यात आतापर्यंत सहा लक्ष वीस हजार इतक्या असाक्षरांची ऑनलाइन नोंदणी केंद्रशासनाकडे झाली असून त्या सर्वांची परीक्षा घेण्याची प्रशासनाने तयारी केली आहे. दरम्यान 5 लाखाहून अधिक नवसाक्षर ही परीक्षा देतील असा अंदाज आहे. सध्या दहावी- बारावीच्या परीक्षांसह इतरही विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे नातवंडांसह आजी ‘ आजोबाही अभ्यासात सध्या मग्न आहेत. उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम सन 2022 ते सन 2027 या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. देशातील 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसीत करून देशातील 15 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील असाक्षर व्यक्तींना महत्वपूर्ण जीवन कौशल्ये विकसीत करावयाची आहेत. या कौशल्यांमध्ये आर...

कृषि सेवक पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

सिंधुदुर्गनगरी, दि.15 (जि.मा.का): कृषी विभागातर्फे घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेमध्ये कृषी सेवक पदी निवड झालेल्या जिल्ह्यातील नितेश पाताडे व स्नेहा खोत यांचा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, तसेच मॉडेल करिअर सेंटर, सिंधुदुर्ग यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त गणेश चिमणकर यांनी मुलांना युपीएससी, एमपीएससी, बँकिंग, पोलीस भरती, आर्मी भरती, तसेच इतर सरळसेवा परीक्षां बद्दल मार्गदर्शन करत कौशल्य विकास विभागात असलेल्या भव्य निशुल्क ग्रंथालय व स्टडी रूम याचा जास्तीत जास्त मुलांनी लाभ घ्यावा असे आवाहन करत मुलांना प्रोत्साहन दिले. यावेळी त्यांनी मुलांना भावी अधिकारी घडवण्यासाठी त्यांच्या विभागातर्फे वेळोवेळी विविध उपक्रम राबवण्यात येतील याची ग्वाही दिली. मंत्रालयाचे श्रम व रोजगारचे, निखील दवणे यांनी यावेळी निवड झालेल्या मुलांना शुभेच्छा देत स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना मुलांनी सातत्य कसे ठेवावे व मुलाखतीस कसे सामोरे जावे याबद्दल मुलांना मार्गदर्शन केले. कनिष्ठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी कृष्ण...

दिव्यांगांनी अर्थसहाय्य योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, : राज्यातील 18 ते 60 वयोगटातील दिव्यांगाना स्वयंरोजगारासाठी अल्प व्याज दराने कर्ज स्वरुपात अर्थसहाय्य करण्याकरीता वैयक्तिक थेट कर्ज योजना व दिव्यांग स्वालंबन कर्ज योजना राबविण्यात येतात. या योजना अनुक्रमे महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ आणि राष्ट्रीय दिव्यांगजन महामंडळामार्फत राबविण्यात येतात. या महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजनांचा लाभ जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या www.mshfdc.co.in या संकेतस्थळावरील डाऊनलोमध्ये कर्ज योजनांचे अर्ज व महामंडळाचे माहितीपत्रक https://mshfdc.co.in/index.php/2013-04-12-13-20-56 या लिंकवर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अपंग वित्त विकास महामंडळ मर्या.चे जिल्हा व्यवस्थापक के.व्ही. लोहकरे यांनी केले आहे. ०००००

अंगणवाडी स्तरावरील कामकाज झाले 'स्मार्ट' अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना 1 हजार 588 स्मार्ट फोनचे वाटप

सिंधुदुर्गनगरी, : जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत 1 हजार 539 अंगणवाड्या कार्यरत असून या अंगणवाडयांमध्ये कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका तसेच बीट स्तरावर कार्यरत असलेल्या 49 पर्यवेक्षिका असे एकूण 1 हजार 588 स्मार्टफोनचा पुरवठा राज्य शासनामार्फत करण्यात आलेला आहे. या स्मार्टफोन सॅमसंग कंपनीचे असून मोबाईल सोबत चार्जर, बॅक कव्हर, स्क्रीन गार्ड व अन्य आवश्यक बाबी पुरविण्यात आल्या आहेत. सदर मोबाईलचा उपयोग अंगणवाडी स्तरावरील ऑनलाईन दैनंदिन कामकाज करण्यासाठी होणार असून त्यामुळे एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये पारदर्शकता व गतिमानता येणार असल्याचे माहिती जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले यांनी केले आहे. ०००००

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

सिंधुदुर्गनगरी, : मार्च महिन्यातील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार दि. 18 मार्च 2024 रोजी सकाळी 11 ते दु. 1 या वेळेत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी समस्याग्रस्त व पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांचे तक्रारी व अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिण्याच्या तिसऱ्या सोमवारी / तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. समस्याग्रस्त व पीडित महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहीत नमुण्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत दालन क्र.106, ए-ब्लॉक, तळमजला सिंधुदुर्गनगरी ओरोस येथून उपलब्ध करुन घ्यावेत. अर्ज विहीत नमुन्यात असावा. तक्रार, निवेदन वैयक्तीक स्वर...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पीएम-सुरज राष्ट्रीय संकेतस्थळाचा शुभारंभ •दुरदृष्यप्रणालीव्दारे साधला लाभार्थ्यांशी संवाद •1 लाख लाभार्थ्यांना आयुष्मान आरोग्य कार्ड वाटप •1 लाख सफाई कर्मचाऱ्यांना पीपीई सुरक्षा किटचे वाटप

सिंधुदुर्गनगरी, दि.13 (जि.मा.का.) : समाजातील वंचित घटकांचा विकास करणे आणि त्यांना सक्षम बनविण्यासाठी केंद्र शासन नेहमी कल्याणकारी योजना राबवित असते. पीएम-सुरज हे पोर्टलमुळे वंचित घटाकांमध्ये सामाजिक परिवर्तन घडून येणार आहे. या उपक्रमांतर्गत गरजूंना कर्ज पुरवठा करण्यात येणार असल्याने अनेक नवउद्योजक स्वत:चा व्यवसाय उभा करु शकणार आहेत. आयुष्मान आरेाग्य कार्डामुळे लाभार्थ्यांना 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत. केंद्र शासन 80 करोड लाभार्थ्यांना मोफत धान्याचे वितरण करत आहे. केंद्रातर्फे अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात असून केंद्र शासन वंचित घटकाच्या विकासासाठी सदैव तत्पर असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधानांच्या हस्ते पीएम-सुरज राष्ट्रीय पोर्टलचा दुरदृष्यप्रणालीव्दारे शुभारंभ पार पडला. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात 1 लाख लाभार्थ्यांना आयुष्मान आरोग्य कार्ड वाटप आणि 1 लाख सफाई कर्मचाऱ्यांना पीपीई सुरक्षा किटचे वाटप देखील करण्यात आले. या उपक्रमाच्या थेट प्रसारणाची व्‍यवस्था जिल्हा नियेाजन सभागृहात करण्यात आलेली होती. यावेळी जिल्हाधिकार...

पुरस्कारांचे वितरण

सिंधुदुर्गनगरी, दि.13 (जि.मा.का.) : जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांनी अंगणवाडीस्तरावर उत्कृष्ठ काम केल्याबद्दल त्यांना सन 2023-24 चा जिल्हा परिषदेचा आदर्श पर्यवेक्षिका, आदर्श अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाळसाहेब पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (म.बा.वि.) संतोष भोसले, सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, व पुरस्कार प्राप्त पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मिनी सेविका व मदतनिस उपस्थित होत्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वरुपात र.रु. 10,000/-, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्न देऊन पुरस्कारकर्त्यांना सन्मानित करण्यात आले. एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनिस यांची जिल्हा आदर्श पुरस्काराची निवड यादी पुढीलप्रमाणे आहे. महिला व बाल विकास ...

जिल्ह्यातील नऊ हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तू संच वाटप सुरु! पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाला शुभारंभ.

सिंधुदुर्गनगरी, दि.8 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील नऊ हजार बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तू संच वाटप करण्यात येत आहे. या वितरणाचा शुभारंभ पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झाला. जिल्ह्यात उद्यापासून पाच ठिकाणी याचे वितरण होणार आहे. नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांनी याचा लाभ घेण्याचे आयोजन रत्नागिरी सिंधुदुर्ग चे सहाय्यक कामगार आयुक्त संदेश सु. आयरे यांनी केले आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदीत (जिवीत) सक्रिय बांधकाम कामगारांकरीता सामाजिक सुरक्षा योजना, शैक्षणिक योजना, आर्थिक योजना, आरोग्य योजना अशा प्रकारच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. नोंदीत (जिवीत) सक्रिय बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तू संच वाटपाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी प्रधानमंत्री विश्वकर्मा समितीचे सदस्य प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे उपस्थितीत होते. या योजनेचा सुमारे ९००० बांधकाम कामगारांना ल...

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द -सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण जिल्ह्यातील विकास कामांसाठी 3 हजार 341 कोटी रुपयांची कामे सुरू मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसह विविध विकासकामांचे ऑनलाइन भूमिपूजन

सिंधुदुर्गनगरी, दि.8 (जि.मा.का.) : विविध विकासकामे आणि प्रकल्प राबवून जिल्ह्याच्या विकासाला शासनाने नेहमीच प्राधान्य दिलेले आहे. शासनाने सुमारे 3 हजार 341 कोटी रुपयांची विकास कामे मंजूर केली आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यासाठी एकूण 4 हजार 591 कोटी एवढा निधी खर्च करून विविध विकास कामे केली जात असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द असल्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंजूर झालेल्या 29 कामांचा व मुख्यमंत्री सडक योजनेतील 52 रस्त्यांचा ऑनलाईन भूमिपूजन सोहळा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. हा सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विकास समिती कार्यालयात पार पडला. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी किशोर तावडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी उदय पाटील, सिंधू रत्न समितीचे सदस्य किरण सामंत, माजी आमदार राजन तेली, पी एम विश्वकर्मा समितीचे सदस्य प्रभाकर सावंत, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आदी मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी...

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी, दि.7 (जि.मा.का.) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि.8 मार्च 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दि. 8 मार्च 2024 रोजी सकाळी 8.20 वाजता मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व कणकवली जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता कणकवली येथे आगमन व शासकीय विश्रामगृह कणकवली इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. स्थळ, शासकीय विश्रामगृह कणकवली. सकाळी 9.45 वाजता कणकवली येथून वैभववाडीकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रमगृह, फोंडा इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ, शासकीय विश्रामगृह फोंडा. सकाळी 11 वाजता वैभववाडी येथे आगमन व पंचायत समिती, वैभववाडी नुतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. स्थळ, पंचायत समिती, वैभववाडी. सकाळी 11.15 वाजता वैभववाडी येथून ओरोस जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. दुपारी 12.15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,ओरोस येथे आगमन व राखीव. दुपारी 12.30 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक व मुख्यमंत्री ग्राम...

अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाची सावंतवाडीमध्ये कारवाई

सिंधुदुर्गनगरी, दि.7 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील सावंतवाडी येथून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड येथे गुटखा पानमसाला वितरीत होत असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई स्थित मुख्यालयातील दक्षता विभागास प्राप्त झाली होती. या माहितीच्या अनुषंगाने कारवाई घेण्यासाठी मुंबई, ठाणे, सातारा, कोल्हापुर येथील अधिकाऱ्यांनी सावंतवाडी येथे दि. ६ मार्च रोजी अचानक धाड टाकली. चंद्रशेखर पांडूरंग नाईक यांच्या मालकीच्या प्लॉट क्र.ई. २८७, न्यू खासकिलवाडा, नवसरणी रोड, सावंतवाडी येथील गोडावूनमध्ये विमल पानमसाला व व्ही वन तंबाखूचा साठा आढळून आला तर गोडावून बाहेर असलेल्या पिकअप क्र. MH07 AJ2436 मध्ये ही पानमसाला सुगंधीत तंबाखूचा साठा होता. सर्व साठ्याची किंमत रु. ४५,१३,६०० एवढी आहे. तसेच चंद्रशेखर नाईक यांचा मुलगा गजानन उर्फ गौरव नाईक यांच्या गौरव एजन्सी, प्लॉट क्र. ई.२२१, कोठावळे पाबंद, खासकीलवाडा, सावंतवाडी येथे टाकलेल्या छाप्यात नजर गुटखा, विमल पानमसाला, आरएमडी गुटखा, सुगंधीत तंबाखू इ. चा ५८,०६,९४३/- चा साठा जप्त करण्यात आला. पिक अप व्हॅन, जप्त करण्यात आली असून गोडवून व एजन्सी सीलबंद करण्य...

'नवतेजस्विनी' प्रदर्शनाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.7 (जि.मा.का): 'नवतेजस्विनी' महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत माविम बचत गटांतील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे "नवतेजस्विनी" तालुका स्तरीय भव्य प्रदर्शन विक्री दि.8 ते 13 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा समन्वय अधिकारी नितीन काळे यांनी दिली आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) (महाराष्ट्र शासन अंगीकृत) जिल्हा कार्यालयामार्फत जिल्ह्यातील गरीब, गरजू, मागासवर्गीय, विधवा, परीतक्ता, भूमिहीन महिला अल्पभूधारक महिला व वंचित महिलासाठी बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे कार्य करीत आहे. सद्यस्थितीत सिंधुदुर्ग मध्ये माविम अंतर्गत ग्रामीण भागात 136 गावात, 1 हजार 14 बचत गटांच्या माध्यमातून एकूण 11 हजार 67 महिला तसेच शहरी भागात 58 वार्डात 275 बचत गटांच्या माध्यमातून एकूण 2 हजार 849 महिला असे एकूण 13 हजार 916 महिलांचे संघटन करण्यात आले आहे. दिनांक लोकसंचलित साधन केंद्र नाव कार्यक्रम ठिकाण व वेळ दि.8 ते 10 मार्च 2024 रोजी अन्नपूर्णा लोकसंचलित साधन केंद्...

स्वदेश दर्शन अंतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.7 (जि.मा.का.) : केंद्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या स्वदेश दर्शन 2.0 योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रातील सहभागीदार यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे नि:शुल्क प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याकरीता अर्ज मागविण्यात येत असल्याची, माहिती उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी दिली. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात प्रत्येक स्तरावर मनुष्यबळ प्रशिक्षित करण्यासाठी आणि कौशल्य क्षमता वाढविण्यासाठी पर्यटन क्षेत्रातील सहभागीदार यांच्याकरीता नि:शुल्क प्रशिक्षण कार्यक्रम पर्यटन संचालनालय, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग पर्यटन क्षेत्र व्यवस्थापन समिती आणि आय.एच.एम.मुंबई यांच्या संयुक्त आयोजित करण्यात येत आहे. पर्यटन जागरुकता प्रशिक्षण कार्यक्रम,(Tourism awareness porgram), कालावधी 2-3 दिवस, वयोमर्यादा किमान 18 वर्ष, सहभागी होऊ शकणारे, टॅक्सी/ बस चालक पर्यटकांना हाताळण्यात गुंतलेले कर्मचारी स्मारक कर्मचारी,पर्यटन केंद्र कर्मचारी, पोलीस विभाग कर्मचारी, मार्गदर्शक, सर, वेटर्स, हेल्पर, आचारी, कुक, शेफ, हॉटेल रेस्टॉरट फ्रंट, ऑफ...

अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील ग्रामस्थांनी सावधानता बाळगावी

सिंधुदुर्गनगरी, दि.7 (जि.मा.का.) : अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पात पाणीसाठा करण्यात आला आहे. सन 2024-25 च्या हंगामात सिंचन तथा विद्युत विमोचकाचा विहिरीमध्ये आपत्कालीनव्दार उभारणीचे काम करण्याकरीता धरणामध्ये साठा करण्यात आलेले पाणी सिंचन विमोचकाव्दारे नदी पात्रात दि.9 मार्च 2024 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सोडण्यात येणार आहे. तरी नदी पात्रातील पाण्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी ग्रामस्थांनी नदीपात्रात उतरु नये व सावधानता बाळगावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी आधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या मांगवली, वेंगसर, हेत, ता. वैभववाडी व चिंचवली, खारेपाटण ता.कणवकली या गावातील नागरिकांना पुढीलप्रामणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत. वरील गावातील ग्रामस्थांना याबाबतीच माहिती होण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय तसेच गावातील लोकांच्या निदर्शनास येतील अशा ठिकाणी फलकावर सदर बाबत सूचना प्रसिध्द कराव्यात. रात्रीच्या वे...

अल्पसंख्याक शाळांनी अनुदानासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.7 (जि.मा.का.) : राज्यातील अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी शासन स्तरावरुन अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते. यायोजनेचा लाभ घेण्यास अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित/विना अनुदानित शाळा/ कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यामध्ये किमान 70 टक्के अल्पसंख्यांक विद्यार्थी (मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, बोद्ध, पारसी, जैन) शिक्षण घेत आहेत तसेच अपंगाच्या शाळांमध्ये किमान 50 टक्के अल्पसंख्यांक विद्यार्थी (मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, बौद्ध, पारसी, जैन) शिक्षण घेत आहेत अशा शाळा/संस्था पात्र असल्याची माहिती जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी दिली. जिल्ह्यातील इच्छुक शाळांनी सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता विहित नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांच्यामार्फत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दि. 12 मार्च 2024 पर्यंत सादर करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे. व...

सैनिक कल्याण विभागांतर्गत गट 'क' पदासाठी 24 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करा

सिंधुदुर्गनगरी, दि.5 (जि.मा.का.) : सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील गट-क ची पदे भरण्याकरीता दि. 24 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन सहाय्यक सैनिक जिल्हा कल्याण अधिकारी उमेश आईर यांनी केले आहे. सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील गट क ची पदे भरण्याकरीता दि. 12 फेब्रुवारी सकाळी 11 वाजल्यापासून दि.3 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. तथापि लोकहितार्थ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दि. 4 ते 24 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी सर्व माजी सैनिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. ०००००

कष्टकरी, शेतकऱ्यांना सुखी आणि संपन्न कर आई भराडी देवी चरणी मुख्यमंत्र्यांचे साकडे

सिंधुदुर्गनगरी, (जिमाका) : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी यात्रेला अनेक ठिकाणांहून भाविक येतात. यात्रा काळात भाविकांची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. भाविकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगून कष्टकरी आणि शेतकऱ्यांवर आलेले संकट दूर होऊ दे, त्यांच्या जीवनात समृध्दी येऊ दे, त्यांना सुखी आणि संपन्‍न कर असे साकडे आई भराडी देवी चरणी घातले. आंगणेवाडी येथील यात्रोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आई भराडी देवीचे दर्शन घेतले. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, जिल्हाधिकारी किशोर तावडे आदी उपस्थित होते. यावेळी श्री भराडी देवी यात्रोत्सव समितीच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री म्हणाले, आंगणे कुटुंबीयांचा मंदिर विकासामध्ये असणारा सहभाग कौतुकास्पद असून इतरांनी त्यांचा आदर्श घ्यावा. आई भराडी देवीच्या आर्शिवादाने मला मुख्यमंत्री पद सांभाळण्याची आणि जनतेची सेवा करण्याची संधी...

आई भराडी देवी भाविकांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करणार - पालकमंत्री रवींद्र चव्हाण

सिंधुदुर्ग दि २ (जिमाका) आई भराडी देवीच्या यात्रेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात. मी देखील गेली अनेक वर्ष आईच्या आशिर्वादासाठी येथे येतो. भराडी देवीचा सर्व भक्तांवर कृपाआशीर्वाद आहे. या कृपाशीर्वादामुळे सर्वजण आपापल्या क्षेत्रात यशस्वी होत आहेत. प्रत्येक भाविकाला चांगल आरोग्य आणि सुख समृद्धी लाभू दे. नवसाला पावणारा आई भराडी देवी सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करेल असा विश्वास पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज कुटुंबीयांसह आई भराडी देवीचे दर्शन घेतले. आंगणे कुटुंबीयांच्या वतीने आनंद आंगणे व काका आंगणे यांच्या हस्ते पालकमंत्री यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर आणि जिल्हाधिकारी किशोर तावडे उपस्थित होते.

पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ जिल्ह्यातील मातांचा उत्स्फूर्त सहभाग कौतुकास्पद -जिल्हाधिकारी किशोर तावडे

सिंधुदुर्गनगरीदि ३ (जिमाका)प्रत्येक मोहिमेत जिल्ह्यातील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. आजच्या पल्स पोलिओ मोहिमेत देखील जिल्ह्यातील मातांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद कौतुकास्पद असल्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे म्हणाले. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालयात जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या उपस्थितीत पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ झाला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांच्यासह वैद्यकीय अधिकारी कर्मचारी तसेच आशा स्वयंसहाय्यक उपस्थित होते. जिल्ह्यातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील ३४ हजार ९०१ बालकांना पोलिओचा डोस पाजला जाणार आहे. तसेच रविवारी जिल्ह्यातील ९०७ लसीकरण केंद्रावर ही मोहीम राबविली जात आहे. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या उपस्थितीत जिल्हा रुग्णालय सिंधूनगरी येथे पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन एका बाळाला पोलिओ डोस पाजून झाले. डॉ. सई धुरी यांनी पल्स पोलिओ बाबत यावेळी विस्तृत माहिती दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध माध्यमाद्वारे आरोग्य विषयक जनजागृती केल्या जात आहे. येथील नागरिकही शासनाच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी असतात. ही एक सकारात्मक बाब आहे. ...