जिल्ह्यात 15 ऑक्टोबरपर्यंत मनाई आदेश
सिंधुदुर्गनगरी, दि.30 (जि.मा.का) : जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये,तसेच जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी. यासाठी जिल्हाधिकारी के. मजुलक्ष्मी यांनी, त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार दिनांक 1 ऑक्टोंबर 2022 रोजी 00.01 वाजलेपासून ते दिनांक 15 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते राज्यभरात आक्रमक झालेले असून काही राजकीय पक्षातील प्रतिस्पर्धी गट आपापल्या कार्यकर्त्यांची जमवाजमव करुन एकमेकांना लक्ष करत असून त्यातून काही ठिकाणी आंदोलनात्मक घटना घडलेल्या आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक मागणीकरिता उपोषणे, मोर्चा, निदर्शने, रास्ता रोको वैगरे सारखे आंदोलनात्मक कार्यक्रमांचे वेळोवेळी नियोजन करण्यात येत असते. त्यामुळे या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण भूभागात खालील कृत्य करण्यांस मनाई आहे. कलम 37 (1) Ø शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, ...