Posts

Showing posts from June, 2025

सामाजिक न्याय दिन व छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

सिंधुदुर्गनगरी दिनांक २६ (जिमाका) :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 151 वी जयंती व सामाजिक न्याय दिन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मानाचा मुजरा करण्यात आला. या कार्यक्रमास समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे, सहाय्यक लेखाधिकारी उदय यादव, वरिष्ठ समजा कल्याण निरीक्षक गणेश हुक्कीरे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, तसेच इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयातील कर्मचारी व विविध महामंडळातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी यांनी शाहू महाराज बद्दल मनोगत व्यक्त केले, तसेच या कार्यालयाचे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गणेश हुक्कीरे यांनी शाहू महाराजांच्या जीवनकार्याबद्दल उपस्थितांना मौल्यवान अशी माहिती दिली. जिल्हाधिकारी यांनी समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त सर्व महामंडळे तसेच समाज कल्याण कार्यालय यांना भेट देवून अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. या कार्यालयाच्या अधिनस्त सर्व वसत...

जिल्हास्तरीय सुबोतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक २६ (जिमाका) :- सुब्रोतो मुखर्जी एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्लीव्दारे सन 2025-26 या वर्षी आयाजित करण्यात येणाऱ्या 64 वी आंतरराष्ट्रीय सुबोता मुखर्जी कप फुटबॉल (सबज्युनिअर,ज्युनिअर) क्रीडा स्पर्धा आयाजित होणार आहेत. या स्पर्धा 15 वर्ष खालील मुले (सब ज्युनियर) व 17 वर्ष खालील मुले व मुली (ज्युनिअर) या वयोगटाच्या आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन दि. 3 जुलै 2025 रोजी 15 वर्ष खालील मुले (सबज्युनियर) 17 वर्ष खालील मुली (ज्युनिअर) व 4 जुलै 2025 रोजी 17 वर्ष खालील मुले (ज्युनिअर) सकाळी 9 वाजता कुडाळ तालुक्यातील श्री. वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगांव येथे आयोजित करण्यात आले आहे. सर्व शाळांना, संघानी सहभागापुर्वी sindhudurga.mahadso.co.in/school या संकेतस्थळावर खेळाडू तसेच संघाची नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच प्राथमिक नोंदणी प्रवेश फी व ऑनलाईन प्रवेशिका भरलेल्या नोंदणीकृत संघांनाच या स्पर्धेत सहभागी करुन घेण्यात येईल. तरी जिल्ह्यातील सर्व शाळांनी यांची नोंद घेऊन व आपला फुटबॉलचा संघ घेऊन वेळेवर स्प...

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन साजरा जिल्ह्यात शाळांमधून साकारला आरोग्य, मैत्री आणि प्रेरणेचा उत्सव

सिंधुदुर्गनगरी दिनांक २६ (जिमाका) :- आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन २३ जून रोजी साजरा झाला. यानिमित्त, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी केवळ क्रीडा नव्हे, तर ऑलिंपिक मूल्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात घोषवाक्य स्पर्धा, पोस्टर मेकिंग, संवाद सत्र अशा विविध उपक्रम पार पडले. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, मैत्री आणि परिश्रम यांचा अर्थ पोहोचवणे,असा कार्यक्रमाचा उद्देश होता. कणकवली येथील माध्यमिक विद्यालय येथे क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड व क्रीडा अधिकारी शीतल शिंदे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येथे देखील राहुल गायकवाड यांनी ऑलिंपिकच्या मूळ संकल्पना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविल्या. जय भवानी इंग्लिश मीडियम स्कूल, मालवण येथे क्रीडा अधिकारी सचिन रणदिवे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, तर कुडाळ हायस्कूल अॅड ज्युनिअर कॉलेज येथे क्रीडा मार्गदर्शक माधुरी घरळ यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागवणारे मार्गदर्शन केले. विशेष उल्लेखनीय उपक्रम परशुराम नाईक हायस्...

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती पर्वानिमित्त विशेष जात पडताळणी मोहिमेचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक २५ (जिमाका) :- "राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती पर्व" निमित्त दि.26 जून ते दि.4 जुलै 2025 या कालावधीत साजरा केला जाणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडून अनु.जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येते. दरवर्षी विद्यार्थ्यांनी 12 वीमध्ये शिकत असताना 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक असते. त्यामुळे " राजर्षी छत्रपती महाराज जयंती पर्व" निमित्त दि.26 जुन ते दि.4 जुलै 2025 या कालावधीत जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत विशेष मोहीमेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य विशाल नाईक यांनी दिली आहे. या विशेष मोहिमे अंतर्गत प्रत्यक्ष काही महाविद्यालयात जाउन शिबीराचे (कॅम्पचे) नियोजन करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना विहीत मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावेत. या उद्देशाने हा कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था...

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक २५ (जिमाका) :- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2025-26 अंतर्गत अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गाच्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज करणे आवश्यक असल्याने खरीप हंगाम लक्षात घेता १५ ते ३० जून २०२५ या कालावधीत क्षेत्रियस्तरावर गावपातळीपर्यंत विशेष मोहिम आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गातील इच्छुक शेतकऱ्यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेंतर्गत महाडीबीटी ऑनलाईन प्रणालीवर जास्तीत जास्त संख्येने अर्ज करुन फलोत्पादन विषयक विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात 'प्रथम अर्ज प्रथम लाभ' या तत्वावर लाभार्थींची निवड केली जात आहे. त्यासाठी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्यासाठी फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आपले तालुक्याच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. 000000

आयटीआय प्रवेश २०२५ अर्ज व प्रवेश फेऱ्यांचे सुधारीत वेळापत्रक जाहीर

सिंधुदुर्गनगरी दिनांक २५ (जिमाका) :- पद्मश्री रमाकांत आचरेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ओरोस येथे ऑगस्ट 2025 करीता मंजूर असलेल्या व्यवसायांकरिता https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरण्याची प्रक्रीया 15 मे पासून सुरु झालेली आहे. अर्ज भरण्याचा अंतिम दि. 26 जून 2025 असून सुधारित वेळापत्रकानुसार अर्ज निश्चित करण्याचा अंतिम दि. 27 जून 2025 असून विकल्प सादर करण्याचा अंतिम दि.28 जून 2025 असल्याची माहिती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य ए.एस. मोहारे यांनी दिली आहे. प्राथमिक गुणवत्ता यादी दि.28 जून 2025 रोजी संकेतस्थळावर उपलब्ध होईल गुणवत्तेबाबत कोणताही आक्षेप, हरकत असल्यास तसेच अर्जात काही बदल करावयाचा असल्यास उमेदवारांने आपल्या नजिकच्या आयटीआयमध्ये जाऊन दिनांक 29 ते 30 जून 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत हरकती नोंदवाव्यात. त्यानंतर अर्जात बदल करता येणार नाही. प्रत्येक प्रवेश फेरीच्या आदल्या दिवशी निवड यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करुन उमेदवारांना SMS द्वारे कळविण्यांत येईल. फेरीच्या दिनांकास आपल्या अर्ज, सर्व मूळ कागदपत्रे, झेरॉक्स व शुल्का...

'लाडकी बहिण' योजनेंतर्गत लाभार्थी महिलांनी नागरी सहकार पतसंस्थेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक २५ (जिमाका) :- महिला व बालविकास विभागाच्या वतीने महिलांसाठी 'लाडकी बहिण योजना' राबविली जात आहे. या योजनेतील जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिलांची गांव, तालुका व जिल्हा कार्यक्षेत्र असलेली नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करता येईल. अशा प्रकारच्या संस्था स्थापन करण्यासाठी नोंदणीचे निकष पुढीलप्रमाणे आहेत - अ.क्र. कार्यक्षेत्र. सभासद संख्या भागभांडवल रुपये 1 गाव २५० १ लाख ५० हजार 2 नगरपालिका ५०० ५ लाख 3 तालुका ५०० ५ लाख 4 जिल्हा १५०० १० लाख महिला सहकारी पतसंस्थांचे सभासद होण्यासाठी महिला व बाल विकास विभाग यांनी प्रमाणित केलेल्या यादीत संबंधित महिला लाभार्थीचे नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात अशा प्रकारच्या संस्था स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन व सहाय्य करण्यासाठी पालक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, कुडाळ सुनिल मरभळ, यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या दूरध्वनी क्रमांक ७७३८३५०६१४ असा आहे, देवगड तालुक्यासाठी सहकारी अधिकारी प्रेमानंद जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या दूरध्वनी क्रमांक ९४०५३९९१३० असा आहे, वै...

आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्या सिंधुदुर्गातील संघर्षयात्रींचा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते गौरव

सिंधुदुर्गनगरी दिनांक २५ (जिमाका) :- देशात १९७५ साली लागू झालेल्या आणीबाणीला आज २५ जून रोजी पन्नास वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त आणीबाणीत कारावास भोगलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघर्षयात्रींचा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाच्यावतीने सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज सकाळी हा कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, आरती देसाई, शारदा पोवार, संघर्षयात्री गजानन पणशीकर, नवनगर विकास प्राधिकरणाचे सदस्य प्रभाकर सावंत, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष लवू म्हाडेश्वर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे गौरवपत्र, गुलाबपुष्प देवून कारावास भोगलेल्या व्यक्तींचा सत्क...

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी दिनांक २५ (जिमाका) :- देशात १९७५ साली लागू झालेल्या आणीबाणीला आज २५ जून रोजी पन्नास वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून देशात सन 1975 ते 1977 मध्ये लावलेल्या आणीबाणीतील घडामोडींवर आधारित सचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, आरती देसाई, शारदा पोवार, संघर्षयात्री गजानन पणशीकर, नवनगर विकास प्राधिकरणाचे सदस्य प्रभाकर सावंत, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष लवू म्हाडेश्वर आदी उपस्थित होते. देशात १९७५ साली लागू झालेल्या आणीबाणीला आज २५ जून रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. १९७५ ते १९७७ या दरम्यान लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि मूल्यांच्या जपवणुकीसाठी अत्यंत कठोर परिस...

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पाहणी

सिंधुदुर्गनगरी दि.23 (जिमाका) :- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 या उपक्रमांतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनात निर्माण झालेल्या सुविधांचा वापर तसेच सार्वजनिक ठिकाणी असलेले परिसर स्वच्छता शिवाय प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन बदललेल्या मानसिकतेची माहिती घेण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने पाहणी करण्यात येणार असल्याने सर्व ग्रामस्थांनी मिळून लोकसहभाग व श्रमदानातून या सार्वजनिक सुविधांचा पुरेपूर वापर करत परिसराची स्वच्छता, व प्लास्टिक मुक्तीची अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे. जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण या उपक्रमामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत सहभागी होत असते. केंद्र शासनाच्या वतीने प्रत्येक ग्रामपंचायतीची अद्यावत माहिती घेऊन उभारण्यात आलेल्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या सुविधांची चाचणी व तपासणी करण्यासाठी केंद्रशासनाचे पथक जिल्ह्यात येणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीची तपासणी करून एक हजार गुणांपैकी प्राप्त झालेल्या गुणांकनाच्या आधारे जिल्ह्याचे गुणांकन ठरणार आहे. ...

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी योग महत्वपूर्ण - जिल्हाधिकारी अनिल पाटील

सिंधुदुर्गनगरी दि २१ (जिमाका) आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक शांतता खूप महत्वाची आहे. योगसाधनेतून मानसिक स्थैर्य लाभते. म्हणून शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी तसेच निरोगी व आनंददायी जीवन जगण्यासाठी सर्वांनी नियमितपणे योगसाधना करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आज येथे केले. अकराव्या आंतरराष्ट्रीय योगदिना निमित्त आज जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा आयुष विभाग, मेरा युवा भारत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुलात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अधिष्ठाता डॉ अनंत डवंगे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा कोषागार अधिकारी अमित मेश्राम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ, क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा आयुष अधिकारी रुपा गावडे, 'माय भारत'च्या जिल्हा समन्वयक अपेक्षा मांजरेकर आदी उपस्थित होते. यावेळी शासकीय वैद्यकीय महाव...

परीक्षेसाठी प्रशासन सज्ज

सिंधुदुर्गनगरी दि.20 (जिमाका) :- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा 24 जून ते 14 जुलै 2025 या कालावधीमध्ये तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा 24 जून ते 8 जुलै 2025 या कालावधीमध्ये सुरु होणार आहेत. तसेच 15 व 16 जुलै 2025 रोजी ऑनलाईन परिक्षा होणार आहे. जिल्ह्यामध्ये इ.10 वी च्या परिक्षेसाठी 02 परिक्षा केंद्रे आहेत तर इ.12 वी च्या परिक्षेसाठीही 02 परिक्षा केंद्रे आहेत. इ. 10 वी च्या परिक्षेसाठी एकूण 46 विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत तर इ. 12 वी च्या परिक्षेसाठी एकूण 63 विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत. कॉपीमुक्त परिक्षा होण्यासाठी जिल्हास्तरावर एकूण 2 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या पथाकांमध्ये जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (योजना) आणि प्राचार्य (डाएट) यांचा समावेश आहे. जिल्ह्यामध्ये 2 परीरक्षक केंद्र (कस्टडी) आहेत. ही परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी पुढीलप्रमाणे सूचना दिल्या. परीक्षा केंद्रांचे क...

ऑलिम्पिक डे निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि.20 (जिमाका) :- जगातील सर्वोत्तम क्रीडा महोत्सव ऑलिम्पिकची स्थापना ग्रीस येथे दि.23 जून 1994 रोजी पिअर दी कुबर्टिन यांनी केली. आंतराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (ICC) तसेच जगातील सुमारे 200 पेक्षा अधिक देशाचे ऑलिम्पिक संघ हे जागतिक ऑलिम्पिक समितीच्या स्थापनेचा दिवस म्हणून 23 जून रोजी ऑलिम्पिक डे साजरा करतात. त्याचप्रमाणे आपल्या देशाचे "भारतीय ऑलिम्पिक संघ " व राज्याचे "महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएश्न " हे सन 1952 वर्षापासून "ऑलिम्पिक डे" व ऑलिम्पिक सप्ताह साजरा करीत आहे. त्यानुसार जिल्हास्तरावर ऑलिम्पिक डे साजरा करण्यात यावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था, शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, एन.सी.सी, मेरा युवा भारत, विविध सामाजिक संस्था, औद्योगिक प्रतिष्ठाने यांनी युध्दा आपआपल्या ठिकाणी खेळाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ऑलिम्पिक दिनाचे महत्व विचारात घेऊन चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळा, विविध खेळ स्पर्धांचे आयोजन करुन ऑलिम्पिक डे उत्साहात साजरा करावा, असे आवासहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे. ०००००

डीएपी खताला पर्यायी खते वापरा

सिंधुदुर्गनगरी दि १८(जिमाका) :- डीएपीला पर्यायी खते वापरल्यामुळे केवळ उत्पादन खर्च कमी नाही,तर जमिनीचे आरोग्य सुधारते आणि शाश्वत शेती पध्दतींना प्रोत्साहन मिळते. त्यामुळे, शेतकऱ्यांनी उपलब्ध पर्यायांचा अभ्यास करुन स्थानिक कृषी अधिकारी किंवा कृषी विद्यापीठांच्या तज्ञांचा सल्ला घेऊन खत व्यवस्थापनाचे नियोजन करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे. रासायनिक खतांच्या वाढत्या किमती, विशेषतः डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट) च्या अनुपलब्धतेमुळे किंवा जास्त दरामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी आता अनेक किफायतशीर आणि पर्यायी खतांचे पर्याय उपलब्ध होत आहेत. कृषी तज्ज्ञांकडून आणि अनुभवी शेतकऱ्यांकडून डीएपीला पर्याय म्हणून इतर खतांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे, ज्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि उत्पादन खर्चही कमी होतो. डीएपी (DAP) ला पर्याय का? डीएपी हे फॉस्फरस आणि नायट्रोजन युक्त एक महत्त्वाचे खत मानले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार, अनुदानाचे प्रश्न आणि वितरण साखळीतील अडचणी यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना डीएपी मिळण्यास अडचणी येतात किंवा ते चढ्या भाव...

मुलांच्या जडणघडणीत शिक्षकांसह पालकांची भूमिका महत्त्वाची

सिंधुदुर्गनगरी दि.17 (जिमाका):- लहान मूल हे कोऱ्या पाटीप्रमाणे असते. त्या पाटीवर जसे गिरवाल तशी त्याच्या आयुष्याची जडणघडण होत जाते. त्याचे व्यक्तिमत्त्व घडवण्याची मुख्य आणि महत्वाची भूमिका कोणाची ? तर ती त्याच्या पालकांची आणि शिक्षकांची आहे. म्हणून पालकांनी आणि शिक्षकांनी आपली भूमिका यशस्वीपणे पार पाडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले. शालेय प्रवेशोत्सव कार्यक्रमांतर्गत कुडाळ तालुक्यातील पणदूर येथील जिल्हा परिषद शाळा क्र.2 मधील विद्यार्थ्यांशी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी संवाद साधला. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, मूल लहान असताना त्यास योग्य ते संस्कार करणे, चांगले वळण लावणे, शिस्त लावणे हे पालकांचे कर्तव्य आहे. मुलासमोर पालकांनी मोबाईल घेऊन बसू नये कारण ते अनुकरणप्रिय असल्याने त्यांना तशी सवय लागू शकते. पालक कितीही व्यस्त असले तरी दिवसातून काही वेळ तरी मुलांसाठी नक्की द्यायला पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. त्याच्या शाळेमध्ये काय चालू आहे ? त्याला शाळेत काय शिकवले जाते, त्याला योग्य प्रकारचा आहार मिळतो का हे सुद्धा पालकांनी पाहावे. शिक्षकांनी देखील विद्य...

प्राधिकरणातील होर्डिंग्ज, पोस्टर, फलक, बोर्ड आठ दिवसांत काढावेत

सिंधुदुर्गनगरी दि १७ (जिमाका) :- सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रात विविध प्रकारचे (राजकीय, सामाजिक, वैयक्तिक शुभेच्छा) इ. प्रकारचे होर्डिंग्ज, पोस्टर्स, फलक बोर्ड इ. विनापरवानगी लावण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. असे लावण्यात आलेले सर्व प्रकारचे होर्डिंग्ज, पोस्टर्स, फलक बोर्ड इ. सदरची सूचना प्रसिध्द झाले पासून आठ दिवसांत आपले स्तरावरून काढण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी, व सचिव सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण तथा अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिल्या. आठ दिवसात होर्डिंग्ज, पोस्टर, फलक, बोर्ड इ. जाहिराती आपले स्तरावरून न काढल्यास कोणत्याही प्रकारची सूचना न देता होर्डिंग्ज, पोस्टर्स, फलक, बोर्ड या कार्यालयाकडून काढून टाकण्यात येतील व त्यासाठी येणारा खर्च महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील तरतुदीनुसार आपणाकडून वसूल करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच भविष्यात प्राधिकरण क्षेत्रात होर्डिंग्ज, पोस्टर, फलक बोर्ड इ. लावायचे झाल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण तथा अपर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाची पूर्वपरवानगी घेणे आवश...

विविध क्रीडा प्रबोधनीमध्ये प्रशिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु पात्र खेळाडूंनी 23 जूनपर्यंत नाव नोंदणी करावी

सिंधुदुर्गनगरी दि 17 (जिमाका) :- महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलीत आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, शिवछत्रपती क्रीडापीठ म्हाळुंगे-बालेवाडी पुणे अंतर्गत राज्यात विविध क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत. सन २०२५-२६ साठी शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत ०९ क्रीडा प्रबोधनीमध्ये सरळप्रवेश ५० टक्के व कौशल्य चाचणी ५० टक्के प्रक्रियेअंतर्गत खालील निकषांनुसार निवासी व अनिवासी प्रवेश देण्यात येणार आहेत. यासाठी पात्र खेळाडूंनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे २३ जून २०२५ पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन कार्यासन क्रीडा अधिकारी यांनी केले आहे. प्रवेश प्रक्रीयासाठी नियम अटी व शर्ती पुढीलप्रमाणे- क्रीडा प्रबोधिनी ठिकाणे -राज्यात पुणे, कोल्हापूर, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, गडचिरोली अशा ९ ठिकाणी क्रीडा प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली होती. ही ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी...

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला पुल आणि साकवांच्या सद्यस्थितीचा आढावा

सिंधुदुर्गनगरी दि 16 (जिमाका) पावसाळी परिस्थिती लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुल आणि साकवांच्या सद्यस्थितीबाबतचा आढावा पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयातून दूरदृश्य प्रणालीव्दारे घेतला. जिल्ह्यातील धोकादायक साकव तसेच पुल नागरिकांच्या वापरासाठी तात्काळ बंद करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाला दिले. नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी साकवांच्या शेजारी साकव नादुरुस्त असल्याचा फलक लावा जेणेकरुन दुर्घटना होणार नाही. अनुचित प्रकार टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी गांभीर्यपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी नवीन पुल बांधण्यात आलेला आहे अशा ठिकाणचे साकव वापरासाठी पुर्णपणे बंद करा असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. राष्ट्रीय महामार्गाबाबत निर्देश देताना ते म्हणाले, पावसामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांची तात्काळ दुरूस्ती करा. रस्ते दुरुस्तीचे काम दर्जेदार झाले पाहिजे जेणेकरुन वारंवार ही समस्या निर्माण होणार नाही. हे काम आगामी काळात सणासुदीचे दिवस लक्षात घेता प्रवासामध्ये नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश द...

मुख्य अभियंता शरद राजभोज यांनी केली पाहणी

सिंधुदुर्गनगरी दि 16 (जिमाका) सार्व‍जनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज यांनी मालवण येथील राजकोट किल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आणि परीसराची पाहणी केली. 14 व 15 जून 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा व मालवण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे चबुतऱ्याच्या बाजूने भरलेला मातीचा भराव (Backfilling) किंचित प्रमाणात खचला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व चबुतरा पूर्णपणे मजबूत, सुरक्षित आणि सुस्थितीत आहे. चबुतऱ्याच्या मुख्य रचनेवर किंवा पुतळ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही असे मुख्य अभियंता शरद राजभोज यांनी यावेळी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्यांच्या भोवतालचा परिसर यांची नियमित देखभाल आणि सुरक्षा परीक्षण या विभागामार्फत नियमानुसार सातत्याने करण्यात येते. सदर खचलेला भाग तात्काळ दुरुस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरु करण्यात आल्या असून हे काम अत्यंत तत्परतेने या विभागाकडून करण्यात येत असल्याची माहिती सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. यावेळी अधीक्षक अभियंता मिलिंद कुल...

अरुणा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील -पालकमंत्री नितेश राणे

• मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करुन धोरणात्मक प्रश्न सोडविणार • पंधरा दिवसानंतर पुन्हा आढावा घेणार सिंधुदुर्गनगरी, दि.13 (जि.मा.का) : अरुणा प्रकल्पामुळे बाधित प्रकल्पग्रस्तांना पायाभूत सुविधा मिळणे हा प्रकल्पग्रस्तांचा हक्क असून त्यांना त्या सुविधा पुरविणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. प्रकल्पग्रस्तांना पाणी, रस्ते, वीज अशा अत्यंत महत्वाच्या सुविधा प्रशासनाने तात्काळ पुरविण्याचे निर्देश देत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली अरुणा मध्यम प्रकल्पाच्या विविध विषयांच्या संदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, अपर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, आखवणे-भोम अरुणा प्रकल्प संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी आणि गांवकरी उपस्थित होते. पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, गावकऱ्यांनी कोणत्याही विरोधाशिवाय आपली जमीन या प्रकल्पासाठी दिलेली आहे. प्रकल्पग्रंस्तांना पायाभुत सुविधा ...

नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदासाठी 1 ते 8 जुलै रोजी ऑनलाईन परिक्षेचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.13 (जि.मा.का) : नोंदणी व मुद्रांक विभागात ऑनलाईन शिपाई 'गट-ड' संवर्गात 284 पदे भरतीकरीता आय.बी.पी.एस. (इंस्टीटयुट ऑफ बँकीग पर्सोनेल सिलेक्शन) कंपनीकडुन 22 एप्रिल 2025 ते 16 मे 2025 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरुन घेण्यात आले आहेत. त्यानुसार आय.बी.पी.एसच्या संकेतस्थळावर यशस्वीरित्या भरलेले अर्ज व पात्र असलेल्या उमेदवारांची शिपाई पदासाठी 1 जुलै 2025 ते 8 जुलै 2025 या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती सह जिल्हा निबंधक वर्ग -1 प्राची घोलप यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र ,हॉलतिकीट उमेदवारास त्यांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर आय.बी.पी.एस. यांचेकडून पाठविण्यात येणार आहे. परीक्षेकरीता विभागाकडुन कोणत्याही इतर एजन्सीची वा मध्यस्थाची नेमणुक करण्यात आली नाही. जर याबाबत कोणती व्यक्ती, संस्थेकडुन, मध्यस्थ अथवा तशी बतावणी करण्यात येत असल्यास अशा व्यक्ती वा संस्थेपासुन उमेदवारांनी कृपया सावध राहावे,असे आवाहन नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक निरीक्षक रविंद्र बिनवडे यांनी केले आहे. 000000

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी, दि.13 (जि.मा.का) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील युवांनी केलेले समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने त्यांना प्रतिवर्षी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतो, सन 2024-25 साठी जिल्हा युवा पुरस्कारासाठी 15 जुलैपर्यंत जिल्हा क्रीडा कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे. राज्याचे युवा धोरण 2012 मधील शिफारशीच्या अनुषंगाने शासनाने जिल्हास्तरावरील युवा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलेला आहे. जिल्हा युवा पुरस्कार तीन जणांना दिला जाणार आहे, यात युवक, युवती व नोंदणीकृत संस्था यांचा समावेश असणार आहे. युवा अथवा नोंदणीकृत संस्थानी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती जमाती व जनजाती, आदिवासी भाग इ. बाबतचे कार्य, शिक्षण, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या इ. बाबत पुरस्कार वर्षापासून गत तीन वर्षात केलेली कार्यकामगिरी या पुरस्कारांसाठी विचारात घेतली जाईल. अर...

फळपीक विम्यासाठी 'शेतकरी ओळखपत्र क्रमांक' बंधनकारक

सिंधुदुर्गनगरी, दि.13 (जि.मा.का) : राज्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी 'शेतकरी ओळखपत्र क्रमांक' (Farmer ID) अनिवार्य करण्यात आला आहे. मृग आणि आंबिया बहारातील सन 2025-26 च्या पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे अॅग्रिस्टॅक अंतर्गत हा युनिक क्रमांक असणे बंधनकारक राहील, असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग व आंबिया बहारातील अधिसूचित फळपिकांसाठी सन 2024-25 व 2025-26 या दोन वर्षांच्या कालावधीसाठी राज्यात राबविण्यास मान्यता दिली आहे. या योजनेची अंमलबजावणी सध्या सुरू आहे. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या लाभाकरिता 15 एप्रिल 2025 पासून शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) अनिवार्य केला आहे. या निर्णयामुळे आता फळपीक विमा योजनेतही पारदर्शकता आणि सुलभता येण्यास मदत होणार आहे, कारण यामुळे शेतकऱ्यांची अचूक ओळख आणि त्यांच्या जमिनीची माहिती एकत्रित करणे सोपे होईल. या नवीन नियमामुळे आता जे शेतकरी सन २०२५-२६ च्या मृग आणि आं...

आपत्ती व्यवस्थापन काळात यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

सिंधुदुर्गनगरी दिनांक 12 (जिमाका) :- प्रादेशिक हवामान विभागाकडून प्राप्त पूर्व सूचनेच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक १२ व १५ जून २०२५ रोजी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला असून दि. १३, १४ व १६ जून २०२५ रोजी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. दि. १२ व १३ जून २०२५ रोजी जिल्ह्यात गडगडाटासह पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. तरी आपत्ती व्यवस्थापन काळात यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिलेले आहेत. सदर सूचनेच्या अनुषंगाने सर्व विभागांनी पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. (१) प्रत्येक विभागाने आपल्या आपत्ती व्यवस्थापन प्रमाणित कार्य पद्धतीप्रमाणे काम करावे. (२) दिनांक १२ जून ते १६ जून २०२५ या कालावधीतील अतिवृष्टी व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता विचारात घेता रस्त्यात झाडे पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडू शकतात. त्यानुषंगाने बांधकाम विभाग यांनी सतर्क राहून रस्त्यावर पडलेली झाडे वेळीच बाजूला होतील याबाबत आवश्यक ते नियोजन करावे. त्याकरिता वूड कटर, JCB तयार ठेवावेत. तसेच रस्...

जिल्ह्यात 12 व 15 जून रोजी रेड अलर्ट या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 12 (जिमाका) :- जिल्ह्यात दि. १२ व १५ जून २०२५ रोजी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. तर दि. १३, 14 व 16 जून रोजी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच दि. 12 व 13 जून रोजी जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची शक्यता असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली आहे. या कालावधीत विजा चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी (१) विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. (२) दूरध्वनी, भ्रमणध्वनी चा वापर टाळावा. (३) विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. (४) विजेच्या खांबांपासून लांब रहावे. (५) विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. (६) विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. (७) धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात. (८) वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाईल वर ‘दामिनी APP’ डाऊनलोड करून घ्यावे. (९) पाऊ...

तळेरे- वैभववाडी- गगनबावडा रस्त्यासंदर्भात बैठक भुसंपादनाच्या प्रस्तावावर सकारात्मक विचार करणार -पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी दि.१२ (जि.मा.का.) : वैभववाडी-कोल्हापूर मार्गावरील करुळ (गगनबावडा) हा घाट जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण आहे. या मार्गाकडे विकासाचा मार्ग म्हणून आम्ही सर्वजण पाहतो. करुळ घाट मार्गाचे काम हे दर्जेदार झालेले आहे. या मार्गातील तळेरे- वैभववाडी रस्त्याच्या भुसंपादनाबाबत गांवकऱ्यांच्या तक्रारी आहेत. या अनुषंगाने रस्त्याच्या हद्दीबाबत जिल्हाधिकारी आणि कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, रत्नागिरी यांनी कागदपत्रे तपासून प्रस्ताव सादर करावा. या प्रस्तावावर सकारात्मक विचार केला जाईल असे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली कणकवली येथे तळेरे-वैभववाडी-गगनबावडा रस्त्याच्या भुसंपादनाच्या अनुषंगाने पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, राष्ट्रीय महामार्गचे मुख्य अभियंता संतोष शेलार, अधीक्षक अभियंता श्रीमती तृप्ती नाग, कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, प्रमोद रावराणे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, करुळ सरपंच नरेंद्र कोलते, कोकिसरे सरपंच प्रदीप नारकर, माजी नगराध्यक्ष नेहा माईणकर, नगरसेवक रणजीत तावडे, संगीता चव्हाण, सुधीर नकाशे, दिलीप तळेकर, भा...

एक जिल्हा एक उत्पादनांच्या (ODOP) वेष्टनांवर (पॅकेजिंग) वर अधिकृत लोगोचा वापर करावा - जिल्हाधिकारी अनिल पाटील

सिंधुदुर्गनगरी, दि.12 (जि.मा.का) : एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड अल्फान्सो मँगो आणि प्रोसेसड कॅश्यू या दोन उत्पादनांचा समावेश झालेला आहे. आपल्या जिल्ह्यातील सर्व ODOP उत्पादन विक्रेते, औद्योगिक समूह (क्लस्टर) आणि उद्योग घटकांनी त्यांच्या उत्पादनांच्या पॅकेजिंग वर अधिकृत लोगोचा वापर करावा. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड हापूस आंबा व काजू प्रक्रिया या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांना स्थानिक व जागतिक बाजारपेठ मिळण्यास सहकार्य मिळेल. यामुळे ग्राहकांमध्ये उत्पादनाची दृश्यमानता (Visibility), गुणवत्ता आणि खरेपणाची ओळख निर्माण होईल. तसेच ODOP उत्पादकांना बाजारपेठ मिळण्यास मदत होणार असल्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले. भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयामार्फत 'एक जिल्हा एक उत्पादन' (ODOP) उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याने एक जिल्हा एक उत्पादन ODOP उपक्रमास चालना देण्यासाठी सक्रीय सहभाग नोंदविला असून राज्यामार्फत सर्व ३६ जिल्ह्यामधून ७२ प्रमुख ODOP उत्पादने अधिसूचित केली आहेत. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १. देवगड अल्फ...

नागरी संरक्षण स्वयंसेवकासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.12 (जि.मा.का):- उपनियंत्रक नागरी संरक्षण कार्यालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व तालुक्यामध्ये रिक्त असलेली मानसेवी सदस्य पदांची भरती करण्यासाठी स्वयंसवेक नोंदणी कार्यक्रम दिनांक 13 ते 18 जून रोजी सकाळी 10 वाजता उपनियंत्रक नागरी संरक्षण कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी तसेच जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय व प्रशिक्षण केंद्र सिंधुदुर्गनगरी (ओरोस) सिडको भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी जिल्ह्यातील पुरुष, महीला प्रवर्गांनी नवीन सदस्य नोंदणीसाठी उपस्थित रहाण्याचे आवाहन जिल्हा समादेश होमगार्ड तथा अपर पोलिस अधिक्षक कृषिकेश रावले यांनी केले आहे. स्वंयसेवक नोंदणी पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे:- भारतीय नागरिक असावा, वयाची कीमान 18 वर्ष पुर्ण झालेली असावेत, किमना चौथी पास असावा, शररिक दृष्ट्या सुदृढ असावा व कोणताही गुन्हा दाखल नसावा. लागणारे कागदपत्रे:- शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पास बुक-( बँकेचे नाव, खाते क्रमांक, आयएफसी कोड, पहीले पान), वैद्यकीय प्रमाणपत्र व सध्याचे 4 फोटो. निवड होऊन पात्र ठरलेले उमेदवार हे वेतनी सेवत असल्यास कार्य...

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 16 जून रोजी

सिंधुदुर्गनगरी, दि.11 (जि.मा.का): जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार दि.16 जून 2025 रोजी सकाळी 11 ते दु. 1 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी समस्याग्रस्त व पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वैशाली काकडे यांनी केले आहे. राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला समान संधी समान हक्क असा मुलभूत अधिकार दिलेला आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांचे तक्रारी व अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी / तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. समस्याग्रस्त व पीडित महिलांनी प्रश्न मांडून त्यांचे हक्कांचे संरक्षण व्हावे व त्यांना न्याय मिळाव या दृष्टीने महिलांच्या तक्रारी व अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक होण्यासाठी महिला लोकशाही दिन हा एक उत्तम मार...

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने तालुकानिहाय शिबीरे माहे जुलै ते डिसेंबर 2025

सिंधुदुर्गनगरी, दि.11 (जि.मा.का): उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाव्दारे जिल्ह्यात जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीत तालुका निहाय शिबीरे घेण्यात येणार असून त्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी दिली. शिबिराचे वेळापत्रक माहे देवगड दिनांक कणकवली दिनांक मालवण दिनांक वेंगुर्ला दिनांक सावंतवाडी दिनांक दोडामार्ग दिनांक जुलै -2025 02 03,23 09 10 16,24 17 ऑगस्ट -2025 05 06,20 07 12 13,21 19 सप्टेंबर-2025 02 03,24 09 10 17,25 18 ऑक्टोंबर-2025 07 08,28 09 14 15,29 16 नोव्हेंबर-2025 04 06,26 12 13 19,27 20 डिसेंबर -2025 03 04,23 10 11 17,24 18 00000

आयुष्मान वय वंदना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.11 (जि.मा.का): भारत सरकारने 1 एप्रिल 2025 पासून 70 वर्षावरील सर्व जेष्ठ नागरिकांना त्यांच्या उत्पन्न विचारात न घेता आयुष्मान वय वंदना योजनेंतर्गत मोफत आरोग्य कव्हरेज प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. तरी जिल्ह्यातील 70 वर्ष व त्यावरील नागरीकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे. आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबविण्यात येत आहे. यायोजनेंतर्गत केंद्र शासनाच्या निर्णयानुसार वेळोवेळी इतर लाभार्थी कुटूंबांचा समावेश करण्यात येऊन त्यांना आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत विनामुल्य वैद्यकीय लाभ प्रदान करण्यात येत आहे. आयुष्मान वय वंदना कार्ड निर्माण (ई-केवायसी) करण्याची प्रक्रिया:- आधार कार्डद्वारे लाभार्थ्यांची ई-केवायसी केली जाते. BIS 2.0 प्रणालीमधील आयुष्मान वयवंदना या टॅबमध्ये जाऊन लाभार्थ्यांच्या आधार कार्डद्वारे पडताळणी करुन त्याची ई-केवायसी केली जाते. ऑपरेटर लॉगिनद्वारे क्षेत्रिय स्तरावरील आशा कर्मचारी, आपले सरकार से...

जागतिक बालकामगार विरोधी दिन

सिंधुदुर्गनगरी, दि.11 (जि.मा.का): बालकामगार या सामाजिक अनिष्ट प्रथेचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने समाजामध्ये जागृती होण्यासाठी शासनाच्या विविध विभागामार्फत व विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून सरकारी कामगार अधिकारी, कार्यालयामार्फत जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आले असल्याची माहिती सरकारी कामगार अधिकारी यांनी दिली आहे. 14 वर्षाखाली बालकास सर्वच व्यवसाय व प्रक्रियांमध्ये काम करण्यास प्रतिबंध करण्यास आलेला आहे. 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन बालकास धोकादायक व्यवसाय व प्रक्रियांमध्ये कामगार ठेवणे हा फौजदारी गुन्हा आहे. फौजदार गुन्ह्यासाठी 6 महीने ते 2 वर्षापर्यंत वाढविता येईल इतक्या तुरुंगवासाची शिक्षा किंवा किमान रु. 20 हजार ते कमाल रु. 50 हजार इतका दंड किंवा दोन्हीही शिक्षा मालकास होऊ शकतात. गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास, किमान 1 वर्ष ते 3 वर्षापर्यंत वाढविण्यात येईल इतकी तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. सर्व औद्योगिक संघटना, असोशिएशन, व्यापारी असोशिएशन, क्रिडाई- बांधकाम व्यवसायातील मालक असोशिएशन व वीटभ...

आंतराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.11 (जि.मा.का): जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांच्या माध्यमातून व जिल्हा योग संघटनेच्या सहकार्यने जिल्हा क्रीडा संकुल येथे 21 जून रोजी सकाळी 7.30 वाजता आंतराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था, शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, एन.सी.सी, मेरा युवा भारत, विविध सामाजिक संस्था, औद्योगिक प्रतिष्ठाने यांनी सुध्दा आपआपल्या ठिकाणी 10 वा. आंतरराष्ट्रीय योग दिन भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयाच्या प्रोटोकॉल नुसार साजरा करावा असे आवाहन जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांच्यावतीने करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या प्रोटोकॉल बातचे सविस्तर माहिती www.ayush.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शारीरिक व अध्यात्मिक विकासासाठी योगाचे महत्व विचारात घेऊन प्रतिवर्षी दि. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. यानुसार प्रतिवर्षी...

जिल्ह्यात 12 जून रोजी यलो अलर्ट, 13 ते 15 जून रोजी ऑरेज अलर्ट या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 11 (जिमाका) :- जिल्ह्यात दि.११ ते १२ जून २०२५ रोजी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर दि.१३ ते १५ जून रोजी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच दि. ११ व १२ जून रोजी जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. दि. ११ जून रोजी ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने तर १२ जून रोजी ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच दि. १३ ते १५ जून २०२५ या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून १३ जून रोजी गडगडाटासह पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची व ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारे वाहण्याची शक्यता असल्याचे माहिती प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी कळविले आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे. या कालावधीत विजा चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी (१) विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. (२) दूरध्वनी, भ्रमणध्वन...

१०० वट वृक्षांचे वाटप वटवृक्षाचे जतन व संवर्धन होणे आवश्यक - जिल्हाधिकारी अनिल पाटील

सिंधुदुर्गनगरी दि १० (जिमाका) वडासारखा महत्त्वपूर्ण वृक्ष आपण जतन केला पाहिजे. झाडांच्या फांद्या तोडून पर्यावरणाचे संतुलन बिघडवण्यापेक्षा प्रत्येकाने वृक्षाची लागवड करून त्याची काळजी घेऊन त्याचे संवर्धन करत पर्यावरण रक्षणास हातभार लावणे आज काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने आपला हा एक छोटासा प्रयत्न आहे अशाच रीतीने प्रत्येक वटपौर्णिमेच्या दिवशी वृक्ष संवर्धनाचे आपले कर्तव्य प्रत्येकाने लक्षात ठेवून पर्यावरण रक्षणाच्या चळवळीत हातभार लावावा असे प्रतिपादन करत जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी अशा प्रकारच्या वेगळ्या वटपौर्णिमा सणाचे आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. वटपौर्णिमा सणाचे औचित्य साधून वटवृक्षाचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचावे या हेतूने जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे आगळ्यावेगळ्या वटपौर्णिमा सणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी अनिल पाटील , श्रीमती सुनिता पाटील, अपर जिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती आरती देसाई, उपजिल्हाधिकारी भूसंपादन श्रीमती शारदा पोवार, तहसीलदार पुनर्वसन श्रीमती शितल जाधव, श्रीमती चैताली सावंत, ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभ

मुंबई, दि. 10 : आयएनएस गुलदार या नौदलातून सेवानिवृत्त झालेल्या युद्धनौकेचे पाण्याखालील संग्रहालय आणि जहाजाभोवती कृत्रिम प्रवाळ निर्माण करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक जवळ हा प्रकल्प होणार असून याचा शुभारंभ दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. भारतातील हा पहिलाच उपक्रम असून यामुळे सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना मिळणार आहे. समुद्रात विराजमान होणाऱ्या जहाजाभोवती प्रवाळ निर्मिती होऊन त्याद्वारे स्कुबा डायव्हिंग व भविष्यात पाणबुडीद्वारे पर्यटन करता येणे शक्य होणार आहे. केंद्र शासनाने ऐतिहासिक पाऊल उचलत भारतीय नौदलाचे निवृत्त जहाज आयएनएस गुलदार हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सुपूर्द केले आहे. जगातील अनेक देशात असे प्रकल्प तयार केले आहेत. हा प्रकल्प तयार करण्यासाठी प्रधानमंत्री नरे...

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी, दि.9 (जि.मा.का): केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत दरवर्षी निस्वार्थी कृती व अतुलनिय शौर्य गाजविलेल्या बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दिला जातो. या अनुषंगाने क्रीडा, खेळ, सामाजिक सेवा, विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण, कला व संस्कृती आणि नाविन्यपूर्ण काम या क्षेत्रात अतुलनीय कार्य केलाने कोणतेही बालक, भारतीय नागरिक असून ज्याचे वास्तव्य भारतात आहे व ज्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त नाही, तसेच उच्चकोटीची असामान्य क्षमता व कौशल्य मिळवलेल्या बालकांकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 साठी अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बैशाली काकडे यांनी दिली आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार खालील दोन प्रकारात देण्यात येतो बाल शौर्य पुरस्कार :- नैसर्गिक आपत्ती किंवा मानवनिर्मित संकटात, स्वतःचा जीव धोक्यात घालून, प्राणाची बाजी लावून अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्या किंवा प्रसंगावधान राखून तात्काळ प्रतिसाद देऊन स्वतःला किंवा समाजातील कुणालाही वाचविणाऱ्या शुरु बालकाला प्रधानमंत्री राष्ट्रीय "बाल शोर्य पुरस्कार...

वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागामध्ये लघुशस्रक्रियागृह सुरु होणार

सिंधुदुर्गनगरी, दि.9 (जि.मा.का): शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथील बाह्यरुग्ण विभागामध्ये राष्ट्रिय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानंकानुसार लवकरच लघुशस्रक्रियागृह सुरु होणार असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग चे अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या दि. 6 जून रोजी झालेल्या रुग्णालयीन राउंड मध्ये जागा निश्चित करण्यात आली आहे. दररोज सकाळी ८ ते दुपारी २ या कालावधीमध्ये बाह्यरुग्ण विभाग येथे जनरल सर्जरी, ऑर्थोपेडिक सर्जरी, कान नाक व घसा शास्त्र, नेत्र चिकित्सा शास्र, स्रीरोग इत्यादि विभागाशी संबंधित लघु शस्रक्रिया विविध विभागाशी संबंधित सर्जन व तज्ज्ञांमार्फत पार पाडल्या जातील. लघु शस्त्रक्रियांमध्ये शरीरावर असलेल्या विविध गाठी जसे कि चरबीच्या गाठी, घामाच्या ग्रंथीच्या गाठी, सिस्ट तसेच कर्करोगाशी संबंधित बायोप्सी, लिफ नोड बायोप्सी, अल्सर सर्जरी इत्यादी शस्त्रक्रिया होणार आहेत.या शस्त्रक्रिया ह्या डे -केअर सर्जरी मध्ये मोडत असल्यामुळे याकरिता रुग्णांना रुग्णालय...

शासकीय वसतिगृह योजनेचे अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी 10 जून अंतिम मुदत

सिंधुदुर्गनगरी, दि.9 (जि.मा.का): सामाजिक न्याय विभाग, सहायक आयुक्त समाज कल्याण सिंधुदुर्ग या कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय वसतिगृहांची प्रवेश-प्रक्रिया सन 2024-25 पासून https://hmas.mahait.org या ऑनलाईन पोर्टलवरती सुरू करण्यात आलेली असून विद्यार्थ्यांचे अर्ज पोर्टलव्दारे स्वीकारण्यात आले आहेत. अनेक विद्यार्थी यांनी Revert Back केलेले अर्ज अजून फेरसादर केले नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अर्जातील त्रृटींची पूर्तता करण्यासाठी दि. 10 जून 2025 अंतिम मुदत देण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयांतर्गत मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मालवण, कणकवली व वेंगुर्ला असे एकूण ०३ तसेच मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मालवण, कणकवली, सावंतवाडी ,वेंगुर्ला व देवगड असे ०५ एकूण ०८ शासकीय वसतिगृहामध्ये विदयार्थी, विद्यार्थीनींना सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध झालेली आहे. तरी अनुसूचित जाती, विमुक्त ज...

'मुख्यमंत्री रोजगार निर्मित कार्मक्रम' योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.9 (जि.मा.का): राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगाराच्या नवीन संधी विचारात घेवून उद्योजकतेला चालना देणारी सर्वसमावेशक मुख्यमंत्री रोजगार निर्मित कार्यक्रम (CMEGP) ही योजना राबविण्यात येत आहे. नवीन शासन निर्णयानुसार पात्र लाभार्थ्यानी या योजनेंचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांनी केले आहे. नविन शासन निर्णय नुसार पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात आल्या आहेत. कुक्कुटपालन, अंडी उबवणी केंद्र, मधुमक्षिका पालन, मत्स्यपालन, रेशीम उद्योग, हॉटेल/धावा शाकाहारी/मांसाहारी पदार्थ विक्री व्यवसाय, होमस्टे, क्लाउड किचन, जलक्रीडा, मासेमारी, प्रवासी वाहतुकीकरिता बोट व्यवसाय ई. उद्योगाचा समावेश करण्यात आला आहे. वयोमर्यादा कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी ज्याचे किमान वय 18 वर्ष पूर्ण झाले आहे. वयास कमाल मर्यादा नाही. सेवा उद्योगास प्रकल्प मर्यादा 50 लाख आहे तर उत्पादन उद्योगासाठी 1 कोटी रुपये करण्यात आले आहेत. प्रकल्प खर्चाचे वर्गीकरण मध्ये बदल करण्यात आले असून खेळते भां...

जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात शिवस्वराज्य दिनी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचे‍ छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

सिंधुदुर्गनगरी दि 06 (जिमाका):- छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याच्या प्रेरणेचा स्मृतीदिन म्हणजे शिवस्वराज्य दिन, आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशव्दारामध्ये भगवा स्वराज्य ध्वजसंहितेनुसार ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात आली. जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक डॉ. माणिक दिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवशक राजदंड व गुढीचे पूजनही करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, विशाल तनपुरे यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राज्यगीत आणि राष्ट्रगीताने झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 रोजी रायगडावर राज्याभिषेक करून स्वराज्याची स्थापना केली. महाराष्ट्र शासनाने 2021 पासून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. 000000

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी 10 जून अंतिम मुदत

सिंधुदुर्गनगरी, दि.6 (जि.मा.का): शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने विभागाच्या संकेतस्थळावर दि. १५ मार्च २०२५ पर्यंत स्विकारण्यात आलेले होते. सन २०२४-२५ मधील ज्या विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेचा अर्ज विहीत मुदतीत ऑनलाईन प्रणालीवर भरलेले आहेत. सर्व अर्जाची तपासणी कार्यालयाकडुन करण्यात आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीमध्ये आहेत त्यांनी मंगळवारी दि.१० जुन २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने त्रुटी पुर्तता करण्याकरीता अंतीम मुदत देण्यात येत असल्याची माहिती समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे. शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या किंवा शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधां अभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविली जाते. ११ वी १२ वी तसेच १२ नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात, शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश म...

वैभववाडी तालुक्यातील कीटकनाशक विक्री केंद्राचा परवाना निलंबित"

सिंधुदुर्गनगरी, दि.6 (जि.मा.का):- कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांनी वैभववाडी तालुक्यातील नारकरवाडी येथील प्रोप्रा. लक्ष्मन सोपान मुंढे यांच्या मालकीच्या मे. कोकण कृषी विकास केंद्राची नियमित तपासणी दि. 4 डिसेंबर 2024 रोजी केली होती. या तपासणीत, कीटकनाशके अधिनियम 1968 चे कलम १३, १४ व कीटकनाशके नियम १९७१ चे नियम १० (४,७), १५ चे उल्लंघन झाल्याचे त्यांचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी परवानाधारक यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याचा प्रस्ताव परवाना प्राधिकारी यांना सादर केला होता.त्यानुसार कोकण कृषी विकास केंद्राचा परवाना 25 जून 2025 पर्यंत निलंबित करण्यात अला आहे. या प्रकरणी, परवाना प्राधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्यासमोर 26 मे 2025 रोजी सुनावणी आयोजित करण्यात आली होती. या सुनावणीदरम्यान, मे. कोकण कृषी विकास केंद्राचे प्रोप्रा. लक्ष्मन सोपान मुंढे यांनी कीटकनाशके अधिनियम १९६८ चे कलम १३, १४ व कीटकनाशके नियम १९७१ चे नियम १०(४,७), १५ मधील कायदेशीर तरतुदींचा भंग झाल्याची बाब मान्य करून यापुढे सर्व का...

खते, बियाणे, किटकनाशके खरेदी करताना दक्षता घ्यावी

सिंधुदुर्गनगरी, दि.6 (जि.मा.का):- खरीप हंगाम 2025-26 खरीप हंगामासाठी जिल्ह्यात बियाणे व खते पुरवठा सुरु झालेला आहे. जिल्ह्यात खरीप हंगाम हाच मुख्य हंगाम असून कृषि निविष्ठा खरेदीचा कालावधी देखील अत्यंत अल्प म्हणजे फक्त दोन-तीन महिन्याचा असतो. या बाबीचा विचार करता निविष्ठा खरेदी करताना शेतकऱ्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. जेणेकरून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. आगामी खरीप हंगामात खते, बियाणे व किटकनाशके खरेदी करताना शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे. खरीप हंगाम 2025-26 चा आढावा घेण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जिल्ह्यातील सर्व बियाणे व खते उत्पादक कंपनी, जिल्ह्यातील अधिकृत निविष्ठा विक्रेते यांच्याबरोबर नुकतीच एक बैठक आयोजित केली होती. यावेळी, चुकीच्या पद्धतीने कृषि निविष्ठा विक्री करणारे विक्रेते कृषि विभागाच्या रडारवर असतील. कोणत्याही अवैध व्यवहाराला पाठीशी घातले जाणार नाही, अवैध पद्धतीने वागणाऱ्याना कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, शेतकऱ्यांना बनावट बियाणे, बनावट खते अथवा बनावट किटकनाशके विकणाऱ्या विक्...

उत्कृष्ट लघु उद्योजकांनी पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.6 (जि.मा.का):- जिल्ह्यातील यशस्वी उद्योजकांच्या मेहनतीचे, चिकाटीचे व जिद्दीचे कौतुक करण्याच्या हेतुने जिल्हा स्तरावर उत्कृष्ट सूक्ष्म व लघु उद्योजकांसाठी जिल्हा पुरस्कार योजना सुरु करण्यात आलेली आहे.या योजनेअंतर्गत सन 2024 च्या पुरस्कारांसाठी पात्र सुक्ष्म व लघु उद्योजकांनी 30 जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत प्रथम पुरस्कार विजेत्यास रोख रु. 15 हजार व सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ व व्दितीय पुरस्कार विजेत्यास रोख रु. 10 हजार सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात येते. योजने अंतर्गत 2024 च्या पुरस्कारांकरिता अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण पात्रतेच्या अटी पुढीलप्रमाणे:- अर्जदार घटक या जिल्ह्यातील दि. 01/01/2021 रोजी किंवा त्यापुर्विचा स्थायी लघु उद्योग नोंदणीकृत, पार्ट-2 ज्ञापन स्वीकृतीधारक घटक असावा. मागील दोन वर्षे सलग उत्पादनात असावा. कोणत्याही बँकेचा अथवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.अर्जदार यापूर्वी राष्ट्रीय/अंतरराष्ट्रीय अथवा जिल्हा पुरस्कार मिळालेला नसाव...

‘समृद्धी महामार्ग’ वाढवण बंदराशी जोडणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इगतपुरी येथे हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण

नाशिक, दि. ५ : हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार आहे. येत्या काळात या महामार्गाला वाढवण बंदराशी जोडण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण व सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनीचा लोकार्पण सोहळा दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अन्न व औषध प्रशासन, विशेष साहाय मंत्री नरहरी झिरवाळ, सार्वजनिक बांधकाम (सा. उ.) राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार नितीन पवार, आमदार सरोज अहिरे, आमदार हिरामण खोसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व...

"देवगड तालुक्यातून 3.31 लाखांचा अवैध खत साठा जप्त, विक्रेत्यावर गुन्हा दाखल"

सिंधुदुर्गनगरी, दि.03 (जि.मा.का):- देवगड तालुक्यातील मौजे कातवणेश्वर येथे कृषी विभाग आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 3.31 लाख रुपये किमतीचा अनधिकृत खत साठा जप्त केला आहे. या प्रकरणी कृषी सेवा केंद्राचे मालक राहुल राजेश जोईल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी दिली आहे. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, यांना मौजे कातवणेश्वर येथील सुखकर्ता कृषीसेवा केंद्र या निविष्ठा केंद्राचे नजीकच्या शेतमांगरात कृषीसेवा केंद्राचे मालक राहुल राजेश जोईल, रा. कुणकेश्वर कातवणेश्वर ता. देवगड हे अवैधरित्या रासायनिक व सेंद्रीय खताचा साठा व विक्री करत असलेबाबत दिसुन आले. संबधितांना विचारणा केली असता त्यांच्या जवळ खत विक्रीसाठी आवश्यक परवाना नसल्याचे आढळून आले. त्यामुळे देवगड पोलीस ठाणे येथुन पोलीस मदत घेवुन शेतमांगराची तपासणी केली असता त्यामध्ये-(i) महाराष्ट्र बायो फर्टीलायजर इंडिया प्रा.लि या कंपनीचे ब्राउन गोल्ड ऑरगॅनिक म्यँनुअर प्रत्येकी 50 किलो बँग प्रत्येक बँगची किंमत 975 रुपये असे एकुण 156 बँग, बँग क्रं. BG01, उत्पादन तारी...

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती योजनेसाठी 15 जूनपासनू अर्ज सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी दिनांक 3 जून 2025 (जिमाका वृत्त) :- शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृती व व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व नुतनीकरण अर्ज नोंदणी करण्याची सुरुवात 15 जून पासून महाडिबीटी पोर्टलवर https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ, वरिष्ठ व व्यावसायिक महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालयात प्रवेशित योजनेस पात्र विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी पुढीलप्रमाणे वेळापत्रकानुसार कार्यवाही करावी. अ.क्र शैक्षणिक स्तर अर्जाचा प्रकार प्राप्त झालेले अर्ज ऑनलाईन अग्रेषित करण्याकरीता प्रस्तावित मुदत (संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्य यांचे करीता) 1 कनिष्ठ महाविद्यालयातील अभ्यासक्रम (उदा.इ.11वी, 12वी (सर्वशाखा), इ.11 वी,12वी MCVC, ITI इ. )...

शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेशाची संधी

सिंधुदुर्गनगरी, दि. 3 (जि.मा.का.): सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयांतर्गत मुला- मुलींच्या शासकीय वसतिगृहाकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मालवण, कणकवली व वेंगुर्ला अशा 3 ठिकाणी तसेच मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मालवण, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला व देवगड असे 5 ठिकाणी आहेत. या 8 शासकीय वसतिगृहामध्ये विदयार्थी, विद्यार्थीनीना सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध झाली, असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले दिली आहे. अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीयसह इतर प्रवर्गाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये रिक्त असणाऱ्या जागेवर विनामूल्य प्रवेश ऑनलाईन पध्दतीने देण्यात येणार आहे. https://hmas.mahait.org या पोर्टलवर अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. गरजू विद्यार्थ्यांनी इ .8 वी ते 10 वी तसेच इ. 10 वी नंतरच्या अभ्यासक्रम व बी.ए, बी.कॉम, बी.एस.सी. अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल...

वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या हॉलमध्ये वस्तू संच वाटप

सिंधुदुर्गनगरी, दि.3 (जि.मा.का):- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत जिल्ह्यातील नोंदणीकृत जिवीत (सक्रिय) बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच (भांडी वाटप) करण्यात येत आहे. मे. मफतलाल इंडस्ट्रिज लि. यांच्यामार्फत 3 जून 2025 रोजी तरळे ग्रामपंचायत येथील वस्तुसंच वाटप कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. त्याऐवजी 5 जून 2025 रोजी आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या हॉल, ता. वैभववाडी येथे करण्यात येणार आहे. सर्व बांधकाम कामगारांनी यांची नोंद घ्यावी. तसेच नोंदीत जिवीत (सक्रीय) बांधकाम कामगारांनी संबंधी ठिकाणी उपस्थितीत राहून वस्तुसंच प्राप्त करुन घेण्याचे आवाहन सरकारी कामगार अधिकारी यांनी केले आहे. या गृहउपयोगी वस्तू संच हे विनामुल्य देण्यात येत आहे, याची नोंद घ्यावी. तसेच संच प्राप्ती करता काही कामगार हे एजंट, व्यक्ती किंवा संघटना यांच्याशी आर्थिक व्यवहार करीत असल्याचे समजत आहे. तरी या कार्यालयामार्फत असे सूचीत करण्यात येते की कामगारांनी अशा कोणत्याही व्यक्ती, एजंट किंवा संघटना यांच्याशी कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करु नये, जर अशा प्रकारच्या आर्थि...

छत्रपती शिवराज्याभिषेक दिन

सिंधुदुर्गनगरी, दि.3 (जि.मा.का):- शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत 6 जून रोजी पद्मश्री रमाकांत आचरेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ओरोस येथे 'छत्रपती शिवराज्याभिषेक दिन' साजरा करण्यात येणार आहे. तरी संस्थेतून उत्तीर्ण झालेले तसेच रोजगार व स्वयंरोजगार करणारे या संस्थेचे माजी प्रशिक्षणार्थींनी उपस्थित रहाण्याचे आवाहन पद्मश्री रमाकांत आचरेकर शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य ए.एस. मोहारे यांनी केले आहे. या कार्यक्रमानिमित्त संस्थेमध्ये निमंत्रित करण्यात आलेल्या प्रमुख व्याख्यांतामार्फत 'सामाजिक समरसता' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. प्रमुख पाहुणे, व्याख्याते तसेच जिल्ह्यातील लोकप्रिनिधींना आमंत्रित करण्यात आलेले आहे. ०००००

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.03 (जि.मा.का):- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या अंतर्गत जिल्हास्तर सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा माहे जुलै 2025 च्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार आहे. याची सर्व जिल्ह्यातील शाळांनी नोंद घ्यावी तसेच जे संघ सुब्रोता मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेत सहभागी होणार आहेत अशा सर्व शाळांनी, संघानी सहभागीपुर्वी www.subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडु तसेच संघानी नोंदणी करण्याचे आवाहन प्र. जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे. राष्ट्रीय सुब्रोता मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेत सहभागी संघानी रु. 2000/- प्रवेश फी भरलेल्या नोंदणीकृत संघानाच या स्पर्धेत सहभागी करुन घेण्यात येईल. सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी जन्मदाखला, आधारकार्ड व पासपोर्ट (सर्व मूळ प्रतीत) सोबत असणे अनिवार्य आहे. तसेच राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंची वैद्यकीय तपासणी होणार असून त्यामध्ये एखाद्या खेळाडू अधिक वयाचा आढळून आल्यास संपूर्ण संघ बाद करण्यात येणार आहे. त्यामुळे खेळाडू अधिक वयाचा नसल्य...