Posts

Showing posts from June, 2021

आजअखेर 35 हजार 184 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 394 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

जिल्हा रुग्णालयातील उत्तम उपचारामुळे आमचा रुग्ण ठणठणीत 60 वर्षीय कोरोनामुक्त रुग्णाच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) – ऑक्सिजनची पातळी 73 पर्यंत कमी झालेली. श्वास घेण्यास त्रास होत होता. धाप लागलेली अशा परिस्थितीत आम्ही आमच्या रुग्णाला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उत्तम उपचार मिळाल्यानेच आमचा रुग्ण ठणठणीत झाल्याची भावना व्यक्त केली आहे, सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त गावातील कोरोनामुक्त रुग्णाच्या नातेवाईकांनी. थकवा आणि श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे कलंबिस्त येथील 60 वर्षीय महिलेस सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखवले होते. तिथे कोरोनाची चाचणी केली. अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रातून 108 रुग्णवाहिकेची सोय ही करण्यात आली. दाखल केले त्यावेळी त्यांची ऑक्सीजनची पातळी 73 पर्यंत खाली आली होती. पण, योग्य उपचार, डॉक्टर्स, नर्स यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी केलेले सहकार्य यामुळे आज या 60 वर्षीय महिला ठणठणीत बऱ्या होऊन नातेवाईकांमध्ये परतल्या आहेत. याकाळात रुग्णालयातील अनुभवाविषयी त्यांचे नातेवाईक सांगतात, थकवा जाणवू लागल्यामुळे सुरुवात...

चर्मकार समाजासाठी स्माईल योजना

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) - राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्या मार्फत अनुसूचित जातीतील चर्मकार समाजासाठी स्माईल अर्थात सपोर्ट फॉर मार्जिनाईलझ्ड इंडिवीड्युअल्स फॉर लाईव्हलीहू़ अँड एन्टरप्राईज ही नवीन योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. कोवीड 19 या महामारीमुळे ज्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती मृत्यू पावली आहे अशा कुटुंबातील प्रमुख वारसदारास एन.एस.एफ.डी.सी. नवी दिल्ली यांच्या मार्फत 5 लाख रुपयांपर्यंत व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना विचाराधीन आहे. या योजनेचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. एन.एस.एफ.डी.सी. कर्ज 4 लाख रुपये, भांडवली अनुदान 1 लाख रुपये यावरील व्याजदर 6 टक्के असणार आहे. या योजनेसाठी मयत व्यक्तीची आवश्यक माहिती पुढीलप्रमाणे आहे. मयत व्यक्तीचे नाव, संपूर्ण पत्ता, आधार क्रमांक, जन्मतारीख, लिंग, जात, पोटजात, मृत्यूचा दिनांक, रेशनकार्ड, मयत झालेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, कुटुंबातील व्यक्तींची एकूण संख्या, कुटुंबातील प्रमुख वारसदार, कुटुंबातील व्यक्तींचे वार्षिक उत्पन्ना( 3 लाख रुपयांच्या आत) कोविड 19 मुळे ...

मालवण पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया सुरू

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) – महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभाग यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२१ -२२ करिता होणाऱ्या पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेसाठी शासकीय तंत्रनिकेतन मालवण (3010) येथे फर्स्ट इयर डिप्लोमा या अभ्यासक्रमांसाठी सुविधा केंद्र (Facilitation Center) सुरु आहे. दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाच्या पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया बुधवार दि. 30 जून ते दि. 31 जुलै या कालावधीत राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज ऑनलाइन भरायचे आहेत. ऑनलाइन पद्धतीमध्ये मध्ये E-Scrutiny व Physical E-Scrutiny असे दोन पर्याय आहेत. कोविड-19 च्या प्रादुर्भाव थांबवण्यासाठीच्या उपाययोजनामध्ये सामाजिक अंतर राखणे, विद्यार्थी व पालकांची होणारी गर्दी टाळणे या साठी E-SCRUTINY या पर्यायची निवड, विद्यार्थी व पालकांनी करावी. Physical E-Scrutiny या पर्यायामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन फॉर्म भरून, प्रिंट घेऊन सुविधा केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहाणे आवश्यक आहे. फॉर्म भरण्यासाठी मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे. शासकीय तंत्रनिकेतन मा...

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 58.6540, अरुणा – 31.9638, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 2.6480, नाधवडे – 3.1205, ओटाव – 1.6224, देंदोनवाडी – 0.4070, तरंदळे – 0.3730, आडेली – 1.2880, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 2.0930, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 1.4310, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 0.8560, दाभाचीवाडी – 1.4810, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.1550, कारिवडे – 1.0830, धामापूर – 1.3410, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 1.0090, ओझरम – 1.8190, पोईप – 0.7610, शिरगाव – 0.6510, तिथवली – 1.3200, लोरे – 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे. 00000

जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 1.3 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1097.312 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 04(1192), सावंतवाडी - 2.4(1352.1), वेंगुर्ला - 00(845.40), कुडाळ - 00(979), मालवण - 00(1040), कणकवली - 00(1239), देवगड - 02(912), वैभववाडी - 02(1219), असा पाऊस झाला आहे. 00000

नोंदणीकृत घरेलू कामगारांच्या खात्यावर अर्थसहाय्य जमा

सिंधुदुर्गनगरी,दि.29 (जि.मा.का): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या नोंदणीकृत घरेलू कामगारांचा बँकेचा तपशील उपलब्ध आहे. अशा कामगारांचा बँक खात्यात रुपये 1 हजार 500 इतके अर्थसहाय्य थेट बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहे. सन 2011 ते मार्च 2021 या कालावधीमध्ये नोंदणी केलेल्या घरेलू कामगारांना आवाहन करण्यात येते की, घरेलू कामगारांचे बँकेचा तपशील उपलब्ध नसल्यामुळे रक्कम रुपये 1 हजार 500 इतके अर्थसहाय्य देता येणे शक्य झाले नाही. या कालावधीमध्ये नांदणी केलेल्या घरेलू कामगारांनी त्यांचे बँकचा तपशील बँकेचे नाव,खाते क्रमांक,आयएफसी कोड, शाखेचे नाव मंडळाच्या http://public.mlwb.in/public या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्यात यावे, नोंदणी करण्यास अडचणी येत असल्यास सरकारी कामगार अधिकारी या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 02362-228872 या क्रमांकावर संपर्क साधावा, जेणेकरुन नोंदणीकृत घरेलू कामगारांना रक्कम रुपये 1 हजार 500 चे अर्थसहाय्य शक्य होईल, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी,सिंधुदुर्ग कार्यालयातर्फे करण्यात येत आहे. 0000

आजअखेर 34 हजार 681 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 572 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

पंचायत समिती वैभववाडीची मासिक सर्वसाधारण सभा 8 जूलै रोजी

सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का) : पंचायत समिती वैभववाडीची मासिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक 8जूलै 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता पंचायत समिती वैभववाडीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. 000

प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत रोजगाराची संधी

सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का) : प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान (PMKUVA) अंतर्गत "मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम" राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये काम करण्यास इच्छूक असलेल्या जिल्हयातील युवक - युवतींसाठी हेल्थकेअर, मेडिकल व नर्सिंग व डोमेस्टिक वर्कर क्षेत्रांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत जिल्हा रुग्णालय,सिंधुदुर्ग व राणी जानकीबाईसाहेब वैद्यकिय संस्था, रुग्णालय यांना महाआरोग्य अंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता देण्यात आली आहे. जिल्हयातील उमेदवार हेल्थकेअर सेक्टरमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्यास इच्छूक आहेत, अशा उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार आपली अनुमती https://forms.gle//M5ZeYjHRJsxbtN9s7 या लिंकवर क्लिक करुन गुगल फॉर्म भरुन नोदवावी. प्रशिक्षण सुरु होण्यापूर्वी ऑनलाईन मार्गदर्शन सत्र आयोजित करुन ईमेल,दूरध्वनीव्दारे याबाबत उमेदवारांना कळविण्यात येईल. नोंदणी करण्यास अडचणी येत असल्यास जि...

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) - तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 353.9950 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 79.13 टक्के भरले आहे. सध्या या प्रकल्पातून 17.96 घ.मी. सेकंद इतका विसर्ग सुरू आहे. जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 58.8810, अरुणा – 30.5235, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 2.6480, नाधवडे – 3.2012, ओटाव – 1.6224, देंदोनवाडी – 0.4347, तरंदळे – 0.4710, आडेली – 1.2710, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 2.0930, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 1.4180, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 0.8560, दाभाचीवाडी – 1.4810, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.1550, कारिवडे – 1.0750, धामापूर – 1.4410, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 0.9730, ओझरम – 1.8190, पोईप – 0.7610, शिरगाव – 0.6510, तिथवली – 1.3200, लोरे – 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे. 00000

जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी 1.87 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 1.87 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1096.012 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 02(1188), सावंतवाडी - 00(1349.7), वेंगुर्ला - 02(845.40), कुडाळ - 02(979), मालवण - 00(1040), कणकवली - 01(1239), देवगड - 01(910), वैभववाडी - 07(1217), असा पाऊस झाला आहे. 00000

रोनामुळे कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झालेल्या अनुसूचित जातीतील कुटुंबांना आधार देणारी स्माईल योजना

सिंधुदुर्गनगरी दि. 28, (जि.मा.का.) - महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत कोविड 19 महामारीत अनुसूचित जातीच्या कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झालेल्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यासाठी स्माईल ही व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना राबविण्यात येणार असल्याचे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, सिंधुदुर्गचे जिल्हा व्यवस्थापक एस.आर.म्हसकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे. प्रसिद्धी पत्रकार म्हटले आहे, सदर योजनेची माहिती आणि अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. पात्रता - अर्जदार अनुसूचित जातीतील असावा, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रुपये 3 लाख पर्यंत असावे, अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाच्या कुटुंबातील सदस्य असावा ( कुटुंब प्रमुखाच्या रेशनकार्डवर सदर सदस्याचे नाव असणे बंधनकारक), मृत्यू पावलेल्या व्यक्तीची वयोमर्यादा 18 ते 60 च्या दरम्यान असावी, मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाची मिळकत कुटुंबाच्या मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीकरिता पुढील पैकी एक दस्ताऐवज आवश्यक आहेत. महानगर पालिका, नगरपालिका यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र( ...

आय टी आय प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दीतीने अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का) : औद्योगिक प्रशिक्षण संस्था ओरोस येथे ऑगस्ट 2021 ची प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पध्दीतीने सुरू होणार आहे. या संस्थेत असलेल्या व्यवसाय व प्रवेश क्षमताची माहिती पुढीलप्रमाणे आहे. वेल्डर-20, डिझेल मॅकेनिक -24,फुड प्रोडक्शन (जनरल)-48, ड्रेस मेकींग-20, फ्रंट ऑफिस असिस्टंट-24, फुड अँड बेव्हरेजीस सर्व्हीस असिस्टंट-20, इलेक्ट्रीशियन-20, मॅकेनिक मोटार व्हेईकल -24, फिटर-20, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक-24, ड्राप्टस्मन (मॅकेनिकल)-20, इन्फॅार्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टीम मेंटेनन्स-24, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे - इयत्ता 10 वी उत्तर्ण गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र (आरक्षणांतर्गत प्रवेशासाठी इच्छुक असल्यास), आर्थिक वर्ष 2020-21 चे नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र (इ.मा.व. वि.मा.प्र.एन.टी(ए,बी,सी,डी ) या आरक्षणांतर्गत प्रवेश घ्यावययाचा असल्यास ), खेळाचे प्रमाणपत्र (जिल्हास्त्र, राज्यस्तर, राष्ट्रीय स्तर,), पाठ्ठयात्तर (एन.सी.सी,एम.सी.सी, स्काऊट गाईट), इंटरमिजीएट ड्रॉईग परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्रमाणपत्र, माजी सैनिक व माजी सैनिक ...

महिंद्रा फायनान्सचे ग्रामीण भागातील ग्राहकांना टपाल कार्यालयांत कर्जाचे हप्ते भरण्याची सुविधा

सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का) : महिंद्रा ॲड महिंद्रा फायनान्सियल लिमिटेडची उप कंपनी असलेल्या महिद्रा रुरल हाउसिंग फायनान्स लिमिटेड (MRHFL) आणि इेडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) यांनी कॅश मेनेजमेंट सोल्युशनसाठी भागीदारी करण्याची घोषणा केली आहे. या करारनाम्याचा भाग म्हणून आयपीपीबीमार्फत सर्व टपाल कार्यालये MRHFL कॅश मॅनेजमेंट आणि संकलन सेवा देणार आहेत. कॅश मॅनेजमेंट सेवेमुळे ग्राहकांना सर्व टपाल कार्यालयांमधून आपल्या कर्जांचे मासिक किंवा तिमाही हप्ते भरता येतील. आयपीपीबीच्या विस्तृत राष्ट्रीय नेटवर्क, तळागाळात असलेली टपाल विभागाची पोहोच आणि साधे व सोपे तंत्रज्ञान यामुळे MRHFL ला गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने कॅश मॅनेजमेंट व्यवसथापन लागू करणे सोपे होणार आहे. वित्तीय क्षेत्रातील ही एक महत्वपूर्ण भागीदारी असून यातून ग्राहकांना सामावून घेण्याचे दोन्ही संस्थांचे लक्ष्य असल्याचे अधीक्षक डाकघर सिंधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्गनगरी हे कळवितात. 0000

आजअखेर 34 हजार 101 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 863 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

जिल्ह्यातील 12 लघु पाटबंधारे प्रकल्प तुडुंब

सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.) - जिल्ह्यातील 12 लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले असून कोर्ले सातांडी मध्यम पाटबंधारे प्रकल्पही 100 टक्के भरला आहे. तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 355.0240 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 79.36 टक्के भरले आहे. सध्या या प्रकल्पातून 23.31 घ.मी. सेकंद इतका विसर्ग सुरू आहे. जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 59.1090, अरुणा – 30.5235, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 2.6480, नाधवडे – 3.2819, ओटाव – 1.5931, देंदोनवाडी – 0.4901, तरंदळे – 0.6020, आडेली – 1.2710, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 2.0700, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 1.4050, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 0.8370, दाभाचीवाडी – 1.4600, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.1550, कारिवडे – 1.0480, धामापूर – 1.5910, हरकूळ – 2.3800, ओसरगाव ...

जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी

सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 2.375 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1094.135 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 02(1186), सावंतवाडी - 02(1349.7), वेंगुर्ला - 00(843.40), कुडाळ - 03(977), मालवण - 01(1040), कणकवली - 00(1238), देवगड - 00(909), वैभववाडी - 11(1210), असा पाऊस झाला आहे. 00000

सिंधुदुर्ग जिल्हा स्तर 4 मध्ये समाविष्ट प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांचे आदेश

सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.) – सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरटीपीसीआर टेस्ट केलेल्या कोविड बाधित रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट हा 12.7 टक्के असुन सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र शासनाकडील स्तीररचनेनुसार चौथ्या स्तरामध्ये समाविष्ट होत आहे. जिल्ह्याकरिता दिनांक 28 जून 2021 रोजी सकाळी 7.00 वाजलेपासून पासून पुढील आदेशापावेतो खालीलप्रमाणे सुधारीत आदेश लागू केले आहेत, असे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी दिलेत. या आदेशात म्हटले आहे, अत्यावश्यक सेवेशी संबंधीत सर्व दुकाने, आस्थापना यांच्या वेळा सर्व दिवशी दुपारी 4.00 वा. पर्यंत सुरु राहतील. अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना यांच्या वेळा सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवार व रविवार बंद राहतील. मॉल्स, सिनेमा हॉल (मल्टी प्लेक्स व सिंगल स्क्रिन सह), नाटयगृह बंद राहतील. रेस्टॉरंटस सोमवार ते शुक्रवार (Weekdays) सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत 50 टक्के आसन क्षमतेनुसार Dining • सायंकाळी 4.00 नंतर पार्सल सेवा चालू राहील व • शनिवार व रविवार (Weekend) फक्त् पार्सल व होम डिलेवरी सुविधा चालू राहील. स...

आजअखेर 33 हजार 981 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 458 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

18 ते 44 वर्षे वयोगातील लसीकरण सत्र सोमवारी

Image

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) - तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 29.00 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 355.3180 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 79.42 टक्के भरले आहे. सध्या या प्रकल्पातून 24.93 घ.मी. सेकंद इतका विसर्ग सुरू आहे. जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 59.3370, अरुणा – 30.4478, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 2.6480, नाधवडे – 3.3240, ओटाव – 1.5638, देंदोनवाडी – 0.4624, तरंदळे – 0.7330, आडेली – 1.2710, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 2.0240, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 1.3920, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 0.8200, दाभाचीवाडी – 1.4180, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.0240, कारिवडे – 1.0350, धामापूर – 1.5910, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 0.9120, ओझरम – 1.8190, पोईप – 0.7610, शिरगाव –...

कणकवली तालुक्यात सर्वाधिक 45 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 45 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 20.00 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1091.76 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 12.00 (1184), सावंतवाडी - 34.00 (1347.70), वेंगुर्ला – 09.00 (843.40), कुडाळ - 17.00 (974.0), मालवण - 02.00 (1039.0), कणकवली - 45.00 (1238.0), देवगड - 02.00 (909.0), वैभववाडी - 39.00 (1199.0), असा पाऊस झाला आहे. 00000

कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 44 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 44 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 29.15 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1071.76 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 12.00 (1172), सावंतवाडी - 20.00 (1313.70), वेंगुर्ला – 28.20 (834.40), कुडाळ - 44.00 (957.0), मालवण - 36.00 (1037.0), कणकवली - 37.00 (1193.0), देवगड - 22.00 (907.0), वैभववाडी - 34.00 (1160.0), असा पाऊस झाला आहे. 00000

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) - तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 11.20 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 355.1710 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 79.39 टक्के भरले आहे. सध्या या प्रकल्पातून 24.11 घ.मी. सेकंद इतका विसर्ग सुरू आहे. जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 59.3370, अरुणा – 30.0696, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 2.6480, नाधवडे – 3.2819, ओटाव – 1.5199, देंदोनवाडी – 0.4347, तरंदळे – 0.8680, आडेली – 1.2540, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 1.9780, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 1.3670, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 0.8010, दाभाचीवाडी – 1.3760, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 1.9580, कारिवडे – 0.9740, धामापूर – 1.6410, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 0.8880, ओझरम – 1.8190, पोईप – 0.7610, शिरगाव ...

आजअखेर 33 हजार 826 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 283 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य दूरगामी परिणाम करणारे सामाजिक सुधारणांसोबतच स्वतंत्र भारताचा भक्कम पाया रचला - श्रीराम पचिंद्रे

सिंधुदुर्गनगरी दि. 25, (जि.मा.का.) - राजर्षी शाहू महाराज हे लोकोत्तर व्यक्तीमत्व होते. समाज सुधाराणांचा वसा पुढे नेतानाच त्यांनी स्वतंत्र भारताचा भक्कम पाय निर्माण करण्याचे कार्य केले. त्यांचे हे कार्य म्हणजे दूरगामी परिणाम करणारे होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक व इतिहास अभ्यासक श्रीराम पचिंद्रे यांनी केले. राजर्षी छत्रपती शाहू माहाराज यांच्या जयंती निमित्त जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्गच्या वतीने आयोजित राजर्षी शाहू महाराज आणि सामाजिक सुधारणा याविषयावरील व्याख्यानावेळी ते बोलत होते. ब्रिटिश सत्तेचा वापर संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी करणारे राजे म्हणजे राजर्षी शाहू महाराज असे सांगून श्री. पचिंद्रे म्हणाले, राज्याभिषेकानंतर शाहू महाराजांनी सर्व प्रथम आपल्या संपूर्ण संस्थांनचा दौरा करून प्रजा कशी जगते आहे याचे बारकाईने अवलोकन केले. प्रजाही अज्ञान, दारिद्य आणि अंधश्रद्धेमध्ये पिचली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या परिस्थितीतून प्रजेला बाहेर काढण्यासाठी काय करावे लागेल यांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आणि त्याप्रमाणे त्यांनी कार्य सुरु केले. प्रथम त्यांनी शेती ...

मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांना आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि. 25, (जि.मा.का.) - अद्ययावत व शुद्ध मतदार यादी करताना व तिचे पुनःरिक्षण करताना मतदारांच्या माहितीमध्ये मतदाराचे छायाचित्र असणे अनिवार्य आहे. जिल्ह्यातील 269 कुडाळ विधानसभा मतदारसंघातील एकूण 2 हजार 777 मतदाराचे विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम दरम्यान छायाचित्र नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी गृहभेटी करून छायाचित्र संकलित करण्याचे प्रयत्न केले. त्यानुसार छायाचित्र उपलब्ध करून देण्याची संधी उपलब्ध करून दिली. तरीही 2 हजार 777 मतदारांनी नमुना 8 मध्ये ऑनलाईन अथवा मतदान केंद्रस्तरीय अधइकारी यांच्याकडे प्रत्यक्ष स्वरुपात अर्ज केलेला नाही. तरी दि. 2 जुलै 2021 पर्यंत सदर मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे अथवा ऑनलाईन स्वरुपात नमुना 8 द्वारे आपले छायाचित्र सादर करावे. तरी या मुदतीत छायाचित्र सादर न केल्यास छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येतील. तसेच जे मतदान विहित मुदतीत नमुना 8 द्वारे छायाचित्र सादर करण्यास असमर्थ ठरतील त्यांना त्यांच्या सर्वसाधारण रहिवासाचे ठिकाण ( लोकप्रतिनिधित्व अधिनियन, 19...

इतर मागासवर्गीय महामंडळाच्या कर्जाच्या लाभार्थीसाठी एकरकमी परतावा योजना

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का): जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय महामंडळाच्या कर्जाच्या परत फेडीचा कालावधी संपलेल्या लाभार्थीसाठी एकरकमी परतावा योजना राबविण्यात येत आहे. योजनेनुसार थकीत कर्जाची एकरकमी परतफेड केल्यास थकीत व्याज रक्कमेवर 2 ट्टके सुट देण्यात येईल. योजना ठराविक कालावधीसाठी आहे. खाते बंद केल्यावर महामंडळाच्या नवीन रुपये 10 लक्ष व्याज परतावा योजनेतंर्गत लाभ घेता येईल. तरी संबधितांनी या योजनेचा लाभ घेऊन थकीत कर्जाची परतफेड करावी व आपले कर्ज खाते बंद करावे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थीनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रिती पटेल जिल्हा व्यवस्थापक शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ मर्या,सिंधुदुर्ग यांनी केला आहे. 0000

पूर्व उच्च प्राथमिक, माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा जूलैमध्ये होण्याची शक्यता

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का): पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी माहे जूलै मध्ये होण्यची शक्यता महाराष्ट्र परीक्षा परिषद, पुणे यानी कळविले आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी दिंनाक 23 मे 2021 रोजी होणार होती मात्र कोरोना साथ आजाराच्या प्रसारामुळे परीक्षा होऊ शकलेली नाही. परीक्षा पुढील महिन्यामध्ये घेण्याची प्रस्तावित आहे, परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी केले आहे. 0000

प्रशिक्षणार्थीच्या नावात, दुरुस्तीची संधी

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का): शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाडी प्रवेश सत्र 2014 पासून अजपर्यंत प्रवेशीत झालेले व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या नावात,आईच्या नावात, जन्मतारीख व फोटो इत्यादी चुका असतील तर त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी डीजीटी, नवी दिल्ली यांचेकडून NCVT MIS Portal Grievance User Manual of Traiees ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. प्रशिक्षणार्थी परीक्षेविषयक ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षेतील विषयांबाबत Grievance नोंदवू शकतो.स्वत:च्या नावातील, आई वडील यांच्या नावातील जन्म्तारीख तसेच फोटो इत्यादी बाबींमधील दुरुस्तीसाठी Grievance नोदवू शकता. फोटो दुरुस्तीसाठी सुधारित फोटो घेऊन प्रशिक्षणार्थ्यांने आद्यौगिक प्रशिक्षण संस्थात उपस्थित राहून सादर करावा लागेल. दुरुस्ती करणेबाबतची ही शेवटची संधी असून अधिकच्या माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 02363-272136,295136 किंवा भ्रमणध्वनी क्रमांक 9423304735, 8007363988, 9420910912 वर संपर्क साधावा असे प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था र.फ.पाटील सावंतवाडी बाहेरचा वाडा,सावंतवाडी, सिंधुदुर्ग यांनी कळव...

नैसर्गिक संकटाचे विपरित परिणाम कमी करण्याच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची गरज - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वेंगुर्ल्याच्या 50 खाटांच्या उपजिल्हा रुगणालयाचे लोकार्पण

Image
सिंधुदुर्गनगरी दि. 25, (जि.मा.का.) - नैसर्गिक संकटाचे विपरित परिणाम कमी करण्याच्यादृष्टीने राज्यातील किनारपट्टी जिल्ह्यांनी आवश्यक उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. कोविड काळात उभारलेल्या तात्पुरत्या आणि इतर रुग्णालयातील वीज पुरवठा सुरळित राखणे, ऑक्सीजन टँकची सुरक्षितता तपासणे. ऑक्सीजनचा पुरेसा साठा करून ठेऊन पुराचे पाणी रुग्णालयात शिरू न देणे यादृष्टीने विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन उभारण्यात आलेल्या 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री उदय सामंत, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजना सावंत, वेंगुर्ल्याचे नगराध्यक्ष दिलीप गिरप, सभापती अनुश्री कांबळी, यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचि...

आजअखेर 33 हजार 423 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 289 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

जिल्ह्यात 1 लाख 99 हजार 737 जणांनी घेतला पहिला डोस

सिंधुदुर्गनगरी, दि.25 (जि.मा.का.) - जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 99 हजार 737 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 757 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 6 हजार 922 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 512 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 4 हजार 867 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 82 हजार 988 व्यक्तींनी पहिला डोस तर 25 हजार 710 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 77 हजार 269 नागरिकांनी पहिला डोस तर 9 हजार 516 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 20 हजार 211 जणांनी पहिला डोस तर 6 हजार 205 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 2 लाख 52 हजार 957 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 2 लाख 44 हजार 460 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 1 लाख 85 हजार 580 लसी या कोविशिल्डच्या तर 58 हजार 880 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 1 लाख 95 हजार 705 कोविशिल्ड आणि 57 हजार 252 कोवॅक्सिन असे मिळून 2 लाख 52 हजार 957 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण कें...

कणकवली तालुक्यात सर्वाधिक 105 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 105 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 71.1 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1042.61 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 44(1160), सावंतवाडी - 84(1293.7), वेंगुर्ला – 53.8(806.2), कुडाळ - 82(913), मालवण - 97(1001), कणकवली - 105(1156), देवगड - 58(885), वैभववाडी - 45(1126), असा पाऊस झाला आहे.

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का.) - तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 30.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 355.0240 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 79.36 टक्के भरले आहे. सध्या या प्रकल्पातून 23.31 घ.मी. सेकंद इतका विसर्ग सुरू आहे. जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 59.1090, अरुणा – 29.9939, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 2.5634, नाधवडे – 3.3240, ओटाव – 1.4759, देंदोनवाडी – 0.4070, तरंदळे – 1.0030, आडेली – 1.2200, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 1.9120, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 1.3190, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 0.7650, दाभाचीवाडी – 1.3340, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 1.8520, कारिवडे – 0.9470, धामापूर – 1.5910, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 0.8650, ओझरम – 1.8190, पोईप – 0.7610, शिरगाव – 0.6150, तिथवली ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण

सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.) - वेंगुर्ला येथे उभारण्यात आलेल्या 50 खाटांच्या नुतन रुग्णालयीन इमारतीचे उद्या दि. 25 जून 2021 रोजी दुपारी 12 वा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. ग्रामीण रुग्णालय, वेंगुर्ला येथे नवीन इमारत उभारून तिथे 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यात येत आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील - यड्रावकर हे ऑनलाईन उपस्थित असणार आहेत. तर पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे. 00000

10 वी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या रेखाकला परीक्षा सवलतीच्या गुणांसाठी प्रस्ताव सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.) - 10 वीच्या मुल्यमापन कार्यपद्धतीमध्ये सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी शासनाच्या व मंडळाच्या धोरणानुसार व तरतुदीनुसार देय असलेल्या अन्य गुणांचा लाभ प्रचलित पद्धतीनुसार देण्यास मान्यता दिली असल्याचे डॉ. शिवलींग पटवे, विभागीय सचिव, कोकण विभागीय मंडळ, रत्नागिरी यांनी कळवीले आहे. त्यासाठीचे प्रस्ताव 30 जून 2021 रोजीपर्यंत विद्यार्थ्यांनी शाळेकडे सादर करावेत. प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडील निर्णयानुसार कोविड 19 संसर्गजन्य साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शासकीय रेखाकला परीक्षेचे सवलतीचे अतिरिक्त गुण देता यावेत. यासाठी खालीलप्रमाणे सवलतीचे गुणदान देण्यात यावे असे सूचित केले आहे. यापूर्वी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शालेय व क्रीडा विभागाच्या तरतुदीनुसार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेमध्ये अतिरिक्त गुणांची सवलत देता यईल. सन 2020-21 या वर्षी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेस बसलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी एलिमेंटरी ड...

आजअखेर 32 हजार 595 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 729 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 87 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 87 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 25 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 971.51 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 27(1116), सावंतवाडी - 87(1209.7), वेंगुर्ला - 00(752.4), कुडाळ - 18(831), मालवण - 05(904), कणकवली - 02(1051), देवगड - 02(827), वैभववाडी - 59(1081), असा पाऊस झाला आहे. 00000

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.) - तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 9.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 354.2890 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 79.19 टक्के भरले आहे. सध्या या प्रकल्पातून 19.43 घ.मी. सेकंद इतका विसर्ग सुरू आहे. जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 58.8810, अरुणा – 29.9182, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 2.3660, नाधवडे – 3.2819, ओटाव – 1.4320, देंदोनवाडी – 0.3844, तरंदळे – 0.9490, आडेली – 1.1860, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 1.8130, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 1.2950, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 0.7120, दाभाचीवाडी – 1.2710, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 1.8110, कारिवडे – 0.9160, धामापूर – 1.6660, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 0.8540, ओझरम – 1.8190, पोईप – 0.7610, शिरगाव –...

आजअखेर 31 हजार 470 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजार 471 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image