Posts
Showing posts from January, 2022
प्रेरणा अंतर्गत स्पर्धा परीक्षांसाठी राज्यशास्त्र विषयावर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मार्गदर्शन सत्र
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 31 (जि.मा.का.) – जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा उपक्रमाअंतर्गत मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येत आहेत. या उपक्रमाअंतर्गत बुधवार दि. 2 फेूब्रुवारी 2022 रोजी सायं. 4 ते 5 या वेळेत राज्यशास्त्री विषयाची तयारी कशी करावी व अभ्यास करताना येणाऱ्या अडचणींवर मार्ग कसा काढावा याविषयी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. फेसबुक लाईव्हद्वारे https://www.facebook.com/Collector-Office-Sindhudurg-01061044850492 या लिंकवर क्लिक करुन या ऑनलाईन सत्रामध्ये सहभागी होता येणार आहे. परीक्षेचे स्वरुपापासून विविध शंकांचे निरसन यात होणार आहे. तरी याबाबत कोणतीही शंका, प्रश्न असल्यास आपण ऑनलाईन सत्रामध्ये विचारू शकता. परीक्षाविधीन उपजिल्हाधिकारी स्वाती देसाई व परीक्षाविधीन तहसिलदार संकेत यमगर हे या ऑनलाईन सत्रामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. यापूर्वी युपीएससी आणि एमपीएससी विषयी मार्गदर्शन सत्र संपन्न झाले आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी-विद्यार्थिंनींनी याचा ला...
शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज भरण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 31 (जि.मा.का) : सन 2021-22 करिता भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवर नवीन अर्ज नोंदणी व जन्या अर्जांच्या नुतनीकरणासाठी दि. 15 फेब्रुवारी 2022 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही प्रक्रिया शासनाच्या आपले सरकार पोर्टलवरील https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सुरू असल्याचे दीपक घाटे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालये तसेच संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य, विद्यार्थी व पालक यांनी, जे विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित असतील अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज व जुन्या अर्जांचे नुतनीकरण दि. 15 फेब्रुवारी 2022 अखेर करावेत. विद्यार्थ्यांचे अर्ज विहीत मुदतीत भरून घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची आहे. या योजनेपासून मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहिल्यास त्यास संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य जबाबदार राहतील असे पत्रकार नमुद केले आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज नोंदणी व नुतनीकरण करण्यात आलेले आहे, अशा अर्जांची छान...
आजअखेर 54 हजार 288 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1090 - जिल्हा शल्य चिकित्सक
- Get link
- X
- Other Apps
आजअखेर 54 हजार 255 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 972 - जिल्हा शल्य चिकित्सक
- Get link
- X
- Other Apps
आजअखेर 54 हजार 169 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 969 - जिल्हा शल्य चिकित्सक
- Get link
- X
- Other Apps
पणदूर येथे 31 रोजी दिव्यांगांसाठी तपासणी शिबिर
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का) : कुडाळ तालुक्यातील पणदूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दि. 31 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वा दिव्यांग व्यक्तींचे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी अस्थिरोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, कान, नाक व घसा तज्ज्ञ, नेत्रशल्य चिकित्सक, फिजिओथेरपिस्ट, क्लिनिकल सायकॉलॉजीस्ट, नेत्र चिकित्सा अधिकारी हे उपस्थित राहून दिव्यांग व्यक्रींची तपासणी करणार आहेत. तरी पणदूर तालुका कुडाळ पंचक्रोशीतील दिव्यांग व्यक्ती की, ज्यांनी कुठल्याही प्रकाराने अपंगत्व प्रमाणपत्र घेतलेले नाही तसेच ज्यांचे प्रमाणपत्र 2012 पूर्वी ऑफलाईन पद्धतीने घेतलेले आहे, अशा सर्व पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी या शिबिरास उपस्थित रहावे. सोबत आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो (अस्थिव्यंग व्यक्तींनी 4 बाय 6 अकारातील फोटो) तसेच आधार कार्ड व रेशन कार्डच्या झेरॉक्स प्रतीसह उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे. 00000
कणकवली पंचायत समिती उपसभापती निवडणूक 4 फेब्रुवारी रोजी
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का) : कणकवली पंचायत समिती उपसभापती यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसभापती पदासाठी निवडणूक घेण्यासाठी दि. 4 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 3 वाजता विशेष सभा बोलावण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी म्हणून तहसिलदार कणकवली यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. उपसभापती पंचायत समिती यांचा कालावधी सध्याचे उपसभापती पद रिक्त झाले नसते तर ज्या कालावधीपर्यंत सदर पद चालू राहिले असते त्या कालावधीकरिता निवड करण्याची आहे. कणकवली पंचायत समितीच्या उपसभापती पदाची निवडणूक कलम 75(1) नुसार उपसभापती पद रिक्त झाले नसते तर जेवढ्या मुदतीकरिता ते पद धारण केले असते तेवढ्याच मुतदीकरिता ते पद धारण करील. या कालावधीकरिता उपसभापती पदाची निवड करण्याची असल्याचे, आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. 00000
- Get link
- X
- Other Apps
गोर-गरीब लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी सर्वेक्षण करा - अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का) : शिधापत्रिका धारकांना पत्ता बदलला असता नवीन ठिकाणी अन्न सुरक्षा लाभ मिळण्याबाबत काही कारणास्तव अडचणी निर्माण होत आहेत. गोर-गरीब लाभार्थी अन्न सुरक्षा योजनेबाबत वंचित राहता कामा नये यासाठी सर्वेक्षण करा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी दिले. जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक आज घेण्यात आली. श्री. बर्गे म्हणाले, तालुकास्तरीय दक्षता समितींच्या कामांचा आढावा घ्या. समित्यांची दरमहा बैठक होते का? या बाबत माहिती घ्यावी. धान्य साठवणूकीची क्षमता आणि व्यवस्था याबाबत आढावा घ्यावा. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राहिलेली कामे पाठपुरावा करू पूर्ण करून घ्यावी. नायब तहसिलदार संजय गवस यांनी यावेळी माहिती दिली. बैठकीला सदस्य मेघनाथ धुरी यांच्यासह अन्य प्रतिनिधी उपस्थित होते.
आजअखेर 53 हजार 675 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 267 - जिल्हा शल्य चिकित्सक
- Get link
- X
- Other Apps
क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि.27, (जि.मा.का.) - राज्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ सेवा प्रवेश व खेळनिहाय कौशल्य प्रवेशाकरिता विभागस्तर व राज्यस्तरावर चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पात्र खेळाडूंनी सहभागी होण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज दि. 15 फेब्रुवारी 2022 रोजीपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सादर करावेत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याकरिता प्रतिभावंत खेळाडूंची निवड करून शास्त्रोक्त प्रशिक्षण, अद्ययावत क्रीडा सुविधा, शिक्षण, भोजन, निवास इ. सुविधा क्रीडा प्रबोधिनीच्या अंतर्गत खेळाडूंना देण्यात येत आहेत. राज्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ सेवा प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचण्यांद्वारे निवासी व अनिवासी खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी ॲथलेटीक्स, आर्चरी, ज्युदो, हँडबॉल, बॅडमिंटन, शुटिंग, कुस्ती, हॉकी, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, जिम्नॅस्टिक इ. खेळांच्या खेळनिहाय चाचण्यांचे आयोजन करण्याचे प्...
भात खरेदी नोंदणीस 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) – सन 2021-22 हंगामासाठी शासनाने एफ ए.क्यु प्रतीच्या भातासाठी 1 हजार 940 रुपये प्रती क्विंटल दर जाहीर केला आहे. ज्या शेतकऱ्यांना हमीभावाने भात शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करायचा आहे, त्यांना ऑनलाईन नोंदणीसाठी 31 जानेवारी 2022 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप धान खरेदी केंद्रावर नोंदमी केलेली नाही त्यांनी त्वरीत तालुक्यातील धान खरेदी केंद्रावर नोंदणी करावी असे आवाहन ए.एस. देसाई, जिल्हा मार्केंटिंग अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
डॉ. झाकीर हुसेन मदरसा अधुनिकीकरण योजनेंतर्गत 11 फेब्रुवारी पर्यंत प्रस्ताव देण्याचे आवाहन
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि.27, (जि.मा.का.) - राज्यातील मदरसांच्या अधुनिकीकरणासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा अधुनिकीकरण योजना राबवण्यात येते. सन 2021-22 या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मदरसांनी दि. 11 फेब्रुवारी 2022 रोजीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रस्ताव सादर करावेत. मदरसांकडू प्राप्त प्रस्तावांची जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत निकषांनुसार तपासणी करून पात्र मदरसांची शिफारस शासनाकडे करण्यात येणार आहे. तसेच दि. 11 फेब्रुवारीनंतर येणाऱ्या प्रस्तावांचा विचार करण्यात येणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी कळविले आहे.
आजअखेर 53 हजार 570 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 256 - जिल्हा शल्य चिकित्सक
- Get link
- X
- Other Apps