जिल्हा क्रीडा संकुलात बुधवारी योगदिन
सिंधुदुर्गनगरी दि.19 (जि.मा.का):- जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम बुधवार दि. 21 जून 2023 रोजी सकाळी 7.15 वाजता जिल्हा क्रीडा संकुल,ओरोस सिंधुदुर्गनगरी येथील बॅडमिंटन हॉल मध्ये आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.
तरी जिल्ह्यातील सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमास अनुकुल पोशाखात उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
00000
Comments
Post a Comment