Posts

Showing posts from June, 2022

चौकुळ वनक्षेत्र परिसरात हिंस्त्र वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर ग्रामस्थांनी रात्री घराबाहेर पडू नये, पाळीव प्राण्यांची काळजी घ्या - उपवनसंरक्षक डी.पी.खाडे

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) – मौजे चैकुळ येथील वनक्षेत्र तसेच त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये बिबट, वाघ अशा हिंस्त्र वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पाळीव जनावरांवर हल्ले होत असल्याने ग्रामस्थांनी रात्रीचे शक्यतो घराबाहेर पडू नये, त्याचबरोबर स्वतःसह प्राण्यांची काळजी घ्यावी असे आवाहन उपवनसंरक्षक डी.पी.खाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. आंबोली वनपरिक्षेत्र स्थळातील मौजे चौकुळ आणि त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये बिबट, वाघ अशा हिंस्त्र वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल आहे. ग्रामस्थांच्या पाळीव जनावरांवर या हिंस्त्र वन्य प्राण्यांचे हल्ले मोठ्या प्रमाणात होत असल्याने ग्रामस्थांनी रात्री शक्यतो घराबाहेर पडू नये. आवश्यक असल्यास गटा गटाने, काठी, तसेच बॅटरी सोबत घेऊन जावे. रात्री कुत्रे जोरजोराने भूंकत असल्यास जवळपास बिबट किंवा वाघ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामस्थांनी आपल्या शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, गाई, म्हशी, आदी पाळीव जनावरे बंद गोठ्यात ठेवावे. बिबट, वाघ हे अनुसूची एक मधील वन्यप्राणी असल्याने या...

आजअखेर 56 हजार 2 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 67 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 5 जूलै पर्यंत मुदवाढ

सिंधुदुर्गनगरी, दि. 30(जि.मा.का.) : सन 2021-22 करिता शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी दि. 14.12.2021 पासुन शासनाने सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. अदयापही मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अर्ज संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरलेले नाहीत त्या विदयार्थ्यांसाठी शासन स्तरावरुन सन 2021-22 मधील शिष्यवत्तीचे अर्ज भरण्यासाठी 5 जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी दिली. जिल्हयातील सर्व महाविदयालय व विद्यार्थ्यांना अवाहन करण्यात येते की, ज्या अनु.जाती प्रवर्गातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अदयापही शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेले नाहीत, त्या विदयार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज 5 जूलै 2022 पर्यंत https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर तात्काळ भरण्याची कार्यवाही करावी. सन 2020-21 वर्षामधील रिअप्लाय अर्ज करण्यासाठी 5 जूलै 2022 पर्यंत मुदतवाढ दिलेली असल्याने तात्काळ शिष्यवृत्तीच्या अर्जांचे नुतनीक...

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) : सन 2022-23 या वर्षासाठी जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालयाव्दारे जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धा दि. 14 व 15 जुलै 2022 रोजी श्री. वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, मागणाव येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली. सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आयोजित करण्यात येणार आहे. 17 वर्षे मुले यांच्यासाठी दि.14 जुलै 2022 रोजी सकाळी 9. वाजता उपस्थित राहवे. 14 वर्षे मुले व 17 वर्षे मुली यांच्यासाठी दि. 15 जुलै 2022 रोजी सकाळी 9 वाजता उपस्थित राहवे. 0000

पदक विजेत्या खेळाडूंना आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तर पदकविजेत्या खेळाडूंची माहिती संकलित करुन कॉफी टेबल बुक प्रसिध्द करण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली. तरी पदकविजेत्या खेळाडूंनी आपली माहिती फोटोसह आपल्या संबंधित शाळा, महाविद्यालय, एकविध क्रीडा संघटनांकडे 15 जुलै 2022 पर्यंत सादर करावी. खेळाडूचे नाव, जन्मतारीख, स्पर्धास्तर, स्पर्धेचे नाव, प्राविण्य,सूचना- खेळाडूंची शालेय स्पर्धा, एकविध क्रीडा संघटानी संघटनेमार्फत आयोजित अधिकृत स्पर्धामधील कामगिरी विचारत घ्यावी. भारतीय ऑलम्पिक महासंघ व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन व्दारा मान्यता प्राप्त खेळांमधील कामिगिरी विचारात घ्यावी. अशी माहिती ही जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी दिली आहे. 0000

देवगड तालुक्यात सर्वाधिक 138.7 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात देवगड तालुक्यात सर्वाधिक 138.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 93.9 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 785.8 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड-138.7(815.2),मालवण-109.6(830.3), सावंतवाडी-65.3(834.8),वेंगुर्ला-95.3(752.5),कणकवली-76.7(705.7),कुडाळ-89.3(826.2), वैभववाडी-89.8(731.1),दोडामार्ग-44.8(693.6) असा पाऊस झाला आहे. 00000

जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि.30 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात सध्या या प्रकल्पामध्ये 242.930 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 54.30 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर-28.7440, अरुणा -2.5425, कोर्ले- सातंडी -22.7550 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव-1.221,नाधवडे-0.821,ओटाव-0.111, देंदोनवाडी – 0.157, तरंदळे -0.498, आडेली-0.316, आंबोली – 0.896, चोरगेवाडी– 1.173, हातेरी-1.807, माडखोल -1.690, निळेली -1.372, ओरोस बुद्रुक – 0.674, सनमटेंब – 0.967, तळेवाडी- डिगस-0.525, दाभाचीवाडी – 0.832, पावशी –1.690, शिरवल – 0.887, पुळास -1.103, वाफोली – 0.555, कारिवडे – 0.655, धामापूर – 0.991, हरकूळ -2.380, ओसरगाव – 0.227, ओझरम – 1.115, पोईप – 0.546, शिरगाव – 0.115, तिथवली – 0.702, लोरे-1.965 तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे-0.659,शिरवळ-0.141, वर्दे-0.000,कोकीसरे-0.006,नानीवडे-0.00...

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 37.300 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 3.500 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर इतकी आहे.कणकवली-वागदे,राष्ट्रीय महामार्ग 66 पूलाजवळ गडनदीची पातळी 34.600 मीटर इतमी असून इशारापातळी 36.764 मीटर व धोका पातळी 37.920 मीटर इतकी असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

आजअखेर 55 हजार 969 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 68 - जिल्हा शल्य चिकित्सक

अल्पसंख्यांक विद्यार्थी बहूल शाळांसाठी अनुदान योजना

सिंधुदुर्गनगरी दि.29 (जि.मा.का): अल्पसंख्यांक विकास विभाग यांच्याकडून मुस्लिम समाजाच्या विकासासाठी धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबवले जाते. या योजनेचा लाभ घेण्यास संबंधित शाळा, संस्थामध्ये किमान 70 टक्के अल्पसंख्यांक विद्यार्थी (मुस्लिम, ख्रिश्चन, शिख बौध्द, पारसी, जैन ) शिक्षण घेत आहेत. तसेच अपंगाच्या शाळामध्ये किमान 50 टक्के अल्पसंख्याक विद्यार्थी शिक्षण घते आहेत. अशा शाळा,संस्था पात्र असतील. जिल्ह्यातील इच्छुक शाळांनी सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता विहित नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक ) यांच्या मार्फत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडे दि. 31 जुलै 2022 पर्यंत सादर करावीत. विहित अर्जाचा नमुना याबाबतचा अधिक माहितीसाठी www.sindhudurg.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मुदतीनंतर प्राप्त अर्जाची दखल घेण्यात येणार नाही. ...

डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी प्रस्ताव करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि.29 (जि.मा.का): सन 2022-23 मध्ये राबविण्यात येत असलेल्या अल्पसंख्यांक विकास विभाग यांचेकडून डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनासाठी दिनांक 30 ऑगस्ट 2022 पर्यंत प्रस्ताव सादर करावित, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यक्षेत्रातील मदरशांनी विहित अटी व शर्तीची पूर्तता करुन सन 2022-23 या वर्षाकरिता विहित नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) यांचेमार्फत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांचेकडे 30 ऑगस्ट 2022 पर्यंत सादर करावीत. विहित अर्जाचा नमुना याबाबत अधिक माहिती www.sindhudurg.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जांची दखल घेण्यात येणार नाही. 00000

बेवारस वाहनांचा लिलाव

सिंधुदुर्गनगरी दि.29 (जि.मा.का): जिल्हा पोलीस अभिलेखावर कुडाळ-2 बांदा-1 अशा एकुण 3 दुचाकी बेवारस वाहनांचे समावेश आहे. या वाहनांच्या मालकांचा सर्वतोपरी शोध घेण्यात आलेला आहे. परंतू आज पर्यंत या वाहनांचे मालकांबाबत कोणतीही उपयुक्त माहिती प्राप्त झालेली नाही. तसेच भविष्यात सुध्दा या वाहनांचे मालक मिळून येतील अशी शक्यता नाही. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी 3 बेवारस दुचाकी वाहनांचे मुल्यांकन केलेले असून त्याची रक्कम रुपये 14,200 अशी निर्धारित केलेली आहे. या वाहने स्क्रॅप करुन त्या भंगार साहीत्याचा लिलाव सोमवार दि.11 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे आवारात आयोजित करण्यात आलेला आहे. लिलाव प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या इच्छुकांनी त्यांचेकडे असणारा भंगार माल खरेदी –विक्री करण्याच्या परवान्याची प्रत आणि तात्पुरत्या स्वरुपातील अनामत रक्कम रुपये 5000 दि. 10 जुलै 2022 रोजी सायंकाळी 16. वाजेपर्यंत पोलीस अधीक्षक कार्यालयात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग येथे जमा करावी. भंगार माल खरेदी - विक्री करण्याचा अधिकृत परवाना असणाऱ्या आणि मुदतीमध्ये अनामत रक्कम भरण्याल...

लोकशाही दिन 4 जुलै रोजी

सिंधुदुर्गनगरी दि.29 (जि.मा.का): माहे जुलै 2022 या महिन्यातील लोकशाही दिन हा महिन्याच्‍या पहिल्या सोमवारी दि.4 जुलै 2022 रोजी दुपारी 1 ते 2 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार, असल्याची माहिती, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी दिली . 0000

शासकीय वसतीगृहात मोफत प्रवेश

सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) : सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहामध्ये मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध झालेली आहे. विद्यार्थी, विद्यार्थीनीं, वसतिगृहातील रिक्त असलेल्या जागावर ऑफलाईन (मॅन्युअली) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तरी मागासवर्गीय विद्यार्थी ,विद्यार्थींनीनी वसतिगृह प्रवेश अर्ज विनामूल्य प्राप्त करुन घेण्यासाठी कार्यालयीन वेळेत सबंधित वसतिगृहातील गृहपाल,अधिक्षिका व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, (डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी, दूरध्वनी क्र.02362-228882 ) या कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे. ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी शालेय विद्यार्थीसाठी दि. 15 जूलै 2022 पर्यंत. इयत्ता 11 वी व 10 वी नंतरचे अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) साठी दि. 30 जूलै 2022 पर्यंत. बी.ए. / बी.कॉम / बी.एस.सी. 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका / पदवी आणि एम.ए. / एम.कॉम./ एम.एस.सी. पदवी नंत...

कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 27.2 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 27.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 21.8 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 691.9 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड-23.1(676.5),मालवण-18.2(720.7), सावंतवाडी-24.5(769.5),वेंगुर्ला-25.7(657.2),कणकवली-16.4(629.0),कुडाळ-27.2(736.9), वैभववाडी-24.2(641.3),दोडामार्ग-12.9(648.8) असा पाऊस झाला आहे. 00000

जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात सध्या या प्रकल्पामध्ये 242.084 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 54.11 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर-27.7840, अरुणा -2.5164, कोर्ले- सातंडी -20.6340 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव-1.211,नाधवडे-0.815,ओटाव-0.103, देंदोनवाडी – 0.148, तरंदळे -0.432, आडेली-0.316, आंबोली – 0.834, चोरगेवाडी– 1.158, हातेरी-1.784, माडखोल -1.690, निळेली -1.297, ओरोस बुद्रुक – 0.674, सनमटेंब – 0.922, तळेवाडी- डिगस-0.497, दाभाचीवाडी – 0.818, पावशी –1.690, शिरवल – 0.808, पुळास -1.082, वाफोली – 0.538, कारिवडे – 0.645, धामापूर – 0.991, हरकूळ -2.380, ओसरगाव – 0.073, ओझरम – 0.936, पोईप – 0.477, शिरगाव – 0.112, तिथवली – 0.504, लोरे-1.913 तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे-0.632,शिरवळ-0.131, वर्दे-0.000,कोकीसरे-0.006,नानीवडे-0.00...

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 37.300 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.000 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 3.100 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर इतकी आहे.कणकवली-वागदे,राष्ट्रीय महामार्ग 66 पूलाजवळ गडनदीची पातळी 34.700 मीटर इतमी असून इशारापातळी 36.764 मीटर व धोका पातळी 37.920 मीटर इतकी असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

जिल्हा सामान्य रुग्णालय येथे अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा

सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) – जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्ग येथए जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जागतिक अंमली पदार्थ विरोधी व अवैध वाहतुक विरोधी दिन तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, आरएमओ डॉ. जाधव, मेट्रन श्रीमती वसावे, नर्सिंग महाविद्यालय प्राचार्य शिल्पा म्हाकले, एनसीडीचे केतन कदम, सल्लागार संतोष खानविलकर, सामाजिक कार्यकर्ते कामिस अल्मेडा, सिस्टर सोनम राणे, तृप्ती जाधव, मयुरी सावंत यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन क्लिनीकल सायकॉलॉजिस्ट रेश्मा भाईप यांनी केले. तसेच अंमली पदार्थांचे आरोग्यावर होणारे परिणाम आणि जनजागृती कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन सायकॉलॉजिस्ट किरण कनकुटे यांनी केले. 00000

आजअखेर 55 हजार 954 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 79 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 37.400 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 3.000 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर इतकी आहे.कणकवली-वागदे,राष्ट्रीय महामार्ग 66 पूलाजवळ गडनदीची पातळी 34.000 मीटर इतमी असून इशारापातळी 36.764 मीटर व धोका पातळी 37.920 मीटर इतकी असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि.28 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात सध्या या प्रकल्पामध्ये 241.238 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 53.92 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर-27.3720, अरुणा -2.4641, कोर्ले- सातंडी -20.6340 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव-1.211,नाधवडे-0.815,ओटाव-0.099, देंदोनवाडी – 0.145, तरंदळे -0.432, आडेली – 0.177, आंबोली – 0.576, चोरगेवाडी– 1.114, हातेरी-1.604, माडखोल -1.690 निळेली - 0.992, ओरोस बुद्रुक – 0.629, सनमटेंब – 0.767, तळेवाडी- डिगस-0.483, दाभाचीवाडी – 0.777, पावशी –1.690, शिरवल – 0.677, पुळास – 0.995, वाफोली – 0.445, कारिवडे – 0.620, धामापूर – 0.891, हरकूळ -1.957, ओसरगाव – 0.073, ओझरम – 0.739, पोईप – 0.227, शिरगाव – 0.097, तिथवली – 0.643, लोरे-1.597 तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे-0.607,शिरवळ-0.100, वर्दे-0.000,कोकीसरे-0.006,नानीवडे-0...

सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 74.6 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 74.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 59.6 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 670.1 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड -45.7(653.4),मालवण-43.7(702.5), सावंतवाडी-74.6 (745.0),वेंगुर्ला-74.5 (631.5),कणकवली-73.8(612.6),कुडाळ-69.2(709.7), वैभववाडी-42.1(617.1),दोडामार्ग-44.8(635.9) असा पाऊस झाला आहे. 00000

पोलीस विभागाकडून 12 जूलै पर्यंत नियमन आदेश

सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.) : राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता विविध राजकीय पक्षाचे कार्यकते राज्यभरात आक्रमक झालेले असून काही राजकीय पक्षातील प्रतिस्पर्थी गट आपआपल्या कार्यकत्यांची जमवाजमव करुन एकमेका लक्ष करीत आहे. काही ठिकाणी आंदोजनात्मक घटना घडलेल्या आहेत. तसेच 10 जूलै 2022 रोजी देवशयनी आषाढी एकादशी व बकरी ईद साजरी होणार आहे. अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी दि. 28 जून 2022 ते 12 जूलै 2022 या कालावधीत जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 प्रमाणे नियमन आदेश पदभार पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जारी केले आहे. आदेश म्हटले आहे की ,राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता विविध पक्षाचे राजकीय पक्षाचे कार्यकर्त राज्यभरात आक्रमक झालेले असून काही राजकीय पक्षातील प्रतिस्पर्थी गट आपआपल्या कार्यकत्यांची जमवाजमव करून एकमेकां लक्ष करीत असुन त्यातून काही ठिकाणी आंदोलनात्मक घटना घडलेल्या आहेत. अशा वेळी वैयक्तीक हेवेदावेंच्या कारणाकरुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शांतता भंग होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत...

जल जीवन मिशनअंतर्गत सन 2022-23 च्या वार्षिक कृती आराखड्यास मान्यता कार्यारंभ आदेश देण्यात आलेल्या योजना पूर्ण करण्यावर भर द्या - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.) – जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या आजच्या बैठकीत सन 2021-22 मधील प्रस्तावीत कामांना तसेच 2022-23 च्या वार्षिक कृती आराखड्यास मान्यता घेण्यात आली. जल जीवन मिशनअंतर्गत कार्यारंभ आदेश देण्यात आलेल्या योजना वाढवाव्यात, त्या पूर्णतेवर अधिक भर द्यावा अशी सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिल्या. जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जल संधारणचे कार्यकारी अभियंता यु.आर.महाजनी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियांता नितीन उपरेलू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता संतोष सावर्डेकर उपस्थित होते. श्री. सावर्डेकर यांनी सुरुवातील सद्यस्थितीची माहिती दिली. एकूण 431 ग्रामपंचायती असून देण्यात आलेली नळ जोडणीची संख्या 1 लाख 25 हजार 87 इतकी आहे. सन 2022-23 च्या कृती आराखड्या नुसार 733 योजना आहेत. त्याची किंमत 330.69 कोटी इतकी आहे. जल जीवन मिशन अंतर्गत योजनांवर झालेला खर्च 7.99 कोटी इतका असून कार्यारं...

आजअखेर 55 हजार 950 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 81 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

सिंधुदुर्ग जिल्हयात 11 जुलैपर्यंत मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी, दि.27 (जि.मा.का) : राज्यातील सद्याच्या राजकीय परिस्थितीचे पडसात जिल्ह्यात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने जिल्ह्यात राजकीय पक्षांकडून अचानकपणे मोर्चा, निदर्शने, रास्ता रोको सारखे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी. यासाठी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी, त्यांना प्राप्त असलेल्या शक्तीचा वापर करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) व 37 (3) नुसार दिनांक 27 जून 2022 रोजी 10 वाजलेपासून ते दिनांक 11 जुलै 2022 रोजी रात्री 12 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्याचे संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला आहे. या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण भूभागात खालील कृत्य करण्यांस मनाई आहे. कलम 37 (1) Ø शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे. Ø अंग भाजून टाकणार पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेवून फिरणे. Ø दगड किंवा इ...

जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 27 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 ( सन 1962 चा अधिनियम, 5) चे कलम 9(1) अन्वये सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वात्रिक निवडणुकीसाठी त्या जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व कलम 58 (1) (अ) अन्वये पंयाचत समित्यांमधील निर्वाचक गणाची रचना व एकूण सदस्य संख्या निवडणूक विभाग व निर्वाचक गणाबाबत जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या आदेशाच्या मसुद्याची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयातील फलकावर, जिल्हा परिषद कार्यालयातील फलकावर, सर्व तहसिलदार कार्यालयातील फलकावर, सर्व पंचायत समिती कार्यालयातील फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 00000

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 37.500 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.200 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 3.000 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर इतकी आहे.कणकवली-वागदे,राष्ट्रीय महामार्ग 66 पूलाजवळ गडनदीची पातळी 34.700 मीटर इतमी असून इशारापातळी 36.764 मीटर व धोका पातळी 37.920 मीटर इतकी असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि.27 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात सध्या या प्रकल्पामध्ये 239.908 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 53.63 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर-26.1740, अरुणा -2.2982, कोर्ले- सातंडी -20.2250 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव-1.183,नाधवडे-0.810,ओटाव-0.025, देंदोनवाडी – 0.127, तरंदळे -0.412, आडेली – 0.154, आंबोली – 0.549, चोरगेवाडी– 1.026, हातेरी-1.438, माडखोल -1.690 निळेली - 0.792, ओरोस बुद्रुक – 0.532, सनमटेंब – 0.575, तळेवाडी- डिगस-0.404, दाभाचीवाडी – 0.652, पावशी –1.437, शिरवल – 0.573, पुळास – 0.930, वाफोली – 0.380, कारिवडे – 0.605, धामापूर – 0.546, हरकूळ -1.345, ओसरगाव – 0.059, ओझरम – 0.630, पोईप – 0.192, शिरगाव – 0.085, तिथवली – 0.620, लोरे-1.366 तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे-0.588,शिरवळ-0.061, वर्दे-0.000,कोकीसरे-0.006,नानीवडे-0....

मालवण तालुक्यात सर्वाधिक 109.3 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 109.3 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 78.0 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 610.5 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड -85.2(607.7),मालवण-109.3(658.8), सावंतवाडी-56.9 (670.4),वेंगुर्ला-44.4 (557.0),कणकवली-76.5(538.8),कुडाळ-98.6(640.5), वैभववाडी-58.5(575.0),दोडामार्ग-38.7(591.1) असा पाऊस झाला आहे. 00000

कणकवलीत जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

Image
सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.): राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे बहुजन समाजाचे महानायक, शेतकऱ्यांचे उद्धारकर्ते, विशाल मनाचे राजे व एक लोकनेते होते. त्यांनी तळागाळातील बहुजन वर्गास समाजातील मुख्य प्रवाहात आणले. त्यांचे विचार आजही दिशादर्शक आहेत. समाजात समानता प्रस्थापित करायची असेल तर आधी जातीभेदाचे निर्मुलन होणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले यांनी केले. कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाचे कणकवली काँलेज कणकवली येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज तथा सामाजिक न्याय दिन आणि नशाबंदी महाराष्ट्र राज्य पुरस्कृत जिल्हा व्यसनमुक्ती समितीच्यावतीने जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले बोलत होते. प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सांस्कृतिक विभाग प्रमुख युवराज महालिंगे, पर्यवेक्षक मंगलदास कांबळे, प्रा.डॉ. मारोती चव्हाण, डॉ. विद्याधर तायशेट्ये,पोलीस निरीक्षक होलावलेकर, पत्रकार महेश सरनाईक ,स्मिता नलावडे, अर्पिता मुंबरकर,संतोष जाधव,हर्षदा...

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन

Image
सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 148 व्या जयंतीनिमित्त समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात राजर्षी छत्रपती शाहू महाराजाच्या प्रतिमेस जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त प्रमोद जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वृंद तसेच विभागातील विविध महामंडळातील कर्मचारी उपस्थित होते. ०००००

प्राथमिक आश्रम शाळा बोर्डवे येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन

Image
सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 148 वी जयंती समाज कल्याण व प्राथमिक आश्रम शाळा बोर्डवे यांचे संयुक्त विद्यमाने प्राथमिक आश्रमशाळा, बोर्डवे येथे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त प्रमोद जाधव यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास समाज कल्याण निरीक्षक अनिल बोरीकर, सुनिल बागुल, संतोष परुळेकर, श्रीम. चव्हाण, श्रीम. तोरसकर, श्रीम. अमरे, श्रीम. गिरी, श्रीम. रेवाळे व इतर कर्मचारी तसेच प्राथमिक आश्रमशाळा, बोर्डवे येथील मुख्याध्यापक आनंद कर्पे, सहा. शिक्षक श्री. पालव, श्री. नाईक, अधीक्षीका उषा गोसावी, सदानंद गोसावी (सचिव), नाथपंथी गोसावी समाज ऐक्य वर्धक मंडळ, बोर्डवे, सिंधुदुर्ग तसेच या आश्रमशाळेतील विद्यार्थी /कर्मचारी उपस्थितीत होते. सदर कार्यक्रमास अध्यक्षांच्या हस्ते निंबध स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह / प्रशस्तीपत्रक देण्यात येऊन विद्यार्थ्यांचा सन्मान व गौरव कर...

आजअखेर 55 हजार 950 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 80 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 37.150 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 2.800 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर इतकी आहे.कणकवली-वागदे,राष्ट्रीय महामार्ग 66 पूलाजवळ गडनदीची पातळी 32.700 मीटर इतमी असून इशारापातळी 36.764 मीटर व धोका पातळी 37.920 मीटर इतकी असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि.26 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात सध्या या प्रकल्पामध्ये 237.491 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 53.09 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर-24.9800, अरुणा -1.9300, कोर्ले- सातंडी -19.2270 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव-1.156,नाधवडे-0.777,ओटाव-0.014, देंदोनवाडी – 0.045, तरंदळे -0.373, आडेली – 0.131, आंबोली – 0.511, चोरगेवाडी– 0.937, हातेरी-1.269, माडखोल -1.690 निळेली - 0.706, ओरोस बुद्रुक – 0.460, सनमटेंब – 0.438, तळेवाडी- डिगस-0.333, दाभाचीवाडी – 0.558, पावशी –1.151, शिरवल – 0.469, पुळास – 0.897, वाफोली – 0.292, कारिवडे – 0.587, धामापूर – 0.341, हरकूळ – 0.899, ओसरगाव – 0.048, ओझरम – 0.489, पोईप – 0.092, शिरगाव – 0.071, तिथवली – 0.558, लोरे – 0.767. तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे-0.607, शिरवळ-0.032, वर्दे-0.000,कोकीसरे-0.006,नानी...

कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 117.7 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक ११७.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 89.0 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 532.5 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड -55.2 (522.5),मालवण-106.5(549.5), सावंतवाडी-89.9 (613.5),वेंगुर्ला-48.1 (512.6),कणकवली-93.9(462.3),कुडाळ- 117.7(541.9), वैभववाडी-106.3(516.5),दोडामार्ग-82.9(552.4) असा पाऊस झाला आहे. 00000
Image

आजअखेर 55 हजार 914 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 106 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

जागतिक अमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.25 (जि.मा.का.)- जागतिक अमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन येत आहे. उद्या रविवार दि. 26 जून जागतिक अमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्ताने नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई, शाखा सिंधुदुर्ग, कणकवली कॉलेज यांच्या संयुक्तपणे जनजागृतीची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तरुणांना नशेच्या पदार्थांपासून लांब ठेवण्यासाठी नशेच्या विरोधात प्रतीबंधात्मक जनजागृती करण्याची गरज आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवार दि. 26 जून रोजी कणकवली कॉलेज, कणकवली येथे सकाळी 9 ते 11 या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये सकाळी साडेदहाच्या दरम्यान कणकवली कॉलेज ते आप्पा पटवर्धन चौक जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या फेरीत जास्तीत जास्त जनतेनी सहभाग घ्यावा असे आवाहन नशाबंदी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. 00000
जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणीसाठा सिंधुदुर्गनगरी, दि.25 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात सध्या या प्रकल्पामध्ये 235.799 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 52.71 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर-24.4640, अरुणा -0.9500, कोर्ले- सातंडी -19.0310 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव-1.146,नाधवडे-0.766,ओटाव-0.012, देंदोनवाडी – 0.036, तरंदळे -0.334, आडेली – 0.540, आंबोली – 0.506, चोरगेवाडी– 0.937, हातेरी-1.194, माडखोल -1.467 निळेली - 0.688, ओरोस बुद्रुक – 0.460, सनमटेंब – 0.346, तळेवाडी- डिगस-0.321, दाभाचीवाडी – 0.547, पावशी –1.110, शिरवल – 0.374, पुळास – 0.880, वाफोली – 0.240, कारिवडे – 0.578, धामापूर – 0.291, हरकूळ – 0.729, ओसरगाव – 0.034, ओझरम – 0.460, पोईप – 0.050, शिरगाव – 0.069, तिथवली – 0.527, लोरे – 0.699. तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे-0.607, शिरवळ-0.000, वर्दे-0.000,को...
देवगड तालुक्यात सर्वाधिक 98.8 मि.मी. पाऊस सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात देवगड तालुक्यात सर्वाधिक 98.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 61.3 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 443.5 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड -98.8 (467.3),मालवण-56.2(443.0), सावंतवाडी-61.8(523.6),वेंगुर्ला-56.7(464.5),कणकवली-56.8(368.4),कुडाळ- 38.4(424.2), वैभववाडी-56.3(410.2),दोडामार्ग-63.8(469.5) असा पाऊस झाला आहे. 00000

आजअखेर 55 हजार 914 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 90 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

सावंतवाडी येथे 27 रोजी पेन्शन अदालत

सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.) : सावंतवाडी पंचायत समितीच्या सभागृहातमध्ये (सेवानिवृत्त जिल्हा परिषद कर्मचारी) यांच्यासाठी दिनांक 27 जून 2022 रोजी पेन्शन अदालतीचे आयोजित करण्यात आल्याची माहिती सावंतवाडीचे गट विकास अधकारी यांनी दिली. सावंतवाडी तालुक्यातील बांधकाम उपविभाग, लघु पाटबंधारे उपविभाग, ग्रामिण पाणि पुरवठा उपविभाग, शिक्षण विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, तालुका आरोग्य अधिकारी, पशुसंवर्धन विभाग तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राकडील जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत व अद्याप निवृत्तीविषयक लाभ देण्याचे प्रलंबित आहेत. त्या कर्मचाऱ्यांनी त्याबाबतची लेखी निवेदने घेऊन पेन्शन अदालत कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन करण्यात येत आहे. 0000 --

26 जून रोजी सामाजिक न्याय दिन

सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस 'सामाजिक न्याय दिन 'म्हणून सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाकडून साजरा करण्यात येणार असून दि.26 जून 2022 रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 148 वी जयंती निर्मित्त समता दिंडी, छत्रपती शाहू महाराजांचे व इतर राष्ट्रपुरुषांचे सुविचार फलक लावणे, मान्यवराचे व्याख्याने, भाषण इ.उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्गनगरी येथे राबविण्यात येणार आहेत. 26 जून रोजी समता दिडींत शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग घ्यावा असे, आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे. 0000

वैद्यकीय गर्भपात कायदा उल्लंघनाची माहिती देणाऱ्यास 1 लाखांचे बक्षिस

सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.) –शासन मान्यता नसलेल्या ठिकाणी अथवा अपात्र व्यक्ती, डॉक्टर गर्भपात करत असतील किंवा वैद्यकीय गर्भपात होईल अशी औषधे देत असतील तर ते बेकायदेशीर आहे. अशा बेकायदेशीर गर्भपात केंद्रांची किंवा कायद्याचे उल्लंघन होत असलेल्या प्रकारांची माहिती देणाऱ्या व्यक्तीस 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येते. वैद्यकीय गर्भपात कायदा 1971, कलम 4 अंतर्गत शासन मान्यता व नोंदणीकृत असलेल्या गर्भपात केंद्रांमध्येच अर्हताप्राप्त वैद्यकीय व्यवसायिक यांना विहीत पद्धतीचा अवलंब करून कायद्यामधील नमुद कारणांसाठी वैद्यकीय गर्भपात करण्यास परवानगी आहे. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यामध्ये अवैध गर्भपात तसेच गर्भलिंग निदान होत असल्यास त्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयामध्ये द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे. वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 च्या तरतुदींचे उल्लंघन होत असल्याबाबत माहिती प्राप्त झाल्यावर व तपासणीनंतर कायद्याचा भंग झाल्याचे निष्पन्न झाल्...

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि.24 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 37.000 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.000 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 2.100 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर इतकी आहे.कणकवली-वागदे, राष्ट्रीय महामार्ग 66, पूलाजवळ गडनदीची पातळी 32.500 मीटर इतमी असून इशारापातळी 36.764 मीटर व धोका पातळी 37.920 मीटर इतकी असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि.24 (जि.मा.का.) - तिलारी- आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात सध्या या प्रकल्पामध्ये 234.830 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 52.49 टक्के भरले आहे. जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर-24.3450, अरुणा -0.6545, कोर्ले- सातंडी -18.8370 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 1.137, नाधवडे -0.756, ओटाव -0.010, देंदोनवाडी – 0.032, तरंदळे -0.294, आडेली – 0.027, आंबोली – 0.501, चोरगेवाडी – 0.922, हातेरी-1.138, माडखोल -1.376, निळेली - 0.688, ओरोस बुद्रुक – 0.455, सनमटेंब – 0.325, तळेवाडी- डिगस-0.309, दाभाचीवाडी – 0.547, पावशी –1.026, शिरवल – 0.337, पुळास – 0.863, वाफोली – 0.240, कारिवडे – 0.574, धामापूर – 0.291, हरकूळ – 0.683, ओसरगाव – 0.021, ओझरम – 0.446, पोईप – 0.000, शिरगाव – 0.069, तिथवली – 0.527, लोरे – 0.668. तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणी साठा पुढीलप्रमाणे-विलवडे-0.622, शिरवळ-0.000, वर्दे-0.000, कोकीस...

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 58.8 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 58.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 30.2 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 382.2 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड -24.9(368.5), मालवण -33.4(386.8), सावंतवाडी-38.1(461.8), वेंगुर्ला-38.5(407.8),कणकवली-15.4(311.6),कुडाळ-31.4(385.8),वैभववाडी-17.9(353.9), दोडामार्ग-58.8(405.7), असा पाऊस झाला आहे. 00000

अंमली पदार्थांविरोधात शाळा, महाविद्यालयात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करा - अतिरिक्त पोलीस अधिक्षक नितीन बगाटे

Image
सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.) – अंमली पदार्थांविरोधात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये व्याख्यान, अभियान असे कार्यक्रम आयोजित करून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. त्यांच्या दुष्परिणामांची माहिती सर्वत्र पोहचवावी, असे निर्देश अतिरिक्त पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांनी दिले. जिल्हा पातळीवर अंमली पदार्थांचे सेवन व वापराविषयी परिणामकारक प्रतिबंधासाठीच्या जिल्हास्तरीय समितीची ऑनलाईन बैठक आज झाली. याबैठकीस प्रांताधिकारी वैशाली राजमाने, प्रशांत पानवेकर, केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे अधिक्षक अभिषेक पाल, सहाय्यक डाक घर अधिक्षक विनायक कुलकर्णी आदी सहभागी झाले होते. सर्व विभागांचा आढावा घेऊन श्री. बगाटे म्हणाले, पोस्ट विभागाने तसेच कृषी विभागाने संशयास्पद पार्सलची आणि लागवडीची माहिती स्थानिक पोलिसांना द्यावी. महसूल विभागाने आपल्या यंत्रणांमार्फतही आपल्या विभागातील लागवडीवर लक्ष ठेवावे. घनदाट अरण्याच्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून तसेच अन्य खबऱ्यांच्या मार्फत लक्ष ठेऊन गांजाच्या लागवडीबाबत खात्री करावी. गांजाचा जमिनीवर कसा परिणा...

आजअखेर 55 हजार 905 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 80 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि.23 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 37.000 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.000 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 2.100 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर इतकी आहे.कणकवली-वागदे, राष्ट्रीय महामार्ग 66, पूलाजवळ गडनदीची पातळी 32.300 मीटर इतमी असून इशारापातळी 36.764 मीटर व धोका पातळी 37.920 मीटर इतकी असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि.23 (जि.मा.का.) - तिलारी- आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात सध्या या प्रकल्पामध्ये 235.315 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 52.60 टक्के भरले आहे. जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर-24.3450, अरुणा -0.4962, कोर्ले- सातंडी -18.8370 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 1.137, नाधवडे -0.756, ओटाव -0.010, देंदोनवाडी – 0.032, तरंदळे -0.275, आडेली – 0.027, आंबोली – 0.491, चोरगेवाडी – 0.922, हातेरी-1.117, माडखोल -1.240, निळेली - 0.670, ओरोस बुद्रुक – 0.455, सनमटेंब – 0.266, तळेवाडी- डिगस-0.289, दाभाचीवाडी – 0.545, पावशी –0.985, शिरवल – 0.324, पुळास – 0.852, वाफोली – 0.211, कारिवडे – 0.569, धामापूर – 0.191, हरकूळ – 0.588, ओसरगाव – 0.016, ओझरम – 0.446, पोईप – 0.000, शिरगाव – 0.069, तिथवली – 0.527, लोरे – 0.668. तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणी साठा पुढीलप्रमाणे-विलवडे-0.636, शिरवळ-0.000, वर्दे-0.000, कोकीस...

वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 50.7 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 50.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 36.1 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 352.0 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड -18.0(343.6), मालवण -44.1(353.4), सावंतवाडी-35.4(423.7), वेंगुर्ला-50.7(369.3),कणकवली-38.7(296.2),कुडाळ-43.0(354.4),वैभववाडी-25.3(336.0), दोडामार्ग-23.3(346.9), असा पाऊस झाला आहे. 00000

आंतरराष्ट्रीय ऑल्मिपिक दिवस साजरा

सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय व न्यू इंग्लिश स्कुल ओरोस सिंधुदुर्गनगरी यांचे संयुक्त विद्यमाने दि.23 जून 2022 रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस न्यू इंग्लिश स्कुल ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी, विद्या शिरस ,प्र.मुख्याध्यापक अनंत साईल, जलतरण खेळाडू, श्रावणी पालव व शाळेतील शिक्षक उपस्थित होते. श्रीमती शिरस म्हणाल्या हा दिवस खेळ आणि आरोग्य यांना समर्पित म्हणुन साजरा केला जातो, असे प्रतिपादन केले. यंदाच्या वर्षीची ऑलिम्पिक दिनाची थिम Together for a Peaceful World म्हणजेच " शांततापूर्ण जगासाठी, एकत्र" अशी आहे. या दिवसाचा मुख्य उद्देश खेळाचे महत्व वाढविणे, खेळ जीवनाला नविन आकार देऊ शकतो हे सांगणे असा आहे. 23 जून 1894 रोजी आधुनिक ऑलिम्पिक खेळाचे आयोजन, प्रमोशन आणि नियोजन करण्यासाठी 1984 मध्ये पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनाचे उद्देश वय,लिंग, वंश किंवा धर्म याचा भेदभाव न करता जगातील खेळ व लोकांच्या ...

जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पेन्शन अदालत

सिंधुदुर्गनगरी, दि.22 (जि.मा.का.): जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरुन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची निवृत्तीवेतन विषयक प्रकरणे व तद्अनुषंगीक लाभांचा आढावा घेऊन सदर प्रकरणे निकाली काढण्यसाठी सन 2022-23 या वर्षी जिल्हास्तरीय पेन्शन अदालत कार्यक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली आहे. जिल्हास्तरीय तिमाही पेन्शन अदालत कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार 28 जून 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजता. मंगळवार 18 ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजता. शुक्रवार 20 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 ते 1.30 वाजता. आयोजित करण्यात आली आहे. तालुक्यास्तरीय तिमाही पेन्शन अदालत कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. माहे जून 2022 चौथ आठवडा. माहे ऑक्टोंबर 2022 दुसरा आठवडा व माहे जानेवारी 2023 दुसरा आठवडा असे आहेत. या सभेस सर्व खातेप्रमुख व गट विकास अधिकारी यांनी उपस्थित रहावे. पेन्शन अदालतीस सेवानिवृत्त वेतन प्रकरण अगर तद्अनुषंगीक लाभ देणे प्रलंबित असणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचारी अगर त्यांच्या प्राधिकृत प्रतिनिधीचे उपस्थित रहावे. गट व...

आजअखेर 55 हजार 904 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 61 - जिल्हा शल्य चिकित्सक

जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील सरपंच व ग्रामसेवकासाठी कार्यशाळा

सिंधुदुर्गनगरी, दि. 22 (जि.मा.का.) : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 जल जीवन मिशन अंतर्गत कामाना गती देण्याकरिता दिनांक 23 व 24 जून रोजी सरपंच व ग्रामसेवक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेकरिता पाटोदाचे माजी सरपंच भास्कर पेरे पाटील व सल्लागार युनिसेफ मुंबईचे मंदार साठे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक यांनी उपस्थित राहवे असे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी केले आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, यांच्या माध्यमातून स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात सुरु असणाऱ्या कामांना गती देण्याकरिता देवगड, वैभववाडी, कणकवली व मालवण तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक यांना कणकवली येथील भगवती मंगल कार्यालय येथे दि.23 जून 2022 रोजी सकाळी 10 ते 4.30 वाजता या कालावधीत कार्यशाळेचे आयोजित करण्यात आले आहे.सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ व वेंगुर्ला या तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक यांच्यासाठी सावतवाडी येथील भगवती मंगल कार्यालय मळगाव येथे दिनांक 24 जू...

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 22 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 37.000 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 3.700 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 2.100 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर इतकी आहे.कणकवली-वागदे,राष्ट्रीय महामार्ग 66 पूलाजवळ गडनदीची पातळी 32.000 मीटर इतमी असून इशारापातळी 37.920 मीटर व धोका पातळी 40.300 मीटर इतकी असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि.22 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात सध्या या प्रकल्पामध्ये 235.678 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 52.68 टक्के भरले आहे. जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर-24.2270, अरुणा -0.3352, कोर्ले- सातंडी -18.8370 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव-1.125,नाधवडे-0.736,ओटाव-0.007, देंदोनवाडी – 0.025, तरंदळे -0.267, आडेली – 0.000, आंबोली – 0.491, चोरगेवाडी– 0.909, हातेरी-1.076, माडखोल -1.200, निळेली - 0.651, ओरोस बुद्रुक – 0.455, सनमटेंब – 0.239, तळेवाडी- डिगस-0.284, दाभाचीवाडी – 0.545, पावशी –0.943, शिरवल – 0.312, पुळास – 0.852, वाफोली – 0.196, कारिवडे – 0.565, धामापूर – 0.141, हरकूळ – 0.575, ओसरगाव – 0.011, ओझरम – 0.432, पोईप – 0.000, शिरगाव – 0.069, तिथवली – 0.519, लोरे – 0.637. तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे-0.654, शिरवळ-0.000, वर्दे-0.000,कोकीसरे-0.006,ना...

देवगड तालुक्यात सर्वाधिक 90.2 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 22 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात देवगड तालुक्यात सर्वाधिक 90.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 38.6 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 315.9 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड -90.2(325.6),मालवण-45.9(309.3), सावंतवाडी-34.5(388.3),वेंगुर्ला-32.9(318.6),कणकवली-18.0(257.5),कुडाळ- 24.6(311.4), वैभववाडी-17.0(310.7),दोडामार्ग-16.3(323.6) असा पाऊस झाला आहे. 00000
Image

आजअखेर 55 हजार 901 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 59 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

जिल्हाधिकाऱ्यांकडून क्रीडा संकुलातील जलतरण तलावाची पाहणी दुरुस्तीसाठी निधी देणार; अंदाजपत्रक सादर करण्याची बांधकाम विभागास सूचना

Image
सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.) – जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज येथील क्रीडा संकुलामधील शासकीय जलतरण तलावाची सविस्तर पाहणी केली. तलावाच्या दुरुस्तीसाठी प्राधिकरणामधून निधी देणार असल्याचे सांगून त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ अंदाजपत्रक सादर करण्याची सूचना उपअभियंता मनोज जोशी यांना दिली. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी जलतरण तलावासह महिला आणि पुरुषांसाठी चेंजिंग रुम, स्वच्छता गृह याची पाहणी केली. दरवाजे, शॉवर बसवण्याबरोबरच तलावाच्या भोवती फरशा बसवणे, पाण्याची स्वच्छता ठेवणे, रंगरंगोटी आदी कामांबाबत त्यांनी सूचना केल्या. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे उपस्थित होते. * सोबत फोटो जोडला आहे. 00000