प्रलंबित प्रकरणे मार्गी लावा - उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती
सिंधुदुर्गनगरी, दि. 14 (जि.मा.का.) –पीडित व्यक्तींना अर्थसहाय्य देण्यासाठी पोलीस विभागाकडे तपासावर असणारी प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावीत, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी दिले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची सभा आज घेण्यात आली. या बैठकीला नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस निरिक्षक संजय डौर, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त जी.पी. बिटोडे उपस्थित होते.
समाजकल्याण सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी विषय वाचन केले. नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 व अनुसुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत आज अखेर 186 गुन्हे घडले त्यापैकी न्यायालयीन प्रलंबित गुन्हे 44, शाबीत झालेले गुन्हे 5, पोलीस तपासावर 6 गुन्हे आहेत. त्यापैकी 4 गुन्हे उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.
पोलीस विभागाने प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावीत जेणेकरुन पीडित व्यक्तींना अर्थसहाय देणे सोपे होईल. असे निर्देश श्री. मठपती यांनी दिले.
000000
Comments
Post a Comment