'गोवर्धन गोवंश सेवा केंद्र स्थापनेसाठी नोंदणीकृत संस्थानी अर्ज करावेत -जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.अ.दे.डांगोरे
सिंधुदुर्गनगरी दि.20 (जि.मा.का):- दुग्धोत्पादन, शेती, पशु-पैदास,ओझी वाहणे आदी कामास उपयुक्त ,अनुपयुक्त असलेल्या गाय, वळू बैल व वय झालेले गोवंश यांचा सांभाळ करणे, त्यांच्या चारा, पाणी, निवाऱ्याची सोय करणे, गोमुत्र, शेण इ. पासून विविध उत्पादने, खते व गोबरगॅस निर्मितीस प्रोत्साहन देणे, आदी उद्दिष्टांसह राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक या प्रमाणे 'गोवर्धन गोवंश सेवा केंद्र स्थापन करावायाचे आहेत त्यासाठी नोंदणीकृत संस्थानी अर्ज सादर करावेत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.अ.दे.डांगोरे यांनी केले आहे.
या करिता धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या व कमीतकमी ३ वर्षे गोपालनाचा अनुभव असलेल्या संस्थेस पात्रते प्रमाणे रु.१५ लक्ष ते २५ लक्ष एवढे अनुदान एकवेळचे अर्थसहाय्य म्हणून देण्यात येईल. याकरिता धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी असलेल्या व सध्या किमान ५० ते १०० पशुधन असलेल्या मागिल ३ वर्षाचे लेखापरीक्षण झालेले असलेल्या पशुंच्या पालन पोषणासाठी व चारा उत्पादनासाठी किमान ५ एकर जागा असलेल्या संस्थंना अर्ज करता येईल. लाभार्थी निवडीचे निकष, अटी व शर्ती करीता दिनांक- १७ मे २०२३ च्या शा.नि.क्र. २०२३०५१८१२०९२२९२०९ नुसार निर्धारित असून अधिक माहिती करीता जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, जिल्हा परिषद इमारत, सिंधुदुर्ग या कार्यालयाशी संपर्क साधावा.
0000
Comments
Post a Comment