अपंग बालकांना मिरज येथील शासकीय संस्थेमध्ये मोफत प्रवेश
सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) : शासनाच्या अपंग कल्याण आयुक्तालय, पुणे अंतर्गत अपंग (अस्थिव्यंग) बालकांसाठी मोफत शिक्षण, वसतीगृह व गरजेनुसार अस्थिव्यंगोपचार शस्त्रक्रिया व कृत्रिम अवयव पुरवण्याच्या सुविधा पुरविणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय निवासी संस्था किल्ला भाग मिरज येथे कार्यरत असून सन 2023-24 या शैक्षणि वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. प्रवेशासाठी त्वरीत 9325555981,9552234586,9422216459 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अधिक्षक, शासकीय अपंग बालगृह व शाळा, किल्ला भाग मिरज यांनी केले आहे.
मोफत शिक्षण सुविधा :- संस्थेच्या परिसरात 1 ली ते 4 थी पर्यंतचे मोफत प्राथमिक शिक्षण. इ. 5 वी पासून पुढील शिक्षण माध्यमिक शाळेमार्फत. माध्यमिक शाळेत जाणे व येणेकरिता मोफत वाहतुकीची सुविधा. पाठ्यपुस्तके वह्या, इतर शैक्षणिक साहित्य व शालेय गणवेश मोफत. मुलींसाठी विशेष काळजी घेण्यासाठी महिला काळजीवाहक.
वसितिगृह सुविधा:- वसतिगृहात अपंग मुला- मुलींची स्वतंत्र निवास व्यवस्था व मोफत जेवण. प्रत्येक विद्यार्थ्यांस कॉट, गादी, बिछाना व इतर साहित्याचा मोफत पुरवठा. दररोज अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय. शुध्द व थंडगार पाण्याची सुविधा.
शस्त्रक्रिया भौतिकोपचार सुविधा- अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञांच्या सल्यानुसार गरजेनुसार शस्त्रक्रीया व भौतिकोपचाराची सुविधा. गरजेनुसार कृत्रिक अवयव, कुबड्या, तीन चाकी सायकल वाटप.वयोगट 0-6 करीता मोफत EARLY INTERVETION CENTRE अंतर्गत भौतिकोपचार.
प्रवेशाबाबत अटी:- प्रवेशित अस्थिव्यंग असला पाहिजे. वयोगट 6 ते 17 वर्षे. प्रवेश अर्जासोबत सिव्हील सर्जन यांनी दिलेल्या अपंगत्वाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, 3 फोटो. प्रवेश अर्ज व माहितीपत्रक पत्यावर समक्ष अथवा पोस्टाव्दारे मोफत मिळतील. अधिक माहितसाठी अधिक्षक, शासकीय अपंग बालगृह व शाळा, किल्ला भाग, बी,एस,एन,एल ऑफिस शेजारी मिरज.
00000
Comments
Post a Comment