डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनाकरिता प्रस्ताव सादर करावेत - जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी दि.13 (जि.मा.का):- महाराष्ट्र शासन, अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडून " डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना " सन २०२३-२४ मध्ये राबविण्यात येत आहे. राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील मदरशांनी विहित अटी व शर्तीची पूर्तता करुन सन २०२३-२४ या वर्षाकरीता विहित नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांचेमार्फत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांचेकडे दि. ३० जून २०२३ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. विहित अर्जाचा नमुना याबाबतचा अधिक तपशील महाराष्ट्र शासन निर्णय क्र. अविवि-२०१०/प्र.क्र.१५२/१०/का.६ दिनांक ११ ऑक्टोबर २०१३ मध्ये व www.sindhudurg.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जांची दखल घेण्यात येणार नाही. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'