Posts
Showing posts from October, 2021
आजअखेर 51 हजार 275 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 288 - जिल्हा शल्य चिकित्सक
- Get link
- X
- Other Apps
जिल्ह्यातील 9 पाटबंधारे प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्ण करा - जलसंपदा मंत्री जयंत पाटील
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) – तिलारीसह जिल्ह्यातील 9 पाटबंधारे प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्ण करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री जंयत पाटील यांनी आज दिल्या. कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीवेळी त्यांनी या सूचना केल्या. या बैठकीस खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक, शेखर निकम, माजी आमदार प्रविण भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, उपवनसंरक्षक श्री. नारनवरे, दक्षिण कोकण पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता विजय थोरात, कार्यकारी अभियंता रोहीत कोरे, हर्षद यादव, महादेव कदम यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सुधारीत प्रशासकीय मान्यतेसाठी शासन स्तरावर असलेल्या प्रस्तावांसाठी तातडीने बैठकीचे आयोजन करावे असे सांगून श्री. पाटील म्हणाले, तिलारी कालव्यांची कामे तातडीने हाती घ्यावीत. वारंवार कालवे फुटत असल्याबाबत तपासणी करून त्यावर कायम स्वरूपी तोडगा काढण्यात यावा. त्यासाठी गोवा राज्याकडेही प्रस्ताव व आराखडा सादर करावा. शिरशिंगे धरणाची उंची कमी करून तो प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावा. नरडवे धरणाचे कामही लवकरात लवकर मार्गी...
बंदिस्त सभागृहे व खुल्या जागेतील सांस्कृतिक कार्यक्रम होणार सुरु प्रभारी जिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांचे आदेश
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि.30 (जि.मा.का.) - पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडील दि. 11 ऑक्टोबर 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार कोव्हिड 19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंदिस्त सभागृहे, मोकळ्या जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक 22 ऑक्टोंबर 2021 पासून नियंत्रित स्वरुपात सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्याअनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंदिस्त सभागृहे/ मोकळ्या जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रमावरील निर्बंध शिथिल करुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंदिस्त सभागृहे / मोकळ्या जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम सुरु करण्यास मान्यता देणारे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी दिले आहेत. या आदेशात म्हटले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिंधुदुर्ग तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारण सिंधुदुर्ग यांना साथरोग अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आदेशान्वये प्राप्त अधिकारातून राज्यातील बंदिस्त सभागृहे / मोकळ्या जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम सुरु करण्याकरीता खालीलप्रमाणे मान्यता देत आहे. कोव्हिड 19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंदिस्त सभागृहे / मोकळ्...
आजअखेर 51 हजार 262 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 289 - जिल्हा शल्य चिकित्सक
- Get link
- X
- Other Apps
पोलीस अधिक्षक कार्यालयात पेन्शन अदालत संपन्न
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) – जिल्हा पोलीस दलाच्या आस्थआपनेवरून सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अंमलदारांकरिता दि. 25 ऑक्टोबर रोजी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कणकवली, पोलीस उप अधिक्षक, मुख्यालय, मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या पेन्शन अदालतीसाठी 86 सेवानिवृत्त पोलीस अंमलदार उपस्थित होते. यावेळी पेन्शन संदर्भातील विविध तक्रारींबाबत माहिती घेण्यात येऊन त्या अनुषंगाने सविस्तर माहिती पुरवून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. सेवानिवृत्त अंमलदारांच्या सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या दुसऱ्या हप्त्याची बिले ऑक्टोबर महिन्यात कोषागारात जमा करण्यात आल्याने 50 टक्के पेन्शनर्सचे प्रश्न सुटलेले आहेत. तसेच त्यांना पेन्शन संबंधी व इतर शासनाच्या विविध परिपत्रकांची माहिती देण्यात आली. यावेळी सेवानिवृत्ती धारकांच्या ओळखपत्रांचेही वाटप करण्यात आले. * सोबत फोटो जोडला आहे. 00000
आजअखेर 51 हजार 244 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 292 - जिल्हा शल्य चिकित्सक
- Get link
- X
- Other Apps
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा जिल्हा दौरा
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 28, (जि.मा.का.)- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील हे दि. 30 ऑक्टोबर 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शनिवार दि. 30 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 9.30 ते 10.30 वा. मोरेश्वर गोगटे सांस्कृतिक भवन, देवगड - जामसंडे येथे कणकवली - देवगड - वैभववाडी विधानसभा मतदारसंघ - राष्ट्रवादी परिवार संवाद आढावा बैठक, सकाळी 10.30 वा. मोटारीने देवगड येथून कणकवलीकडे प्रयाण, सकाळी 11.30 वा. कणकवली येथे आगमन व राष्ट्रवादी काँग्रेस पाट्री कार्यालय कणकवली येथे, कणकवली तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालायचे उद्घाटन समारंभास उपस्थिती, सकाळी 11.30 ते 11.45 वा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय कणकवली येथे कणकवली तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश. सकाळी 11.45 ते 12.00 वा. कणकवली येथे राखीव. दुपारी 12.00 वा. मोटारीने कणकवली येथून कुडाळकडे प्रयाण, दुपारी 12.30 वा. कुडाळ येथे आगमन. दुपारी 12.30 ते 2.00 वा. लेमन ग्रास हॉटेल, कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा जलसंपदा...
उत्साव साजरा करताना आरोग्याच्या दृष्टीकोनातून खबरदारी घेणे आवश्यक - दत्तात्रय भडकवाड
- Get link
- X
- Other Apps
आजअखेर 51 हजार 193 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 326 - जिल्हा शल्य चिकित्सक
- Get link
- X
- Other Apps
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिकांसाठी पदभरती
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी,दि.28 (जि.मा.का.) स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिक प्रवर्गातून महाराष्ट्र रज्यात एकूण ७४२५ सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येणार आहेत. या पदाकरिता इच्छुक सैन्यदलातून सेवानिवृत्त झालेल्या,खालील पात्रता पूर्ण करत असलेल्या जिल्हयातील माजी सैनिकांनी लवकरात लवकर कोणत्याही परिस्थितीत दिनांक ३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत आपले डिस्चार्ज बुक, ओळख पत्र, इम्पलॉयमेंट कार्डसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन आपले नाव नोंदवावे. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, यांनी केले आहे. आवश्यक पात्रता पुढील प्रमाणे वय १ ऑक्टोबर २०२१ ला ४५ वर्षापेक्षा कमी असावे, शिक्षण कमीत कमी ८ वी पास व १२ वी पास नसवा. सैन्य दलातील सेवा कमीत कमी १५ वर्ष, सैन्य दलातील हुद्दा जास्तीत जास्त Hav and below. सैन्य दलातील चारित्र्य कमीत कमी Good. Medical Cat AYE,SHAPE-1 अशी माहिती सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली आहे. ०००००
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त्तचा संदेश
- Get link
- X
- Other Apps
दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त राज्यपाल व मुख्खमंत्री यांचा संदेश सिंधुदुर्गनगरी,दि.28 (जि.मा.का.) महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व महाराष्ट्रा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त्त संदेश राज्यातील जनतेसाठी प्रस्तुत करण्यात येत आहे. भष्टाचाराविरुध्दच्या जनजागृतीच्या उपायांचा भाग म्हणून संपुर्ण राज्यात दिनांक २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी सप्ताहाचे बोधवाक्य ‘स्वतंत्र भारत @ ७५: सचोटीतून आत्मनिर्भरतेकडे’ हे ठरविण्यात आले आहे. जनसामान्यांच्या मनात भ्रष्टाचार व दप्तरदिरंगाईबाबत प्रक्षोभ आहे. लहानमोठ्या कामाकरिता कार्यालयामध्ये वारंवार बोलावले गेल्यास तसेच पत्रव्यवहाराला उत्तर न दिल्यास त्याच्या मनात शासन यंत्रणेविषयी अविश्वास निर्माण होतो. यास्तव प्रत्येक नागरिकाशी सौजन्याने वागले पाहिजे, त्याच्या समस्यांची रास्त दखल घेतली पाहिजे व विहित नियमानुसार समस्यांचे यथाशिघ्र निराकरण केले पाहिजे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना आपला समाज भ्रष...
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा जिल्हा दौरा
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 28, (जि.मा.का.)- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील हे दि. 30 ऑक्टोबर 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शनिवार दि. 30 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 9.30 ते 10.30 वा. मोरेश्वर गोगटे सांस्कृतिक भवन, देवगड - जामसंडे येथे कणकवली - देवगड - वैभववाडी विधानसभा मतदारसंघ - राष्ट्रवादी परिवार संवाद आढावा बैठक, सकाळी 10.30 वा. मोटारीने देवगड येथून कणकवलीकडे प्रयाण, सकाळी 11.30 वा. कणकवली येथे आगमन व राष्ट्रवादी काँग्रेस पाट्री कार्यालय कणकवली येथे, कणकवली तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालायचे उद्घाटन समारंभास उपस्थिती, सकाळी 11.30 ते 11.45 वा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय कणकवली येथे कणकवली तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश. सकाळी 11.45 ते 12.00 वा. कणकवली येथे राखीव. दुपारी 12.00 वा. मोटारीने कणकवली येथून कुडाळकडे प्रयाण, दुपारी 12.30 वा. कुडाळ येथे आगमन. दुपारी 12.30 ते 2.00 वा. लेमन ग्रास हॉटेल, कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा जलसंपदा...
आजअखेर 51 हजार 169 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 333 - जिल्हा शल्य चिकित्सक
- Get link
- X
- Other Apps
वीजदर सवलत घेणाऱ्या यंत्रमाग घटकांनी ३ नोव्हेंबर पूर्वी प्रस्ताव सादर करावेत
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी,दि.27 (जि.मा.का.) वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वीज अनुदान योजनेचा लाभ घेणारे वस्त्रोद्योग आणि 27 अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेले यंत्रमाग सोडून अन्य सर्व वस्त्रोद्योग प्रकल्प ज्यांची वीज सवलत सुरु आहे. त्याच प्रमाणे वीज सवलतीचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करीत असलेले वस्त्रोद्योग प्रकल्पांनी 22 ऑक्टोबर 2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये कार्यवाही करावी. त्यासाठी 3 नोव्हेंबर 2021 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन वस्त्रोद्योग आयुक्त शीतल तेली- उगले यांनी केले आहे. ज्या वस्त्रोद्योग घटकांची वीज सवलत सुरु असेल किंवा बंद आहे. अथवा वीज सवलत मागणीसाठी प्रस्ताव सादर करीत आहे. त्या उद्योगांनी शासन निर्णय, सहकार पणन, व वस्त्रोद्योग विभाग 22 ऑक्टोंबर 2021 शासन निर्णयातील परिशिष्टानुसार प्रस्ताव आयुक्त (वस्त्रेाद्योग) यांच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावेत. प्रस्ताव मागील 6 महिन्याचे वीज देयक तसेच प्रकल्पाचा एकूण वीज वापर जसे औद्योगिक, कामगार, वसाहत त्यांचे कार्यालय व अन्य वापर यांच्या माहिती तसेच त्यासाठीच्या वीज मिटर याची माहिती देखील सादर करावी. ज्या वस्त्रोद्योग घटका...
महिला व बालविकास समितीची सर्वसाधारण सभा गुरुवार २८ रोजी
- Get link
- X
- Other Apps
1 नोव्हेंबरपर्यंत दक्षता जनजागृती सप्ताह द्या 1064 ला साथ...करूया भ्रष्टाचारावर मात..!
- Get link
- X
- Other Apps
आज 26 ऑक्टोबर पासून 1 नोव्हेंबरपर्यंत दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित केला आहे. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र घडवूया. लाच देणे आणि लाच घेणे हे दोन्ही कायद्याने गुन्हा आहे. कोणताही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी शासकीय कामासाठी लागणाऱ्या शुल्काव्यतिरिक्त पैशाची, वस्तूची मागणी करत असेल तर ती लाच आहे असे समजावे. जर आपल्याकडे कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी अशा प्रकारे लाचेची मागणी करीत असेल तर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्ग कार्यालय कुडाळ १०६४ या टोल फ्री क्रमांकावर, ०२३६२-२२२२८९ वर तसेच ९९३०९९७७०० या व्हाट्स ॲप क्रमांकावर किंवा www.acbmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर लेखी तक्रार करा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक दीपक कांबळे यांनी केले आहे. शासकीय नोकरांनी लाचेची मागणी, लाच स्वीकारणे, शासकीय नोकरास लाच देणे, अपसंपदा प्राप्त करणे व पदाचा दुरूपयोग करून भ्रष्टाचार करणे, शासकीय नोकराने भ्रष्टाचारामार्फत मोठ्या प्रमाणात स्वत:च्या नावे किंवा त्याच्यावतीने कोणत्याही व्यक्तीकडे, पद धारण करण्याच्या कालावधीत कोणत्याही वेळी तो समाधानकारक हिशोब दे...
आजअखेर 51 हजार 93 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 397 - जिल्हा शल्य चिकित्सक
- Get link
- X
- Other Apps
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत ह्यातीचा दाखला अपडेट करण्याचे आवाहन
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी,दि.26 (जि.मा.का.) पेन्शनरांची गैरसोय टाळण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेव्दारे पोस्टमन मार्फत Digital Life Certificate (ह्यातीचा दाखला) अपडेट केला जातो, त्यासाठी पेन्शनरांच्या Biometric ची आवश्यकता असते. पोस्टमन घरी येऊन पेन्शनरांचे Life Certificate अपडेट करतात. त्यासाठी नाममात्र शुल्क ७० रुपये घेतले जाते. Life Certificate घरपोच अपडेट होत असल्यामुळे पेन्शनरांना त्यांच्या पेन्शन ऑफिसला जाण्याची गरज नाही . तरी जिल्हयातील सर्व पेन्शनरांनी या सेवेचा लाभ घ्यावा. असे आवाहन अधीक्षक डाकघर सिंधुदुर्ग यांनी केले आहे. 00000
शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि.26 (जि.मा.का.) सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध झालेली आहे. शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरु झाले आहेत. मागासवर्गीय मुला, मुलींच्या शासकीय वसतिगृहातील रिक्त असणाऱ्या जागेवर प्रवेश प्रक्रियाबाबत विद्यार्थी, विद्यार्थींनीकडून ऑफलाईन पध्दतीने (मॅन्युअली) अर्जाची नोंदणी करण्यात येत आहे. तेव्हा मागसवर्गीय गरजू विद्यार्थी,विद्यार्थींनीनी वसतिगृह प्रवेश अर्ज विनामूल्य प्राप्त करुन घेण्यासाठी कार्यालयीन वेळेत सबंधित वसतिगृहातील गृहपाल,अधिक्षिका व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग दूरध्वनी क्र. ०२३६२२२८८८२ यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा . असे आवाहन दीपक घाटे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सिंधुदुर्ग यांनी केलेले आहे. 00000
आजअखेर 51 हजार 26 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 445 - जिल्हा शल्य चिकित्सक
- Get link
- X
- Other Apps
विकास आराखड्याबाबत एकदिवशीय प्रशिक्षण
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का.) – राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत जिल्हा, पंचायत समिती, ग्रामपंचायत विकास आराखड्याबाबत उद्या दि. 27 ऑक्टोबर 2021 रोजी शरद कृषी भवन, सिंधुदुर्गनगरी येथे एकदिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे ग्रामपंचाय विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील या कळवितात. आमचं गाव आमचा विकास या उपक्रमाअंतर्गत मार्गदर्शक सूचना व शासन निर्णयाद्वारे निर्गमित केलेल्या पुरक मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन सन 2022-23 चा वार्षिक विकास आराखडा अंतिम करण्याबाबत सुचना आहेत. हा विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने या प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 00000
पोलीस शिपाई चालक व पोलीस शिपाई पदांसाठी 28 व 29 रोजी मैदानी चाचणी
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का.) – जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील एकूण 20 पोलीस शिपाई चालक व 21 पोलीस शिपाई रिक्तपदांसाठी पात्र उमेदवारांना दि. 28 व 29 ऑक्टोबर 2021 रोजी कागदपत्र पडताळणी, उंची, छाती मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेसाठी बोलवण्यात आले असल्याची माहिती पोलीस उप अधिक्षक एस.बी. गावडे यांनी दिली आहे. याविषयी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. पोलीस शिपाई चालक लेखी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या अधारे भरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांना 1:10 प्रमाणे प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्धकरून त्यांना दि. 28 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 7.30 वा. पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, सिंधुदुर्ग येथे कागदपत्र पडताळणी व उंची, छाती मोजमाप या प्रक्रियेकरीता बोलवण्यात आले आहे. पोलीस शिपाई लेखी परीक्षेमध्ये मिळआलेल्या गुणांच्या अधारे भरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांना 1:10 प्रमाणे प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून त्यांना दि. 29 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 5.00 वा. पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, सिंधुदुर्ग येथे कागदपत्र पडताळणी...
आय.टी.आय. प्रवेशसाठी पुन्हा नव्याने अर्ज करण्याचे आवाहन
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. २५ (जि.मा.का.) जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश हुकलेले आहे, अशा इच्छुक उमेदवारांना रिक्त जागेवर प्रवेशासाठी नव्याने ऑनलाईन अर्ज करण्याची संधी प्रशिक्षण महासंचालनालयांनी उपलब्ध करुन दिलेली आहे. उमेदवारांनी २६ ऑक्टोंबर २०२१ पर्यंत itiadmissions@dvet.gv.in किंवा www.dvet.gov.in या अधिकृत संकेस्थळावर जाऊन अर्ज करावित. असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (म.रा) संचालक दि.अ. दळवी यांनी केलेली आहे. अर्ज केलेल्या इच्छूक उमेदवारांची गुणवत्ता यादी २७ ऑक्टोंबर २०२१ रोजी संबंधित संस्थेत स्थळावर लावण्यात येईल. दि२८ ऑक्टोंबर पासून रिक्त राहिलेल्या जागेसाठी समुपदेशन प्रवेश फेरी सुरु होईल. संकेतस्थळावर सूचित केलेल्या नोटीफिकेशन प्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात यंणार आहे. शिल्प कारागीर योजना, आदिवासी उपाययोजना , अल्पसंख्याक योजना, सार्वत्रिक योजना, अनुसूचित जाती संबंधित आदी योजनांच्या अंतर्गत ज्या जागा रिक्त आहे त्या जागेवर प्रवेश घेण्यासाठी ही शेवटची संधी संचालनालयाने उपलब्ध करुन दिलेली आहे. अलिकडे मोठमो...