ग्रामपंचायत स्तरावर नल जलमित्रांची नेमणूक करणार
सिंधुदुर्गनगरी दि 25 (जिमाका):- जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक आहे. याकरिता बहु कौशल्यावर आधारित जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गवंडी- प्लंबर, मेकॅनिकल फिटर, इलेक्ट्रीशियन पंप ऑपरेटर याप्रमाणे तीन नल जल मित्र यांची नेमणूक प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर करण्यात येणार आहे. 431 ग्रामपंचायतीसाठी किमान 1 हजार 293 बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक विनायक ठाकूर यांनी दिली. जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना कार्यान्वित घरगुती नळ जोडणीद्वारे प्रती मानसी प्रती दिन 55 लि. विहित गुणवत्तेसह दैनंदिन वापरासाठी कार्यान्वित नळाद्वारे पाणी उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी व योजना शाश्वत टिकविण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर तांत्रिक मनुष्यबळाची उपलब्धता असणे आवश्यक आहे. यासाठी लोक सहभागाला अन्यन्य साधारण महत्व देण्यात आलेले आहे. तसेच पाणी पुरवठा योजना पुर्व नियोजन टप्यापासून ते देखभाल व दुर...