मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी दि.05 (जि.मा.का):- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवार दि. 6 जून 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार दि. 6 जून 2023 रोजी सकाळी 9.45 मोपा, विमानतळ गोवा येथे आगमन व मोटारीने जयप्रकाश चौक,सावंतवाडी जि.सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 10.15 वाजता सावंतवाडी मतदारसंघातील विविध प्रकल्पांच्या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ:- जयप्रकाश चौक, सावंतवाडी. सकाळी 11.30 वाजता सावंतवाडी येथून मोटारीने कुडाळकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- कुडाळ हायस्कुल कुडाळ. दुपारी 2 वाजता कुडाळ हायस्कुल येथून मोटारीने वेंगुर्लाकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता मंत्री उदय सामंत, यांच्या निवासस्थानी, वेंगुर्ला येथे आगमन व राखीव. दुपारी 3.15 वाजता वेंगुर्ला येथून मोटारीने चिपी विमानतळाकडे प्रयाण. सायं. 4 वाजता चिपी विमानतळ सिंधुदुर्ग येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'