Posts

Showing posts from November, 2021

नगर पंचायत निवडणूक कार्याक्रम जाहीर आचारसंहितेचे पालन करण्याबाबत दक्षता घ्यावी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) – राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील कुडाळ, वाभवे - वैभववाडी, कसई - दोडामार्ग आणि देवगड - जामसंडे या नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार या चार नगरपंचायतीच्या क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत राहणार आहे. या निवडणूक क्षेत्रातील मतदारांवर विपरित प्रभाव टाकणारी कोणतीही कृती/घोषणा कोणत्याही मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक किंवा इतर पदाधिकाऱ्यांना इतरत्र सुद्धा करता येणार नाही. तरी आचारसंहिता कालावधीत आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. या निवडणुकीचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. अंतिम प्रभागनिहायय मतदार याद्या अधिप्रमाणित करुन प्रसिद्ध करण्याचा दिनांक 29 नोव्हेंबर 2021. जिल्हाधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख 30 नोव्हेंबर 2021, नामनिर्देशनपत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध असण्याचा कालावधी बुधवार दि. 1 डिसेंबर 2021 सकाळी 11 ते मंगळवार दि. 7 डिसेंब...

पणजी येथे 50 वी डाक अदालत

सिंधुदुर्गनगरी,दि.29 (जि.मा.का) पोस्टमास्तर जनरल,गोवा क्षेत्र पणजी व्दारे दि. 21 डिसेंबर रोजी दुपारी 12 वा. पणजी येथे 50 वी डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अधीक्षक डाकघर सिंधुदुर्ग विभागगाचे आ.ब. कोड्डा यांनी दिली आहे. गोवा क्षेत्राशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल,स्पीड पोस्ट काऊटर सेवा, वस्तू,पार्सल, मनीऑर्डर, बचत खाते, याबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव, हुद्दा इ. संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार डाक अदालतीचे सेक्रेटरी रमेश प्रभू सहायक डाक निदेशक, पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, गोवा क्षेत्र पणजी 403001 यांच्या नावे दोन प्रतींसह दि. 10 डिसेंबर 2021 पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहचेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाणार नाही. 00000

सिंधुदुर्गनगरी मध्ये डाक अदालत

सिंधुदुर्गनगरी,दि.29 (जि.मा.का) दिनांक 10 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता अधीक्षक डाकघर सिंधुदुर्ग यांचे कार्यालयामध्ये डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अधीक्षक डाकघर सिंधुदुर्ग विभागाचे आ.ब. कोड्डा यांनी दिली आहे. पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल,स्पीड पोस्ट काऊटर सेवा, डाक वस्तू,पार्सल, मनीऑर्डर, बचत खाते, याबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास पाठविली असेल त्याचे नाव, हुद्दा इ. संबंधितानी डाक सेवेबाबतची आपली तक्रार सिंधुदुर्ग विभागाचे अधीक्षक डाकघर आ.ब. कोड्डा सिंधुदुर्गनगरी 416812 यांचे नावे दिनांक 6 डिसेंबर 2021 पर्यंत अथवा त्यापुर्वी पोहाचेल अशा रीतीने पाठवावी त्यानंतर आलेल्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही . 00000

वारस नोंदणीसाठी विधवा तसेच पालक गमावलेल्या मुलांची गावनिहाय यादी द्यावी - निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड

Image
सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) – कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांबाबत तसेच विधवांचे वारस नोंदणीसाठी गाव निहाय, तालुका निहाय यादी द्यावी. तहसिलदारांच्या माध्यमातून वारस नोंद केली जाईल, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी केली. कोविड 19 रोगाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक आज घेण्यात आली. बैठकीला विधी व सेवा प्राधिकरणचे सचिव डी.बी. म्हालटकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता बढे, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक नितीन काळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना शिरदावडे, महिला अत्याचार निवारण कक्षाच्या सहायक पोलीस निरीक्षक नलिनी शिंदे आदी उपस्थित होते. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी आढावा दिला. जिल्ह्यामध्ये एक पालक मयत बालके 233 असून दोन्ही पालक मयत बालके 14 असे एकूण 247 बालके आहेत. 568 विधवा असून 250 गृहभेटी पूर्ण झाल्या आहेत. अनाथ प्रमाणपत्रासाठी 14 प्रस्ताव उपआयुक्तालयाकडे सादर ...

आजअखेर 51 हजार 676 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 54 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

सामाजिक न्याय भवन येथे संविधान दिन साजरा

Image
सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का): संविधान दिनानिमित्त आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे संविधानाचे वाचन करण्यात आले. यावेळी समाज कल्याण उपायुक्त प्रमोद जाधव यांनी संविधानाचे महत्व विशद केले. दीपक घाटे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी सर्वांना राज्य घटनेची माहिती सांगितली. यावेळी सामाजिक न्याय भवन येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. * सोबत फोटो जोडला आहे. 00000

जिल्ह्यात 5 लाख 40 हजार 176 जणांनी घेतला पहिला डोस

सिंधुदुर्गनगरी, दि.26(जि.मा.का.): जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 5 लाख 40 हजार 176 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 855 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 156 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 991 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 847 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 1 लाख 31 हजार 979 व्यक्तींनी पहिला डोस तर 88 हजार 259 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 1 लाख 55 हजार 704 नागरिकांनी पहिला डोस तर 1 लाख 20 हजार 11 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 2 लाख 32 हजार 647 जणांनी पहिला डोस तर 1 लाख 13 हजार 18 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 8 लाख 60 हजार 467 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 9 लाख 51 हजार 260 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 7 लाख 17 हजार 180 लसी या कोविशिल्डच्या तर 2 लाख 34 हजार 80 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 6 लाख 72 हजार 297 कोविशिल्ड आणि 1 लाख 88 हजार 170 कोवॅक्सिन असे मिळून ...

ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिलांसाठी धार्मिक स्थळे खुली जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का): जिल्ह्यातील 65 वर्षापेक्षा जास्त वयाचे सर्व नागरिक आणि गर्भवती महिला ज्यांनी कोविड 19 लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झालेले आहेत, अशांना धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करणेच्या अटीस अधीन राहून खुली करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज दिले आहेत. या आदेशात म्हटले आहे. जिल्ह्यातील 65 वर्षापेक्षा जास्त वयाचे सर्व नागरिक आणि गर्भवती महिला ज्यांनी कोव्हीड 19 लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झालेले आहेत, अशांना धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करणेच्या अटीस अधीन राहून खुली करणेत येत आहेत. तसेच धार्मिक आणि प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी मास्क परिधान करणे, शारिरिक अंतराचे पालन करणे, थर्मल स्क्रिनिंग करणे आणि वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील. यापूर्वी कोविड -19 व्यवस्थापनासाठी या कार्यालयाकडून विहित केलेले दिनांक 12 ऑगस्ट 2021 रोजीचे, आदेश आणि त्यात उल्लेख असलेल...

आजअखेर 51 हजार 652 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 70 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का): जिल्ह्यातील कसई - दोडामार्ग, वाभवे - वैभववाडी आणि कुडाळ नगरपंचायतीसाठीची सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी मागासवर्गीय उमेदरावांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणीचा परिपूर्ण प्रस्ताव निवडणूक निर्णय अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांचे शिफारसपत्र घेऊन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी सिंधुदुर्ग यांच्याकडे तात्काळ सादर करावेत असे आवाहन प्रमोद जाधव, उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी सिंधुदुर्ग यांनी केले आहे. 00000

रेवतळेच्या स्वराज्य वस्तीस्तर संघाच्या महिलांकडून सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता

Image
सिंधुदुर्गनगरी दि.25 (जि.मा.का): महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापिक सिंधुकन्या लोक संचलित साधन केंद्र, मालवण नगर परिषद, अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापीत स्वराज्य वस्तीस्तर रेवतळे येथील संघाच्या महिलांकडून सिंधुदुर्ग किल्ल्यावर साफ-सफाई करण्यात आली. वायरी - भूतनाथ ग्रामपंचायतीने ग्रास कटर उपलब्ध करून दिले होते. सर्वप्रथम किल्ल्याची साफ - सफाई करण्यासंदर्भात अध्यक्ष संजना मांजरेकर आणि सहकारी सदस्य यांनी एक दिवस आधी किल्ल्यावर भेट देऊन किल्ल्यावरील समितीशी चर्चा केली. त्याचबरोबर वायरी ग्रामपंचायत यांचेही सहकार्य मिळण्याबाबत मागणी केली. त्यानंतर काल सिंधुदुर्ग किल्ल्यावरील मंदिर, बुरूज, पायवाटा, विहीर भोवतालची साफ - सफाई करून एक स्वच्छतेचा वेगळा संदेश आणि प्रेरणा दिली. वाढलेल्या गवताआड गेलेल्या विहिरी स्वच्छतेनंतर पर्यटकांसाठी पाहण्यास उपलब्ध झाल्या. यासाठी वायरी ग्रामपंचायतीने ग्रास कटर उपलब्ध करून दिला होता. त्याचबरोबर महिलांनीही साधनसामग्री उपलब्ध केली होती. माविमचे जिल्हा समन्वयक नितीन काळे यांनी स्वच्छतेबाबत आणि प्रशिक्षण देण्याब...

जिजाई वस्तीस्तर संघाच्यावतीने गवंडीवाडा येथे आरोग्य तपासणी

सिंधुदुर्गनगरी दि.25 (जि.मा.का): महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापीत सिंधुकन्या लोक संचलित साधन केंद्र, नगर परिषद मालवण, दिनदयाळ अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजीविक अभियानअंतर्गत जिजाई वस्तीस्तर संघाच्यावतीने गवंडीवाडा येथे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबीरात 38 जणांनी लाभ घेतला. जिल्हा समन्वयक नितीन काळे, जिजाई वस्तीस्तर संघाच्या अध्यक्ष माधवी तिरोडकर, नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक, सिंधुकन्या सीएमआरसीच्या व्यवस्थापक गिता चौकेकर यांच्या उपस्थितीत शिबीराला सुरुवात झाली. सुरुवातीला राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. क्षेत्रीय समन्वयक खेमराज सावंत, संकल्प शहरस्तर संघाचे सदस्य स्नेहा मयेकर, दतात्रय मयेकर, हिंदू लॅब फ्लेबोटॉमिस्ट पूजा चव्हाण, तालुका रुग्णालयाचे समुपदेशक उमेश पेडणेकर हे उपस्थित होते. या शिबीरात रक्तामधील साखर, लोह, कोलेस्ट्रॉल, थॉयरॉईड, लिवर, कीडनी, रक्तदाब तसेच रॅन्डम साखर तपासणी करण्यात आली. शिबीर यशस्वी होण्यासाठी बचत गटातील निशा कांबळी, जागृती ...

आजअखेर 51 हजार 649 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 70 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

आजअखेर 51 हजार 647 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 63 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

मोठ्या जत्रांच्या ठिकाणी वजन व मापे तपासणीसाठी व्यवस्था करावी - अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी

सिंधुदुर्गनगरी दि.23 (जि.मा.का): येणाऱ्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जत्रा भरणार आहेत. जिल्ह्यातील मोठ्या जत्रा जसे आंगणेवाडी, कुणकेश्वर या जत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुकाने थाटली जातात. या ठिकाणी वजन व मापे यांची तपासणी करण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात यावी असे आदेश अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी दिले. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या आज वेबिनारद्वारे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी वजन व मापे वैध मापनचे अधिकारी, परिवहन महामंडळाचे अधिकारी, पुरवठा विभागाचे अधिकारी तसेच अशासकीय सदस्य उपस्थित होते. अशासकीय सदस्य विलास कुबल यांनी ट्रान्सफॉर्मर, वीज देयक परतावा याविषयी म्हणणे मांडले. तसेच जिल्ह्यात सीएनजीचा पुरवठा सुरळीत व जास्तीचा व्हावा यासाठी पुरवठादारांना आदेश द्यावेत. दुधाची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात प्रयोगशाळा उभारण्यात यावी अशी मागणी केली. अशासकीय सदस्यांनी केलेल्या मागण्यांचा पाठपुरवा करण्याचे आदेश अपर जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले. 00000

कबड्डी खेळसाठी जिल्हास्तरीय खलो इंडियाचे प्रशिक्षण केंद्र

सिंधुदुर्गनगरी,दि.23 (जि.मा.का) क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या मार्फत शुक्रवार २६ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ९ वाजता कबड्डी या खेळ प्रकाराचे खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र निवड चाचणीसाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे. खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रसाठी दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ रोजी निवड चाचणी आयोजित करण्यात आलेली होती या निवड चाचणीस खेळाडूंचा अल्प प्रतिसाद असल्याने पात्र खेळाडू प्राप्त न झाल्याने . पुनश्च दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ राजी सकाळी ९ वाजता खेला इंडिया प्रशिक्षण केंद्रासाठी कबड्डी खेळाडुंची निवडचाचणी आयोजित करण्यात आलेली आहे. सदरच्या निवड चाचणीस खेळाडूंसाठी वयोमर्यादा ८ ते १२ वर्षाखालील मुले, मुली ही आहे. खेळाडुंनी निवड चाचणीस येताना कबड्डी किट तसेच जन्म तारखेचा पुरावा आधारकार्ड, जन्मदाखला सोबत आणणे आवश्यक आहे. 00000

विमुक्त जाती,भटक्या जमाती प्रवगंसाठी कन्यादान योजना -सहायक आयुक्त दीपक घाटे

सिंधुदुर्गनगरी,दि.23 (जि.मा.का) विमुक्त जाती, भटक्या जमाती धनगर व वंजारीसह इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील आर्थिक कमकुवत असलेल्या मागासवर्गीय कुटुंबातील सामुहीक सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या जोडप्यांना २० हजार रुपये अनुदान देणेबाबतची कन्यादान योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी व संस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होवून विवाह करणाऱ्या दांपत्यांना वस्तू स्वरुपात २० हजार रुपये इतके अनुदान व सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रती जोडप्यामागे ४ हजार रुपये इतके प्रोत्साहनात्मक अनुदान खालील निकषाप्रमाणे देण्यात येते. सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणाऱ्या मागासवर्गीय दांपत्यांना वस्तुस्वरुपात देण्यात येणाऱ्या अनुदान २० हजार रुपये वधुचे वडील,आई किंवा पालकांच्या अधोरेखित धनादेशाव्दारे लग्नाच्या दिवशी देण्यात येते. सामु...

धनगर समाजासाठी घरे बांधण्याची योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन -सहायक आयुक्त दीपक घाटे

सिंधुदुर्गनगरी,दि.23 (जि.मा.का) धनगर समाज बांधवाच्या विकासाठी विशेष कार्यक्रम भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्यावची योजना अमलात आली असून जिल्ह्यातील सर्व धनगर बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा.असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे. या योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत धर्तीवर सुरु करण्यात आली आहे. ही योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित सर्व धनगर बांधवांना सुचित करण्यात येते की सदर योजना वैयक्तिक व सामुहीक स्वरुपाची आहे. या योजनेबाबत अर्ज ग्रामविकास अधिकारी, सरपंच यांचे मार्फत गट विकास अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात यावित. या योजनेचा लाभ घेण्यासाठीचे निकष पुढील प्रमाणे आहेत. लाभार्थी धनगर कुटुंबातील भटक्या जमाती -क या मुळ प्रवर्गातील असावा. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपये पेक्षा कमी असावे. कुटुंबाचे स्वत:चे मालकीचे घर नसावे. कुटुंब हे भूमिहीन असावे. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असवा. राज्यात कोठे ही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. सदर योजनेचा लाभ हा कुटुंबातील एकाच व्यक्तीस देण्यात येईल. लाभार्थी वर्षभरात ६ महिने एका...

अथर्व फाऊंडेशन यांच्या मार्फत शहिद सैनिकांच्या मुलींना लॅपटॉपचे वाटप

सिंधुदुर्गनगरी,दि.22 (जि.मा.का) देशाभरातील शहिद जवानांच्या कुटुंबियांना तसेच माजी सैनिकांना वेगवेगळ्या माध्यमातुन मदत केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून अथर्व फाऊंडेशन, मुंबईचे चेअरमन सुनिल राणे यांच्या मार्फत शहिद सैनिकांच्या मुलींना लॅपटॉपचे वितरण करण्याचे गौरवास्पद काम करण्यात आले आहे. अथर्व फाऊंडेशन,चे स्वयंसेवक प्राध्यापक बालाजी शिंदे व प्राध्यापक संदिप झाडे यांच्याकडून १८ नोव्हेंबर २०२१ राजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे शहिद जवान रमेश महादेव गवस यांची कन्या श्वेता रमेश गवस, शहिद जवान सोमा शांताराम परब यांची कन्या सानिका सोमा परब व शहिद जवान हरि पाटकर यांची कन्या कोमल हरि पाटकर या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शहिद जवानांच्या तीन मुलींना पुढील शिक्षणासाठी लॅपटॉप देऊन गौरविण्यात आले. 00000

खेलो इंडिया युथ गेम्स क्रीडा स्पर्धेचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी,दि.22 (जि.मा.का) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत, जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने अयोजित १८ वर्षाखालील जिल्हास्तरीय चौथ्या इंडिया युथ गेम्स क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्हास्तरीय चौथ्या गेम्स स्पर्धाचे आयोजन पुढीलप्रमाणे करण्यात येणार आहे. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी १८ वर्षाखालील मुले, २५ नोव्हेंबर २०२१ रोजी १८ वर्षाखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धा. २६ नोव्हेंबर २०२१ रोजी १८ वर्षाखालील मुलांच्या तर, २७ नोव्हेंबर २०२१ रोजी १८ वर्षाखालील मुलींच्या खो-खो स्पर्धा. व ३० नोव्हेंबर २०२१ रोजी १८ वर्षाखालील मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. वरील दिलेल्य खेळामधील आयोजनाच्या सुचना पुढीलप्रमाणे आहेत. कबड्डी, खो-खो व बास्केटबॉल या खेळाकरिता, खेळाडूची जन्मतारीख १ जानेवारी २००३ रोजीची किंवा त्यानंतरची असावी.खेळाडूने सोबत - आधारकार्ड,१०वी बोर्डचे प्रमाणपत्र.कबड्डी या खेळाकरिता खेळाडूचे वजन १८ वर्षाखालील मुले-७० किलोखाली व १८ वर्षा...

आजअखेर 51 हजार 640 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 67 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये नॉन कोविड रुग्णसेवा नियमित सुरू - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील

सिंधुदुर्गनगरी दि.22 (जि.मा.का): शासन धोरण व जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये नॉन कोविड रुग्णसेवा सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. माहे मार्च 2020 पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालये हे कोविड रुग्णालय म्हणून कार्यरत आहेत. या साथीच्या कालावधीमध्ये असंख्य कोविड बाधीत रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करण्यात आलेले आहेत. तरी सध्यस्थितीमध्ये कोविड रुग्णांची संख्या ही अल्प प्रमाणात असून नवीन लागण होण्याचे प्रमाण कमी होत आहे. त्या अनुषंगाने शासन धओरण व जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये नॉन कोविड रुग्णसेवा सुरू करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कोविड बाधीत रुग्णांकरिता नियमित रुग्णसेवा सद्यस्थितीतही सुरू राहतील. तसेच रुग्णालयीन सर्व विभागांच्या बाह्यरुग्ण सेवा, अपघात, वैद्यकीय सेवाही सुरू आहेत. मात्र सद्या टप...

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय योजनेचा लाभा घ्यावा

सिंधुदुर्गनगरी,दि.18 (जि.मा.का) शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग यांचे मार्फत इतर मागास घटकांसाठी महामंडळाकडून २० टक्के बीज भांडवल, १० लाख रुपये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गट कर्ज व्याज परतावा व १ लाख रुपये पर्यंतची थेट कर्ज योजना राबविल्या जात आहेत. योजनाची माहिती पुढीलप्रमाणे आहे. बीज भांडवल कर्ज योजना - योजनेत कर्जाची मर्यादा ही ५लाख रुपये असून कर्जाची मुदत ५ वर्षे आहे. योजनेमध्ये महामंडळाचा सहभाग २० टक्के बँकेचा सहभाग ७५ टक्के व लाभार्थी सहभाग हा ५ टक्के असतो. महामंडळाच्या कर्ज रकमेवर द.सा.द.शे ६ टक्के व्याज आकारले जाते व बँकेच्या कर्ज रकमेवर बँकेच्या नियमानुसार आकारले जाते. लाभार्थीच वय १८ ते ५० वर्षे असणे आवश्यक आहे.या योजनेचे अर्ज जिल्हा कार्यालय येथे उपलब्ध आहेत. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना - या योजनेत कर्जाची मार्यादा १० लाख रुपये असून ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. कर्जाचे हप्ते वेळेवर भरल्यास १२ टक्के पर्यंतचा व्याज परतावा लाभार्थींच्या बचत खात्यात दरमहा जमा करण्यात येणार आहे....

भाताच्या एफ.ए.क्यु प्रतीसाठी यंदाच्यावर्षी 1 हजार 940 रुपये दर जाहीर भात विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणीचे फेडरेशनचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 18 (जि.मा.का.) – सन 2021-22 हंगामासाठी शासनाने एफ ए.क्यु प्रतीच्या भातासाठी 1 हजार 940 रुपये प्रती क्विंटल दर जाहीर केला आहे. ज्या शेतकऱ्यांना हमीभावाने भात शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करायचा आहे, त्यांची विक्रीसाठी खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. या ऑनलाईन नोंदणीसाठी जिल्ह्यात 22 ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी दि. 30 नोव्हेंबर 2021 रोजीपर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी केले आहे. प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. राज्य शासनाचे अधारभूत किंमत धान खरेदी योजनेकरिता शासनाची मुख्य अभिकर्ता संस्था म्हणून दि महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन लि. ही संस्था काम पाहते. हंगाम 2021-22 करिता शासनाने एफ ए.क्यु प्रतीच्या धान (भात) करिता 1 हजार 940 रुपये प्रती क्लिंटल दर जाहीर केला आहे. ज्या शेतकऱ्यांना हमीभावाने धान शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करायचा आहे त्या शेतकऱ्यांकरिता विक्रीसाठी खरेदी केंद्रावर आगाऊ ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे. त्यानुसार मार्केंटिंग फेडरेशनच्या जिल्हा कार्या...

निरीक्षण गृहात पळविलेल्या मुलाची माहिती देण्याचे आवाहन

Image
सिंधुदुर्गनगरी,दि.18 (जि.मा.का) शासकीय मुलांचे निरीक्षण गृहामधील बालक रुपेश करकेश शासमनवर वय १७ हा निरीक्षणगृहामध्ये दाखल असताना कुलरमधील पिण्याचे पाणी आणण्याकरिता गेला असता कोणीतरी आज्ञात इसमाने त्यास फुस लावुन कायदेशीर पालकांचे सुरक्षा रक्षकांचे ताब्यातुन विनापरवानगी पळवुन नेले आहे. मुलाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे. रा. रुम नं -१०, बाब भालचंद्र अपार्टमेंट, नागवेकर हॉस्पीटल जवळ, ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग . वर्णन रंग- काळा,उंची १६५ सेंमी, बांधा - मजबुत,अंगात काळया रंगाचा टिशर्ट, व निळया रंगाची हाफ पँट अशा वर्णनाचा आहे. सदर बालक आढळल्यास सिंधुदुर्ग पोलिस स्टेशन -०२३६२ २२८८८८, पोलीस उप निरीक्षक, नळकांडे मोबा.९७६२९००४०३ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन आर.एस.नळकांडे तपा. अंम . पोलीस उपनिरीक्षक सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे, जिल्हा सिंधुदुर्ग यांनी केले आहे. सोबत- फोटो जोडला आहे. ००००

आगी सारखी दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी हाच महत्वाचा उपाय - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

Image
सिंधुदुर्गनगरी दि.18 (जि.मा.का): आगी सारखी दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी हाच महत्वाचा उपाय आहे. त्यासाठी कामाच्या ठिकाणी सतर्क रहावे. दुर्दैवाने एखाद्या ठिकाणी आग लागण्याचा प्रकार घडल्यास उपस्थित असलेल्या कर्मचारी, अधिकारी यांनी प्रथम माहिती देणे व आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी कर्मचारी, अधिकारी यांना अग्मी शमन यंत्रणा हाताळण्याची माहिती असणे आवश्यक आहे. अशी माहिती जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि इतर कर्मचारी यांना व्हावी यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सांगितले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हा रुग्णालय येथील नर्सिंग महाविद्यालयामध्ये अग्नी सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील आदी उपस्थित होते. अग्नी सुरक्षा प्रशिक्षण हे एक महत्वाचे प्रशिक्षण असल्याचे सांगून जिल्हा...

आजअखेर 51 हजार 599 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 95 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

जिल्ह्यात 30 नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी दि.17 (जि.मा.का): त्रिपुरा घटनेच्या अनुषंगाने सुरु असलेली आंदोलने, एस.टी. संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आंदोलने /निदर्शने होऊन तसेच इंधन दरवाढ व इतर कारणास्तव विविध संघटनांकडून होणारी आंदोलने- निदर्शने झाल्यास जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जिल्हादंडाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी त्यांना प्राप्त झालेल्या शक्तींचा वापर करून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागामध्ये दि. 30 नोव्हेंबर 2021 रोजीपर्यंत मनाई आदेश लागू केला आहे. या आदेशात म्हटले आहे. सद्दस्थितीत त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात विविध संघटनातर्फे आंदोलने सुरु आहेत. आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला होता. वरील घटनेच्या निषेधार्थ आपल्या जिल्ह्यात आंदोलने व निदर्शने झाल्यास प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत न...

आजअखेर 51 हजार 570 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 116 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

सावंतवाडी येथे माजी सैनिकी मुलांचे वसतिगृहात प्रवेश सुरु

सिंधुदुर्गनगरी,दि.17(जि.मा.का) सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता वसतीगृह प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तरी सर्व युध्द विधवा, माजी सैनिक विधवा, माजी सैनिक व माजी सैनिक अनाथ पाल्य तसेच शिल्लक राहिलेल्या जागासाठी नागरी पाल्य यांनी दिनांक 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत आपला प्रवेश निश्चित करुन घ्यावा असे आवाहन सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशांनुसार विविध स्तरावर शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. त्यास अनुसरुन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग यांचे अधिपत्याखालील सैनिकी मुलांचे वसतिगृह सावंतवाडी येथे प्रवेशाकरिता आकारण्यात येणारी दर पुढीलप्रमाणे आहेत. सैनिकी मुलांचे वसतिगृह,सावंतवाडी येथे प्रवेश क्षमता 60 एवढी आहे. दर प्रतिमाह माजी अधिकारी, ऑनररी अधिकारी पाल्य रुपये 900, माजी जेसीओज पाल्य रुपये 800, माजी एनसीओज, शिपाई रुपये 600, नागरी पाल्य रुपये 2250 आहे. युध्द विधवा, इतर माजी सैनिक विधवा यांचे सर्व पाल्यांना तसेच माजी सैनिकांच्या अनाथ पाल्यांना वसतिगृह प्रवेश मोफत आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्...

किसान क्रेडीट कार्ड योजनेसाठी कार्यशाळांचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी,दि.17(जि.मा.का) केंद्र शासनाच्या सुचनेनूसार किसान क्रेडीट कार्ड संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत दर शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यशाळांच्या यशस्वी आयोजनासाठी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांना तालुका नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आलेले अहे. या योजनेंतर्गत ज्या पशुपालकांना पशुपालनासाठी व कुक्कुटलनासाठी अर्थसहाय्य हवे आहे, अशा पुशुपालकांनी या कार्यशाळेस उपस्थित रहावे. कार्यशाळेच्या ठिकाणासाठी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा. या योजनेंतर्गत पशुपालकांकडे सध्या उपलब्ध असलेल्या पशुधनाचा खर्च भागविण्यायसाठी पण या योजनेतून तरतुद करण्यात आलेली आहे. या कार्यशाळेस बँक ऑफिसर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी इच्छुकांनी पशुधन विकास अधिकारी विस्तार यांचेशी संपर्क साधून कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. आर.बी. दळवी, उपायुक्त पशुसंवर्धन अधिकारी यांनी केलेले आहे. 00000

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी प्रस्ताव सादर करावित

सिंधुदुर्गनगरी,दि.17(जि.मा.का) भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती फी योजनेअंतर्गत अनुसुचित जाती, विजाभज इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी २४ नोव्हेंबर २०२१ पर्यत प्रस्ताव सादर करावित. असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे. सन 2011-12 ने 2016-17 या कालावधीत तांत्रिक त्रुटी असल्यामुळे प्रलंबित असलेले अर्ज, सन 2017-18 मधील Mahaeschol या ऑनलाईन प्रणालीमध्ये नुतनीकरण केलेले मात्र देयक न निघाल्यामुळे प्रलंबित असणारे अर्ज सन 2017-18 मधील प्रथम वर्षास असणाऱ्या विद्यार्थ्यांचे नवीन अर्ज ज्या महाविद्यालयांनी सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयकडे अद्यापही सादर केलेले नाहीत अथवा सादर केलेले आहेत. परंतु एखादा विद्यार्थी राहून गेलेला आहे. अशा महाविद्यालयांनी प्रस्ताव या कार्यालयास 24 नोव्हेंबर 2021 पर्यंत सादर करावे.जिल्हयातील महाविद्यालयांना कार्यालयाकडून वारंवार झालेल्या बैठकीव्दारे Google Meet या ऑनलाईन प्रणालीवरुन होणाऱ्या बैठकामध्ये, कार्यालयांकडॅन वारंवार केलेला पत्रव्यवहार याव्दारे अर्ज सादर करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. तरी सन 2011-12 ते सन...

भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी नवीन अर्ज व नुतनीकरण करण्याची मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी,दि.17(जि.मा.का) भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवरील विजाभज इमाव व विशेष मागास प्रवर्गाचे सन २०२०-२१ करिता नवीन अर्ज नोंदणी करण्याची व अर्जांचे नुतनीकरण करण्याची मुदतवाढ मंगळवार ३० नोव्हेंबर २०२१ अखेर करण्यात आलेली आहे.अशी माहित दीपक घाटे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी दिली आहे. ज्या विजाभज, इमाव व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज नोंदणी व अर्ज नुतनीकरण करण्याची ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच जिल्हयातील सर्व महाविद्यांलयानी महाविद्यालय स्तरावर प्रलबिंत असणारे अर्ज छाननी करुन ३० नोव्हेंबर २०२१ अखेर ऑनलाईन प्रणालीतून सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे वर्ग करण्याचे आवाहन दीपक घाटे सहायक आयुक्त समाज कल्याण,सिंधुदुर्ग यांनी केलेले आहे. 00000

महाराष्ट्र राज्य बालनाट्य व दिव्यांग बालनाटय स्पर्धा 30 नोव्हेंबर पर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत

सिंधुदुर्गनगरी,दि.17(जि.मा.का) शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या 1 फेब्रुवारी 2022 पासून सुरु होणाऱ्या बालनाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्था,शाळा,विद्यालयांकडून दिनांक 30 नोव्हेंबर, 2021 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. 18 व्या बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी 1 फेब्रुवारी, 2022 पासून महाराष्ट्र राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच द्वितीय दिव्यांग बालनाटय स्पर्धेची अंतिम फेरी फेब्रुवारी 2022 मध्ये एका केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे. बालनाट्य व दिव्यांग बालनाटय स्पर्धेकरिता रु.1,000/- इतक्या अनामत रकमेचा धनाकर्ष स्पर्धक संस्थेने संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे नावे पाठवावयाचा आहे. प्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा धनाकर्ष (डीडी) संस्थांना परत करण्यात येईल. गतवर्षी स्पर्धेत नियमांचे उल्लंघन केलेल्या तसेच कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रयोग न करणाऱ्या नाट्यसंस्थांना यावर्षी स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी बालनाटय स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्...

मत्स्यव्यवसायिक व मत्स्यकास्तकार यांनी किसान क्रेडिट कार्डचा लाभ घेण्यासठी कॅम्पचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी,दि.17(जि.मा.का) जिल्ह्यातील जास्तीत जास्त मत्स्यव्यवसायिक व मत्स्यकास्तकार यांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ मिळण्यासाठी दिनांक 8 नोव्हेंबर 2021 पासून तीन महिन्यासाठी प्रत्येक शुक्रवारी कॅम्पचे आयोजन करण्याच्या सुचना दिल्या आहेत.त्यानुषंगाने गुरुवार 18 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11.वाजता खालील ठिकाणी किसान क्रेडिट कार्डचे ‍कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे. आरोंदा मच्छीमार सहकारी संस्था, पिरवाडी, आरोंदा, ता. सावंतवाडी, रामेश्वर मच्छीमार सहकारी संस्था, दांडी मालवण, र्वेगुर्ला मच्छीमार सहकारी संस्था,गिरपवाडा,ता. र्वेगुर्ला ,वाचनालय, तांबळडेग, ता. देवगड . तरी इच्छुक मच्छिमारांनी उपस्थित रहावे.अशी माहिती र.ग. मालवणकर सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग मालवण यांनी दिली आहे. 00000

इतर मागासवर्गीय महामंडळाची एकरकमी परतावा योजन

ा सिंधुदुर्गनगरी,दि.17(जि.मा.का) जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय महामंडळाच्या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी संपलेल्या लाभार्थीसाठी एकरकमी परतावा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेनूसार थकीत कर्जाची एकरकमी परतफेड केल्यास थकीत व्याज रकमेवर 2 टक्के सुट देण्यात येईल ही योजना ठराविक कालावधीसाठी आहे. खाते बंद केल्यावर महामंडळाच्या नवीन रु. 10.00 लक्ष व्याज परतावा योजनेतंर्गत लाभ घेता येईल. संबधितांनी योजनेचा लाभ घेऊन थकीत कर्जाची परतफेड करावी व आपले कर्ज खाते बंद करावे . योजनेचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थीनी घ्यावा असे आवाहन प्रिती आर पटेल जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. ही योजना महामंडळाच्या थेट कर्ज योजनेस लागू राहणार नाही याची नोंद घ्यावी, अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग येथे 02362 2228119 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. 0000

पणजी येथे पेन्शन अदालत

सिंधुदुर्गनगरी,दि.17(जि.मा.का) पोस्टाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनसंबंधी प्रभावीपणे निवारण करण्यासाठी गोवा पोस्टल क्षेत्रीय कार्यालया तर्फे पेन्शन अदालतचे आयोजन केले आहे. ज्या मध्ये गोवा राज्य, महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी अणि सिंधुदुर्ग जिल्हयाचा समावेश आहे. पोस्ट मास्तर जनरल, क्षेत्रीय कार्यालय पणजी गोवा येथे बुधवार दिनांक 1 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 12.30 वाजता पेन्शन अदालत आयोजित करण्यात आलेली आहे. डाक विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन पेन्शन संबंधी ज्या तक्रारींचे निवारण 3 महिन्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा सर्व तत्कारींची या डाक पेन्शन अदालन मध्ये दखल घेतली जाईल. कायदा संबंधित प्रकरणे. उदा उत्तरधिकार तसेच धोरणात्मक स्वरुप संबंधित तत्कारी पेंन्शन अदालत मध्ये विचारात घेतली जाणार नाहीत. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलांसह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यांस मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव, हुद्दा इत्यादी. संबंधितांनी पेंन्शन बाबतची आपली तक्रार श्री एरीक्सन पी. सॅमुअल,सहा लेखाधिकारी, सचिव पेन्शन अ...

आजअखेर 51 हजार 565 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 119 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

कोविड 19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या जिल्ह्यातील 14 बालकांना पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मुदत ठेव प्रमाणपत्राचे वितरण

Image
सिंधुदुर्गनगरी दि. 16 (जि.मा.का) : कोविड 19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या जिल्ह्यातील 14 बालकांना 5 लक्ष मुदत ठेव प्रमाणपत्रांचे वितरण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज करण्यात आले. या प्रमाणपत्र वितरण प्रसंगी खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, सहाय्यक जिल्हाधिकारी संजिता महोपात्रा उपस्थित होते. जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी सुरुवातीला याबाबत माहिती दिली. यावेळी बाल कल्याण समितीचे सदस्य ॲड. पी.डी. देसाई, स्नेहलता चोरगे, प्रतिभा नाटेकर, कौशल्य विकासचे सहायक आयुक्त एस.जी. पवार, महिला आर्थिक विकास महामंडळाचे नितीन काळे आदी उपस्थित होते. * सोबत फोटो जोडला आहे. 00000

जिल्हा पत्रकार संघ आणि माहिती कार्यालयाच्यावतीने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त दर्पणकारांना अभिवादन

Image
सिंधुदुर्गनगरी दि. 16 (जि.मा.का) : 16 नोव्हेंबर या राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त जिल्हा पत्रकार संघ, मुख्यालय पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आद्य मराठी पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्यालय पत्रकार कक्षामध्ये झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वालावलकर यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची स्थापना, त्याचे महत्व आणि त्यापाठीमागील भूमिका याबाबतची माहिती श्री. सातपुते यांनी यावेळी दिली. तसेच श्री. जेठे यांनी या दिवसाचे औचित्य सांगून राष्ट्रीय पत्रकार दिन व त्याबाबत केलेल्या घोषणेची माहिती दिली. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे सचिव उमेश तोरसकर, मुख्यालय पत्रकार संघाचे सचिव नंदकुमार आयरे, खजिनदार दत्तप्रसाद वालावलकर, संदीप गावडे, विनोद दळवी, सतीश हरमलकर, गिरीष परब, शांताराम राऊत, रवी गावडे, प्रसाद पाताडे, बाळ खडपकर, लवू म्हाडेश्वर, माहिती सहायक ह...

समर्पित निधी प्राप्त करुन घेण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार - पालकमंत्री उदय सामंत

Image
सिंधुदुर्गनगरी दि. 16 (जि.मा.का) : सन 2021 - 22 या आर्थिक वर्षातील माहे ऑक्टोबर अखेर 170 कोटी मुळ अर्थसंकल्पीय तरतुदीच्या 9.18 टक्के खर्च झाला आहे तसेच अनुसुचित जाती उपयोजनेच्या मुळ अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी 27.44 टक्के खर्च झाला आहे. समर्पित केलेला 44 कोटी 55 लक्ष निधी पुन्हा प्राप्त करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिली. या बैठकीस केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, खा. विनायक राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, सर्वश्री आमदार अनिकेत तटकरे, बाळाराम पाटील, दीपक केसरकर, वैभव नाईक, नितेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, नियोजन समितीचे सदस्य व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी सुरुवातीला स्वागत करुन विषय वाचन केले. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्यात येतील, असे सांगून पालकमंत्री उदय स...

आजअखेर 51 हजार 549 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 120 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जिल्हा दौरा

Image

आजअखेर 51 हजार 548 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 117 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 13, 14, 27 व 28 नोव्हेंबर रोजी विशेष मोहीम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जयकृष्ण फड

सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जि.मा.का.) – मुख्य निवडणूक अधिकारी यांनी भारत निवडणूक आयोग यांच्याकडील 20 ऑक्टोबर 2021 रोजीच्या पत्रानुसार जिल्ह्यामध्ये दिनांक 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत केला आहे. या कार्यक्रमाच्या वेळापत्रकाप्रमाणे विशेष मोहिमांचा कालावधी उद्या शनिवार दि. 13 नोव्हेंबर, रविवार दि.14 नोव्हेंबर, शनिवार दि. 27 नोव्हेंबर आणि रविवार दिनांक 28 नोव्हेंबर हा आहे. अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे आज दिली. पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत. एकत्रीकृत प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी दिनांक 1 नोव्हेंबर, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर, दावे व हरकती निकालात काढणे 20 डिसेंबर आणि मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे 05 जानेवारी 2022 असा आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी दि. 1 नोव्हेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये पुढीलप्रमाणे योग्य तो फॉर्म- नमुना नोंदविण्याकरिता आवाहन करण्यात येत आहे. 1) फॉर्म- नमूना नं. 6 –...

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 वी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन सादर करावयाचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 12(जि.मा.का.) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी (Pravate Candidate), तसेच श्रेणीसुधार योजने अंतर्गत व तुरळक विषय, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेव्दारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) घेवून प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहेत. सदर परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेनदनपत्र ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची असून त्यांच्या तारखा व तपशील पुढीलप्रमाणे आहे. शुल्क प्रकार उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL Database वरुन ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी (Hsc Vocation stream), पुनर्परिक्ष...