शिष्यवृत्ती, फ्रिशीप योजनेंतर्गत प्रलंबित अर्ज शनिवारपर्यंत द्या
सिंधुदुर्गनगरी दि.19 (जि.मा.का):- विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे सन 2018 -19 ते 2021-22 या कालावधीतील शिष्यवृत्ती, फ्रिशीप योजनेंतर्गत प्रलंबित अर्ज दि. 24 जून अखेर मागविण्यात येत असल्याचे, माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी सन 2018 -19 ते 2021-22 या कालावधीतील शिष्यवृत्ती, फ्रिशीप योजनेंतर्गत महाडिबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज केले होते. तथापि सदर शैक्षणिक वर्षात काही विद्यार्थ्यांचे अर्ज ॲटो रिजेक्ट झाले होते. अशा विद्यार्थीनी सदर योजनेपासून वंचित राहिलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती योजनेतंर्गत अर्ज निकाली काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑफलाईन अर्ज, प्रस्ताव आपल्या संबंधित महाविद्यालयास संपर्क साधून महाविद्यालयांनी सदर अर्ज ,प्रस्ताव दि. 24 जून 2023 अखेर सार करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment