अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास मागास विकास महामंडळाच्या मुंबई मुख्यालयास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची सदिच्छा भेट

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मुंबई मुख्यालयास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री संसदीय कार्यमंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील (मंत्री दर्जा), महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते तसेच महामंडळाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत प्रामुख्याने मराठा समाजाकरीता कार्यरत असणाऱ्या व्याज परतावा योजनांची सविस्तर माहिती, योजनांची कार्यपद्धती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली.यावेळी प्रत्यक्षात मंत्री महोदयांनी संगणकावर बसून LOI निर्माण करण्याची प्रक्रीया, कर्ज मंजूरीची प्रक्रीया व्याज परतावा कशा प्रकार देण्यात येतो याची प्रक्रीया सविस्तर समजून घेतली व लगेचच ४,३३३ लाभार्थ्यांना रु 3 कोटी ७५ लाख व्याज परताव्याची रक्कम स्वत: लामार्थ्यांना वितरीत केली व महामंडळाच्या योजनांतर्गत आजपर्यंत ६१,४११ लाभार्थ्यांना बँकेने वितरीत केलेल्या रु. ४,३६७ कोटीच्या कर्ज रक्कमेबाबत व महामंडळाने ५०,२८५ लाभार्थ्यांना व्याज परतावा स्वरूपात वितरीत केलेल्या रु. ४५६ कोटी रक्कमेचे अवलोकन करून महामंडळाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केल. मुख्यालयात भेट दिल्यानंतर मंत्री महोदयांनी महामंडळाच्या मुख्यालयाच्या जागेबद्दल खंत व्यक्त केली व महामंडळाकरीता लवकरच नवी मुंबई सारख्या शहरामध्ये भव्य इमारतीकरीता जागा उपलब्ध करुन देण्याकरीता राज्याच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत चर्चा करणार आहेत. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'