जिल्हा पोलिस दलामध्ये ई-ऑफिस कार्यान्वित

सिंधुदुर्गनगरी, दि. 2 (जि.मा.का.): जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व शाखा व सर्व मंत्रालयीन कर्मचारी यांचे कामकाज ई-ऑफिस प्रणाली व्दारे दिनांक 1 मे 2023 रोजीपासून कार्यान्वित करण्यात आलेले आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली आहे. संगणकीय प्रणालीव्दारे संबंधीतास SMS चे माध्यमातून आपले टपाल सध्या कोणत्या टेबल/ शाखा/ पोलीस ठाणेकडे आहे. याबाबतची माहिती मिळू शकणार आहे. त्याचप्रमाणे प्राप्त टपाल ई- ऑफिसचे माध्यामातून संबंधीतास पुढील कार्यवाहीस प्राप्त होणार असल्यामुळे सर्व शाखा, पोलीस ठाणे तसेच उपविभागीय कार्यालय यांचे कामकाजामध्ये एकसूत्रीपणा व गतिशीलता येऊन कामकाजास विलंब होणार नाही. शासकिय कामकाजात संगणकाचा अधिकाधिक वापर करून कामकाज गतिमान व्हावे, कामकाजात सुसूत्रता यावी. दस्तऐवज व माहिती सुरक्षीत त्वरेने व जलद गतीने संबंधीताना प्राप्त होऊन निर्णय प्रक्रिया सुलभ व्हावी, याकरिता ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावी वापर करून सदर प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी महाराष्ट्र शासन माहिती तंत्रज्ञान संचालनालय, शासन परिपत्रक आवश्यक सुचना देण्यात आलेल्या आहेत. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'