Posts

Showing posts from November, 2025

नगर परिषद आणि नगर पालिका सार्वत्रिक निवडणूक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे आणि पोलिस अधीक्षक डॉ दहिकर यांची चारही मतदान क्षेत्राला भेटी सावंतवाडी–वेंगुर्ला–मालवण–कणकवलीत निवडणूक तयारीचा सखोल आढावा राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश सिंधुदुर्ग नगरी दिनांक २९ (जिमाका) नगर परिषद तसेच नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण आणि कणकवली येथे भेट देत निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेतला. मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि शांततेत पार पडावी यासाठी आवश्यक त्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांना राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काटेकोर कामकाज करण्याचे निर्देश दिले. तर पोलिस अधीक्षक डॉ. दहिकर यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देत सूचना केल्या. सावंतवाडी : प्रशिक्षण व Strong Room ची पाहणी दौऱ्याची सुरूवात सावंतवाडी येथून झाली. येथे निवडणुकीच...

सोमवारी लोकशाही दिन

सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का.) : डिसेंबर महिन्यातील लोकशाही दिन महिन्याच्या पहिला सोमवार दि.1 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 1 ते दु.2 या वेळेत मायनाक भंडारी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे राबविण्यात येणार असल्याची, माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे यांनी दिली आहे. 000000

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांच्यावतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि.२७ (जि.मा.का):- संविधान दिनाच्या औचित्याने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांनी जिल्हा परिषद सिंधुदुर्गनगरीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे स्पर्धा परिक्षा तयारी करणाऱ्या मुलांसाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न झाल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योगकता मार्गदर्शन कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. या शिबिराचा उद्देश स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी, युवक यांच्यात आत्मविश्वास वाढविणे, संवाद कौशल्य, सॉफ्ट स्किल्स विकसीत करणे व त्याव्दारे रोजगारक्षमतेत वाढ घडवून आणणे हा होता. तसेच याव्दारे विद्यार्थ्यांना आपल्या संविधानात अंतर्भूत असलेल्या जबाबदारी, समानता आणि प्रामाणिकतेच्या मूल्यांचे प्रत्यक्ष जीवनात पालन करण्यास प्रोत्साहन प्राप्त करून देणे हा होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी, तृप्ती धोडमिसे, यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, अप्पर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड यांच्या हस...

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेची अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करावीत - जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या सूचना

सिंधुदुर्गनगरी, दि. २६ (जि.मा.का) :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत प्राधान्य गटातील लाभार्थ्यांची ग्रामसभेत यादी वाचून संबंधिताना अनुज्ञये कामांबाबत ग्रामसभेत माहिती द्व्यावी, मुदत संपलेली अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करावीत, तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी कामांच्या नियमित तपासण्या कराव्यात, नियमित आढावा बैठका घ्याव्यात, उद्दिष्टांनुसार मनुष्यदिवस निर्मिती करावी, घरकुलांची कामे वेळेत पूर्ण करावीत, कामांच्या संचिका व नोंदवह्या अद्यावत ठेवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिल्या. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामकाज आढावा बैठक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितीन राऊत, जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख तसेच तालुका स्तरावरील सर्व गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, वनक्षेत्रपाल उपस्थित होते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग व बांबू लागवडमध्ये आत्तापर्यंत 25854 हे. क्षेत्र लागवडीखाली आलेले आहे. चालू आर्थिक वर्षात 463280 मनुष्य दिवस निर्मिती झा...

संविधान दिन साजरा

सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का) :- भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी येथे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांच्या अध्यक्षतेखाली संविधान दिन साजरा करण्यात आला. सहायक आयुक्त श्री. चिकणे यांच्याहस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. संविधान अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत दि.26 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच या कालावधीत भारतीय संविधानाची उद्देशिका / प्रस्ताविका यांचे नियमित वाचन करणे व जनजागृती करणे, महाविद्यालय, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहे येथे वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा इत्यादीचे आयोजन करणे, समतादूतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाटय व लघुनाटिका याद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्त श्री.‍ चिकणे यांनी सांगितले. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक बार्टीचे समतादूत अॅड. सगुण जाधव यांनी संविधान प्रास्ताविकेचे महत...

३० नोव्हेंबरपर्यंत सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करा – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश

सिंधुदुर्गनगरी, दि.२६ (जिमाका):- राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी, आधार सिंडींग, मोबाईल सिंडींग तसेच शिधापत्रिका ऑनलाईन करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे तसेच जिल्ह्यातील पाच तालुक्यातील निरीक्षण अधिकारी, सर्व पुरवठा निरीक्षक आणि अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट निर्देश देत सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १,७८,७१७ लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित असून ही प्रक्रिया दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ पूर्वी शंभर टक्के पूर्ण करणे बंधनकारक आहे. संबंधित लाभार्थ्यांनी आपापल्या रास्तभाव दुकानदारांकडे जाऊन तात्काळ ई-केवायसी करावी, असे आवाहन करण्यात आले. आधार सिंडींगबाबत, जिल्ह्यातील १२,३५६ लाभार्थ्यांचे आधार क्रमांक शिधापत्रिकेशी अजूनही संलग्न झालेले नाहीत. त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांचे आधार क्रमांक तात्काळ जोडण्याचे निर्देश देण्यात आले. मोबाईल सिंडींग प्रक्रियेतही मोठ्या...

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी दि.२६ (जिमाका) : जिल्ह्यातील उद्योजकांच्या अडचणी, मागण्या व विकासाच्या संधी जाणून घेण्यासाठी स्थापन केलेल्या जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात व सकारात्मक वातावरणात संपन्न झाली. या बैठकीत विविध औद्योगिक प्रश्नांवर सखोल चर्चा झाली. सावंतवाडी औद्योगिक वसाहतीतील भू-मापन प्रक्रियेला गती देण्यासाठी अध्यक्षांनी सर्व संबंधित विभागांची विशेष बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले. देवगड येथील मल्टीफ्रूट क्लस्टरचे अध्यक्ष श्रीधर ओगले यांनी ड्रोनद्वारे फवारणी तसेच फळप्रक्रिया प्रशिक्षणाची मागणी केली होती. यावर प्रतिसाद देताना जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी ही सर्व प्रशिक्षणे जिल्हा कौशल्य विकास आराखडा 2025-26 मध्ये समाविष्ट असून यावर्षी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच प्रशिक्षण कालावधी उद्योगांच्या गरजेनुसार ठरविण्यास सांगितले. कोकम औद्योगिक समूहाच्या जागेस परवानगीप्रश्नी मार्ग काढला जाणार असल्याचेही अध्यक्षांनी सभेत जाहीर केले. अडाळी व कुडाळ औद्योगिक क्षेत्रांतील विविध समस्यां...

जिल्ह्यात “हमारा शौचालय, हमारा भविष्य” या विशेष माहिमेंत सहभागी होण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.24 (जि.मा.का):- केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जागतिक शौचालय दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) विभागामार्फत “हमारा शौचालय, हमारा भविष्य” ही विशेष मोहिम सुरू करण्यात येत आहे. ही मोहीम मानवी हक्क दिनापर्यंत म्हणजे 10 डिसेंबर 2025 पर्यंत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचाय व सर्व सिंधुदुर्गवसियांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे. “हमारा शौचालय, हमारा भविष्य” या विशेष मोहिमेत शौचालय ही केवळ सोयीची नव्हे तर आरोग्य, प्रतिष्ठा व सुरक्षिततेची हमी देणारी मूलभूत गरज असल्याचे श्री. खेबुडकर यांनी म्हटले आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावातील वैयक्तिक शौचालये व सामुदायिक शौचालयांची तपासणी, दुरुस्ती, देखभाल व सुशोभीकरणावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. अपूर्ण किंवा दुरुस्तीची गरज असलेली सार्वजनिक शौचालये यांची नोंद घेऊन त्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कालावधीत शाळा, ग्रामसभा, स्वयंसहाय्य गट, युवक मंडळे, निवृत्त सैनिक, सामाजि...

देशाची एकता आणि स्वातंत्र्य टिकवून ठेवूया - जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे कुडाळ शहरात एकता पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधुदुर्ग नगरी दी २२ (जिमाका) : स्वातंत्र्यानंतर देश एकत्र आणण्याचे खूप मोठे काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. जात, धर्म, भाषा, प्रांत याच्याही पलीकडे जाऊन आपण आपली एकता आणि स्वातंत्र्य कायम टिकवून ठेवूया, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. ‘मेरा युवा भारत’ या उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय युनिटी मार्च म्हणजेच एकता पदयात्रा कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी कुडाळ येथे त्या आज बोलत होत्या. युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत सन २०२५ हे वर्ष भारताचे लोहपुरुष राष्ट्रीय एकात्मतेचे प्रमुख शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती वर्ष म्हणुन साजरे केले जात आहे. या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधुन राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ३१ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर २०२५ या दरम्यान संपुर्ण भारतभर जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित केल्या जात आहेत. ‘मेरा युवा भारत’ या उपक्रमांतर्गत या जिल्हास्तरीय युनिटी मार्च म्हणजेच एकता पदयात्रेचे आज सकाळी कुडाळ शहरात आयोजन करण्यात आले होते. कुडाळ हायस्कुलच्या मैदानावरून या पदयात्रेची सुरुवात झाली. तत्पूर्वी या कार्यक्रमाचा...

जिल्ह्यात 5 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी, दि.२१ (जि.मा.का):- जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी 12 वाजल्यापासून ते दिनांक 05 डिसेंबर 2025 रोजी 24 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला असल्याचे जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. स्थानिक संस्था निवडणूक -2025 नगरपरिषद सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण तसेच नगरपंचायत कणकवली यांच्या निवडणुक कार्यक्रम दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी मतदार व दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणूकीची दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. निवडणुकीचे काळात सर्व राजकिय पक्ष आपले वर्चस्व प्रस्तावित करण्यासाठी, मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतात, निवडणुक प्रचारादरम्यान राजकिय पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करणे, वर्तमानपत्रामध्ये वारंवार एकमेकांवर टिका टिप्पणी करणे, ...

स्पर्धा परिक्षा तयारी करणाऱ्या मुलांसाठी शिबिराचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.20 (जि.मा.का):- कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत जिल्हा परिषद सिंधुदुर्गगनरीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे स्पर्धा परिक्षा तयारी करणाऱ्या मुलांसाठी मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी दिली आहे. आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता महाराष्ट्र राज्य यांच्याकडून दि26 नोव्हेंबर रोजी “संविधान दिन” या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय दिनानिमित्त, “व्यक्तिमत्व विकास आणि किमान रोजगारक्षमतेचे कौशल्य शिबिर” आयोजित करण्याबाबत निर्देश प्राप्त झाले आहेत. या शिबिराचा उद्देश सहभागी विभागाच्या विविध योजनांतर्गत कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी, युवक यांच्यात आत्मविश्वास वाढविणे, संवाद कौशल्य, सॉफ्ट स्किल्स विकसीत करणे व त्याव्दारे रोजगारक्षमतेत वाढ घडवून आणणे हा आहे. तसेच याव्दारे प्रशिक्षणार्थींना आपल्या संविधानात अंतर्भूत असलेल्या जबाबदारी, समानता आणि प्रा...

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल आढावा बैठक संपन्न

• ई-पिक पाहणी पूर्ण करा • ॲग्रीस्टॅकसाठी विशेष शिबिरांचे आयोजन सिंधुदुर्गनगरी, दि.20 (जि.मा.का):- जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली. महसूल कामकाजातील गती, अचूकता आणि पारदर्शकता वाढविण्यावर भर देत त्यांनी ई-पिक पाहणी, अ‍ॅग्रीस्टॅक योजना आणि ई-पंचनामा या महत्त्वाच्या उपक्रमांबाबत स्पष्ट सूचना दिल्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, नितिन राऊत, श्रीमती शारदा पोवार, आरती देसाई, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे तसेच उपविभागीय अधिकारी जगदीश काटकर, श्रीमती ऐश्वर्या काळुशे, आणि सर्व तहसिलदार उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी खरीप हंगामासाठी ई-पिक पाहणीची मुदत 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे. अजूनही शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांनी पुढील 10 ते 12 दिवसांत आपल्या गावातील नियुक्त सहाय्यकांमार्फत ई-पिक पाहणी पूर्ण करावी, असे निर्देशित केले. गावनिहाय सहाय्यकांनी व्यक्तीशः लक्ष देऊन ही प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण करण्यावर भर द्यावा. ...

लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा विषयावर शिबिर संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि.20 (जि.मा.का):- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्गच्या वतीने लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा, 2012 (Pocso Act) या विषयावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग येथे शिबिर संपन्न झाल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक यांनी दिली आहे. यावेळी जिल्हा न्यायाधीश -1 व अति. सत्र न्यायाधीश एस.एस. इंदलकर, शासकीय वैद्यकीय महाविद्याचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे, उपअधिष्ठाता श्रेयश बुरुडे, वैद्यकीय अधीक्षक शिल्पा नारायणकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, या शिबिरामध्ये 165 विद्यार्थी उपस्थित होते. या शिबिरामध्ये जिल्हा न्यायाधीश -1 व अति. सत्र न्यायाधीश श्री. इंदलकर म्हणाले, कायद्यामध्ये बालकांचे (मुली, मुले) लैंगिक अपराधांपासून संरक्षण करण्यासाठी तसेच अपराध्यास कठोर शासन करण्याकरीता तरतूद केली आहे. बालकांचे लैंगिक छळणूक, छेडछाड, अश्लीलता, कुकर्म, अत्याचार, बलात्कार, ह्या गोष्टींपासून संरक्षण व्हावे, या उद्देशाने हा विशेष कायदा अस्तित्वात आला असे सांगितले. हा कायदा तयार करताना बालक प्रथम या तत्वाचा अंगिकार करण्यात आला असू...

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कामकाज सुरळीत; नवीन 'एलओआय' देण्याची प्रक्रीया लवकरच सुरु होणार

सिंधुदुर्गनगरी, दि.20 (जि.मा.का):- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे नवीन पात्रता प्रमाणपत्र (LOI) देण्या व्यतिरिक्त उर्वरीत कामकाज सुरळीत सुरू आहे. लाभार्थ्यांना दिला जाणारा व्याज परतावा कोणत्याही अडथळ्याविना नियमितपणे वितरित केली जात आहे. सप्टेंबर, 2025 अखेर होल्ड केलेली व स्थगित (ब्लॉक) केलेली प्रकरणे वगळता व्याज परताव्यासाठी दावा केलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात व्याज परताव्याची रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या. मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. काही माध्यमांमध्ये महामंडळाचे कामकाज बंद असल्याच्या प्रसारित झालेल्या बातम्यांवर महामंडळाने स्पष्टीकरण दिले आहे. पात्रता प्रमाणपत्र (LOI) संबंधीची प्रक्रिया काही तांत्रिक कारणांमुळे तात्पुरती स्थगित करण्यात आली होती, मात्र व्याज परतावा व बँक मंजुरी प्रकरणांचे कामकाज सुरळीत सुरू आहे. अहिल्यानगर येथील गैरप्रकारांबाबत गुन्हा दाखल ! नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील काही एजंट आणि ट्रॅक्टर एजन्सी...

जिल्ह्यातील युवक युवतींना इस्त्राईल देशात रोजगाराची संधी

सिंधुदुर्गनगरी,दि.19 (जि.मा.का):- महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत जिल्ह्यातील युवक युवतींना इस्त्राईल देशात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देत असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास विभागाने दिली आहे. जिल्हृयातील जास्तीत जास्त युवक- युवतींनी https://maharashtrainternational.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट देवून या पदासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे. यामध्ये पुढीलप्रमाणे रिक्तपदे Plastering Work-1 हजार जागा, 2. Ceramic Tiling -1 हजार जागा, Drywall Worker- 300 जागा, Mason-300 जागा या पदांसाठी उमेदवाराची शैक्षणिक अहर्ता किमान 10 वी पास आहे. इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. 25 ते 50 वर्षे वयोगटाचे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी Renovation Construction या क्षेत्रात अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्यक्रम दिला जाईल. या पदासाठी मासिक वेतन रु. 1 लाख 62 हाजर 500 पर्यंत असेल. इस्राईल येथे नोकरी मिळविण्यासाठी निवड प्रक्रिया महाराष्ट्रातच होणार...

मराठी व उर्दू शाळाच्या शनिवारच्या वेळेत बदल

सिंधुदुर्गनगरी,दि.19 (जि.मा.का):- जिल्ह्यतील मराठी व उर्दू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (सर्व) शासन मान्य मराठी, उर्दू, इंग्रजी माध्यम अनुदानित, विनाअनुदानित खाजगी प्राथमिक शाळा (सर्व) शाळांच्या शनिवारच्या शाळेच्या वेळेत सकाळी 7.20 ते 11.55 ऐवजी सकाळी 7.20 ते 11.30 असा बदल करण्यात आला असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. गणपती कमळकर यांनी दिली आहे. हा बदल 18 नोव्हेंबर 2025 पासून, शनिवार तासिका नियोजन पुढीलप्रामणे, तास, कंसात वेळ, परिपाठ (7.20 ते 7.30), 1 ला तास ( 7.30 ते 8.05),2 रा तास (8.05 ते 8.40),3 रा तास( 8.40 ते 9.15),4 था तास (9.15 ते 9.50), मधली सुट्टी (9.50 ते 10.20), 5 वा तास (10.20 ते 10.55), 6 वा तास (10.55 ते 11.30) असा बदल आहे. 00000

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने पदयात्रेचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी,दि.19 (जि.मा.का):- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्ताने जिल्ह्यात शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजता कुडाळ शहरात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मेरा युवा भारतचे उपसंचालक कालिदास घाटवळ यांनी दिली आहे. या पदयात्रेचा मार्ग, कुडाळ हायस्कुल कुडाळ, मैदान –पोलीस स्टेशन, गांधी चौक बाजार, एस.टी. स्टॅण्ड ते एस.आर.एम कॉलेज, कुडाळ हायस्कुल कुडाळच्या मैदानावर समारोप होणार आहे. युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत सन 2025 हे वर्ष भारताचे लोहपुरुष राष्ट्रीय एकात्मतेचे प्रमुख शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती वर्ष म्हणुन साजरे केले जात आहे. या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधुन राष्ट्रीय एकता दिनानिमित्त 31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2025 या दरम्यान संपुर्ण भारतभर जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित केल्या जाणार आहेत. या पदयात्रा प्रत्येक जिल्ह्यात आयोजित केल्या जाणार आहेत. त्यासोबत स्वच्छता मोहिम, स्वदेशी मेळे, व्यसनमुक्ती मोहिम, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांवर चर्चासत्रे, वाद...

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे 17 नोव्हेंबर रोजी आयोजन

सिंधुदुर्गनगरी,दि.14 (जि.मा.का):- नोव्हेंबर महिन्यातील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार दि.17 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दु. 1 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग आपल्या अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बापू शिणगारे यांनी केले आहे. राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला समान संधी समान हक्क असा मुलभूत अधिकार दिलेला आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांचे तक्रारी व अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी व तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडणेसाठी व्यासपीठ मिळावे,त्यांचे हक्कांचे संरक्षण व्हावे व त्यांना न्याय मिळाव या दृष्टीने महिलांच्या तक्रारी व अडचणी शासकीय यंत्रणेकडून ...

कुष्ठरोग शोध मोहीम जिल्हास्तरीय समन्वय समिती सभा संपन्न

सिंधुदुर्गनगरी दि.14 (जिमाका) : जिल्ह्यात एलसीडीसी (LCDC) कुष्ठरोग शोध मोहीम दिनांक 17 नोव्हेंबर ते 02 डिसेंबर 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी स्वेच्छेने स्वतःची कुष्ठरोगांबाबत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद येथे जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा संपन्न झाली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील डॉ. कुष्ठरोग सहाय्यक संचालक सतीश गुजलवार, व सहाय्यक संचालक कुष्ठरोग कार्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष माडगे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रमेश कर्तसकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी निलेश मठकर इतर समन्वय समिती सदस्य आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एलसीडीसी (LCDC) कुष्ठरोग शोध मोहीमे अंतर्गत जिल्ह्यात एकूण 607 पथकामार्फत 7 लाख 79 हजार 434 लोकसंख्येचे कुष्ठरोग आजाराचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. कुष्ठरोग शोध मोहिमेत घरोघरी येणाऱ्या सर्व्हेक्षण पथ...

दिव्यांग तक्रार निवारण समितीची सभा १७ नोव्हेंबरला

सिंधुदुर्गनगरी : ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तींच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण समिती गठीत करुन दर महिन्याला तक्रार निवारण समितीची सभा घेण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेमार्फत दिव्यांग व्यक्तींच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सोमवार, दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता ही सभा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्स (व्ही.सी.) द्वारे आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींनी या सभेसाठी आपल्या नजिकच्या पंचायत समिती कार्यालयात उपस्थित राहून ऑनलाईन माध्यमातून सहभागी होण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी केले आहे. ००००००

मतदानाच्या दिवशी आठवडा बाजार बंद

सिंधुदुर्गनगरी दि.14 (जिमाका) : नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक विडणूक 2025 साठी कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायत, मालवण नगरपरिषद, सावंतवाडी नगरपरिषद, वेंगुर्ला नगरपरिषदेसाठी दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान तर दिनांक 3 डिसेंबर रोजी मततोजणीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. जिल्ह्यातील ज्या-ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरविण्यात येतो, त्या-त्या ठिकाणी मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदान सुरळीतपणे पार पाडावे, याकरीता कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मतदानाच्या दिवशी भरविण्यात येणारा आठवडा बाजार बंद ठेवण्याकरीता मंगळवार दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील खाली नमूद केलेले आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी निर्गमित केल आहे. तसेच या दिवशी भरविण्यात येणारे आठवडा बाजार अन्य दिवशी भरविण्यास अनुमती देण्यात आलेली आहे. अ.क्र तालुका दि.2/12/2025 रोजी मतदान दिवशी आठवडा बाजार बंद करण्याचे नगरपरिषद/ नगरपंचायत नाव 1 सावंतवाडी सावंतवाडी नगरपरिषद 4 कणकवली कणकवली नगरपंचायत 00000

कुडाळमध्ये 22 नोव्हेंबर रोजी 'एकता पदयात्रा'

सिंधुदुर्गनगरी, दि. 13 (जिमाका वृत्तसेवा) :‘मेरा युवा भारत’ या उपक्रमांतर्गत जिल्हा स्तरीय युनिटी मार्च म्हणजेच एकता पदयात्रा दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी कुडाळ शहरात आयोजित करण्यात येईल. ही पदयात्रा सकाळी 7.30 वाजता कुडाळ हायस्कूलच्या मैदानातून सुरुवात होऊन पोलीस स्टेशन - गांधी चौक - एस.टी. स्टँड - गुलमोहर हॉटेल - हायवे बसस्टँड - एस.आर.एम. कॉलेज चौक या मार्गाने तहसील कार्यालय येथे या पदयात्रेचा समारोप होणार असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पदयात्रेच्या नियोजनासाठीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबाबत सविस्तर चर्चा होऊन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीची सुरुवात मेरा युवा भारतचे उपसंचालक कालिदास घाटवळ यांनी केली. त्यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट, युवकांमध्ये एकात्मतेचा संदेश आणि राष्ट्रीय ऐक्याचा प्रसार याबाबत माहिती दिली. युनिटी मार्चच्या माध्यमातून राष्ट्रीय एकता, सामाजिक समरसता आणि युवक शक्तीचा जागर घडविण्याचा संदेश देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. य...

‘प्लास्टिक व ई- वेस्ट संकलन स्पर्धे’चे आयोजन

सिंधुदुर्गनगरी 13 (जि.मा.का) :- पर्यावरण संवर्धन, स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या माध्यमातुन दिनांक 15 ते 20 नोव्हेंबर 2025 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये ‘प्लास्टिक व ई- वेस्ट संकलन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व शाळानी व जिल्हावासियांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख स्वच्छ सुंदर जिल्हा तसेच पर्यटन जिल्हा म्हणुन आहे. यामुळेच पर्यटकांची रेलचेल मोठ्याप्रमाणात आहे. जिल्ह्यातील रस्त्यावर प्लस्टिक बॉटल, रॅपर असा प्लस्टिक कचरा दिसुन येतो. याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने तसेच जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छ व सुंदर दिसावा या करीता जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन ­‘प्लास्टिक व ई-वेस्ट संकलन स्पर्धा’ उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक 15 ते 20 नोव्हेंबर 2025 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्य...

शस्त्र परवाना नूतनीकरणासाठी तालुकानिहाय कार्यक्रम जाहीर

सिंधुदुर्गनगरी 13 (जि.मा.का) :- जिल्ह्यातील बंदुक परवानाधारकांना परवान्यांची मुदत दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी संपत आहे. त्यांनी आपल्या परवान्याचे नूतनीकरणासाठी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील उपचिटणीस शाखेत सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आवश्यक माहितीसह विहीत नमुन्यातील अर्ज दाखल करण्याचे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. नूतनीकरणासाठी आवश्यक कागदपत्रे शस्र परवाना नुतनीकरण करीता आवश्यक असलेला Form A-3 परिपूर्ण माहितीसह सादर करावा. (अर्जावर फोटो लावणे आवश्यक आहे). शस्र वापरण्यास शारीरीक दृष्ट्या सक्षम असल्याबाबतचे S-3 नमुन्यात जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांचे प्रमाणपत्र. शस्र परवाना नूतनीकरण करीता आवश्यक असलेला Form - S-4 संबंधित पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे यांच्याकडून सही शिक्यानिशी सादर करावा. शस्र पडताळणी केलेबाबतचे संबंधित पोलीस ठाणे निरीक्षक यांच्याकडील शस्र पडताळणी प्रमाणपत्र. सरपंच/पोलीस पाटील/नगराध्यक्ष/ यांच्याकडील रहिवाशी व वर्तवणुकीचा दाखला किंवा आधारकार्ड. मुळ शस्र परवाना अर्जासोबत जोडावा. परवाना नुतनीकरण 5 वर्षाकरीता फी रु. 2...

खड्यांवर लक्ष ठेवणार आता जिल्हास्तरीय समिती

सिंधुदुर्गनगरी दिनांक 12 (जिमाका) :- जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत हद्दीबाहेरील ग्रामीण भागातील क्षेत्रात रस्त्यांवरील खड्यांबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली या समितीव्दारे खड्याच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. मा.उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील जनहित याचिका क्र.71/2013 ची सुनावणी दिनांक 13 ऑक्टोंबर 2025 रोजी झाली. या सुनावणी दरम्यान मा.उच्च न्यायालय यांनी आदेशीत केल्याप्रमाणे खड्यांमुळे व मानवनिर्मित उघडे गटार यामुळे मृत्यू झाल्यास वारसांना 6 सहा लाख तर गंभीर दुखापत झाल्यास 50 हजार ते 2 लाख 50 हजार रुपये इतकी नुकसान भरपाई संबंधित प्राधिकरणाकडून देण्यात येणार आहे. भरपाई देण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक संस्था, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए किंवा संबंधित प्राधिकरणावर राहणार आहे. ही रक्कम नंतर रस्त्यांच्या देखभालीतील त्रुर्टीसाठी जबाबदार ठरलेल्या कंत्राटदार किंवा अधिकाऱ...

खड्यांवर लक्ष ठेवणार आता जिल्हास्तरीय समिती

सिंधुदुर्गनगरी दिनांक 12 (जिमाका) :- जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत हद्दीबाहेरील ग्रामीण भागातील क्षेत्रात रस्त्यांवरील खड्यांबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली या समितीव्दारे खड्याच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. मा.उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील जनहित याचिका क्र.71/2013 ची सुनावणी दिनांक 13 ऑक्टोंबर 2025 रोजी झाली. या सुनावणी दरम्यान मा.उच्च न्यायालय यांनी आदेशीत केल्याप्रमाणे खड्यांमुळे व मानवनिर्मित उघडे गटार यामुळे मृत्यू झाल्यास वारसांना 6 सहा लाख तर गंभीर दुखापत झाल्यास 50 हजार ते 2 लाख 50 हजार रुपये इतकी नुकसान भरपाई संबंधित प्राधिकरणाकडून देण्यात येणार आहे. भरपाई देण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक संस्था, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए किंवा संबंधित प्राधिकरणावर राहणार आहे. ही रक्कम नंतर रस्त्यांच्या देखभालीतील त्रुर्टीसाठी जबाबदार ठरलेल्या कंत्राटदार किंवा अधिकाऱ्याकडून वसूल...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक- 2025 उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक -जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 10 (जिमाका) :- जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला आणि मालवण नगरपरिषद तर नगर पंचायत कणकवली सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रियेस सुरूवात झाली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिराती प्रसारणापूर्वी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीच्या (MCMC) माध्यमातून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील 3 नगर परिषदेसाठी (सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला) आणि 1 नगर पंचायतसाठी (कणकवली) निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांच्याव्यतिरिक्त) आदेश व सूचना, महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक- अ- मध्य उप- विभाग, वर्ष ११ अंक 32, गुरुवार,...

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज सुरळीत, अफवांवर विश्वास ठेवू नये व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख

सिंधुदुर्गनगरी दिनांक 10 (जिमाका) :- अलीकडील काही दिवसांपासून मराठा समाजातील बेरोजगार युवकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत “महामंडळाचे कामकाज बंद झाले आहे, व्याज परतावा थांबविण्यात आला आहे. अशा प्रकारच्या निराधार अफवा काही व्यक्तींकडून सोशल मीडियासह विविध माध्यमांतून पसरवल्या जात आहेत. या अफवांना कोणतेही तथ्य नसून, महामंडळाचे नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याचे काम वगळता इतर सर्व कामकाज सुरळीतपणे सुरु असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या. मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. महामंडळाच्या कामकाजाबाबत वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे आहे. तपशील जुलै-2025 ऑगस्ट-2025 सप्टेंबर-2025 ऑक्टोबर-2025 6 नोव्हेंबर, 2025 पर्यत जुलै-2025 पासून आजपर्यत निर्माण झालेले LOI 10,811 8,817 13,733 1,422 - 34,783 Bank Sanction संख्या 4,808 4,999 4,104 2,384 1,187 17,482 व्याज परतावा रक्कम 36,12,51,327 116,59,98,192 61,09,92,210 50,30,67,782 6,16,48, 296 ...

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता पथकाची बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी दिनांक 10 (जिमाका) :- गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भधारणा निदान तंत्र (लिंगनिवडीस प्रतिबंध) कायदा, 1994 अंतर्गत जिल्हास्तरीय दक्षता पथकाची बैठक आज जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी, पोलिस उपअधीक्षक श्रीमती खाडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत तसेच समिती सदस्य उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यातील नोंदणीकृत 75 सोनोग्राफी केंद्रे आणि 26 खासगी गर्भपात केंद्रांच्या तपासणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सर्व वैद्यकीय अधीक्षकांना आपल्या कार्यक्षेत्रातील केंद्रांची काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश दिले. तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या केंद्रांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. लिंगनिवडीसारख्या गंभीर गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी संशयित सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांवर "डिकॉय केस" व स्टिंग ऑपरेशन राबविण्याचे आदेश देखील दिले गेले. यावेळी...

थकबाकीदार लाभार्थींनी एक रकमी परतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 10 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळाच्या दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजीच्या परिपत्रकानुसार ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपुर्ण थकीत कर्ज रक्मेचा एक रक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के रक्कम सवलत देण्याबाबतची एक रकमी परतावा (OTS) योजना 31 मार्च 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यानुसार महामंडळाच्या थकबाकीदार असलेल्या लाभार्थ्यांनी या योजनेचा फायदा येऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन शामराव पेजे कोकण इतर मागास वर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक प्रिती आर पटेल यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय (ओबीसी) वित्त आणि विकास महामंडळ मर्यादीत मुंबई यांची उपकंपनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग अर्थिक विकास महामंडळ लि. जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या मार्फत मुदत कर्ज, बीज भांडवल कर्ज, स्वर्णिमा कर्ज योजना, मार्जिन मनी कर्ज योजना इ. कर्ज योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर मागास (ओबीसी) प्रवर्गातील लाभार्थींना स्वयंरोजगाराकरीता अल्प व्याज...

राष्ट्रीय लोक अदालतीचे 13 डिसेंबरला आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 10 (जिमाका) :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत शनिवार १३ डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले, असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक यांनी दिली आहे. सन २०२५ या वर्षातील चौथी लोक अदालत आहे. जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील तडजोडपात्र स्वरुपाची दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे, दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग तसेच सर्व तालुका न्यायालयातील तडजोपात्र स्वरुपाची प्रलंबित प्रकरणे, दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये नेमून घेण्याबाबत पक्षकारांना आवाहन करण्यात येत आहे. तडजोड होऊ शकणारी प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी १३ डिसेंबर च्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवायची असल्यास संबंधित न्यायालयात जावून प्रकरण तडजोडीसाठी ठेवायचे आहे,असे संबंधित अधिक्षक अथवा लिपिक आणि संबंधित वकीलाना कळवावे. लोक अदालतीत तडजोड झाल्याने कायमस्वरुपी ...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक- 2025 उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक -जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 10 (जिमाका) :- जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला आणि मालवण नगरपरिषद तर नगर पंचायत कणकवली सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रियेस सुरूवात झाली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिराती प्रसारणापूर्वी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीच्या (MCMC) माध्यमातून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील 3 नगर परिषदेसाठी (सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला) आणि 1 नगर पंचायतसाठी (कणकवली) निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांच्याव्यतिरिक्त) आदेश व सूचना, महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक- अ- मध्य उप- विभाग, वर्ष ११ अंक 32, गुरुवार,...

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा वार्षिक अहवाल जाहिर

सिंधुदुर्गनगरी दिनांक 10 (जिमाका) :- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा सन 2024-25 चा वार्षिक प्रशासन अहवाल सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने प्रशासक सभेमध्ये ठराव क्रमांक 837 दिनांक 15 ऑक्टोंबर 2025 ने मंजूर केलेला आहे. हा अहवाल जिल्हा परिषद कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथील कार्यालयात, कार्यालयीन वेळेत पाहावयास उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा परिषेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी दिली आहे. ०००००

वन्यहत्तीस कोणत्याही प्रकारची इजा होईल, अशा प्रकारचे कृत्य करु नये

सिंधुदुर्गनगरी दिनांक 10 (जिमाका) :- सावंतवाडी तालुक्यात वन्यहत्ती ओंकारचा वावर सुरु आहे. हा वन्यहत्ती सातोसे, कास, मडुरा, रोणापाल, ओटवणे, विलवडे, भालावल, तांबोळी, डेगवे, वाफोली, इन्सुली व बांदा गावातील परिसरातील भातशेती तसेच फळबागायती व लोकवस्तीमध्ये वावर सुरु आहे. या वन्यहत्ती ओंकारला मानवी वस्तपासून दूर ठेवण्याकामी तसेच नैसर्गिक अधिवासात ठेवण्याकामी वनकर्मचारी व जलद बचाव कृती दलमार्फत देखरेख ठेवण्यात येत असल्याची माहिती सावंतवाडी वन परिक्षेत्र अधिकारी सु.बा. पाटील यांनी दिली. सोशल मिडीयावर तेरेखोल नदीपात्रात वन्यहत्ती ओंकारचा वावर असताना फटाके फोडलेबाबत व्हीडीओ 7 नोव्हेंबर रोजी प्रसारीत झालेला आहे. याबाबत या दिवशी डयुटीवर कार्यरत असलेले वनकर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ यांना विचारणा केली असता, दि. 2 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास वन्यहत्ती ओंकार हा इन्सुली येथील भातशेती तसेच केळी बागायतीमधुन नुकसानी केली आहे. तेरेखोल नदीपात्रात पाणी पिण्याकरीता उतरुन पाणी पिऊन पाण्यात डुबकी मारत नदी किनारी आला. याठिकाणी नदी किनारी असलेल्या सुर्यकांत महादेव दळवी, र...

निक स्वराज्य संस्था निवडणूक- 2025 निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

• २ डिसेंबर रोजी मतदान • ३ डिसेंबर रोजी मतमोजणी सिंधुदुर्गनगरी दि.०७ (जिमाका) राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका -2025 चा कार्यक्रम जाहिर केला आहे. जिल्ह्यातील 3 नगर परिषदेसाठी (सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला) आणि 1 नगर पंचायत (कणकवली) साठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान तर 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा प्रशासन अधिकारी विनायक औंधकर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत तसेच विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या की, राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका -2025 चा कार्यक्रम जाहिर केला आहे. या निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. 74 मतदान केंद्रावर मतदान होणार असून जिल्ह्यातील मतदारांची एक...

वंदे मातरम् गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रम उत्साहात संपन्न • शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सामूहिक गायन

सिंधुदुर्गनगरी दि.07 (जिमाका): थोर कवी बंकिमचंद्र चटर्जी रचित 'वंदे मातरम' या गीत रचनेला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वंदे मातरमचे सामूहिक गायन करण्यात आले. सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हा क्रिडा संकुलामध्ये जिल्हा प्रशासन आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने वंदे मातरम गीताचे आयेाजन करण्यात आले होते. या प्रसंगी अध्यक्षस्थानी पद्मश्री परशुराम गंगावणे, तर प्रमुख उपस्थिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची होती. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अधिष्ठाता डॉ. अनंत डवगे, उपजिल्हाधिकारी शारदा पोवार, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, श्री श्री गावडे महाराज, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, तहसिलदार वीरसिंह वसावे तसेच आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाला. त्यानंतर ‘वंदे मातरम’ या राष्ट्रभावना जागवणाऱ्या गीताचे एकसुरात सामूहिक गायन करण्यात आले.आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी 'वंदे मातरम' विषयावर प्रभावी पथनाट्य...

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे सिंधुदुर्गमध्ये यशस्वी संपन्न

सिंधुदुर्गनगरी दिनांक 07 (जिमाका) :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, यांच्या वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सव जिल्हा नियोजन समिती सभागृह, सिंधुदुर्ग येथे उत्साहात पार पडल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी दिली. महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नटराज मुर्तीचे पूजन करुन झाले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ व जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत उपस्थित होते. तसेच या महोत्सवात जिल्ह्यातील विविध तालुक्यातील युवक-युक्तींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. जिल्हाधिकारी श्री. धोडमिसे म्हणाले, 'युवकांनी योग्य मार्गदर्शन घेऊन करिअर करण्यासंदर्भात मार्गदर्शन घेऊन करिअर करण्याबाबत मार्गदर्शन केले, 'युवा महोत्सव हा करिअर करण्याकरिता एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. 'आपल्या महाराष्ट्राला सांस्कृतिक परंपरेचा चांगला वारसा लाभलेला आहे, असे मत व्यक्त केले. या महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत, चित्रकला, वक्तृत्व, कथा लेखन, कविता लेखन आणि विज्ञान प्रदर्शन अशा विविध प्रकारांच्या स्पर...

जिल्ह्यात 20 नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी, दि.६ (जि.मा.का):- जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार दिनांक 6 नोव्हेंबर 2025 रोजी 12 वाजल्यापासून ते दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी 24 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला असल्याचे जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. स्थानिक संस्था निवडणूक -2025 नगरपरिषद सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण तसेच नगरपंचायत कणकवली यांच्या निवडणुक कार्यक्रम जाहिर करण्यात आलेला आहे. दिनांक १० ते १७ नोव्हेंबर २०२५ रोजीपर्यंत अर्ज दाखल करण्यात येणार आहे. तसेच दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी मतदार व दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणूकीची दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. निवडणुकीचे काळात सर्व राजकिय पक्ष आपले वर्चस्व प्रस्तावित करण्यासाठी, मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतात निवडणुक प्रचारादरम्यान राजकिय पक्षाचे ...

शिक्षक पात्रता परीक्षा 23 नोव्हेंबर रोजी

सिंधुदुर्गनगरी दिनांक 06 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जिल्ह्यातील चार परीक्षा केंद्रावर 23 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार, असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. गणपती कमळकर यांनी दिली आहे. या परीक्षेकरिता पेपर क्र. 1 साठी, 1 हजार 55 उमेदवार आणि पेपर क्र.2 साठी, 1 हजार 368 उमेदवार असे एकूण 2 हजार 423 उमेदवार बसणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4 हजार 501 कुडाळ हायस्कूल कुडाळ, 4 हजार 502 एस. एम. हायस्कूल कणकवली, 4 हजार 503 विद्यामंदिर हायस्कूल कणकवली, 4 हजार 504 कणकवली कॉलेज कणकवली, या चार परीक्षा केंद्रावर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 घेण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय परीक्षा आयोजन व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय परीक्षा आयोजन व संनियंत्रण समितीच्या परीक्षेच्या पूर्व तयारीचा आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत परीक्षा नियोजनावर चर्चा करण्यात आली. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या पूर्व तयारीबाबत केलेल...

सरळसेवा भरतीसाठी अर्ज करण्यास 26 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी दिनांक 06 (जिमाका) :- : सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्त्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सरळसेवेन लिपिक टंकलेखक गट 'क' ही पदे भरण्याकरीता उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने 5 नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. तथापि जास्तीत जास्त उमदवारांना अर्ज भरण्याची संधी मिळण्यासाठी अर्ज भरण्यास 26 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 23.59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. जिल्ह्यातील इच्छुक व पात्र माजी सैनिक (आर्मी, नेव्ही व एअर फोर्स) यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. या भरतीची सविस्तर जाहीरात सूचना सैनिक कल्याण विभागाच्या www.mahasainaik.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाचा दुरध्वनी क्र. 02362 228820 वर संपर्क साधावा. ०००००००

वन्यहत्ती "ओंकार"च्या वावर असलेल्या भागात गर्दी करु नये

सिंधुदुर्गनगरी दिनांक 06 (जिमाका) :- हत्तीला कोणत्याही प्रकारे त्रास होईल किंवा इजा होईल असे वर्तन करुन नये. वन्यजीवांचे संरक्षण करणे हे सर्वाचे कर्तव्य आहे. त्यामुळे वन्यहत्ती "ओंकार" चे वावर असलेल्या भागात गर्दी करुन नये, असे अहवान वनविभागातर्फ करण्यात आले आहे. सावंतवाडी तालुक्यात वन्यहत्ती "ओंकार" याचा वावर सुरु आहे. तो सातोसे, कास, मडुरा, रोणापाल, ओटवणे, विलवडे, भालावल, तांबोळी,डेगवे, वाफोली, इन्सुली व बांदा या गावांच्या परिसरात दिसून येत आहे. हा हत्ती भातशेती, फळबागायती क्षेत्र तसेच काही ठिकाणी वस्ती परिसरातही फिरतांना आढळला आहे. या वन्यहत्तीला मानवी वस्तीपासून दूर ठेवण्यासाठी आणि नैसर्गिक अधिवासात राखण्यासाठी वनकर्मचारी व जलद बचाव पथक सातत्याने देखरेख ठेवत आहेत. वन्यहत्तीचा वावर असलेल्या ठिकाणी काही ग्रामस्थ व बाहेरुन येणारे लोक हत्ती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत आहेत. गर्दी नियंत्रणासाठी पोलीस विभागाची मदत घेण्यात येत आहे. तथापि, काही नागरिक हत्तीच्या अगदी जवळ जावून फोटो काढणे, व्हिडीओ तयार करणे, हत्तीवर ...