Posts

Showing posts from February, 2025

"पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे" कणकवली कॉलेज येथे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.28 (जि.मा.का.) :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग आणि कणकवली कॉलेज कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 5 मार्च 2025 रोजी कणकवली कॉलेज कणकवली येथे "पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे" आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त इ.सि. शेख यांनी केले आहे. जिल्ह्यातील उमेदवरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच उद्योजकांना आवश्यक कुशल मनुष्यबळ प्राप्त करुन देण्यासाठी जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील नामांकित उद्योजक/ इंडस्ट्रिजना या रोजगार मेळाव्यात आमंत्रित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील उद्योजकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर "पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्या"मध्ये आपली रिक्तपदे अधिसूचित करावीत. जिल्ह्यातील नोकरी साधक (Job Seeker ) उमेदवारांनी पोर्टलवर अधिसूचित रिक्तपदांसाठी आपल्या स्वत:च्या लॉगीन आयडीने शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित प...

औद्यागिक प्रशिक्षण संस्था फोडाघाटच्या "स्मार्ट रोड सेफ्टी" या प्रतिकृतीला विभागस्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त

सिंधुदुर्गनगरी दिनांक 27 (जिमाका वृत्त) : मुंबई विभागीय तंत्र प्रदर्शन सन 2024-25 या वर्षी औद्योगिक प्रशिक्षण संस्था डॉनबोक्स्को, कुर्ला येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात औद्योगिक प्रशिक्षण संस्था, फोंडाघाटने प्रथम क्रमांक मिळवत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात मानाचा तुरा रोवला असल्याची माहिती औद्योगि प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य भूषण सोनवणे यांनी दिली आहे. या प्रदर्शनासाइी मुंबई विभागाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यामधून एकुण 53 प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या, या मधील उत्कृष्ट 10 प्रतिकृतींची निवड राज्यस्तरीय तंत्र प्रदर्शनासाठी करण्यात आली. औद्यागिक प्रशिक्षण संस्था फोडाघाटच्या "स्मार्ट रोड सेफ्टी" या प्रतिकृतीला विभागस्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. यावेळी सहसंचालक निकम तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था डॉनबोक्स्को चे प्राचार्य यांच्यामार्फत सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले. या प्रतिकृतीसाठी मेकॅनिक ऑक्टो इलेक्ट्रिशियन अँड इलेक्ट्रॉनिक्स या व्यवसायाचे शिल्प निर्देशक स्वप्निल विश्वंभरे यांचे मार्गदर्शन ...

सोमवारी लोकशाही दिन

सिंधुदुर्गनगरी, दि.27 (जि.मा.का.) : माहे मार्च महिन्यातील लोकशाही दिन हा महिन्याच्या पहिला सोमवार दि. 3 मार्च 2025 रोजी दुपारी 3 ते 4 या वेळेत, जिल्हाधिकारी कार्यालयात राबविण्यात येणार असल्याची, माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे यांनी दिली आहे. 000000

उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले कुणकेश्वराचे दर्शन आपली संस्कृती आणि परंपरा आपल्यालाच पुढे घेऊन जायची आहे -उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सिंधुदुर्गनगरी दिनांक 26 (जिमाका वृत्त) : महाशिवरात्रीचा उत्साह संपूर्ण महाराष्ट्र, देशभरात कालपासून सुरू झाला आहे. सगळीकडे महादेवाच्या मंदिरामध्ये लाखो शिवभक्त श्रध्देने पूजा-अर्चना करत आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. राज्यात अनेक मोठी तीर्थक्षेत्र आहेत. आणि त्या तीर्थक्षेत्रामध्ये ठरलेल्या मुहुर्तावर यात्रा, पूजा होत असतात. सण, उत्सव आपली परंपरा आहे. आपल्याला आपली संस्कृती आणि परंपरा पुढे घेऊन जायची असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवदर्शन घेतले. दर्शनानंतर श्री शिंदे यांचा पालकमंत्री नितेश राणे आणि मंदिर व्यवस्थापन समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, आमदार रविंद्र फाटक, आमदार भैया सामंत आदी उपस्थित होते. श्री शिंदे म्हणाले, कुणकेश्वर येथे दर्शनासाठी येण्याची माझी खुप इच्छा होती आणि आज ती पुर्ण झाली. कोकणाच्या विकासाला शासनाने नेहमी प्राधान्य दिले आहे. कोकणात नवनवी...

गुणवत्तापूर्ण कामातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य -पालकमंत्री नितेश राणे

· 300 कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी · प्रत्येक वर्षी डिसेंबर अखेर सर्व कामे पुर्ण करणार · आर्थिक शिस्तीला प्राधान्य सिंधुदुर्गनगरी दिनांक 26 (जिमाका वृत्त) : जिल्हा वार्षिक योजनेसोबतच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्याचा पालकमंत्री म्हणून माझा प्रयत्न राहणार आहे. पुढील आर्थिक वर्षामध्ये ३०० कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. या निधीतून गुणवत्तापूर्ण कामातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य राहणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले. देवगड येथील शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. या उद्घाटनानंतर झालेल्या पत्रकार परीषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी माजी आमदार श्री गोगटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आदी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शासन विकासात्मक कामे करत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला वाढीव निधी मिळाल...

देवगड येथील शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन नुतन शासकीय विश्रामगृह पर्यटनवाढीसाठी महत्वाचे - पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी दिनांक 26 (जिमाका वृत्त) : सर्वसामान्यांच्या करातून उभारलेल्या शासकीय निधीचे नियोजन कसे आसावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे देवगड येथील विश्रामगृह आहे. कणकवली येथील विश्रामगृह देखील कौतुकास्पद आहे. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने देवगड येथील हे विश्रामगृह पर्यटनवाढीसाठी महत्वाचे ठरणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले. देवगड शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या शासकीय विश्रामगृहाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार श्री गोगटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड आदी उपस्थित होते. विश्रामगृहातील अंतर्भुत बाबी- सुसज्ज स्वागत कक्ष, २ व्ही.व्ही. आय.पी कक्ष अँन्टी चेंबरसहित, ३ व्ही.आय.पी. कक्ष (एसी सहित), मिटींग रुम, प्रशस्त लॉबी, विस्तीर्ण वाहनतळ, अग्निरोधक कार्यप्रणाली आणि सीसीटीव्ही सुरक्षा कार्यप्रणालीचा समावेश आहे. 00000

उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी दिनांक 25 (जिमाका) :- उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवार दि. 26 फेब्रुवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार दि. 26 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता चिपी विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने डॉ. बोरफळकर सरिता हॉस्पिटल जवळील नंदकिशोर जोशी यांच्या जागेवरील हेलिपॅड ता. देवगडकडे प्रयाण. सकाळी 10.45 वाजता डॉ. बोरफळकर सरिता हॉस्पिटल जवळील नंदकिशोर जोशी यांचे जागेवरील हेलिपॅड, ता. देवगड येथे आगमन व मोटारीने कुणकेश्वर मंदिर ता. देवगडकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता कुणकेश्वर मंदिर येथे दर्शन व राखीव. सकाळी 11.30 वाजता मोटारीने श्री. रविंद्र फाटक, माजी आमदार यांच्या निवासस्थानाकडे प्रयाण. सकाळी 11.45 वाजता श्री. रविंद्र फाटक, माजी आमदार यांच्या निवासस्थान येथे राखीव. दुपारी 12.15 वाजता मोटारीने डॉ. बोरफळकर सरिता हॉस्पिटल जवळील नंदकिशोर जोशी यांच्या जागेवरील हेलिपॅड ता. देवगडकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता डॉ. बोरफळकर सरिता हॉस्पिटल जवळील नंदकिशोर जोशी यांच्या जागेवरील हेलिपॅड ता. देवगड येथे आगमन व हेलिकॉप...

निर्यातक्षम आंबा पिकांची मॅगोनेट प्रणालीव्दारे शेत नोंदणी करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 25 (जिमाका) :- जिल्ह्यातील आंबा बागायतदारांनी सन 2024-25 या वर्षामध्ये निर्यातक्षम आंबा पिकांची मॅगोनेट प्रणालीव्दारे शेत नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे. युरोपियन युनियन व इतर देशांना आंबा निर्यातीसाठी अपेडाच्‍या मॅगोनेट प्रणालीव्‍दारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते. सन २०२४ -२५ मध्‍ये आज अखेर महाराष्ट्र राज्यातून ९ हजार ४५९ निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी झालेली आहे. निर्यातक्षम आंबा बागाची मॅगोनेट या ऑनलाईन प्रणालीवर नोंदणी करण्याची अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०२४ होती. परंतु अपेडा नवी दिल्ली कार्यालयाकडे विनंती करून ही मुदत दि.२८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीत विशेष मोहीम राबवून निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी कृषी विभागामार्फत करण्यात यावी. निर्यातक्षम आंबा फळबागेत राबवायच्या योग्य कृषी पद्धती (Good Agriculture Practices) राबविणे आवश्यक आहे. युरोपीय युनियन व अमेरिका देशाला आंबा निर्यात करण्यासाठी क्षेत्रीय/ शेतकरी स्तरावर ठेवायचे दस्तऐवजचे वि...

साहित्याची दरपत्रक सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 24 (जिमाका) :- औद्योगिक प्रशिक्षण संस्था फोडाघाट या कार्यालयातील विविध प्रकारच्या निर्लेखित जडसंग्रह साहित्याची दरपत्रक पध्दतीने विक्री करावयाची आहे. साहित्य ज्या खरेदीदारास विकत घ्यावयाचे आहे, त्यांनी या कार्यालयात दि. 5 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सिलबंद दरपत्रक लिफाप्यात सादर करण्याचे आवाहन फोडाघाटचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बो.सोनावणे यांनी केले आहे. निविदेच्या बंद लिफाप्यावर स्वच्छ अक्षरात लॉट घेणाऱ्याचे नांव व संपूर्ण पत्ता नमूद करावा दि. 5 मार्च 2025 नंतर आलेल्या निविदांच्या स्विकार केला जाणार नाही. निविदा दि. 6 मार्च 2025 रोजी दुपारी 2 वाजता उघडण्यात येतील सदर विक्री करावयाचे निर्लेखित जडसंग्रह साहित्य या कार्यालयात सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत 10.30 ते 5 वाजेपर्यंत पाहता येतील. निर्लेखित जडसंग्रह साहित्य हे आहे त्या स्थितीत आपल्या स्वखर्चाने नेण्याची व्यवस्था करावी. अटी पुढीलप्रमाणे, ज्या खरेदीदाराच्या साहित्याचा दर जास्त असेल अशा पात्र खरेदीदारास सदरह साहित्याची विक्री केली जाईल. ज्याचा दर मंजूर होईल त्य...

राष्ट्रीय तंबाखू मुक्ती जागरुकता मोहीम संपन्न

सिंधुदुर्गनगरी दिनांक 24 (जिमाका) :- जिल्ह्यातील आंगणेवाडी श्री देवी भराडी माता यात्रा प्रसंगी, तंबाखू नियंत्रणाचे महत्त्व वाढवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्रालय, भारत सरकारच्या "राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम" (NTCP) अंतर्गत, राष्ट्रीय तंबाखू मुक्ती सेवा केंद्र, सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमिओलॉजी (सीसीई), टाटा मेमोरियल सेंटर (टीमसी), युनिट ऑफ एटॉमिक इनर्जिकेंद्र, भारत सरकार, मुंबई व जिल्हा आरोग्य विभाग, यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखू मुक्ती सेवा केंद्राची जागरूकता मोहीम संपन्न झाली, असल्याची माहिती जिल्ह शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. राष्ट्रीय तंबाखू मुक्ती सेवा केंद्र (NTQLS) हा भारत सरकारचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. जो तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांबद्दल जनजागृती वाढविणे आणि तंबाखू मुक्तीसाठी मदत करणे यावर केंद्रित आहे. टोल फ्री नंबर १८००११२३५६ वर कॉल करून, व्यक्तींना तंबाखू मुक्तीसाठी मार्गदर्शन, सल्ला आणि आवश्यक संसाधने उपलब्ध करून दिली जातात. या केंद्राच्या मदतीने, तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांबद्दल जनजागृती वाढविणे आणि ...

आठवी आर्थिक गणना जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी दिनांक 22 (जिमाका) :- आठवी आर्थिक गणना एप्रिल 2025 पासून सुरू होणार आहे. यामध्ये नियुक्त प्रगणकांमार्फत घरोघरी जावून विहीत नमुन्यात माहितीचे संकलन केले जाणार आहे. आर्थिक गणनेच्या माहितीचा वापर केंद्र व राज्य शासनाला औद्योगिक विकासाच्या नियोजन व धोरणांसाठी उपयुक्त ठरणार असल्यामुळे नागरिकांनी योग्य माहिती देवून शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे. केंद्र शासनातर्फे सन 2025-26 मध्ये राष्ट्रव्यापी आठवी आर्थिक गणना होणार आहे. आठवी आर्थिक गणनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व कामाच्या सनियंत्रण व समन्वयासाठी जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीची बैठक जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे. या बैठकीला जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक अ. कुलकर्णी, उप मुख्यकार्यकारी अधिकारी किशोर काळे, जिल्हा नियोजन अधिकारी यंशवंत बुधवाले, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक श्रीपाद दामले, जिल्हा माहिती अधिकारी मुकूंद चिलवंत, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी सोमनाथ रसाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, नगरपालि...

आई भराडी देवी भाविकांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करणार -पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी, दि.२२ (जि.मा.का.) : आई भराडी देवीच्या यात्रेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात. मी देखील गेली अनेक वर्ष आईच्या आशिर्वादासाठी येथे येतो. भराडी देवीचा सर्व भक्तांवर कृपा आशीर्वाद आहे. या कृपाशीर्वादामुळे सर्व यशस्वी होत आहेत. आईच्या चरणी लीन होणाऱ्या प्रत्येक भक्ताला चांगले आरोग्य आणि सुख समृद्धी लाभू दे. नवसाला पावणारी आई भराडी देवी सर्वांच्या इच्छा नक्कीच पूर्ण करेल असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. पालकमंत्री नितेश राणे यांनी आज आई भराडी देवीचे दर्शन घेतले. आंगणे कुटुंबीयांच्या वतीने आनंद आंगणे व काका आंगणे यांच्या हस्ते पालकमंत्री यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसिलदार वर्षा झाल्टे आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्र व प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम घरकुलांचे काम वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी, दि.२२ (जि.मा.का.) : प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वपूर्ण योजना असून राज्य शासनही या योजनेला सर्वतोपरी सहकार्य करत आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मधून जिल्ह्यातील ९ हजार ९६७ घरकुल मंजूर झोलेले आहेत. मे महिन्यापर्यंत जिल्ह्यातील लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ देण्यासाठी सुक्ष्म नियोजन करून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ मधील मंजूरी पत्र वितरण व प्रथम हप्ता वितरण कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकचे अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, विशाल तनपुरे आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्ह्यातील लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वितरण देखील करण्यात आले. राज्यस्तरीय कार्यक्रमाच्य...

आंगणेवाडी यात्रेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

सिंधुदुर्गनगरी दिनांक 21 (जिमाका) :- आंगणेवाडीच्या वार्षिक यात्रोत्सवानिमित्त श्री भराडी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र गोवा आणि इतर राज्यातून असंख्य भाविक दिनांक 22 व 23 फेब्रुवारी 2025 रोजी आंगणेवाडीत भेट देणार आहेत .यानिमित्ताने आरोग्य विभागाने नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून विविध उपाय योजना केल्या असून आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी सांगितले आहे. पाणी शुद्धीकरण व ओटी टेस्टद्वारे हॉटेल व कोल्ड्रिंक मधील पाणी नमुने तपासणी :- मागील पंधरा दिवसापासून आरोग्य विभागाद्वारे आंगणेवाडी मधील पाण्याच्या स्त्रोतांचे शुद्धीकरण प्रक्रिया राबवण्यात येत आहे. तसेच सर्व स्त्रोतांची पाणी नमुने तपासणी करून घेण्यात आलेले आहेत. टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे शुद्धीकरण करण्याची खबरदारी घेण्यात येत असून यात्रेनिमित्त लावण्यात आलेल्या हॉटेल्स, कोल्ड्रिंक्समध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची पथके भेट देवून ओटी टेस्ट द्वारे पाणी नमुने तपासणी करत आहे .भाविकांना शुद्ध आणि सुरक्षित पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टिकोनातून वरील उपाययोजना करण्यात येत आहेत. वै...

जिल्हा पुरस्कार योजनेंसाठी 7 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 21 (जिमाका) :- जिल्ह्यातील यशस्वी उद्योजकांच्या मेहनतीचे, चिकाटीचे व जिद्दीचे कौतुक करण्याच्या हेतून जिल्हा स्तरावर उत्कृष्ट सुक्ष्म व लघु उद्योजकांसाठी जिल्हा पुरस्कार योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत सन 2024 च्या पुरस्कारांसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्जाची मागणी केली होती. या पुरस्कारसाठी 7 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची, माहिती जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत प्रथम पुरस्‍कार रोख रु.15 हजार आणि व्दितीय पुरस्‍कार रोख रु. 10 हजार सन्‍मानचिन्‍ह, शाल व श्रीफळ देऊन समारंभपूर्वक गौरविण्‍यात येणार आहेत. पुरस्‍कार करण्यासाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहे. १) अर्जदार घटक जिल्ह्यातील दि. ०१/०१/२०२१ रोजी किंवा त्‍यापुर्विचा स्‍थायी लघु उद्योग नोंदणीकृत / पार्ट-२ ज्ञापन स्‍वीकृतीधारक घटक असावा. २) अर्जदार घटक मागील दोन वर्षे सलग उत्‍पादनात असावा. ३) अर्जदार घटकास कोणत्‍याही बॅंकेचा अथवा वित्‍तीय संस्‍थेचा थकबाकीदार नसावा. ४) अर्जदार घटक यापूर्वी राष्‍ट्रीय / अंत...

सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात प्रथम स्थानी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्र व प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम

सिंधुदुर्गनगरी दि.20 (जि.मा.का):- जिल्ह्यातील ग्रामीण भागाकरीता एकूण ८ पंचायत समित्यांना आज अखेर ९ हजार ९६७ घरकुल मंजूरीचे उद्दिष्ट प्राप्त असून सर्वतोपरी प्रयत्न करुन त्यापैकी ९ हजार ९६७ लाभार्थ्यांना १०० टक्के ऐवढी मंजूरी देण्यात आलेली आहे. शासनाकडून प्रथम हप्ता वितरण मंजूरीचे लक्ष ५ हजार ५३९ असून त्यापैकी ७ हजार ९७ ऐवढी लाभार्थी प्रथम हप्ता वितरण मंजूरीसाठी पूर्तता केलेली असून हे प्रमाण १२८.१२ टक्के ऐवढी आहे. आज रोजी महाराष्ट्र राज्यातील एकूण ३४ जिल्ह्याचा विचार करता उद्दिष्ट मंजूरी व हप्ता वितरण लक्षांक पूर्ततेमध्ये सिधुदुर्ग जिल्हा सर्वप्रथम स्थानी आहे. मंत्री ग्राम विकास व पंचायत राज, महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांच्याकडील पत्रानुसार केंद्रीय गृहमंत्री, अमित शाह यांच्या शुभहस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमुख उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत २० लाख लाभार्थ्यांना घरकुलाचे मंजूरी पत्र व १० लक्ष लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरणाच्या गृहोत्सवाच्या कार्यक्रमास ग्रामपंचायत स्तरावरुन लाभार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमातून व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्व...

आंगणेवाडी यात्रा तयारीची प्रत्यक्ष पाहणी भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य -पालकमंत्री नितेश राणे

सिंधदुर्गनगरी दि २० (जिमाका) : आंगणेवाडी येथे विविध ठिकाणांहून भाविक दर्शनासाठी येतात. यात्रेदरम्यान भाविकांना सर्व सोयी सुविधा पुरविणे आवश्यक आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी अधिकचा पोलिस बंदोबस्त पुरवावा तसेच सर्व परीसरात सीसीटीव्ही लावावेत. यात्राकाळात भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. आंगणेवाडी यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी आंगणेवाडीत आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसिलदार वर्षा झाल्टे यासंह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, स्थानिक देवस्थान समितीला प्रशासनाकडून आवश्यक ती मदत दिली जाईल. भाविकांना सुलभ दर्शन देताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी खबरदारी घ्यावी, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने जादा कुमक तैनात करावी, परिसरात अधिक प्रमाणात सीसीटीव्ही लावावेत, मंदिर परिसरावर ड्रोनव्दारे नजर ठेवावी, प्रवाशांच्या सोय...

जिल्ह्यातील एकविध क्रीडा संघटनांनी क्रीडा गुण सवलतीकरीता स्पर्धा अहवाल सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि.20 (जि.मा.का):- जिल्ह्यातील जिल्ह्यास्तरावरील एकविध क्रीडा संघटनांनी सन २०२४-२५ या वर्षात आयोजित झालेल्या क्रीडा स्पर्धेचे रेकॉर्ड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास दि.१० मार्च २०२५ पर्यंत उपलब्ध करून देण्यात यावे. त्यानुसार पात्र खेळाडू विद्यार्थी क्रीडा गुणांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील एकविध क्रीडा संघटनांनी आपल्या क्रीडा स्पर्धेचे रेकॉर्ड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास हस्तेपोच अथवा कार्यालयाच्या sindhusports@yahoo.com या ई मेल आयडीवर सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, यांनी केले आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार संबंधित खेळ संघटनांनी विविध स्तरावर पार पडलेल्या स्पर्धांचे रेकॉर्ड जिल्हा क्रीडा अधिकारी यांना सादर करणे आवश्यक आहे. तथापि बऱ्याच एकविध खेळ संघटनांद्वारा संबंधित स्पर्धाचे रेकॉर्ड फक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडे सादर केले जात ...

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि.20 (जि.मा.का):- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील युवांनी केलेले समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने त्यांना प्रतिवर्षी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतो. सन २०२४-२५ साठी जिल्हा युवा पुरस्कारसाठी ३१ मार्चपर्यंत जिल्हा क्रीडा कार्यालयात सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे. राज्याचे युवा धोरण २०१२ मधील शिफारशीच्या अनुषंगाने शासनाने जिल्हास्तरावरील युवा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलेला आहे. जिल्हा युवा पुरस्कार तीन जणांना दिला जाणार आहे, यात युवक, युवती व नोंदणीकृत संस्था यांचा समावेश असणार आहे. युवा अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती जमाती व जनजाती, आदिवासी भाग इ. बाबतचे कार्य, शिक्षण, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या इ. बाबत पुरस्कार वर्षापासून गत तीन वर्षात केलेली कार्यकामगिरी या पुरस्कारांसाठी विचारात घेतली जाईल...

अंगणवाडी मदतनीससाठी २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि.20 (जि.मा.का):- देवगड तालुका अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील मानधनी अंगणवाडी मदतनिस पदासाठी संबंधित ग्रामपंचायत महसूल गावातील इच्छूक व पात्र महिला उमेदवाराकडून दिनांक १४ ते २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत (सार्वजनिक सुट्या वगळून) कार्यालयीन वेळेत बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प देवगड कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन देवगड एकात्मिक बालविकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी बाबली होडावडेकर यांनी केले आहे. एकूण २९ पदांसाठी ही भरती होत असून पात्र व इच्छुक उमेदवाऱ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज, स्वतःची स्वाक्षरी करून सादर करणे आवश्यक आहे. (सोबत अर्जाचा नमुना) अर्जासोबत लहान कुटुंबाबाबत प्रतिज्ञापत्र जोडणे अनिवार्य आहे. अर्जासोबत जन्म नोंदीचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र सत्यप्रत,उमेदवार त्याच महसुली गावातील कायम रहिवास असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र सोबत जोडण, पोलीस पाटील यांच्याकडील कायम रहिवास दाखला, विवाहीत असल्यास विवाह नोंदणी दाखला, जोडणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता- अंगणवाडी मदतनिस व अं...

अलौकिक प्रतिभेचा लेखक….. जयवंत दळवी

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१ ते २३ फेब्रुवारी संपन्न होत आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर भूषविणार आहेत. देशाच्या राजधानीत ७१ वर्षांनंतर हे साहित्य संमेलन होत आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. त्या पार्श्वभुमीवर हा विशेष लेख ...... कोकणाने मराठी साहित्याला अनेक साहित्य रत्ने दिली. त्यातीलच एक जयवंत दळवी होत. हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. सतरा कथा संग्रह, बावीस कादंबऱ्या (चार अप्रकाशित,) सोळा नाटके, आठ विनोदी, एक प्रवास वर्णन, पाच इतर अशी विपूल ग्रंथसंपदा निर्माण करणारे जयवंत दळवी हे एक अलौकिक प्रतिभेचे साहित्यिक होते. दळवींच्या साहित्याचा अभ्यास केल्यानंतर त्यांची अनेक रूपे एक व्यक्ती, एक लेखक, कुटूंब प्रमुख, रसिक, मिस्कील विनोदी, नवोदिताना मार्गदर्शन करणारे, सर्वांशी समरस होणारी व्यक्ती , उदार, मनस्वी, अशी अनेक विलोभनीय रूपे आढळतात.माणूस समजून घेण्यासाठी दळवी जे चिंतन करायचे किंवा ज्या माणुसक...

साहित्य संमेलन आणि मराठी भाषा

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१ ते २३ फेब्रुवारी संपन्न होत आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर भूषविणार आहेत. देशाच्या राजधानीत ७१ वर्षांनंतर हे साहित्य संमेलन होत आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. त्या पार्श्वभुमीवर हा विशेष लेख ...... दिल्ली येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे खऱ्या अर्थाने मराठी भाषेसाठी व साहित्यासाठी मैलाचा दगड ठरेल असे म्हणायला हरकत नाही. प्रतिवर्षी मराठी भाषेची साहित्य संमेलने निरनिराळ्या ठिकाणी आयोजित करण्यात येतात. अनेक वेळा तर भारताबाहेरही आयोजित करण्यात आलेली आहेत. परंतु यावर्षीच्या या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला एक विशिष्ट आयाम आहे. हे मी अशासाठी म्हणतो की नुकताच केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्या अनुषंगाने मराठी भाषेचा सर्वांगीण विकास होऊ घातला आहे आणि कोणत्याही भाषेचा विकास म्हटला की त्या भाषेमध्ये निर्माण होणारे साहित्य, साहित्यिकांचे योगदान व साहित्य संमेलने ही नितांत गरजेची बाब असते...

जिल्ह्यात 25 फेब्रुवारीपर्यंत मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी, दि.१८ (जि.मा.का): जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी 00.01 वाजल्यापासून ते दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी 24.00 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला असल्याचे जिल्हादंडाधिकारी अनिल पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता १२ वी.परीक्षा दि. ११ फेब्रुवारी २०२५ ते १८ मार्च २०२५ व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता १० वी दि. २१ फेब्रुवारी २०२५ ते दि. १७ मार्च २०२५ रोजीच्या कालावधीत सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इयत्ता १२ वी साठी २३ परीक्षा केंद्र व इयत्ता १० वीसाठी ४१ केंद्र अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात इयत्ता १० वी व १२ वी ची शालांत प्रमाणपत्र परीक्षा सुरळीत पार पाडून कोठेही अनुचित प्रकार घडू नये व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था प...

पालकमंत्री नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी दिनांक 18 (जिमाका) :- मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री नितेश राणे हे बुधवार दि.19 फेब्रुवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार दि.19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवास उपस्थिती (स्थळ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कणकवली). सकाळी 10.30 वाजता मोटारीने मालवणकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणे या कामाच्या पायाभरणी समारंभास उपस्थिती. (स्थळ, किल्ले राजकोट ता. मालवण). दुपारी 12 वाजता मोटारीने कणकवलीकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता ओम गणेश निवासस्थान येथे आगमन व राखीव. दुपारी 4 वाजता मोटारीने सावंतवाडीकडे प्रयाण. सायं.5 वाजता विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सकल शिवप्रेमी व हिंदू समाज यांच्या माध्यमातून होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव कार्यक्रामास उपस्थिती. (स्थळ, कोकण कॉलनी कोलगांव ता. सावंतवाडी). सायं. 6 वाजता मोटारीने कणकवलीकडे प्रयाण. सायं. 7 वाजता ओम गणेश...

संत शिरोमणी श्री संत रोहिदास महाराज जयंती साजरी

सिंधुदुर्गनगरी 18 (जि.मा.का) :- संत राहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या वतीने जिल्हा कार्यालय, सिंधुदुर्ग येथे संत शिरोमणी श्री संत रोहिदास महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी समाजकल्याण विभागचे लेखाधिकारी उदयकुमार यादव यांच्या हस्ते श्री संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या रिध्दी शरद केरकर तसेच समाजकल्याण विभाग, महात्मा फुले मागसवर्ग आर्थिक विकास महामेंडळ, दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, शामराव पेजे कोकण आर्थिक मागास विकास महामंडळ तसेच वसंतराव नाईक वित्त व विकास महामंडळाचे तसेच वसंतराव नाईक वित्त व विकास महामंडळाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ०००००

परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी 18 (जि.मा.का) :- शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता परदेश शिष्यवृत्तीसाठी रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी ऑफलाईन पध्दतीने 25 फेब्रुवारी अखेर अर्ज मागविण्यात येत आहे. या परदेश शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज समाज कल्याण आयुक्तालय,3 चर्च, रोड पुणे यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. शैक्षणिक वर्ष सन 2024-25 करीता अल्पसंख्याक समुदायातिल विद्यार्थ्यांकरिता परदेश शिष्यवृत्तीसाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज www.maharashtra.gov.in या वेबसाईटवरुन अर्ज डाऊनलोड करुन तो परिपुर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत पोस्टाने किंवा समक्ष "समाज कल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड, पुणे-४११००१" येथे सादर करावेत. अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर तसेच योजनेचे निकषांची माहितीसाठी www.maharashtra.gov.in (जलद दुबे ताज्या घडामोडी) येथे या संकेतस्थळाला भेट द्यावी. या योजनेच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालय दूरध्वनी क्र.०२३६२-२२८८८२ येथे ...

महाडिबिटी पोर्टलवर शिष्यवृत्ती अर्ज नोंदणी करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी 18 (जि.मा.का) :- शैक्षणिक वर्ष 2024-2025 करीता भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परीक्षा फी प्रदाने योजना, राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना इ. योजनेस नवीन अर्ज नोंदणी करणे व नुतनीकरण करणसाठी अनु. जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयांनी ऑनलाईन पध्दतीने महाडिबिटी पोर्टलवर शिष्यवृत्ती अर्ज नोंदणी करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून महाडिबिटी प्रणालीवरील मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी महाडिबिटी पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. समाज कल्याण विभागामार्फत दि. 25 जुलै 2025 पासून महाडिबिटी पोर्टल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज नोंदणी करण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेले आहे. विद्यार्थींनी शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेत...

कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक १८ (जिमाका) :- माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता १० वी ची दि. २१ फेब्रुवारी २०२५ ते दि. १७ मार्च २०२५ या कालावधीत सुरु होत आहेत. इ. १० वी च्या परीक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ४१ परिक्षा केंद्र आहेत, या परीक्षेसाठी एकूण ९ हजार ६ विद्यार्थी प्रविष्ठ होणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कविता शिंपी यांनी दिली आहे. इयत्ता १० वी ची परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीतपणे पार पाडावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांचा कृती आराखडा कार्यकमांतर्गत, शिक्षणमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली इ. १२ वी व इ. १० वीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पडाव्यात यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे विभाग तथा पालकमंत्री नितेश राणे आपणास पुढील आवाहन करीत आहे. या जिल्ह्याचा पालकमंत्री, सहपालकमंत्री पालकसचिव म्हणून आपणास पुढील आवाहन करीत आहे. तुमच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षण हा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. आगामी परीक्षांच्या काळात तुम्ही निर्धास्त, आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे परीक्षेस सामोरे जा...

महाराष्ट्रातील तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत आढावा बैठक

महाराष्ट्र सरकारने नवीन फौजदारी कायदे राज्यातील सर्व आयुक्तालयांमध्ये लवकरात लवकर लागू करावेत महाराष्ट्राने नवीन कायद्यांच्या अनुषंगाने एक आदर्श अभियोजन संचालनालय प्रणाली स्थापन करावी कायदा आणि सुव्यवस्था बळकट करण्यासाठी गुन्हे नोंदवले जाणे आवश्यक, एफआयआर दाखल करण्यात विलंब होता कामा नये सात वर्षांहून अधिक शिक्षेच्या गुन्ह्यांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त दोषसिद्धी दर मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत मुंबई, दि १४ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीत महाराष्ट्रातील नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील पोलीस, कारागृहे, न्यायालये, अभियोजन आणि फॉरेन्सिक यासंबंधीच्या विविध नवीन तरतुदींच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला केंद्रीय गृह सचिव, महाराष्ट्राचे मुख्य सचिव, महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक, पोलीस संशोधन आणि विकास ब्युरो (BPRD) चे महासंचालक, राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (NCRB) चे महासंचालक तसेच केंद्रीय गृह मंत्रालय आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होत...

पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार जल जीवन मिशनच्या अपूर्ण कामांचा सीईओ घेणार आढावा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये १७ फेब्रुवारी पासून होणार आढावा सभा

सिंधुदुर्ग दि १४ (जिमाका) जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख हे जल जीवन मिशनच्या अपूर्ण कामांचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे जल जीवन मिशनच्या रखडलेल्या कामांना गती प्राप्त होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधील आढावा सभांचे नियोजन झाले असून ते पुढील प्रमाणे. 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता कणकवली तर दुपारी 3 वाजता मालवण तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत अपूर्ण कामाचा ते आढावा घेतील. 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता कुडाळ तर दुपारी 3 वाजता वेंगुर्ले तालुक्याचा आढावा घेणार आहे. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता वैभववाडी तालुक्याचा आढावा घेतील तर दुपारी 3 वाजता देवगड तालुक्याचा आढावा घेणार आहेत. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सावंतवाडी तालुक्याचा व दुपारी 3 वाजता दोडामार्ग तालुक्याचा आढावा घेणार आहेत.

महसूल क्रीडा स्पर्धेत सिंधुदुर्ग संघ विजेता, रत्नागिरीला उपविजेतेपद; वेंगुर्ल्यात पार पडल्या स्पर्धा

सिंधुदुर्ग दि १५ (जिमाका) कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सर्वसाधारण विजेतेपद सिंधुदुर्ग संघाने पटकावले. उपविजेतेपद रत्नागिरी संघाला, तर रायगड आणि ठाणे संघाला विभागून तृतीय क्रमांक देण्यात आला. विजेत्या संघांना कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशुख यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. विभागीय आयुक्त डॉ.राजेश देशमुख यावेळी म्हणाले की सर्व यशस्वी स्पर्धकांचे मी अभिनंदन करतो. त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो. सिंधुदुर्ग जिल्ह्याने स्पर्धेचे नियोजन उत्तम प्रकारे केले. खेळामुळे आपल्यात विचारांची देखील देवाण घेवाण झाली आहे. जिंकणं आणि हारणे महत्वाचे नाही तर खेळात सातत्य असणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी किमान अर्धा तास स्वतःसाठी काढावा. सर्वांनी आपापले छंद जोपासने आवश्यक आहे. त्यासाठी वेळ काढा असेही ते म्हणाले. वेंगुर्ला येथील कॅम्प मैदानावर गेल्या तीन दिवस सुरू असलेल्या विभागीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचा समारोप आणि बक्षीस वितरण झाले. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील, ठाणे जिल्हाधिकारी किसन जावळे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी श्री क्षीरसागर, म...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा 'पायाभरणी समारंभ' पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शिवजयंतीच्या दिवशी होणार समारंभ पुतळ्याची उंची ६० फूट ३१ कोटी ७५ लाख रकमेस प्रशासकीय मान्यता

सिंधुदुर्ग नगरी दिनांक 17 (जिमाका) मालवण येथील राजकोट किल्ला परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग , सावंतवाडी अंतर्गत हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाचा समावेश महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत काम प्रगतीपथावर असून काम विहित मुदतीत पूर्ण करण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेले आहे. पुतळ्याच्या ब्राँझ धातूच्या उभारणीच्या कामाचा 'पायाभरणी समारंभ' छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते किल्ले राजकोट येथे संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर ,आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी सांगितले आहे. या पुतळा उभारण्याच्या कामास महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ३१ कोटी ७५ लाख रकमेस प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे. त्यानुसार विभागाने या क...

महात्मा गांधी व्यसनमुक्ती सल्ला, उपचार पुनर्वसन केंद्र, प्रचार व प्रसार योजनेअंतर्गत स्वयंसेवी संस्थांना सहाय्य अनुदान देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे अवाहन

सिंधुदुर्गनगरी 17 (जि.मा.का) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत महात्मा गांधी व्यसनमुक्ती सल्ला उपचार, पुनर्वसन केंद्र, प्रचार व प्रसार योजनेअंतर्गत स्वयसेवी संस्थाचे व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्य लक्षात घेऊन प्रत्येक महसूल विभागामधून दोन संस्थाना प्रत्येकी रुपये 11 लाख याप्रमाणे प्रोत्साहन अनुदान देण्यात येते. सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी व्यसनमुक्ती क्षेत्रात बहुमूल्य काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळकृष्ण परब यांनी दिली आहे. या योजनेसाठी प्राप्त प्रस्तावांमधून गुणवत्तेच्या निकषाप्रमाणे शासन स्तरावरील निवड समितीकडून संस्थांची, केंद्राची निवड करण्यात येते. यासाठी नियमावली विहित नमुन्यातील आर्ज याबाबतची माहिती https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे, सदरचे प्रस्ताव स्वीकारण्याची मुदत दिनाक 22 फेब्रुवारी 2025 रोजी सायकाळी 5.00 वाजेपर्यंत असून सदरचे प्रस्ताव समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे सादर करावेत विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्...

राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी 17 (जि.मा.का) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार देण्यासाठी पात्र व्यक्ती व संस्था यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळकृष्ण परब यांनी दिली आहे. व्यसनमुक्ती क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा व संस्थांचा गौरव करण्यात यावा तसेच व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्यकरीत असलेल्या कार्यकर्ते व संस्थांच्या कार्याला दाद द्यावी व इतर कार्यकर्त्यांना त्यापासून प्रेरणा मिळावी जेणेकरून व्यसनमुक्ती कार्याच्या उत्थानासाठी कार्यकर्ते सरसावून पुढे यावेत या व्यसनमुक्ती प्रचार कार्याचा दर्जा वाढविताना सर्वसमावेशकता निर्माण करणे, त्यायोगे पात्र व्यक्ती व संस्था यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी सन 20-21, सन 21-22 सन 23-24 व सन 24-25 या पाच वर्षाकरिता व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांच्याकडून राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. व्यक्ती व संस्थांनी प्रत्येक वर्षासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्य...

औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळामध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना

सिंधुदुर्गनगरी 17 (जि.मा.का) : अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडून मुस्लिम समाजाच्या विकासाठी "धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खासगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळामध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना" अंमलात आणली आहे. तरी जिल्ह्यातील इच्छुक शाळांनी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता विहित नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव शिक्षणाधिकारी (प्राथमिक,माध्यमिक) यांच्यामार्फत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडे दि. २२ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे. राज्यातील अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी शासन स्तरावरुन अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यास अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित शाळा, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महा...

" डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजने"साठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी 17 (जि.मा.का) : अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडून मुस्लिम समाजाच्या विकासासाठी " डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजना" सन 2024-25 मध्ये राबविण्यात येत आहे. या योजनासाठी 22 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे. राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील मदरशांनी विहित अटी व शर्तीची पूर्तता करुन सन 2024-25 या वर्षाकरीता विहित नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) यांच्यामार्फत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडे दि. 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत सादर करावेत. या प्रस्तावमध्ये water purifler व Solar Inverter या 2 पायाभूत सोयी सुविधांचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात यावा. विहित अर्जाचा नमुना याबाबतचा अधिक तपशील शासन निर्णय क्र. अविवि-2010/ प्र.क्र.152/10/का.6, दि. 11/10/2013 मध्ये उपलब्ध आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जाची दखल घेण्यात येणार नाही. ०००००

कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन संघभावना वाढीस लागण्यासाठी क्रीडा स्पर्धा महत्वाच्या -पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग दि १३ फेब्रुवारी (जिमाका) :- महसूल विभाग हा शासनाचा कणा आहे. हा विभाग शासनाच्या अनेक महत्वाकांक्षी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करतो. वाढत्या कामांमुळे अतिरिक्त ताण-तणाव शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर असतो. आलेला ताण - तणाव कमी करण्यासाठी दररोज शारिरीक व्यायाम महत्वाचा आहे. शिवाय क्रीडा स्पर्धांमुळे संघभावना वाढीस लागत असल्याने क्रीडा स्पर्धा महत्वाच्या असल्याचे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. वेंगुर्ला येथील कॅम्प मैदानावर कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे दि १३ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, आदी उपस्थित होते. सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत...

जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाचे निकामी प्रशिक्षण साहित्याचा लिलाव

सिंधुदुर्गनगरी दिनांक 13 (जिमाका) :- जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय, सिंधुदुर्ग येथेली निकामी प्रशिक्षण साहित्य लिलाव करण्यात येणार आहे. तरी सिलबंद निविदा दरपत्रक दि. 19 फेब्रुवारी 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करण्याचे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड यांनी केले आहे. प्राप्त सिलबंद निविदा दि. 20 फेब्रुवारी 2025 रोजी समिती समोर उघडण्यात येतील व त्याच वेळी त्या दिवशी 16.30 वाजता जाहीर लिलाव घेवून वस्तू विक्री करण्यात येतील लिलाव घेणाऱ्यास त्वरीत किंमत कार्यालयास जमा करावी लागेल. निकामी साहीत्य पहाण्यासाठी उपलब्ध आहे. शासकीय सुट्टी वगळता कार्यायीन वेळेत साहित्य पहाता येईल. लिलावाच्या दिवशी दि. 20 फेब्रुवारी रोजी लिलाव पुर्वी रु. 1 हजार अनामत रक्कम भरावी लागेल व ती लिलावा नंतर परत देण्यात यईल. टिप. काही अपरिहार्य लिलाव किंमतीपेक्षा कमी रक्कम प्राप्त होत असेल तर हातची किंमत पुन्हा काढून हाच लिलाव पुन्हा तारीख व प्रसिध्दी देऊन घेण्याचा हक्क समितीकडे राखून ठेवला आहे, याची नोंद घ्यावी. 0000000

सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 13 (जिमाका) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती जमाती, विमुक्त भटक्या जमाती मधील सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्यकरणाऱ्या सामाजिक कार्यर्त्याचा गौरव करवा व त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने डॉ. बाबासाहेब आंबडेकर समाजभूषण पुरस्कार (व्यक्ती), साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहु, फुले, आंबेडकर पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबडेकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार (संस्था) नमुद पुरसकारासाठी व्यक्ती व संस्था यांना प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी जिल्ह्यामधील इच्छुक व्यक्ती व स्वयंसेवी संस्थानी पुरस्कारासाठी त्यांचे विहीत नमुन्यातील प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग यांच्याकडे दि. 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत 3 प्रतित सर्व कागदपत्रासह सादर करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. या पुरस्काराची जाहिरात व अर्जाचा नमुना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपल...

कुणकेश्वर यात्रा नियोजन बैठक भाविकांच्या सोयीसाठी १०० जादा बसचे नियोजन करा -पालकमंत्री नितेश राणे

•कायमस्वरुपी सुविधा उभारा •विभाग प्रमुखांनी प्रत्यक्ष सोयी- सुविधांची पाहणी करावी •भाविकांची तक्रार येता कामा नये सिंधुदुर्गनगरी दिनांक 12 (जिमाका) :- कुणकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त विविध ठिकाणांहून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून यात्रा कालावधीत १०० जादा बस उपलब्ध करुन देण्याचा निर्णय पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला आहे. मागच्या वर्षी ७४ बस सोडण्यात आल्या होत्या. यावर्षी पालकमंत्री नितेश राणे यांनी १०० जादा बस सोडण्याचा निर्णयामुळे प्रवासाची चिंता मिटल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. देवगड, विजयदुर्ग, मालवण आणि कणकवली या आगारातून जादा बसची व्यवस्था करण्यात येणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात देवगड तालुक्‍यातील कुणकेश्वर देव स्वयंभू देवाचा वार्षिक जत्रौत्‍सव नियोजनाचा आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाल...

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 साठी प्रवेशिका सादर करण्यासाठी मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी दि.12 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका 31 जानेवारी 2025 रोजी पर्यंत मागविण्यात आल्या होत्या. या प्रवेशिका पाठविण्यास 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई - 32, येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचं नमुने dgipr.maharashtra.gov.in व www.maharshtra.gov.in तसेच https://mahasamvad.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. पुरस्कारांची माहिती अ.क्र पुरस्काराचे नाव ...

आंब्यावरील फुलकीड नियंत्रणासाठी ठोस पावले उचलावीत - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी दिनांक ११ (जिमाका) : कोकणात आंबा पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने ठोस उपाययोजना कराव्यात अशा सूचना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. फुलकिड नियंत्रणाबाबत कृषी मंत्री माणिक कोकाटे यांच्या दालनात बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.फुलकिडीमुळे होत असलेल्या नुकसाणीविषयी परिस्थिती कृषी मंत्री श्री कोकाटे यांच्या निदर्शनास आणून मंत्री श्री. राणे म्हणाले की, या किडीमुळे कोकणातील आंबा बागायतदारांचे अतोनात नुकसान होत आहे. बागायतदारांनी बाजारातील उपलब्ध किटकनाशकांचा वापर केला आहे. तरीही ही किड नियंत्रणात आलेली नाही. ही किड नियंत्रणात आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या माध्यमातून कृषी पर्यावेक्षक आणि कृषी सहाय्यक यांच्यासाठी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे प्रशिक्षणाचे आयोजन करावे अशा सूचना मंत्री श्री. राणे यांनी दिल्या. मंत्री श्री. राणे यांच्या या सूचनांना कृषी मंत्री श्री. कोकाटे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अशा प्रका...

पालकमंत्री व महसूल मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार उद्घाटन वेंगुर्ला येथे 13 फेब्रुवारी पासून कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन

•स्पर्धेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन •स्पर्धेच्या माध्यमातून संघभावना वृध्दींगत •विविध क्रीडा प्रकारांचा समावेश सिंधुदुर्गनगरी दिनांक ११ (जिमाका) : वेंगुर्ले कॅम्प येथील तालुका संकुल येथे दि. १३ फेब्रुवारी पासून कोकण विभागीय महसूल क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२४-२५ चे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. १३ ते १५ फेब्रुवारी असे तीन दिवस या स्पर्धा रंगणार आहे. याची जय्यत तयारी वेंगुर्ला कॅम्प मैदानावर सुरू आहे. या सोहळ्यास रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार दिपक केसरकर, आमदार निलेश राणे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख, यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे. या स्पर्धेच्या निमित्ता...

सर्व वाहनांना एचएसआरपी (HSRP) बसविणे आवश्यक

सिंधुदुर्गनगरी दिनांक ११ (जिमाका) : केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम ५० अन्यये महाराष्ट्र शासनाने सर्व वाहनांना एचएसआरपी (HSRP) बसविण्याची तरतुद करण्यात आली आहे. वाहनांना नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना एचएसआरपी (HSRP) बसविणे आवश्यक आहे. असे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी दिली आहे. त्याअनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वाहन धारकांना त्यांच्या वाहनांना HSRP बसविण्याकरिता पुढीलप्रमाणे सूचना जारी करण्यात येत आहेत. सिंधुदूर्ग जिल्ह्याकरिता M/s FTA HSRP SOLUTION PVT LTD ही एजन्सी निश्चित करण्यात आलेली असून HSRP नंबर प्लेट बसविण्याकरिता बुकींग पोर्टल http://maharashtrahsrp.com हे पोर्टल निश्चित करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील (MH07 क्रमांक असणाऱ्या) वाहनधारकांनी वरील पोर्टलवर बुकींग करून त्यांच्या सोईप्रमाणे अपॉइंटमेंट घेवून HSRP नंबर प्लेट आपल्या वाहनास बसवून घ्यावी. वाहनधारक सिंधुदूर्ग उ...

एकरक्कमी परतावा योजनेंचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक ११ (जिमाका) : ओबीसी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत सर्व योजनांमध्ये लाभ घेतलेल्या लाभार्थीना संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत ५० टक्के सवलत देण्याबाबतची एकरक्कमी परतावा (OTS) योजना दि.३१ मार्च २०२५ पर्यंत राबविण्यात येत आहे. महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थीनी या योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे व महामंडळाच्या नवीन कर्ज याजनेचा लाभ घेण्याचे आवाहन शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक प्रिती आर पटेल यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय (ओबीसी) वित्त आणि विकास महामंडळ मर्यादीत, व उपकंपनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लि... सिंधुदुर्ग यांचेमार्फत मुदती कर्ज योजना, मार्जिन मनी कर्ज योजना, स्वर्णिमा कर्ज योजना, बीज भांडवल कर्ज योजना अशा विविध कर्ज योजनेतंर्गत सिधुदुर्ग जिल्ह्यातील इतर मागास (ओबीसी) प्रवर्गातील लाभार्थीना स्वयंरोजगाराकरीता अल्प व्याजदराने कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे. अधिक माहितीसाठी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महा...

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक ११ (जिमाका) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या निर्देशानुसार सन 2024-25 पासून ग्रेस गुणांसाठी केली जाणारी प्रक्रिया शासनाद्वारे आपले सरकार पोर्टलद्वारे ऑनलाइन करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व खेळाडू, विद्यार्थी, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी आपले सरकार पोर्टलवर यावर्षीपासून सवलत गुणांचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे. पोर्टलद्वारे सर्व अर्ज ऑनलाइन प्रणालीद्वारेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळास सादर करण्याची सुविधा निर्माण करून देण्यात आली आहे. खेळाडू विद्यार्थी/जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी aaplesarkar.mahaonline.gov.in या लिकच्या माध्यमातून आपले सरकार अॅपद्वारे सवलत गुणांचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावयाचा आहे. खेळाडूने जिल्हा क्रीडा कार्यालयात ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू नये, असा अर्ज जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून स्वीकारला जाऊ नये, असे निर्देश संचालनालयाकडून देण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी शितल शिंदे मोबा....

माकडतापाचे दोन्ही रुग्णांवर यशस्वी उपचार

सिंधुदुर्गनगरी दिनांक ११ (जिमाका) : माहे जानेवारी पासून सावंतवाडी तालुका अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र सांगेली येथील कलंबिस्त गावात व दोडामार्ग तालुका अंतर्गत प्राथमिक आरोगय केंद्र भेडशी येथील केर गावात प्रत्येकी एक के.एफ.डी. (माकडताप) रुग्ण आढळून आले असून दोन्ही रुग्ण पूर्णःपणे बरे आहेत. या दोन्ही ठिकाणी नियमित ताप रुग्ण सर्वेक्षण चालू असून सर्वेक्षणामध्ये एकही विशेष तापाचा रुग्ण तसेच के.एफ.डी. (माकडताप) लक्षणे असलेला रुग्ण आढळून आलेला नाही. अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. स्वप्नील बोदमवाड यांनी दिली आहे. माहे जानेवारी पासून एकूण २२० रक्त जल नमुने एन.आय.व्ही. पूणे येथे तपासणीसाठी पाठविलेले असून त्यापैकी फक्त दोन रुग्ण के.एफ.डी. (माकडताप) दूषित आढळले आहेत. जिल्ह्यातून एकूण ३४४ गोचिड तपासणीसाठी एन.आय.व्ही. पूणे येथे पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे. कोल्हापूर चे (हिवताप) आरोग्य सेवा सहाय्यक संचालक डॉ. संजय रणवीर व जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धूरी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. स्वप्नील बोदमवाड, यांनी के.एफ.डी. दूषित भागातील रुग्णभेट घेऊ...

ज्येष्ठ नागरिक मेळावा आणि हेल्पलाईनचे उद्घाटन 'हेल्पलाईन सेवा' ज्येष्ठांसाठी अत्यंत उपयुक्त -पालकमंत्री नितेश राणे

• पोलिसांनी जनतेशी संवाद ठेवावा •ज्येष्ठ नागरिक आणि भावी पिढी सुरक्षित असावी •'ग्रामसंवाद' उपक्रम कौतुकास्पद सिंधुदुर्ग दि ०८ फेब्रु (जिमाका) : शिक्षणासाठी तसेच नोकरी निमित्ताने शहरी व ग्रामीण भागातील युवकांचे स्थलांतर होत असल्याने ज्येष्ठ नागरिक घरात एकटे राहण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा हा समाजासमोरील महत्वाचा मुद्दा आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणीच्यावेळी तसेच त्यांच्या आरोग्यविषयक व सुरक्षाविषयक समस्यांमध्ये त्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने सुरू केलेली 'हेल्पलाईन सेवा' अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री नितेश राणे यांनी काढले. जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या 'ज्येष्ठ नागरिक मेळाव्याचे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाईनचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार दिपक केसरकर, पद्मश्री पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लोककलाकार परशुराम गंगावणे, कोकण परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक स...