जिल्ह्यात 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोंबर रॅबिज आठवडा
सिंधुदुर्गनगरी, दि.28 (जि.मा.का.) जिल्ह्यात दरवर्षी 28 सप्टेंबरला 'जागतिक रॅबीज दिवस' साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोंबरला जागतिक रॅबीज आठवडा साजरा करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी कळविले आहे. रॅबीज संबंधिची माहिती खालीलप्रमाणे :- रॅबीज कसा होतो? त्यावर उपचार काय? कोणताही कुत्रा चावल्याने रॅबीज होतो का? प्राण्याने त्यातही प्रामुख्याने कुत्रा चावल्यामुळे होणारा आजार म्हणजे 'रॅबीज'. हा आजार अत्यंत जीवघेणा असून, वेळीच आणि योग्य उपचार मिळाले तरच जीव वाचवता येऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, कुत्रा चावल्यानंतरच्या वैद्यकीय उपचारांबाबत सामान्यांमध्ये खूप कमी प्रमाणात जनजागृती आहे. यामुळेच, जगभरात दरवर्षी 59 हजारपेक्षा जास्त लोकांना रॅबीजमुळे आपले प्राण गमवावे लागतात.रॅबीजमुळे जगभरात होणाऱ्या मृत्यूपैकी 36 टक्के मृत्यू एकट्या भारतात नोंदवण्यात येतात. आशिया आणि अफ्रिकेत रॅबीजचा संसर्ग होण्याचं प्रमाण अधिक आहे. सामान्यांना या आजाराबाबत फार माहिती नाही. त्यामुळे सामान्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तर आम्ही तज्...