वयोवृद्धास मारहाण करुन दुखापत करणाऱ्या आरोपीस सश्रम कारावास

सिंधुदुर्गनगरी दि.24 (जि.मा.का):- वयोवृद्धास शिवीगाळी करुन त्यांना जंगली लाकडी दांडयाने मारहाण केल्याप्रकरणी आरोपी मोहन विजय चुडनाईक (वय ४३ रा. काळसे, ता. मालवण) यास मालवण प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी महेश देवकाते यांनी भा.दं.वि.कलम ३२३ नुसार १ महिना सक्त मजुरी व भा.दं.वि. कलम ३५२ नुसार १५ दिवस सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. मालवण पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. ५०/२०२२, भा. दं. वि. कलम ३२४, ३२३, ३५२, ५०४ अन्वये दि. ०७/०४/२०२२ रोजी दाखल आहे. या गुन्हयातील सिद्धदोष अपराधी - मोहन विजय चुडनाईक (वय ४३ रा. काळसे, ता. मालवण) याने फिर्यादी रामचंद्र देऊ चुडनाईक (वय ७६) यांच्या शेतातील पाईपलाईन वरुन मोटार सायकल चालवित नेली. त्यावेळी फिर्यादीने त्यास मोटार सायकल पाईप वरुन नेऊ नकोस, नुकसान होईल, असे सांगितले. त्या कारणावरुन अपराध्याने फिर्यादीला शिवीगाळी करुन त्यांना मारण्यासाठी अंगावर धावत गेला. जंगली लाकडी दांडयाने हाता-पायावर मारुन दुखापती केलेल्या होत्या. या गुन्हयाचे अन्वेषण मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कट्टा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल / ९५७ रुक्मांगद मुंडे यांनी उत्कृष्ट प्रकारे करुन न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, मालवण यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले होते. या गुन्हयात न्यायालयाने अपराध्यास भा.दं.वि. कलम ३२३ नुसार १ महिना सक्त मजुरी व भा.दं.वि. कलम ३५२ नुसार १५ दिवस सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. अपराध्याने दोन्ही शिक्षा एकत्रित भोगावयाचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयात अभियोग पक्षातर्फे सहा. सरकारी अभियोक्ता अॕङ हृदयनाथ चव्हाण, अॅङ तुषार भणगे यांनी यशस्वी युक्तीवाद केला. तसेच त्यांना न्यायालयीन कामकाजात पैरवी अधिकारी म्हणून पो. कॉ. १२४० संदिप करंगुटकर यांनी विशेष मदत केलेली आहे. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सरकारी अभियोक्ता, मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, तपासिक अंमलदार, पैरवी पोलीस अंमलदार यांचे त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक व अभिनंदन केले आहे. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'