Posts

Showing posts from May, 2020

जिल्ह्यात एकूण 48 कोरोना बाधीत पैकी 7 बरे, 1 मृत्यू, 1 मुंबईत, 39 जणांवर उपचार सरू - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

जिल्ह्यात एकूण 48 कोरोना बाधीत पैकी 7 बरे, 1 मृत्यू, 1 मुंबईत, 39 जणांवर उपचार सरू                                                 - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 30 –  जिल्ह्यात एकूण 48 व्यक्तींचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. त्यापैकी 7 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 1 रुग्ण उपचारासाठी मुंबई येथे गेला असून 39 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे काल दिनांक 29 मे रोजी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये एकूण 18 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये वैभववाडी तालुक्यातील 2, कणकवली तालुक्यातील 12, सावंतवाडी तालुक्यातील 3 आणि मालवण तालुक्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. काल प्राप्त झालेल्या 18 पॉजिटीव्ह अहवालांपैकी 9 अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाले आहेत.  हे प...

जिल्ह्यात 15 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची भर - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

जिल्ह्यात 15 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची भर                                                 - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 29 –   जिल्हा सामान्य रुग्णाालयाकडे आज दुपारी कोरोना तपासणीचे 25 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 8अहवाल पॉजिटीव्ह आले असून 17 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द येथील 1, हरकुळ बुद्रुक येथील 1, पियाळी येथील 1, सावंतवाडी तालुक्यातील सावंतवाडी येथील 1, माडखोल 1, इगवेवाडी 1 तर वैभववाडी तालुक्यातील वैभववाडी येथे 2 रुग्ण सापडले आहेत. या सर्वाचे स्वॅब दिनांक  22 मे 2020 रोजी घेण्यात आले होते. त्यांचे अहवाल आज प्राप्त झाले आहेत.   संध्याकाळी आणखी एका रुग्णाचा अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. सदर रुग्ण हा कुडाळ तालुक्यातील आहे. काल रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे प्राप्...

मुंबईतून आलेल्या जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णाचा मृत्यू - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

मुंबईतून आलेल्या जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णाचा मृत्यू                                                 - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 29 –   देवगड तालुक्यातील टेंबवली येथील कोरोना बाधीत 79 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. सदर महिला दिनांक 19 मे रोजी मुंबई येथून जिल्ह्यात आली होती. त्यानंतर तिला दुसऱ्यादिवशी रुग्णालयामध्ये दाखल करून तिचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. दिनांक 23 मे 2020 रोजी तिचा मृत्यू झाला होता. तिचा कोरोना चाचणी अहवाल आज पॉजिटीव्ह आला आहे. तिला उच्च रक्तदाब व जुनाट श्वसनाचा आजार होता. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधीत रुग्णांची माहिती पुढील प्रमाणे आहे. कणकवली तालुक्यातील बावशी येथील एक, कुडाळ तालुक्यातील कवठी येथील एक, देवगड तालुक्यातील वाडा येथील एक, वेंगुर्ला ता...

जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 24 वर सध्या 17 रुग्णांवर उपचार सुरू, 7 रुग्ण घरी परतले - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 24 वर सध्या 17 रुग्णांवर उपचार सुरू, 7 रुग्ण घरी परतले                                                  - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 28 –   जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 24 झाली असून सध्या 17 रुग्णांवर विलगीकरण कक्षामध्ये उपचार सुरू आहेत. तर 7 रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याची माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे. जिल्ह्यात एकूण 7 कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. कणकवली तालुक्यातील 1, वैभववाडी तालुक्यात 2, कुडाळ तालुक्यात 2, सावंतवाडी तालुक्यात 2 या प्रमाणे नवीन रुग्ण आढळले आहेत. कणकवली तालुक्यातील शिवडाव येथील 22 वर्षीय पुरुष, कुडाळ तालुक्यातील पणदूर येथे सापडलेली 22 वर्षीय युवती आणि 50 वर्षीय  महिला असे तिन्ही रुग्ण हे कुडाळ तालुक्यातील पणदूर य...

गृह व संस्थात्मक विलगीकरण 14 दिवस --- जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी

गृह व संस्थात्मक विलगीकरण 14 दिवस                                     --- जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.)   दि. 2 8 : कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर विलगीकरणाबाबत शासना‍कडून आता 14 दिवस गृह व संस्‍थात्‍मक विलगीकरण करण्‍याच्‍या सुचना देण्‍यात आल्या आहेत. अशी माहिती   जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. जिल्ह्यातील बाधित क्षेत्रामधून ( Containment Zone ) येणा-या लोकांना 14 दिवस संस्थात्मक     विलगीकरण ( Institutional Quarantine ) करण्‍यात येणार आहे.   तर बाधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रामधून येणा-या लोकांना 14 दिवस गृह विलगीकरण ( Home Quarantine ) करण्‍यात येईल. बाधित क्षेत्रामधून ( Containment Zone ) येणा-या लोकांची राहते घर स्वतंत्र, विलग असल्यास अशा लोकांना ग्राम व वॉर्ड समितीने त्याबाबत खात्री करुन गृह विलगीकरण ( Home Quarantine ) करण...

लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात एकूण 11 हजार 426 मे.टन धान्य वाटप - जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते

Image
लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात एकूण 11 हजार 426 मे.टन धान्य वाटप                                                  - जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 28 –   कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा उपाय म्हणून देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. या लॉकडाऊनमुळे समाजातील आर्थिक मागास वर्गात मोठा फटका बसला. या कठीण परिस्थितीमध्ये त्यांना अन्न धान्याचा तुटवडा भासू नये म्हणून राज्य शासनाने मोठ्या प्रमाणावर धान्य वाटपाचा निर्णय घेतला. त्यामध्ये अंत्योदय, प्राधान्य कुटुंब यांना नियमित मिळणाऱ्या धान्या व्यतिरिक्त 5 किलो प्रती व्यक्ती मोफत धान्य वाटप करण्यात आले. केशरी शिधापत्रिका धारकांनाही धान्य वितरण करण्यात आले. या सर्व गटातील कुटुंबांना जिल्ह्यात एकूण 11 हजार 426 मे. टन धान्याचे वाटप एप्रिल व मे या दोन महिन्यात करण्यात आले आहे. ...

जिल्ह्यातील 116 अहवाल निगेटीव्ह - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

जिल्ह्यातील 116 अहवाल निगेटीव्ह                                                  - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 27 –   जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णाच्या अती जोखमीच्या संपर्कातील आणखी 8 व्यक्तींचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर काल पाठविलेल्या 59 नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहे. जिल्ह्यातील 116 अहवाल काल निगेटीव्ह आले आहेत.   जिल्ह्यात एकूण 24 हजार 759 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून त्या पैकी 409 व्यक्ती या शासकीय संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. तर 24 हजार 350 व्यक्तींना गावपातळीवरील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर जिल्ह्यात प्रवेश केलेल्या इतर सर्व नागरिकांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 1 हजार 552 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 1 हज...

राज्य शासनाचा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम कमाल 50 लाख रुपयांपर्यंत मिळणार अर्थसहाय्य

राज्य शासनाचा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम कमाल 50 लाख रुपयांपर्यंत मिळणार अर्थसहाय्य सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 26 –  बेरोजगार युवकांना बँकेकडून सहज व सोप्या पद्धतीने अर्थसहाय्य देऊन स्वयंरोजगारासाठी प्रेरित  करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेमध्ये उत्पादन व प्रक्रिया उद्योगांसाठी कमाल 50 लाख रुपये व सेवा व कृषी पूरक उद्योगांसाठी कमाल 10 लाख रुपये अर्थसहाय्य मिळणार असल्याची माहिती महाव्यवस्थापक, जिल्हा  उद्योग केंद्र, सिंधुदुर्ग यांनी दिली.             युवकांच्या सर्जनशीलतेला वाव मिळून स्वयंरोजगारासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे. याद्वारे ग्रामीण तसेच शहरी भागात सुक्ष्म, लघु उपक्रमातून रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी आर्थिक सहाय्यातून प्रकल्प उभारणीस हातभार लावण्याचाही उद्देश या योजनेमध्ये आहे.             या योजनेच्या अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार हा...

अतिजोखमीच्या संपर्कातील 59 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी रवाना - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

अतिजोखमीच्या संपर्कातील 59 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी रवाना                                                  - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 26 –   जिल्ह्यात आढळलेल्या   नवीन 9 कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचा शोध पूर्ण झाला आहे. त्यातील अतीजोखमीच्या संपर्कातील 59 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर कमी जोखमीच्या संपर्कातील सर्व व्यक्तींना अलगीकरणात ठेवण्यात आले आहेत.             जिल्ह्यात सध्या 4 कंटेन्मेंट झोन आहेत. त्यामध्ये कणकवली तालुक्यातील डामरे, वैभववाडी तालुक्यातील नाधवडे, मालवण तालुक्यातील हिवेळे आणि कुडाळ तालुक्यातील पणदूर या गावांचा समावेश आहे. पणदूर कंटेन्मेंट झोनमध्ये 8 पथकांनी  282 क...

नवीन आठ कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध पूर्ण - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी संपर्कातील सर्व अलगीकरणात

नवीन आठ कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध पूर्ण                                  - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी संपर्कातील सर्व अलगीकरणात सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 24 –  जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या 8 कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचा शोध पूर्ण झाला असून संपर्कातील सर्व व्यक्तींना अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या नवीन 8 रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची संख्या 110 इतकी आहे. त्यापैकी 46 व्यक्ती या अतिजोखमीच्या संपर्कातील असून कमी जोखमीच्या संपर्कातील व्यक्तींची संख्या 64 आहे. त्यामध्ये डामरे येथील कुटुंबाच्या संपर्कात एकूण 21 व्यक्ती आल्या आहेत. त्यापैकी 4 जण हे अतिजोखमीच्या संपर्कातील तर 17 जण हे कमी जोखमीच्या संपर्कातील आहेत. धालकथी येथील रुग्णांच्या संपर्कात एकूण 26 व्यक्ती आल्या आहेत. त्यातील 2 जण अती जोखमीच्या संपर्कातील तर 24 व्यक्ती या कमी जोखमीच्या संपर्कातील आहेत. हि...

सिंधुदुर्गनगरी येथून सुटली चौथी श्रमिक विशेष रेल्वे झारखंडमधील 1 हजार 545 नागरिक रवाना

Image
सिंधुदुर्गनगरी येथून सुटली चौथी श्रमिक विशेष रेल्वे झारखंडमधील 1  हजार 545 नागरिक रवाना सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 23 –  राज्य शासन व जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नातून आज सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकातून झारखंड राज्यातील हातिया स्थानकाकडे श्रमीक विशेष रेल्वे रवाना करण्यात आली. जिल्ह्यातून सोडण्यात आलेल्या या चौथ्या श्रमीक रेल्वेतून 1 हजार 545 मजूर व कामगार झारखंडकडे रवाना झाले. यावेळी मजूरांच्या चेहऱ्यावर समाधान व गावी जाण्याचा आनंद दिसून येत होता.             यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रवाशांना फुड पॅकेट्स, पाणी बॉटल, मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. संध्याकाळपर्यंत जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधून मजूर व कामगार यांना एस.टी. बसने सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकावर आणण्यात आले. त्यामध्ये वेंगुर्ले तालुक्यातील 237 मजूर 12 बसमधून, मालवण – 491, 25 बस, कुडाळ – 372, 22 बस, सावंतवाडी – 384, 19 बस, देवगड -37, 2 बस आणि वैभववाडी तालुक्यातील 24 जण 1 बस मधून असे एकूण  81 बसमधून सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकामध्...

जिल्ह्यात एकूण 16 हजारांपेक्षा जास्त व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात - जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

जिल्ह्यात एकूण 16 हजारांपेक्षा जास्त व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात -           जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 23 -  जिल्ह्यात एकूण 16 हजार 378 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून त्या पैकी 515 व्यक्ती या शासकीय संस्थात्म अलगीकरण कक्षात आहेत. तर गावपातळीवर 15 हजार 863 व्यक्तींना गावपातळीवरील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर जिल्ह्यात प्रवेश केलेल्या  इतर सर्व नागरिकांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 1 हजार 307 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 1 हजार  142 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 16 अहवाल पॉजिटीव्ह आले असून उर्वरीत 1 हजार 126 अहवाल निगेटीव्ह आले आहेत.  अजून 165 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.  जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 85 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 52 रुग्ण डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलमध्ये, 33 रुग्ण डेडिकेटेड कोवीड हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी 4 हजार 996 व्यक्तींची तपा...
जिल्ह्यात आणखी आठ जणांचे कोरोना अहवाल पॉजिटीव्ह -           जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 23 -  जिल्ह्यात आज आणखी 8 जणांचे कोवीड – 19 तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये कणकवली तालुक्यातील 6 जणांचा, वैभववाडी तालुक्यातील 1 आणि मालवण तालुक्यातील एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.  कणकवली येथील 4 रुग्णांनी मुंबई येथून प्रवास केला आहे. तर दोन व्यक्तींनी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथून प्रवास केला आहे. मालवण तालुक्यातील रुग्ण हा ठाणे येथून आलेला आहे. वैभववाडी तालुक्यातील रुग्ण हा प्रभादेवी मुंबई येथून आलेला आहे. या नवीन 8 रुग्णांमध्ये 4 महिला व 4 पुरुषांचा समावेश आहे. या सर्वांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. 8 नवीन कोरोना बाधीत रुग्ण सापडल्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आता 16 झाली आहे. यातील 5 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता 11 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

लॉकडाऊन काळात बेकायदेशीक कृत्यांना आळा घालण्यासाठी सिंधु पोलीस ॲपची निर्मिती

लॉकडाऊन काळात बेकायदेशीक कृत्यांना आळा घालण्यासाठी सिंधु पोलीस ॲपची निर्मिती सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 22 –  लॉकडाऊनच्या काळात जमावबंदीचे उल्लंघन, अनधिकृत स्थलांतर, विध्वसंक वर्तन, संशयास्पद हलचाली किंवा इतर बेकायदेशीर कृत्य तसेच अलगीकरणाचे नियम न पाळणाऱ्यांची माहिती पोलीसांना तात्काळ देता यावी यासाठी सिंधुदुर्ग पोलीस दलाच्यावतीने सिंधु पोलीस (Sindhu Police)  हे ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिक एखाद्या बेकायदेशीर कृत्याचे फोटो काढून तात्काळ जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षास कळवू शकणार आहेत. नागरिकांनी पाठविलेल्या फोटोसोबत अक्षांश व रेखांश यांची सुविधा उपलब्ध असल्याने पोलीस नियंत्रण कक्षास सदर कृत्य कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडत आहे याबाबत अचूक माहिती मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 30 सेक्टर पेट्रोलिंग वाहनांपैकी जवळच्या वाहनास संपर्क साधून संबंधित ठिकाणी पोलीस पथक तात्काळ पाठवून बेकायदेशीर कृत्यास आळा घालणे शक्य होणार आहे.             Sindhu Police हे ॲप्लीकेशन गुगल प्ले स्...

कणकवली शहरातील उड्डाणपुल येत्या 15 ऑक्टोबर पर्यत सुरु करा -पालकमंत्री उदय सामंत

Image
कणकवली शहरातील उड्डाणपुल येत्या 15 ऑक्टोबर पर्यत सुरु करा                                                        -पालकमंत्री उदय सामंत सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 21 – राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 मधील कणकवली ते झाराप या टप्प्यातील बहुतांशी कामे पुर्ण झाली असून त्याअंतर्गत असणारा कणकवली शहरातील उड्डाणपुल येत्या 15 ऑक्टोबर पर्यत सुरु करा अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिल्या.             महामार्ग कामांची आढावा बैठक आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी आयोजीत करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार वैभव नाईक, जिल्हा मध्यवती बँकेचे चेअरमन सतिश सावंत, कणकवली प्रांताधिकारी वैशााली राजमाने, तहसिलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी रमेश पवार, बा...

राजस्थानमधील मजुरांना नोंदणी करण्याचे आवाहन /जिल्ह्यातील आणखी एक रुग्ण कोरोना मुक्त - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

राजस्थानमधील मजुरांना नोंदणी करण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 21 - लॉकडाऊन मुळे जिल्ह्यात अडकलेल्या   राजस्थानमधील नागरिकांना त्यांच्या गावी जाता यावे, यासाठी राज्य शासन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने राजस्थानसाठी श्रमिक विशेष रेल्वे सोडण्याचे प्रस्तावित आहे. तरी जिल्ह्यात अडकलेल्या राजस्थानातील कामगार, मजूर, विद्यार्थी, व्यापारी अथवा अन्य व्यक्ती यांनी त्यांच्या राज्यात जाण्यासाठी आपली नावे संबंधित तालुक्यांच्या तहसिलदारांकडे दिनांक 22 मे 2020 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत नोंदवावीत असे आवाहन जिल्हाप्रशासनाने केले आहे. या प्रवाशांना त्यांच्या तालुक्यातील बस स्थानकावरुन वैद्यकीय तपासणी करुन एस.टी. बसने सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकावर आणण्यात येणार आहे. त्यांच्या या प्रवासाची सोय मोफत करण्यात येणार आहे. तसेच रेल्वे प्रवासही मोफत असणार आहे. तरी राजस्थानातील जे नागरिक त्यांच्या मुळ गावी जाऊ इच्छितात त्यांनी त्वरीत त्यांची नोंदणी संबंधीत तहसिलदारांकडे करावी असेही आवाहन जिल्हाप्रशासनाने केले आहे. 00000 जिल्ह्यातील आणखी एक रुग्ण कोरोना मुक्त -   ...

सिंधुदुर्गनगरी येथून धावली तिसरी श्रमिक विशेष रेल्वे मध्यप्रदेशातील 1 हजार 13 मजूर स्वगृही रवाना

Image
सिंधुदुर्गनगरी येथून धावली तिसरी श्रमिक विशेष रेल्वे मध्यप्रदेशातील 1  हजार 13 मजूर स्वगृही रवाना सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 21 –  लॉकडाऊन मुळे गेली दोन महिने   जिल्ह्यात अडकलेल्या मजूर, कामगार यांना त्यांच्या गावी जाता यावे यासाठी राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे आज तिसरी श्रमिक विशेष रेल्वे मध्यप्रदेशातील जबलपूरकडे रवाना झाली. जिल्ह्यातून एकूण 1 हजार 16 मजूर व कामगार या रेल्वेने त्यांच्या स्वगृही रवाना झाले. यावेळी मजूरांच्या चेहऱ्यावर समाधान व गावी जाण्याचा आनंद दिसून येत होता.             यावेळी प्रवाशांना जिल्हा प्रशासनाच्यवतीने सर्व कामगार व मजुरांची वैद्यकिय तपासणी करुन पाण्याची बाटली, मास्क, साबन व फुड पॅकेट्सचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 910 व रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कामगार व मजुरांना दुपारपर्यंत एस. टी. बसने सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकामध्ये आणण्यात आले. यामध्ये कुडाळ तालुक्यातील 96 व्यक्ती 7 बसगाड्यांमधून, देवगड तालुक्यातील 7 व्यक्ती 1...