Posts

Showing posts from March, 2025

पालकमंत्र्यांनी साधला जनतेशी संवाद जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर -पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी दिनांक 27 (जिमाका) :- सामान्य नागरिकाचं प्रश्न समजून घेऊन ते तात्काळ सोडविण्यासाठी 'पालकमंत्री कक्ष' सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी आणि त्या सोडविण्यासाठी आज मी 'पालकमंत्री कक्षा'त उपलब्ध आहे. यापुढेही आठवड्यातून किंवा पंधरा दिवसांतून एकदा मी 'पालकमंत्री कक्षा'त सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध राहणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील 'पालकमंत्री कक्षा'त जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी आपल्या तक्रारी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. यावेळी जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी, अपर पोलिस अधिक्षक तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित असल्याने सामान्य नागरिकांच्या तक्रारी तात्काळ सुटण्यास मदत झाली. 'पालकमंत्री कक्षा'त आपल्या समस्या सोडविण्यासाठी जिल्ह्यातील अनेक नागरिक आलेले होते. आपल्या समस्या घेऊन आलेल्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने काही वेळानंतर जिल्हा नियोजन सभागृहात तक्रारी स्विकारण्यात आल्या. अनेक तक्रारदारांच्या सम...

दुय्यम निबंधक कार्यालये 29 ते 31 मार्च रोजी सुरु राहणार

सिंधुदुर्गनगरी दिनांक 27 (जिमाका) :- आर्थिक वर्ष 2024-2025 या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्यासाठी सह दुय्यम निबंधक सिंधुदुर्ग व सर्व दुय्यम निबंधक कार्यालये दि. 29 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये सुरु ठेवण्याचे निर्देश नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे यांनी दिले आहे. अशी माहिती सह जिल्हा निबंधक प्राची घोलप यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. ०००००

नोंदणीकृत न्यासांच्या विश्वस्तांसाठी कार्यशाळेचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 25 (जिमाका) :- सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय व श्री दत्त मंदीर माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदणीकृत न्यासांचे विश्वस्तांसाठी दि. 1 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता श्री दत्त मंदीर माणगाव ता. कुडाळ येथे विश्वस्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. नोंदणीकृत न्यासांच्या सर्व विश्वस्तांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग विभागाचे सहायक धर्मादाय आयुक्त ए.जी. कुलकर्णी यांनी केले आहे. या कार्यशाळेस कोल्हापूरचे धर्मादाय सह आयुक्त निवेदीता पवार, सहायक धर्मादाय आयुक्त अवंतीका कुलकर्णी, कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराम नाईकवाडे, कोल्हापूरचे विधिज्ञ प्रविण कदम, सनदी लेखापाल जयंती कुलकर्णी यांचे मार्गदर्शन होणार आहे, असे सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाने प्रसिध्दीप्रकाव्दारे कळविले आहे. ००००००

उष्माघात व उष्माघात रुग्णांवर करावयाची उपाययोजना

सिंधुदुर्गनगरी दिनांक 25 (जिमाका) :- प्रामुख्याने प्रत्येक वर्षी एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये तापमानात वाढ झाल्यांने उष्माघात संभावतो. अशावेळी पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे. अतिजोखमीचे घटक :- 1) 65 वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्ती. 2) 1 वर्षाखालील व 1 ते 5 वयोगटातील मुले. 3) गरोदर माता. 4) मधुमेह व हृदयविकार तसेच अल्कोहोलीक व्यक्ती. 5) अतिउष्ण वातावरणामध्ये काम करण्याऱ्या व्यक्ती. उष्माघात होण्याची कारणे :- 1) उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे. 2) कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे. 3) जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे. 4) घट्ट कपड्यांचा वापर करणे, अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो. लक्षणे :- १) थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे. २) भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, पोटऱ्यात वेदना येणे अथवा पेटके येणे. ३) रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी व अस्वस्थता, बेशुध्दावस्था इत्याद...

दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे उद्घाटन भावी पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी ग्रंथालये सक्षम करू -पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी दिनांक 23 (जिमाका) :- पुस्‍तके अथवा ग्रंथ यांच्‍या सारखा दुसरा गुरु नाही, असे म्‍हटल्‍या जाते. सामाजिक, शैक्षणिक व सांस्‍कृतिक जीवन समृध्‍द करण्‍यासाठी तसेच वाचन संस्‍कृती वृध्‍दींगत करण्‍यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान महत्‍त्वाचे आहे. भावी पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी ग्रंथालये अधिक सक्षम करणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सिंधुदुर्गच्या वतीने दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन सिंधुनगरी येथील आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनामध्ये करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, मुबंई चे प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, मुबंई विभागाचे प्र. सहायक ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील, कोकण मराठी साहित्य परीषदेचे अध्यक्ष मंगेश मसके, जिल्हा ग...

को.म.सा.प.चे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन दुर्मिळ साहित्याचे जतन करुन ते जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक -पालकमंत्री नितेश राणे

• मालवणी भाषा भवन उभारणार •साहित्यांचे डिजिटायजेशन होणे आवश्यक • तरुणांनी वाचन संस्कृती जोपासावी सिंधुदुर्गनगरी दि. २२ (जिमाका) :- सिंधुदुर्ग जिल्ह्याची साहित्य संस्कृती फार मोठी आहे. या जिल्ह्याने अनेक साहित्यिक, लेखक घडविले आहेत. दुर्मिळ साहित्यांचे जतन करणे जेवढे आवश्यक असते तेवढेच ते साहित्य सर्वांसाठी उपलब्ध करुन जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचणेही गरजेचे आहे. या दोन्ही गोष्टी परस्परांना पूरक असून वाचनसंस्कृती टिकविण्यासाठी आवश्यक आहेत. पालकमंत्री म्हणून साहित्याचे जतन करून वाचक वाढविण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले. कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा आयोजित जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष गंगाराम गव्हाणकर, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, प्रांतअधिकारी हेमंत निकम आदी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले...

प्रशासक सभेमध्ये 21 प्रस्तावांपैकी 18 प्रस्ताव मंजूर

सिंधुदुर्गनगरी दिनांक 22 (जिमाका) :- जिल्हा परिषदेची प्रशासक सभेमध्ये 17 प्रस्ताव विषय पत्रिकेवर ठेवण्यात आले होते. तसेच आयत्यावेळी 4 विषय संबंधित खातेप्रमुख यांनी मांडले, असे एकूण 21 प्रस्तावांपैकी 18 प्रस्ताव मंजूर करण्यात आले. मंजूर प्रस्तावांबाबत जलदगतीने कार्यवाही करण्याच्या सूचाना प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबडुकर यांनी सूचना दिल्या आहेत. जे प्रस्ताव मंजूर करण्यात आले नाहीत, त्यांच्याबाबतीत पर्यायी व्यवस्था कशी करता येईल याबाबत विचार विनिमय करण्यात आला व त्यापध्दतीने पुढील कार्यवाही करण्याच्या सूचनाही सर्व खातेप्रमुखांना दिल्या. या स भेस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक, सर्व खातेप्रमुख, सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी व कनिष्ठ प्रशासन अधिकारी उपस्थित होते. मंजूर प्रस्तावांमध्ये प्रामुख्याने समाजकल्याण जिल्हा परिषद 20 टक्के सेस योजनेंतर्गत प्राप्त प्रस्तावांच्य यादीला मान्यता देण्याबाबत. (शिलाई मशिन, घरघंटी, स्मशानशेड, समाज मंदीर दुरुस्ती.) समाजकल्याण...

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींच्या पालकत्वाचे दाखले वाटप

सिंधुदुर्गनगरी दिनांक 19 (जिमाका) नॅशनल ट्रस्ट संकेतस्थळावरील दिव्यांग व्यक्तींच्या पालकत्वासाठी ज्यांनी ऑनलाईन अर्ज केले अशा तीन व्यक्तींना पालकत्वाचे दाखले जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी दिली आहे. नॅशनल ट्रस्ट संकेतस्थळावर दिव्यांग व्यक्तींच्या पालकत्वासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सोय शासनाने समाज कल्याण विभागामार्फत उपलब्ध करून दिली आहे. या कायद्याअंतर्गत ज्या व्यक्तींना मेंदूला पक्षाघात, मानसिक अपंगत्व, ओटीसम आणि मल्टिपल डिसॅबिलिटीज आहेत, फक्त त्यांच्या फायद्यासाठी हा कायदा आहे. भारतात अपंगत्व असलेल्या व्यक्तींचे आई-वडील आणि कुटुंबातल्या सदस्यांना असलेली सर्वात मोठी काळजी म्हणजे अशा प्रकारच्या व्यक्तींकरिता त्यांच्या जीवनकाळात तसेच जेव्हा त्यांची काळजी घेण्यासाठी आई-वडील नसतात तेव्हा अशा दिव्यांगांसाठी बऱ्याच समस्या निर्माण होत असतात. राष्ट्रीय ट्रस्ट कायद्याआधी अशा प्रकारची अपंगत्व असलेली मुले असलेल्या व्यक्तींना आपले मूल १८ वर्षाचे झाल्यानंतर त्याचे कायदेशीर पालक होण्याचा अधिकार नव्हता. त्यासाठी ...

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा

सिंधुदुर्गनगरी दिनांक 19 (जिमाका) केंद्र पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत (ULLAS Navbharat Saksharata Karykram) सन २०२२-२३ ते सन २०२६-२७ या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात रविवार दि. २३ मार्च २०२५ रोजी सकाळी १० ते सायं.५ वाजेर्यंत असाक्षर व्यक्तींसाठी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी चे (FLNAT) आयोजन करण्यात येत, असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (योजना) निलिमा भिकाजी नाईक यांनी दिली आहे. केंद्र शासन पुरस्कृत, "उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम" सन २०२२-२३ ते सन २०२६-२७ या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. देशातील १५ वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसीत करून देशातील १५ वर्ष आणि त्यावरील वयोगटातील असाक्षर व्यक्तींना महत्वपूर्ण जीवन कौशल्ये विकसित करावयाची आहेत. या कौशल्यांमध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरूकता, बालसंगोपन आ...

जिल्ह्यात 7 एप्रिलपर्यंत मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी, दि.२१ (जि.मा.का): जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार दिनांक 24 मार्च 2025 रोजी 00.01 वाजल्यापासून ते दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी 24.00 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला असल्याचे जिल्हादंडाधिकारी अनिल पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. जिल्ह्यात ३० ते ३१ मार्च २०२५ रोजी रमजान ईद असे सण उत्सव साजरे करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यापुर्वी राज्यात उत्सवाचे कालावधीत जातीय घटना घडलेल्या असून त्याचं पडसाद राज्यात उमटून विविध राजकिय पक्ष व संघटना आक्रमक झालेल्या आहेत. आगामी काळात त्यांचे पडसाद जिल्ह्यात उमटून जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात विविध संघटनेकडुन निवेदन, निषेध आंदोलन करण्यात येत आहेत. विविध समाजाचे लोक आरक्षणाचे मुद्यावरुन उपोषण, आंदोजने होत आहेत तसेच सोशल मिडियावर समाजकंटकांडून ध...

जागतिक वन दिनानिमित्त वृक्षारोपणांचा कार्यक्रम संपन्न

सिंधुदुर्गनगरी दिनांक 21 (जिमाका) :- जागतिक वन दिनानिमित्त सामाजिक वनीकरण, विभाग यांच्या मार्फत स्मृती उद्यान ओरोस या ठिकाणी जिल्हाधिकारी अनिल पाटील व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत बी. गायकवाड यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाले, असल्याची माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी राजेंद्र मगदूम यांनी दिली आहे. या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी राजेंद्र मगदूम, भूसंपादन उपजिल्हाधिकारी शारदा पोवार, निवडणूक उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, महिला व बाल विकास अधिकारी, सोमनाथ रसाळ, कोर्ट मॅनेजर, प्रशांत मालकर, सहा. वनसंरक्षक एल. व्ही. पोतदार, वनक्षेत्रपाल (प्रा.) संदिप कुंभार, मुख्य लेखापाल पी.एन. राठोड, वनपाल सुनिल सावंत, वनपाल दत्तगुरु पिळणकर, वनपाल व वनरक्षक शिवाजी लटके, सुरज बागुल, सामाजिक वनीकरणाचे कर्मचारी तसेच न्यू इंग्लिश स्कूल ओरोस शाळेतील हरित सेनेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी वृक्षलागवडीनंतर...

नव्याने दाखल कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

सिंधुदुर्गनगरी दिनांक 21 (जिमाका) :- शासनाचे महत्वाकांक्षी 100 दिवस कार्यक्रमांतर्गत सेवेत नव्याने दाखल कर्मचाऱ्यांकरीता प्रशिक्षण देण्याबाबत सूचना आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे एकूण 150 कर्मचाऱ्यांना दि.21 मार्च व 24 मार्च 2025 या दोन दिवशी प्रत्येकी 75 कर्मचाऱ्यांची एक तुकडी प्रमाणे एक दिवशीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) किशोर काळे यांनी दिली आहे. या प्रशिक्षणामध्ये सेवाविषयक बाबी आणि कृत्रिम बुध्दीमत्ता तंत्रज्ञान वापर AI या विषयावर प्रशिक्षण होणार आहे. त्यानुसार पहिल्या तुकडीचे उध्दाटन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज सभागृह सिंधुदुर्ग येथे करण्यात आले. कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) किशोर काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं) विशाल तनपुरे, यांनी प्रशिक्षण दिले. त्यानंतर कार्यालयीन कामकाज व झीरो पेन्डसी व ई- ऑफिस या विषयावर, सामान्य प्रशासन विभाग, सहा. प्रशासन अधिकारी दत्ता गायकवाड व प्रोजेक्ट लीड ऑफिसर शंकर बगाड,...

जागतिक क्षयरोग दिनानिमित विविध कार्यक्रमांचे आयोजन

जागतिक क्षयरोग दिनानिमित विविध कार्यक्रमांचे आयोजन सिंधुदुर्गनगरी दिनांक 21 (जिमाका) :- राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमातर्गत 24 मार्च हा "जागतिक क्षयरोग दिन" म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी दिली आहे. जागतिक स्तरावर दरवर्षी 24 मार्च हा दिवस क्षयरोगविषयी जनजागृती करण्यासाठी "जागतिक क्षयरोग दिन" म्हणुन साजरा करण्यात येतो. राज्यात 100 दिवस मोहिमेच्या निमित्ताने विविध प्रभावी प्रचार व प्रचार माध्यमांच्या वापर करून क्षयरोगाविषयी जनजागृती करण्यात आलेली आहे. जनजागृतीची व्याप्ती अधिक वाढविण्यासाठी ह्या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक क्षयरोग दिनानिमित्त 24 मार्च 2025 साठी "Yes!We can End TB:Commit,Invest,Deliver" हे इंग्रजीतून तर "होय आपण क्षयरोग निश्चित संपवू शकतो: प्रतिज्ञा करा, तरतुद करा, सेवा द्या" हे मराठीतून घोषवाक्य तयार केलेले आहे. या घोषवाक्यानुसार क्षयरोग संपविण्यासाठी सर्वांन...

23 आणि 24 मार्च रोजी साहित्य आणि सांस्कृतिक मेजवानी दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन • पालकमंत्री नितेश राणे यांचे हस्ते होणार उद्घाटन • छत्रपती शिवाजी महाराजांवर विशेष व्याख्यान

सिंधुदुर्गनगरी दिनांक 20 (जिमाका) :- वाचन संस्कृती जोपासण्यासाठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणांतर्गत प्रत्येक जिल्हयात ग्रंथोत्सव भरविण्यात येतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रंथालय संचालनालय, मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने 'सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव -2024' चे आयोजन करण्यात आले आहे. हा ग्रंथोत्सव रविवार दि.23 आणि 24 मार्च 2025 रोजी पत्रकार भवन ओरोस, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आला आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन मत्स्यवसाय व बंदरे विकास तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते रविवार दि. 23 मार्च रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. यावेळी लोकसभा सदस्य नारायण राणे, आमदार सर्वश्री ॲड निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, दिपक केसरकर, निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, मुबंई चे प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कविता शिंपी, मुबंई विभागाचे प्र. सहायक ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच...

विकास निधी परत जाता कामा नये - मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर

सिंधुदुर्गनगरी दिनांक 18 (जिमाका) :- जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या योजनांचा खर्च 31 मार्चपर्यंत 100 टक्के करावा. ज्या विभागाची योजना आहे, त्या विभागाने कार्यान्वयीन यंत्रणा या विभागाशी समन्वय ठेवून अनुदान खर्च करावे, शासकीय विकासाचा निधी कोणत्याही परिस्थितीत अपवादात्मक कारण वगळता शासनास परत करु नये, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी शासनाचा 100 दिवसाच्या कृती आराखड्याचा आणि आर्थिक वर्षाच्या अनुषंगाने सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. हे म्हणाले तालुका पातळीवरील निधी, पंचायत समिती सेस आणि शासकीय निधी 100 टक्के खर्च होण्यासाठी सर्व तालुका कार्यालयप्रमुख यांनी ठोस कार्यवाही करावयाची आहे. मार्चअखेर असल्याने कार्यालय प्रमुखांनी आवश्यकतेनुसार सुट्टीच्या दिवशी कार्यलय सुरु ठेवावे. अशा सूचना गटविकास अधिकारी यांना दिल्या. शासन निर्णयानुसार 100 दिवसाचा कृती आराखडा निश्चित केलेला आहे. या कार्यक्रमामधील विषयावर चर्चा करण्यात आली. कृति आराखड्यामध्ये दिलेल्या 10 विषयावर प्रत्येक विभागाने ठोस क...

दिव्यांग व्यक्तींची तक्रार निवारण सभा प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला

सिंधुदुर्गनगरी दिनांक 18 (जिमाका) :- ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 23 नुसार जिल्हास्तरांवर जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीची सभा प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला किंवा 15 तारखेला कार्यालयीन सुट्टी असल्यास लगतच्या कार्यालयीन दिवशी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे घेण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) किशोर काळे यांनी दिली आहे. तालुकास्तरावरील दिव्यांग व्यक्तींच्या तक्रार निवारणासाठी गट विकास अधिकारी पंचायत समिती यांना तक्रार निवारण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तालुकास्तरीय तक्रारकर्त्यांचे समाधान न झाल्यास संबंधित तक्रारकर्ते जिल्हास्तरावर अपिल अर्ज दाखल करु शकतात. त्याअनुषंगाने जिल्हा तक्रार निवारण समिती सभा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. जिल्हास्तरावरील दिव्यांग व्यक्तींचे तक्रार अर्ज पुढील सभेपूर्वी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथील सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करावे. याबाबत काही अडचण असल्यास सहाय्यक प्रशासन ...

परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरीदिनांक 12 (जिमाका) :-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्यविभागामार्फत अनुसूचित जाती, प्रवर्गातील 75 विद्यार्थ्यांना(मुला-मुलीना) दर वर्षी परदेशामध्ये अध्ययनासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजशिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. या योजनेसाठीजिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचेआवाहन समाज कल्याणचे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संतोषचिकणे  यांनी केले आहे.सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाची प्रक्रीया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांकडून परदेशशिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्याप्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी. साठी अद्ययावत (Qx WorldUniversity Ranking) 200 च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्येप्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूरकरण्यात येते. त्यापैकी 30 टक्के जागावर मुलीचीगुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी विहीत नमुन्यातील अर्जशासनाच्या www.maharashtra.gov.in  या अधिकृतसंकेतस्थळावरील ताज्या घडमोडी या लिंकवरुन डाऊनलोड करुन घ्यावा.  परिपूर्ण भरलेले अर्ज...

लेप्रोस्कोपीक स्त्री नसबंदी शस्त्राक्रिया शिबीर संपन्न

सिंधुदुर्गनगरी दिनांक 11 (जिमाका) :- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रिय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत लेप्रोस्कोपीक स्त्री नसबंदी शस्त्राक्रिया शिबीर महिला व बाल रुग्णालय कुडाळ व उप जिल्हा रुग्णालय कणकवली येथे संपन्न झाले, असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली आहे. राष्ट्रिय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याकरीता 1900 कुटुंब कल्याण शस्त्राक्रियांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले असून 1 हजार 34 एवढे 54 टक्के उद्दिष्ट पुर्ती झालेली आहे. कुटुंब कल्याण स्त्री नसबंदी शस्त्राकियांकरिता पात्र लाभार्थींची लेप्रेस्कोपीव्दारे नसबंदी करुन घेण्याकडे जास्त कल असतो. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला बाल रुग्णालय कुडाळ व उप जिल्हा रुग्णालय कणकवली येथे कुटुंब कल्याण स्त्री नसबंदी शस्त्राकिया शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. याकरिता डॉ.राजेश उबाळे,खाजगी वैदयकिय व्यवसायिक वेंगुर्ला यांनी उपस्थित राहून अनुक्रमे 12 व 8 असे एकूण 20 कुटुंब कल्याण स्त्री नसबंदी शस्त्राकिया केल्या. या शिबिरामध्ये मध्ये वेंगुर्ला,कुडाळ,कणकवली मधील पात्र लाभार्थी व त्यांचे प्...

अनंत मुस्कान अंतर्गत सहविकसन कार्यशाळा संपन्न

सिंधुदुर्गनगरी दिनांक 11 (जिमाका) :- हेलिस सेखसरिया इन्स्टिटयूट ऑफ पब्लिक हेल्थ, नवी मुंबई यांच्यावतीने अनंत मुस्कान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी 'सहविकसन कार्यशाळा' जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात येथे संपन्न झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली आहे. 'अनंत मुस्कान' भारतातील प्राथमिक शाळांमध्ये ब्रशने दात घासणे आणि तोंडाचे आरोग्य शिक्षण याबद्दल विविध राज्यांतील काही जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी करत आहे. या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधींची उपस्थिती कार्यशाळेस लाभली होती. या कार्यशाळेसाठी डॉ. उमेश शिरोडकर (Deputy director oral health, public health department maharashtra) हे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सहअध्यक्ष जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, अतिरिक्त जिल्हा शिक्षण अधिकारी रामचंद्र अंगणे, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, संचालक, हेलिस डॉ. मंगेश पेडणेकर आणि डॉ. खुशबू शर्मा (कार्यक्रम प्रमुख, अनंत मुस्क...

पी.एम.किसान एपीके लिंकचा वापर शेतकऱ्यांनी करु नये

सिंधुदुर्गनगरी दिनांक 10 (जिमाका) :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. प्रशानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी.एम. किसान योजना) अंतर्गत शेतकऱ्यांच्या मोबाईलवर PM Kisan List. APK किंवा Pm Kisan APK मेसेजची लिंक उघडतात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात असलेली रक्कम गायब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणून शेतकऱ्यानी मोबाईल वर पी.एम.किसान लिस्ट एपीके किंवा पी.एम.किसान एपीके या मेसेजची लिंक उघडू नये किंवा या लिंक चा वापर शेतकऱ्यांनी करु नये. अशी घटना घडल्यास किंवा आढळून आल्यास त्वरित जवळच्या संबंधित सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्यावतीने करण्यात येत आहे. ०००००

जिल्हाधिकारी कार्यालयातील 'पालकमंत्री कक्षा'चे उद्घाटन 'पालकमंत्री कक्षा' मुळे जनतेचे प्रश्न जलदगतीने सुटणार -पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी दि ०८ (जिमाका) सामान्य जनतेची प्रशासनाकडे अनेक कामे प्रलंबित असतात. सामान्य नागरिक जिल्हा मुख्यालयात कामानिमित्त आल्यावर त्याचे प्रश्न समजून घेऊन ते तात्काळ सोडविण्यासाठी 'पालकमंत्री कक्षा'ची स्थापना करण्यात आलेली आहे. जनतेची कामे अधिक गतीमान पध्दतीने व्हावीत हा या पालकमंत्री कक्ष स्थापनेमागचा मुख्य उद्देश आहे. हा कक्ष प्रशासन आणि सामान्य जनता यांच्यामधील दुवा म्हणून काम करणार असून या कक्षामुळे जनतेचे प्रश्न जलदगतीने सुटणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य इमारतीमध्ये 'पालकमंत्री कक्षा'ची स्थापना करण्यात आली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालय आणि परिसरातील कार्यालयांमध्ये सामान्य जनतेची अनेक कामे असतात. या कक्षाच्या माध्यमातून जनतेच्या तक्रारी आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्...

जिल्ह्यात 22 मार्चपर्यंत मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी, दि.७ (जि.मा.का): जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार दिनांक 8 मार्च 2025 रोजी 00.01 वाजल्यापासून ते दिनांक 22 मार्च 2025 रोजी 24.00 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला असल्याचे जिल्हादंडाधिकारी अनिल पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. जिल्ह्यात दि. २ मार्च २०२५ रोजीपासून रमजान मास प्रारंभ दि. १३ मार्च २०२५ रोजी होळी, दि. १४ मार्च २०२५ धुलिवंदन, दिनांक १७ मार्च २०२५ रोजी शिवजयंती (तिथीप्रमाणे), दि. ३० मार्च २०२५ रोजी गुढीपाडवा, दि. ३१ मार्च २०२५ रोजी रमजान ईद असे सण उत्सव साजरे करण्यात येणार आहे. विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यापूर्वी राज्यात उत्सवाचे कालावधीत अनुचित घटना घडलेल्या असून त्यांचे पडसाद राज्यात उमटून विविध राजकिय पक्ष व संघटना आक्रमक झालेल्या आहेत. आगामी काळात त्यांचे पडसाद जिल्ह्यात उमटून, तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकरता येत नाही. ...

दाजीपूर ते राधानगरी रस्ता 10 मार्च ते 30 एप्रिल पर्यंत वाहतुकीस बंद

सिंधुदुर्गनगरी दिनांक 7 (जिमाका) :- सिंधुदुर्ग जिल्हा हद्द ते दाजीपूर राधानगरी मुदाळतिट्टा- निढोरी-निपाणी कलादगी रस्ता रा.मा. क्र. 178 कि.मी. 66/00 ते 136/500 रस्त्याचे दुरुस्ती व नुतणीकरणाचे काम करण्यात येणार असल्याने दिनांक 10 मार्च ते 30 एप्रिल 2025 या 45 दिवसांच्या कालावधीसाठी दाजीपूर ते राधानगरी रस्ता मोटर वाहन कायदा 115 व 116 अन्वये जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व प्रकारच्या वाहतूकीस बंद करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. दाजीपुर ते राधानगरी मार्गावरील वाहतूक खाली नमुद केल्याप्रमाणे अन्य मार्गाने वळविण्यात येत आहे – दाजीपुर ते राधानगरी रस्त्यावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करुन हलक्या व लहान वाहनांकरीता वालिंगा- महे पाटी- कोते- धामोड- शिरगाव- तारळे- पडळी- कारीवडे- दाजीपुर रस्ता प्रजिमा 29 चा वापर करावा. तसेच अवजड व मोठी वाहतुक या रस्त्यावरुन पुर्णपणे बंद करुन कोकणातुन कोल्हापूरकडे येणारी अवजड वाहने फोंडा-कणकवली फाटा- नांदगाव- तळेरे- वैभववाडी- गगनबावडा मार्गे कोल्हापूर अशी वळविण्यात यावी. तसेच कर्नाटकातून येणारी अवजड वाहने कोकणामध्ये जाण्याकरीता आंबोली- आजरा- गडहिंग्लज व...

भारतरन्त डॉ. एपीजे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा 9 मार्च रोजी

सिंधुदुर्गनगरी दिनांक 7 (जिमाका) :- जिल्हा परिषद सिंधुदुर्गमार्फत आयोजित भारतरन्त डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा रविवार 9 मार्च 2025 रोजी जिल्ह्यातील एकूण 40 परीक्षा केंद्रावर संपन्न होणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. गणपती कमळकर यांनी दिली आहे. भारतरन्त डॉ. एपीजे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षासाठी इयत्ता चौथीची 21 परीक्षा केंद्र व सातवीची 19 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आलेली आहेत. ही परीक्षा मराठी, उर्दू व सेमी इंग्रजी माध्यमातून होणार आहे, पेपर क्रमांक 1 वेळ सकाळी 11 ते 12.30 वाजता तर पेपर क्रमांक 2 वेळ दुपारी 2 ते 3.30 अशी असणार आहे. या परीक्षेसाठी इयत्ता चौथी मधून 5 हजार 100 विद्यार्थी आणि सातवी मधून 2 हजार 207 विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. परीक्षेला प्रविष्ट झालेलया विद्यार्थ्यांनी त्या - त्या केंद्रावर सकाळी 10 वाजता उपस्थित राहावयाचे आहे. इयत्ता पाचवी व आठवीच्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी व्हावी, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचा व परीक्षांचा सराव व्हावा, स्पर्धात्मक अभ्यासाची सवय लगावी, विद्यार्थ्...

उष्माघातापासून बचावासाठी मार्गदर्शक सुचना

सिंधुदुर्गनगरी, दि.4 (जि.मा.का.) :- जिल्ह्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा मुंबई यांच्याकडून वर्तविण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत सुरु झालेला उन्हाळा आणि तापमानात होणारीवाढ लक्षात घेता नागरिकांनी उष्माघातापासून बचाव होण्याच्या दृष्टीने, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, शासनाकडून प्राप्त पुढील मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. काय करावे १) पुरेसे पाणी प्या तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या. २) घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा. ३) दुपारी बारा ते तीन वाजे दरम्यान घरा बाहेर जाणे टाळा. ४) सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा. ५) उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा . ६) हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. ७) प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. ८) उन्हात...

"पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे" लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.3 (जि.मा.का.) :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग आणि कणकवली कॉलेज कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. 5 मार्च 2025 रोजी कणकवली कॉलेज कणकवली येथे "पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे" आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त इ.सि. शेख यांनी केले आहे. जिल्हयातील तसेच जिल्हयाबाहेरील उद्योजकांकडे Accountant, Marketing Executive, Manager, Service Manager, Back Office, Carpenter, Front Office Assistant, Electrician, Mechanic, Fitter, Welder, Wireman, AC Repair अशी विविध पदे उपलब्ध आहेत. उद्योजक/आस्थापना दि. 05 मार्च 2025 रोजी "पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्या"त कणकवली कॉलेज कणकवली येथे उपस्थित राहून उमेवारांची Interview घेवून त्यांना त्याच ठिकाणी नियुक्तीपत्र देणार आहेत. या "पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात" कणकवली कॉलेज कणकवली येथे उपस्थित रह...

संपूर्ण दोडामार्ग तालुक्यात आणि सावंतवाडी तालुक्यातील 13 गावांमध्ये वृक्षतोडीस बंदी

सिंधुदुर्गनगरी, दि.3 (जि.मा.का.) :- उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील जनहीत याचिका मधील आदेशानुसार संपूर्ण दोडामार्ग तालुक्यात व सावंतवाडी तालुक्यातील एकूण 13 गावांमध्ये वृक्षतोडीस बंदी घातलेली असल्याची माहिती सावंतवाडी दोडामार्ग टास्क फोर्स समिती तथा सहाय्यक वनसंरक्षक (प्रादे. व कॅम्पा सावंतवाडी ) सदस्य सचिव वैभव बोराटे यांनी दिली आहे. अवैधरित्या होणाऱ्या वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सावंतवाडी – दोडामार्ग Task Force समिती तयार करण्यात आलेली आहे. या समिती मध्ये महसूल विभाग, वन विभाग व पोलीस विभाग मधील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या सावंवाडी – दोडामार्ग Task Force समितीचे अध्यक्ष हे उपविभागीय अधिकारी सावंतवाडी असून सदस्य सचिव सहाय्यक वनसंरक्षक हे आहेत. त्याचबरोबर या समितीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार सावंतवाडी, दोडामार्ग हे सदस्य आहेत. ही समिती उच्च न्यायालयाकडील आदेशानुसार वृक्षतोडीस प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये संबंधित विभागांनी वृक्षतोडीस प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने केलेली कार्यवाही, प्रचार- प्रसिध्दी व प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाह...