सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत दक्षता व गुणनियंत्रण प्रयोगशाळा सुरू - कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड

सिंधुदुर्गनगरी, दि.1 (जि.मा.का.) ओरोस येथील शासकीय विश्रामगृह येथे सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत दक्षता व गुणनियंत्रण प्रयोगशाळा सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नाने आज 1 जूनपासून सुरू झाली आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी दिली. शासकीय विश्रामृह परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षता व गुणनियंत्रण प्रयोगशाळेचे उद्घाटन काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र, अधिकारी व काही तांत्रिक बाबीमुळे या प्रयोगशाळेचे कामकाज सुरू होऊ शकले नव्हते. सिंधुदुर्गमधील ठेकेदारांना कामाच्या टेस्टींगबाबत रत्नागिरीला जावे लागत असल्याने, ही प्रयोगशाळा सुरू होणे गरजेचे होते. त्यानुसार प्रयोगशाळेचे प्रत्यक्षात काम सुरू व्हावे, यासाठी पाठपुरावा सुरु होता. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी विशेष लक्ष घातल्याने या प्रयोगशाळेचे काम सुरू झाले आहे. येथे उपअभियंता श्री.सय्यद व श्री.चौधरी हे कामकाज पाहणार आहेत. जिल्ह्यातील ठेकेदारांना आता टेस्टींगसाठी रत्नागिरीला जाण्याची गरज भासणार नाही. याबाबत ठेकेदारांमधूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'