महसूल सप्ताहाचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी, दि.28 (जि.मा.का.) : महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत राज्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा. त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा, यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने यावर्षी 1 ऑगस्ट महसूल दिनापासून दि.7 ऑगस्ट 2023 या कालावधीत 'महसूल सप्ताह 'साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषगाने जिल्ह्यात पुढीलप्रमाणे तहसिल व उपविभागीय कार्यालयात महसूल सप्ताहाचे अयोजन करण्यात आलेले असून जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या सप्ताहामध्ये राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांतर्गत योजनाचा जास्तीत जास्त लाभ घ्याण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. 1 ऑगस्ट 2023 रोजी महसूल दिन साजरा व महसूल सप्ताह शुभारंभ. दि.2 ऑगस्ट रोजी युवा संवाद. दि.3 ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा. दि.4 ऑगस्ट रोजी जनसंवाद. दि.5 ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी.दि. दि. 6 ऑगस्ट...