Posts

Showing posts from October, 2024

जिल्हा निवडणूक अधिकारी यांची मिडिया कक्षाला भेट माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीने जाहिरात व पेडन्यूज खर्चावर काटेकोर लक्ष ठेवावे -जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील

सिंधुदुर्गनगरी दि.३१ (जिमाका) आचारसंहिता काळात माध्य कक्षाचे आणि विशेषत: माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे कार्य महत्वाचे आहे. या समितीद्वारे राजकीय जाहिरातीचे प्रमाणिकरण करणे, जाहिरातींवर होणाऱ्या खर्चाची माहिती नियमितपणे खर्च विभागाला सादर करणे एमसीएमसीची मुख्य जबाबदारी असून याकडे बारकाईने लक्ष देण्याचे आवाहन सिंधुदुर्गचे जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालयाने स्थापन केलेल्या मिडिया कक्ष आणि माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण कक्षाला ( एमसीएमसी ) त्यांनी आज भेट दिली. श्री पाटील म्हणाले, उमेदवार मुद्रित माध्यमांसह दृकश्राव्य माध्यम, समाज माध्यमांवर देखील मोठ्या प्रमाणात जाहिरात करत असतात. या माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या जाहिराती, बातम्या, पोस्ट, पेड न्यूज आहेत का यावर काळजीपूर्वक लक्ष ठेवणे आवश्यक आहे. महत्वाचे म्हणजे निवडणूक आचारसंहिता कालावधीत मुद्रित, इलेक्ट्रॉनिक तसेच समाज माध्यमांमध्ये काही आक्षेपार्ह मजकूर आढळल्यास तात्काळ जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यावे असेही ते म्हणाले. एमसीएमसीचे ...

जिल्ह्यात 14 नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी, दि.३० (जि.मा.का): जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार दिनांक 31 ऑक्टोबर 2024 रोजी 00.01 वाजल्यापासून ते दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी 24.00 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला असल्याचे जिल्हादंडाधिकारी अनिल पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. जिल्ह्यात विधानसभा निवडणुक २०२४ च्या राजकीय पक्षाच्या बैठका, तसेच वैयक्तीक व सामाईक मागणीकरीता उपोषणे मोर्चा, संप, निदर्शने, रस्ता रोको वगैरे सारखे आंदोलनात्मक कार्यक्रमांचे वेळोवेळी नियोजन करण्यात येते अशावेळी आंदोलनकर्ते यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी विधानसभा निवडणुक २०२४ करीता जाहीर सभा, कॉर्नर सभा, कार्यकर्ता बैठक, मेळावे, सण उत्सव, तसेच होणारी उपोषणे, मोर्चा, संप, निदर्शने, रस्ता रोको या सारख्या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कोठेही अनुचित प...

जिल्हाधिकारी यांनी बालगृहातील मुलांसमवेत केली दिपावली साजरी मुलांचा आनंद गगनात मावेना … चेहऱ्यावर फुलले हास्य

सिंधुदुर्गनगरी, दि.30 (जि.मा.का): बालगृहातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांच्या सोबत जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिवाळी सण साजरा केला. दिपावली हा सण अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा उत्सव असून मुलांसोबत दिवाळी साजरी करतांना मला खुप आनंद झाल्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील म्हणाले. जिल्हाधिकारी यांनी बालगृहातील बालकांच्या समवेत दिवाळीचा सण मोठ्या आनंदाने साजरा करुन संस्थेतील बालकांना व कर्मचांऱ्या शुभेच्छा दिल्या. दिपावली सणाचे औचित्य साधून संस्थेतील बालकांचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी बालकांच्या सोबत दिपावली फराळाचा आस्वाद घेवून बालकांचा आनंद व्दिगुणीत केला. यावेळी संस्थेतील सर्व बालके उत्साही व आनंदी झाली. जिल्हाधिकारी यांनी बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कर्मचारी हे सामाजिक भावनेतून योगदान देत असल्याने सर्वांचे कौतुक करुन समाधान व्यक्त केले. संसथेतील आयोजित कार्यक्रमामध्ये ओरोस सिधुदुर्ग येथील संगीत विशारद श्री. संजय दळवी व सहकारी यांच्यामार्फत बालकांसाठी संगीत भजन व गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख...

निवडणूक निरीक्षक परवीन कुमार थिंद जिल्ह्यामध्ये दाखल

सिंधुदुर्गनगरी, दि.30 (जि.मा.का): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता जिल्ह्यातील 268- कणकवली, 269- कुडाळ, 270- सावंतवाडी या तीन विधानसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निरीक्षक (General Observer) परवीन कुमार थिंद (भा.प्र.से) जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहेत. त्यांचे वात्सव्य एम.आय.डी.सी.विश्रागृह कुडाळ येथे असून त्यांचा मोबा. 9359614815 आणि ई-मेल आयडी gen.observer.sindhu2024@gmail.com असा आहे. 0000

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघनिहाय दाखल नामनिर्देशन पत्रांची माहिती

268 कणकवली अ.क्र उमेदवाराचे नाव राजकीय पक्ष /अपक्ष 1 श्री. नितेश नारायण राणे भारतीय जनता पार्टी 2 श्री. नितेश नारायण राणे भारतीय जनता पार्टी 3 श्री. गणेश अरविंद माने अपक्ष 4 श्री. बंदेनवाझ हुसेन खानी अपक्ष 5 श्री. संदेश भास्कर पारकर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) 6 श्री. संदेश सुदाम परकर अपक्ष 7 श्री. प्रकाश दत्ताराम नारकर अपक्ष 8 श्री. चंद्रकांत आबाजी जाधव बहुजन समाज पार्टी 9 श्री.विश्वनाथ बाबू कदम अपक्ष 269 कुडाळ अ.क्र उमेदवाराचे नाव राजकीय पक्ष / अपक्ष 1 श्री. वैभव विजय नाईक शिवसेना, (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) 2 श्री. वैभव विजय नाईक शिवसेना, (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) 3 श्री. निलेश नारायण राणे शिवसेना 4 श्री. निलेश नारायण राणे शिवसेना 5 श्री. रविंद्र हरिश्चंद्र कसालकर बहुजन समाज पार्टी 6 श्रीम. उज्वला विजय येळाविकर राष्ट्रीय समाज पक्ष 7 श्री. वैभव जयराम नाईक अपक्ष 8 श्री. वैभव विजय नाईक शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) 9 श्रीम. स्नेहा वैभव नाईक अपक्ष 10 श्री. अनंतराज नंदकिशोर पाटकर महाराष्ट्र स्वराज्य पक्ष 11 श्री. प...

निवडणूक खर्च निरीक्षक श्रीम. दिव्या के.जे जिल्ह्यामध्ये दाखल

सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता जिल्ह्यातील 268- कणकवली, 269- कुडाळ, 270- सावंतवाडी या तीन विधानसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेले निवडणूक खर्च निरीक्षक (Expenditure observer) श्रीम. दिव्या के.जे जिल्ह्यामध्ये दाखल झालेल्या आहेत. त्या शासकीय विश्रागृह, ओरोस येथे वास्तव्यास असून त्यांचा मोबा. 9359688515 आणि ई-मेल आयडी exp.observer.sindhudurg2024@gmail.com असा आहे. 0000

जिल्ह्यात 29 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरपर्यंत यलो अलर्ट

सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का): जिल्ह्यात दि. 29 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2024 या कालावधीत यलो अलर्ट असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने कळविले आहे. या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून 30 ते 40 किमी प्रती तास वेगाने वारे वाहणार आहेत. तसेच ढगांचा गडगडाट होवून विजा चमकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. या कालावधीत विजा चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनी चा वापर टाळावा. विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब रहावे. विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्...

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी

सिंधुदुर्गनगरी दिनांक 29 (जिमाका) : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि. 2 ते 11 डिसेंबर 2024 या कालावधीत कोर्स (SSB) क्र. 59 आयोजित करण्यात येत आले असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली आहे. या कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थींना नि:शुल्क प्रशिक्षण निवास व भोजन दिले जाते. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे दि. 27 नोव्हेंबर 2024 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईट वर सर्च करुन त्यामधील SSB-५९ कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे. एस. एस. बी. वर्गामध्ये प्रवे...

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा राज्य शासनाकडून गौरव उत्कृष्ट जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखड्याचा मान

सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का): जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२४-२५ चा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करण्यात आला. या आराखड्यास राज्य शासनाकडून उत्कृष्ट जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा म्हणून गौरविण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे संचालक सतीश कुमार खडके (भा.प्र.से) यांच्या स्वाक्षरीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांना प्रशस्तीपत्र (letter of appreciation) देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार सर्व जिल्ह्यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करण्याचे निर्देश राज्य शासनाकडून प्राप्त झालेले होते. या पार्श्वभूमीवर व्यवस्थापन आराखड्याच्या अमंलबजावणीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे व जिल्हा...

गोवा राज्यातील स्थिर सर्वेक्षण पथकाचे (SST) प्रशिक्षण स्थिर सर्वेक्षण पथकाने वाहनांची कसून तपासणी करण्याचे निर्देश

सिंधुदुर्ग, दिनांक २८ ऑक्टोबर(जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचारसंहितेच्या अंमलबाजावणीस सुरुवात झाली आहे. आपला जिल्हा दोन राज्याच्या सीमेलगत असल्याने विशेषत: सिमेलगत असणाऱ्या स्थिर सर्वेक्षण पथकाने वाहनांची कसून तपासणी करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिले. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गोवा राज्याने महाराष्ट्राच्या सीमेलगत कार्यान्वीत केलेल्या स्थिर सर्वेक्षण पथक (SST) टिमचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रवी पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, जिल्हा खर्च सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी डॉ. शिवप्रसाद खोत व त्यांची टिम उपस्थित होती. सदर प्रशिक्षणामध्ये जिल्हा खर्च सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी डॉ. शिवप्रसाद खोत यांनी गोवा राज्यातील SST टिम यांना निवडणूक खर्च संनियंत्रण या वरील अनुदेशांचा सारसंग्रहामध्ये नमूद करण्यात आलेल्या निर्देशानुसार काम करण्याबाबत सवि...

जिल्हा माहिती कार्यालयनिर्मित विधानसभा निवडणूक पूर्वपीठिकेचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते प्रकाशन माध्यमांना तसेच राजकीय विश्लेषकांना पूर्वपीठिका संदर्भ म्हणून उपयुक्त

सिंधुदुर्ग, दिनांक २८ ऑक्टोबर(जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाची पूर्वपीठिका तयार केली आहे. या पूर्वपीठिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते आज संपन्न झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या प्रकाशन समारंभास निवडणूक खर्च निरीक्षक श्रीम दिव्या के.जे., जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्री शेवरे, खर्च नियंत्रण समिती नोडल अधिकारी शिवप्रसाद खोत, श्री मेश्राम, पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री.पाटील म्हणाले की, या निवडणूक प्रक्रियेत शासनाचा प्रत्येक विभाग सहभागी होत असून निवडणूक हे एक टीम व...

नामनिर्देशन पत्र 22 ते 29 ऑक्टोबरपर्यंत स्विकारले जाणार

सिंधुदुर्गनगरी, दि.21 (जि.मा.का): भारत निवडणूक आयोग, दिल्ली यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 269 कुडाळ विधानसभा मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यानुसार दिनांक 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर या कालायवीत सकाळी 11 पासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कुडाळ यांच्या दालनात स्विकारली जाणार आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नामनिर्देशनपत्रे भरतेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी 269 कुडाळ विधानसभा मतदार संघाचे कार्यालयाच्या 100 मीटरच्या परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्रक दाखल करणाऱ्या इच्छूक उमेदवार किंवा त्यांच्या सोबतच्या व्यक्तींच्या वाहनाची संख्या जास्तीस जास्त 3 एवढी निश्चित करण्यात येत आहे. नामनिर्देशन पत्र भरतेवेळी उमेदवारासह 5 व्यक्तींना निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात येत आहे. दिनांक 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर 2024 या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत 100 मीटरच्या परिसरात कुठलीही खाजगी आस्थापना सुरु ठेवू नयेत. नागर...

मुद्रणालय चालकांनी माहिती देणे बंधनकारक

सिंधुदुर्गनगरी, दि.21 (जि.मा.का): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 निवडणूक कालावधीत मुद्रणालयामध्ये विषयांकित कोणत्याही प्रकारचे मुद्रण होत असेल तर त्याची माहिती मुद्रणालय चालकाने निवडणूक कार्यालय सिंधुदुर्ग यांना देणे बंधनकारक असल्याची माहिती जिल्हा खर्च सनियंत्रण समितीचे समन्वय अधिकारी अमित मेश्राम यांनी दिली आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 कलम 127 (क) नुसार कोणतीही व्यक्ती मुद्रक व प्रकाशकाचे नाव व पत्ता नमूद केल्याशिवाय आणि दोन व्यक्तींनी साक्षांकित केलेल्या प्रकाशकाकडून प्रतिज्ञापत्र घेतल्याशिवाय कोणतेही निवडणूक पत्रके किंवा भित्तीपत्रक, हस्तपत्रके किंवा अन्य कागदपत्रांचे मुद्रोत करणार नाही किंवा प्रकाशित करणार नाही किंवा मुद्रीत करण्याची किंवा प्रकाशित करण्याची व्यवस्था करणार नाही. कागदपत्रांच्या मुद्रणानंतर वाजवी वेळेत कागदपत्रांच्या प्रतींसह प्रतिज्ञापत्राची प्रत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यास / मुख्य निवडणूक अधिकाऱ्यास देण्याची जबाबदारी अशा मुद्रणालयाची आहे. ०००००

निवडणूक खर्च संनियंत्रण यंत्रणा कार्यान्वित

सिंधुदुर्गनगरी, दि.22 (जि.मा.का): जिल्ह्यामध्ये दिनांक 15 ऑक्टोंबर 2024 पासून निवडणूक आदर्श आचारसंहिता अंमलात येऊन विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची प्रक्रीया सुरु झालेली आहे. निवडणूकीचे पावित्र्य राखण्यासाठी तसेच खुल्या, पारदर्शक आणि शांततापूर्ण वातावरणात निपक्षपणे निवडणूका पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रीयेच्या दरम्यान विविध राजकीय पक्ष, उमेदवार, त्याचे प्रतिनिधी यांच्याकडून केल्या जाणाऱ्या निवडणूक विषयक खर्चाचे सक्त संनियंत्रण करण्यासाठी जिल्ह्यामध्ये भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार समुचित निवडणूक खर्च संनियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेल्या असल्याची माहिती जिल्हा खर्च सनियंत्रण समिती समन्वय अधिकारी अमित मेश्राम यांनी दिली आहे. विधानसभा निवडणूक खर्च संनियंत्रण प्रक्रीयेचा एक भाग म्हणून निवडणूकीच्या प्रक्रियेदरम्यान, मतदान संघामध्ये प्रचारावर बेसुमार खर्च, रोख रक्कमेत किंवा इतर प्रकारे लाच म्हणून वस्तूंचे वाटप करणे, बेकायदेशीर हत्यारे, दारुगोळा, मद्य यांची वाहतूक किंवा समाजकंटक यांवर लक्ष ठेवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी स्थिर संनिरीक्षण पथके...

निवडणूक खर्च निरीक्षक श्रीम. दिव्या के.जे जिल्ह्यामध्ये दाखल

सिंधुदुर्गनगरी, दि.22 (जि.मा.का): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता जिल्ह्यातील 268- कणकवली, 269- कुडाळ, 270- सावंतवाडी या तीन विधानसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेले निवडणूक खर्च निरीक्षक (Expenditure observer) श्रीम. दिव्या के.जे जिल्ह्यामध्ये दाखल झालेल्या आहेत. त्या शासकीय विश्रागृह, ओरोस येथे वास्तव्यास असून त्यांचा मोबा. 9359688515 आणि ई-मेल आयडी exp.observer.sindhudurg2024@gmail.com असा आहे. 0000

मनाई आदेश लागू

सिंधुदुर्गनगरी, दि.22 (जि.मा.का): निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे 269 कुडाळ विधानसभा मतदार संघाकरीता विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटार गाड्या वाहने यांचा समावेश नसावा अशा निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक कुडाळ यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता प्रक्रिया संहीता 2023 चे कलम 163 नुसार मनाई आदेश लागू करण्याची विनंती केली आहे. तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालनात पाच व्यक्ती उपस्थित राहतील या व्यतिरिक्त कोणालाही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात प्रवेश दिला जाणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा...

सुवर्ण महोत्सवी योजनेअंतर्गत अनुदान घेणाऱ्या शहीद जवानांच्या पत्नी हयातीचा दाखल सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 23 (जिमाका) : सुवर्ण महोत्सवी योजनेअंतर्गत अनुदान घेणाऱ्या शहीद जवानांच्या पत्नी यांनी दरवर्षीप्रमाणे त्या हयात असल्याबाबतचा दाखला संबंधित बँक, सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडून सही व शिक्यासह प्राप्त करुन घेऊन त्यासोबत माजी सैनिक विधवा पत्नी ओळखपत्र व बँक पासबुकच्या छायांकीत प्रतीसह या कार्यालयात दिनांक 20 नोव्हेंबर 2024 पर्यत सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. जिल्ह्यातील 7 शहीद जवानांच्या पत्नी यांना सुवर्ण महोत्सवी योजनेअंतर्गत जिल्हा सैनिक कार्यालय,सिंधुदुर्ग यांच्याकडून दरमहा अनुदान अदा करण्यात येते. या लाभार्थी हया वयोवृध्द असल्याने शासनाच्या नियमानुसार वर्षातून प्रत्येक सहा महीन्याने दि. 31 मे व 30 नोव्हेंबर हयातीचे दाखले घेऊनच अनुदान अदा करण्याचे निर्देश आहेत. हयातीचे दाखले दिलेल्या मुदतीत या कार्यालयास प्राप्त न झाल्यास दिनांक 1 डिसेंबर 2024 पासून त्यांचे मासिक अनुदान दाखला प्राप्त होईपर्यंत तात्परत्या स्वरुपात स्थगित करण्यात येईल यांची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी या कार्यालयाचा दुरध्वनी क्र.02362 228820,9322051...

बेळगावी येथे माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 23 (जिमाका) : जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी, वीरमाता, वीरपिता यांनी 15 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 8.30 ते सायं.4 वाजेपर्यंत दि मराठा लाइट इन्फट्री सेंटर, बेळगावी येथील शिवाजी स्टेडीयमवर माजी सैनिक मेळाव्याचे (ESM Rally) आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली आहे. या मेळाव्यात विविध Records Office ची पथके, वैद्यकीय पथके उपस्थित राहणार आहेत. ही पथके सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी, वीरमाता, वीरपिता यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या निवृत्तीवेतन, माजी सैनिकांच्या पत्नी, वारसाच्या नावात बदल, ECHS Cards,Sparsh प्रणाली, बँकेशी निगडीत अडचणी, आधार कार्ड व त्यासंबंधी इतर अडी-अडीचणींचे निरसन करणार आहेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 02362-228820/9420300620 वर संपर्क करावा. जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी, वीरमाता यांच्या निवृत्तीवेतन, माजी सैनिकांच्या पत्नी, वारसाच्या नावात बदल ECHS Cards,Sparsh प्रणाली, बँकेशी निगडीत अडचणी, आधार कार्ड व त्यासंबंधी अडचणी असल्या...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ समाज माध्यमांवर मीडिया कक्षाच्या माध्यमातून राहणार करडी नजर इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियावरील जाहिराती प्रमाणित करून घेणे आवश्यक

सिंधुदुर्गनगरी, दि.23 (जि.मा.का): विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २६८- कणकवली, २६९- कुडाळ आणि २७० सावंतवाडी विधानसभा मतदार संघासाठी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती (एमसीएमसी) ची स्थापना करण्यात आली आहे. निवडणूक लढविणारे उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, राजकीय पक्ष यांनी समाज माध्यमांवर निवडणूक प्रचारासंबंधित जाहिरातींचे प्रमाणीकरण करून घेण्यासाठीविहित नमुन्यातील अर्ज कार्यालयीन वेळेत सादर करावा. असे आवाहन मिडीया सेंटरचे नोडल अधिकारी तथा जिल्हा माहिती अधिकारी श्री. मुकुंद चिलवंत यांनी केले आहे. जिल्हा माहिती कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या कक्षाच्या माध्यमातून ही समिती मुद्रित, दृकश्राव्य व सर्व प्रकारच्या समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या पेड, फेक न्यूज, द्वेष व दिशाभूल करणाऱ्या पोस्ट/बातम्यांवर बारीक नजर ठेवत आहे. तसेच राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार यांना समाज माध्यमांवर निवडणूक प्रचारासंबंधित जाहिरातींचे प्रमाणीकरण करून देण्याचे कार्य सुद्धा ही समिती करणार आहे. निवडणुकीचा काळ असल्यामुळे आदर्श आचारसहिंता...

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची आकाशवाणीवर मुलाखत

सिंधुदुर्गनगरी, दि.23 (जि.मा.का): विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन करत असलेल्या तयारीची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आकाशवाणीवरुन मुलाखतीच्या माध्यमातून दिली आहे. ही मुलाखत गुरूवार दि २४ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ५:३० वाजता आकाशवाणीच्या सिंधुदुर्गनगरी केंद्रावरुन (१०३.६ मेगाहार्टझ्‍) प्रसारित होणार आहे. तसेच News On AIR या ॲपवर देखील प्रसारीत होणार आहे. ही मुलाखत कार्यक्रम अधिकारी श्रीपाद कहाळेकर यांनी घेतलेली आहे. तरी जास्तीत जास्त प्रेक्षकांनी ही मुलाखत ऐकण्याचे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आलेले आहे. या निवडणुकीमध्ये मतदानाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन करत असलेली तयारी, मतदार संख्या, मतदान केंद्रे, ‘स्विप’ या उपक्रमांतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम, नवमतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग तसेच जनतेला केलेले आवाहन याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. 0000000

विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामार्फत शिष्यवृत्ती, फ्रीशीप योजनेचे प्रस्ताव ३० नोव्हेंबरपर्यंत ऑफलाइन पद्धतीने सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 24 (जिमाका) : शैक्षणिक वर्ष २०१८-१९ ते २०२३-२४ मधील अनु. जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामार्फत शिष्यवृत्ती, फ्रीशीप योजनेचे प्रस्ताव दि. ३० नोव्हेंबर २०२४ अखेर ऑफलाइन पद्धतीने सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे. महाडीबीटी संकेतस्थळारील शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित राहिलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी महत्त्वाचा बदल राज्य शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०१८-१९ ते २०२३-२४ मधील ज्या अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत, व सदर वर्षी त्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. अशा अनु. जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामार्फत ऑफलाइन पद्धतीने शिष्यवृत्ती किंवा फ्रीशीप योजनेचे अर्ज, प्रस्ताव सादर करण्यास दि.३० नोव्हेंबर, २०२४ अखेर शासनाने मुदत दिली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील दि.१५ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या शासननिर्...

पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 9 फेब्रुवारी रोजी

सिंधुदुर्गनगरी दिनांक 24 (जिमाका) : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ 8वी) दिनांक 09 फेब्रुवारी 2025 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in आणि https://www.mscepuppss.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी आवेदन पत्र ऑनलाईन पध्दतीने भरण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. गणपती कमळकर यांनी केले आहे. शाळा माहिती प्रपत्र, नियमित शुल्कासह ऑनलाइन आवेदन पत्र भरण्याचा कालावधी दिनांक 17 ओक्टोबर 2024 ते 30 नोव्हेंबर 2024 असा आहे. शाळा माहिती प्रपत्र, विलंब शुल्कासह ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याचा कालावधी दिनांक 1 डिसेंबर 2024 ते 15 डिसेंबर 2024 असा आहे. शाळा माहिती प्रपत्र, अतिविलंब शुल्कासह ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याचा कालावधी दिनांक 16 डिसेंबर 2024 ते 23 डिसेंबर 2024 असा आहे. शाळा माहिती प्रपत्र, अति विशेष विलंच शुल्कासह ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याचा कालावधी दिनांक 24 डिसेंबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 असा आ...

जिल्हयामध्ये प्रौढ बीसीजी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ 18 वर्षावरील नागरिकांना मिळणार बीसीजी लस आरोग्य विभागाची मोहिम जिल्ह्यातील आठ तालुक्यात लसीकरण सुरुवात

सिंधुदुर्गनगरी 1 (जि.मा.का) :- क्षयरोग दुरीकरण करण्याचे राष्ट्रीय ध्येय साध्य करण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने 18 वर्षावरील जोखमीच्या गटातील लोकांना बीसीजी लस देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात साठ वर्ष वय असलेली व्यक्ती, बी एम आय 18 पेक्षा कमी असणे, मधुमेही व्यक्ती, स्वयंघोषित सध्या किंवा पूर्वी धुम्रपान करणारे व्यक्ती, जानेवारी 2021 पासून सक्रिय टीबी रुग्णांच्या संपर्कात असणारे जवळील सहवासित, मागील 5 वर्षात टीबी झालेल्या व्यक्ती अशा सहा निकषात बसणाऱ्या 60 हजार 942 पात्र नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरणाची मोहिम हाती घेण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई रुपेश धुरी यांनी दिली आहे. संपुर्ण महाराष्ट्रत 2025 पर्यंत क्षयरोग दुरीकरण करण्याचे राष्ट्रीय ध्येय ठेवले आहे. त्या अनुषंगाने राज्य क्षयरोग विभाग, लसीकरण विभाग व आयसीएमआर यांच्या वतीने बीसीजी लसीकरण जिल्हयातील आठ तालुक्यात सुरु करण्यात आले आहे. बीसीजी लस ही लहान मुलांप्रमाणे प्रौढांसाठीही उपयुक्त ठरत असुन इतर आजांरांविरोधातही लस परि...

जागतिक ह्दय रोग दिन व जागतिक वृध्दापकाळ दिन संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि.1 (जि.मा.का.) : जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जागतिक हृदय रोग दिन व जागतिक वृध्दापकाळ दिन संपन्न झाला, असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली आहे. जागतिक हृदय रोग दिनानिमित्त एनसीडी स्टाफ नर्स तृप्ती जाधव यांनी हृदय रोगाची लक्षण तसेच हृदय रोगाची कारणे या बाबत उपस्थित लाभार्थ्यांना विस्तृत माहिती दिली. तसेच एनसीडी कार्यक्रमांच्या माध्यमातून जिल्हा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालये, प्रा. आ. केंद्र व उपकेंद्र याठिकाणी लाभार्थ्यांनी उच्चरक्तदाब, मधुमेह, तमेष मुखाचा कॅन्सर, गर्भाशय मुखाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर या बाबतची तपासणी केली जाते या विषयी माहिती दिली. एनसीडी कार्यक्रम अंतर्गत नव्याने स्टेमी कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र , उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे लाभार्थोकरीता ईसीजी निशूल्क स्वरुपात काढले जातात. जागतिक वृध्दापकाळ दिन कार्यक्रमाचे उद्‌द्घाटन डॉ. सुबोध इंगळे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क गट-अ) यांच्या हस्ते करण्यात आले. जेष्ठ नागरिक दिनानिमित्त एनपीएचसीई स्टाफ नर्स अनिता बिबवणेकर यांनी जेष्ठ नागरीकांच्या...

संवेदनशील क्षेत्र घोषित गावांना आक्षेप नोंदविण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.1 (जि.मा.का.) : केंद्र शासनाचे पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशीन क्षेत्र घोषित करण्यासाठी क्र. So३०६० (इ) दि.31 जुलै 2024 अन्वये मसूदा अधिसूचना जारी केलेली आहे. सदर अधिसूचना https://egazette.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रस्तूत मसूदा अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यातील 13 जिल्हे व 56 तालुके अंतर्गत 2515 गावांचे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे. त्यापैकी सिधुदुर्ग जिल्ह्यातीत सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, देवगड, वैभववाडी या 5 तालुक्यातील 198 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. राज्यातील पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केल्यास ज्या स्थानिक रहिवासीना त्याचा परिणाम होणार आहे, त्यांनी Environment Protection Act, 1986 व नियम 1986 मधील तरतूदीनुसार त्यांचे आक्षेप 60 दिवसांच्या आत केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड, नवी दिल्ली- 110003 यांचेकडील esz-mef@nic.in या ईमेल आयडीवर आक्षेप नोंदविणे आवश्यक आहे. ०००००

नोंदणीकृत सेवा सोसायट्यांनी 3 ऑक्टोबरपर्यत प्रस्ताव सादर करा

सिंधुदुर्गनगरी, दि.1 (जि.मा.का.) : सेवा सोसायट्यांना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयचे शिफारस पत्र घेऊन नाव नोंदणी झाल्या आहेत. अशा सेवा सोसायट्यांना कामाची आवश्यकता असल्यास काम मिळण्याबाबतचे आपले प्रस्ताव दि.3 ऑक्टोंबर 2024 रोजी सायं. 5 वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालय येथे स्वहस्ते सादर करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे, सहायक आयुक्त ग.पा. चिमणकर यांनी केले आहे. बेरोजगारांच्या सहकारी सेवा सोसायट्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यांच्या उद्देशाने रु. 10 लाख इतक्या रक्कमेची कामे विनानिविदा उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे शासन निर्णय अन्वये जिल्हा स्तरावर काम वाटप समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने काम वाटप समितीकडे जिल्हयातील विविध शासकीय कार्यालयाकडून कंत्राटी कामाकरिता पत्र प्राप्त झाली आहेत. आवश्यक अटी व शर्तीच पूर्तता करणे अनिवार्य आहे. उशिरा प्राप्त झालेली तसेच अपूर्ण स्वरूपातील प्रस्ताव अपात्र ठरवून स्विकारण्यात येणार नाहीत...

कसाल येथे स्वच्छता कार्यक्रम

सिंधुदुर्गनगरी, दि.1 (जि.मा.का.) : स्वच्छता हि सेवा 2024 अंतर्गत दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2024 या कालावधीत राबविण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत. दि. 2 ऑक्टोबर 2024 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून' स्वच्छ भारत दिवस साजरा' करावयाचा आहे. त्या अनुषंगाने दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी ग्रामपंचायत कसाल, ता.कुडाळ येथे जिल्हास्तरीय परिसर स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन पुढीलप्रमाणे करण्यात आले असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) विनायक ठाकुर यांनी दिली आहे. सकाळी 8.30 ते 9 वाजता जिल्हा मुख्यालय ते कसाल हायस्कुल पर्यत रॅली, सकाळी 9 ते 9.30 वाजत मान्यवराचे स्वागत व मनोगत, सकाळी 9.30 ते 10 वाजता शालेय मुलांचे मनोगत व वक्तृत्व स्पर्धा बक्षिस वितरण, सकाळी 10 ते 10.15 वाजता स्वच्छता शपथ, सकाळी 10.15 ते 11.30 रॅली व परिसर स्वच्छता कार्यक्रम सकाळी 11.30 वाजता कार्यक्रमाचे समारोप करण्यात येणार आहे. ०००००

स्वच्छ भारत दिवस साजरा निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता महत्वाची -जिल्हाधिकारी अनिल पाटील

· स्वच्छता मोहिमेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद · कसाल गावात 'स्वच्छता रॅली'चे आयोजन · विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव सिंधुदुर्गनगरी, दि. ०२ (जि.मा.का.) सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर जिल्हा म्हणून सर्वपरिचित आहे. जिल्ह्यातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटलेले असल्याने जिल्ह्यात सगळीकडे स्वच्छता पाहायला मिळते. 'स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता' ही यावर्षीची थीम आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:मध्ये स्वच्छतेचा संस्कार रुजवणे आवश्यक असून निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता महत्वाची असल्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून' स्वच्छ भारत दिवस साजरा' करावयाचा आहे. त्या अनुषंगाने आज कसाल हायस्कुल येथे स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार गणेश जेठे, लवु महाडेश्वर, कसाल ग्रामपंचायतीचे सरपंच श्री परब , कसाल हायस्कुलचे पदाधिकारी, गा...