Posts

Showing posts from December, 2021

ओमीक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी निर्बंध आणखी कडक विवाह,सामाजिक,राजकीय,धार्मिक समारंभात केवळ 50 जण; अंतिम संस्कारास 20 व्यक्तींना परवानगी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश

सिंधुदुर्गनगरी, दि.31(जि.मा.का.): ओमीक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लग्न समारंभासाठी बंदिस्त अथवा मोकळ्या जागेत तसेच इतर सामाजिक, सांस्कृतिक राजकीय किंवा धार्मिक कार्ये आणि मेळाव्याच्या बाबतीतही जास्तीत जास्त 50 व्यक्तींना परवानगी असेल. अंतिम संस्कारासाठी 20 व्यक्तींना परगानगी असणार आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज लागू केले. या आदेशात म्हटले आहे, राज्यशासनाच्या महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाने 30 डिसेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात कोविड-19 ओमिक्रॉन विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिरोध (प्रतिबंध) करण्यासाठी नवीन निर्बंध संपूर्ण जिल्ह्यासाठी लागू करीत आहे. • लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहामध्ये किंवा मोकळ्या जागेत जास्तीत जास्त ५० व्यक्तींना परवानगी असेल. • इतर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक कार्ये आणि मेळाव्याच्या बाबतीत, उपस्थितांची उपस्थिती बंदिस्त सभागृहासाठी किंवा मोकळ्या जागेत जास्तीत जास्त ५० व्यक्तीपुरती मार्यादित असेल. • अंतिम संस्कारच्या बाबतीत जास्तीत जास्त २० व्यक्तींना ...

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्याकडून बँक निवडणूक मदतान केंद्रांची पहाणी

Image
सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीसाठी आज मतदान पार पडले. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर भेट देत मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत सुरू असल्याविषयी पहाणी केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी कुडाळ आणि सावंतवाडी येथील मतदान केंद्रावर भेट देऊन मतदान सुरळीत पार पडण्याविषयी सूचना दिल्या. * सोबत फोटो जोडला आहे. 00000

आजअखेर 51 हजार 756 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 16 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

मनोधैर्य योजना समितीसाठी इच्छुक महिला सदस्यांची अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.30 (जि.मा.का.): मनोधैर्य योजनेअंतर्गत पिडीत व्यक्तिंना नुकसान भरपाई देण्याच्या योजनेची अंमलबजावणी ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे सोपविण्यात आलेली आहे. मनोधैर्य योजना समितीवर महिला व बालविकास क्षेत्रात काम करणाऱ्या महिला समाजसेविकेला एक वर्षाच्या कालावधीकरिता सदस्य म्हणुन नामनिर्देशित करणे आवश्यक आहे. तरी दिनांक 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीकरिता महिला व बालविकास क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या महिला समाजसेविकेची सदस्य काम करणेची इच्छा आहे. त्यांनी आपला अर्ज, नांव, पत्ता, दुरध्वनी क्रमांक व माहिती परिचय बायोटाटा हा दिनांक 4 जानेवारी 2022 ते 18 जानेवारी 2022 या कालावधीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांचे कार्यालयात किंवा secretarydlsasin289@gmail.com या ई-मेलवर पाठवावा असे आवाहन सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी केले आहे. 00000

३१ डिसेंबर निमित्त आयोजित कार्यक्रम व नववर्षाचे स्वागत कार्यक्रमांसंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

सिंधुदुर्गनगरी, दि.30(जि.मा.का.): कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमायक्रॉन विषाणू संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. याचे संक्रमण नागरिकांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता लक्षात घेवून नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्यासाठी गृह विभागाने ३१ डिसेंबर, २०२१ (वर्ष अखेर) व नूतन वर्ष २०२२ चे स्वागत अत्यंत साधेपणाने करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने दि. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी व दि. १ जानेवारी २०२२ रोजी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत शक्यतो घरीच साधेपणाने साजरे करावे. राज्यात २५ डिसेंबर पासून रात्री ९:०० ते सकाळी ६:०० वाजेपर्यंत ५ पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशांचे पालन करण्यात यावे. कोवीड-१९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. ३१ डिसेंबर, २०२१ व नूतन वर्ष, २०२२ चे स्वागताकरिता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त ...

जिल्हा परिषदेच्या रांगोळी स्पर्धेत प्राची सावंत तर चित्रकला स्पर्धेत यश शिंदे प्रथम जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून विजेत्यांचे अभिनंदन

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये रांगोळी स्पर्धेत 5 वी ते 7 वीच्या गटात जिल्हा परिषद शाळा पावशी मिटक्याचीवाडी शाळेच्या प्राची सदानंद सावंत हीने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर रांगोळी स्पर्धेमध्ये 5 वी ते 7 वीच्या गटात जिल्हा परिषद शाळा वाडोस नं 1 चा विद्यार्धी यश मधुकर शिंदे याला पहिला क्रमांक मिळाला आहे. जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या रांगोळी, चित्रकला, वकृत्व, निबंध लेखन या स्पर्धांमधील विजयी विद्यार्थी व शिक्षक यांचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजना सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, आरोग्य सभापती अनिषा दळवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांनी अभिनंदन केले. जिल्हास्तरावर दि. 28 व 29 डिसेंबर 2021 रोजी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये तालुकास्तरावरील पहिल्या 3 क्रामांकाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धांचे निकाल आज जाहीर करण्यात आले आहेत. एक...

ोदाम, मनुष्यबळ - पदांबाबत पाठपुरावा करावा - अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे

ग सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का): जिल्ह्यातील शासकीय गोदामांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून ती ताब्यात घ्यावीत. तसेच आवश्यक त्या ठिकाणी पदांची निर्मिती आणि मनुष्यबळासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी दिले. जिल्हा दक्षता समितीची बैठक आज घेण्यात आली. याबैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते, अशासकीय सदस्य संजय माजगावकर, तहसिलदार धारवलकर, नायब तहसिलदार संजय गवस आदी उपस्थित होते. जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. गिते यांनी विषय वाचन करून सविस्तर माहिती दिली. श्री. बर्गे म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण करत आलेल्या गोदामांबाबत पाठपुरावा करावा. ही गोदामे ताब्यात घेण्यापूर्वी तेथील आवश्यक त्या सुविधा पूर्ण झाल्याबाबत पहाणी करावी. काही अपूर्ण कामकाज राहीले असेल तर त्याबाबत पाठपुरावा करावा. आवश्यक असल्यास प्रस्ताव पाठवावा. दोडामार्ग तालुक्यासाठी आवश्यक असणाऱ्या पदनिर्मिती बाबत तसेच लागणाऱ्या मनुष्यबळासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करावा. शिधापत्रिका धारकांना येत असणाऱ्या अडचणी सोडवाव्यात. नव्या...

अन्न पदार्थ वर्तमानपत्राच्या वेष्टनात देण्यास बंदी अन्न सुरक्षा व मानवी कायदा 2006 नुसार दाखल होऊ शकत गुन्हा

सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का.): वर्तमानपत्र छपाईसाठी रासायनिक शाईचा वापर केला जाते. ही शाई माणसाच्या आरोग्यास घातक आहे. त्यामुळे वर्तमानपत्रा मध्ये भेळ, वडापाव, भजी यासारखे पदार्थ बांधून देण्यास बंदी करण्यात आली आहे. असे केल्यास सदर व्यावसायिकावर अन्न सुरक्षा व मानवी कायदा 2006 नूसार गुन्हा दाखल होऊ शकतो. अशी माहित अन्न व ऑषध प्रशासनाचे सहायक आयुक्त तु.ना. शिगाडे यांनी दिली. रासायनयुक्त शाई मानवी आरोग्यास धोकादायक व हानिकारक आहे. त्यामुळे अशा घातक रसायनयुक्त शाईने छापलेल्या वर्तमानपत्राचा कागदामध्ये गरम पदार्थ बांधून देणे ग्रहकांना धोकादायक ठरू शकते. त्याचबरोबर खाद्यतेलाचा तळण्यासाठी वापर करणाऱ्या हातगाडी, फरसाण उत्पादक, स्विट मार्ट धारक,मोठे हॉटेल्स, कॅटरर्स इत्यादी अन्न व्यावसायिकांनी देखील दोन ते तीन वेळा वापरलेले आणि काळे पडलेले खाद्यतेल हे पुन्हा अन्न पदार्थ तळण्यासाठी वापरु नयेत, असे काळे पडलेले तेल हे आरोग्यासाठी घातक असते. असे तेल हे इतरत्र फेकून पर्यावरणाची देखील हानी होतो, त्यामुळे हे तेल फेकून न देता ते जमा करुन केंद्र शासन प्राधिकृत बायोडिझेल कंपनीचे ...

औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत

सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का.): सन 2022-23 करिता कायम विना अनुदान तत्वावर नवीन खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करणे आणि विद्यमान खाजगी औ. प्र.संस्थांमध्ये नवीन व्यवसाय, जादा तुकडीवाढ, व्यवसाय बदल करण्याकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची संचालनालयाचे पोर्टल http://vti.dvet.gov.in वर दि.9 डिसेंबर ते दि 31 डिसेंबर 2021 पर्यंत सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. औ. प्र. संस्‍थाना किमान 04 व्‍यवसाय अभ्‍यासक्रम व 8 तुकड्या सुरु करणे बंधनकारक करण्‍यात आलेले आहे. त्‍यातील किमान एक व्‍यवसाय अभियांत्रिकी, आणि एक व्यवसाय न्यू एज/Industry4.0 आवश्यक असल्याने काही संस्थांना या निकषानुसार अर्ज करता आला नाही . दि 1 जुलै ते 31 ऑगस्ट 2021 दरम्यान सन 2022-23 करिता काही संस्थांची सर्व तयारी असून देखील संस्था अर्ज करण्यात इच्छुक असूनही पोर्टल बंद असल्याने अर्ज करु शकले नाहीत. अशी माहिती रमण पाटील जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सिंधुदुर्ग यांनी दिली . 0000

आजअखेर 51 हजार 756 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 12 - जिल्हा शल्य चिकित्सक

आजअखेर 51 हजार 753 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 14 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

पशुसंवर्धव्दारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारित नविन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान

सिंधुदुर्गनगरी दि.28(जि.मा.का): सन2021-22 या वर्षापासून केंद्र शासनाने पशुसंवर्धनाव्दारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारित नविन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान ही योजना सुरु आहे. या योजने अंतर्गत शेळी-मेंढी पालन, कुक्कुट पालन, वराह पालन, पशुखाद्य व वैरण विकास उपअभियांनातर्गत मुरघास निर्मिती, टीएमआर व फॉडर ब्लॉक निर्मिती तसेच वैरण बियाणे उत्पादन या योजनाकरिता 50 टक्के अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अनुदानाची अधिकतम मर्यादा शेळी मेंढी पालनाकरिता 50लाख रुपये, कुक्कुट पालनाकरिता 25 लाख रुपये, वराह पालनाकरिता 30 लाख रुपये आणि पशुखाद्य व वैरण विकास यासाठी 50 लाख रुपये अशी आहे. प्रकल्पाकरिता स्वहिस्सा व्यक्तिरीक्त उर्वरित आवश्यक निधी बँकेकडून कर्जाव्दारे उपलब्ध करुन घ्यावयाचा आहे. या योजनेचा लाभ व्यक्तीगत व्यवसायिक, स्वंय सहायत्ता बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी सहकारी संस्था, कलम 8 अंतर्गत स्थापन झालेली कंपनी, सहकारी दूध उत्पादक संस्था, सह जोखिम गट (जेएलजी),सहकारी संस्था, खाजगी संस्था, स्टार्टअप ग्रुप इत्यादी घेवू शकतात. या योजनांच्या लाभाकरित...

नुतन अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

Image
सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का): नुतन अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांच्याकडून स्वीकारला. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. श्री. बर्गे हे यापूर्वी 2009 ते 12 या कालावधीत जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून होते. हिंगोली येथे अपर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. आज त्यांनी सिंधुदुर्ग येथील पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे, सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर उपस्थित होते. * सोबत फोटो जोडला आहे. 00000

केंद्रिय अन्न सुरक्षा प्राधिकरणचा "ईट राईट इंडिया" उपक्रम

सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का): केंद्रिय अन्न सुरक्षा प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी संपूर्ण देशातील जनतेच्या आहाराच्या सवयींमध्ये स्थानिक गरजांनुसार आवश्यक बदल करण्याच्या अनुषंगाने "ईट राईट इंडिया" हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून राज्य शासनाने राज्य स्तरीय आणि जिल्हा स्तरीय समिती स्थापन केली आहे. जिल्हास्तरीय समिती ही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली असून त्यामध्ये सदस्य म्हणून पुरवठा, पोलीस, कृषी, शिक्षण, महिला व बालकल्याण, जिल्हा उद्योग व जिल्हा दुग्ध विकास या विभागातील अधिकारी व ग्राहक संस्था, अन्न व्यावसायिक आणि पोषण आहार तज्ज्ञ अशा अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत जिल्ह्याची गरज विचारात घेऊन नागरिकांच्या आहारातील अन्न पदार्थांचे बदलाच्या अनुषंगे वेळोवेळी सर्वेक्षण करणे, शासनाच्या आयुष्यमान भारत, पोषण अभियान आणि स्वच्छ भारत मिशन इत्यादी योजनांच्या संयोगाने नागरिकांत अन्न सुरक्षा व पोषण विषयक जागृती करणे,...

ोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी परदेशातून गावात येणाऱ्या नागरिकांची तपासणी करावी प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

Image
क सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का): कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन प्रकार जगभरात वेगाने पसरत आहे. राज्यातही कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी. परदेशातून गावात येणाऱ्या नागरिकांची माहिती मिळवून सात दिवसांनंतर पुन्हा त्यांची आरटीपीसीआर तपासणी करावी. त्याचबरोबर विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी अशी सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज दिली. जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे, सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील आदी उपस्थित होते. राज्य शासनाच्या सूचनेनुसार ओमिक्रॉन प्रतिबंधासाठी सर्व य...

आजअखेर 51 हजार 753 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 14 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

जिल्हास्तरीय युवा महोत्सव ऑनलाईन पध्दतीन

सिंधुदुर्गनगरी दि.26(जि.मा.का): राष्ट्रीय एकात्मता व युवाच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी, सुप्त कलांचे सादरीकरण होण्यासाठी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते यामध्ये प्रत्येक राज्याचे प्रतिनिधी संघ सहभागी होतात. राज्याची संस्कृती व परंपरा जतन करण्यासाठी जिल्हा, विभाग,राज्य, राष्ट्रीय स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या सूचनेनुसार 15 ते 29 वयोगटातील युवकांसाठी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे गुरुवार दि. 30 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार आहे. या युवा मोत्सवाकरिता पुढील कला प्रकार आहेत. लोक नृत्य folk dance सहभाग कलाकार संख्या 20 -वेळ 15 मिनिटे.तसेच लोकगीत folk dance सहभाग कलाकार संख्या- 10 वेळ 07 मिनिटे. जिल्हयातील महाविद्यालयातील शिक्षण घेणारे शिक्ष्‍ाण पूर्ण झालेले, कला अध्यापन, विद्यार्थी, नाट्य मंडळातील कलाकार या सर्वासाठी हे कलामंच खुले आहे. या महोत्सवातील कला प्रकारासाठी प्रवेश विनामुल्य असून प्रविण्य संपादन करणारे कलाक...

ओमिक्रॉन विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवे निर्बंध लागू

Image

जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकोप्याने काम करावे, विकासकामांमध्ये राजकारण आणू नका - उपमुख्यमंत्री अजित पवार

Image
सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का): जिल्ह्याच्या विकासासाठी जी काही मदत लागेल ती सरकार म्हणून आम्ही करू. विकासासाठी काम करताना त्यामध्ये कोणतेही राजकारण न आणता एकाप्याने काम करा असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात नियोजन समितीचे कामकाज, कोविड - 19 विषाणू प्रादुर्भाव व उपाय योजना तसेच चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान याविषयी आढावा बैठकीचे आयोजन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक, नितेश राणे, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील विकास कामे करताना मंत्रालयीन स्तरावर काही अडचणी असल्यास त्या आम्हाला सांगा, आम्ही त्या सोडवू असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, प्राथमिक स्तर...

26 डिसेंबर 2021 बातमी कोरोना

Image

आजअखेर 51 हजार 750 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 13 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

ई- संजीवनी ओपीडीचा लाभ घेण्‍याचे जिल्‍हावासीयांना आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि.24(जि.मा.का): जिल्ह्यातील नागरिकांसाठी आरोग्य विभागाचे ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन ओपीडी, प्राथमिक उपचारविषयक मोफत मार्गदर्शन सल्ला दिला जातो. ई-संजीवनी ॲपवर टेलिकन्सल्टेशनव्दारे वैद्यकीय अधिकारी गरजू व कोविड रुग्णाना वैद्यकीय सल्ला देतात. ई संजीवनी ओपीडी ही सेवा ऑनलाईन असल्याने या सेवेचा लाभ घेण्यासाठी रुग्णाकडे ॲड्राईड मोबाईल फोन असणे आवश्यक आहे. ही सेवा www.esanjeevniopd.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून लॅपटॉप व संगणकावरुन घेता येते. सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यत, तर दुपारी 1.30 ते 5 यावेळी उपलब्ध आहे. रविवार सुध्दा ही सुविधा उपलब्ध आहे. सुविधेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांना ॲड्रोईड मोबाईलव्दारे या ई- संजीवनी ओपीडी या संकेस्थळावर किंवा ई- संजीवनी ओपीडी हे ॲप मोबाईल मध्ये इंस्टॉल करुन नोंदणी करुन वैद्यकीय अधिकाऱ्याकडून ऑनलाईन वैद्यकीय सल्ला घेता येतो. डॉक्टरांशी चर्चा झाल्यानंतर सल्ला मसलत झाल्यानंतर ई- प्रिस्किप्शनही दिले जात आहे. या संजीवनी ओपीडी चा लाभ घेण्यसाठी पुढील टप्पाचे पालन करावे. सेवा नोंदणी करुन टोकन घेणे- ...
जिल्‍हा परिषदेचा वार्षिक प्रशासन अहवाल उपलब्‍ध सिंधुदुर्गनगरी दि.24(जि.मा.का): सन 2020-21 चा जिल्हा परिषद सिंधुदुर्गचा वार्षिक प्रशासन अहवाल सर्वसाधारण दिनांक 23 सप्टेंबर 2021 रोजी च्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. हा अहवाल जिल्हा परिषद कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे कार्यालयीन वेळेत पहावयास उपलब्ध असल्‍याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली. 00000

कणकवली येथे राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का): कणकवली येथील नगरपंचायत वाचनालय हॉल येथे उद्या दि. 24 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसाठी केंद्र शासनाकडून "A Turning Point for Indian Consumers : The consumers Protection Act 2019" ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने सीताराम उर्फ दादा कुडतरकर, असी. रोटरी क्लब कणकवली, सदस्य, भ्रष्टाचार निर्मुलन सिंधुदुर्ग यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कणकवलीचे तहसिलदार रमेश पवार यांनी केले आहे. 00000

आजअखेर 51 हजार 745 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 18 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

12 वीची परीक्षा 4 मार्च पासून तर 10 वीची परीक्षा 15 मार्च पासून

सिंधुदुर्गनगरी दि.23 (जि.मा.का): उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमच्या लेखी परीक्षा शुक्रवार दि. 4 मार्च 2022 ते दि.30 मार्च 2022 रोजी तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मंगळवार दि. 15 मार्च 2022 ते दि.4 एप्रिल 2022 या कालावधीत होणार आहेत. मार्च -एप्रिल 2022 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ.12 वी व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इ.10 वी लेखी परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in या संकेस्थळावर दि. 21 डिसेंबर 2021 पासून उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मंडळाच्या संकेतस्थावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांचकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. छापील वेळापत्रकावरुन परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सॲप किंवा तत्सम माध्यमातून प्रसारित झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नय...

बैलांमधील वेदनारहित खच्चीकरणाचे प्रशिक्षण संपन्न

सिंधुदुर्गनगरी दि.21 (जि.मा.का): महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग यांच्या सहकार्याने ॲनिमल राहत या संस्थेच्यावतीने जिल्ह्यातील सरकारी पशुवैद्यकांना मानवीय पध्दतीने बैलांमधील खच्चीकरण प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. अशाप्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम या पूर्वी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोल्हापूर, रत्नागिरी ,जळगांव,उस्मानाबाद, बीड, लातूर ,औरंगाबाद, परभणी,आणि जालना, जिल्ह्‌यात आयोजित करण्यात आले होते. राज्यातील प्रत्येक उर्वरित जिल्ह्यात हे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण मानवीय पध्दतीने हाताळणी आणि बैलांना काबू करणे यावर लक्ष केंद्रित करण्यात येते. उपशामक, वैदनाशामक आणि निस्तेजक औषधांचा एकत्रित वापर करुन,बैलांना खच्चीकरुणापुर्वी भूल दिले जाते. खच्चीकरणानंतर वेदनेचे व्यवस्थापन करण्यासाठी वेदनाशामक औषधाने उपचार केले जातात. प्रशिक्षणामध्ये सादरीकरण क्षेत्र वेदनारहित खच्चीकरणाची पध्दत पशुसंवर्धन विभागाच्या प्रगत पध्दती व मानवी पध्दतीचा अवंलब करण्यसाठी हितकारक ठरेल. कोणत्याही पशु हिंसक प्रक्रियेला भविष्यात सामोरे जाणार नाही.प्रात्यक्षिक आणि अपक्व...

आजअखेर 51 हजार 741 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 19 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

आजअखेर 51 हजार 737 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 22 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

जिल्ह्यातील जनतेने ई- संजीवनी ओपीडीचा लाभ घ्यावा

सिंधुदुर्गनगरी दि.20 (जि.मा.का): जिल्ह्यातील जनतेला घरी राहून त्यांच्या आजारावर वैद्यकीय सल्ला घेण्यात यावा म्हणुन ई- संजीवनी ओपीडी ही सुविधा सुरु करण्यात आलेली आहे. तसेच कोविड व नॉन कोविड रुग्णांना घरी सुरक्षित राहुन वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मार्फत उपचार सल्ला मसलत करण्यात यावे.या कार्यक्रमाचा मुळ उद्देश आहे. जनतेने ॲण्ड्रोइड मोबाईल मध्ये ई-संजीवनी ओपीडी हे ॲप इंन्स्टॉल करुन या सेवेचा लाभ घ्यायचा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आतापर्यंत 330 रुग्णांनी घर बसल्या या सेवेचा लाभ घेतलेला आहे. हा लाभ घेण्यासाठी डॉक्टरांशी सल्ला मसलत करण्यासाठी खालील टप्यांचे पालन करावे, आपला मोबाईल नंबर सत्यापित, व्हेरीफाय करा. नोंदणी झाल्यानंतर टोकन जनरेट करा. नोटिफीकेशन मिळाल्यानंतर लॉग इन करा. तुमचा नंबर येईपर्यंत वाट पहा व त्यानंतर डॉक्टरांशी सल्ला मसलत करा. ई- प्रिस्क्रीप्शन डाऊनलोड करा . तरी जनतेने तसेच रुग्णांनी ई-संजीवनी ओपीडी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ ध्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 0000

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी मतदानासाठी भरपगारी सुट्टी -जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश

सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का): जिल्ह्यातील 127 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवार दि. 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी / विशेष सवलत देण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. या आदेशात म्हटले आहे, दि. 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत ग्रामपंचायतीतील निधन, राजीमाना, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांच्या पोट निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी दि. 17 नोव्हेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 127 ग्रामपंचायतीच्या 172 जागांसाठी पोट निवडणुका घेण्याची कार्यवाही सुरू आहे. सदर निवडणूक कार्यक्रमानुसार मतदानाच्या दिवशी 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 वा. पासून सायं. 5.30 वा. पर्यंत हा कार्यालयीन कामाचा दिवस असल्याने ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुका जेथे नियोजित आहेत, तेथे मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी / विशेष सवलत देण्यात यावी अ...

निवडणूक क्षेत्रातील संस्था, आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश

सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का): जिल्ह्यातील कुडाळ, वाभवे - वैभववाडी, कसई - दोडामार्ग आणि देवगड - जामसंडे या नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक दि. 21 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे. या निवडणूकीच्या मतदानाच्या दिवशी मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मंगळवार दि. 21 डिसेंबर रोजी निवडणूक क्षेत्रातील संस्था, आस्थापनांमधील कर्मचारी यांना भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज दिले आहेत. या आदेशात म्हटले आहे, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून कुडाळ, वाभवे - वैभववाडी, कसई - दोडामार्ग आणि देवगड - जामसंडे या नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 2021 करिता प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील कुडाळ, वाभवे - वैभववाडी, कसई - दोडामार्ग आणि देवगड - जामसंडे या नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक दि. 21 डिसेंबर 2021 रोजी ( वार - मंगळवार ) होणार आहे. लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 ( भाग -2) मधील नियम 135 (ब) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांच्या मतदानाचा ह...

ऑनलाईन रोजगार मेळावा 21 डिसेंबर रोजी

सिंधुदुर्गनगरी दि.20(जि.मा.का): कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी दि.12 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2021 दरम्यान ऑनलाईन State Level "MEGA JOB FALR" चे आयोजन करण्यात आले होते, आता याचह मुदत ही 21 डिसेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील उद्योजकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर पंडित दीनद्याळ उपाध्याय स्टेट लेवल "MEGA JOB FALR" मध्ये आपली रिक्तपदे welder,fitter,Traub Operator, Machine Opertor,Sales Executive,Back Office DTP Operator, Telecalling, Service Advisor,Manager, Workshop Manager, Supervisor,Guard इ. अधिसुचित केलेली आहेत. जिल्‍हयातील नोकरी साधक (job seeker)उमेदवारांनी वरील पोर्टलवर आपल्या स्वत:च्या लॉगीन आयडीने शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित पदासाठी ऑनलाईन ॲप्लाई करावे,या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 02362 228835 मो.9403350689 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन शालिक पवार सहायक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्श...

साहसी पर्यटन उपक्रम नोंदणीसाठी आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि.20 (जि.मा.का): महाराष्ट्रात साहसी पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी जमीन, हवा व पाणी या विविध उपक्रमांसाठी साहसी पर्यटन धोरण जाहीर केले आहे, अशी माहिती नवी मुंबई पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक हनुमंत हेडे यांनी दिली. कोकण विभागात जमीन, हवा पाणी यावर साहसी पर्यटन उपक्रम राबविणाऱ्या कार्यरत असणाऱ्या किंवा नवीन उपक्रम सुरु करु इच्छिणाऱ्या सर्व संस्था, व्यक्तीसमुह यांना www.maharashtratourism.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करण्यात यावे. या साहसी पर्यटन उपक्रमाची नोंदणी पर्यटन संचालनायाकडे (DoT) येथे करावी. साहसी पर्यटन उपक्रमांची नोंदणी करण्याची कार्यपध्दती www.maharashtratourism.gov.in या संकेत स्थळावर Menu- Registration forms- Adventure Registration यावर Click करुन Online अर्ज व आवश्यक कागदपत्रे उपलोड करावे. अधिक माहितीसाठी पर्यटन संचालनालय उपसंचालक पर्यटन, प्रादेशिक कार्यालय कोकण भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई किंवा पर्यटन संचालनालयाचे नरीमन भवन, 156/ 157/ 15वा मजला, नरीमन पाँईट, मुंबई -21 येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे...

दुसरे महायुध्दातील सैनिक,विधवा यांनी हयातीचे दाखले जमा करण्याचे आहवान

सिंधुदुर्गनगरी दि.20 (जि.मा.का): दुसऱ्या महायुध्दाचे अनुदान घेत असलेल्य जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवा त्यांनी हयातीचे दाखले 10 जानेवारी 2022 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे जमा करावित, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले अहे. जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी आपले हयात असलेचे व दाखल्यावरीती आपला एक फोटा लावून दाखले ग्रामसेवक नगरसेवक अथवा बँकेकडून स्वाक्षरी घेवून सोबत या कार्यालयाने दिलेल्या ओळखपत्राचे प्रत, आधारकार्ड, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या व शेवटच्या पानाची छायांकीत प्रत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, येथे जमा करावी . ज्या लाभार्थी दुर्गम भागात राहतात अशा लाभार्थ्यांनी आपल्या नातेवाईकांची मदत घ्यावी. तसेच जे लाभार्थी मयत झालेले आहेत त्यांचे मृत्यूचे दाखले त्यांच्या वारसदारानी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात जमा करावे जेणे करुन त्यांचे पुढील अनुदान कायमस्वरुपी बंद करण्यात येईल. लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले 10 जानेवारी पर्यंत जमा न केल्यास अशा लाभार्थीचे अनुदान बंद करण्यात येईल. हयातीचे दाखले वेळेत सादर न केलेमुळे आपले ...

माजी सैनिक, विधवांना पेन्यूरी अनुदान नूतनीकरण करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि.20 (जि.मा.का): सन 2021- 22 करिता पेन्यूरी अनुदान नूतनीकरण्यासाठी माजी सैनिक, विधवा 65 वर्षावरील आहेत, ज्यांना कोणतेही निवृत्ती वेतन, इतर सरकारी अनुदान मिळत नाही. अशा लाभार्थीनी अनुदान पुढे चालू ठेवण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने दिनांक 1 मार्च 2022 पर्यंत के.एस.बी या वेबसाईट वर जाऊन नुतनीकरण करुन घेण्यात यावे. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. पेन्यूरी अनुदान नूतनीकरण करण्यासाठी पुढील प्रमाणे मूळ कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहेत. हयातीचा दाखला(जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या सहीनिशी.). बँक पासबुकचे पहिले पान ज्यामध्ये बँकेचा IFSC Code असणे आवश्यक आहे. आधार कार्ड. डिसचार्ज पुस्तक.या योजनेचा लाभ पुढे चालू ठेवण्यासाठी सर्व माजी सैनिक, विधवा यांनी ऑनलाईन पध्दतीने नुतनीकरण करावे. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे संपर्क करावा. अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली. 00000

जिल्ह्यात 5 लाख 60 हजार 966 जणांनी घेतला पहिला डोस

सिंधुदुर्गनगरी, दि.17(जि.मा.का.): जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 5 लाख 60 हजार 966 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 855 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 191 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 991 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 934 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 1 लाख 35 हजार 686 व्यक्तींनी पहिला डोस तर 99 हजार 302 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 1 लाख 60 हजार 830 नागरिकांनी पहिला डोस तर 1 लाख 20 हजार 191 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 2 लाख 44 हजार 604 जणांनी पहिला डोस तर 1 लाख 58 हजार 919 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 9 लाख 56 हजार 503 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 10 लाख 60 हजार 500 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 8 लाख 16 हजार 180 लसी या कोविशिल्डच्या तर 2 लाख 44 हजार 320 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 7 लाख 57 हजार 931 कोविशिल्ड आणि 1 लाख 98 हजार 572 कोवॅक्सिन असे मिळून 9 लाख 56 हजार ...

आजअखेर 51 हजार 737 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 19 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 31 डिसेंबर पर्यत मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी दि.16 (जि.मा.का): जिल्ह्यात सद्यस्थितीत नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक2021, ग्रामपंचायत पोटनिवडणूक तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीची प्रक्रीया सुरु आहे. या दरम्यान मतदान व मतमोजणी शांततेत पार पाडावी या अनुषंगाने जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जिल्हादंडाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) ते (फ) व 37 (3) नुसार जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागामध्ये दि. 31 डिसेंबर 2021 रोजी पर्यंत मनाई आदेश लागू केला आहे. या आदेशात म्हटले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्यास्थितीत नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021, ग्रामपंचायत पोटनिवडणूक तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. निवडणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार, घटना न घडता मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडावी तसेच जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात महाराष्‍ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(अ) ते (फ) आणि 37(3) प्रमाणे दिनांक 17/12/...

जिल्ह्यात 5 लाख 60 हजार 136 जणांनी घेतला पहिला डोस

सिंधुदुर्गनगरी, दि.16(जि.मा.का.): जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 5 लाख 60 हजार 136 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 855 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 188 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 991 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 929 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 1 लाख 32 हजार 489 व्यक्तींनी पहिला डोस तर 98 हजार 446 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 1 लाख 60 हजार 623 नागरिकांनी पहिला डोस तर 1 लाख 18 हजार 866नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 2 लाख 44 हजार 178 जणांनी पहिला डोस तर 1 लाख 55 हजार 733 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 9 लाख 50 हजार 298 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 10 लाख 60 हजार 500 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 8 लाख 16 हजार 180 लसी या कोविशिल्डच्या तर 2 लाख 44 हजार 320 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 7 लाख 51 हजार 726 कोविशिल्ड आणि 1 लाख 98 हजार 572 कोवॅक्सिन असे मि...

साहसी पर्यटन उपक्रम नोंदणीसाठी आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि.16 (जि.मा.का): महाराष्ट्रात साहसी पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी जमीन, हवा व पाणी या विविध उपक्रमांसाठी साहसी पर्यटन धोरण जाहीर केले आहे, अशी माहिती नवी मुंबई पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक हनुमंत हेडे यांनी दिली. कोकण विभागात जमीन, हवा पाणी यावर साहसी पर्यटन उपक्रम राबविणाऱ्या कार्यरत असणाऱ्या किंवा नवीन उपक्रम सुरु करु इच्छिणाऱ्या सर्व संस्था, व्यक्तीसमुह यांना www.maharashtratourism.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करण्यात यावे. या साहसी पर्यटन उपक्रमाची नोंदणी पर्यटन संचालनायाकडे (DoT) येथे करावी. साहसी पर्यटन उपक्रमांची नोंदणी करण्याची कार्यपध्दती www.maharashtratourism.gov.in या संकेत स्थळावर Menu- Registration forms- Adventure Registration यावर Click करुन Online अर्ज व आवश्यक कागदपत्रे उपलोड करावे. अधिक माहितीसाठी पर्यटन संचालनालय उपसंचालक पर्यटन, प्रादेशिक कार्यालय कोकण भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई किंवा पर्यटन संचालनालयाचे नरीमन भवन, 156/ 157/ 15वा मजला, नरीमन पाँईट, मुंबई -21 येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 00000

आजअखेर 51 हजार 728 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 27 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना वारसाप्रमाणपत्र देण्याबाबत तातडीने कार्यवाही करा - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का.) – कोरोनामुळे दोन्ही तसेच एक पालक पालक गमावलेल्या बालकांना वारसाप्रमाणपत्र देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिल्या. कोविड 19 रोगाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक आज घेण्यात आली. बैठकीला विधी व सेवा प्राधिकरणचे सचिव डी.बी. म्हालटकर, बाल कल्याण समिती अध्यक्ष पी.डी. देसाई, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले, पोलीस उपअधिक्षक संध्या गावडे, जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. रुपाली पाटील, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक नितीन काळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळी, चाईल्ड लाईनच्या प्रकल्प समन्वयक प्रियांका घाडी, बालविकास प्रकल्प अधिकारी एस.के. भोसे, महिला अत्याचार निवारण कक्षाच्या सहायक पोलीस निरीक्षक नलिनी शिंदे आदी उपस्थित होते. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी आढावा दिला. जिल्ह्यामध्ये एक पालक मयत बालके 248 असून दोन्ही पालक मयत बालके 18 असे एकूण 266 बालके आहेत. 568 विधवा असून 200 ग...

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या सर्व अडचणी व समस्या सोडविण्यास प्राधान्य - गृहमंत्री वळसे पाटील

Image
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 14- सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने तसेच जिह्यालगत गोवा राज्य असल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात. जिल्ह्यातील वाढत्या अमली पदार्थ वाहतूक, विक्रीला आळा घालण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी प्रभावी उपाययोजना करावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.तसेच जिल्हा पोलीस दलाच्या सर्व अडचणी व समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकास कामे तसेच पोलीसविभागाच्या अडचणीबाबत आढावा बैठक आज मंत्रालयात घेण्यात आली. या बैठकीला आ. दिपक केसरकर, अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव आनंद लिमये, प्रधान सचिव संजय सक्सेना, अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंह, अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय वर्मा, राज्य गुप्त वार्ता विभाग आशुतोष डुंबरे, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग राजेंद्र दाभाडे यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने जिल्ह्यात टुरिझम पोलिस ठाणे निर्माण करावेत, अशी मागणी श्री केसरकर यांनी केली. पर्यटकांची सुर...

भारत सरकार शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी ३१ जानेवारी पर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी दि .14 (जि.मा.का) सन २०२०-२१ व २०२१-२२ या शैक्षिणीक वर्षाकरिता भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनु. जाती, इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज व अर्ज नुतनीकरण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अर्ज भरण्यासठी ३१ जानेवारी २०२२ अखेर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती दीपक घाटे सहायक आयुक्त समाज कल्याण अधिकारी यांनी दिली आहे. तरी जिल्ह्यातील अनु. जाती, इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर तात्काळ अर्ज करावीत. जिल्ह्यातील सर्व महाविद्यांलयानी महाविद्यालय स्तरावर अर्ज व प्रलंबित असणारे अर्ज छाननी करुन लवकरात लवकर ऑनलाईन प्रणालीतून सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे वर्ग करण्‍याचे आवाहन दीपक घाटे सहायक आयुक्त समाज कल्‍याण अधिकारी यांनी केले आहे. ००००

आजअखेर 51 हजार 726 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 28 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना विविध गंभीर आजारांवर मोफत उपचार लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 14 (जि.मा.का): प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पिवळे, केशरी, अंत्योदय, अन्नपुर्णा व पांढरे शिधापत्रिका धारक शेतकरी, नोंदणीकृत बांधकाम कामगार तसेच निवडक लाभार्थी कुटुंबांना विविध गंभींर अजारांवर मोफत उपचार दिले जातात. जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले. या योजनेच्या अंबलबजावणीसाठीच्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीवेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. नांद्रेकर यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. जन आरोग्य योजना जिल्ह्यातील एकूण 13 रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. त्यामध्ये 6 सरकारी व 7 खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे. सराकरी रुग्णालय पुढील प्रमाणे आहेत. जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग, उपजिल्हा रुग्णालय, कणकवली, उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी, उपजिल्हा रुग्णालय, शिरोडा, ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ला, गोवा वैद्यकीय महाविद्यालय, गोवा. तर खासगी रुग्णालये पुढीलप्रमाणे आहेत....

आजअखेर 51 हजार 722 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 34 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकाच दिवशी 909 प्रकरणे निकाली पक्षकारांनी व्यक्त केले समाधान

Image
सिंधुदुर्गनगरी, दि. 11 (जि.मा.का): वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले खटले समोपचाराने व सामंजस्याने तात्काळ निकाली निघावे यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशानुसार आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण 909 प्रकरणे एकाच दिवशी निकाली काढण्यात आली. एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात प्रकरणांचा निकाल लावण्यात आल्याने पक्षकारांनी समाधान व्यक्त केले. तडजोडीने वाद सोडवण्यासाठी लोक अदालत महत्वपूर्ण व्यासपीठ असल्याचे मत जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. व्ही. हाडे यांनी व्यक्त केले. आज पार पडलेल्या लोक अदालतीमध्ये एकूण तीन पॅनेल तयार करण्यात आले होते. पॅनेल क्रमांक 1 वर प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधिश - 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधिश आर.बी.रोटे यांनी काम पाहिले असून पॅनेल सदस्य म्हणून ॲड्. सतीश खानोलकर व ॲड्. रुपाली प्रभू यांनी काम पाहिले. पॅनेल क्रमांक 2 वर पॅनेल प्रमुख म्हणून दिवानी न्यायाधिश एम.बी.कुरणे यांनी काम पाहिले असून पॅनेल सदस्य म्हणून ॲड्. अशपाक शेख व ॲड्. पी.एस.क...

11 डिसेंबर 2021 बातमी कोरोना

News

Image

भाताच्या एफ.ए.क्यु प्रतीसाठी यंदाच्यावर्षी 1 हजार 940 रुपये दर जाहीर भात विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणीचे फेडरेशनचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 10 (जि.मा.का.) – सन 2021-22 हंगामासाठी शासनाने एफ ए.क्यु प्रतीच्या भातासाठी 1 हजार 940 रुपये प्रती क्विंटल दर जाहीर केला आहे. ज्या शेतकऱ्यांना हमीभावाने भात शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करायचा आहे, त्यांची विक्रीसाठी खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. या ऑनलाईन नोंदणीसाठी जिल्ह्यात 22 ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी दि. 31 डिसेंबर 2021 रोजीपर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी केले आहे. प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. राज्य शासनाचे अधारभूत किंमत धान खरेदी योजनेकरिता शासनाची मुख्य अभिकर्ता संस्था म्हणून दि महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन लि. ही संस्था काम पाहते. हंगाम 2021-22 करिता शासनाने एफ ए.क्यु प्रतीच्या धान (भात) करिता 1 हजार 940 रुपये प्रती क्लिंटल दर जाहीर केला आहे. ज्या शेतकऱ्यांना हमीभावाने धान शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करायचा आहे त्या शेतकऱ्यांकरिता विक्रीसाठी खरेदी केंद्रावर आगाऊ ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे. त्यानुसार मार्केंटिंग फेडरेशनच्या जिल्हा कार्याल...

आवास योजनांचे उद्दिष्ट 31 मार्च पर्यंत पूर्ण करा - पालकमंत्री उदय सामंत

Image
सिंधुदुर्गनगरी, दि. 10 (जि.मा.का): प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या केंद्राच्या तसेच राज्य शासनाच्या आवास योजनांचे उद्दिष्ट मार्च अखेर पर्यंत पूर्ण करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी काम करावे, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या. जिल्हा ग्रमीण विकास यंत्रणेमार्फत महा आवास अभियान ग्रामीण 2 सन 2021-22 अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेंद्र पराडकर यांच्यासह सर्व तहसिलदाल, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते. आवास योजनेमध्ये ज्यांना लाभ दिला जातो त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा अधिकारी, कर्मचारी यांनी विचार करावा असे सांगून पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, गेल्या वर्षी आपला जिल्हा आवास योजनांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यामध्ये राज्यात पहिल्या क्रमांकावर होता. तसाच तो यंदाच्या वर्षीही पहिल्या क्रमांकावर असेल यासाठी...

आजअखेर 51 हजार 720 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 27 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image