Posts

Showing posts from August, 2023

सोमवारी लोकशाही दिन

सिंधुदुर्गनगरी, दि.31 (जि.मा.का.) : माहे सप्टेंबर या महिन्यातील लोकशाही दिन हा महिन्याच्या पहिला सोमवार दि.4 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 1 ते 2 या वेळेत, जिल्हाधिकारी कार्यालयात राबविण्यात येणार असल्याची, माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी दिली आहे. 0000

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला खेळाडूंचा भरघोस प्रतिसाद

सिंधुदुर्गनगरी दि 31 जिमाका:- जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या विशेष सहाकार्याने, नेहरू युवा केंद्र, व कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रीडा दिनामित्त माणगाव, कुडाळ येथे क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला तालुक्यातील कॉलेज आणि विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. क्रीडा महोत्सव माणगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयाच्या क्रीडांगणावर संपन्न झाला. स्पर्धेची सुरवात जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, एकनाथ केसरकर (सचिव माणगाव पं.शि. प्र मंडळ) उपमुख्याध्यापक संजय पिळनकर, कमलाकर धुरी, चंद्रकांत चव्हाण नेहरु युवा केंद्राचे विल्सन फर्नाडिस व कोकण चे व्यवस्थापक अजिंक्य शिंदे या मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन झाली. कॉलजेच्या विद्यार्थ्यांनी मैदान गाजवत विद्यार्थ्यांनी खेळामध्ये चुणूक दाखवली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा मुलांमधील खेळाचे महत्व वाढावे या दृष्टिकोनातून आयोजित स्पर्धेमध्ये 100 मीटर धावणे हा खेळ प्रकार घेण्यात आला. स...

माजी सैनिकांनी, विशेष गौरव पुरस्कारासाठी 15 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर कर

ा सिंधुदुर्गनगरी दि 31 जिमाका:- जिल्ह्यात विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांनी विशेष गौरव पुरस्कारासाठी 15 सप्टेंबर 2023 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांना कळविण्यात येते की, विविध क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडु, साहीत्य, संगीत, गायन, नृत्य, वादन इ. क्षेत्रातील पुरस्कार विजेते,यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळवणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पुर, जळीत, दरोडा, अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्ती मध्ये बहुमोल कामगिरी करणारे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये इयत्ता 10 वी तसेच 12 वी च्या परीक्षेमध्ये 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवुन उत्तीर्ण माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, पाल्य यांना त्यांच्या कार्याबद्दल धनराशी व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तरी पात्र माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांनी संबंधित कार्याबाबतची प्रमाणपत्रे,...

शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे, जुन्या अर्जाचे नुतनीकरण करण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का.) : भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांचे सन 2022-23 करिता शिष्यवृत्ती अर्ज अद्याप नोंदणी झालेली नाहीत, अशा अनु.जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विर्द्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नुतनीकरण करणे तसेच महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज मंजुरीसाठी दि. 31 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची, माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांनी विहित वेळेत अर्ज https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सुरु आहेत. महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले अर्जांची छाननी करुन परिपूर्ण अर्ज मंजुरीस्तव या कार्यालयाकडे वर्ग करण्याबाबत संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य कार्यवाही करावी, ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज अद्याप नोंदणी झालेली नाहीत, अशा विद्यार्थ्यांचे अर्ज संबंधित महाविद्यालयानी नोंदणी करुन शिष्यवृत्ती अर्ज मंजुरीसाठी पाठविण्यात यावे. शिष्यवृत्ती अर्ज भरणे व मंजुरीसाठी पाठविण्याची अंतिम मुदत दि. 31 ऑगस्ट 2023 असल्याने सदर य...

शासकीय वसतीगृहामध्ये 20 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करा

सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का.) : सासमाजिक न्याय विभागाअंतर्गत जिल्ह्यातील शासकीय वसतीगृहामध्ये सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी वसतिगृहातील रिक्त असलेल्या जागेवर प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पध्दतीने दि. 20 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. शासकीय वसतिगृहासाठी व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रीया ऑफलाईन पध्दतीने येत असून सन 2023-24 मध्ये शासकीय वसतीगृहातील प्रवेश प्रक्रिया शासकीय वसतिगृहातील रिक्त असलेल्या जागावर ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. मागासवर्गीय विद्यार्थी/ विद्यार्थींनीनी वसतिगृह प्रवेश अर्ज विनामूल्य प्राप्त करुन घेण्यासाठी कार्यालयीन वेळेत संबंधित वसतिगृहातील गृहपाल, अधिक्षीका यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या 02362 228882 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वसतिगृह पुढीलप्रमाणे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मालवण ...

शिक्षक दिनानिमित्त विशेष कार्यक्रम 'लोकशाही जीवनप्रणाली आणि शिक्षण' परिसंवादाचे आयोजन • मुख्य निवडणूक अधिकारी यांची उपस्थिती • जिल्ह्यातील 800 विद्यार्थ्यांचा सहभाग

सिंधुदुर्गनगरी दि 29 जिमाका:- शिक्षक दिनाचे औचित्‍य साधून 5 सष्‍टेंबर 2023 रोजी "लोकशाही जीवनप्रणाली आणि शिक्षण" या विषयावर भोंसले नॉलेज सिटी चराठे, ता. सावंतवाडी येथे मुख्‍य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्‍या प्रमुख उपस्थितीत सकाळी 11 वाजता परिसंवादाचे आयोजन करण्‍यात आले आहेत. या परिसंवादामध्ये भाषा अभ्यासक डॉ. प्रकाश परब, अभिनेत्री संपदा जोगळेकर, मनोविकारतज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर, सामाजिक कार्यकर्त्या वंदना करंबळेकर, छायाचित्रकार इंद्रजीत खांबे, तसेच संवादक डॉ. दीपक पवार सहभागी होणार आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी , महाराष्ट्र शासन, भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त या परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या परिसंवादामध्ये जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील 800 विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये भोसले पॉलिटेक्‍नीक, चराठे, ता. सावंतवाडी 400, बी. एस. बांदेकर, फाईन आर्ट कॉलेज, सावंतवाडी 50, श्री पंचम खेमराज लॉ कॉलेज सावंतवाडी 100,...

सायकलिंग क्रीडा स्पर्धेचा निकाल

सिंधुदुर्गनगरी, दि.25 (जि.मा.का.) : जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग क्रीडा स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील मुलीमध्ये कृतीका देवेंद्र लोहार तर 17 वर्षाखालील मुलीमध्ये तृप्ती दळवी प्रथम आल्या असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक रिझवाना नदाफ, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे, कनिष्ठ लिपीक पंढरीनाथ चव्हाण व सिंधुदुर्ग जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष गजानन कांदळगांवकर, संघटना प्रतिनीधी बापु परब हे उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये टोपीवाला हायस्कुल मालवण डॉन बॉस्को हायस्कुल ओरोस, बॅ.नाथ पै हायस्कुल कुडाळ, न्यु.इंग्लिश स्कुल ओरोस, वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुल मालवण, वराडकर हायस्कुल कट्टा, कुडाळ हायस्कुल कुडाळ, न्यु. इंग्लिश स्कुल पेंडुर या शाळांमधुन एकूण 26 खेळाडू उपस्थित होते. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे 14 वर्षाखालील मुली, प्रथम- कृतीका देवेंद्र लोहार, व्दितीय -श्रावणी प्रशांत इब्रामपुरकर 14 वर्षाखालील मुले, प्रथम- श्राव्य एन झांटये, व्दितीय- सोहम नंदिकिश...

जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धेचा निकाल

सिंधुदुर्गनगरी, दि.25 (जि.मा.का.) : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा विद्यामंदीर प्रशाला कणकवली येथे आयोजन करण्यात आल्या होत्या,या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे आहे. या स्पर्धेचे उद्घाटन तहसीलदार दीक्षांत देशपांडे, कणकवली कॉलेज कणकवली चे प्राचार्य युवराज महालिंगे, यांचे हस्ते झाले. यावेळी तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे, कनिष्ठ लिपीक पंढरीनाथ चव्हाण, व तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष अच्युतराव वणवे, सचिव एकनाथ धनवटे हे उपस्थित होते. ही स्पर्धा पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक पी. जे. कांबळे, क्रीडा शिक्षक सुदिन पेडणेकर, संजय सावळ, जयश्री कसालकर, निलेश फोंडकर, अमोल चौगुले उपस्थित होते. या स्पर्धेचे पंच व तांत्रिक अधिकारी, ऍड. अक्षय कुलकर्णी, अंकुर जाधव, भावना ठाकूर हुमेरा मनसुरी, प्रथमेश घाडी, साहिल बाईत यांचे सहकार्याने स्पर्धा संपन्न झाल्या. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे 14 वर्षाखालील मुले (फॉईल) प्रथम- लतिकेश संतोष धनवटे, व्दितीय- साहिल अडुळकर, तृतीय- तेज नारायण देसाई, सोहम संतोष देसाई. 14 वर्षाखालील म...

आजादी का अमृत महोत्सव सांगता समारोह संपन्न तरुणांनी देश सेवेसाठी पुढे यावे -पालकमंत्री रविंद्र चव्हाण

सिंधुदुर्गनगरी दि.24 (जि.मा.का):- देशाबद्दल सर्वांनाच अभिमान आहे. देशाच्या रक्षणासाठी व स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या शूर सैनिकांनी बलिदान दिले, त्यांच्या बलिदानातूनच देशाला स्वातंत्र्य मिळाले. अशा शूर विरांचे योगदान ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत सर्वांच्या स्मरणात राहील. देश सेवेसाठी तरुणांनी पुढे येण्याचे आवाहन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले. आजादी का अमृत महोत्सवाच्या सांगता समारोह आणि श्रावण मेळा कार्यक्रम पालकमंत्री यांच्या प्रमुख उपस्थित पार पाडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण व मराठी भाषी मंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर आदी उपस्थित होते. यावेळी रान भाजी महोत्सवाचे उद्घाटन देखील पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडले. पालकमंत्री म्हणाले, देशातील प्रत्येक नागरिकाला शूर सैनिकांप्रती अभिमान आहे. देश सेवेसाठी प्राणाची आहूती देणाऱ्या हुतात्म्ये आपल्या कायम स्मरणात राहणार. सामान्य नागरिक म्हणून आपणही देशासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमात...

दोडामार्ग नगर पंचायत कार्यालयाचे भूमिपूजन जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी योगदान द्यावे -केंद्रीयमंत्री नारायण राणे

सिंधुदुर्गनगरी दि.24 (जि.मा.का):- सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. शिवाय शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजना व उपक्रमांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास करणे आवश्यक असून यासाठी सर्वांनी भरीव योगदान देण्याचे आवाहन देखील केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले. कसई-दोडामार्ग नगरपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन, दोडामार्ग नगरपंचायत नूतन अग्निशमन यंत्रणा, तसेच सेल्फी पॉईंटचा लोकार्पण सोहळा श्री. राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षण व मराठी भाषी मंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर आदी उपस्थित होते. श्री. राणे म्हणाले, जिल्ह्यातील तरुणांचे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्ह्यात उद्योग येणे आवश्यक आहे. यासाठी मी वैयक्तिक प्रयत्न करत आहे. वैद्यकीय क्षेत्रात लागणाऱ्या उपकरणांची निर्मिती करणारे उद्योग जिल्ह्यात गुंतवणुकीस तयार आहेत. लवकरच ही प्रक्रीया...

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सिंधुदुर्गात विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.22 (जि.मा.का.) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व संबंधित खेळाच्या संघटनेच्या सहकार्याने जिल्हा संकुल, सिंधुदुर्गनगरी येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध खेळ प्रकारांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली आहे. दि. 29 ऑगस्ट 2023 रोजी क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्गनगरी येथे दि. 26 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजता 18 ते 40 वयोगटांतील पुरुष व महिलांसाठी 100 मीटर धावणे, योगा, फुटबॉल, बॅडमिटन, कॅरम, लंगडी, लिंबू चमचा, तर 41 ते 60 वयोगटातील पुरुष व महिलांसाठी 50 मीटर धावणे, 300 मीटर धावणे, 1 किलोमीटर चालणे, खो-खो, योगासन, कॅरम, बॅडमिंटन, बुध्दिबळ तसेच 60 वर्षाच्यावर वयोगटासाठी 300 मीटर जोरात चालणे, 1 किलोमीटर चालणे, बुध्दिबळ, कॅरम या खेळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्गनगरी येथे होतील. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडुंनी 24 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत आधारकार्डची झेरॉक्स प्रत जोडून आपल्या नावांची नोंदणी जिल्हा क्रीडा अधिकार...

आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.22 (जि.मा.का.) : केंद्र शासन पुरस्कृत आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत दि. 16 ते 31 ऑगस्ट 2023 या कालावधीत कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचा प्रचार व प्रसार आणि लाभार्थी नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. कृषी विभाग तसेच सर्व बँक मार्फत या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. लाभार्थी नोंदणी अभियान राबविण्यासाठी तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, असल्याची माहिती (आत्मा) चे प्रकल्प संचालक बी.बी. नाईकनवरे यानी दिली आहे. कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेंतर्गत आतापर्यंत सद्यस्थितीत जिल्ह्यातून एकूण 105 लाभार्थ्यांनी योजनेसाठी सहभाग नोंदविला आहे. 48 लाभार्थ्याचे या योजनेंतर्गत कर्ज प्रकरणाना मंजुरी मिळालेली आहे. या योजनेंचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2023 या कालावधीत जिल्ह्यामध्ये "लाभार्थी जोडणी अभियान पंधरवडा" राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यात कुडाळ, मालवण, कणकवली, देवगड आणि सावंतवाडी येथे तालुकास्तरीय कार्यशाळा दि. 24 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट 2023 दरम्यान आयोजित करण्यात येत आहेत. यामध्ये आत्मा कृषी विभाग तसे...

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 21 ते 25 ऑगस्ट रोजी आरोग्य शिबीराचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. 18 (जि.मा.का.) : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 21 ते 25 ऑगस्ट 2023 या कालावधीत दररोज देवगड, कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या एसटी डेपोत व गोवा, पुणे, मुंबई या मार्गावर चालणाऱ्या खाजगी प्रवासी बसेसच्या चालकांसाठी झाराप येथे आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी कळविले आहे. या आरोग्य शिबीरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. या शिबीराचा लाभ सर्व प्रकारच्या बस चालक यांनी घ्यावा यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. तसेच नेत्रतपासणीत वाहन चालकास दृष्टीदोष आढळल्यास आवश्यकतेनुसार मोफत चष्मा वाटप करण्यात येणार असून गंभीर दोष असेल तर त्याबाबत शिफारस पत्र देऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत आयोजित मोफत नेत्र तपासणी आरोग्य शिबीर जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड, सावंतवाडी, यांच्या सेवाभावी संस्थेचे सहाकार्यातून घेण्यात येणार आहे. परिवहन आयुक्त, महाराष्ट्र र...

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 18 (जि.मा.का.): तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 354.142 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 79.16 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 74.6720 (76.18), अरुणा – 77.8844 (84.63), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 1.616 (19.82), ओटाव- 3.887 (52.31), देंदोनवाडी – 0.673 (6.87), तरंदळे – 7.776 (79.27), आडेली- 1.254 (97.63), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 3.085 (96.41), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 1.600 (66.50), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 1.892 (75.56), दाभाचीवाडी- 2.235 (92.32), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – 1.385 (100), धामापूर – 0.966 (39.57), हरकूळ -2.380 (100), ओ...

कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 28.4 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि.18 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 28.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 15.5 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 2348.5 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- 8.4 (1911.7), मालवण- 11.9 (2189.7), सावंतवाडी- 21.7 (2780.9), वेंगुर्ला- 8.7 (2286.4), कणकवली- 14.0 (2213.1), कुडाळ- 28.4 (2498.1), वैभववाडी- 9.4 (2612.5), दोडामार्ग- 23.3 (2831.3) असा पाऊस झाला आहे. ००००

बसचालकांनी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी करुन घ्यावी -निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे

सिंधुदुर्गनगरी, दि. 18 (जि.मा.का.) : बसेसच्या अपघातांमध्ये होणारी मोठ्या प्रमाणातील जिवितहानी टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या बसचालकांनी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी करुन घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा पोलीस उपअधीक्षक के. एल. सावंत, राज्य परिवहन महामंडळ विभाग नियंत्रक अभिजीत पाटील, कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप विभागीय अधिकारी व्ही.व्ही. जोशी, सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभाग उप कार्यकारी अभियंता सीमा गोवेकर, राष्ट्रीय महामार्ग उप विभाग सावंतवाडी आर.पी. कांबळे, राष्ट्रीय महामार्ग उप विभाग खारेपाटण ए.एस. शिमीवाळ, सावंतवाडी मुख्याधिकारी सागर साळुंखे, महामार्ग पोलीसचे व्ही. बी. केसरकर, सहायक पोलीस निरीक्षक भारत फारने, जिल्हा रुग्णालयतील डॉ. अमित आवळे आदी उपस्थित होते. श्री. सुकटे म्हणाले, उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत दि. 21 ते 25 ऑगस्ट 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्...

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 21 ऑगस्ट रोजी आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.17 (जि.मा.का): माहे ऑगस्ट 2023 च्या जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 ते दु. 1 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. तरी समस्याग्रस्त व पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी हक्कांचे व्यासपीठ मिळावे, त्यांचे तक्रारी व अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिण्याच्या तिसऱ्या सोमवारी / तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. समस्याग्रस्त व पीडित महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहीत नमुण्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत दालन क्र. 106,ए-ब्लॉक, मळमजला सिंधुदुर्गनगरी ओरोस येथून उपलब्ध करुन घ्यावेत. तसेच न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहीत नमु...

राष्ट्रीय लोक अदालतीचे 9 सप्टेंबर रोजी आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. 17 (जि.मा.का.) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयात 9 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले असल्याचे माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए.बी. कुरणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग ओरोस, दिवाणी न्यायालय (व. स्तर), मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय, सिंधुदुर्ग या न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची प्रलंबित प्रकरणे, जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोकन्यायालयात नेमुन घेण्याबाबत पक्षकारांना आवाहन करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष एस.जे. भारुका यांनी याबाबत सांगितले की, दिवाणी तडजोडपात्र स्वरुपाची फौजदारी, कौटुंबिक वाद, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे 9 सप्टेंबर ...

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

सिंधुदुर्गनगरी दि.15 (जि.मा.का):- जनतेच्या कल्याणासाठी शासन अनेक योजना राबवित असते. अशा योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले. स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण श्री केसरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जनतेला दिलेल्या शुभेच्छापर भाषणात ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी , मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलिस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल उपस्थित होते. श्री. केसरकर म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य चळवळीला गौरवशाली इतिहास आहे. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले योगदान दिले. या लढ्याच्या यज्ञात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अशा अनेकांच्या त्यागातून, प्राणार्पणातून आपल्याला स्वराज्य मिळाले आहे. अशा या स्वातंत्र्य लढ्यातील सर्व ज्ञात- अज्ञात वीरांना माझे त्रिवार नमन. या लढ्यातील क्रांतिकारक तसेच अज्ञात नायकांच्या घडलेल्या विविध घटनांचे स्मरण होण्यासाठी ‘माझी माती- माझा देश’ हे विशेष अभियान सुरू झालेले आहे. य...

शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर जिल्हा दौऱ्यावर

सुधारित शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर जिल्हा दौऱ्यावर सिंधुदुर्गनगरी दि.14 (जि.मा.का):- शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार, दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 08.45 वा. शासकीय विश्रामगृह, ओरोस येथून मोटारीने पोलीस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्गनगरी कडे प्रयाण. सकाळी 09.04 वा. सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, पोलीस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्गनगरी, ता. कुडाळ येथे आगमन. सकाळी 09.05 वा. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्‍य शासकीय समारंभ (स्थळ- सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, पोलीस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्गनगरी ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग). सकाळी 9.30 वा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांसमवेत भेट (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस- सिंधुदुर्ग). सकाळी 09.45 वा. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालय येथील उपोषणकर्त्यांची भेट. सकाळी 10.00 वा. जिल्हाधिकारी यांच...

तलाठी भरती परीक्षा करिता मदत कक्षाची स्थापना

सिंधुदुर्गनगरी, दि.14 (जि.मा.का.) : महसूल विभागातील गट-क संवर्गातील तलाठी पदाची परीक्षा टीसीएस कंपनीमार्फत दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत होणार आहेत. सदर परीक्षेच्या अनुषंगाने अर्जदार यांच्या प्रवेशपत्र, परीक्षा केंद्राच्या माहितीबाबत तसेच त्यांना येणाऱ्या इतर अडचणीकरीता परीक्षेच्या तारखेनुसार तसेच सुट्टीच्या दिवशी पुढीलप्रमाणे मदत कक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्यात आल्याची मा‍हिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे. नाव पदनाम व दूरध्वनी नंबर, मोबाईल क्रमांक निहाय पुढीलप्रमाणे- श्रीधर पाटील, तहसिलदार महसूल, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग 02362-229000 मो. क्र. 7588065694 विजय वरक, नायब तहसिलदार, मो. क्र. 9423236054, अनिल पवार,अव्वल कारकून, मो क्र. 9422373729, एम.ए. पाटकर,अव्वल कारकून, मो. क्र.9730093801, एस.एल. गाड, महसूल सहायक, मो क्र. 9834915332, एस.बी. देसाई महसूल सहायक, मो क्र. 9370363453 या क्रमांकावर संपर्क साधावा. 00000

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ

सिंधुदुर्गनगरी, दि.14 (जि.मा.का.) : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पार पडणार आहे. हा समारंभ मंगळवार, दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9.05 वा. सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, पोलीस परेड ग्राऊंड सिंधुदुर्गनगरी येथे पार पडणार आहे. ध्वजारोहणानंतर सकाळी 9.05 ते 9.15 वा. पोलीस दल, राज्य राखीव दल व होमगार्ड यांची संयुक्त मानवंदना होणार आहे. तरी या समारंभाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 00000

शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी दि.14 (जि.मा.का):- शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार, दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 08.45 वा. शासकीय विश्रामगृह, ओरोस येथून मोटारीने पोलीस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्गनगरी कडे प्रयाण. सकाळी 09.04 वा. सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, पोलीस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्गनगरी, ता. कुडाळ येथे आगमन. सकाळी 09.05 वा. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्‍य शासकीय समारंभ (स्थळ- सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, पोलीस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्गनगरी ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग). सकाळी 09.33. वा. पोलीस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्गनगरी येथून मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस कडे प्रयाण. सकाळी 09.40 वा. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालय येथील उपोषणकर्त्यांची भेट. सकाळी 10.00 वा. जिल्हाधिकारी यांच्या समवेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांसमवेत चहापान व संवाद (स्थळ...

‘आंबोली वर्षा पर्यटन महोत्सवा’चे उद्घाटन आंबोली हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ व्हाव - दीपक केसरकर

सिंधुदुर्गनगरी, दि.12 (जि.मा.का.) : जुलै आणि ऑगस्ट महिन्यात आंबोली परिसरात सर्वात जास्त पाऊस पडतो. ही नैसर्गिक देणगी आंबोलीला लाभलेली आहे. शिवाय हा परिसर जैवविविधतेने नटलेला आहे. या परिसरातले सौंदर्य जपत आंबोली हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ होऊन या परिसराचा विकास करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत आंबोली येथील ग्रामसचिवालयात ‘आंबोली वर्षा पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन श्री. केसरकर यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते. हा महोत्सव 12 ते 16 ऑगस्ट दरम्यान सुरू असणार आहे. यावेळी आंबोली पर्यटन माहिती पुस्तिका 2023 चे प्रकाशन व संकेतस्थळाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, माजी आमदार राजन तेली, प्रभाकर सावंत, अश...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबविण्यासाठी पात्र संस्थानी 7 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करा

सिंधुदुर्गनगरी, दि.11 (जि.मा.का.) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबविण्यासाठी पात्र संस्थेकडून जिल्हा स्तरावर प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक व पात्र संस्थानी 3 प्रतीत दि. 7 सप्टेंबर 2023 पर्यत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे. महिला व बाल विकास विभागांतर्गत अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर, दुर्धर आजारी पालकांची मुले, कैद्यांची मुले, काळजी व संरक्षंणाची गरज असलेल्या 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुला मुलींना संस्थेत दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटुंब उपलब्ध करुन देणे व संस्थेतील वातावराणाऐवजी कौटुंबिक वातावरणात त्याचे संगोपन व विकास घडवून आणणे या उद्देशाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना 30/5/2023 च्या शासन निर्णयानुसार कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या शासन निर्णयातील तरतुदीच्या अनुषंगाने बालसंगोपन योजना जिल्हास्तरावर राबविण्याकरीता विहित पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची निव करण्याकरिता शासन निर्णयातील परिशिष्ट ब, क, ड, फ, व इ नुसार संस्थांकडून प्रस्ताव मागविण्य...

जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी गोवर्गिय जनावरांचे लसीकरण करुन घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.11 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील गोवर्गिय जनावरांना लम्पी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पशुसंवर्धन विभाग युध्दपातळीवर लसीकरण करत आहे. जिल्ह्यात 70 टक्के जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. ज्या जनावरांचे लसीकरण अद्यापही झालेले नाही त्यांनी तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी आपल्या जनावरांना लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा पशुसवर्धन अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी केले आहे. लम्पी हा विषाणुजन्य रोग असल्याने सन 2023-24 मध्ये साधारणतः जुलै 23 पासून जिल्हयामध्ये लम्पी आजार काही जनावरांमध्ये आढळू लागला. यामध्ये प्रामुख्याने मागील एक वर्षामध्ये जन्माला आलेली व लसीकरण न झालेल्या जनावरांचा समावेश होता. चालु वर्षामध्ये 1 एप्रिल 2023 पासून आजअखेर 669 जनावरांना या रोगाची लागण झालेली असुन त्यापैकी 372 जनावरे उपचाराने बरी व 28 जनावरांचा मृत्यु झाला आहे. 269 जनावरे सध्या बाधित असुन उपचार सुरू आहेत. चालु वर्षी सुध्दा शासनाने मृत जनावरांसाठी नुकसान भरपाईची तरतुद केली असुन मृत जनावरांच्या मालकांना न...

शामराव पेजे इतर मागासवर्ग महामंडळामार्फत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनाचा लाभ घ्यावा

सिंधुदुर्गनगरी,दि.11 (जि.मा.का.) : इतर मागासवरर्गीय आर्थिक विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्ग प्रवर्गातील हातकरु, गरजू विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांनी केले आहे. शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना :- इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिणाकरीता बँकेमार्फत मंजूर केलेल्या रु. 20 लक्ष पर्यंत कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा महामंडळाकडून वितरीत केला जाईल. योजनेचे स्वरुप: राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रु 10 लक्ष पर्यंत. परदेशी अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रु. 20 लक्ष पर्यंत. लाभार्थी पात्रतेच्या अटी व शर्ती- अर्जदाराचे वय 17 ते 30 वर्षे असावे. अर्जदार हा इतर मागास प्रवर्गातील असणे, तो महाराष्ट्राचा रहीवासी असावा. अर्जदाचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामिण व शहरी भागाकरीता रु.8 लक्ष पर्यंत असावी. अर्जदार हा इयत्ता 12 वी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा तसेच पदवीच्या व्दितीय वर्षे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ...

जिल्ह्यात 24 ऑगस्टपर्यंत मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी, दि. 10 (जि.मा.का) : जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी. यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी, त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी दु.12.00 वाजल्यापासून ते दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी 24.00 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला आहे. जिल्ह्यात दि.15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्यदिनी, दि. 16 ऑगस्ट 2023 रोजी पारसी न्यू ईयर, दिनांक 17 ऑगस्ट रोजी श्रावण मासारंभ दि. 21 ऑगस्ट 2023 रोजी नागपंचमी सण, उत्सव पारंपारिक पध्दतीने साजरे करण्यात येणार आहेत. यापूर्वी राज्यात सण, उत्सवाचे कालावधीत जातीय घटना घडलेल्या असून त्याचे पडसाद राज्यात उमटून विविध राजकिय पक्ष व संघटना आक्रमक झालेल्या आहेत. आगामी काळात त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटून जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच राज्यातील सध्याची राजकिय परिस्थिती पाहता काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते...

आंबोली वर्षा महोत्सवाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.10 (जि.मा.का.) : पर्यटन संचालनालय आणि जिल्हा प्रशासन यांच्या सहकार्याने दि. 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या कालावधीत "आंबोली वर्षा महोत्सव 2023" चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव आंबोली ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात येत असल्याची माहिती हनुमंत हेडे, उपसंचालक पर्यटन संचालनालय कोकण विभाग नवी मुंबई यांनी दिली. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या प्रसिद्धी व प्रचालनासाठी तसेच पर्यटकांच्या वाढीसाठी जिल्हास्तरावर जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने या स्थळांची पर्यटकांना ओळख व्हावी, या दृष्टीने "आंबोली वर्षा महोत्सव 2023" चे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षा महोत्सवामध्ये कोकणातील सांस्कृतिक पार्श्वभूमी लक्षात घेता विविध सांकृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. दशावतार, फुगडी, चांगभल असे विविध प्रकार इथे पहावयास मिळतील. शहीद हवालदार पांडुरंग गावडे स्मारक येथे माजी सैनिकांचे संचलन तसेच इतर साहसी पर्यटन ऍक्टिव्हिटी चे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील आंबोली हे पर्यटन स्थळ पर्यटनाच्या वेगवेगळ्या आकर्षाणानी समृद्ध...

सहकार विभागात गट-क पदभरती 14 व 16 ऑगस्टला ऑनलाईन परीक्षा

सिंधुदुर्गनगरी, दि.10 (जि.मा.का.) : सहकार विभागातील गट-क वर्गातील सरळसेवेव्दारे भरण्यात येणाऱ्या रिक्त पदांसाठी टी.सी.एस. कंपनीमार्फत सोमवार, 14 ऑगस्ट आणि बुधवार, 16 ऑगस्ट 2023 रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक एम.बी. सांगळे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील केंद्र मेट्रोपोलिटन इन्स्टीटयुट ऑफ टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंट ओरोस, मु. सुकळवाड पो. ओरोस ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथे सोमवार दि. 14 ऑगस्ट आणि बुधवार 16 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 8.30 ते 10.30 वाजता आणि दुपारी 12.30 ते 2.30 वाजता तसेच सायं. 4.30 ते 6.30 वाजता अशा तीन सत्रात ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या प्रवेशपत्राबाबतच्या सूचना उमेदवारांनी अर्ज सादर करतेवेळी नोंदणीकृत केलेल्या भ्रमणध्वनीवर आणि ई-मेल आयडीवर पाठविण्यात आल्या आहेत. प्रवेशपत्र डाऊनलोड करावयाची लिंक आणि याबाबतच्या सूचना सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी संकेतस्थळ...

मालवण तालुक्यात सर्वाधिक 8.7 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि.10 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 8.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 7.0 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 2310.7 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- 7.2 (1884.8), मालवण- 8.7 (2157.8), सावंतवाडी- 7.4 (2732.8), वेंगुर्ला- 8.2 (2267.6), कणकवली- 5.9 (2180.6), कुडाळ- 7.8 (2441.8), वैभववाडी- 0.5 (2579.2), दोडामार्ग- 7.6 (2759.4) असा पाऊस झाला आहे. ००००

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 10 (जि.मा.का.): तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 361.639 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 80.84 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 71.4190 (72.86), अरुणा – 78.1636 (84.94), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 1.575 (19.33), ओटाव- 4.128 (55.53), देंदोनवाडी – 0.735 (7.50), तरंदळे – 7.597 (77.44), आडेली- 1.288 (100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 3.057 (95.53), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 1.587 (65.96), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 1.821 (72.72), दाभाचीवाडी- 2.209 (91.24), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – 1.385 (100), धामापूर – 0.841 (34.45), हरकूळ -2.380 (100), ओसरगाव – 1.339 (10...

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 10 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.600 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 3.200 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर इतकी आहे. कणकवली-वागदे, राष्ट्रीय महामार्ग 66 पूलाजवळ गडनदीची पातळी 35.000 मीटर इतकी असून इशारापातळी 36.764 मीटर व धोका पातळी 37.920 मीटर इतकी आहे. तेरेखोल नदीची पाणी पातळी इन्सुली चेकपोस्ट पुलाजवळ 1.700 मीटर इतकी असून इशारा पातळी 4.260 मीटर व धोका पातळी 6.260 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

'माझी माती माझा देश' या अभियानांतर्गत अधिकारी-कर्मचारी यांनी घेतली पंचप्रण शपथ

सिंधुदुर्गनगरी, दि.8 (जि.मा.का.) : केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत 'मेरी माटी मेरा देश' अर्थात माझी माती माझा देश या अभियानांतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यांनी पंचप्रण शपथ घेतली. यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती, प्रशिक्षणार्थी आयएएस विशाल खत्री, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली पंचप्रण शपथ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने 'मेरी माटी मेरा देश' अर्थात माझी माती माझा देश अभियानांतर्गत आज येथील जिल्हा परिषद छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी मातीच्या कलशाला पुष्पहार अर्पण केले. यावेळी जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पंचप्रण शपथ घेतली. 00000

'मेरी माटी मेरा देश' अंतर्गत जिल्हा ग्रंथालय येथे ग्रंथप्रदर्शन

सिंधुदुर्गनगरी, दि.8 (जि.मा.का.) : स्वातंत्र्याचा अमृत माहोत्सव वर्षाचा उपक्रम संपन्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 'मेरी माटी मेरा देश' अर्थात 'माझी माती माझा देश' या नवीन उपक्रमाची घोषणा केलेली आहे. या नवीन उपक्रमानिर्मित्त जिल्हा ग्रंथालय कार्यालयामार्फत ग्रंथप्रदर्शन दि. 9 ते 11 ऑगस्ट 2023 रोजी कार्यालयीन वेळेत आयोजित करण्यात आला आहे. तरी शासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच वाचक सभासद यांनी ग्रंथप्रदर्शन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी केले आहे. ००००

जिल्ह्यातील कृषी प्रक्रिया जागृती पंधरवडामध्ये लाभार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.08 (जि.मा.का.) :कार्यरत व नवीन सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचा विस्तार वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि नवे सुक्ष्म उद्योग सुरु करण्याकरिता बँक कर्जाशी निगडीत लाभ देण्यासाठी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये 15 ऑगस्ट पर्यंत कृषी प्रक्रिया जागृती पंधरवडा राबविण्यात येत आहे. या कालावधीत जास्तीत जास्त इच्छुक लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवावा. यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयास अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमध्ये नाशवंत फळपिके, भाजीपाला, अन्नधान्य, तृणधान्य, कडधान्य, प्रक्रिया, दुग्ध व पशू उत्पादने, सागरी उत्पादने, मांस उत्पादने, वन उत्पादने, इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत प्रगतशील शेतकारी, नव उद्योजक, बेरोजगार युवक, महिला वैयक्तिक मालकी किंवा भागीदारी, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट, सहकारी संस्था, खासगी कंपन्या, यांना प्रकल्प किमतीच्या 35 टक्के जास्तीत जास्त 10 ...

जिल्ह्यातील उद्योजक व उमेदवारांनी ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.08 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील खासगी उद्योजक व बेरोजगार उमेदवारांसाठी बुधवार दि.23 ऑगस्ट 2023 रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील उद्योजक व उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त ग.पां चिमणकर यांनी केले आहे. उद्योजकांनी आपल्या आस्थापनेवार असलेली रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर Sindhudurg pandit Dindayal Upadhyay Online job Fair ४ मध्ये अधिसूचित करावीत. ज्या उद्योग आस्थापनांनी पोर्टलवर नोंदणी केलेली नाही परंतु त्यांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे. अशा उद्योजकांनी प्रथम पोर्टलवर नोंदणी करुन रिक्तपदे अधिसूचित करावीत. उद्योजकांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळवा 4 मध्ये रिक्तपदे अधिसूचित केल्यानंतर नोकरी साधक (JOB SEEKER)उमेदवारांनी वरिल पोर्टलवर स्वत:च्या लॉगीनने आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित पदासाठी ॲप्लाई करावे. अधिक माहितीसाठी 02362 228835, ई-मेल sindhudurgrojgar@gmali.com वर संपर्क साधावा. 00...
शासनाच्या योजनांची माहिती पुस्तिका तयार करुन ती तळागाळापर्यंत पोहोचवा - डॉ. महेंद्र कल्याणकर मंडळ स्तरापर्यंत 3 हजार 760 विविध दाखल्यांचे वितरण -जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी सिंधुदुर्गनगरी, दि.06 (जि.मा.का.) : महसूल विभाग शासनाचा महत्वाचा विभाग असून या विभागामार्फत अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजना पात्र असणाऱ्या लाभार्थ्यापर्यंत जाण्यासाठी योजनांची माहिती असणारी पुस्तिका तयार करुन ती महसूल दूतांच्यामार्फत तळागाळापर्यंत पोहोचवावी. तसेच यासाठी सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांनीही आपला सहभाग द्यावा, असे आवाहन कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले. महसूल सप्ताहानिमित्त नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृहात महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित सेवाविषयक बाबी निकाली काढणे, तसेच विविध लाभार्थींना लाभ प्रदान करणे या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, रत्नागिरी जिल्ह...

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 35.8 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि.5 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 35.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 14.0 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 2263.7 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- 8.6 (1843.5), मालवण- 12.05 (2127.7), सावंतवाडी- 14.7 (2669.3), वेंगुर्ला- 10.0 (2235.1), कणकवली- 16.8 (2136.0), कुडाळ- 11.3 (2389.9), वैभववाडी- 17.8 (2502.4), दोडामार्ग- 35.8 (2695.7) असा पाऊस झाला आहे. ००००

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 5 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 368.441 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 82.36 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 67.7200 (69.09), अरुणा – 78.4429 (85.24), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 1.708 (20.96), ओटाव- 4.282 (57.62), देंदोनवाडी – 0.716 (7.31), तरंदळे – 7.151 (72.90), आडेली- 1.288 (100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 2.997 (96.66), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 1.561 (64.88), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 1.764 (70.45), दाभाचीवाडी- 2.209 (91.24), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – 1.385 (100), धामापूर – 1.116 (45.72), हरकूळ -2.380 (100), ओसरग...

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 5 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 39.200 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 3.300 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर इतकी आहे. कणकवली-वागदे, राष्ट्रीय महामार्ग 66 पूलाजवळ गडनदीची पातळी 35.000 मीटर इतकी असून इशारापातळी 36.764 मीटर व धोका पातळी 37.920 मीटर इतकी आहे. तेरेखोल नदीची पाणी पातळी इन्सुली चेकपोस्ट पुलाजवळ 1.700 मीटर इतकी असून इशारा पातळी 4.260 मीटर व धोका पातळी 6.260 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

जिल्हा परिषदेत 334 पदांसाठी भरती

सिंधुदुर्गनगरी, दि.4 (जि.मा.का.) : ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदाकडील गट क मधील रिक्त पदे भरण्यास शासन स्तरावरुन मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद सिंधुदुर्गकडील 17 संवर्गाच्या 334 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. यासाठी शनिवार दि.5 ऑगस्ट 2023 पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याची, माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली आहे. जाहिरातीचा संपूर्ण तपशिल जिल्हा परिषदेच्या www.zpsindhudurg.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी जाहिरातीत नमूद संपुर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन पध्दतीनेच https://ibpsonline.ibps.in/zpvpjun२३/ या संकेतस्थळावर अर्ज दि. 5 ऑगस्ट 2023 पासून ते दि. 25 ऑगस्ट 2023 रोजी 23.59 वाजेपर्यत सादर करता येणार आहेत. भरती परीक्षा IBPS या कंपीनव्दारे ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या www.zpsindhudurg.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच अर्ज दाखल करण्यात काही अडचणी आल्यास जिल्हा पर...

टपाल विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावर पत्रलेखन स्पर्धा

सिंधुदुर्गनगरी, दि.4 (जि.मा.का.) : भारतीय टपाल विभागामार्फत या वर्षी "ढाई आखर" या राष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी या स्पर्धेत दि.31 ऑक्टोबर पर्यंत सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुदुर्ग विभागाचे डाकघर अधीक्षक मयुरेश कोले यांनी केले आहे. या स्पर्धेचे विषय "नवीन भारतासाठी डिजिटल इंडिया" असे असून मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील पत्र स्वीकारले जाणार आहे. हि स्पर्धा खुली असून 18 वर्षापर्यंत व 18 वर्षावरील अशा दोन गटात होइल. पत्रलेखनाकरिता शब्द मर्यादा पोस्ट लिफाफा / साध्या लिफापयामधून आवश्यक तिकीट लावून ए-4 साईज पेपरवर जास्तीत जास्त 1000 शब्द व आंतर्देशीय पत्रावर जास्तीत जास्त 500 शब्द आहे. स्पर्धकांनी लिफाफ्यावर/ आंतर्देशीय पत्रावर आपले नाव व संपूर्ण पत्ता लिहावा तसेच लिफाफा /आंतर्देशीय पत्रावर वरील बाजूस "ढाई आखर" राष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धा असे नमूद करावे. स्पर्धकांनी सदरची पत्र दि. 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई 400001...

सोमवारी लोकशाही दिन

सिंधुदुर्गनगरी, दि.4 (जि.मा.का.) : माहे ऑगस्ट महिन्यातील लोकशाही दिन हा महिन्याच्या पहिला सोमवार दि.7 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 1 ते 2 या वेळेत, जिल्हाधिकारी कार्यालयात राबविण्यात येणार असल्याची, माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी दिली आहे. 0000

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘एक हात मदतीचा’ उपक्रम शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा -पालकमंत्री रविंद्र चव्हाण

Image
सिंधुदुर्गनगरी, दि.03 (जि.मा.का.) : शासन नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवित असते. या योजना पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यामध्ये महसूल विभागाची भूमिका महत्वाची आहे. महसूल सप्ताहानिमित्त सर्व यंत्रणांनी शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले. शासनाच्या कामकाजबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दिंगत व्हावा यासाठी ‘महसूल सप्ताह’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ह्या उपक्रमांतर्गत गुरूवार 3 ऑगस्ट रोजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘एक हात मदतीचा’ हा विशेष कार्यक्रम कुडाळ येथे संपन्न झाला. ह्या कार्यक्रमात अतिवृष्टी, पूर अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधीत झालेल्या नारिकांना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार नुकसान भरपाई धनादेश वाटप, कातकरी उत्थान अभियान अंतर्गत विविध दाखल्यांचे वाटप वैयक्तिक लाभांच्या योजना अश्या अनेक योजनांचा लाभ पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. अतिवृष्टीमुळे पुरात वाहून गेलेल्या शिवापूर येथील तुकाराम राऊळ यांच्या कुटुंबियांना 4 लाख मदतीचा धनादेश देखील देण्यात...

महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.3 (जि.मा.का.) : महाराष्ट्र राज्य नाविन्यता परिषदेमार्फत महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज ही स्पर्धा राबविण्यात येत असून या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील संस्था, महाविद्यालय व विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र.सहायक आयुक्त ग.पां.चिमणकर यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य नाविन्यता परिषदेमार्फत राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी व नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यसाठी महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज चे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांचा शोध घेणे व त्यांचे नवउद्योजकतेचे स्वप्न साकार करण्यासाठी योग्य ते पाठबळ पुरविणे हे महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चैलेजचे मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाच्या नोंदणीकरीता संस्थानी / महाविद्यालयांनी दिनांक 15 जुलै 2023 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये आणि नवसंकल्पना असलेल्या विद्यार्थी उमेदवारांनी दिनांक 1 ऑगस्ट 2023 ते दि.31 ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये अर्ज करावेत. यात सहभागी होण्याकरिता w...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी 15 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करा

सिंधुदुर्गनगरी, दि.3 (जि.मा.का.) : महिला व बाल विकास विभागाकडून महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेविकांना व संस्थाना दरवर्षी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात येते. सन २०२०-२१,२०२१-२२,२०२२-२३ व सन २०२३-२४ या कालावधीच्या पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती, संस्थेकडून दि.15 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करण्याचे, आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे. चार वषाचे प्रस्ताव मागविण्यात आले असून इच्छुक व्यक्तीला/ संस्थेला एका वेळी कोणत्याही एका वर्षासाठी प्रस्ताव करता येईल, पुरस्काराचे स्वरूप व अर्हता पुढीलप्रमाणे आहेत राज्यस्तरीय पुरस्कार:- रु.१,००,००१/- (अक्षरी रु.एक लाख एक मात्र) रोख स्मृती चिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ सदर पुरस्काराकरिता महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये विमान 25 वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव असावा. ज्या महिलांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्कार, दलितमित्र पुरस्कार,अथवा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झालेला आहे. अशा महिलांना पुरस्कार मिळाल्याचे 5 वर्षापर्यंत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पात्र र...

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी, दि.7 (जि.मा.का.) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 3 ऑगस्ट 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दि. 3 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 3.05 वाजता मनोहर विमानतळ (मोपा) गोवा येथे आगमन व कुडाळ जि. सिुंधुदुर्गकडे प्रयाण. दुपारी 4.00 वाजता कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व 'महसूल दिन' या कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- सिध्दीविनायक हॉल, कुडाळ. रात्री 7.30 वाजता कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथून मनोहर विमानतळ (मोपा), गोवाकडे प्रयाण. ००००

महसूल सप्ताहानिमित्त नागरिकांना घरपोच दाखल्यांचे वाटप

सिंधुदुर्गनगरी, दि.2 (जिमाका) : शासनाकडून देण्यात येणाऱ्या सेवा पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे महत्वपूर्ण काम महसूल विभाग करते. ह्या अनुषंगाने 7 ऑगस्ट पर्यंत ‘महसूल सप्ताह’ सुरू आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या पुढाकारातून दुर्गम भागातील नागरिकांना महसूल दुतामार्फत जातीचे दाखले घरपोच वाटप करण्यात आले. या विशेष अभियानांतर्गत देवगड तालुक्यात कातकरी वस्तीमध्ये जाऊन त्यांना जातीचे दाखले देण्यात आले आहे. मोंड -11, सौंदाळे-13, मुणगे-14 तर शिरगाव येथे 6 दाखल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, तहसिलदार आर.जे.पवार आदी उपस्थित होते. 0000000

महसूल सप्ताहानिमित्त कुडाळ येथे कार्यक्रम पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘एक हात मदतीचा’ उपक्रम

सिंधुदुर्गनगरी, दि.2 (जिमाका वृत्तसेवा) : शासनाकडून देण्यात येणाऱ्या सेवा, विविध योजना याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाच्या कामकाजबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दिंगत व्हावा यासाठी ‘महसूल सप्ताह’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ह्या उपक्रमांतर्गत गुरूवार 3 ऑगस्ट रोजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘एक हात मदतीचा’ हा विशेष कार्यक्रम संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम दुपारी ठिक 4 वाजता कुडाळ येथील सिध्दीविनायक मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे. ह्या कार्यक्रमात अतिवृष्टी , पूर अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधीत झालेल्या नारिकांना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार नुकसान भरपाई देण्यात येणार आहे तसेच कातकरी उत्थान अभियान अंतर्गत विविध दाखल्यांचे वाटप देखील करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे. 00000

गौरव सोहळा व महसूल दिन सप्ताहाचा शुभारंभ महसूल सप्ताहाच्या माध्यमातून नागरिकांना घरपोच सेवा द्या -के. मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी, दि.1 (जि.मा.का.) : शासन अनेक कल्याणकारी योजना आणि उपक्रम राबवित असते. शासनाकडून देण्यात येणाऱ्या सेवा पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यामध्ये महसूल विभागाची महत्वाची भूमिका आहे. या अनुषंगाने 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत ‘महसूल सप्ताह’साजरा करण्यात येतो. या सप्ताहाच्या माध्यमातून नागरिकांना घरपोच सेवा देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात गौरव सोहळा व महसूल दिन सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते झाला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सन 2022-23 मध्ये उल्लेखनिय कामगिरी केलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा सत्कार देखील करण्यात आला. या प्रसंगी परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी करिष्मा नायर, विशाल खत्री, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपविभागीय अधिकारी श्रीमती एैश्वर्या काळुशे, उपजिल्हाधिकारी अविशकुमार सोनोने आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाल्या, महसूल सप्ताहाच्या माध्यमातून सर्व तहसिलदार, मंडळ अधिकारी तसेच तलाठी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील अतिदुर्गम भागात शिबीराचे आयोजन करावे. या शिब...