Posts

Showing posts from May, 2023

वाजवी दरात हळद कंदांसाठी डॉ.हेगडेवार प्रकल्पाशी संपर्क करा - प्र.कृषी विकास अधिकारी विरेश अंधारी

सिंधुदुर्गनगरी,दि. 31 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील जे शेतकरी हळदीच्या कंदाव्दारे लागवड करणार आहेत, अशा शेतकऱ्यांना वाजवी दरात कंद डॉ. हेगडेवार प्रकल्प माणगांव ता. कुडाळ यांच्याकडे उपलब्ध होणार आहेज. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी डॉ. हेगडेवार प्रकल्प, माणगांव येथे संपर्क साधावा. ज्या बचतगटानी हळद कंदांचे (बियाण्यांचे) उत्पादन केले आहे. बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे, अशा बचतगटांची माहीती तालुका समन्वयक उमेद अभियान कक्ष यांच्यामार्फत एकत्रित केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी हळद लागवड करण्यासाठी बियाणे कंद आवश्यक आहे. अशा इच्छुक शेतकऱ्यांनी आपली मागणी राज्यस्तर कृषी विभाग, कृषी विभाग जिल्हा परिषद, पंचायत समिती कृषी विभाग तसेच डॉ. हेगडेवार प्रकल्प माणगांव, भगिरथ प्रतिष्ठान झाराप, उमेद अभियान समन्वयक (तालुका कक्ष) यांच्याकडे नोंदवावे असे आवाहन प्र.कृषी विकास अधिकारी विरेश अंधारी यांनी केले. जिल्ह्यामध्ये हळद लागवडीखाली सुमारे 245.30 हे. क्षेत्र असून या पिकासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये क्षेत्र विस्तारासाठी संधी आहेत. बदललेल्या हवामान परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी शेतकऱ्यांना ...

बनावट प्रमाणपत्राआधारे पोलीस होणाऱ्या दोघांवर गन्हे

सिंधुदुर्गनगरी, दि.31 (जि.मा.का.) : जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२१ प्रक्रियेमध्ये बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळविणाऱ्या २ उमेदवारांवर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात फसवणुकी अंतर्गतगुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली . महाराष्ट्र शासनाकडून पोलीस शिपाई भरती २०२१ प्रक्रिया माहे नोव्हेंबर २०२२ पासून माहे मे २०२३ या कालावधीमध्ये पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हयामध्ये राबविण्यात आली. सदरच्या भरती प्रक्रियेमध्ये कागदपत्रांची छाननी, मैदानी चाचणी परिक्षा, लेखी परिक्षा व वैद्यकिय चाचणी घेवून उमेदवारांना पात्र, अपात्र ठरविण्यात आले. उमेदवारांकडून प्राप्त कागदपत्रांची छाननी करण्यात आल्यावर त्याची सत्यता पडताळणी करीता संबंधीत विभागांकडे पाठविण्यात आली. लातूर व बिड जिल्ह्यातील २ उमेदवारांनी बनावट भूकंपग्रस्त प्रमाणपत्र व बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र पोलीस भरतीकरिता सादर केल्याचे पडताळणीमध्ये निष्पन्न झाले. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सदर प्रकरणाची गंभिर दखल घेवून शासनाची फसव...

सोमवारी लोकशाही दिन

सिंधुदुर्गनगरी, दि.31 (जि.मा.का.) : माहे जून महिन्यातील लोकशाही दिन हा महिन्याचा पहिला सोमवार दि.5 जून 2023 रोजी दुपारी 1 ते 2 या वेळेत होणार, जिल्हाधिकारी कार्यालयात होणार असल्याची, माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आली आहे. 0000

तलाठी पदभरतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मदत कक्ष

सिंधुदुर्गनगरी,दि.31 (जि.मा.का.) : जिल्‍हाधिकारी कार्यालय यांच्‍या आस्‍थापनेवरील तलाठी पदभरतीसाठी अर्ज केलेल्‍या उमेदवारांच्‍या अडी अडचणी दूर करण्‍यासाठी आणि त्‍यांना मार्गदर्शन करण्‍याकरिता जिल्‍हाधिकारी कार्यालयात मदत कक्ष (हेल्‍प डेस्‍क) 02362-228845 स्‍थापन करण्‍यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी पदभरतीच्या अनुषंगाने महसूल व वन विभाग यांच्याकडील पत्रानुसार तलाठी (गट-क) संवर्गाची सरळसेवा पदभरती प्रक्रिया राबवून संपूर्ण भरती प्रक्रीया पार पाडण्यासाठी शासन स्तरावरुन जाहिरात प्रसिध्दी देण्यात येणार असून, तलाठी पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या अडी अडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता विभागस्तरावर व जिल्हास्तरावर मदत कक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्यातबाबत अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक,भूमी अभिलेख पुणे यांच्याकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. 0000

झाराप आणि इन्सुली पुलासाठी 68 कोटी, व्हाईट टॉपींगसाठी 38 कोटी आंबोली - रेडी रस्ता क्राँक्रीटीकरणाचा प्रस्ताव मुंबई-गोवा महामार्ग पूर्णत्वासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री रविंद्र चव्हाण

Image
सिंधुदुर्गनगरी,दि.30 (जि.मा.का.) : मुंबई - गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्नशील असून, अनेक ठिकाणी ब्लॅक स्पॅाट आहेत. त्यासाठी अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी इन्सुली आणि झाराप या दोन ठिकाणी होणाऱ्या पुलांसाठी 68 कोटींना तसेच जुन्या रस्त्यावरील व्हाईट टॉपींगसाठी 38 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. आंबोली - रेडी रस्ता क्रॉक्रीटीकरण करण्याचा प्रस्तावही पाठवला असून तोही लवकरच मार्गी लावला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी झाराप येथून मुंबई - गोवा महामार्गाची पाहणी करण्यास आज सुरुवात केली. यावेळी प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, माजी आमदार राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते. या पाहणीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. पत्रादेवी ते झाराप आणि सावंतवाडीकडून येणारा रस्ता यामुळे झाराप तिठ्यावर अपघात होत होते. या ठिकाणी तसेच इन्सुली येथे पुलाच्या काम...

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने 8 जून रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

सिंधुदुर्गनगरी,दि.29 (जि.मा.का.) : खासगी क्षेत्रातील कारखाने, उद्योजग, व्यापार, उद्योजक, दुकाने, शॉप्स व इतर व्यवसाय यांना सद्यस्थितीत मनुष्यबळाचा तुटवडा भासत असल्याने जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगार देण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने ‘शासन आपल्या दारी’ पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा प्लेसमेंट ड्राईव्ह जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्श केंद्र सिंधुदुर्ग येथे गुरुवार दि. 8 जून रोजी सकाळी 10 वाजता आयोजित केला आहे. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त ग.प्र.बिटोडे यांनी दिली. उद्योजकांना आवश्यक असलेल्या रिक्तपदांची माहिती त्यांच्या लॉगीनने ऑनलाईन पोस्ट करण्याची सुविधा कौशल्य विकास विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in पोर्टलवर उपलब्ध आहे. ज्या उद्योग आस्थापनांनी या पोर्टलवर नोंदणी केलेली नाही. परंतु त्यांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे, अशा उद्योजकांनी प्रथम वरील पोर्टलव्दारे आपली नोंदणी करून रिक्तपदे पोस्ट करावीत. जिल...

जिल्हात हळद लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी लोकसहभागातून बियाण्यांची बँक बनवा - पालकमंत्री रविंद्र चव्हाण

Image
सिंधुदुर्गनगरी,दि.29 (जि.मा.का.) : हळदीचे लागवड क्षेत्र जिल्ह्यात वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना हळदीची रोपे, कंद हे योग्य भावात मिळायला हवीत. त्यासाठी लोकसहभागातून बियाण्यांची बँक बनवा, असे निर्देश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी कृषी विभागाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात हळद लागवड नियोजन बैठक आज घेण्यात आली. बैठकीला आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार राजन तेली, प्रभाकर सावंत उपस्थित होते. प्र. कृषी विकास अधिकारी विरेश अंधारी यांनी संगणकीय सादरीकरण करुन माहिती दिली. सध्या जिल्ह्यात 250 हेंक्टर हळद लावगड क्षेत्र असून, ते 2 हजार हेंक्टरवर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त केले जाणार आहे. शिवाय फोंडाघाट येथे 2 लाख 20 हजार हळद रोपे तयार करण्यात आली आहेत. पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, शेत...

सिंधुदुर्ग भरडधान्य अभियान बियाण्यांच्या संपत्तीतून जिल्ह्याला भरडधान्य उत्पादनात अग्रेसर ठेवा - पालकमंत्री रविंद्र चव्हाण

Image
सिंधुदुर्गनगरी,दि.29 (जि.मा.का.) : भरडधान्याची बियाणं ही खऱ्या अर्थाने संपत्ती आहे. ही संपत्ती शेतकऱ्यांना दिली जात आहे. या संपत्तीमधून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्गला अग्रेसर ठेवा, असे आवाहन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग, सिंधु आत्मनिर्भर अभियान, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सिंधुदुर्ग भरडधान्य अभियानांतर्गत प्रात्यक्षिक प्रक्षेत्र लागवड व मोफत बियाणे वाटपाचा शुभारंभ पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते आज झाला. याप्रसंगी आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार राजन तेली, प्रभाकर सावंत उपस्थित होते. पालकमंत्री श्री....

जिल्हास्तरीय पौष्टिक तृणधान्य महत्व जनजागृती उपक्रम पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना होणार तृणधान्य बियाण्यांचे वाटप

सिंधुदुर्गनगरी,दि.28 (जि.मा.का.) : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग, सिंधु आत्मनिर्भर अभियान, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग भरड धान्य अभियान उपक्रम राबविण्यात येत आहे. उद्या सोमवार दि. 29 मे रोजी सकाळी 11 वा. नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हास्तरीय पौष्टिक तृणधान्य महत्व जनजागृती कार्यक्रम होणार आहे. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते या कार्यक्रमांचे उद्घाटन होत असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात बियाण्यांचे वाटप होणार आहे. शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या बियाण्यांमध्ये नाचणी, कांग, सावा, कोडो, छोटे वरी, ब्राऊन टॉप यांचा समावेश आहे. यासाठी जवळपास 5 टन बियाणे गोळा करण्यात आले आहे. काही वर्षांपूर्वी आपल्या सर्वांच्या आहारात भरड धान्यांचा समावेश होता. बदलत्या काळात तो कमी-कमी होत गेला. काही ठिकाणी भरड धान्यांचा वापर आहारातून बाजूला गेला आहे. या पौष्टिक भरड धान्यांचा आहारात व...

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे मानवरूपी कल्पवृक्षमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते मॉरिशस मधील सावरकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

Image
सिंधुदुर्गनगरी,दि.28 (जि.मा.का.) : "स्वातंत्र्यवीर सावरकर हे मानवरूपी कल्पवृक्ष होते. ज्याप्रमाणे एखाद्या कल्पवृक्षाची पाने, फुले, फळ, मुळं उपयुक्त असतात आणि त्या कल्पवृक्षाची सावलीही आपल्याला सुखद गारवा देते; त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर कल्पवृक्ष होते. स्वातंत्र्यवीर हे स्वातंत्र्यसैनिक, वकील, कवी, लेखक, साहित्यिक, तत्वचिंतक, समाजसुधारक, व्हिजनरी असे व्यक्तिमत्व होते. त्यामुळे सावरकर यांचे प्रखर विचार हे आजच्या युवा पिढी पर्यंत पोहोचवणे हे आपली जबाबदारी आहे", असे ठाम प्रतिपादन महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज मॉरिशस येथे केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तेजस्वी विचार पुढील पिढीत रुजवण्याचे कार्य अव्याहतपणे सुरु राहावे म्हणून मॉरिशस येथे स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन आयोजन करण्यात आले आहे. मॉरिशसच्या राजधानीत स्वा. सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आज महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि आमदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. मॉरिशसचे माननीय राष्ट्रपती पृथ्वीराज सिंह रूपन यांच्या प्रमुख उपस्थितीत ...

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी, दि. २७ (जि.मा.का.) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. २9 व 30 मे 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार, दिनांक 29 मे 2023 रोजी सकाळी 6.50 वा. गोवा (दाबोलिम) विमानतळ येथे आगमन व केसरी जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 8.30 वा. केसरी येथे आगमन व राखीव. सकाळी 9.30 वा. केसरी येथून ओरोस कडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. ओरोस येथे आगमन व सिंधुदुर्ग भरडधान्य अभियान कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ- नवीन जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग). दुपारी 12.30 ते 1.00 वा. हळद लागवडी संदर्भातील नियोजबाबत बैठक (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग). दुपारी 1.00 वा. ते 2.00 वा. राखीव. दुपारी 3.00 वा. मोदी @9 अभियानांतर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग लोकसभा क्षेत्रातील उपक्रमासंदर्भात नियोजन बैठक (स्थळ- शासकीय विश्रामगृह, कणकवली). सायं. 5.00 वा. पत्रकार परिषद (स्थळ- शासकीय विश्रामगृह, कणवकली). सायं. 6 .00 वा. ते 8.00 वा. राखीव. र...

पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

मानवी आहारातील पोषक तत्वाच्या कमतरतेने निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्या सोडवून सर्वसामान्यांना आरोग्यसंपन्न जीवन जगता यावे यासाठी शासनाने पौष्टिक तृणधान्याचा आहारात वापर वाढविण्याचा अभिनव कार्यक्रम हाती घेतला आहे. सुदृढ व आरोग्यदायी समाजासाठी पौष्टिक तृणधान्य ही काळाजी गरज असून त्यांचा आहारात नियमित वापर करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पौष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी तसेच त्यांचा आहारात वापर वाढविण्याकरिता ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३’साजरे करण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यकारणीत सदस्य सचिव म्हणून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारीसह २४ विभागाच्या सदस्यांची समिती तयार करण्यात आली आहे. या समितीमार्फत महिनानिहाय वर्षभर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये शास्त्रज्ञाव्दारे व्याख्याने, रॅली, महिला बचत गटांचे शिबीर, मार्गदर्शन कार्यशाळा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला, भाषण इ. स्पर्धा व जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ‘पौष्टिक तृणधान्य दिन’ वर्षारंभी मकर संक्रांत-भोगी या सणाला पौष्टिक तृणधा...

खेळाडू प्रशिक्षण आणि इतर बाबीसाठी आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावा - जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस

सिंधुदुर्गनगरी,दि.27 (जि.मा.का.) : अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच सहभागी झालेल्या होतकरु खेळाडूंना प्रशिक्षण व इतर बाबीसाठी आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे. राज्यातील खेळाडूंना अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील खेळाडूंना आर्थिक सहाय्य देणे बाबतचा शासन निर्णयामध्ये नमूद १४ अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी झालेल्या खेळाडुंना पुढील बाबींसाठी अर्थसहाय्य अनुज्ञेय आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा प्रवास खर्च, प्रवेश शुल्क, निवास, भोजन इ. देश विदेशातील स्पर्धापूर्व प्रशिक्षण उपकरणे, तज्ञ क्रीडा प्रशिक्षकांचे मार्गदर्शन शुल्क, प्रशिक्षण कार्यक्रम शुल्क, आधुनिक क्रीडा साहीत्य आयात / खरेदी करणे, गणवेश इ. या योजनेसाठी पुढील स्पर्धा अधिकृत स्पर्धा म्हणून मान्यता दिली आहे. ऑलिम्पिक गेम्स, विश्व अजिंक्यपद स्पर्धा, एशियन गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धा, राष्ट्रकुल युवा स्पर्धा, एशियन चॅम्पियपशिप, युथ ऑलिम्पिक, ज्यु. व...

सोमवारी जिल्हास्तरीय पौष्टिक तृणधान्य महत्व जनजागृती कार्यक्रम पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार शेतकऱ्यांना पौष्टिक तृणधान्य बियाण्यांचे वाटप

सिंधुदुर्गनगरी,दि.27 (जि.मा.का.) : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग, सिंधु आत्मनिर्भर अभियान, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग भरड धान्य अभियान उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगानेच सोमवार दि. 29 मे रोजी सकाळी 10.30 वा. नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हास्तरीय पौष्टिक तृणधान्य महत्व जनजागृती कार्यक्रम होणार आहे. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते या कार्यक्रमांचे उद्घाटन होत असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात बियाण्यांचे वाटप होणार आहे. या संदर्भात आज पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी ऑनलाईन बैठक घेत आढावा घेतला. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, प्रभाकर सावंत, स्नेहसिंधुचे अध्यक्ष हेमंत सावंत, सदस्य पंकज दळी, संदिप राणे, डी. आर. परब आदींसह त...

सहायक संचालकपदी निवड झालेल्या तृप्ती टेमकरचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार

Image
सिंधुदुर्गनगरी,दि.26 (जि.मा.का.) : सहायक संचालक वित्त व लेखा वर्ग-1 पदी निवड झालेल्या तृप्ती कृष्णा टेमकर हिचा जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी पुष्पगुच्छ आणि पुस्तक भेट देवून सत्कार केला. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात हवालदार पदावर काम करणारे कृष्णा टेमकर यांची ती कन्या आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज सत्कार करुन शुभेच्छा दिल्या यावेळी वडील कृष्णा टेमकर, बंधू अनंत टेमकर, स्थानिक निधी कार्यालयाचे लेखाधिकारी पांडुरंग थोरात आदी उपस्थित होते. सोबत :-फोटो 00000

जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर आंबोलीत स्वच्छता मोहीम

सिंधुदुर्गनगरी,दि.26 (जि.मा.का.) : आंबोली वनक्षेत्र मार्फत आंबोली मुख्य धबधबा आंबोली पूर्वीचा वस या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेंचे आयोजन आंबोली वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल विद्या घोडके यांनी केले होते. स्वच्छता मोहिमेमध्ये आंबोली सरपंच पालेकर, पार्पोली सरपंच, पार्पोली ग्रामस्थ व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. आंबोली मुख्य धबधबा व पूर्वीचा वस मंदिर परिसरामध्ये स्वच्छता करण्यात आली. यात विशेषत: पिशव्या प्लास्टिक गोळा करण्यात आले, हा उपक्रम केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून यावर्षीच्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपल्या जीवनशैलीमध्ये वेगवेगळे 75 पर्यावरण पूरक गुण अंगीकृत करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. यामध्ये जवळच्या अंतरासाठी सायकल वापरणे, सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळणे, विजेचा वापर कमी करणे, आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. आंबोलीतील स्वच्छता मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व मोहीम यशस्वीरित्या पार करण्यात आली. सोबत :- फोटो 0000

'शासन आपल्या दारी' अभियानासाठी सूक्ष्म नियोजन करा - जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी सावंतवाडीत मंगळवारी मुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती

Image
सिंधुदुर्गनगरी,दि.25 (जि.मा.का.) : शासन आपल्या दारी हे अभियानांतर्गत सावंतवाडी येथे मंगळवारी 30 मे रोजी होणाऱ्या जिल्ह्याच्या प्रमुख कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. या अभियानात सर्व विभागांनी सहभाग घेतानाच, सूक्ष्म नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात या बाबत सर्व विभागप्रमुखांची आज आढावा बैठक झाली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितिन बगाटे, उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, जगदीश काटकर, ऐश्वर्या काळुसे यांच्यासह तहसीलदार, प्रमुख विभागप्रमुख उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी सर्वांचे स्वागत करुन अभियानाविषयी माहिती दिली. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, सर्व विभागांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांबाबत लाभार्थ्यांची माहिती द्यावी. प्रत्येक विभागाचा स्टॉल असावा. तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांनी याबाबत सर्व विभागांशी समन्वय करावा. आरोग्य विभाग...

शामराव पेजे इतर मागासवर्ग महामंडळामार्फत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनाचा लाभ घ्यावा

सिंधुदुर्गनगरी,दि.24 (जि.मा.का.) : शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्ग प्रवर्गातील हातकरु, गरजू विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक निशिकांत नार्वेकर यांनी केले आहे. शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना :- इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिणाकरीता बँकेमार्फत मंजूर केलेल्या रु. 20 लक्ष पर्यंत कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा महामंडळाकडून वितरीत केला जाईल. योजनेचे स्वरुप: राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रु 10 लक्ष पर्यंत. परदेशी अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रु. 20 लक्ष पर्यंत. लाभार्थी पात्रतेच्या अटी व शर्ती- अर्जदाराचे वय 17 ते 30 वर्षे असावे. अर्जदार हा इतर मागास प्रवर्गातील असणे, तो महाराष्ट्राचा रहीवासी असावा. अर्जदाचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामिण व शहरी भागाकरीता रु.8 लक्ष पर्यंत असावी. अर्जदार हा इयत्ता 12 वी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा तसेच पदवीच्या व्दितीय वर्षे व्यावसा...

‘एक पाऊल थकबाकी मुक्तीकडे’ व्यापारी बांधवांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा - राज्यकर उपआयुक्त एस. आर. मोटकर

सिंधुदुर्गनगरी,दि.24 (जि.मा.का.) : व्हॅट, बीएसटी, सीएसटी कायद्यांतर्गत असलेल्या थकबाकीतून मुक्त होण्यासाठी 30 जून 2017 पर्यंतच्या कालावधिच्या थकबाकी करिता 1 मे ते 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत अभय योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ सर्व व्यापारी बांधवानी घेवून ‘एक पाऊल थकबाकी मुक्तीकडे’ टाकावे, असे आवाहन राज्यकर उपआयुक्त एस. आर. मोटकर यांनी केले आहे. वैधानिक आदेशानूसार रु. 2 लाख किंवा कमी असलेल्या थकबाकीसाठी निर्लेखित करण्यात येईल. रु.2 लाख पेक्षा जास्त थकबाकीसाठी विवादित करात 50 ते 70 टक्के तसेच व्याजात 85 ते 90 टक्के व शास्तीचा 95 टक्के सवलत देण्यात येईल. रु. 50 लाखापर्यंत थकबाकी असणाऱ्या व्यापाऱ्यांना एकत्रित 20 टक्के रक्कम भरुन थकबाकीतून मुक्त होता येईल. रु 50 लाखापेक्षा जास्त थकबाकीदारांसाठी हप्ते सवलतीचा पर्याय उपलब्ध आहे. अभय योजनेचा कालावधी 1 मे 2023 ते 31 ऑक्क्टोबर 2023 पर्यंत आहे. आवश्यक रक्कम व अर्ज विहित मुदतीच्या आत सादर करावेत. अधिक माहितीसाठी संपर्क दूरध्वनी क्रमांक 02362-228651 व ई-मेल आयडी amnestyoros2023@gmail.com वर संर्पक साधावा. 00000

कोकणचा मेवाच बनला करिअरचा ‘गोडवा’ खाद्य तंत्रज्ञ ते सरबत उत्पादक

वाढत्या उन्हाळ्याच्या उष्म्यात थंडगार सरबताचा गोडवा मानवाला आल्हाददायक बनवतो. कोकणच्या निसर्गरम्य भूमीत पीकणाऱ्या रानमेव्याचा नैसर्गिक गोडवा जर सरबतातून मिळाला तर...हाच विचार घेवून ‘द रियल टेस्ट ऑफ कोकण’ ही ओळख घेवून फूड टेक्निशीयन असणाऱ्या श्रीमती संगिता श्याम माळकर रा.वेतोरे ता.वेंगुर्ले यांनी ‘गोडवा’ या नावाने सरबत निर्मितीचा उद्योग सुरु केला आहे. श्रीमती माळकर या पूर्वी ठाण्यामध्ये राहत होत्या. त्यावेळी त्या इतर उत्पादनाच्या मार्केटींग करत होत्या. फूड टेक्नोलॉजिचा त्यांनी यामध्ये डिप्लोमाही केला आहे. त्यानंतर त्यांनी स्वत:च्या कोकणातील मूळ गावी येवून 2017 साली कुडाळ एम.आय.डी.सी मध्ये ‘वत्सला एंटरप्राईजेस’ नावाने सरबत निर्मितीचा प्रकल्प सुरु केला. भाऊ परेश वरवडेकर यांनी सद्यस्थितीत या प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी ‘मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत’ चालू वर्षी 1 कोटी 7 लाख 50 हजार प्रकल्प खर्चाचा प्रस्ताव सादर केला. यासाठी त्यांना दोन हप्त्यांचे मिळून 20 लाख 40 हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. सध्या ‘गोडवा’ या नावाने आंबा, कोकम, अननस, फणस, जांभूळ, ऑरेंज, करवंदं...

विविध कृषी पुरसकारांसाठी 30 जूनपर्यंत प्रस्‍ताव द्या - जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत

सिंधुदुर्गनगरी,दि.23 (जि.मा.का.) : महाराष्ट्र शासनाच्‍या कृषी विभागामार्फत सन 2022 या वर्षामध्ये कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती, गट, संस्थांनी विविध कृषी पुरस्कारांसाठी आपल्या जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे दि.30 जून 2023 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत राज्यात कृषी आणि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, कृषी उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरीता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच कृषी विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गट यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न, वसंतराव नाईक कृषीभूषण, जिजामाता कृषीभूषण, सेंद्रीय शेती कृषीभूषण, उद्यानपंडित, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, युवा शेतकरी पुरस्कार व कृषी विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना पद्यश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मानीत करण्यात येते. 00000

करिअरला लसणाची फोडणी..! प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून लसूण सोलून देण्याचा उद्योग

Image
स्वयंपाक घरात स्वादिष्ट जेवणासाठी लसणाची फोडणी ही तृप्तीची ढेकर द्यायला भाग पाडते. परंतु, या लसूण पाकळ्या सोलून त्यावरील साल काढणे हे अत्यंत जिकिरीचे, कंटाळवाणे आणि वेळखाऊ काम असते. नेमके हेच हेरून यालाच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटाच्या प्रांजली प्रमोद सुभेदार यांनी करिअर बनवले आहे. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून लसूण सोलून देणे, पेस्ट बनवून देण्याचा उद्योग त्यांनी सुरु केला आहे. सावंतवाडी येथे तुळजाई एंटरप्राईजेस या नावाने लसूण प्रक्रिया उद्योग सुरु केला आहे.श्रीमती सुभेदार यांच्या पुतण्याचे हॉटेल होते. या हॉटेलसाठी त्यांना बाहेरुन लसूण आणावा लागत असे आणि अगदी तोही सोलण्यासाठी पैसे द्यावे लागायचे. याच वेळी हाच उद्योग आपण सुरु केला तर बचत गटातील महिलांनाही रोजगार मिळेल, शिवाय आपल्यालाही स्वयंरोजगार उपलब्ध होईल, ही संकल्पना त्यांच्या मनात चमकून गेली. गुजरात,मुंबई येथून उद्योगासाठी आवश्यक असणारे लसूण गड्डे मागवून ऑक्टोबर 2022 पासून त्यांना हा उद्योग सुरु केला. त्यासाठी आवश्यक असणारी यंत्र सामुग्री घेण्यासाठी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्...

जिल्‍ह्याला प्रगतीपथावर नेण्‍यासाठी गांभिर्यतेने नियोजन करा पुढील जिल्‍हा विकास आराखडा बैठक पालकमंत्र्यांच्‍या अध्‍यक्षतेखाली -जिल्‍हाधिकारी के.मंजुलक्ष्‍मी

Image
सिंधुदुर्गनगरी,दि.22 (जि.मा.का.) : जिल्‍ह्याला प्रगती पथावर नेण्‍यासाठी तुमचे अनुभव, नागरिकांची काय अपेक्षा आहे, याचा समावेश करण्‍याबाबत सर्व विभागांनी गांभिर्यतेने अभ्‍यास करुन नियोजन अहवाल द्यावा. याबाबत पालकमंत्री रविंद्र चव्‍हाण यांनीही सूचना दिल्‍या असून, पुढील बैठक त्‍यांच्‍या अध्‍यक्षतेखाली होणार आहे. सर्व विभागांनी 10 दिवसात आपला अहवाल द्यावा. अशी सूचना जिल्‍हाधिकारी के. मंजुलक्ष्‍मी यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्‍हा विकास आराखडा आढावा बैठक आज झाली. या बैठकीला मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, अतिरिक्‍त जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. श्रीपाद पाटील, मत्‍स्यविभागाचे सहायक आयुक्‍त प्रदीप सुर्वे आदींसह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्‍हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी सुरुवातीला संगणकीय सादरीकरण करुन सविस्‍तर माहिती दिली. नियोजन विभागाने 20 एप्रिल 2023 रोजी निर्गमित केलेल्‍या शासन निर्णयानुसार जिल्‍हा विकास आराखडा तयार करण्‍यासाठी विविध स्‍तरावर समित्‍यांचे गठन करणे तसे...

सैन्य दलातील अधिकारी पदासाठी इच्छुक उमेदवारांची गुरुवारी मुलाखत

सिंधुदुर्गनगरी,दि.22 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे गुरुवार दि. 25 मे रोजी मुलाखतीस हजर राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हीस सिलेक्शन बोर्ड (एस.एस.बी) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महारष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दिनांक 29 मे 2023 ते 7 जून 2023 या कालावधीत एस.एस.बी कोर्स क्र. 53 आयोजित करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी फेसबुक पेज वर Department of sainik Welfare,pune (Dsw) वर सर्च करुन त्यामधील कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे. केंद्रामध्ये एस.एस.बी ...

छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर मंगळवारी

सिंधुदुर्गनगरी,दि.22 (जि.मा.का.) : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावंतवाडी येथे आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे उद्या मंगळवार दि. 23 मे रोजी रविंद्र मंगल कार्यालय, सालईवाडा, येथे सकाळी 9 वाजता शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. उपविभागीय अधिकारी (महसूल) उपविभागीय दंडाधिकारी प्रशांत पानवेकर, तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी अरुण उंडे, पोलीस उपअधीक्षक रोहिणी सोळंके, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, नगरपालिका मुख्याधिकारी जयंत जावडेकर आदी प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत. अशी माहिती जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी ए.एस.मोहोरे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र.सहाय्यक आयुक्त ग.प्र.बिटोडे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य एन.डी.पिंडकुरवार यांनी दिली. दहावी, बारावी नंतर करीअरच्या संधी, या विषयावर, गुरुकुल करियर ॲकेडमीचे बी.एस.जांभेकर हे मार्गदर्शक आहेत. व्यक्तीमत्व विकास या विषयवर, गुरुकु...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीरांचे 23 ते 26 मे रोजी आयोजन

सिंधुदुर्गनगरी,दि.22 (जि.मा.का.) : समस्याग्रस्त व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यसाठी व्यासपीठ मिळावे व त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या दृष्टीने महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी,यासाठी एक प्रभावी उपाय योजना म्हणून राबविण्यात येणाऱ्या लोकशाही दिनाच्या धर्तीवर जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर" आयोजन महिला व बाल विकास विभार्गामार्फत करण्यात आले आहे. या शिबीरात तालुकास्तरावरील तसेच जिल्हा स्तरावरील सर्व प्रशासकीय विभाग सहभागी होणार असून समस्याग्रस्त महिलांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यात दि.23 ते 26 मे 2023 या कालावधीत सर्व तालुक्यांच्या ठिकाणी पुढीलप्रमाणे शिबीराचे आयोजन केलेले आहे. दि. 23 मे 2023 रोजी कणकवली, येथे मातोश्री मंगल कार्यालय कणकवली सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत व कुडाळ येथे सिध्दीविनायक हॉल कुडाळ रेल्वे स्टेशन रोड सकाळी 10 ते सायं.5 वाजेपर्यंत. आणि तहसिलद...

प्रादेशिक बंदर अधिकारी,वेंगुर्ला बंदरे समुह वेंगुर्ला कार्यालयाचे जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरी येथे स्थलांतर

सिंधुदुर्गनगरी,दि.22 (जि.मा.का.) : प्रादेशिक बंदर अधिकारी, वेंगुर्ला बंदरे समूह हे कार्यालय जिल्हा मुख्यालय ओरोस, सिंधुदुर्गनगरी येथे स्थलांतरीत करण्याकरीता शासनाकडून मान्यता प्राप्त झालेली आहे. दि.22 मे 2023 रोजी सदरचे कार्यालय शासनमान्य प्राप्त जागेत स्थलांरीत करण्यात येत आहे. यास्तव नव्या जागेचा कार्यालयीन पत्ता- प्रादेशिक बंदर अधिकारी महाराष्ट्र मेरोटाईम बोर्ड, वेंगुर्ला बंदरे समुह, सिंधुदुर्ग- ओरोस जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग कार्यालय नजिक ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग पिन नं 416812 असून या पत्यावतर हे कार्यालय स्थलांरीत करण्यात येत आहे. सर्व कार्यालय आहरणं व सविंतरण अधिकारी यांनी वरील कार्यालयाच्या पत्यावर पत्र व्यहार करावयाचा आहे. अशी माहिती महाराष्ट्र मेरोटाईम बोर्ड, वेगुर्ला बंदरे समुहांचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. एस.व्ही. भुजबळ यांनी दिली. 00000

‘आम्ही कटिबध्द आहोत’ 22 ते 28 मे मासिक पाळी व्यवस्थापन जनजागृती सप्ताह

सिंधुदुर्गनगरी,दि.22 (जि.मा.का.) : जागतिक पातळीवर 28 मे हा दिवस मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षीच्या जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त ‘आम्ही कटिबद्ध आहोत’ ही या सप्ताहाची थिम असणार आहे. या दिनाचे औचित्य साधून सोमवार दि.22ते दि.28 मे या कालावधीत जिल्ह्यात मासिक पाळी व्यवस्थापन जनजागृती सप्ताह राबविण्यात येणार आहे. अशी माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांनी दिली. मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया असून त्याबाबत असलेल्या अज्ञानापोटी निर्माण झालेल्या विविध रूढी परंपरांमुळे मुली-महिलांना मोठ्या प्रमाणात मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन हा मासिक पाळी व्यवस्थापनाचा महत्त्वाचा घटक आहे या पार्श्वभूमीवर या दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात रॅली, चर्चासत्रे, प्रशिक्षणे, प्रात्यक्षिक, प्रबोधन उपक्रमांद्वारे जनजागृती सप्ताह जिल्हा, तालुका व ग्रामपंचायतस्तरावर राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने महिला व किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळी दरम्यान स्वच्छता व त्यांचे आरोग्य या बाबींना के...

G-20 शिखर परिषदे अंतर्गत चीवला बीच येथे स्वच्छता मोहीम

सिंधुदुर्गनगरी,दि.21 (जि.मा.का.) : G-20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळाल्यानंतर देशभरात मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमांतर्गत विविध क्षेत्रातील प्रगतीवर विशेष भर दिला जात आहे. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून समुद्र किनारे, सागरी जैवविविधता यांचे जतन व संवर्धन करण्याबाबत जागतिक पातळीवर लक्ष वेधण्याच्या उद्देशाने जगभरातील काही निवडक समुद्र किनाऱ्यांवर आज रविवारी सकाळी 7 ते 9 वेळेत मालवण येथील चिवला बिचवर जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबविली. G-20 शिखर परिषदे अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या या स्वच्छता मोहिमेत भारतातील एकूण 37 किनाऱ्यांवर एकाच वेळी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रशासनाच्या निर्देशानुसार मालवण नगर परिषदेच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छता मोहिमेस सुरुवात होण्यापूर्वी निसर्गाबरोबरच मानवी आरोग्याचा संदेश देण्यासाठी मालवण येथील योगज्योती या योगा क्लासेसच्या माध्यमातून अगदी मराठमोळ्या नऊवारी साडीत महिलांच्या योगाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी नागरिक...

देवगड तालुक्यात 25 मे रोजी स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी,दि.19 (जि.मा.का.) : शासन आपल्या दारी अभियानातंर्गत देवगड तालुक्यातील इंद्रप्रस्थ हॉल डायमंड हॉटेलच्या मागे सातपायरी येथे गुरुवार दि. 25 मे 2023 रोजी सकाळी 10 ते सायं.5 या वेळेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर कार्यक्रम आयोजित केला आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पाटील यांनी केले आहे. महिला व बालविकास विभागाकडील शासन निर्णयनुसार राज्यातील महिलांकरिता शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती महिलांना उपलब्ध करुन देण्याच्य अनुषंगाने तसेच त्यांच्या स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर हा महिला विशेष कार्यक्रम राबविण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे. सदर शिबीरातून तालुकास्तरावरील सर्व शासकीय विभागांचा सहभाग असणार आहे. सर्व विभागाचे प्रमुख या शिबीरास उपस्थित राहून महिलांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे विहित मुदतीत निरसन करणार आहेत. शिबीरामध्ये सर्व शासकीय विभागाचे स्टॉल्स उभारुन...

कौशल्य विकास धोरणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुणांना जर्मनीत नोकऱ्यांची संधी -शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर

सिंधुदुर्गनगरी,दि.19 (जि.मा.का.) : कौशल्य विकासासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आणि त्या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे धोरण महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीकारले. त्या धोरणास शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी गती दिली. त्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत, कौशल्यविकास व उद्योजकता विकासमंत्री मंगलप्रभात लोढा आणि उच्चशिक्षणमंत्री चंद्रकात पाटील यांचे सहकार्य मिळाले. उद्योग-परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रात अग्रस्थानी राहावा, मराठी तरुणांना रोजगार मिळावा, असा संकल्प महाराष्ट्राच्या नेतृत्वाने सोडला आहे. महाराष्ट्र सरकारच्या याच धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या हेतूने शिक्षण मंत्री दिपक केसरकर जर्मनीच्या दौऱ्यावर गेले.या दौऱ्यात कौशल्यविकास, शिक्षण, पर्यटन व सांस्कृतिक देवाण-घेवाण याबाबत महाराष्ट्राशी - तातडीने सांमजस्य करार करण्यास जर्मनीतील बाडेन-वूर्टेमबर्ग राज्य सरकार उत्सुक आहे. त्याचा फायदा महाराष्ट्रातील लाखो तरुणांना होईल आणि त्यांना जर्मनीत नोकऱ्यांची संधी मिळेल,अशी माहिती शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री श्री...