Posts

Showing posts from January, 2023

तीन वर्षानंतर होणार जिल्ह्यात कृषी महोत्सव -जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर

Image
सिंधुदुर्गनगरी, दि. 31 (जि.मा.का.) : कोरोनाचा काळ वगळता तीन वर्षानंतर जिल्ह्यामध्ये जिल्हा कृषी महोत्सव 2022-23 आयोजीत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी दिली. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)च्या वतीने होणाऱ्या जिल्हा कृषी महोत्सवासंदर्भात पूर्व प्राथमिक चर्चेसाठी बैठक घेण्यात आली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. दिवेकर म्हणाले, या महोत्सवाच्या संदर्भात तारीख, ठिकाण आणि उद्घाटन याबाबत पत्रव्यवहार सुरु आहे. सद्यस्थितीत विविध विभागांच्या सूचना प्राप्त करुन घेण्याच्या दृष्टीने ही बैठक आयोजीत करण्यात आली आहे. रविवार तसेच सार्वजनिक सुट्ट्यांना जोडून 5 दिवसांचा महोत्सव आयोजीत करण्यात येणार आहे. यामध्ये कृषी प्रदर्शन, परिसंवाद,चर्चासत्रे, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री केंद्र, विक्रेता संम्मेलन, शेतकरी सन्मान समारंभ याचा समावेश असणार आहे. एकूण दोनशे स्टॉल यामध्ये असणार आहेत.या महोत्सवाची तारीख आणि ठिकाण अंतीम झाल्यानंतर सर्वांना कळविण्यात येईल. बैठकीला सहायक संशोधन संचालक डॉ. ए.जी. माटीलकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ बाळकृष्ण गावडे, जिल्हा उ...

भारत माता की जय.... वंदे मातरम्.... प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण जिल्ह्याला सर्वच क्षेत्रात अव्वल ठेवण्याचा संकल्प करुया - पालकमंत्री रविंद्र चव्हाण

सिंधुदुर्गनगरी, दि.26, (जि.मा.का.)- पर्यटन आणि सुजलाम-सुफलाम असणारा जिल्हा येणाऱ्या काळात सर्व क्षेत्रात अव्वल ठेवण्याचा संकल्प आपण सर्वांनी करुया, अशा शुभेच्छा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिल्या. ‘भारत माता की जय, वंदे मातरम्’च्या घोषणांनी पालकमंत्री आणि विद्यार्थी-बालचमूने एकमेकांना शुभेच्छा दिल्या. पोलीस कवायत मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यास जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्र.निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड, जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते,जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री.चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शुभेच्छा संदेश देताना, पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा देवून, सीमेवर सैन्य दलातील जवान रात्रीचा दिवस करुन देशाची सुरक्षा करीत असल्यानेच आज आपण चांगल्या वातावरणात राष्ट्रीय सोहळा साजरा करतो. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हौ...

प्रजासत्ताक दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते

सिंधुदुर्गनगरी, दि.25, जि.मा.का. - प्रजासत्ताक दिनांच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ गुरुवार दि. 26 जानेवारी 2023 रोजी पोलीस परेड ग्राऊंड, येथे सकाळी 9.15 वा. आयोजित करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा हा मुख्य समारंभ संपन्न होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली. मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभासाठी येणाऱ्यांनी सकाळी 8.45 वाजेपर्यंत आपल्या जागेवर स्थानापन्न व्हावे. समारंभास राष्ट्रीय पोषाखात यावे. मास्क परिधान करणे व शासनाने दिलेल्या कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. मुख्य शासकीय समारंभ सकाळी 9.15 असल्यामुळे इतर कार्यालय अगर संस्था यांनी आपल्या कार्यालयात ध्वजवंदनाचा कार्यक्रम सकाळी 8.30 च्यापूर्वी किंवा सकाळी 10 च्या नंतर आयोजित करावा. 00000

पूर्व उच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 12 फेब्रुवारी रोजी

सिंधुदुर्गनगरी,दि.२५(जि.मा.का.): पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.५ वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.८ वी परीक्षा रविवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. अशी माहिती शिक्षणाधिकारी प्राथमिक प्रदीपकुमार कुडाळकर यांनी दिली आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरीत करावी. सर्व परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र पाप्त करुन घ्यावे असे आवाहन आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून करण्यात येत आहे. 00000

वन अधिकाऱ्यांनी घडविली माकडाच्या पिल्लाची आणि आईची भेट

सिंधुदुर्गनगरी,दि.२५(जि.मा.का.): आंबोली वनपरिक्षेत्रांचे वनअधिकारी व वनकर्मचारी यांना नानापाणी रस्त्यांच्या बाजुला आठ ते दहा दिवसाचे माकडाचे पिल्लू असल्याचे मानद वन्यजीव रक्षक महादेव भिसे यांनी दूरध्वनी वरुन वन विभागास कळविले. तातडीने माकडाचे पिल्लू वन कार्यालयात आणून त्याला दूध पाजून प्राथमिक उपचार केले.वन विभागाच्या वतीने रेस्कू करुन पिल्लाच्या आईचा शोध घेतला आणि त्यांच्या आईशी पिल्लाची भेट घडवून आणली. त्याचे झाले असे की, दिनांक 24 रोजी रत्याच्याकडेला पिल्लू असल्याचे महादेव भिसे मानद वन्यजीव रक्षक यांनी कळविले.सदरचे पिल्लू वन विभागाने ताब्यात घेवून यांनी त्या माकडाच्या पिल्ल्याच्या आईचा शोध घेतला पण ती दिसून आली नाही. थोड्यावेळानंतर 1 माकड मादी आवाज करत आंबोली वनपरिक्षेत्राच्या कार्यालयाच्या परिसरात आली. उपस्थित वनअधिकारी यांना समजले की, याच पिल्लाची ती आई असल्याची खात्री झाली. त्या पिल्लाला कार्यालयाच्या आवारात झाडाखाली ठेवले तेव्हा तेही आपल्या आईला पाहून ओरडायला लागले. लगेचच त्यांची आई येवून त्या पिल्लाला आपल्या कुशीत घेवून ती अधिवासात निघून गेली. या कार्यात वनक्ष...

व्यवसाय अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रके घेऊन जावीत

सिंधुदुर्गनगरी, दि.२५(जि.मा.का.): शैक्षणिक सत्र 2022 पर्यंतचे उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग ॲन्ड फॅशन डिसायनिंग, शिवण व कर्तन या प्रमाणपत्र अभ्यासक्रमातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रके अद्याप संस्थेतून घेऊन गेलेले नाहीत. अशा विद्यार्थ्यांनी स्वत:चे ओळखपत्र व पासपोर्ट फोटो सोबत आणून आपले उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रिका कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस व सार्वजनिक सुट्टीची दिवस वगळून घेऊन जावे. असे आवाहन टोपीवाला स्मारक तंत्रशाळा तंत्राशाळा तंत्र माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी दिली आहे. शैक्षणिक सत्र वर्ष 1995 पासून ते शैक्षणिक सत्र वर्ष 2021 पर्यंतचे वर नमूद केलेल्या अभ्यासक्रमातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपले गुणपत्रक व प्रमाणपत्र घेऊन जाण्यासाठी सोबत आपले ओळखपत्र (आधारकार्ड) व पासपोर्ट साईज फोटो-2 आणून कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस व सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून स्वत: घेऊन जावे. टोपीवाला स्मारक तंत्रशाळा तंत्र माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी य...

‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’२८ जानेवारी पर्यंत

सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.) :‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ दि. १४ ते २८ जानेवारी २०२३ या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन २३ जानेवारी रोजी लेखक सतिश लळीत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त ग्रंथप्रदर्शन दि.२३ जानेवारी पासून (सार्वजनिक सुट्टी वगळता) दि.२८ जानेवारी पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी शासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच वाचक सभासद यांनी ग्रंथप्रदर्शन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन बा. हजारे यांनी केले आहे. 0000

अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ - अधीक्षक डाकघर मयुरेश कोले

सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.) : केंद्र सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदरात जानेवारी 2023 पासून वाढ करण्यात आली आहे. अर्थखात्याने काढलेल्या नोटिफिकेशननुसार सेव्हिंग स्कीमवरील व्याजदर 0.20 टक्के ते 1.10 टक्के वाढवण्यात आले आहेत. अशी माहिती सिंधुदुर्ग विभागाचे अधीक्षक डाकघर मयुरेश कोले यांनी दिली. केंद्र सरकारने अल्पबचत योजनांवरिल व्याजदरात वाढ करत सर्वसामान्यांना "न्यू ईयर" गिप्ट दिले आहे. सरकारने नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, पोस्ट ऑफिस मुदत ठेव (POST OFFCE DEPOSITS) जेष्ठ नागरिक बचत योजनांवर मिळणाऱ्या व्याजदरात मोठी वाढ केलीय. सदर व्याजदर माहे जानेवारी 2023 पासून लागू झालेली आहेत. किसान विकास पत्राच्या व्याजदरात वाढ करण्यात आलेली असून 7 टक्क्यांवरुन 7.2 टक्के व्याजदर मिळणार आहे. तसेच किसान विकास पत्राच्या माध्यमातून केली जाणारी गुंतवणूक आता 120 महिन्यातच दुप्पट होणार आहे. जेष्ठ नागरिक बचत योजनेच्या व्याजदरातही वाढ करण्यात आलेली असून आता या योजनेकरिता 7.6 टक्क्यांवरुन 8 .0 टक्के इतका व्याजदर मिळणार आहे. बचत ठेव 4 टक्के, एक वर्षाच्या ठ...

प्रजासत्ताक दिनी ग्रामस्तरावर विशेष ग्रामसभा - मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर

सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.) : केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून जलजीवन मिशन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. या अंतर्गत प्रजासत्ताक दिनी ग्रामस्तरावर विशेष ग्रामसभा घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली. राज्यात मार्च २०२४ अखेरपर्यंत ‘हर घर नल से जल’ म्हणून घोषित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दिनांक २६ जानेवारी रोजी आयोजित ग्रामसभेत जलजीवन मिशनचा विषय प्राधान्याने हाताळण्यात यावा. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना गुणवत्तेसह पुरेसे प्रतिमानसी ५५ लिटर व नियमित स्वरुपात पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट या उपक्रमांतर्गत करण्यात आले आहे. जिल्ह्यात या योजनेचे काम योग्य पध्दतीने मार्गी लागावे यासाठी लोकसहभाग व पारदर्शकता येऊन व्यापक प्रचार व्हावा व नियोजन व्हावे. ग्रामपंचायत सदस्यासोबत ग्राम आरोग्य पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या सदस्यांना आमंत्रित करुन विशेष स्थान देण्यात यावे. समिती सदस्यांची ओळख, त्यांचा अधिकार व जबाबदारीबाबत उपस्थितांना अवगत करण्यात येणार आहे. ग...

प्रजासत्ताक दिनी सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात स्वच्छता कार्यक्रम - मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर

सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.) : भारतीय प्रजासत्ताक दिनाचे ७३ व्या औचित्य साधून दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी शासनाच्या सूचनाप्रमाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात सकाळी ६ वाजता परिसर स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली . सामान्य प्रशासन विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या कडील परिपत्रकद्वारे राज्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ६.०० वा. स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत कळविण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ६.०० वा. स्वच्छता कार्यक्रम घेण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. तरी जिल्हावासियांनी या कार्यक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री.नायर यांनी केले आहे. 0000

लघुउद्योजकांसाठी जिल्हा पुरस्कार 2019 जाहीर -महाव्यवस्थापक श्रीपाद शं. दामले

सिंधुदुर्गनगरी, दि.23 (जि.मा.का.) उत्कृष्ट लघुउद्योजकांसाठी जिल्हा पुरस्कार योजनेअंतर्गत जिल्हा पुरस्कार 2019 जाहीर झाले आहेत. अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद शं. दामले यांनी दिली.पुरस्कार विजेत्या उद्योजकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. प्रथम पुरस्काराचे स्वरुप शाल व श्रीफळ व रोख रु. 15,000, संजीव शशिकांत कर्पे, संचालक मे. नाटिव्ह कोनबॅक बांबू प्रोडक्स प्रा. लि. प्लॉट नं.बी-09,एम.आय.डि.सी.कुडाळ. व्दितीय पुरस्काराचे स्वरुप स्वरुप शाल व श्रीफळ व रोख 10,000 प्रो.प्रा संगीता केशव प्रभूशिरोडकर, संचालक मे. तेज शिरोडकर उद्योग प्लॉट नं.एच-163, एम.आय.डि.सी.कुडाळ. उत्कृष्ट लघुउद्योजकांसाठी जिल्हा पुरस्कार योजनेअंतर्गत जिल्हा पुरस्कार 2019 च्या पुरस्कारांचे वितरण जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते गुरुवार दि. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी पोलीस परेड ग्राऊंड सिंधुदुर्गनगरी येथे संपन्न होणार आहे. 0000

शिष्‍यवृत्‍ती नवीन अर्ज नोंदणी व जुन्या अर्जाचे नुतनीकरणासाठी मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी, दि. २३ (जि.मा.का.) : भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी महाडिबीटी प्रणालीवर सन 2022-23 करिता भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नुतनीकरण करण्यासाठी महाविद्यालयातील अनु. जाती, इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवगासाठी 31 जानेवारी 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली, असल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे. भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नुतनीकरण्याची प्रक्रीया शासनाच्या आपले सरकार पोर्टलवरील https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सुरु आहे. जिल्हयातील सर्व कनिष्ठ ,वरिष्ठ महाविद्यालये तसेच संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य, विद्यार्थी व पालक यांना आवाहन करणेत येते की, जे विद्यार्थी स्कॉलरशिप योजनेपासून वंचित असतील अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जांचे नुतनीकरण त्वरीत करुन घ्यावेत. वेळेत विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्याची जबाबदारी संबधित महाविद्यालयाची आहे. महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले ...

राष्ट्रीय लोकअदालत ११ फेब्रुवारी रोजी -न्यायाधीश डी.बी. म्हालटकर

सिंधुदुर्गनगरी, दि. २३ (जि.मा.का.) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशाप्रमाणे व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तालुका, जिल्हा व उच्च न्यायालयात शनिवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश डी.बी. म्हालटकर यांनी दिली. सन २०२३ या वर्षातील हे पहिले राष्ट्रीय लोकअदालत आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत सिंधुदुर्ग येथील जिल्हा व सत्र न्यायालय ओरोस या जिल्हा न्यायालयातील, दिवाणी न्यायालय व स्तर सिंधुदुर्ग न्यायालय व मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय सिंधुदुर्ग या न्यायालयातील प्रलंबित असलेली प्रकरणे, जिल्हयातील सर्व तालुका न्यायालयांमधील प्रलंबीत असलेली प्रकरणे विनाविलंब निर्णय मिळविणेकामी व पक्षकारांनी शांततेने जीवन जगण्यासाठी त्यांचे संमतीने सामंजस्य करुन तडजोडीसाठी प्रकरणे ठेवण्यासाठी आवाहन करणेत येत आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राध...

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तीक रजा -डॉ. जयकृष्ण फड

सिंधुदुर्गनगरी, दि.२३ (जि.मा.का.) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदार संघातील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना संबंधित मतदारसंघाच्या निवडणूकीच्या दिवशी सोमवार दि.३० जानेवारी २०२३ रोजी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्या दिवसाची विशेष नैमित्तीक रजा मंजुर करण्यात आली आहे. अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी दिली. अवर सचिव व उप मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचेकडील पत्रान्वये सदरची रजा ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजे व्यतीरिक्त असणार आहे. 0000

ग्राम विकास समितीद्वारे गृह पर्यटन वाढवून रोजगार निर्मितीवर भर आंबोली वन परिक्षेत्रात संवर्धन राखीव क्षेत्राबाबत चर्चासत्र

सिंधुदुर्गनगरी, दि. २१ (जि.मा.का.) : आंबोली वनपरिक्षेत्रातील आंबोली, पारपोली, नेने या गावामध्ये दोडामार्ग, आंबोली संवर्धन राखीव क्षेत्राबाबत नुकतेच चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रामध्ये पश्चिम मुंबई चे वन्यजीव अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही.क्लेमेंट बेन, कोल्हापूरचे प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजम, व क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोल्हापूर तथा वनसंरक्षक लडकत, सांवतवाडीचे वनविभाग उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी, सावंतवाडी चे सहाय्यक वनसंरक्षक, (प्रा.व.कं) स.ब. सोनवडेकर, वन्यजीवन संरक्षण व सवर्धन संस्था गिरीक्ष पंजाबी, आंबोली चे वनक्षेत्रपाल वि.अ. घोडके वन कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी विविध विषयांबाबत चर्चा करुन मार्गदर्शन करण्यात आले. आंबोली- दोडामार्ग मधील क्षेत्राचे परिस्थितीकीय प्राणी जातीय व वनस्पती विषयक महत्व असल्या कारणाने त्यातील बिबट, हत्ती, इतर प्राणी प्रजाती व वनस्ततीचे तसेच त्यांच्या अधिवासांचे संरक्षण करण्याच्या प्रयोजनार्थ संवर्धन राखीव क्षेत्र घोषीत करण्यात आले आहे. या क्षेत्रात पक्षी २५० पेक्षा अधिक प्रजाती, फुलपाख...

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती काव्यस्पर्धा, संमेलन परिसंवाद 22 जानेवारी रोजी

सिंधुदुर्गनगरी, दि. २० (जि.मा.का.) : राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, मुंबई व शाखा सिंधुदुर्गच्यावतीने राज्यस्तरीय व्यसनमुक्ती काव्यस्पर्धा, काव्य संमेलन, परिसंवाद रविवार दि. 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता गोपुरी आश्रम, प्रशिक्षण केंद्र सभागृह (नाईक पेट्रोल पंपाच्या मागे) वागदे ता. कणकवली येथे आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती व्यसनमुक्ती सिंधुदुर्ग जिल्हा समिती यांच्याकडून देण्यात आली आहे. या परिसंवादाला प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेश खलिपे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी शाम चव्हाण, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाचे सरचिटणीस वर्षा विद्या विलास, महाराष्ट्र राज्य मंडळाचे नशाबंदी राज्य संघटक अमोल माडामे, मानोविश्लेषक तज्ञ डॉ. रेश्मा भाईप, प्रसिध्दी अभिनेत...

स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी समजपूर्वक वाचनाचा पाया पक्का आवश्यक - मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर

सिंधुदुर्गनगरी, दि. २० (जि.मा.का.) : अध्ययन कार्ड ही माता पालकांच्या सहकार्याने विद्यार्थ्याच्या प्रभावी संवाद व समजपूर्वक आकलनासाठी फायदेशीर ठरतील. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी समजपूर्वक वाचनाचा पाया पक्का असणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतीमार्फत या कार्डाचा आर्थिक भार स्वीकारला जाईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी सांगितले. निपुण भारत अंतर्गत शरद कृषी भवन येथे निपुण ध्येय 1 व ध्येय 2 या केंद्रप्रमुख व शिक्षक यांच्यासाठी संयुक्त कार्यशाळेमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्यांमार्फत आयोजित करण्यात आली होती. 14 जानेवारी ते 28 जानेवारी या भाषा पंधरवडा कालावधीचे औचित्य साधून मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत तयार करुन "कृतीप्रवण स्वयंअध्ययन कार्ड- विषय भाषा" चे अनावरण करण्यात आले. यावेळी कृतीप्रयण स्वयंअध्ययन कार्ड निर्मिती करणारे शिक्षक, राज्यस्तरावरील माध्यमिक व प्राथमिक नवोपक्रम स्पर्धेतील विजेते शिक्षक या सर्वांचा श्री. नायर यांचे हस्ते प्रमा...

भराडी देवी आंगणेवाडी व कुणकेश्वर देवगड जत्रौत्सव आयोजन आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करा -जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

Image
सिंधुदुर्गनगरी, दि. १9 (जि.मा.का.) : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडी देवी व देवगड येथील स्वयंभू देव कुणकेश्वर यांच्या वार्षिक जत्रौत्सवा-२०२३ साठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये.या दोन्ही यात्रा सुरळीत व शांततेत पार पडाव्यात यासाठी जिल्हा प्रशासन व देवस्थान समित्यांनी यात्रा नियोजनाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून जिल्हा प्रशासनास सादर करावा. अशा सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात श्री.देवी भराडी वार्षिक जत्रौत्सव २०२३ व श्री. स्वयंभू देव कुणकेश्वर देवगड वार्षिक जत्रौत्सव -२०२३ नियोजन आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्र.निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड, कुडाळ प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने, कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने, जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते, मालवण तहसिलदार श्रीधर पाटील, देवगड तहसिलदार स्वाती देसाई, जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे,उप प्रादेशिक परिवहन अधिक...

वाचन, मनन चिंतनावर भर देवून ध्येय गाठा -पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल

सिंधुदुर्गनगरी, दि. १८ (जि.मा.का.) : जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रथम आपले ध्येय निश्चित करा. वाचन, मनन आणि चिंतनावर भर देवून ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. आयुष्यामध्ये प्रत्येक यश आनंद देते तर प्रत्येक नवीन अपयश शिकवण देवून जाते. स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गाची निवड करा. अपयश आल्यास खचून जावू नका. नव्या जोमाने व आणि जोशाने स्पर्धा परीक्षांची तयारी करा. स्पर्धा परीक्षामध्ये प्रत्येकजण यशस्वी होईलच असे नाही, त्यासाठी प्लॅन बी तयार ठेवा असा मौलीक सल्ला पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिला. ‘प्रेरणा’ अंतर्गत जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात यूपीएससी आणि एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय मार्गदर्शनपर मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात पोलीस अधीक्षक श्री. अग्रवाल यांनी परीक्षांची तोंड ओळख व मुख्य परीक्षा या विषयावर विस्तृतपणे मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी,अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, प्रशिक्षणार्थी आय.ए.एस. करिष्मा नायर, जिल्हा नियोजन ...

नाउमेद न होता ग्रँडमास्टर्स होण्यासाठी प्रयत्न करा -सोमनाथ रसाळ

सिंधुदुर्गनगरी, दि.18 (जि.मा.का.) बंधमुक्त खेळ मन लावून एकाग्रतेने खेळा. हरलात तरी नाउमेद होऊ नका. कुठं हरलो त्यावर विचार करा 'ग्रँडमास्टर्स होण्यासाठी प्रयत्न करा,अशा शब्दांत जिल्हा व महिला बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी शुभेच्छा दिल्या. जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने 14 वर्षाखालील मुले व मुलींसाठी राज्यस्तरीय शालेय बुद्धीबळ क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन हिर्लोक येथील मामाचो गाव रिसॉर्ट येथे झाले. प्रमुख पाहुणे श्री. रसाळ म्हणाले, बुद्धीबळ हा बुध्दीचा खेळ आहे. बुध्दीचा जोर लावा. कस लावा. येथून जाताना खेळ जिंकून जा. हरलात तरी उमेद न सोडता, कुठे कमी पडलो त्यावर विचार करून कमतरता शोधा. त्याची प्रेरणा घेवून पुढे विजयी व्हा. अध्यक्षीय भाषणात जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते म्हणाले, खेळात सराव आणि सातत्य नेहमी राहीले पाहीजे. सराव आपल्याला परिपूर्ण बनवतो, गुणवत्ता टिकवण्याचे सार म्हणजे सराव. मन लावून खेळा. आपल्या घराचे, आपल्या गावाचे पर्यायाने आपल्या राज्याचे, आपल्या राष्ट्राचे नाव उज्ज्वल करा. सुरुवाती...

नोंदणीकृत धान खरेदी केंद्रावर जावून शेतकऱ्यांनी धान विक्री करावी -जिल्हा मार्केटींग अधिकारी अनिल देसाई

सिंधुदुर्गनगरी, दि. १८ (जि.मा.का.) : खरीप हंगाम २०२२-२३ मधील शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान विक्रीसाठी आनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी दिनांक ३१ जानेवारी अखेर ज्या धान खरेदी केंद्रावर नोंदणी केलेली आहे. त्या धान खरेदी केंद्रावर जावून धान (भात) विक्री करावयाची आहे. अशी माहिती जिल्हा मार्केटींग अधिकारी अनिल देसाई यांनी दिली आहे. खरीप पणन हंगाम २०२२-२३ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंअंतर्गत जिल्ह्यातील ३९ धान खरेदी केंद्रावरती धान खरेदी सुरु आहे. त्यांचा तालुकानिहाय तपशिल पुढीलप्रमाणे आहे. सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघामार्फत- कोलगाव, सावंतवाडी, मळगाव, मळेवाड,डेगवे, तळवडे, भेडशी,इन्सुली मडुरा. कुडाळ तालुका खरेदी-विक्री संघामार्फत- कुडाळ, पिंगुळी, माणगाव, कडावल, आंब्रड, घोडगे, गोठोस, कसाल, वेताळ बांबार्डे, पणदुर, तुळस, निरुखे, निवजे, फोंडा. मालवण तालुका खरेदी-विक्री संघामार्फत- पेंडूर, गोठणे. वेंगुर्ला तालुका खरेदी- विक्री संघामार्फत- वेंगुर्ला, होडावडा. देवगड तालुका खरेदी-विक्री संघामार्फत- देवगड, पडेल, पाटगाव. वैभववाडी तालुका खरेदी- विक्री संघामार्फत- वैभ...

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कुडाळमध्ये झाली वॉकेथॉन रॅली

Image
सिंधुदुर्गनगरी, दि. १५ (जि.मा.का.) राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान २०२३ अंतर्गत ६ किलोमीटर वॉकेथॉनचे आयोजन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यावतीने व रोटरी क्लब, कुडाळ, लायन्स क्लब कुडाळ व गिअर अप जिम कुडाळ यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. या वॉकेथॉनचा आरएसएन हॉटेल चौकातून शुभारंभ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांच्याहस्ते फित कापून व हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी श्री. काळे म्हणाले, सध्या रस्त्यावर होणाऱ्या अपघातात मोठी वाढ झाली आहे. रस्त्याने चालणाऱ्या पादचाऱ्यांना वाहनांद्वारे धडक होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अनेकांचा नाहक बळी जातो. हे अपघात होऊ नयेत, यासाठी रस्त्यावर चालताना डाव्या बाजूने चालल्याने मागील वाहन दिसत नाही व अपघात होतात. त्यामुळे उजव्या बाजूने चालल्यामुळे पुढून येणारे वाहन दिसते व यामुळे अपघात होणार नाहीत. त्यामुळे लोकांनी चालताना उजव्या बाजूने चालावे व वाहन चालकांनीही रस्ता सुरक्षेचे नियम पाळावेत. वॉकेथॉन रॅली आरएसएन हॉटेलपासून सुरु करण्यात आली. त्यानंतर कॉलेज चौक, गवळदेव चौक, पोलीस स्टेशन, एस. टी. स्टॅन्ड, आंबेडकर चौक...

सावंतवाडी येथे सोमवारी महिलांसाठी हेल्मेट रॅली

सिंधुदुर्गनगरी, दि. १५ (जि.मा.का.) रस्ता सुरक्षा अभियान २०२३ अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हेल्मेट रॅली, हेल्मेट व सीट बेल्ट वापरणाऱ्यांचा सन्मान, वॉकेथॉन, शाळा महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती, चालकांचे प्रबोधन, चालकांची नेत्र तपासणी, विना अपघात गाडी चालवणाऱ्या चालकांचा सत्कार असे विविध कार्यक्रम राबवले जात असून उद्या सोमवार दि. १६ जानेवारीला सावंतवाडी शहरात महिलांसाठी हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी गाडी चालवताना नियमित हेल्मेट वापरणाऱ्या व सीट बेल्ट वापरणाऱ्या महिला वाहन चालकांचा गौरव करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता मोती तलाव, सावंतवाडी येथे सुरु होणाऱ्या या रॅलीमध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी केले आहे. 0000

लीडरशिपचे गुण स्वतःमध्ये तयार करा - निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड 'आपदा मित्र' प्रशिक्षण कार्यक्रमाचे कुडाळमध्ये उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी, दि. १३ (जि.मा.का.) : आपत्तीच्या वेळी जागृत राहणे गरजेचे असते. आजवर अनेक आपत्ती आपल्या राज्यावर असो वा देशावर आल्यात. यावेळी आपत्तीकाळात सामाजिक बांधिलकी जपून समाजासाठी कार्यतत्पर होणे आवश्यक असते. आजपासून सुरु झालेल्या ''आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम २०२२-२३'' मधून सर्व कॅडेटला नवीन शिकता येईल. यातूनच लीडरशिपचे गुण स्वतःमध्ये तयार करा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी केले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी कमान्डींग ऑफिसर ५८ महाराष्ट्र एनसीसी बटालियन कर्नल दीपक दयाल, सुभेदार मेजर दिनेश गेडाम, उपविभागीय अधिकारी आविशकुमार सोनाने, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत, सांस्कृतिक कार्यक्रम मार्गदर्शक आनंद परब, नागरी संरक्षण कार्यालय प्रशिक्षक अतुल जगताप, व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षक निलेश पवार आदी उपस्थित होते. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, (NDMA), नवी दिल्ली आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (SDMA), महाराष्ट्र यांच्या संयु...

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. १३ (जि.मा.का.) : शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार,उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) पुरस्कारासाठी दि. ३० जानेवारी पर्यंत इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू,दिव्यांग खेळाडू यांनी विहीत मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूचा गौरव करण्यासाठी राज्य शासन शासनाने नुकत्याच दि. १४ डिसेंबर २०२२ च्या शासन निर्णयान्वये शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी नियमावली विहीत केली आहे. या नियमावलीनुसार सन २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ या तीन स्वतंत्र वर्षांच्या पुरस्कारासाठी राज्यातील जेष्ठ क्रीडापटू. क्रीडा मार्गदर्शक. खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांच्यामार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत....

जिल्हा पत्रकार संघ, मुख्यालय पत्रकार समिती व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने हिंदी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाबूराव पराडकर यांना अभिवादन

Image
सिंधुदुर्गनगरी, दि. १२ (जि.मा.का.) हिंदी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाबूराव पराडकर यांच्या पराड येथील जन्मगावी त्यांचे स्मारक उभे राहावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ, मुख्यालय पत्रकार समिती आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने येथील पत्रकार कक्षात बाबूराव पराडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रतिमेला जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, उपाध्यक्ष बाळ खडपकर, मुख्यालय पत्रकार समिती अध्यक्ष संजय वालावलकर, सचिव मनोज वारंग, माहिती सहाय्यक रणजित पवार, रवी गावडे, नंदू आयरे, सतीश हरमलकर, दत्तप्रसाद वालावलकर आदी उपस्थित होते. जिल्हा माहिती अधिकारी श्री.सातपुते म्हणाले, जिल्ह्यात जन्मलेल्या संपादक पराडकर यांनी महाराष्ट्रातून जाऊन हिंदी राज्यात आणि हिंदी पत्रकारितेत ठसा उमटवला.त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १८८३ ला झाला होता तर १२ जानेवारी १९५५ रोजी त्यांचे निध...

मैदानी चाचणीतील पात्र उमेदवारांची यादी लवकरच पोलीस दलाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणार

सिंधुदुर्गनगरी, दि. १२ (जि.मा.का.) जिल्हा पोलीस दलाच्यावतीने 2 ते 11 जानेवारी या कालावधीत पोलीस भरतीचे आयोजन करण्यात आले होते. यात मैदानी चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी लवकरच जिल्हा पोलीस दलाच्या www.sindhudurgpolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. अशी माहिती पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी दिलेली आहे. पोलीस शिपाई या पदासाठी दिनांक ५ ते ११ जानेवारी २०२३ या कालावधीत मैदानी चाचणी घेण्यात आली होती. पोलीस शिपाई पदासाठी ४ हजार ८५५ पुरुष उमेदवार व १ हजार १०३ महिला उमेदवार असे एकुण ५ हजार ९५८ अर्ज प्राप्त झालेले होते. त्यापैकी प्रत्यक्षात ४ हजार २९० उमेदवार मैदानी चाचणीसाठी हजर होते. पोलीस चालक पदासाठी दिनांक २ ते ४ जानेवारी २०२३ या कालावधीत भरती आयोजित करण्यात आलेली होती. पोलीस चालक पदासाठी एकुण २ हजार १२६ अर्ज प्राप्त झालेले होते. त्यामध्ये पुरुष चालक पदासाठी २ हजार २७ उमेदवार व महिला चालक पदासाठी ९९ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले होते. त्यापैकी पुरुष चालक पदासाठी १ हजार २४८, महिला चालक पदासाठी ५६ महिला यांनी मैदानी चाचणीसाठी सहभाग नोंदवि...

"मकर संक्रांती भोगी" सणाचा दिवस "पौष्टिक तृणधान्य दिन" म्हणून साजरा करावा - कृषि संचालक विकास पाटील

सिंधुदुर्गनगरी, दि. १२ (जि.मा.का.) : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत "मकर संक्रांती भोगी" हा सणाचा दिवस राज्यामध्ये "पौष्टिक तृणधान्य दिन" म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करावा, असे आवाहन कृषि आयुक्तालयाचे संचालक विस्तार व प्रशिक्षण विकास पाटील यांनी केले आहे. मकर संक्रांतीचा औचित्य साधून प्रत्येक कृषि सहाय्यकांनी आपल्याकडील गावामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्राचे आयोजन, तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्यांचे लागवड तंत्रज्ञान, तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, मुलाखती, तृणधान्य पिकांपासून बनवण्यात येणारे विविध उपपदार्थ यांची माहिती देणे यासाठी प्रगतीशील शेतकरी, आहार तज्ञ, विद्यापीठांचे शास्त्रज्ञ यांना निमंत्रित करून कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्याअनुषंगाने कृषि विभागामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून आपण सर्व सामान्य लोकांपर्यंत पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व, ...

राज्यस्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेचे मंगळवारी उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी, दि. १२ (जि.मा.का.) : राज्यस्तरीय शालेय बुध्दीबळ क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता मामाचो गाव रिसॉर्ट हिर्लोक येथे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली आहे. यावेळी प्रमुख उपस्थितीत जिल्हा प्ररिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, कोल्हापूर विभागाचे क्रीडा व युवकसेवा उपसंचालक संजय सबनीस, कुडाळ तहसिलदार अमोल पाठक, मामाचो गाव रिसॉर्ट हिर्लोक चे संचालक अनंत सावंत हे उपस्थित राहणार आहेत. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्याव्दारे १४ वर्षाखालील मुले व मुली यांच्यासाठी आयोजित करण्यात आले आहे. 0000

आपदा मित्र' व्दितीय तुकडी प्रशिक्षणाचे शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी, दि. १२ (जि.मा.का.) : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने शुक्रवार दि. १३ जानेवारी रोजी कुडाळ येथील आर एस एन हॉटेल येथे 'आपदा मित्र' प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन दुपारी ३.३० जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी दिली. जिल्ह्यात आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम राबविणेचा असून या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्ह्यातील २०० स्वयंसेवकांना "आपदा मित्र" चे प्रशिक्षण देणेचे आहे. त्यातील ९६ स्वयंसेवकांच्या प्रथम तुकडीस दिनांक १९ ते ३० डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रशिक्षण दिलेले असून १०४ स्वयंसेवकांच्या व्दितीय तुकडीस दिनांक १३ ते २४ जानेवारी २०२३ या कालावधीत प्रशिक्षण दिले जाणार आहे. 0000

कोकण विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे घवघवीत यश

सिंधुदुर्गनगरी, दि. १२ (जि.मा.का.) : संचालनालय लेखा व कोषागारे कर्मचारी कल्याण समितीतर्फे आयोजित कोकण विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याने चॅम्पियनशिप चषकासह वैयक्तिक क्रींडा प्रकारात ८ सुवर्ण पदके, ६ रजत पदके व १ कांस्य पदकाची कमाई केली. सांघिक क्रीडा प्रकारात क्रिकेट व हॉलीबॉल (शुटींग) यामध्ये विजेतेपद पटकावून घवघवीत यश संपादन केले. तसेच सिंधुदुर्ग संघाने संचलनामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले असून सर्व स्तरावरून विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन होत आहे. ही स्पर्धा ७ व ८ जानेवारी २०२३ रोजी पालघर येथे संपन्न झाल्या. त्यामध्ये वैयक्तिक आणि सांघिक अशा एकूण २१ क्रीडाप्रकारांचा व एकल गाणे, दुकल गाणे व समुह नृत्य या सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता. स्पर्धेमध्ये कोकण विभागातील कोकण भवन, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यातील खेळाडूंनी व कलाकारांनी सहभाग दर्शविला होता. यामध्ये सहभागी सर्व खेळाडू व कलाकारांना डॉ. शिवप्रसाद खोत, जिल्हा कोषागार अधिकारी, सिंधुदुर्ग व स्थानिक निधी व लेखा परीक्षाचे सहाय्यक संचालक बाळासाहे...

लोकशाही दिन रद्द

सिंधुदुर्गनगरी, दि. ११ (जि.मा.का.) : माहे जानेवारी २०२३ चा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार दि. १६ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. सद्या जिल्ह्यात विधानपरिषद निवडणूक २०२२ कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीची आचारसंहिता असल्याने जानेवारी २०२३ चा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन रद्द करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी दिली आहे. 0000

राष्ट्रीय लोक अदालत ११ फेब्रुवारील

ा सिंधुदुर्गनगरी, दि. ११ (जि.मा.का.) : राष्ट्रीय लोक अदालतीचे ११ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजन करण्यात आली आहे. या लोकन्यायालयामध्ये महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. मुंबई व वसंतराव नाईक विमुक्त व भटक्या जाती व जमाती महामंडळ, मुंबई यांची थकीत कर्ज प्रकरणे लोकन्यायालयात ठेवली जाणार आहेत. या लोकन्यायालयामध्ये थकीत कर्जदाराने तडजोड करावी व उपरोक्त योजनेतील व्याज सवलतीचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी.बी. म्हालटकर यांनी केले आहे. इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. मुंबई यांजकडील ओबीस महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करणाऱ्याया लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत ५० टक्के सवलत देण्याबाबतची एकरकमी परतावा (OTS) योजना लागू करण्यात आलेली आहे. तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्यादित), मुंबई महामंडळाच्या योजनेअंतर्गत लाभार्थ्याकडे थकीत असलेले कर्जावरील व्याजामध्ये एक रकनी समझोता (One Time Settlement) योजनेअंतर्गत व्याजामध्ये ५० टक्के सवलत देण्यात आलेली आहे. 0000 ...

वाहतूक व सुरक्षा नियमांचे पालन करणे प्रत्येकांची जबाबदारी -जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी दि.11 (जि.मा.का): अपघातामध्ये आपले जवळचे नातेवाईक जखमी झाले किंवा दगावले तरच आपल्याला अपघाताची गंभीरता कळते. रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक व सुरक्षा नियमांचे पालन करणे प्रत्येकांची जबाबदारी आहे. 2023 वर्षामध्ये अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करु या, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले. जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, परिवहन विभाग, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे 33 व्या रस्ता सुरक्षा अभियान 2023 चे उद्घाटन आज झाले.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता अतुल शिवनीवार आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, केंद्र शासन, राज्य शासन, जिल्हा वार्षिक योजना यांच्या विकास निधी मध्ये रस्ते विकासाला जास्तीत जास्त निधी दिला जातो. प्रशासनाकडून रस्ते विकासाची कामे करताना त्याचा दर्जा चांगला होईल य...

‘प्रेरणा’ अंतर्गत १८ जानेवारीला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी १५ जानेवारी पर्यंत नोंदणी करावी -जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

Image
सिंधुदुर्गनगरी, दि. १० (जि.मा.का.) : यूपीएससी आणि एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रेरणा अंतर्गत १८ जानेवारीला सकाळी १० ते ४ यावेळेत एक दिवसीय मार्गदर्शनपर मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. याची नोंदणी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe1VWAAnpi4szBQ7QeEk3EndZOIvJjgZvJe1JAk2V-j6fWnfg/viewform?usp=sf_link या वर आजपासून ते १५ जानेवारी पर्यंत होणार असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. ‘प्रेरणा’ अंतर्गत जिल्हा प्रशासनाच्यावतीने यापूर्वी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मान्यवरांचे मार्गदर्शन सत्रे झाली आहेत. १८ जानेवारीला ओरोस येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, प्रशिक्षणार्थी आय.ए.एस. करिष्मा नायर हे मार्गदर्शन करणार आहेत. यु.पी.एस.सी. संदर्भातील शंका, पूर्...

कर्करोग प्रतिबंध नियंत्रणासाठी आरोग्य विभागांना प्रशिक्षण लोकांना फायदा होण्याकरिता काम करणार आहे. - सहसचिव सुषमा तायशेट्ये

सिंधुदुर्गनगरी दि.08 (जि.मा.का): सिंधुदुर्ग जिल्ह्यात कर्करोग प्रतिबंध व नियंत्रणात आरोग्य विभाग सर्व स्तरावरील वैदयकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेऊन अधिकाधिक लोकांना याचा फायदा होण्याकरिता काम करणार आहे. त्याकरिता नजीकच्या जिल्ह्यातील कर्करोग रुग्णालयांची मदत घेतली जाणार आहे. जेणेकरून Affordable Cancer Care उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करता येईल असे DAE चे सहसचिव सुषमा तायशेट्ये (भा.प्र.से.) यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग व टाटा मेमोरिअल रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने preventive oncology आरोग्य सेवा सुरु करण्याच्या उद्देशाने व किमोथेरपी डे केअर आरोग्य सेवा अधिक प्रमाणात कार्यान्वित करण्याकरिता CME कार्यशाळा आज दिनांक 7 जानेवारी रोजी शरद कृषी भवन सिंधुदुर्गनगरी येथे संपन्न झाला. या एकदिवसीय CME कार्यशाळेवेळी जिल्हाधिकारी, के. मंजुलक्ष्मी, टाटा मेमोरिअल सेंटर चे Academic संचालक, डॉ. श्रीपाद बनावली, डॉ. अतुल बुदुक, डॉ. अभय देसाई, डॉ. सुवर्णा गोरे, डॉ. राहुल सो...

शिष्‍यवृत्‍ती नवीन अर्ज नोंदणी व जुन्या अर्जाचे नुतनीकरणासाठी मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी दि.5 (जि.मा.का): महाडिबीटी प्रणालीवर सन 2022-23 करिता भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नुतनीकरण करण्यासाठी अनु. जाती, इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवगासाठी 20 जानेवारी 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली, असल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे. भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नुतनीकरण्याची प्रक्रीया शासनाच्या आपले सरकार पोर्टलवरील https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सुरु आहे. जिल्हयातील सर्व कनिष्ठ ,वरिष्ठ महाविद्यालये तसेच संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य, विद्यार्थी व पालक यांना आवाहन करणेत येते की, जे विद्यार्थी स्कॉलरशिप योजनेपासून वंचित असतील अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जांचे नुतनीकरण त्वरीत करुन घ्यावेत. वेळेत विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्याची जबाबदारी संबधित महाविद्यालयाची आहे. महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले अर्जांची छाननी करून परिपूर्ण अर्ज मंजुरीस्तव जिल...

राज्यातील खाजगी चित्रीकरण स्थळांची माहिती पाठविण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि.05(जि.मा.का): राज्यातील खाजगी मालकीच्या चित्रीकरण स्थळांची माहिती जास्तीत जास्त निर्मिती संस्थांना कळावी यासाठी संबधित चित्रीकरण स्थळांचे मालक अथवा संस्थांनी गुगल ड्राईव्हवर स्थळांची विस्तृत माहिती, छायाचित्र, व्हिडीओ आणि संपर्क क्रमांक पाठविण्याचे आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने (चित्रनगरी,फिल्मसिटी) केले आहे. महाराष्ट्र हे मनोरंजन क्षेत्रातील नावाजलेले राज्य असून देश-विदेशातील निर्मिती संस्था येथे चित्रीकरण करण्यासाठी प्राधान्याने येत असतात. सध्या राज्यातील विविध ठिकाणी खाजगी चित्रीकरण स्थळ विकसित होत आहेत. ही चित्रीकरण स्थळे विविध निर्मिती संस्थांना माहिती व्हावीत यासाठी महामंडळ पुढाकार घेत आहे. यासाठी चित्रीकरणायोग्य अशा मालमत्ताधारकांनी महामंडळास संपर्क साधून आपल्या स्थळांची परिपूर्ण माहिती कळविल्यास, महामंडळ विविध प्रसिद्धीमाध्यमाद्वारे चित्रीकरण स्थळांची माहिती निर्मितीसंस्थांपर्यंत पोहोचविण्याचे काम करेल. याद्वारे नागरिकांना अधिकचे उत्पन्न प्राप्त होईल आणि त्यांच्या स्थळांची प्रचार-प्रसिद्धी होईल. ...

सत्र न्यायालयीन खटल्यांच्या दोषसिध्दीमध्ये सिंधुदुर्ग पोलीस दल राज्यात प्रथम - सौरभकुमार अग्रवाल

Image
सिंधुदुर्गनगरी दि.04(जि.मा.का): "सत्र न्यायालयात चालणाऱ्या खटल्यांची दोषसिद्धी" या सदराखाली सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचा महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांक आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी दिली. कामाच्या मूल्यांकनाचे निकष सकारात्मक, नकारात्मक मापदंड (Parameters) इत्यादींच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामधून जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीतील दाखल गुन्हयांची माहिती विचारात घेऊन वाषिक गुन्हेगारीच्या आधारावर अ-श्रेणी, ब- श्रेणी, क श्रेणी तयार करण्यात आलेली होती. तीन वेगवेगळया श्रेणीतील सर्वोकृष्ट पोलीस घटक निवडीसाठी अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग (सी.आय.डी.), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आलेली होती. या समितीने सत्र न्यायलयात चालणाऱ्या खटल्यांच्या दोषसिध्दी या सदराखाली सिंधुदुर्ग पोलीस दलास राज्यात प्रथम दिलेला आहे. भविष्यातही सत्र न्यायालय व प्रथमवर्ग न्यायालयामध्ये चालणाऱ्या खटल्यांचे पृथक्करण व न्यायालयाचे पटलावर नियमित चालणारे खटले यांचेवर पर्यवेक्षण करण्याकरीत...

जिल्हा नियोजन समितीची आज होणारी सभा पुढे ढकलली

सिंधुदुर्गनगरी,दि.4 (जि.मा.का.) जिल्‍हा नियोजन समितीची आज दिनांक 5 जनोवारी रोजी होणारी सभा प्रशासकीय कारणास्‍तव पुढे ढकलण्‍यात येत असून आगामी सभेची तारीख कळविण्‍यात येईल. असे जिल्‍हाधिकारी के.मंजुलक्ष्‍मी यांनी कळविले आहे. जिल्हा नियोजन समितीची सभा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्‍हा नियोजन समिती सभागृह (नवीन) जिल्‍हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्‍यात आली होती. 0000

‘आपदा मित्र’ प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील युवक-युवतींनी नाव नोंदणी करा - डॉ. जयकृष्ण फड

सिंधुदुर्गनगरी दि.04 (जि.मा.का): राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत ‘आपदा मित्र’ हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून या प्रशिक्षण कार्यक्रमातील 96 प्रशिक्षणार्थीयाच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण दि.19 ते 30 डिसेंबर 2022 या कालावधीत पूर्ण झालेले असून दुसऱ्या तुकडीचे प्रशिक्षणासाठी 104 स्वयंसेवकांची नाव नोंदणी करण्याचे काम सुरु झालेले आहे. तरी अधिकाधिक युवक-युवती यांनी नाव नोंदणी करून आपत्ती प्रतिसादाच्या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी केले आहे. ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करणाऱ्या व्यक्तीस शासनाकडून आपत्ती प्रतिसादासाठी आवश्यक साहित्याचा संच आपदा मित्र गणवेश देण्यात येईल. तसेच सदर व्यक्तीचा शासनामार्फत विमा उतरविणेत येईल.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग यांचेमार्फत प्रशिक्षणार्थी यांची नोंदणीसाठी https://docs.google.com/forms/d/e/१FAIpQLScnt३q७mQZeejuvZL३qJZyKQWktRZkvQ३VCQGbR७Y५KazROHQ/viewform?usp=sf_link ही लिंक आहे. ...

अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांनी मोफत अन्नधान्याचा लाभ घ्यावा - दादासाहेब गिते

सिंधुदुर्गनगरी दि.03 (जि.मा.का): राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांनी मोफत अन्नधान्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रतिकिलो 3 रुपये तांदुळ, गहु रुपये 2 प्रतिकिलो या दराने अन्नधान्य वितरित करण्यात येते. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडील सुचनेनुसार दिनांक 1 जानेवारी 2023 पासून सदर अन्नधान्य मोफत वितरित करण्याबाबत कळविले आहे. 0000

तिमाही विवरणपत्र 31 जानेवारी पर्यंत ऑनलाईन भरा - इ.सि. शेख

सिंधुदुर्गनगरी दि.03 (जि.मा.का): सेवायोजन कार्यालये (रिक्त पदे अधिसूचित करणे सक्तीचे) कायदा 1951 अन्वये कलम 5 मधील तरतुदीनुसार शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनेत काम करित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माहितीचे तिमाही विवरणपत्र ई आर-1 दि. 31 जानेवारी 2023 पर्यंत https://rojgar.mahaswayam.gov.in या बेवसाईटवर ऑनलाईन पध्दतीने भरावे. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त इ.सि. शेख यांनी केले आहे. प्रत्येक तिमाही संपल्यावर 30 दिवसाचे आत सादर करणे आस्थापनेस बंधनकारक आहे. दिनांक 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाईचे विविरणपत्र ई-आर -1 https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईवर ऑनलाईन पध्दतीने भरावे. ज्या उद्योजक, आस्थापना यांना ऑनलाईनव्दारे विवरणपत्र भरण्यास अडचणी येत असतील अशांनी या कार्यालयाचा दूरध्वनी क्र. 02362 228835 वर संपर्क साधावा. 0000

पोलीस कॉन्स्टेबल भरती सुरु 467 उमेदवार मैदानी चाचणीसाठी उपस्थित - सौरभ कुमार अग्रवाल

सिंधुदुर्गनगरी दि.02 (जि.मा.का): चालक पदांकरीता एकुण 2 हजार 126 उमेदवारांनी अर्ज केले होते. आज 700 उमेदवारांना मैदानी चाचणी करिता बोलाविण्यात आले होते. त्यापैकी 467 उमेदवारांनी मैदानी चाचणीला उपस्थिती लावलेली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली. 4 जानेवारी 2023 पर्यंत 22 रिक्त पोलीस चालक पदाकरिता पोलीस मुख्यालय मैदान, सिंधुदुर्गनगरी येथे चाचणीला सुरुवात झाली आहे. पोलीस कॉन्स्टेबल पदाकरिता दि. 05 जानेवारी पासून भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. 0000

थकीत कर्ज एकरकमी परतफेडकेल्यास थकीत व्याज रकमेत 50 टक्के सवलत                                                           -प्रिती पटेल

सिंधुदुर्गनगरी दि.02 (जि.मा.का):  जिल्ह्यातील इतर मागासवर्गीयवित्त विकास महामंडळ व शामराव पेजे कोकण इतर मागास महामंडळ (ओबीसी महामंडळ)यांचेमार्फत कर्ज घेतलेल्या कर्जाचा परतफेडीचा कालावधी संपलेल्या लाभार्थीसाठीमहामंडळाकडून एकरकमी परतावा योजना राबविण्यात येत आहे. योजनेनुसार महामंडळाकडूनघेतलेल्या मुदती कर्ज, बीज भांडवल कर्ज, स्वर्णिमा कर्ज, मार्जिन मनी कर्ज सर्वयोजनांतर्गत असलेल्या थकीत कर्जाची एकरकमी परतफेड केल्यास थकीत व्याज रकमेत 50टक्के सवलत देण्यात येत, असल्याची माहिती शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हाव्यवस्थापक प्रिती पटेल यांनी दिली.            संबंधित कर्ज खातेधारकांनी  या योजना मर्यादीत कालावधीकरिता असून या योजनेचा लाभ घेऊन थकीत कर्जाची परतफेड करावीव आपले कर्ज खाते बंद करावे. लाभार्थीने कर्ज खाते बंद केल्यावर महामंडळाच्यारुपये 10 लक्ष कर्ज परतावा योजनेतंर्गत तसेच विविध महामंडळाच्या योजनांचा लाभ घेतायेईल. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग  02362 228119/866889950 या दूरध्वनी  क्रमांकावर संपर्क साधावा. 0000

पोलीस भरतीतंर्गत चालक व पोलीस अंमलदार पदासाठी मैदानी चाचणी ११ जानेवारी पर्यंत -पोलीस निरीक्षक संदीप भोसले

सिंधुदुर्गनगरी दि.01 (जि.मा.का): जिल्हा पोलीस दलातंर्गत सोमवार दिनांक २ ते ४ जानेवारी २०२३ कालावधीत चालक पोलीस अंमलदार पदांची मैदानी चाचणी आणि गुरुवार दिनांक ५ ते ११ जानेवारी २०२३ कालावधीत पोलीस अंमलदार पदाची मैदानी चाचणी, पोलीस मुख्यालय मैदानावर होणार,असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी दिली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग दलातंर्गत मैदानी चाचणीसाठी एकुण ८ हजार ८४ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी चालक पदासाठी २ हजार १२६ अर्ज असून पोलीस अंमलदार पदासाठी ५ हजार ९५८ अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेत पोलीस अंमलदार ९९ पदे आणि चालक पोलीस अंमलदार २२ पदे अशी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ज्या उमेदवारांनी सिंधुदुर्ग पोलीस दल येथे भरती प्रक्रीयेसाठी ऑनलाईन आवेदन अर्ज भरलेले आहेत त्यांनी महाआयटी कडून प्रवेशपत्र पाठविण्यात आलेले आहेत. संबंधित उमेदवारांनी ओळखपत्राच्या दोन प्रती आवेदन अर्जाच्या आणि त्यांच्या छायांकित प्रतीचा संच तसेच आवेदन अर्जावर सादर केलेल्या छायाचित्राच्या पासपोर्ट साईजच्या छायाचित्रासह त्यांना बोलविले...