Posts
Showing posts from February, 2022
आजअखेर 55 हजार 690 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 139 - जिल्हा शल्य चिकित्सक
- Get link
- X
- Other Apps
चित्रकला क्षेत्रात प्राविण्या मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.) – शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने कोविड - 19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमउळे सन 2021-22 या वर्षी इ. 10वी च्या परीक्षेला बसणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना सन 2020-21 या वर्षी एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेला बसला आले नाही, अशा विद्यार्थ्यांना सन 2021-22 मध्ये केवळ इंटरमिजीएट ड्रॉईंग परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या श्रेणीच्या आधारे सन 2021-22 या वर्षापुरते सवलतीचे गुण देण्यास मान्यता दिली आहे. सदर निर्णय हे फक्त सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापुरताच लागू राहील. तरी सर्व माध्यमिक शाळआ, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक व संबंधितांची याची नोंद घ्यावी, असे आवाहन डॉ. अशोक भोसले, सचिव राज्यमंडळ पुणे यांनी केले आहे. 00000
10 वी व 12 वी परीक्षांसाठी राज्यमंडळ स्तरावर समुपदेशांची नियुक्त
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च - एप्रिल 2022 मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) लेखी परीक्षा दि. 4 मार्च 2022 ते दि. 7 एप्रिल 2022 व माध्यमिक प्रमाणपत्र ( 10 वी) ची लेखी परीक्षा दि. 15 मार्च 2022 ते दि. 4 एप्रिल 2022 या कालावधीत आयोजित केली आहे. परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्यासाठी राज्यमंडळ स्तरावर समुपदेशकांची नियुक्त करण्यात आली आहे. त्याचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. 1)8432592358, 2)7249005260, 3)7387400970, 4)9307567330, 5)8975478247, 6)7822094261, 7)9579159106, 8)9923042268, 9)7418119156, 10)8956966152. हे समुपदेशक परीक्षा कालावधीत सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क आवश्यकते समुपदेशन करतील. मात्र विद्यार्थी, पालक यांनी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व प...
३७ हजार ६०७ बालकांना पल्स पोलिओचा डोस
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी दि. 27 ( जि.मा.का) :- पल्स पोलिओ मोहिमेत आज ५ वर्षाखालील ३७ हजार २३७ तर ५ वर्षापुढील ३७० अशा एकूण ३७ हजार ६०७ बालकांना आज डोस पाजण्यात आला. यासाठी एकूण १ हजार ५० बुथवर २ हजार २८० कर्मचारी कार्यरत होते. ट्रॅझीट टीमकडून एकूण ८४० तर फिरत्या पथकाकडून एकूण १७७१ बालकांना डोस देण्यात आला. अशा एकूण ३७ हजार ६०७ बालकांना डोस देण्यात आला. ०००००
आजअखेर 55 हजार 689 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 137 - जिल्हा शल्य चिकित्सक
- Get link
- X
- Other Apps
दो बुंद जिंदगी के.. जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते बालकांना डोस पाजून राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेस प्रारंभ
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्ग दि. २७(जिमाका)- येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात झिरो ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते पोलिओचा डोस पाजून पल्स पोलिओ मोहिमेचा प्रारंभ झाला. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी बालकांना घेऊन आलेल्या मातांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अपर्णा गावकर, जिल्हा बाल संगोपन अधिकारी डॉ. संदेश कांबळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी हर्षल जाधव, बाह्य संपर्क अधिकारी डॉ. अविनाश नलावडे तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. ०००००
आजअखेर 55 हजार 687 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 137 - जिल्हा शल्य चिकित्सक
- Get link
- X
- Other Apps
10 मार्च रोजी पणजी येथे डाक अदालतीचे आयोजन
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का) : पोस्टमास्तर जनरल, पणजी-गोवा यांच्यामार्फत गुरुवार 10 मार्च 2022 रोजी पोस्टमास्तर जनरल, पणजी-गोवा यांच्या कार्यालयात डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग पोस्ट विभागाचे अधिक्षक, आ.ब.कोड्डा यांनी दिली. पोस्ट खात्याच्या विविध सेवेबाबत टपाल, स्पीड पोस्ट काऊंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक व मनिऑर्डर इत्यादी सेवेबाबतच्या तक्रारी या डाक अदालतीमध्ये विचारात घेतल्या जाणार आहेत. यासाठी तक्रार दाराने आपली तक्रार तपशिलासह तारीख, अधिकारी, नाव, हुद्दा इत्यादी माहितीसह आपली तक्रार शुक्रवार दि. 1 मार्च 2022 पर्यंत रमेश प्रभू, सेक्रेटरी, डाक अदालत आणि सहाय्यक डाकनिदेशक, पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, गोवा क्षेत्र, पणजी-गोवा यांच्या नावे पाठविण्यात यावी, असे आवाहन पोस्ट विभागाकडून करण्यात आले आहे.
14 मार्च रोजी सिंधुदुर्गनगरी येथे डाक अदालतीचे आयोजन
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का) : सिंधुदुर्ग पोस्ट खात्यामार्फत सोमवार 14 मार्च 2022 रोजी अधिक्षक डाकघर सिंधुदुर्गनगरी यांच्या कार्यालयात डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग पोस्ट विभागाचे अधिक्षक, आ.ब.कोड्डा यांनी दिली. पोस्ट खात्याच्या विविध सेवेबाबत टपाल, स्पीड पोस्ट काऊंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक व मनिऑर्डर इत्यादी सेवेबाबतच्या तक्रारी या डाक अदालतीमध्ये विचारात घेतल्या जाणार आहेत. यासाठी तक्रार दाराने आपली तक्रार तपशिलासह तारीख, अधिकारी, नाव, हुद्दा इत्यादी माहितीसह आपली तक्रार शुक्रवार दि. 4 मार्च 2022 पर्यंत आ.ब.कोड्डा, अधिक्षक, डाकघर, सिंधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्गनगरी यांच्या नावे पाठविण्यात यावी, असे आवाहन सिंधुदुर्ग डाकघर यांनी केले आहे.
अवजड वाहतुकीसाठी करुळ घाट 3 आठवडे बंद
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी दि. 25 ( जि.मा.का) : राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 जी वरील करुळ घाट रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग 166 जी वरील मौजे तळेरे ता. कणकवली पासून करुळ घाट, ता. वैभववाडी - गगनबावडा हद्दीपर्यंत रस्त्यावरील वाहतूक 3 आठवड्यांसाठी सर्व प्रकारच्या जड वाहनांसाठी बंद करणयाचे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. करुळ घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या घाटात सुरू असेलल्या जड वाहतुकीमुळे भरलेले खड्डे वारंवार उखडले जात असल्याने काम वेळेत होण्यास अडथळा निर्माण होत असल्याने घाटातील अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येत आहे. करुळ घाटातून होणारी वाहतूक पुढीलप्रमाणे पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. 1) कोल्हापूर वरुन येणारी अवजड वाहने खंडासरी (क्रशर चौक) चौकातून उजव्या वळणाने फोंडा घाटाने राष्ट्रीय महामार्ग 166 - जी कडे. 2) गोवा वरुन कोल्हापूरकडे जाणारी अवजड वाहने नांदगाव तिठ्ठ्यावरून फोंडा घाटातून कोल्हापूरकडे या पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने बंद करण्यात आलेला रस्ता व पर्याय...
बोगस क्रीडा प्रमाणपत्र, बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पण योजना
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी दि. 25 ( जि.मा.का) : खेळाडूंना शासकीय, निमशासकीय सेवेत 5 टक्के आरक्षण ठेवलेले असून बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारण करून क्रीडा विभागाकडून क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी केलेली आहे. तसेच काही उमेदवारंनी शासकीय सेवेचा लाभ घेतला आहे, अशा युवा उमेदवारांना भविष्यात अडचण निर्माण होऊ नये यासाठी एक संधी म्हणून बोगस क्रीडा प्रमाणपत्र, बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पण योजना राबवण्यात येत आहे. ज्या उमेदवारंनी क्रीडा संचालनालय व विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांच्याकडून बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी करून घेतली असेल, अशा उमेदवारांना तसेच त्या आधारे शासकीय, निमशासकीय व इतर कार्यालयामध्ये नोकरी धारण केली आहे अशा उमेदवारांनी मुळ क्रीडा प्रमाणपत्र व मुळ क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल आयुक्त, क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे व्यक्तीशः अथवा पत्राद्वारे दि. 31 मे 2022 पूर्वी समर्पीत करण्यात यावेत. अशा उमदवारांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील. मुदतीत बोगस क्रीडा प्रमाणपत्रे व मुळ क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल जमा न केल्यास संबंधीत उमेद...
आजअखेर 55 हजार 679 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 143 - जिल्हा शल्य चिकित्सक
- Get link
- X
- Other Apps
युक्रेनमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थांच्या सहाय्याकरिता जिल्हा प्रशासनाच्या २२८८४७ तसेच टोल फ्री १०७७ वर संपर्क करा - निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का) : सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी केंद्र शासनाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून १८००११८७९७ हा टोल फ्री क्रमांक तसेच जिल्हास्तरावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या ०२३६२-२२८८४७ व १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी केले आहे. नागरिकांसाठी पुढीलप्रमाणे हेल्पलाईन्स नवी दिल्ली येथे स्थापन करण्यात आलेल्या आहेत. केंद्रीय परराष्ट्रमंत्री कार्यालय, नवी दिल्ली फ़ोन-टोल फ्री 1800118797 फोन - 011-23012113/23014104/ 23017905 फॅक्स 011-23088124 ईमेल- situationroom@mea.gov.in सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणतेही नागरिक, विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असतील तर त्यांच्या नातेवाईकांनी/ संबंधितांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियत्रंण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गच्या ०२३६२-२२८८४७ या हेल्पलाईन क्रमांकावर आण...
जैविक एफटिके-एचटूएस व्हायलस वापरुन पिण्याच्या पाण्याची तपासणी
- Get link
- X
- Other Apps
लंडन, सिसिली, सिंगापूर पर्यटनस्थळांच्या पंगतीत सिंधुदुर्ग कोंड नेस्ट ट्रॅव्हलरने जाहीर केली जगातील 30 सर्वात सुंदर पर्यटनस्थळांची यादी
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी दि. 23 ( जि.मा.का) : कोंड नेस्ट ट्रॅव्हलर या मॅगझिनने यंदाच्या वर्षी भेट देण्यासाठी जगातील 30 सर्वात सुंदर पर्यटन स्थळांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये लंडन, सिसिली, सिंगापूर यासह इस्तंबूल, इजिप्त, माल्टा, सर्बिया, केपवर्दे अशा आंतरराष्ट्रीय तसेच सिक्कीम, मेघालय, ओरिसा, राजस्थान, गोवा, कोलकाता, भिमताल, केरळमधील आयमानम अशा भारतीय 9 पर्यटन स्थळांत महाराष्ट्रातील एकमेव सिंधुदुर्गचा समावेश केला आहे. जगातील सर्वात सुंदर 30 पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये सिंधुदुर्गचा समावेश असणे ही खरोखरच आपल्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली. कोंड नेस्ट ट्रॅव्हलर, इंडिया https://www.cntraveller.in/story/best-places-to-visit-in-india-world-2022-cnt-bhimtal-goa-shillong-seoul/ हे एक मॅगझिन तसेच वेबसाईट असून दरवर्षी जगातील सुंदर पर्यटन स्थळांची यादी ते प्रसिद्ध करतात. त्यामध्ये या पर्यटन स्थळांची संपूर्ण माहिती दिली जाते. जागतिक स्तरावरील पर्यटनास चालना देण्यासाठी त्यांच्याकडून हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो. यंदाच्याव...
निर्लेखित जडसंग्रहाच्या विक्रीसाठी निविदा पाठवण्याचे आवाहन
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी दि. 22 ( जि.मा.का) : जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, सिंधुदुर्ग या कार्यालयातील निर्लेखित जडसंग्रह साहित्याची परपत्रक पद्धतीने विक्री करण्यात येणार असल्याचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.एफ. पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे. प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सिंधुदुर्ग या कार्यालयातील विविध प्रकारच्या निर्लेखित जडसंग्रह साहित्याची दरपत्रक पद्धतीने विक्री करावयाची आहे. सदर साहित्य ज्या खरेदीदारात विकत घ्यावयाचे आहे त्यांनी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय येथे दि. 25 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत दरपत्रते सिलबंद लिफाफ्यात पाठवावीत. निविदेच्या बंद लिफाफ्यावर स्वच्छ अक्षरात लॉट घेणाऱ्याचे नाव व संपूर्ण पत्ता नमुद करावा. दि. 25 फेब्रुवारी 2022 रोजी नंतर आलेल्या निविदांचा स्वीकार केला जाणार नाही. निविदा दि. 28 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 5 वाजता उघण्यात येतील. सदर विक्री करावयाचे निर्लेखित जड संग्रह साहित्या कार्यालयाच...
5 हजार 941 सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी
- Get link
- X
- Other Apps
फिल्ड टेस्ट किट द्वारे एकाच दिवशी जिल्ह्यातील सिंधुदुर्गनगरी दि. 22 ( जि.मा.का) : जल जीवन मिशन अंतर्गत पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण उपक्रमांतर्गत क्षेत्रीय तपासणी संच ( फिल्ड टेस्ट किट) च्या माध्यमातून उद्या दि. 23 फेब्रुवारी 2022 रोजी एकाची दिवशी अभियान स्वरुपात जिल्ह्यतील एकूण 431 ग्रामपंचायतीमधील 741 महसुली गावातील 5 हजार 941 सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी करण्यात येणार आहे असल्याचे पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रसिद्धई पत्रकाद्वारे कळविले आहे. प्रसिद्धी पत्रकार म्हटले आहे. केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन या महत्वकांक्षी प्रकल्पांतर्गत पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमामध्ये ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व सुरक्षित पाणी उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठी पाणी गुणपत्ता संनियत्रण व सर्वेक्षण उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणीसाठी क्षेत्रीय तपासणी संचाच्या ( फिल्ड टेस्ट किटच्या ) माध्यमातून स्थानिक लोकांना सक्षम करण्यात येणार आहे. विशेषतः स्थानिक...
शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज भरण्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 22 (जि.मा.का) : सन 2021-22 करिता भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवर नवीन अर्ज नोंदणी व जन्या अर्जांच्या नुतनीकरणासाठी दि. 28 फेब्रुवारी 2022 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही प्रक्रिया शासनाच्या आपले सरकार पोर्टलवरील https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सुरू असल्याचे दीपक घाटे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालये तसेच संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य, विद्यार्थी व पालक यांनी, जे विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित असतील अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज व जुन्या अर्जांचे नुतनीकरण दि. 28 फेब्रुवारी 2022 अखेर करावेत. विद्यार्थ्यांचे अर्ज विहीत मुदतीत भरून घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची आहे. या योजनेपासून मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहिल्यास त्यास संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य जबाबदार राहतील असे पत्रकार नमुद केले आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज नोंदणी व नुतनीकरण करण्यात आलेले आहे, अशा अर्जांची छाननी क...
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत मोफत विधी सेवा राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून 701 खटले निकाली
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी दि. 22 ( जि.मा.का) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फकत अनुसूचित जाती किंवा जमातीतील व्यक्ती, स्त्रीया किंवा बालके, अपंग व्यक्ती, किंवा वार्षिक 3 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना मोफत विधी सेवा व सल्ला तसेच प्रकरण दाखल करण्यासाठी विधिज्ञ (वकिल ) नेमले जातात. तसेच राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून सन 2021 मध्ये 701 खटले निकाली निघाले असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव डी.बी. म्हालटकर यांनी दिली. विधी सहाय्य किंवा सल्ला मोफत आहे. विधिज्ञांचे मानधन, प्रकरण दाखल करण्याकरिता येणारा टायपिंग, झेरॉक्स तद्अनुषंगीक खर्च हे विधी सेवा प्राधिकरणामार्फत अदा केले जातात. सन 2021 मध्ये 3 राष्ट्रीय लोक अदालती झाल्याअसून त्यामध्ये एकूण प्रलंबित 701 खटल्यांसह 2 हजार 476 वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटली आहेत. तसेच 15 आरोपींना रिमांडच्यावेळी विधी सहाय्य देण्यात आले आहे. 17 न्यायालयीने बंदींना, 5 शिक्षाबंदींना जिल्हा व सत्र न्यायालय सिंधुदुर्ग येथे तर 2 शिक्षाबंदीना उच्च न्यायालय, मुंबई येथे विधी सहाय्य देण्यात आले आहे. प्राधिकरणामार...
एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा 26 फेब्रुवारी रोजी
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि.22: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा - 2021 ही शनिवार दि. 26 फेब्रुवारी 2022 रोजी होत आहे. कणकवली तालुक्यातली विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली, कणकवली कॉलेज, कणकवली आणि एस.एम.हायस्कूल कणकवली, या उपकेंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेची वेळ सकाळी 11 ते दुपरी 12 अशी असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी कळविले आहे. विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली, बैठक क्रमांक KD001001 ते KD001432, एस.एम.हायस्कूल, कणकवली बैठक क्रमांक KD002001 ते KD002384 व कणकवली कॉलेज कणकवली बैठक क्रमांक KD003001ते KD003282 याप्रमाणे आहेत. या परीक्षेच्या आयोजनाबाबत उमेदवारांना महत्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे आहेत. Ø आयोगामार्फत आयोजित परीक्षामध्ये कॉपीचा, गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. Ø अशा प्रकरणी आयोगाकडून संबंधितांवर फौजदारी व प्रशासकीय अशा दोन्ही स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे. Ø परीक्षांकरिता आयोगाने कडक उ...
सकारात्मक व शाश्वत विकास महत्वाचा - पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.) – एकाद्या परिसराचा विकास करत असताना होणारा विकास हा सकारात्मक आणि शाश्वत असणे हे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. तारकर्ली, मालवण येथे स्कुबा डायव्हिंगच्या अत्याधुनिक बोटीच्या लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, दीपक केसरकर, पर्यटन सचिव वल्सा नायर, सचिव मनिषा म्हैसकर, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी संजिता महोपात्रा, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसिलदार अजय पाटणे, पर्टयन महामंडळाचे दीपक माने, डॉ. सारंग कुलकर्णी आदी उपस्थित होते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून सकारात्मक विकास करणे हे उद्दीष्ट असल्याचे सांगून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, जिल्ह्यात रोजगार निर्मिती झाली पाहिजे, उद्योग आले पाहिजेत. पण त्यामुळे कोकणच्या निसर्ग सौंदर्यामध्ये कोणतीही बाधा आली नाही पाहिजे. कोकण हा निसर्ग संपन्न आहे. विकास करत असताना त्याचे सौंदर्य कोठेह...