बर्मिगहॅम जागतिक नेमबाजी स्पर्धा 2022 पदक प्राप्त खेळाडु व क्रीडा मार्गदर्शकांना पारितोषिकाची रक्कम जाहिर
सिंधुदुर्गनगरी दि.26 (जि.मा.का):- महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण, 2012 अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी तसेच राज्याचे नाव उज्वल करुन पदक प्राप्त खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना रोख बक्षीस देऊन गौरविण्याची योजना संचालनालय स्तरावर कार्यान्वित असुन त्याअंतर्गत दि. 28 जुलै ते 8 ऑगस्ट 2022 या कालावधीत बर्मिगहॅम-इग्लंड येथे संपन्न झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धा 2022 स्पर्धेतील पदक प्राप्त 4 खेळाडु व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांच्या रोख पारितोषिक रक्कमेत मुख्यमंत्री महोदयांनी वाढ करुन पुढीलप्रमाणे पदक प्राप्त खेळाडूंना रोख पारितोषिकाची रक्कम जाहिर केली आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली.
राष्ट्रीयकुल स्पर्धा 2022 व जागतिक नेमबाजी स्पर्धा 2022 स्पर्धेतील पदक प्राप्त खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना मंजूर रोख पारितोषिकाची रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
राष्ट्रकुल स्पर्धा,2022 क्रीडा स्पर्धेत संपादन केलेले पदक व रोख पारितोषिक रक्कम (रु. लाखात) सुवर्ण पदक- खेळाडू- 50, मार्गदर्शक- 12.50. रौप्य पदक - खेळाडू- 30 मार्गदर्शक- 7.30. कांस्य पदक- खेळाडू - निरंक, मार्गदर्शक- निरंक.
राष्ट्रकुल स्पर्धा,2022 क्रीडा स्पर्धेत संपादन केलेले पदक व रोख पारितोषिक रक्कम (रु. लाखात)
सुवर्ण पदक- 50, मार्गदर्शक- 12.50. रौप्य पदक- खेळाडू-30, मार्गदर्शक- 7.30. कांस्य पदक- खेळाडू- निरंक, मार्गदर्शक- निरंक.
00000
Comments
Post a Comment