गुणवंत विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांचा गौरव सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात सर्वांचे योगदान आवश्यक -पालकमंत्री नितेश राणे
• दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कटिबध्द • दरडोई उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न • सिंधुदुर्गला विकसित जिल्हा बनविणार सिंधुदुर्गनगरी दि 30 (जिमाका) सिंधुदुर्ग जिल्हा विकासाकडे घोडदौड करत आहे. साक्षरतेमध्ये राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे. दहावी आणि बारावीच्या निकालात कोकण विभागात आपला जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. प्रशासनातील अधिकारी देखील जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबध्द आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकसित जिल्हा बनविण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. जिल्ह्यातील इयत्ता बारावीच्या (विज्ञान, कला आणि वाणिज्य विद्याशाखा) व इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना आणि १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिमेमध्ये कोकण विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या तालुका स्तरीय शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, पोलिस अधीक्षक डॉ. मनोज दहिकर, अपर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, अपर जिल्ह...