Posts

Showing posts from March, 2023

पोलीस शिपाई पदाची रविवारी लेखी परीक्षा

सिंधुदुर्गनगरी, दि. ३० (जि.मा.का.): सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरती २०२१ मधील पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या, उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार दि. २ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वा. कुडाळ येथील संत राऊळ महाराज कॉलेज, कराची महाराष्ट्र शिक्षण प्रसारक इंग्लिश स्कूल व कुडाळ हायस्कूल कुडाळ या तीन केंद्रांवर घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र हे 'महाआयटी' मार्फत ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करण्यास उपलब्ध आहे. परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी दोन तास अगोदर पोहोचणे आवश्यक आहे. या संदर्भात काही अडचण, समस्या असल्यास उमेदवारांनी पोलीस नियंत्रण कक्ष ०२३६२- २२८६१४ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी केले आहे. 0000

अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करा - अविशकुमार सोनोने

सिंधुदुर्गनगरी,दि.29 (जि.मा.का.) : अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम घ्यावेत. अंमली तपासणीसाठी पोलीसांकडे संपर्क साधून किटची मदत घ्यावी, असे निर्देश प्र.निवासी उपजिल्हाधिकारी अविशकुमार सोनोने यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय नार्को कोऑडीनेशन सेंटर व जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची एकत्रित बैठक आज झाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक महेंद्र घाग यांनी सर्वांचे स्वागत करुन विषय वाचन केले. तसेच विभाग निहाय आढावा घेतला. अंमली पदार्थ प्रतिबंधात्मक उपाय-योजना अंमलबजावणीबाबत गृह विभाग व सर्व संबंधित विभागाव्दारे सुरु असलेल्या कामाची माहिती दिली. उपजिल्हाधिकारी श्री. सोनोने म्हणाले, खसखस व गांजा लागवडीबाबत खबऱ्यांकडून माहिती मिळवावी त्याबाबत संबंधित यंत्रणांनी तात्काळ कळवावे. अंमली पदार्थाच्या सेवनाच्या दुष्पपरिणामांची माहिती व्हावी, यासाठी शाळा- महाविद्यालयांमध्ये जनजागृती करण्यात यावी. नशाबंदी, व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना करण्याबाबत कृती आराखडा तयार करावा. सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून आरोग्य विभागाने व्यस...

जिल्हावासियांना शुध्द व सुरक्षित पाणी पुरवठा करणे ही जिल्हा परिषदेची जबाबदारी - मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर

सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.) : पाणी म्हणजे जीवन आहे, म्हणुनच मानवी जीवनात स्वच्छ व शुध्द पाण्याचे अनन्य साधारण महत्व आहे. शुध्द व सुरक्षित पाणी पुरवठा होण्यासाठी पाणी गुणवत्ता चांगली असणे गरजेचे आहे. जिल्हावासियांना शुध्द पाणी पुरवठा करणे ही जिल्हा परिषदेची जबाबदारी असुन त्या करीता जिल्हापरिषद कटिबध्द आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे. शरद कृषी भवन येथे जल जीवन मिशन अंतर्गत ग्राम पाणी पुरवठा स्वच्छता समिती सदस्य तसेच ग्रामपंचायत स्तरावरील भागधारक यांच्या स्तर- 3 चे दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर, श्रीपाद पाताडे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संतोष पाटील, आदी उपस्थीत होते. यावेळी जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याची गुणवत्ता राखण्याकरीत तयार करण्यात आलेली पाणी गुणवत्ता माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. प्रास्ताविकांत श्री. ठाकुर म्हणाले, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत कोट्यावाधी रुपय...

वसतीगृह भाडे तत्वावर घेण्यासाठी इच्छुक इमारत मालकांनी संपर्क साधावा - सहायक आयुक्त संतोष चिकणे

सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.) : इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय विभागाकडून इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात मुलांकरीता एक व मुलींकरीता एक असे दोन वसतीगृह तातडीने सुरु करावयाचे आहे. या वसतीगृहाकरीता खासगी इमारत भाडे तत्वावर घेण्यासाठी शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे. तरी इमारत मालक भाडेतत्वार इमारत देण्यात इच्छुक असतील अशा इमारत मालकांनी अधिक माहितीसाठी समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. मुलां- मुलींसाठी 100 क्षमतेच्या खासगी इमारतीमध्ये आवश्यक जागा 9200 चौ.फुट (अंदाजे) असणे आवश्यक आहे. इमारतीमध्ये स्वंयपाकगृह, भोजनकक्ष, मनोरंजन हॉल, संगणक कक्ष, स्टोअर रुम, कार्यालय, अभ्यासिका व स्वच्छतागृहे 10, स्नानगृहे 10 या सर्व बाबी करीता अंदाजित 92 चौ.फुट बांधकाम पुर्ण असलेल्या इमारतीमध्ये सर्व सोयी- सुविधायुक्त इमारत आवश्यक आहे. इमार ही जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरी किंवा कुडाळ, कणकवलील शहराच्या ...

ग्रंथदिंडीने सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव २०२२ ची कुडाळ मध्ये सुरुवात

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) : परंपरिक वेशभूषेत... लेझीमच्या तालावर पुस्तक देती हमको ज्ञान, चांगले पुस्तक- चांगले शिक्षक घोषणा देत कुडाळ मधील रा. ब. अनंत शिवाजी देसाई तथा टोपीवाला वाचनालय आणि ग्रंथ संग्रहालय येथून ग्रंथदिंडीची सुरुवात करण्यात आली. नगराध्यक्ष आफरीन करोल यांच्या हस्ते या ग्रंथ पुजनाने दिंडीचा शुभारंभ झाला. उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथ संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यामार्फत आयोजित सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव २०२२ ला आज कुडाळ येथे सुरुवात झाली. २७ आणि २८ मार्च या दोन दिवशी हा ग्रंथोत्सव कुडाळमध्ये आयोजित करण्यात आला आहे. ग्रंथदिंडीतील पालखीत भारताचे संविधान, भगवतगीता, विश्वकोष यांचा समावेश होता. राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष मंगेश मस्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे उपस्थित होते. आजच्या ग्रंथ दिंडीमध्ये ...

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मगावी शासकीय यंत्रणेतून पत्रकार दिन करा वाचन संस्कृती वाढविण्यासाठी पुस्तकांचे आदान-प्रदान सुरु करा -पालकमंत्री रविंद्र चव्हाण

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) : नव्या पिढीला वाचनाची सवय लावण्यासाठी आवड निर्माण करायला हवी. भाषा आणि त्यावरील प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी ही वाचन संस्कृती महत्त्वाची आहे. लोक सहभागातून वाचन संस्कृती वाढविण्यासाठी पुस्तकांचे आदान-प्रदान सुरु करा असा मौलीक सल्ला देतानाच पुढील वर्षापासून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी शासकीय यंत्रणेतून पत्रकार दिन साजरा करावा त्यासाठी विशेष निधीची तरतूद ठेवावी, अशी सूचना पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिली. उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव-2022 चे उद्घाटन पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते कुडाळ येथे करण्यात आले. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष आफ्रिन करोल, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, माजी आमदार राजन तेली, संजय आंग्रे, अमरसेन सावंत आदी उपस्थित होते. पालकमंत्र्यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले या नंतर सरस्वती प्रतिमा, ग्रंथ पालखी आणि डॉ. एस....

आंबोलीमध्ये निसर्ग पर्यटनावर आधारित प्रकल्प राबविण्याचा मानस - उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी

सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) आंबोली मध्ये विविध निसर्ग पर्यटन यावर आधारित प्रकल्प राबविण्याचा मानस असल्याचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी सांगितले. वनविभाग सावंतवाडीमार्फत आंबोली येथे सिंधूरत्न योजनेंतर्गत तीन दिवसीय गाईड प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच सावित्री पालेकर, वनक्षेत्रपाल विद्या घोडके, वन्यप्राणी अभ्यासक गिरीश पंजाबी, फुलपाखरू तज्ज्ञ हेमंत ओगले, उभयचर प्राणी अभ्यासक महादेव उर्फ काका भिसे, वनस्पती अभ्यासक मिलिंद पाटील, मानद वन्यजीव रक्षक रमण कुलकर्णी, हेमंत उगले आदी उपस्थित होते. उपवनसंरक्षक श्री. रेड्डी यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन झाले. ते म्हणाले, आंबोलीमध्ये विविध निसर्ग पर्यटन यावर आधारित प्रकल्प राबविण्याचा मानस आहे. त्याचबरोबर पर्यटनासोबतच निसर्ग संवर्धनासाठी उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांनी सुद्धा पुढे येऊन वनमित्र म्हणून काम केल्यास वने वाचून पर्यटन वाढण्यास मदत होईल. तसेच प्राण्यांचा अधिवास अबाधित होईल. या प्रशिक्षण कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून वन्यप्राणी अभ्यासक गिरीश पंजाबी पुढे म्हणाले, वन्यप्राणी त्यांचा अधिवास त्यांचं वा...

अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे मत्स्यव्यवसाय वाढीस चालना

Image
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात कोकण विकासासाठी जवळपास साडेतेरा हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय वाढीस अधिक चालना मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला 121 किलो मीटरचा सागरी किनारा लाभला आहे. यावरील 87 गावांमधून मासेमारी चालते. 2016 नुसार 32 हजार 17 ही मच्छीमारांची लोकसंख्या आहे. एकूण 7 हजार 304 कुटुंबे असून त्यापैकी 7 हजार 174 क्रियाशील मच्छीमार आहेत. जिल्ह्यात मासळी उतरविण्याची 34 केंद्रे आहेत. तर शासकीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र दांडी मालवण येथे आहे. एकूण 23 बर्फ कारखाने असून 3 शीतगृहे आहेत. एकूण परवानाधारक मासेमारी नौका 2 हजार 826 आहेत. 1 हजार 646 परवानाधारक यांत्रिक नौका आहेत. तर परवानाधारक बीगर परवानाधारक नौका 1 हजार 180 इतक्या आहेत. 23 सागरी मत्स्य सहकारी संस्था असून 26 हजार 772 मत्स्य सहकारी संस्थांचे सभासद आहेत. 380 डिस्ट्रेस अलर्ट ट्रान्समिशन यंत्र असून 21 व्हिटीएस-एआयएस यंत्र आहेत. 312 नौकाधारकांना किसान क्रेडीट कार्ड देण्यात आले आहे. निमखारे पाणी खाजणक्षेत्र 2 हजार 216 हेक्टर असून संवर्धनास उपयुक्त क्षेत्र 1 हजार 268 हेक्टर इतके आहे. ...

24 मार्च जागतिक क्षयरोग दिन "होय, आपण टीबी संपवु शकतो"

दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सर्व स्तरावर क्षयरोग नियंत्रणाकरीता विविध विशेष जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतात. जागतिक आरोग्य संघटना क्षयरोग संदर्भात लक्ष वेधुन घेण्यासाठी क्षयरोग निर्मुलना संदर्भातल्या महत्वांच्या बाबींवर प्रकाश टाकण्याकरीता दरवर्षी 24 मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमित्त घोषवाक्य प्रसारित करते या वर्षीचे (24 मार्च 2023) घोषवाक्य आहे. "Yes!We can End TB" "होय, आपण टीबी संपवु शकतो. " तसेच 24 मार्च World TB Day च्या निमित्ताने जनजागृती प्रभातफेरी, ऑटो मायकिंग रांगोळी स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा, निबंध स्पर्धा, कम्युनिटी मिटिंग, पेशंट प्रोव्हायडर मिटिंग, स्कुल मिटिंग, सेन्सेटायझेशन मिटिंग इत्यादी चे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमाअंतर्गत केंद्र सरकारने सन २०२५ पर्यंत भारत देशातुन क्षयरोग दुरिकरणाचे धोरण ठरविलेले असुन त्या अनुषंगाने माहे मार्च २०२३ मध्ये राष्ट्रीय क्षयरोग दूरिकरण कार्यक्रमाअंतर्गत अनेक क्षयरोगाविषयी उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रधानमंत्री टीबी ...

जिल्हा युवा पुरस्कारासाठी ५ एप्रिल पर्यंत अर्ज सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी, दि. २3 (जि.मा.का.): राज्याचे युवा धोरण २०१२ मधील शिफारशीच्या अनुषंगाने शासनाने राज्य व जिल्हास्तरावर युवा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलेला आहे.जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील युवा अथवा पात्र नोंदणीकृत संस्थांनी आपले अर्ज विहीत नमुन्यात भरुन योग्य कागदपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे दि. ५ एप्रिल २०२३ पर्यंत सादर करावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे. जिल्हास्तरावर एक युवक व एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना पुरस्कार देण्यात येईल. या पुरस्कार गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम रु.१०,०००/- (प्रति युवक व युवतीसाठी) व गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम रु.५०,०००/- (एका संस्थेसाठी) अशा स्वरुपाचा असेल. युवा अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य, समाजातील दुर्बल घटक, अनुसुचित जाती, जमाती व जनजाती आदिवासी भाग इत्यादी बाबतचे कार्य, शिक्षण, प्रौढशिक्षण, रोजगार,...

जेईई, नीट, एमएचटी - सीईटी प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅब चे वाटप

सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.): इतर मागास व बहुजन कल्याण विभागांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर या संस्थेमार्फत JEE,NEET, MHT-CET चे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, येथे विद्यार्थ्यांना टॅब चे वाटप करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी समाज कल्याण विभागाचे सहायक लेखाधिकारी भालचंद्र कापडी उपस्थित होते. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) महाराष्ट्र राज्य, नागपूर या संस्थेमार्फत JEE, NEET, MHT - CET चे प्रशिक्षण घेणाऱ्या जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना टॅब, टॅब कव्हर तसेच दररोज 6 GB डाटासह सिमकार्डचे वाटप मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच बरेच विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी सदर टॅबचा उत्तम उपयोग होणार असल्याचे मनोगतही मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी अनिल बोरीकर, अमोल श्रीमानवार, संतोष परूळेकर, सुनिल बागुल, रवी जाधव, कलिंगण, मयुर कदम, आ...

शिष्यवृत्ती नवीन अर्ज नोंदणी, जुन्या अर्जाचे नूतनीकरणासाठी 31 मार्च पर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.): भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी सन 2022-23 करीता महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज अद्याप नोंदणी झालेली नाहीत, अशा अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नूतनीकरण करणे तसेच महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज मंजुरीस पाठविण्यासाठी दि.31 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे. शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रीया शासनाच्या आपले सरकार पोर्टलवरील https://mahadhtmahait.gov.in या संकेतस्थळावर सुरु आहे. विद्यार्थ्यानी वेळत अर्ज भरून घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची आहे. महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले अर्जाची छाननी करून परिपूर्ण अर्ज मंजुरीस्तव या कार्यालयाकडे वर्ग करण्याबाबत संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य यांनी दि. 31 मार्च अखेर कार्यवाही करावी. ज्या विद्याथ्यांचे अर्ज अद्याप नोंदणी झालेली नाहीत. अशा विद्यार्थ्याचे अर्ज संबंधित महाविद्यालयांनी नोंदणी करून म...

जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते बचतगट उत्पादित वस्तूंच्या भव्य प्रदर्शनाच्या बॅनरचे अनावरण

सिंधुदुर्गनगरी, दि. २१ (जि.मा.का.): माविम बचतगटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्री २४ ते २७ मार्च २०२३ रोजी सकाळी १० ते रात्री १० या कालावधीत होणार आहे. या भव्य प्रदर्शन आणि विक्रीच्या बॅनरचे अनावरण जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आले. हे प्रदर्शन आणि विक्री जेटी बंदर, मालवण बीच, मालवण येथे आयोजित केली आहे. या बॅनर अनावरण प्रसंगी महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी नितीन काळे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते उपस्थित होते. भव्य प्रदर्शन आणि विक्री समारंभाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती जिल्हा समन्वयक अधिकारी (महिला आर्थिक विकास महामंडळ, सिंधुदुर्ग) नितीन काळे यांनी दिली आहे. जागतिक महिला दिननिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प ( नवतेजस्विनी अंतर्गत) महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) (महाराष्ट्र शास...

माविमच्या महिला बचत गटांचे जिल्हास्तरीय प्रदर्शन 24 ते 27 मार्चला जेटी बंदर, मालवणात -जिल्हा समन्वय अधिकारी नितीन काळे

सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का.): आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून सन 2023 हे साजरे करण्यात येत आहे. (नवतेजस्विनी) महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माविम बचत गटांतील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूचे जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री दिनांक 24 ते 27 मार्च 2023 असे एकूण 04 दिवस जेटी बंदर, मालवण याठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी नितीन काळे यांनी दिली. या प्रदर्शनाचे उद्घाटन दि.24 मार्च 2023 रोजी दुपारी 1 वाजता सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण, यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात येणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) (महाराष्ट्र शासन अंगीकृत) जिल्हा कार्यालय या कार्यालयामार्फत जिल्ह्यातील गरीब, गरजू, मागासवर्गीय, विधवा, परितक्ता, भूमिहीन महिला अल्पभूधारक महिला व वंचित महिलासाठी बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे कार्य करीत आहे. सद्यस्थितीत सिंधुदुर...

गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ‘आनंदाचा शिधा’एक लाख 58 हजार 749 कुटुंबियांना -जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते

सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का.): राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअतंर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकाधारकांना आगामी गुढीपाडवा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 1 लाख 58 हजार 749कुटुंबांना राज्य शासनाच्यावतीने 100 रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ मिळणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते यांनी दिली आहे. ‘आनंदाचा शिधा’ मध्ये 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 किलो साखर व 1 लिटर पामतेल या 4 शिधाजिन्नसांचा समावेश आहे.हे शिधाजिन्नस प्रति शिधापत्रिकाधारकांना ई पॉस प्रणालीव्दारे प्रति संच 100 रुपये दराने वितरीत करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये गोदाम निहाय शिधाजिन्नस संच्याचा पुरवठा पुढीलप्रमाणे आहे. गोदामाचे नाव सावंतवाडी -25 हजार 175, दोडामार्ग -9 हजार 54, वेगुर्लां- 16 हजार 257, कुडाळ- 29 हजार 345, कणकवली -26 हजार 537, मालवण- 12 हजार 534, आचरा, 9 हजार 120, देवगड, 11 हजार 666, विजयदुर्ग 9 हजार 702, वैभववाडी- 9 हजार 359 असे एकूण 1 लाख 58 हजार 749 शिधा पत्रिकाधारकांना आनंदाच्या शिधा संच्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. 0000

वीज, वारा मेघगर्जनेसह 16 व 17 मार्चला पावसाची शक्यता नागरिकांनी दक्षता घ्यावी

सिंधुदुर्गनगरी, दि.16 (जि.मा.का.): प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून हवामान विषयक मिळालेल्या पूर्व सूचनेनुसार जिल्ह्यात दि. 16 व 17 मार्च या कालावधीत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या कालावधीत विजा चमकण्याची शक्यता असून ताशी 30 ते 40 किमी प्रती तास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेली आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे. नागरिकांनी विजा चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी:- विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्रोतांपासून अलग करून ठेवावीत, दूरध्वनी, भ्रमणध्वनी चा वापर टाळावा,विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, विजेच्या खांबांपासून लांब रहावे, विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये, एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे, धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात, पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झ...

सामाजिक न्याय विभागाच्या अनुसूचित जाती योजनांची कलापथक व चित्ररथाव्दारे प्रचार- प्रसिध्दी - जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते

सिंधुदुर्गनगरी, दि. 16 (जि.मा.का.) : अनुसूचीत जातीच्या लोकांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी निर्णय घेत असते. या निर्णयांचा लाभ लाभार्थीपर्यंत पोहचावा त्याची प्रचार- प्रसिध्दी व्हावी, यासाठी माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय प्रचार- प्रसिध्दी करते.सध्या जिल्ह्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अनुसूचित जातीसाठी असणाऱ्या योजनांची कलापथक व चित्ररथाच्या माध्यमातून प्रचार- प्रसिध्दी सुरु असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी दिली. जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने कलापथक व चित्ररथ जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये फिरणार आहे. कला पथकामध्ये शाहीर कल्पना माळी,तळवणे- सावंतवाडी, विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी गुढीपूर व चैतन्य महिला विकास मंडळ बांदा- सावंतवाडी यांचा समावेश आहे. तर स्काय क्रिएशन, कोल्हापूर येथील चित्ररथ आहे. कला पथक व चित्ररथामध्ये अनुसूचित जातीसाठी असणाऱ्या अनेक योजनांची सविस्तर माहिती व्हीडिओ जिंगल्सच...

बजेटात मॉप पैशे राखून ठेयले... 65 हजार मे.टन काजू प्रक्रिया उत्पादनाक वाव!

Image
‘गती निर्णयांची प्रगती महाराष्ट्राची’ हे ब्रीद घेवून महाराष्ट्र शासनाने राज्याच्या विकासाची पाऊले टाकायला सुरुवात केली. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात कोकण विकासासाठी जवळपास साडेतेरा हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे काजू प्रक्रिया उद्योगाला निश्चितच बळ मिळणार असून, जिल्ह्यातून अतिरिक्त 65 हजार मेट्रीक टन काजू प्रक्रिया उत्पादनाला वाव मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 72 हजार हेक्टर हे काजू लागवडीचे क्षेत्र आहे. प्रत्यक्षात यामधून 59 हजार हेक्टर क्षेत्रातून फळे निघतात 1.60 मेट्रीक टन हेक्टरी काजूचे उत्पादन आहे. म्हणजेच 95 हजार मे.टन काजू उत्पादन सध्या मिळत आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत 97 मोठे तर, 224 छोटे काजू प्रक्रिया उद्योग अस्तित्वात आहेत. यामधून 10 हजार 584 मे.टन प्रक्रिया केलेले काजू उत्पादन मिळते. याचबरोबर मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेमध्ये 10 मोठ्या काजू प्रक्रिया उत्पादकांना मान्यता आहे. त्यामधून 20 हजार मे.टन प्रक्रिया काजू उत्पादन मिळत आहे. 9 मार्च रोजी झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात कोकणात विकासाला चालना देण्यासाठी जवळपास साडेतेरा ...

कुपोषण मुक्त जिल्ह्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची भूमिका महत्वाची - मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर

सिंधुदुर्गनगरी, दि. 14 (जि.मा.का.) : जिल्ह्यामध्ये कुपोषणाचे प्रमाण 1 टक्क्यापेक्षाही कमी आहे. कमी वजनाची किंवा कुपोषीत बालके जन्माला येवू नयेत यासाठी पोषण आहाराच्या माध्यमातून गरोदर व स्तनदा मातांना प्रथिनयुक्त सकस आहार उपलब्ध करुन देण्यावर भर द्यावा. जिल्हा कुपोषण मुक्त करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची भूमिका महत्वाची आहे. त्याबाबतचा जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार करण्यात येवून निधीची उलब्धता करुन दिली जाईल, असे आश्वासन जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी दिले. जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाच्यावतीने नवीन जिल्हा नियोजन सभागृहात आदर्श पर्यवेक्षिका, अंगवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस पुरस्कार वितरण सोहळा झाला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडनीस, जिल्हा पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. विद्यानंद देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी पल्लवी गावडे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी विलास आरोंदकर, जिल्हा जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते उपस्थित होते. श्री. नायर पुढे म्हणाले, जिल्ह्यामध्ये बालकांचे आरोग्य चा...

शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम उत्तर सूची संकेतस्थळावर प्रसिध्द

सिंधुदुर्गनगरी दि.14 (जि.मा.का): अंतरिम उत्तरसूचीमध्ये विहित मुदतीत प्राप्त झालेली आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तरसूची सुधारित केली आहे. या उत्तरसूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील या अंतिम उत्तरसूचीबाबत आलेली निवेदने विचारात घेतील जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्याहार केला जाणार नाही. या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येईल. अंतिम उत्तर सूची सह परीषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. याची कृपया नोद घ्यावी.असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त शैलेजा दराडे यांनी केले आहे. पूर्व उच्च प्राथमिक इ.5वी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.8वी या परीक्षेची इयत्तानिहाय पेपरनिहाय अंतरिम तात्पुरती उत्तरसूची दि. 17 फेब्रुवारी 2023 रोजी परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. 0000

राष्ट्रीय युवा स्वयंसेवक पदासाठी अर्ज करण्यासाठी २३ मार्चपर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी दि. 14 (जि.मा.का) : भारत सरकार युवा कार्य क्रीडा मंत्रालयतर्फे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी दि. २३ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील युवक व युवतीनी www.nyks.nic.in या वेबसाईटवर ऑनलाईन व नेहरु युवा केंद्र ओरोस येथे ऑफलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी यांनी केले आहे. या पदासाठी शिक्षण पात्रता कमीत कमी १० वी पास असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा दिनांक ०१/०४/२०२३ रोजी १८ पेक्षा जास्त व २९ पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. अर्जदार नियमित विद्यार्थी किंवा नोकरी करणारा नसावा. निवड झालेल्या युवा स्वयंसेवकाला दर महिना रु.५००० माधन देण्यात येईल. उमेदवार हा त्याच तालुक्यातील रहिवासी असावा. राष्ट्रीय युवा स्वयंसेवक पद हे पगाराची नोकरी नाही तसेच स्वयंसेवक हा कायदेशीररित्या सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या रोजगाराचा दावा करण्यास पात्र नसेल. अधिक माहिती व अर्ज www.nyks.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सदर करण्याची अंतिम तारी...

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेच्या 19 कर्ज प्रस्तावांना मान्यता - जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल

सिंधुदुर्गनगरी, दि. 14 (जि.मा.का) : शामराव पेजे कोकण इतर मागास महामंडळाची 10 लाख वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेच्या 19 कर्ज प्रस्तावांना आणि रुपये 1 लाख थेट कर्ज योजनेचा एका कर्ज प्रस्तावाला, वसंतराव नाईक महामंडळ यांचे 10लाख वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेतील एका कर्ज प्रस्तावाला लाभार्थी निवड समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या अध्यक्षेतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.असल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालायात शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ व वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, सन 2022-23 या आर्थिक वर्षातील लाभार्थी निवड समितीचे संपन्न झाली. बैठकीला जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मेश्राम, समाजकल्याणचे सहायक आयुक्त संतोष चिकणे, कौशल्य विकास व रोजगार विभागचे सहायक आयुक्त बिटोडे, आय. टी.आय चे प्रतिनिधी गवस यावेळी उपस्थित होते. 00000

सिंधुरत्न समृध्द योजनेतून क्रांती घडविणार -शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

सिंधुदुर्गनगरी, दि. 11 (जि.मा.का) : जिल्ह्यात सिंधुरत्न समृध्द योजनेतून क्रांती घडविली जाणार असल्याचं प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलं. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सिंधुरत्न समृध्द योजना मुख्यालयाच्या आजच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, माजी आमदार प्रमोद जठार, योजनेचे उपाध्यक्ष एम. देवेंद्र सिंह, सदस्य कीर्ती किरण कुमार, सदस्य सचिव दिलीप पवार , सदस्य सत्यविनायक मुळे आदी उपस्थित होते. शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले, अर्थसंकल्पातूनच कोकणच्या विकासासाठी नवी मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. कोकणासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली असून कोकणात विकासाला चालना नक्कीच मिळेल. सिंधूरत्न योजनेद्वारे कोकणातील बागायतदार शेतकरी, बचतगटांच्या महिलांसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. या योजनेतूनच जिल्ह्यातील महिला सक्षम होण्यासाठी मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात काजू पीक मोठ्या प्रमाणात होत आहे. या पिकावरील पूरक उद्योगधंद्यांना सुद्धा चालना देण्यात येईल. म्हणजेच जिल्ह्यात नवी काजू क्रांती होईल. फणस आणि ...

बाल विवाह प्रतिबंध अधिनियम जनजागृतीसाठी कार्यशाळा घ्या - उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती

सिंधुदुर्गनगरी, दि. 9 (जि.मा.का.) : सामुहिक विवाह सोहळ्यात एखादा बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विवाह सोहळा करणाऱ्या यंत्रणांच्या जनजागृतीसाठी तसेच बाल विवाह प्रतिबंध अधिनियमाच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी कार्यशाळांचे आयोजन करावे, असे निर्देश उपजिल्हाकारी रविंद्र मठपती यांनी दिले. महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हास्तरीय कृती दल तसेच जिल्हास्तरीय सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी संदेश कांबळे,माविमचे जिल्हा समन्वयक नितीन काळे, पोलीस निरीक्षक एस.बी.गावडे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत, बाल कल्याण समिती सदस्य ॲङ अरुण पणदूरकर, चाईल्ड लाईनच्या प्रियंका घाडी, समुपदेशक स्वाती पाटील, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समन्वयक विश्वनाथ कांबळी आदी उपस्थित होते. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी विषय वाचन केले. उपजिल्हाधिकारी श्री. मठपती यांनी यावेळी सविस्तर आढावा घेतला. कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या बालकांमध्ये एक पालक मयत बालके 316, दोन्ही पालक मयत बालके 18 तसेच विधवा महिला 972...

मत्स्यव्यवसाय योजना करीता १५ मार्च पर्यंत प्रस्ताव सादर करावेत - आयुक्त मत्स्यव्यवसाय (ता.) रत्नाकर राजम

सिंधुदुर्गनगरी, दि. 9 (जि.मा.का) : सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक साधनसामुग्रीवर आधारित पर्यटन, मत्स्यव्यवसाय व सूक्ष्म उद्योगांचा विकास करण्यासाठी सिंधुरत्न समृद्ध ही पथदर्शी योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या ३ वर्षांसाठी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या अनुषंगाने मत्स्यव्यवसाय विभागामार्फत राबवयाच्या योजना करीता प्रस्ताव सादर करणेबाबत कळविण्यात आले होते. ३१ मार्च २०२३ रोजी २०२२-२३ हे आर्थिक वर्ष संपत आहे. सन २०२२-२३ अंतर्गत प्राप्त प्रस्तावाची तपासणी छाननी व प्रस्ताव जिल्हा नियोजन विभागास सादर करणे इत्यादी करीता अवधी लागणार असल्याने सिधुरत्न समृद्ध सन २०२२-२३ अंतर्गत प्रस्ताव दि.१५ मार्च २०२३ रोजी पर्यंत सादर करावेत. तरी आपले मत्स्य सहकारी संस्थेच्या सभासद यांना याबाबत तात्काळ अवगत करावे. सदर योजनेचे परिपूर्ण प्रस्ताव आपले कार्यक्षेत्रातील परवाना अधिकारी यांना दि.१५/०३/२०२३ रोजी पर्यंत सादर करावे. अशी माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (ता.) मालवण रत्नाकर प्रभाकर राजम यांनी दिली आहे. 0000

क्रीडा सवलत गुणांचे परीपूर्ण प्रस्ताव 5 एप्रिल पर्यत सादर करावेत -जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस

सिंधुदुर्गनगरी, दि. 9 (जि.मा.का) : जिल्ह्यातील शाळा,कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विद्यार्थ्याचे क्रीडा सवलत गुणांचे परीपूर्ण प्रस्ताव (प्रत्येक खेळाडूसाठी स्वतंत्र प्रस्ताव ) तयार करून दोन प्रतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, येथे दि. 5 एप्रिल 2023 पर्यत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये स्टेट बोर्ड अंतर्गत असलेल्या शाळेतील इ.10 वी व इ.12 वी मधील खेळाडू "विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण मिळणेसाठीचे प्रस्ताव शालेयस्तरावरून या कार्यालयात पुढीलप्रमाणे विहित नमुन्यातील प्रपत्र व आवश्यक माहिती, कागदपत्रानुसार सादर करावयाचे आहे. खेळाडू विद्यार्थ्याचे क्रीडा सवलतीचे गुणांचे प्रस्ताव सादर करणे बाबतचे कव्हरींग पत्र. शासकीय / संघटनेच्या जिल्हा/विभाग/राज्य/राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत क्रीडा गुण सवलत मिळण्यासाठी खेळाडू विद्यार्थ्यांची यादी. प्रपत्र 1 ग्रेस ...

सलोखा योजनेमुळे समाज व शेतकऱ्यांचा फायदा - प्र. निवासी उपजिल्हाधिकारी आविशकुमार सोनोने

सिंधुदुर्गनगरी, दि. 9 (जि.मा.का) : शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या जमिन धारकाच्या जमिन अदलाबदलानंतर क्षेत्र ज्याचे त्याचे नावे होतील. शेतजमिनींचा कागदोपत्री ताबा मिळाल्याने शेतकऱ्यांना विहीर, शेततळे, पाईपलाईन वृक्ष व फळबाग लागवडीबाबत शासनाच्या विविध योजनांचा फायदा होऊ शकतो. शेतकऱ्यांचे आपआपसातील वादामुळे अनेक शेतजमिनी पडीक राहतात. वाद मिटल्यास शेतजमिनीच्या लागवडीखालील व वहितीखालील क्षेत्रात वाढ होऊन उत्पादनात वाढ होईल. सलोखा योजना राबविली तर अशा परस्परविरोधी ताब्याबाबत असलेली विविध न्यायालयातील प्रकरणे निकाली निघतील. त्यामुळे समाज व शेतकऱ्यांचा फायदा होईल.तरी या योजनानेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्र. निवासी उपजिल्हाधिकारी आविशकुमार सोनोने यांनी केले आहे. महसूल व वनविभाग यांच्याकडील शासन निर्णय क्रमांक मुद्रांक- २०२२/ प्र.क्र. ९३/म- १ (धोरण) दिनांक ३ जानेवारी २०२३ अन्वये राज्य भरात सलोखा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत एका शेतकऱ्यांच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे १२ ...

सन 2023 साठी स्थानिक सुट्या जाहिर

सिंधुदुर्गनगरी, दि. 9 (जि.मा.का) : जिल्ह्यातील महसूली हद्दीमध्ये असलेल्या शासनाच्या सर्व खात्यामधील कार्यालयाकरीता तीन स्थानिक सुट्या जाहिर करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांना प्रदान करण्यात आलेल्या आहेत. त्या अधिकाराचा वापर करुन सन 2023 या वर्षाकरीता दिनांक 30 ऑगस्ट 2023 रक्षाबंधन, व दिनांक 18 सप्टेंबर 2023 हरितालिका, आणि दिनांक 10 नोव्हेबर 2023 धनत्रयोदशी (दिवाळी) याप्रमाणे स्थानिक सुट्या जाहिर करण्यात आल्या आहेत. 0000

केंद्र सरकार मार्फत कमी किमतीत उपलब्धहोणाऱ्या जन औषधांचा लाभ घ्या -डॉ.सई धुरी

सिंधुदुर्गनगरी, दि. 9 (जि.मा.का) : मधमेह, उच्‍च रक्‍तदाब, कर्करोग इत्‍यादी आजारामध्‍ये रुग्‍णास आपले आरोग्‍य चांगले ठेवण्‍यासाठी आणि पुढील गुंतागुंत टाळण्‍यासाठी नियमीतपणे औषधे घेणे अपरिहार्य आहे.पण औषधांच्या किंमतीत दिवसेदिवस वाढ होत आहे. अशावेळी सर्वसामान्‍य जनतेस कमी किंमतीमध्‍ये चांगली गुणवत्‍तापूर्ण औषधे मिळाल्‍यास तो रुग्‍ण उपचारात नियमीतता ठेवतो. त्यासाठी केंद्र सरकार मार्फत कमी कमतीत जन औषधे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.सई धुरी यांनी केले. प्राथमिक आरोग्‍य केंद्र कसाल येथे जन औषधी दिवस साजरा करण्‍यात आला. या ची सुरुवात सुरुवात जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ.सई रुपेश धुरी यांच्या हस्ते दीप प्रज्‍वलन करुन करण्यात आली . डॉ. धुरी म्हणाल्या, सद्या औषधांच्‍या ही योजना केंद्र सरकार मार्फत राबविली जात असुन औषधे WHO-GMP प्रमाणीत असुन औषधची गुणवत्‍ता NABL च्‍या मान्‍यताप्राप्‍त प्रयोगशाळेतून केली जात असल्‍याने गुणवत्‍तापूर्ण आहे. उपस्थित जनतेची वैद्यकीय तपासणी करुन त्‍यात आढळून आलेल्‍या मधुमेह, उच्‍चरक्‍तदाब रुगणाना एका महिन्‍या...

"दक्ष महिला सक्षम महिला " पुस्तिका महिलांसाठी उपयुक्त तर असहाय्य व पिडीत महिलांसाठी मार्गदर्शक - सहाय्यक धर्मादाय आयुक्त एम. एस. निकम

सिंधुदुर्गनगरी, दि. 9 (जि.मा.का) : महिलांनी महिला विषयक असणारे कायदे याबाबत जागृत राहणे आवश्यक आहे. महिला व बाल विभागामार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या "दक्ष महिला सक्षम महिला " हि पुस्तिका समाजातील सर्व महिलांना निश्चितच उपयुक्त तर आहेच शिवाय असहाय्य व पिडीत महिलांसाठी ही पुस्तिका मार्गदर्शक अशी राहणार आहे असे विचार सहाय्यक धर्मादाय आयुक्त एम. एस. निकम यांनी व्यक्त केले. जिल्हास्तरावरील जागतिक महिला दिन जिल्हाधिकारी कार्यालयातील जुन्या नियोजन समिती सभागृहात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व जिल्हा विधी सेवा प्राधिकारण यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला.यावेळी सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण डी. बी. म्हालटकर प्रा. माया रहाटे व प्रा. अमर निर्मळे, सदस्य बाल कल्याण समिती, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त शेख, जिल्हा क्रिडा अधिकारी विद्या शिरस, सहाय्यक पोलीस निरिक्षक सुवर्णा माधव उपस्थित होते. धर्मादाय आयुक्त एम. एस. निकम यांनी यावेळी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधि 2005 तसेच कामाच्या ठिकाणी महिलांचा ल...

स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या महिला खेळाडूंनी सत्कारासाठी 13 मार्च पर्यंत माहिती सादर करावी. -जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस

सिंधुदुर्गनगरी, दि. 9 (जि.मा.का) : जिल्ह्यातील राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार असून त्याकरीता मान्यता प्राप्त खेळांच्या अधिकृत राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या व साहसी उपक्रमांमध्ये उत्तम कामकगरी करणाऱ्या महिला खेळाडूंची माहिती संबंधित कामगिरीच्या प्रमाणपत्रासह जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे दि. 13 मार्च पर्यंत सादर करावी. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून केद्र शासनाच्य दि. 20 फेब्रुवारी 2023 च्या परिपत्रकानुसार दि. 10 ते 25 मार्च या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांच्यामार्फत करण्यात येणार आहेत. 0000

कर्तव्य जबाबदारी पार पाडताना आरोग्यही तितकेच महत्वाचे - माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सई धुरी

सिंधुदुर्गनगरी,दि.8 (जि.मा.का.) : महिलांनी आपले कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडतांना आपल्या स्वत:च्या आरोग्याची योग्य ती खबरदारी घ्यावी. हाच सल्ला पुरुषांनाही लागू होतो असे विचार जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. सई धुरी यांनी व्यक्त केला. जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेतील स्थानिक निधी व लेखा कार्यालयात महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाचे सहायक संचालक बाळासाहेब पाटील, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, महिला बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ, आयुषच्या डॉ. कृपा गावडे जिल्हा माहिती कार्यालयचे उपसंपादक रणजित पवार उपस्थित होते. डॉ. धुरी म्हणाल्या, नोकरीच्या निमित्ताने अनेक महिला घराबाहेर पडतात. घर आणि नोकरी सांभाळताना कसरत करावी लागते. अशावेळी मानसिकता सकारात्मक ठेवून, आरोग्य चांगले ठेवण्यावर भर दिला पाहिजे. अनेक संकटे येत राहतील त्यावर मात करण्यासाठी सज्ज असले पाहिजे, हे सर्व करताना आपल्या जोडीदाराला व कुटुंबालाही प्राधान्य दिले पाहिजे. सहायक संचालक बाळासाहेब पाटील म्हणाले, स्त्री व पुरुष ही संसाराच्या रथाची दोन चाके आहेत. या दोघांनीही एकमे...

जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन - सोमनाथ रसाळ

सिंधुदुर्गनगरी, दि.3 (जि.मा.का.) : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा मुख्यालय, जिल्हा नियोजन समिती जुने सभागृह येथे सकाळी 9.30 ते दुपारी 1 या वेळेत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बुधवार दि.8 मार्च रोजी विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी दिली. कार्यक्रमास जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी.बी.म्हालटकर तसेच सहाय्यक धर्मादाय आयुक्त एम.एस. निकम, हे मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत. या जागतिक महिला दिना निमित्ताने, महिला विषयक कायदे व योजना "दक्ष महिला, सक्षम महिला" या उपयुक्त पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे. महिला मेळाव्यामध्ये जिल्हास्तरावरील सर्व प्रशासकीय विभागातील सहभागी होणाऱ्या सर्व महिला अधिकारी, कर्मचारी यांच्याकरीता संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर महिला विषयक कायदे, महिलांचे हक्क व संरक्षण या बाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणा...

" अवकाश दर्शन" कार्यशाळा पोलीस परेड मैदान येथे संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि.2 (जि.मा.का.) : विज्ञान दिनाचे औचित्य साधून पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांचे पाल्य यांना अवकाश व ग्रहांची ओळख व्हावी, तसेच *टेलिस्कोपव्दारे ते प्रत्यक्ष बघून त्यांची माहिती मिळावी. याकरीता पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून व अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली "अवकाश दर्शन" कार्यशाळा पोलीस परेड मैदान, ओरोस-सिंधुदुर्गनगरी येथे दि.28 फेब्रुवारी रोजी संपन्न झाली. अशी माहिती पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांनी दिली. या "अवकाश दर्शन कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी खुशी एज्युकेशनः सोशल ट्रस्ट, मुंबई यांचेकडील सेक्रेटरी, संदिप बेडेकर, विधिता बेडेकर,दिपक फसाळे या तज्ज्ञ व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी उपस्थितांना ग्रह, तारे, अवकशातील इतर घडमोडींबाबत माहिती देवून त्यानंतर टेलिस्कोपव्दारे ग्रह, तारे दाखविले. विज्ञान दिनाचे औचित्य साधून "अवकाश दर्शन" कार्यशाळेचे आयोजन करून ग्रह, तारे, अवकाशातील घडामोडी याबाबत बहुमोल माहिती व अवकाशातील ग्रह, ताऱ्...

शामराव पेजे कोकण इतर मागास महामंडळाच्या विविध योजनांच्या लाभासाठी उमेदवारांनी अर्ज करावेत - जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल

सिंधुदुर्गनगरी, दि.2 (जि.मा.का.) : शामराव पेजे कोकण इतर मागास महामंडळ इतर मागास प्रवर्गातील नवीन व्यवसाय सुरू करण्याकरीता तसेच व्यवसायामध्ये वाढ करण्याकरीता शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. सन 2022-23 या चालू आर्थिक वर्षात जास्तीत जास्त लाभार्थीना योजनांचा लाभ देण्याकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांनी केले आहे. जिल्ह्यातील ओबीसी समाजातील पात्र उमेदवारांकरीता वय वर्ष 18 ते 50 करीता या बिनव्याजी रूपये 1.00 लक्ष थेट कर्ज योजना रु.5.00 लक्ष पर्यंतची बीज भांडवल कर्ज योजना, वय 18 से 50 गटातील व्यक्तीना वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना रू 10.00 लक्ष पर्यंत तसेच 17 ते 30 वयोगटातील विद्यार्थी, विद्यार्थीनी यांना राज्यांतर्गत व शिक्षणाकरीता रूपये 10.00 लक्ष व परदेशी शिक्षणाकरीता 20.00 लक्ष पर्यतची शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना सुरू आहे. ज्या उमेदवारांना महामंडळाच्या रू 10.00 लक्ष व शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेमध्ये लाभ घ्यावयाचा आहे अशा उमेदवारांनी महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्...

फ्रान्स (ल्योन) येथे होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी जिल्ह्यातील उमेदवारांनी माहिती भरावी -प्र. सहायक आयुक्त इनुजा शेख

सिंधुदुर्गनगरी, दि.2 (जि.मा.का.) : जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने जिल्ह्यातील उमेदवारांसाठी जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 मध्ये फ्रान्स (ल्योन) येथे आयोजित होणार आहे. तरी जिल्हयातील जास्तीत जास्त उमेदवारांनी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd8qFH8yMrvfTonc77WU67QL7-IGVVsC2m6- 1jK3Qn7Uv6LLw/viewform?usp=sf_link या लिंक ला क्लिक करून आपली माहिती भरावी व या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे. जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ आयोजित करण्याबाबत राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद (NSDC- National Skill Development Council) मार्फत मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. जिल्हयात कार्यरत असलेल्या ITIs, Polytechnics, MSME Tools Rooms, CIPET, Engineering College, IHM/Hospitality Institutes, Corporate Technical Institute, Skill Training Institute, Colleges, Institute of Jewellery Making, Others मधील उमेदवार यात सहभागी होऊ शकतील. जागतिक कौशल्य स्प...