Posts

Showing posts from January, 2026

हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदरांजली

सिंधुदुर्गनगरी, दि. ३० (जि.मा.का.) : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी ३० जानेवारी रोजी देशभरात हुतात्मा दिन पाळण्यात येतो. या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी आरती देसाई, बालाजी शेवाळे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, क्रीडा अधिकारी श्रीमती अडसूळ तसेच विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

मतमोजणी व आंगणेवाडी जत्रा एकाच दिवशी प्रशासनाला सहकार्य करण्याचे नागरिकांना आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. ३० (जि.मा.का.) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक मतदान आणि मतमोजणीच्या तारखामध्ये बदल करण्यात आला आहे. झालेल्या बदलानुसार ५ फेब्रुवारी २०२६ ऐवजी आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान; तर ७ फेब्रुवारी २०२६ ऐवजी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या दिवशीच म्हणजे ९ फेब्रुवारी रोजी कोकणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी श्री. भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव देखील असणार आहे. मतमोजणी आणि श्री देवी आंगणेवाडी जत्रा याच दिवशी येत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियोजन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सज्ज असून, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. लोकशाहीचा उत्सव आणि श्रद्धेचा महोत्सव एकाच दिवशी साजरा होत असताना, संयम, शिस्त आणि सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि पोलिस अधीक्षक ड...

मराठी शब्दांचा उत्सव : अभिवाचन-काव्यवाचनाची रंगतदार मैफल सिंधुदुर्गनगरीत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची प्रमुख उपस्थिती; रसिकांसाठी काव्यवाचनाची साहित्यिक मेजवानी

सिंधुदुर्गनगरी, दि. २७ (जि.मा.का.) – मराठी भाषेच्या संवर्धनाचा जागर करणाऱ्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त सिंधुदुर्गनगरीत अभिवाचन आणि काव्यवाचनाचा विशेष साहित्यिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या वेळी कवयित्री मिनाक्षी पाटील लिखित “ललद्यदस् ललबाय” या पुस्तकाचे अभिवाचन ज्येष्ठ साहित्यप्रेमी वामन मधुसूदन पंडित करणार असून, रसिकांसाठी मनाला स्पर्शून जाणाऱ्या काव्यवाचनाची रंगतदार मैफल देखील सजणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय तसेच कोकण मराठी साहित्य परिषद, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बुधवार, दि.२८ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता, आरमार प्रमुख मायनाक भंडारी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस, सिंधुदुर्ग येथे संपन्न होणार आहे. नागरिकांनी व साहित्यप्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 0000000

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते ध्वजवंदन

सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) : प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे ध्वजवंदन समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. भारतीय संविधानामुळे देशाला लोकशाही, समता, स्वातंत्र्य आणि न्यायाची मूल्ये मिळाली असून प्रत्येक नागरिकाने संविधानाचा सन्मान ठेवून आपल्या कर्तव्यांचे प्रामाणिकपणे पालन करावे, असे त्यांनी सांगितले. या ध्वजारोहण समारंभास अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, श्रीमती प्रतिभा वराळे, आरती देसाई, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, जिल्हा कोषागार अधिकारी अमित मेश्राम, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, माविमचे नितीन काळे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. ००००००

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजवंदन

संविधानामुळे भारताची जागतिक ओळख; लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचे आवाहन सिंधुदुर्गनगरी दिनांक २६ (जिमाका):- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना व मसुदा समितीने तयार केलेल्या भारतीय राज्यघटनेमुळे भारताची ओळख जगात सार्वभौम, लोकशाही व प्रजासत्ताक देश म्हणून निर्माण झाली आहे. ही बाब प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची आहे. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून गौरवले जाते. भारतीय संविधान निर्मितीची प्रक्रिया दीर्घ, सखोल आणि लोकशाही मूल्यांवर आधारित होती. सुमारे २ वर्षे ११ महिने १८ दिवस चाललेल्या या प्रक्रियेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. जगातील अनेक देशांच्या संविधानांचा अभ्यास करून भारतासाठी योग्य अशा तरतुदी संविधानात समाविष्ट करण्यात आल्या. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान मंजूर झाले आणि २६ जानेवारी १९५० पासून ते अंमलात आले. या संविधानामुळे नागरिकांना स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही मूलभूत मूल्ये मिळाली. भारतीय संविधान हे केवळ कायद्यांचे पुस्तक नसून देशाचा आत्मा असून सर्व नागरिक समान असल्याचा संदेश या संविधानामधून देण्यात आला असल...

तखत सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी घेतले दर्शन

नांदेड, दिनांक 24 (जिमाका) : तखत सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दर्शन घेतले. त्यांच्यासह आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आमदार मोहन हंबर्डे यांनीही दर्शन घेतले. यावेळी गुरुद्वारा बोर्डतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला.

तखत सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन

नांदेड, दिनांक 24 (जिमाका) : तखत सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दर्शन घेतले. त्यांच्यासह आंध्रप्रदेश उपमुख्यमंत्री कोनिडला पवन कल्याण, महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य चरणदीप सिंघ आदींनीही दर्शन घेतले. गुरुद्वारा बोर्डाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी, मान्यवर यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ जी यांची प्रमुख उपस्थिती होती.

हिंद-दी-चादर समागम कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी भाविकांची अलोट गर्दी” ’बोले सो निहाल सत श्री अकाल' च्या जयघोषात लाखो भाविकांनी घेतले दर्शन

नांदेड, दि. २५ जानेवारी:- “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य कार्यक्रमात मान्यवरांसह लाखो भाविकांनी “वाहे गुरु” व “बोले सो निहाल सत श्री अकाल” च्या जयघोषात श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे पावन दर्शन घेतले. आज दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच मोदी मैदान येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे. देशातील विविध राज्यातून आलेल्या सर्व धर्माच्या भाविकांनी शांतता, शिस्त व श्रद्धेने दर्शनाचा लाभ घेत आहेत. भाविकांच्या सोयीसाठी आयोजकांच्यावतीने चोख व्यवस्था करण्यात आली असून स्वयंसेवक व सेवाभावी संस्थांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम सुरळीतपणे सुरू आहे. भाविकांच्या भोजनासाठी भव्य लंगरची व्यवस्था केली असून भाविक याचा लाभ घेताना दिसून येत आहेत. गुरुद्वारातर्फे भाविकांसाठी अखंड कीर्तन सुरू आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी भाविकांसाठी लोकसहभागातून चहा, अल्पोपहार, ज्यूस, विविध स्टॉल उभारण्यात आलेले आहेत. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग, धर्मनिष्ठा व मानवतेच्या...

सेवा स्टॉल्सना उत्स्फूर्त प्रतिसाद भाविकांनी व्यक्त केले समाधान

नांदेड, दि. २५ जानेवारी:-श्री. गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सेवेसाठी सेवा स्टॉल्स उभारण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नांदेडकरांना केले होते. या आवाहनाला नांदेडवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध शासकीय कार्यालये, सेवाभावी संस्था, व्यावसायिक आस्थापना, व्यापारी संघटना, बँका, पतसंस्था, शिक्षण संस्था, उत्पादक, उद्योजक तसेच लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत सेवा स्टॉल्ससाठी नोंदणी केली. समागम परिसराच्या चहूबाजूंनी निःशुल्क सेवा स्टॉल्स उभारण्यात आले होते. या स्टॉल्सवर चहा, बिस्किटे, नाश्ता, फलाहार, पाणी, सरबत, आईस्क्रीम, लस्सी, चिक्की, उसाचा रस आदी विविध पदार्थांची दिवसभर रेलचेल पाहायला मिळाली. बीएसएनएलच्या वतीने मोफत सिमकार्डचे वितरण करण्यात आले. तसेच आरोग्य तपासणी व औषध वाटप उपक्रमाचाही हजारो भाविकांनी लाभ घेतला. याशिवाय मेंदूची व्यायामशाळा, पर्यटन विकास, विमान उड्डाण क्षेत्रातील रोजगार संधी, कृषी व पोस्ट विभागाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आबालवृद्धांसह दूरवरून आल...

हिंद दी चादर कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी भाविकांना लंगर वाढून केली सेवा

नांदेड, दि. २५ जानेवारी:-“हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी प्रत्यक्ष लंगर वाढून भाविकांची सेवा केली. जिल्हाधिकारी यांनी रांगेत बसलेल्या भाविकांना लंगर सेवा केल्याने उपस्थितांमध्ये विशेष उत्साह व समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. सेवा, समता व बंधुभावाचा संदेश देणाऱ्या लंगर परंपरेचे महत्त्व यावेळी अधोरेखित झाले. जिल्हाधिकारी यांनी लंगर सेवेत सहभागी होत शीख परंपरेतील सेवाभाव, मानवता व समतेच्या मूल्यांना अभिवादन केले.ही लंगर सेवा २४ तास भाविकांच्या सेवेसाठी खुली आहे. शहीदी समागमाच्या निमित्ताने नांदेड येथे देश-विदेशातून भाविक उपस्थित असून, संपूर्ण परिसर भक्तिमय व सेवाभावी वातावरणाने भारावून गेला आहे. या कार्यक्रमातून श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग, धर्मनिष्ठा व मानवतेच्या संदेशाचा जागर करण्यात येत आहे. ०००००

सेवा स्टॉल्सना उत्स्फूर्त प्रतिसाद भाविकांनी व्यक्त केले समाधान

नांदेड, दि. २५ जानेवारी:-श्री. गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सेवेसाठी सेवा स्टॉल्स उभारण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नांदेडकरांना केले होते. या आवाहनाला नांदेडवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध शासकीय कार्यालये, सेवाभावी संस्था, व्यावसायिक आस्थापना, व्यापारी संघटना, बँका, पतसंस्था, शिक्षण संस्था, उत्पादक, उद्योजक तसेच लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत सेवा स्टॉल्ससाठी नोंदणी केली. समागम परिसराच्या चहूबाजूंनी निःशुल्क सेवा स्टॉल्स उभारण्यात आले होते. या स्टॉल्सवर चहा, बिस्किटे, नाश्ता, फलाहार, पाणी, सरबत, आईस्क्रीम, लस्सी, चिक्की, उसाचा रस आदी विविध पदार्थांची दिवसभर रेलचेल पाहायला मिळाली. बीएसएनएलच्या वतीने मोफत सिमकार्डचे वितरण करण्यात आले. तसेच आरोग्य तपासणी व औषध वाटप उपक्रमाचाही हजारो भाविकांनी लाभ घेतला. याशिवाय मेंदूची व्यायामशाळा, पर्यटन विकास, विमान उड्डाण क्षेत्रातील रोजगार संधी, कृषी व पोस्ट विभागाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आबालवृद्धांसह दूरवरून आले...

प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण

सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.):- देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय समारंभाचे आयोजन करण्यात आले असून पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण होणार आहे. हा मुख्य शासकीय सोहळा सोमवार, दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9.15 वाजता पोलीस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे संपन्न होणार आहे. ध्वजारोहणानंतर सकाळी 9.30 ते 9.40 या वेळेत पोलीस दल व राखीव पोलीस दलाचे आकर्षक संचलन होणार असून या सोहळ्याला विशेष शिस्तबद्धतेचे स्वरूप लाभणार आहे. मुख्य शासकीय समारंभ सकाळी 9.15 वाजता असल्याने जिल्ह्यातील इतर शासकीय कार्यालये व संस्थांनी आपापल्या ठिकाणी ध्वजवंदनाचा कार्यक्रम सकाळी 8.30 पूर्वी किंवा सकाळी 10 नंतर आयोजित करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. सभारंभासाठी उपस्थित मान्यवर व नागरिकांनी सकाळी 8.45 वाजेपर्यंत आपापल्या जागांवर स्थानापन्न व्हावे तसेच राष्ट्रीय पोशाखात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांच्या वतीने करण्यात आले आहे. ००००००

हिंद-दी-चादर समागमात श्री गुरु ग्रंथसाहिबजींच्या दर्शनासाठी भाविकांची महासागरासारखी गर्दी” मान्यवरांसह हजारो भाविकांची हजेरी

श्री गुरु ग्रंथसाहिबजींच्या दर्शनाने भक्तीचा महासंगम नांदेड, दि. २४ जानेवारी:- “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य कार्यक्रमात आज राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार आनंदराव तिडके, आमदार श्रीजया चव्हाण, पोहरादेवीचे, महंत, सुनील महाराज,बाबुसिंग महाराज, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोड यांच्यासह हजारो भाविकांनी श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे पावन दर्शन घेतले. सकाळपासूनच मोदी मैदान येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे. सर्व जिल्ह्यातून व नांदेड शहरातून आलेल्या हजारो भाविकांनी शांतता, शिस्त व श्रद्धेने दर्शनाचा लाभ घेत आहेत. भाविकांच्या सोयीसाठी आयोजकांच्यावतीने चोख व्यवस्था करण्यात आली असून स्वयंसेवक व सेवाभावी संस्थांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम सुरळीतपणे सुरू आहे. भाविकांच्या भोजनासाठी भव्य लंगरची...

'हिंद दी चादर': त्याग आणि सर्वोच्च बलिदानाचा जिवंत अनुभव

पवित्र तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब जी नांदेड गुरुद्वाराच्या पवित्र परिसरात भाविकांची मांदियाळी आहे. दर्शनासाठी रांगेत उभे असलेले भाविक केवळ नतमस्तक होत नाहीत, तर तिथे सुरू असलेल्या एका विशेष माहितीपटासमोर थबकतही आहेत. हिंद दी चादर गुरू तेग बहादूर साहिब जींच्या जीवनावरील हा माहितीपट पाहताना अनेकांची पावले तिथेच रेंगाळतायत. संध्याकाळची वेळ... गोदावरीच्या तीरावर वसलेले सचखंड गुरुद्वारा विद्युत रोषणाईने लख्ख उजळून निघाले आहे. गुरुद्वाराच्या सुवर्ण कळसाचे प्रतिबिंब आणि रोषणाईचा प्रकाश यामुळे परिसर न्हाऊन निघाला आहे. हवेत लंगरचा आणि कडा प्रसादाचा तोच परिचित, पवित्र आणि मनाला तृप्त करणारा सुवास दरवळत आहे. एकीकडे गुरुजींच्या गुरबानीचे मंगल सूर कानावर पडत आहेत, तर दुसरीकडे समोरच्या भव्य पडद्यावर श्री गुरू तेग बहादूर साहिब जींचा इतिहास जिवंत होत आहे. एरवी भाविकांच्या गजबजाटाने भरलेल्या या परिसरात आज एक वेगळीच, एकाग्रतेची शांतता आहे. तो भव्य डिजिटल पडदा केवळ प्रकाश फेकत नाहीये, तर त्या प्रकाशात ४०० वर्षांपूर्वीचा इतिहास उलगडत आहे. अंधारात चमकणारा तो पडदा आणि त्यावरचे प्रसंग पाहून, उपस्...

महानगर किर्तन दरम्यान घरासमोर रंगीबेरंगी फुलं, रांगोळींनी सजावट करून सहभाग नोंदवावा

नांदेड, दि. 23 जानेवारी :- हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहाद्दूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमीत्त श्री गुरूग्रंथ साहीब नगर किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर महानगर किर्तनास शनिवार 24 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8 वा. गुरूव्दारा गेट नं 1 पासून गुरूव्दारा चौक-महाविर चौक- वजिराबाद मार्केट येथून वजिराबाद चौक-तिरंगा चौक-रामसेतू दादरा-रविनगर-नागार्जून पब्लिक स्कूल-मामा चौक या मार्गाने मोदी मैदान मुख्य कार्यक्रम स्थळी पोहचणार आहे. या मार्गातील सर्व रहिवाशी यांनी या महानगर किर्तनादरम्यान आपण आपल्या घरासमोर, दुकानासमोर रंगीबेरंगी फुलांनी अथवा रांगोळीनी संपूर्ण रस्त्याच्या बाजूने सजावट करावी. तसेच आपल्या घरावर, दुकानावर विद्युत रोशनाई तसेच दिवे लावून पालखीचे स्वागत करून भव्य महा नगर किर्तनात सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 000000

हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादूरजी : मनाचे श्लोक

शीख धर्माचे नववे गुरू श्री गुरू तेग बहादूरजी यांना संपूर्ण भारतात "हिंद दी चादर" (भारताचे संरक्षक) म्हणून ओळखले जाते. त्यांचे स्थान केवळ शीख इतिहासातच नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आदराचे आहे. ते केवळ एक धार्मिक नेते नव्हते, तर मानवी सन्मान, श्रद्धा स्वातंत्र्याचे सर्वोच्च रक्षक होते. त्यांचे जीवन आणि कृती आपल्याला स्वतःच्या धर्मापलीकडे जाऊन मानवतेची मूल्ये कशी जपावीत, याबाबत शिकवते. श्री गुरू तेग बहादूरजी असे योद्धे होते, की वयाच्या 14 व्या वर्षी मोगलांबरोबरच्या युद्धात त्यांनी अतुलनीय शौर्य गाजवले. तलवारीने शत्रूस कंठस्नान घातले. म्हणून त्यांचे नाव तेग बहादूर ठेवले गेले. तरीही पुढे अध्यात्मिक साधनेमुळे ते पूर्णपणे स्थिरमती बनले. सुख, दु:ख, हर्ष, खेद यापासून मुक्त, असे मुक्तामा बनले. त्यांना ठार मारण्यासाठी आलेल्या मारेकऱ्यासही त्यांनी क्षमा केली, केवढे हे त्यांचे औदार्य आणि मनाची ताकद. श्री गुरू तेग बहादूरजी यांचे पुत्र शीख धर्मियांचे दहावे आणि अंतिम देहधारी गुरू श्री गुरू गोबिंद सिंग जी. त्यांनी नांदेड येथे देह त्यागण्यापूर्वी त्यांच्यानंतर देहधारी गुरू असणार...

हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादूरजी : मनाचे श्लोक

शीख धर्माचे नववे गुरू श्री गुरू तेग बहादूरजी यांना संपूर्ण भारतात "हिंद दी चादर" (भारताचे संरक्षक) म्हणून ओळखले जाते. त्यांचे स्थान केवळ शीख इतिहासातच नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आदराचे आहे. ते केवळ एक धार्मिक नेते नव्हते, तर मानवी सन्मान, श्रद्धा स्वातंत्र्याचे सर्वोच्च रक्षक होते. त्यांचे जीवन आणि कृती आपल्याला स्वतःच्या धर्मापलीकडे जाऊन मानवतेची मूल्ये कशी जपावीत, याबाबत शिकवते. श्री गुरू तेग बहादूरजी असे योद्धे होते, की वयाच्या 14 व्या वर्षी मोगलांबरोबरच्या युद्धात त्यांनी अतुलनीय शौर्य गाजवले. तलवारीने शत्रूस कंठस्नान घातले. म्हणून त्यांचे नाव तेग बहादूर ठेवले गेले. तरीही पुढे अध्यात्मिक साधनेमुळे ते पूर्णपणे स्थिरमती बनले. सुख, दु:ख, हर्ष, खेद यापासून मुक्त, असे मुक्तामा बनले. त्यांना ठार मारण्यासाठी आलेल्या मारेकऱ्यासही त्यांनी क्षमा केली, केवढे हे त्यांचे औदार्य आणि मनाची ताकद. श्री गुरू तेग बहादूरजी यांचे पुत्र शीख धर्मियांचे दहावे आणि अंतिम देहधारी गुरू श्री गुरू गोबिंद सिंग जी. त्यांनी नांदेड येथे देह त्यागण्यापूर्वी त्यांच्यानंतर देहधारी गुरू असणार...

वाहतूक मार्गात बदल

सिंधुदुर्गनगरी दिनांक 22 (जिमाका) :- कसाल एन एच-66 रस्त्यावरील आरयूबीकडे मुंबई-गोवा लेनवर हाईट गेजचे दोन कॉलम व टॉप बीम बदलण्याचे काम 23 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते 1 वाजल्यादरम्यान सरू राहणार आहे. तरी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबई-गोवा लेनवरील वाहतुक गोवा - मुंबई याएकाच लेनवरुन म्हणजे कसाल –बेळणे ब्रिज वरुन गोवा करीता येवून एक मार्गीकेवर वळवून यापुढे गोवा-मुंबई लेनवरील वाहतुक हॉटेल साई माऊली कसाल कुंदे फाटा दुतर्फा मार्गावरून वळविण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. नागरीकांच्या सुविधेसाठी उपविभागीय अभियंता, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 सावंतवाडी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस मदत केंद्र कणकवली,कसाल, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतुक शाखा यांनी मोटार वाहन कायदा 1988 कलम 166 नुसार वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला रस्ता व पर्यायी वाहतूक मार्ग लोकाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी दिशादर्शक फलक, वाहतूक संकेत चिन्हे लोकांना समजेल अशा भाषेत लावण्याची किंवा उभ...

माजी सैनिक व्याख्येत न येणारे सैनिकांची व विधवांची माहिती सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 22 (जिमाका) :- जिल्ह्यातील ज्या सैनिकांनी अल्पशा कालावधीत सैन्यात सेवा केली आहे. आजपर्यंत माजी सैनिक व्याख्येत न येणारे तसेच सैन्यातील निवृत्ती वेतन मिळत नसलेल्या ६५ वर्षे वयावरील सैनिकांचा तपशिल दिनांक ०५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत मागविलेला आहे. त्याअनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र सैनिक व विधवांनी आपली माहिती दिनांक ३१ जानेवारी २०२६ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे प्रत्यक्ष भेटून सादर करावी. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. तथापि वयोमानामुळे कार्यालयात येणे शक्य नसल्यास जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचा ई-मेल आयडी zswo_sindhudurg@maharashtra.gov.in वर किंवा मोबाईल क्रमांक ८२१९२८५७८८, ७०२८३१८४०७ वर व्हॉट्सअपद्वारे पुढीलप्रमाणे, आर्मी नंबर, रँक व संपूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, रेजिमेंट, रेकॉर्ड ऑफिस, भरतीची तारीख, सेवानिवृत्तीची तारीख, निवृत्तीचे कारण, चारित्र्य आणि युद्धात सहभाग असल्यास तपशील नमूद करणे आवश्यक माहिती सादर करावी. यासाठी पात्रता अटी पुढीलप्रमाणे आहेत : सैन्यस...

‘हिंद-की-चादर’ शताब्दी समागमासाठी नांदेडमध्ये आरोग्य यंत्रणा सज्ज १० लाखांहून अधिक भाविकांसाठी ५ दिवस व्यापक वैद्यकीय सेवा

नांदेड, दि. 21: शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम- हिंद-की-चादर शताब्दी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून, लाखो भाविकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी अत्यंत काटेकोर, बहुस्तरीय व समन्वयित वैद्यकीय व्यवस्थापन उभारण्यात आले आहे. 24 व 25 जानेवारी २०२६ रोजी नांदेड शहरात होणाऱ्या मुख्य सोहळ्यासाठी राज्यभरासह देशाच्या विविध भागांतून १० लाखांपेक्षा अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर २२ ते २६ जानेवारी २०२६ या पाच दिवसांच्या कालावधीत अखंड आरोग्य सेवा उपलब्ध असणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या निर्देशानुसार सूक्ष्म नियोजन मुख्यमंत्री कार्यालयाच्या स्पष्ट निर्देशानुसार विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले तसेच मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्य समन्वयक डॉ. रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य व्यवस्थापनाबाबत सविस्तर कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी जिल्हास्तरीय आरोग्य व्यवस्थापन समिती गठीत करून वारंवार आढावा बैठका घेण्यात आल्या आहेत. शासकीय-खाजगी आरोग्य यंत...

‘स्क्रोलिंग’ थांबलं, इतिहास जागा झाला! गाणं, डॉक्युमेंटरी आणि डिजिटल युगातील संस्कार क्रांती

सध्याच्या 'फास्ट फूड', 'इन्स्टा रिल्स'च्या युगात एखादा ट्रेंड किती काळ टिकतो ? फार तर २४ तास! पण, याच डिजिटल जगात ४०० वर्षे जुन्या इतिहासाने आजच्या 'जनरेशन झी'ला (Gen Z) चक्क थांबायला भाग पाडले. निमित्त, सुप्रसिद्ध सुफी गायक डॉ. सतींदर सरताज यांच्या आवाजातील 'हिंद की चादर' या कलाकृतीचे. नांदेडच्या पवित्र मातीत श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचा ३५० व्या भव्य शहीदी समागम वर्षानिमित्त कार्यक्रम होत आहे. महाराष्ट्र शासन आणि श्री गुरू तेग बहादूरजी यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी समितीच्या सहकार्याने र्निवैर निर्मित 'हिंद की चादर' डॉक्युमेंटरी (माहितीपट), अन् सरताज यांचे गीत आता केवळ व्हायरल कंटेंट उरला नसून, ती एक 'संस्कारांची डिजिटल चळवळ' बनली आहे. सुरांचा जादूगर : कोण आहेत सतींदर सरताज ? या चळवळीचा चेहरा आणि आवाज आहेत, डॉ. सतींदर सरताज. मूळचे पंजाबचे. सरताज केवळ गायक नाहीत, तर सुफी संगीतातील 'डॉक्टरेट' (Ph.D) आहेत. त्यांच्या गळ्यातून जेव्हा “सीस लेकर उसी ओर चल दिए...” हे शब्द उमटतात, तेव्हा त्यात केवळ संगीत नसते, तर १७ व्या...

घरकुल लाभार्थ्यांसाठी सौर ऊर्जा संयंत्राबाबत आढावा व मार्गदर्शन सभा संपन्न

सिंधुदुर्गनगरी दिनांक 19 (जिमाका) :- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सन 2024-25 व सन 2025-26 या सह राज्य पुरस्कृत घरकुल योजनांचा लाभ घेऊन घरकुले पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना सौर उर्जा संयंत्र बसविणे बाबतची आढावा व मार्गदर्शन सभा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. ही सभा मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्या कार्यालयात पार पडली, या सभेसाठी महावितरणचे अधिकारी प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सिंधुदुर्ग व जिल्ह्यातील नोंदणीकृत सौर उर्जा संयंत्र पुरवठेदार व शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. शासनाच्या मार्गदर्शक योजना निर्देशानुसार प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण टप्पा-2, राज्य पुरस्कृत आवास योजना (रमाई आवास योजना इ.) योजनांतर्गत जी घरकुले पुर्ण झाली आहेत. अशा लाभार्थ्यांनी सौर उर्जा संयंत्र बसविल्यास उर्जा निर्मिती होणार असून ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना यांचा दुरगामी फायदा होणार आहे. यासाठी शासनाकडून घरकुल लाभार्थ्यांना 15,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. ही योजना लोककल्याणकारी व उर्जा निर्माण करणारी आहे. यामध्ये ग्...

रब्बी पिकांच्या ई-पीक पाहणीसाठी मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी दिनांक 19 (जिमाका) :- जिल्ह्यातील रब्बी हंगाम 2025-26 मधील पिकांची अचूक नोंद सातबारा उताऱ्यावर होण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवताना तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी 'ई-पीक पाहणी' प्रक्रियेला शासनाने मुदतवाढ दिली आहे. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या या डिजिटल क्रॉप सर्वे (DCS) प्रणाली अंतर्गत, रब्बी पिकांची नोंदणी 1 डिसेंबर 2025 पासून सुरू झाली असून ती 14 जानेवारी 2026 पर्यंत होती. आता शेतकरी स्तरावरून स्वतःच्या मोबाईलद्वारे ही नोंदणी करण्यासाठी 24 जानेवारी 2026 पर्यंत अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. तरी जिल्ह्यतील शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी चा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी दिली आहे. शासनाचा ई-पीक पाहणी प्रकल्प दिनांक 15 ऑगस्ट 2021 पासून संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या प्रकल्पात सुधारणा करून, खरीप व रब्बी हंगाम 2024 पासून पीक पाहणी ही डिजिटल क्रॉप सर्व प्रणालीद्वारे संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली आहे. तथापि, शेतकऱ्यांनी सहाय्यकांवर अवलंबून न राहता शक्य तितकी पीक पाहणी स्वतःच पूर्ण करावी. पीक प...

जिल्ह्यात “स्पर्श” व “कुसुम” कुष्ठरोग जनजागृती अभियान

सिंधुदुर्गनगरी दिनांक 20 (जिमाका) :- जिल्ह्यात २६ जानेवारी २०२६ रोजी ग्रामसभेमध्ये कुष्ठरोगाविषयी संदेश जनसामान्यांपर्यत पोहचविण्यात येणार आहे. महात्मा गांधी पुण्यतिथीचे औचित्य साधून दिनांक ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत “स्पर्श” कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. याच कालावधीत राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार “कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम)” मोहीम देखील राबविली जाणार आहे, त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची बैठक पार पडली, असल्याची माहिती सहायक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग डॉ. एस.व्ही. गुजलवार यांनी दिली आहे. “स्पर्श” कुष्ठरोग जनजागृती अभियान २०२५-२६ :- कुष्ठरोगाबाबत समाजात पसरलेला गैरसमज अंधश्रद्धा व भीती दूर करण्याकरिता“स्पर्श” कुष्ठरोग जनजागृती अभियान घेण्यात येणार आहे. अभियानात दि. 26 जानेवारीच्या ग्राम सभेत कुष्ठरोगाबाबत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या देशाचे वाचन तसेच सरपंचाचे भाषण व प्रतिज्ञा यांचे वाचन करण्यात येणार आहे. अभियानांतर्गजिल्ह्यातील प्रत्य...

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी निरीक्षकांची नियुक्ती

सिंधुदुर्गनगरी : दिनांक 21 (जिमाका):- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोग, मुंबई यांच्या सूचनेनुसार विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडून निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी प्रतिभा वराळे यांनी दिली आहे. यामध्ये शंकर बर्गे, अपर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जात पडताळणी समिती, रत्नागिरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते वैभववाडी, कणकवली, देवगड व मालवण या तालुक्यांसाठी निरीक्षक म्हणून काम पाहणार असून त्यांचा संपर्क क्रमांक 9579735559 असा आहे. तसेच इब्राहिम चौधरी, अपर जिल्हाधिकारी, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन, मुंबई यांची नियुक्ती कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी व दोडामार्ग या तालुक्यांसाठी निरीक्षक म्हणून करण्यात आली आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 9881794221 असा आहे. नियुक्त निरीक्षक निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी, मतदान व मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक निरीक्षण करणार आहेत. नागरिकांनी कोणत्याही तक्र...

गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या हौतात्म्य दिनानिमित्त नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा दिल्ली, मुंबई आणि चंदीगडवरून सुटणार विशेष रेल्वे

नांदेड दि.२१ जानेवारी:- ‘हिंद दी चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांची आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने 'ट्रेन ऑन डिमांड' (TOD) अंतर्गत मुंबई, चंदीगड आणि दिल्ली (हजरत निजामुद्दीन) येथून नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, उत्तर भारतातून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्थानकावरूनही २३ आणि २४ जानेवारी रोजी दुपारी १२:३० वाजता विशेष गाडी नांदेडसाठी हजरत निजामुद्दीन, पानिपत, आग्रा कॅन्ट, विरांगणा लक्ष्मीबाई झांसी, बिना, भोपाळ, इटारसी, खंडवा, भुसावळ, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, पूर्णा मार्गे दुसऱ्या दिवशी दुपारी १६.२० नांदेडला पोहोचेल . चंदीगड ते नांदेड (गाडी क्र. ०४५२४/०४५२३) आणि हजरत निजामुद्दीन ते नांदेड (गाडी क्र. ०४४९४/०४४९३) या दोन राखीव सुपरफास्ट वि...

शहीदी समागम कार्यक्रम जागतिक स्तरावर नेण्यासाठी समन्वयाने काम करा – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न नांदेड, दि. २० जानेवारी:- ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमाचा कार्यक्रम नांदेडपुरता मर्यादित न राहता जागतिक स्तरावर पोहोचावा, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने, काटेकोर नियोजनासह जबाबदारीने काम करावे, असे स्पष्ट निर्देश नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले. नांदेड येथे होणाऱ्या या शताब्दी वर्ष कार्यक्रमाच्या आयोजनाचा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्स) सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, समिती अध्यक्ष डॉ. विजय सतबीर सिंग, विभागीय माहिती उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, कार्यक्रमस्थळी पुरेसे पिण्याचे पाणी, स्वच्छ व पर्याप्त शौचालय व्यवस्था सुनिश्चित करण्यात यावी. कार्यक्रमाची प्रचार–प्...

रब्बी पिकांच्या ई-पीक पाहणीसाठी 24 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी दिनांक 19 (जिमाका) :- ई-पीक पाहणी DCS मोबाईल अॅपच्या साहाय्याने रब्‍बी हंगाममध्‍ये ई-पीक पाहणी करण्याची मुदत दिनांक 14 जानेवारी 2026 पर्यंत होती. तथापि, काही शेतकरी यांची ई-पीक पाहणी करणे शिल्‍लक असल्याकारणाने शेतकरी स्‍तरावरून पीक नोंदणीसाठी दिनांक 24 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्‍यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली आहे. सर्व शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलद्वार ७/१२ उताऱ्यावर शेतात लागवड केलेल्या रब्‍बी पिकांची नोंदणी दिनांक 1 डिसेंबर 2025 पासून सुरू झाली आहे. महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प दिनांक 15 ऑगस्ट 2021 पासून संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या प्रकल्पात सुधारणा करून, खरीप व रब्बी हंगाम 2024 पासून पीक पाहणी ही डिजिटल क्रॉप सर्वे प्रणालीद्वारे संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली आहे. तथापि, शेतकऱ्यांनी सहाय्यकांवर अवलंबून न राहता शक्य तितकी पीक पाहणी स्वतःच पूर्ण करावी. पीक पाहणी दरम्यान काही अडचणी आल्यास, आपल्या गावासाठी नेमणूक करण्यात आलेले पीक पाहणी सहाय्यक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपल...

िभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने निबंध व घोषवाक्य स्पर्धेला मुदतवाढ आता स्पर्धकांना १० फेब्रुवारीपर्यंत पाठवता येणार प्रवेशिका

व कोल्हापूर दि. १९ (विमाका): शीख धर्माचे नववे धर्मगुरू श्री. गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त विभागीय माहिती कार्यालय कोल्हापूर अंतर्गत कार्यरत असणाऱ्या जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर, सांगली व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक व सर्व सामान्य नागरिकांचा या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग असावा, या उद्देशाने इयत्ता 8 ते 12 वी या वर्गातील विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी (खुला गट) अशा दोन गटात निबंध व घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी या स्पर्धेची अंतिम तारीख 20 जानेवारी होती. तथापि, आता या स्पर्धेला मुदतवाढ मिळाली असून स्पर्धक आपल्या प्रवेशिका 10 फेब्रुवारीपर्यंत पाठवू शकतील. श्री गुरु तेग बहादूर यांनी देशासाठी प्राण दिले. धर्मांतर सक्तीला शरण न जाता त्यांनी स्वतःचे बलिदान दिले. त्यांच्या शौर्याचे,बलिदानाचे व देशाबद्दलचे मानवतावादी कार्य लक्षात घेऊन तसेच त्यांच्या पराक्रमाची व्यापक माहिती इतर समाजाला व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्यातर्फे अनेक विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विभागी...

क्रीडा धोरणांतर्गत ५ टक्के आरक्षणासाठी ब्लॉकचेन आधारित क्रीडा ई-प्रमाण प्रणाली कार्यान्वित

सिंधुदुर्गनगरी दिनांक 19 (जिमाका) :- राज्यातील गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवेतील 5 टक्के आरक्षणाचा लाभपारदर्शक, जलद आणि त्रुटीमुक्त पद्धतीने मिळावा, या उद्देशाने शासनाने "ब्लॉकचेन"(Blokchain) च "कृत्रिम बुद्धिमता"(Artificil Intelligence) या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयानुसार जुनी कागदपत्रांवर आधारित पडताळणी प्रक्रिया बंद करुन, पूर्णत: डिजिटल क्रीडा ई-प्रमाण प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या अंमलबजावणीसाठी क्रीडा संघटनांनी या कार्यप्रणालीची तत्काळ माहिती द्यावी. अभिलेख जतन अंतर्गत स्पर्धा संपन्न झाल्यापासून 7 दिवसांच्या आत, स्पर्धेचा अंतिम निकाल, सहभागी खेळाडूंची यादी आणि गुणपत्रिका या माहितीची फाईल क्रीडा ई प्रमाण पोर्टल https://soprts.maharashtra.gov,in वर अपलोड करण्यासाठी संचालनालयाला सादर करणे संघटनांवर बंधनकारक राहील. ही माहिती संबंधित संघटनेच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांने डिजिटल स्वाक्षरीने प्रमाणित करणे आवश्यक आहे. जी संघटना विहित 7 दिवसांच्या मुदतीत माहिती ब्लॉकचेनवर अपलोड करणार नाही, अशा परिस्थितीत ख...

राज्य क्रीडा दिनानिमित्त खेळाडूंच्या सत्कार समारंभाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 19 (जिमाका) :- स्व. खाशाबा जाधव हे भारतीय फ्रीस्टाईल कुस्तीपटू होते. हेलसिंकी येथील १९५२ मधील उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारे ते स्वतंत्र भारतातील आणि महाराष्ट्रातील पहिले मल्ल होते. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल त्यांचा जन्मदिवस १५ जानेवारी "राज्य क्रीडा दिन" म्हणून साजरा केला जातो. याअनुषंगाने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील शालेय क्रीडा स्पर्धामध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा सत्कार समारंभ २१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता आरमार प्रमुख मायनाक भंडारी सभागृह, सिंधुदुर्गनगरी येथे निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, यांच्या अध्यक्षतेखाली व आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर वेंगुर्ला तहसिलदार ओकार ओतारी, याच्या हस्ते जिल्ह्यातील राज्यस्तरीय पदक प्राप्त, राष्ट्रीय पदक प्राप्त व सहभागी खेळाडूंच्या सत्कार करण्यात येणार आहे. तसेच खेलो इंडिया कबड्डी प्रशिक्षण केंद्र, सिंधुदुर्ग सावंतवाडी, सिंधुदुर्गच्या खेळाडूंना खेळ साहित्य (कीट) वाटप केले जाण...

श्री गुरु तेग बहादूर साहिब : मौनातून उमटलेली मानवतेची गर्जना

इतिहास कधी कधी रणांगणात तलवारीच्या जोरावर घडतो, तर कधी एका शांत, स्थिर आणि निर्भय मौनातून. अशाच मौनातून मानवतेसाठी अमर झालेलं नाव म्हणजे श्री गुरु तेग बहादूर साहिब. त्यांनी इतिहास घडवला तो रणांगणावर रक्त सांडून नव्हे, तर सत्यासाठी स्वतःचे शिर अर्पण करून. म्हणूनच काळाच्या प्रवाहात त्यांची ओळख केवळ शीख धर्माचे नववे गुरु म्हणून नाही, तर ‘हिंद की चादर’ – भारतभूमीचे कवच म्हणून अढळ राहिली आहे. शांत स्वभावात दडलेले अपार धैर्य गुरु तेग बहादूर साहिब यांचा जन्म अमृतसर येथे झाला. बालपणापासूनच त्यांच्या स्वभावात एक विलक्षण शांतता होती. शब्दांपेक्षा मौन त्यांना अधिक प्रिय होते. बाह्य जगाच्या गोंगाटापेक्षा अंतर्मनातील स्वर ऐकण्यात त्यांना समाधान लाभे. त्यांनी शस्त्रविद्या आत्मसात केली होती; परंतु त्यांच्या हातात तलवार होती तरी हृदयात करुणेचे साम्राज्य होते. त्यांचे आयुष्य म्हणजे ध्यान, साधना आणि आत्मचिंतनाचा अखंड प्रवास होता. हिमालयाच्या सान्निध्यात, निर्जन वनांत, शांत आश्रमांत त्यांनी स्वतःला ईश्वराशी जोडले. या साधनेतूनच त्यांचा आत्मा निर्भय झाला—कारण जो मृत्यूला ओळखतो, तोच जीवनाला निर्भयतेने ...

इलेक्ट्रॉनिक माध्यमांवरील प्रचारार्थ जाहिरातींची पुर्व परवानगी घ्यावी - जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

जाहिरातींच्या प्रमाणिकरणासाठी समितीची स्थापना सिंधुदुर्गनगरी दिनांक 17 (जिमाका) :- जिल्हा परिषद, पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुक्त, निर्भय, पारदर्शक आणि प्रत्येक राजकीय पक्ष व उमेदवाराला समान संधी मिळेल अशा वातावरणात घडवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने माध्यम क्षेत्रातील सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने व्यापक मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेत माध्यमांचा गैरवापर थांबवणे, मतदारांना दिशाभूल होऊ न देणे आणि जाहिरातींमधील आचारसंहितेचे पालन बंधनकारक ठेवण्यासाठी जिल्हा व राज्य स्तरावर माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समित्या तात्काळ कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यानुसार, जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली असून, जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकांसाठी जाहिरातींच्या प्रमाणिकरणाची जबाबदारी ही समिती पार पाडेल. जिल्ह्यातील राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार आणि निवडणूक प्रचार करणाऱ्या संस्थांनी उमेदवाराच्या परवानगीने इलेक्ट्रॉनिक माध्यमांवरील प्रचारार्थ जाहिरातींची पुर्व परवानगी घ्यावी, असे आ...

"जिल्हास्तरीय आदर्श आचारसंहिता समिती कक्ष" स्थापन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 17 (जिमाका) :- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०२६ च्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात "जिल्हास्तरीय आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी समिती कक्ष" स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात कार्यरत करण्यात आलेला आहे. या समितीच्या नोडल अधिकारी म्हणून श्रीम. शितल पुंड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, पंकज कोरगांवकर, मनीष राणे, गणेश जंगले, गणेश परब, अमित तेंडोलकर, सुधीर बालम, सुनिल गिरगांवकर, सुबोध गोसावी, सिद्धेश धुमक, भालचंद्र माळवदे, नंदकिशोर हळदणर, संदेश जुवेकर यांचा या समितीमध्ये समावेश आहे. या आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी समिती कक्षाशी संपर्कासाठी ९५५२२८७५५७ या क्रमांकावर किंवा mccsind.zpps2026@Gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क साधता येणार आहे. समितीस नेमून दिलेली कामे १. आचार संहिता कक्ष स्थापन करुन आचार संहिता संबंधिच...

शासकीय सहकारी व लेखा पदविका परीक्षा मे महिन्यात

सिंधुदुर्गनगरी दिनांक 16 (जिमाका) :- शासकीय सहकारी व लेखा पदविका (जी.डी.सी ॲण्ड ए.) व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम) परीक्षा दि. २६,२७,व २८ मे २०२६ रोजी घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी सन २०२६ पासून ‘रत्नागिरी’ हे १७ वे परीक्षा केंद्र नव्याने सुरू करण्यात आले आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी केंद्र क्रमांक १७ ‘रत्नागिरी’ या परीक्षा केंद्राची निवड करावी,असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सिंधुदुर्ग यांनी केले आहे. ००००००

पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारी २०२६ रोजी

सिंधुदुर्गनगरी दिनांक 16 (जिमाका) :- पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यामंध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार असल्याची माहिती उप शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी दिली आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरीत करावे. सर्व परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन उपशिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी केले आहे. ०००००

प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षचे 26 एप्रिल रोजी आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 16 (जिमाका) :- प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.७ वी) २६ एप्रिल २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार असल्याची माहिती उप शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी दिली आहे. या परीक्षेसाठी आवेदन पत्र ऑनलाईन पध्दतीने भरावयाची आहे. शाळा माहिती प्रपत्र, नियमित शुल्कासह ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याचा कालावधी दिनांक ३० डिसेंबर २०२५ ते २ फेब्रुवारी २०२६ असा आहे. शाळा माहिती प्रपत्र, विलंब शुल्कासह ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याचा कालावधी दिनांक ३ ते १७ फेब्रुवारी २०२६ असा आहे. शाळा महिती प्रपत्र, अतिविलंब शुल्कासह ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याचा कालावधी दिनाक १८ ते २३ फेबुवारी २०२६ असा आहे. शाळा माहिती प्रपत्र, अति विशेष विलंब शुल्कासह ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याचा कालावधी दिनांक २४ ते २८ फेब्रुवारी २०२६ असा आहे. २८ फेब्रुवारी २०२६ नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरता येणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी. परीक्षेचे वेळापत्रक, स्वरुप, पात्रता निकष, परीक्षेचे माध्यम, परीक्षेचे शुल्क भरण्याची प...

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक संनियंत्रण समितीची बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी :दिनांक १७ जानेवारी (जिमाका) निवडणूक प्रक्रियेदरम्यान आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करणे, निवडणूक खर्चावर काटेकोर नियंत्रण ठेवणे तसेच आर्थिक बळाचा गैरवापर व मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तूंच्या वाटपाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संनियंत्रण समितीने कामकाज करावे. आपल्या जिल्ह्याला लागून आंतर राज्य सीमा असल्याने येथील चेक पोस्टवर पोलिस, महसूल आणि उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बारकाईने लक्ष द्यावे असेही जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी सांगितले. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांच्यासह विविध विभागांचे नोडल अधिकारी उपस्थित होते. निवडणूक संनियंत्रण समितीत जिल्हाधिकारी अध्यक्ष असून मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस ...

बलिदानाची अमर गाथा ‘हिंद-दी-चादर’ – श्री गुरु तेग बहादूर साहिब

भारतीय इतिहासाच्या विस्तीर्ण पटावर काही महान व्यक्तिमत्त्वे अशी कोरली गेली आहेत, ज्यांचे जीवन आणि बलिदान काळाच्या मर्यादा ओलांडून मानवतेसाठी दीपस्तंभ ठरले आहे. अशाच तेजस्वी ताऱ्यांपैकी एक म्हणजे शीख धर्माचे नववे गुरु, ‘हिंद-दी-चादर’ म्हणून गौरविले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहिब. त्यांचे जीवन हे केवळ धार्मिक नेतृत्वाचे उदाहरण नसून, मानवी स्वातंत्र्य, आत्मसन्मान, विवेक आणि सत्यासाठी दिलेल्या सर्वोच्च त्यागाचे अमर प्रतीक आहे. श्री गुरु तेग बहादूर साहिब यांनी दिलेले बलिदान कोणत्याही एका धर्माच्या संरक्षणापुरते मर्यादित नव्हते. ते होते मानवतेच्या सार्वत्रिक मूल्यांचे रक्षण. “धर्माचे रक्षण म्हणजे मानवतेचे रक्षण” हा संदेश त्यांनी केवळ शब्दांत नव्हे, तर आपल्या जीवनातून आणि मृत्यूतून जगासमोर मांडला. म्हणूनच त्यांचे बलिदान आजही संपूर्ण देशासाठी, आणि जगासाठी, प्रेरणादायी ठरते. सत्य आणि मानवतेच्या रक्षणासाठी श्री गुरु तेग बहादुर साहिब यांनी आपले सर्वस्व अर्पण केले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी इतरांच्या हक्कांसाठी उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यांचे बलिदान कोणाविरुद्ध नव्हते, तर संपूर...

‘ऊर्जा’ : सावली, सारथी आणि मायेच्या आशीर्वादातून उजळलेले एक भविष्य चिमुकल्या जीवाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिले नांव

सिंधुदुर्गनगरी दिनांक १४ (जिमाका) “हरवले आभाळ ज्यांचे हो, तयांची सावली सापडेना वाट ज्यांना हो, तयांचा सारथी…” आणि “जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे, निराधार आभाळाचा तोच भार साहे…” या अर्थगर्भ ओळी जणू प्रत्यक्षात उतरल्या, जेव्हा सावंतवाडी येथील शासकीय अंकुर महिला वसतिगृहात एका निराधार नवजात बालिकेला मायेची सावली, नावाची ओळख आणि उज्ज्वल भविष्याचा आशेचा दीप मिळाला. दिनांक १४ जानेवारी २०२६, मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर, महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त शासकीय अंकुर महिला वसतिगृह, सावंतवाडी येथे संस्थेतील दाखल प्रवेशितेच्या नूतन बालिकेचा नामकरण सोहळा पार पडला.हा सोहळा जिल्हाधिकारी महोदया श्रीम. तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत साकार झाला.विशेष बाब म्हणजे, संस्थेच्या तब्बल ७० वर्षांच्या इतिहासात प्रथमच असा नामकरण सोहळा पार पडला. स्वतः जिल्हाधिकारी महोदया यांनी त्या चिमुकल्या जीवाला ‘ऊर्जा’ हे नाव दिले. हे नाव केवळ संबोधन नव्हते, तर संघर्षावर मात करणाऱ्या जीवनशक्तीचे, प्रकाशाकडे नेणाऱ्या आशेचे प्रत...

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

सिंधुदुर्गनगरी, दि. 14 (जिमाका) : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी अत्यंत सतर्कतेने आणि जबाबदारीने काम करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. निवडणूक प्रक्रियेच्या संपूर्ण कालावधीत राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील मायनाक भंडारी सभागृहात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली नोडल ऑफिसरची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत निवडणूक नियोजन, प्रशासनाची तयारी, जबाबदाऱ्यांचे वाटप तसेच विविध विभागांमधील समन्वय याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या की, निवडणूक प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी आपापली जबाबदारी नीट समजून घेऊन दक्षतेने काम करावे. आचारसंहिता अंमलबजावणी, मतदान केंद्रांची तयारी, कायदा व सुव्यवस्थेची स्थिती, तसेच मतदारांना क...

नागरिकांना विहित कालावधीत जलद व पारदर्शक सेवा देणे हे आपले कर्तव्य - मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव

सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जिमाका): महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना जलद, पारदर्शक आणि कालबद्ध सेवा मिळाव्यात, यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 लागू करण्यात आला असून, या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे हे सर्व शासकीय यंत्रणांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सेवांची सविस्तर माहिती दिली. मुख्य आयुक्त श्रीवास्तव म्हणाले की, हा अधिनियम नागरिकांना सेवा मिळण्याचा कायदेशीर अधिकार देणारा क्रांतिकारी कायदा आहे. या अंतर्गत नागरिकांना कोणत्या सेवा मिळू शकतात, याची ...

शहिदी समागमाच्या ३५० व्या वर्षानिमित्त - नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी होणार भव्य कार्यक्रम

सिंधुदुर्गनगरी : दि -11 (जिमाका) शिख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे येत्या २४ व २५ जानेवारी रोजी भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, भगत नामदेव व उदासीन असे नऊ समाज-संप्रदाय नांदेड या ठिकाणी एकत्र येणार आहेत.श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा त्याग, बलिदान व मानवतेसाठी दिलेल्या शहीदीचा इतिहास देश-विदेशात पोहोचविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नांदेडला सुमारे १० लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे .या कार्यक्रमाच्या निमित्ताने अल्पसंख्याक विकास व औकाफ विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी श्री गुरु तेग बहादूर यांना आपल्या संदेशाद्वारे अभिवादन करत या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आपल्या व्हिडिओ संदेशामध्ये राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या,श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त देशभरामध्ये हिंद की चादर हा कार्य...

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी – ‘हिंद की चादर’

धर्म आणि मानवतेच्या रक्षणासाठी ज्यांनी आपले जीवन अर्पण केले, असे महापुरुष इतिहासात अजरामर झाले आहेत. शीख परंपरेतील नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर साहिबजी हे असेच एक महान व्यक्तिमत्त्व होते. त्यांना ‘हिंद की चादर’ म्हणजेच भारतभूमीचे संरक्षण करणारे कवच म्हणून ओळखले जाते. धर्मस्वातंत्र्य, न्याय आणि सहिष्णुतेसाठी त्यांनी दिलेले बलिदान भारतीय संस्कृतीतील अत्यंत गौरवास्पद अध्याय आहे. त्यांच्या विचारांप्रमाणे जीवन जगणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा जन्म एप्रिल १६२१ मध्ये अमृतसर येथे झाला. ते शीख धर्माचे सहावे गुरु श्री गुरु हरगोबिंद आणि माता नानकी यांचे सुपुत्र होते. त्यांचे मूळ नाव त्यागमल होते. लहान वयातच एका युद्धात त्यांनी अपूर्व शौर्य दाखवले. त्यामुळे त्यांना ‘तेग बहादुर’ म्हणजेच शूर आणि तळपती तलवारीसारखे धैर्यवान असे नाव मिळाले. १६६४ मध्ये त्यांना गुरु पदाची दीक्षा मिळाली. त्या काळात देशात क्रूर राजवटीमुळे मोठ्या प्रमाणावर धार्मिक अत्याचार सुरू होते. लोकांवर जबरदस्तीने धर्मांतर लादले जात होते. धर्म, श्रद्धा आणि संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न होत होते....

आंगणेवाडी - कुणकेश्वर जत्रोत्सवाचे काटेकोर नियोजन भाविकांच्या सुरक्षितता, सुविधा आणि सुव्यवस्थेला प्राधान्य - पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी, दि. १० (जि.मा.का.) :लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी श्री. भराडी देवी आणि कुणकेश्वर श्री देव स्वयंभू देवाच्या वार्षिक जत्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देताना त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. आंगणेवाडी श्री. भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव दि. 9 फेब्रुवारी 2026, तर कुणकेश्वर श्री देव स्वयंभू देवाचा जत्रोत्सव महाशिवरात्री, दि. 15 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न होणार आहे. या दोन्ही जत्रोत्सवांच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, आंगणेवाडी व कुणकेश्वर देवस्थानचे विश्वस्त तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, हे दोन्ही जत्रोत्सव जिल्ह्याच्या धार्...

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत विकास कामांचा शुभारंभ व लोकर्पण सर्व यंत्रणांच्या समन्वयातून सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम क्रमांकावर नेणार - पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी, दि. 10 (जि.मा.का.) : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात सिंधुदुर्ग जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिला असून, अनेक उपक्रमांत जिल्ह्याने प्रगतशील आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हीच कामगिरी अधिक गतीने पुढे नेत सर्व यंत्रणांच्या समन्वयातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला राज्यात नेहमी प्रथम क्रमांकावर आणणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत विकास कामांचा शुभारंभ व लोकर्पण तसेच वैयक्तिक लाभ वितरण व सन्मान सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ मोहन दहिकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमुळे वैयक्तिक लाभार्थ्यांना थेट लाभ मिळत असून, त्याचबरोबर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम होत आहे. या योजनांमुळे ग्रामीण भागातील न...

दोडामार्ग तालुक्यात वन्यहत्ती नियंत्रणासाठी वनविभाग सतर्क शेतकरी व ग्रामस्थांनी घाबरू नये – सावंतवाडी वनविभागाचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 09 (जिमाका) :- दोडामार्ग तालुक्यात कर्नाटक-दोडामार्ग सीमाभागात तब्बल 12 हत्तींचा मोठा कळप दाखल झाल्याची बातमी पसरली होती. या पार्श्वभूमीवर वनविभागाचे एक पथक तात्काळ कर्नाटक हद्दीवर दाखल झाले. तेथे त्यांना हत्तीची कोणतीही हालचाल दिसून आली नाही. यावेळी या पथकाने तेथील स्थानिक ग्रामस्थ व स्थानिक वनकर्मचाऱ्यांशी चर्चा करून हत्तीच्या हालचालीची माहिती घेतली असता काही दिवसांपूर्वी हत्तींच्या एका कळपाचा वावर हेवनहट्टी भागात होता, त्यानंतर तो कळप बेलूर वरून दांडेलीच्या दिशेने गेला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत दोडामार्ग तालुक्याच्या कर्नाटक हद्दीवर हत्तीचा वावर नाही तसेच सावंतवाडी वनविभाग देखील कर्नाटक हद्दीवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थ यांनी घाबरून जावू नये, असे आवाहन सावंतवाडी वनविभागातर्फे सर्वांना करण्यात आले आहे. दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी प्रवीण नारायण गवस जिल्हाध्यक्ष सरपंच सेवा संघ यांनी हत्ती संबंधी विविध मागण्यांच्या अनुषंगाने सुरु केलेले ठिय्या आंदोलन दि. 08 जानेवारी 2026 रोजी स्थगित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत वन्यहत्तीम...