Posts

Showing posts from September, 2021

आजअखेर 49 हजार 530 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 53 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

ग्रामसभेत जलजीवन मिशन कार्यक्रमांबाबत जनजागृती

सिंधुदुर्गनगरी दि. 30 (जिमाका): जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ग्रामिण भागातील प्रत्येक कुंटुबाला नळाव्दारे शुध्द व शाश्वत पेयजल उपलब्ध व्हावे यासाठी 2 ऑक्टोंबर 2021 राजी होणाऱ्या ग्रामसभेत जलजीवन मिशन कार्यक्रमांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या ग्रामसभेत नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे. दिनांक 2 ऑक्टोंबर 2021 राजी होणाऱ्या ग्रामसभेत जलजीवन मिशन कार्यक्रमांबाबत जनजागृती याबाबतचे निर्देश महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने दिनांक 24 सप्टेंबर 2021 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाव्दारे देण्यात आले आहेत. या ग्रामसभाचा प्रमुख उद्देश -तीस ते चाळिस वर्षासाठी वैयक्तिक नळ जोडणीव्दारे शाश्वत व शुध्द पेयजल यंत्रणा निर्माण करणे, पाणी व स्वच्छता समिती गठीत करण्यासाठी पन्नास टक्के महिला प्रतिनिधी व दुर्बल घटकांतील प्रतिनिधी यांना संधी देणे, सहभागी सदस्य यांना पेयजल स्त्रोतांचे महत्व विशद करणे, ज्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात भुजल व भुपृष्ठ जल उपलब्ध आहे. अशा ठिकाणी स्वंतत्र पाणी पुरवठा योजन...

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना ई श्रम कार्डचे वाटप

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) – केंद्र सरकारमार्फत असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी देण्यात येणाऱ्या ई श्रम कार्डचे आज जिल्ह्यातील 4 लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी सरकारी कामगार अधिकारी सचिन कोल्हाळ, सीएससीचे विभागीय समन्वयक सुयोग दीक्षित, दुकाने निरीक्षक रवीराज हुबे, सीएसीचे जिल्हा व्यवस्थापक तोरणकुमार इनामदार आदी उपस्थित होते. यावेळी पोईप येथील समीर परब, मारुती वडर, शंकर वडर आणि मयुरी सरमळकर या लाभार्थ्यांना ई श्रम कार्डचे वाटप करण्यात आले. केंद्र शासनाने असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी ई श्रम पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवरील माहितीच्या अधारे असंघटित क्षेत्रातील कामकागारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना अंमलात आणल्या जातात. तसेच इतर सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळण्यासाठी या कार्डचा उपयोग होणार आहे. * सोबत फोटो जोडला आहे.

मालवण तालुक्यात सर्वाधिक 47 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 47 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 29.875 मि.मी. पाऊस झाला असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 3879.3575 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 33(3777), सावंतवाडी - 46(4191.1), वेंगुर्ला - 37(3119.8) कुडाळ - 27(3800), मालवण - 47(4188.96), कणकवली - 07(4202), देवगड - 12(3344), वैभववाडी - 30(4412) पाऊस झाला आहे. 00000

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) - तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 435.0950 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 97.26 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 24.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर - 84.9760, अरुणा - 78.2893, कोर्ले- सातंडी - 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6480, नाधवडे – 3.4900, ओटाव – 4.5267, देंदोनवाडी – 1.4334, तरंदळे – 4.3180, आडेली – 1.2710, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 3.2000, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 2.3130, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 2.2840, दाभाचीवाडी – 2.4210, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.3850, धामापूर – 2.4410, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 1.310, ओझरम – 1.819, पोईप – 0.717, शिरगाव – 1.302, तिथवली – 1.7230, लोरे – 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे. 00000

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) – आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपाताळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.400 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुोलाजवळ वाघोटन नदीची पातळी 2.500 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

आजअखेर 49 हजार 471 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 58 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

महिला वसतीगृहासाठी इमारत भाडेतत्वार घेण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि. 29 (जिमाका): राज्यातील लोकसंख्या व नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतीगृहाची मागणी लक्षात घेता मुंबई उपनगर जिल्हा- 6 मुंबई शहर, ठाणे, पुणे या जिल्ह्यांसाठी प्रत्येकी 4 व राज्यातील उर्वरित 32 जिल्हयांसाठी प्रत्येकी 1 याप्रमाणे 50 वसतीगृहांना 100 प्रवेशित क्षमतेची इमारत भाडेतत्वार उपलब्ध करुन घेऊन नोकरी करणाऱ्या महिलांचे वसतीगृह ही सुधारित योजना राबविण्यात येत आहे. शासन निर्णयामध्ये परिशिष्ट अ मध्ये योजना राबविणाऱ्या संस्थासाठी मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. तसेच विशिष्ट ब मध्ये संस्थाकडून भाडेतत्वार चालविण्यात येणाऱ्या वसतीगृहासाठी मंजूर करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे व अटी याबाबत तरतूद नमूद करण्यात आहे. तरी सिंधुदुर्ग येथे नोकरी करणाऱ्या महिलांसाठीचे वसतीगृह भाडेतत्वावरिल इमारतीमध्ये सुरु करण्यासाठी जिल्हास्तरावर इच्छूक संस्थाकडून प्रस्ताव मागविण्यात येत असून याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय 02362 228869 सिंधुदुर्गनगरी येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे. 0000...

समाज कल्याण कार्यालयाच्या जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) – सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, सिंधुदुर्ग या कार्यालयाकडून जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक दि. 27 सप्टेंबर 2021 रोजी रविंद्र मठपती, उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन शाखा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत घडलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला. 1एप्रिल 1991 ते 31 ऑगस्ट 2021 या कालावधीत एकूण 181 गुन्हे घडले असून त्यापैकी पोलीस तपासावर 2, शाबीत गुन्हे -5, निर्दोष सुटलेले 125, काढून टाकलेले 1, न्यायालयात प्रलंबित 31, अ फायनल 4, ब फायनल 8, क फायनल 2, एन.सी. फायनल 3 असे गुन्ह्यांचे वर्गीकरण तसेच देय अर्थसहाय्याबाबतची माहिती दीपक घाटे, सचिव तथा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याणस सिंधुदुर्ग यांनी दिली. या बैठकीस पोलीस उपअधिक्षक संध्या गावडे, नाहसं पथक पोलीस निरीक्षक श्री.एस.डौर, शिक्षणाधिकारी दत्ता गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी शाम चव्हाण, तसेच अशासकीय सदस्य सर्वश्री अनिल जाधव, राजू राठोड, राजाराम जाधव, सोमनाथ टोमके, गुणाजी दळवी आदी उपस्थित होते. 00000

पिंजरा मत्स्यसंवर्धनासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) – मत्स्योत्पादनात वाढ करण्यासाठी पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धनासाठी मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत ठेक्याने देण्यात येणाऱ्या 15 हेक्टर पेक्षा कमी नसलेल्या सर्व जलाशयात, ज्या जलाशयांची पाण्याची वर्भर किमान 8 मीटर पेक्षा जास्त सरासरी खोली असेल असे जलाशय, एकूण जलाशयाच्या 1 टक्के जलक्षेत्रामध्ये परवानगी देण्यात येणार आहे. सर्व जलाशयांकरिता पिंजरा उभारणी संख्या कमाल 18 पिजंरे, 630 चौ.मी. जलक्षेत्र प्रति वैयक्तिक मत्स्यसंवर्धक तसेच मत्स्यसंवर्धक सहकारी संस्था, महिला स्वयं सहायता गट, मच्छिमार स्वयं सहायता गट, संयुक्त दाईत्व गट असल्यास पिंजरा उभारणी संख्या 6 पिजंरे प्रती सदस्य या प्रमाणात कमाल 72 पिंजरे, 2 हजार 520 चौ.मी. जलक्षेत्र या प्रमाणे निश्चित करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन करण्यास इच्छुक असलेल्या सभासदांनी, मत्स्यकास्तकारांनी दि. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, मालवण यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावेत असे आवाहन र.ग.मालवणकर, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग-मालवण यांनी केले आहे. 00000

क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे 4 ऑक्टोबर रोजी आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) – आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करून त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पूरवून त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय व आर्मी स्पोर्ट्स इन्स्टीट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने बॉईज स्पोर्ट्स कंपनी, पुणे येथील प्रवेशासाठी क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे दि. 4 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 9 वा. जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे आयोजन करण्यात आले आहे. या चाचण्या या 8 ते 14 वर्षाखालील मुलांसाठी आहेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे हे कळवितात. 00000

स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा - प्रजित नायर

सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) – स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा 2 अंतर्गत सन 2021-22 करिता ग्रामीण भागात स्वच्छता सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणामध्ये लोकसहभाग महत्वाचा असून जिल्ह्यातील नागरिकांनी स्वच्छ सर्वेक्षणात सक्रीय सहभाग घ्यावा. तसेच एसएसजी 21 ॲपच्या माध्यमातून नागरिकांनी प्रतिसाद नोंदवावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचा सहभाग असून ग्रामपंचायत क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे जसे आरोग्य केंद्र, शाळा, अंगणवाडी, बाजाराची ठिकाणे, धार्मिक स्थळे यांची स्वच्छते संदर्भातील पडताळणी होणार आहे. या पडताळणीच्या माध्यमातून जिल्ह्याला 300 पैकी गुण देण्यात येणार आहेत. तसेच स्वच्छ भारत मिशन ग्रामीणमध्ये नागरिकांचा सहभाग नोंदवण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर एसएसजी 21 हे ॲप सुरू करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून गावातील सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता सुविधा यावरील प्रश्नांची उत्तरे ग्रामस्थांनी द्यायची आहेत. ग्रामस्थांनी मोबाईल ॲपच्या माध्यमातून नोंदविलेल्या प्रतिक्...

सावंतवाडी येथे 4 ऑक्टोबर रोजी रोजगार मेळावा

सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, सिंधुदुर्ग, औद्योगिक प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग व मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील आयटीआय प्रशिक्षित बेरोजगार युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दि. 4 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वा. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावंतवाडी येथे ॲपरेन्टीसशिप रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील उद्योजकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in पोर्टलवर पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये आपली ॲपरेन्टीसशिपची रिक्तपदे अधिसूचित करावीत. तसेच नोकरीच्या शोधातील उमेदवारांनीही याच पोर्टलवर स्वतःच्या लॉगीन आयडीने शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित ॲपरेन्टीसशिप पदासाठी ऑनलाईन अर्ज करावे असे आवाहन शा.गि.पवार, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग यांनी केले आहे. 00000

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) – आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपाताळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.300 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.300 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुोलाजवळ वाघोटन नदीची पातळी 2.600 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) - तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 433.9820 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 97.01 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 53 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर - 84.7070, अरुणा - 78.2893, कोर्ले- सातंडी - 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6480, नाधवडे – 3.3872, ओटाव – 4.4348, देंदोनवाडी – 1.4334, तरंदळे – 4.2520, आडेली – 1.2710, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 3.2000, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 2.3280, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 2.2990, दाभाचीवाडी – 2.4210, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.3850, धामापूर – 2.4410, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 1.310, ओझरम – 1.819, पोईप – 0.717, शिरगाव – 1.313, तिथवली – 1.7230, लोरे – 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे. 00000

कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 98 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 98 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 48.55 मि.मी. पाऊस झाला असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 3849.4825 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 67(3744), सावंतवाडी - 40(4145.1), वेंगुर्ला - 40.4(3082.8) कुडाळ - 98(3773), मालवण - 51(4141.96), कणकवली - 46(4195), देवगड - 20(3332), वैभववाडी - 26(4382) पाऊस झाला आहे. 00000

जिल्ह्यातील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे 7 ऑक्टोबरपासून होणार सुरू जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी मार्गदर्शक तत्वे व मानक कार्यप्रणाली केली जारी

Image
सिंधुदुर्गनगरी दि. 28 (जि.मा.का.) - शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे 7 ऑक्टोबर पासून सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी मानक कार्यप्रणाली/मार्गदर्शक तत्वे आज जारी केली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्रा बाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे दिनांक ०७/१०/२०२१ पासून खुली करणेसाठी सोबतच्या परिशिष्ट – अ मध्ये नमुद मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करणेच्या अटीस अधीन राहून परवानगी देण्यात येत आहे. प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक आणि प्रार्थना स्थळांच्या वेळेबाबत संबंधीत विश्वस्त/ मंडळ/ अधिकारी यांनी निर्णय घेण्याचा आहे. मास्क परिधान करणे, शारीरिक आंतराचे पालन करणे, थर्मल स्क्रिनिंग करणे आणि वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील. सर्व सबंधीत प्रतिबंधीत क्षेत्रा बाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे यांच्याकडून परिशिष्ट – अ मध्ये नमुद मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याबाबत तपासणी करण्याचे अधिकार त्या त्या क्षेत...

वारस प्रमाणपत्र तातडीने उपलब्ध करावे - निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड

Image
सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.) – कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांबाबत विधी व सेवा प्राधिकरण तसेच तहसिलदार यांनी तातडीने वारस प्रमाणपत्र द्यावीत जेणेकरून या मुलांना शासनाच्या योजनेचा लाभ देता येईल, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांनी दिली. कोविड 19 रोगाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक आज घेण्यात आली. बैठकीला पोलीस उपअधिक्षक संध्या गावडे, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक नितीन काळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना शिरदावडे, महिला अत्याचार निवारण कक्षाच्या सहायक पोलीस निरीक्षक नलिनी शिंदे, परिवीक्षा अधिकारी बी.जी.काटकर आदी उपस्थित होते. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी आढावा दिला. जिल्ह्यामध्ये एक पालक मयत बालके 229 असून दोन्ही पालक मयत बालके 16 आहेत. 314 विधवा असून 245 गृहभेटी पूर्ण झाल्या आहेत. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्व 16 ...

स्वच्छ भारत अभियन अंतर्गत स्थानिक प्रशासनाच्या सहकार्यातून सागर किनाऱ्यांची स्वच्छता राबवावी - निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड

Image
सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.) – आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत नेहरू युवा केंद्राने विविध कार्यक्रमांच्या आयोजनाबरोबरच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता मोहीम राबवावी. यासाठी शाळा, स्थानिक प्रशासन यांचे सहकार्य घ्यावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांनी दिले. नेहरू युवा केंद्रामार्फत जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक आज झाली. जिल्हा युवा अधिकारी मोहित कुमार सैनी यांनी या बैठकीत 2021 - 22 वार्षिक कृती योजना आराखडा सादर केला. या बैठकीत जिल्हा कृती आराखडा आझादी का अमृत महोत्सव, स्वच्छ भारत कार्यक्रम यावर चर्चा करण्यात आली. 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत ग्रामपंचायत,शाळा, स्थानिक प्रशासन यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवावी. जनजागृतीसाठी दशावतार, कळसुत्री बाहुल्या अशा पारंपरिक कलेचा वापर करावा, अशा सूचना श्री. भडकवाड यांनी दिल्या. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक परशुराम गावडे, जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वालावलकर, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, सहायक युवा अधि...

सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 35 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 35 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 15.45 मि.मी. पाऊस झाला असून, एकूण 3800.9325 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 08(3677), सावंतवाडी - 35(4105.1), वेंगुर्ला – 9.6(3042.4), कुडाळ - 05(3675), मालवण - 14(4090.96), कणकवली - 11(4149), देवगड - 14(3312), वैभववाडी - 27(4356) असा पाऊस झाला आहे. 00000

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.) : तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून 370.755 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 431.6000 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 96.48 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चौवीस तासात 4.20 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 85.5140, अरुणा – 78.2470, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6480, नाधवडे – 3.2819, ओटाव – 4.3129, देंदोनवाडी – 1.3560, तरंदळे – 4.1190, आडेली – 1.2880, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 3.2000, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 2.3440, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी-डिगस – 2.2990, दाभाचीवाडी – 2.4210, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.3850, धामापूर – 2.4410, हरकूळ – 2.380, ओसरगाव – 1.310, ओझरम – 1.819, पोईप – 0.717, शिरगाव – 1.313, तिथवली – 1.723, लोरे – 2.696 या प्रमाणे उपलब्ध...

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पाताळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.200 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.000 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 2.600 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

पोलीस ठाण्याचा वन क्लीक एसओपी तयार करावा - गृहराज्य मंत्री सतेज पाटील

Image
सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.) – जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याची माहिती येणाऱ्या नव्या अधिकाऱ्यांना एका क्लीकवर उपलब्ध व्हावी यासाठी एसओपी तयार करावी. अशी सूचाना देतानाच कोविड आणि तौक्ते वादळाच्या काळात चांगले काम केल्याबद्दल गृहराज्य मंत्री (शहरे) सतेज पाटील यांनी पोलीस दलाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. गृहराज्यमंत्री श्री. पाटील यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयात विभागाचा, भारत नेट, म्हाडा/पंतप्रधान आवास योजना, परिवहन आणि एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे उपस्थित होते. सुरुवातीला झालेल्या पोलीस विभागाच्या आढावा मनुष्यबळ उपलब्ध साधन सामग्री, सुविधा, राबवलेले उपक्रम, जिल्ह्याचा गुन्ह्यांबाबतची माहितीचे पोलीस अधिक्षक श्री. दाभाडे यांनी संगणकीय सादरीकरण केले. राज्यमंत्री श्री. पाटील म्हणाले, कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याचे काम पोलीस प्रशासनाने केले आहे. पोलीसांची विश्वासहार्ता टिकून आहे यावरच राज्याची प्रगती सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय...

28 व 29 सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) – प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांजकडून प्राप्त संदेशानुसार दिनांक 27 सप्टेंबर 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. दिनांक 28 सप्टेंबर 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडासह मुसळधार पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. दिनांक 29 सप्टेंबर 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तरी त्या अनुषंगाने आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी. असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग या विभागाने कळविले आहे.

आरोग्य विभागाच्या 14 रुग्णवाहिकांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Image
सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) – राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या 14 रुग्णवाहिकांचा लोकार्पण आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सिंधुदुर्ग झाले. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात जिल्हा आरोग्य विभागास प्राप्त झालेल्या 11 रुग्णवाहिकांचे लोकार्पण वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा परिषदेचे सदस्य नागेंद्र परब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, दिपाली पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयास प्राप्त झालेल्या 3 रुग्णवाहिकांचे लोकार्पण वेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील आदी उपस्थित होते. * सोबत फोटो जोडला आहे. 00000

आजअखेर 49 हजार 271 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 146 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

देवगड तालुक्यात सर्वाधिक 13 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात देवगड तालुक्यात सर्वाधिक 13 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 2.375 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3785.4825मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 0(3669), सावंतवाडी - 0(4070.1), वेंगुर्ला - 0(3032.8) कुडाळ - 2(3670), मालवण - 2(4076.96), कणकवली - 1(4138), देवगड - 13(3298), वैभववाडी - 1(4329) पाऊस झाला आहे. 00000

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) - तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 430.6490 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 96.26 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 6.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 86.0510, अरुणा - 78.3860, कोर्ले- सातंडी - 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6480, नाधवडे – 3.0397, ओटाव – 4.2569, देंदोनवाडी – 1.2504, तरंदळे – 4.0530, आडेली – 1.2880, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 3.2000, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 2.3440, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 2.2990, दाभाचीवाडी – 2.4210, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.3850, धामापूर – 2.4410, हरकूळ – 2.380, ओसरगाव – 1.310, ओझरम – 1.819, पोईप – 0.717, शिरगाव – 1.325, तिथवली – 1.723, लोरे – 2.696 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे. 00000

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) – आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपाताळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.200 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.000 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुोलाजवळ वाघोटन नदीची पातळी 2.700 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

आजअखेर 49 हजार 215 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 136 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

पालकमंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

Image

26 सप्टेंबर 2021 बातमी पाणीसाठा

Image

निर्यात प्रचलन समितीच्या माध्यमातून उद्योजकांच्या अडचणींवर उपाययोजना - के. मंजुलक्ष्मी अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त निर्यातदारांचे संमेलन

Image
सिंधुदुर्गनगरी दि. 24 (जिमाका): निर्यात करताना उद्योजकांना येणाऱ्या अडचणींची दखल घेऊन जिल्हा निर्यात प्रचलन समितीच्या माध्यमातून यावर आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. अमृतमहोत्सव वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत निर्यातदारांचे संमेलन आज झाले. या संमेनात जिल्हा अग्रणी बँक, वस्तू व सेवा कर विभाग, एम्पेडा व जिल्हा उद्योग केंद्र यांनी निर्यांत विषयक विविध विषयावर उपस्थितांना माहिती दिली. निर्यात व्यवसाय कसा सुरु करावा, त्यासाठी उपलब्ध विविध सवलती, वित्त पुरवठ्यासाठीच्या योजना, याबाबत दूरदृश्यप्रणालीद्वारे माहिती दिली. जिल्हा निर्यात प्रचलन समितीमार्फत हाती घेण्यात आलेल्या जिल्हा नियोजन आराखड्याबाबत सादरीकरण करण्यात आले. जिल्ह्यातून परदेशामध्ये विविध प्रकारच्या वस्तू, आंबा, काजू, बांबू, इत्यादी निर्यात करणाऱ्या उद्योजकांनी त्यांना निर्यात करताना सध्या येणाऱ्या अडचणी व त्या अपेक्षित उपायायोजनांबाबत आपले अभिप्राय व्यक्त केले. या सर्व अडचणींची दखल घेऊन, जिल्हा निर्यात प्रचलन समितीच्या माध्यमातून यावर...

आजअखेर 49 हजार 08 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 224 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image
Image
प्रभावी जनसंपर्कातून प्रशासनाची प्रतिमा उंचवावी - उपसंचालक डॉ. संभाजी खराट सिंधुदुर्गनगरी दि. 24 (जिमाका): प्रभावी जनसंपर्कातून प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख करुन प्रशासनाची प्रतिमा उंचवावी, असे मार्गदर्शन कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांनी सांगितले. उपसंचालक डॉ. खराट यांनी आज जिल्हा माहिती कार्यालयाला भेट देवून मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी माहिती सहाय्यक हेमंतकुमार चव्हाण, एकनाथ पोवार, दूरमुद्रणचालक रवींद्रकुमार चव्हाण, लिपीक-टंकलेखक संदिप राठोड, सर्वसाधारण सहाय्यक रवींद्र देवरे, रोनिओ ऑपरेटर अविनाश होडावडेकर, शिपाई महेंद्र भालेकर उपस्थित होते. उपसंचालक डॉ. खराट यांनी यापूर्वी मुंबई, कोल्हापूर, कोकण भवन, रत्नागिरी, ठाणे, मंत्रालय याठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी तसेच मंत्रालयात वरिष्ठ सहायक संचालक पदाची जबाबदारी सांभाळली आहे. माहिती व जनसंपर्क विभागात समाज माध्यमांचा वापर अधिक प्रभावीपणे करण्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. तसेच शासनाचे मुखपत्र असणाऱ्या लोकर...

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 2 (जि.मा.का.) – आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपाताळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.200 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.000 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुोलाजवळ वाघोटन नदीची पातळी 3.400 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.) - तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 426.1170 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 95.25 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 6.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर - 88.2230, अरुणा - 78.9433, कोर्ले- सातंडी - 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6480, नाधवडे – 2.9590, ओटाव – 4.0973, देंदोनवाडी – 1.1448, तरंदळे – 3.9860, आडेली – 1.2880, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 3.2000, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 2.4060, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 2.2840, दाभाचीवाडी – 2.4210, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.3850, धामापूर – 2.4410, हरकूळ – 2.380, ओसरगाव – 1.339, ओझरम – 1.819, पोईप – 0.732, शिरगाव – 1.336, तिथवली – 1.723, लोरे – 2.696 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे. 00000

कणकवली तालुक्यात सर्वाधिक 34 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 34 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 14 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3779.3575 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग -0 (3669), सावंतवाडी -22 (4066.1), वेंगुर्ला -1(3030.8) कुडाळ - 3(3664), मालवण - 20(4074.96), कणकवली - 34(4136), देवगड - 0(3279), वैभववाडी - 32(4315) पाऊस झाला आहे. 00000

जिल्ह्यात 4 लाख 49 हजार 217 जणांनी घेतला पहिला डोस

सिंधुदुर्गनगरी, दि.24(जि.मा.का.): जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 4 लाख 49 हजार 217 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 834 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 967 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 915 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 463 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 1 लाख 15 हजार 590 व्यक्तींनी पहिला डोस तर 76 हजार 581 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 1 लाख 34 हजार 384 नागरिकांनी पहिला डोस तर 83 हजार 387 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 1 लाख79 हजार 494जणांनी पहिला डोस तर 45 हजार 916 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 6 लाख 71 हजार 531 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 6 लाख 56 हजार 520 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 4 लाख 97 हजार 480 लसी या कोविशिल्डच्या तर 1 लाख 59 हजार 40 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 5 लाख 13 हजार 150 कोविशिल्ड आणि 1 लाख 58 हजार 381 कोवॅक्सिन असे मिळून 6 लाख 71 हजार 531 डोस देण्यात आले ...

आजअखेर 48 हजार 964 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 202 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.) – आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपाताळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.200 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुोलाजवळ वाघोटन नदीची पातळी 2.700 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.) - तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 423.7950 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 94.73 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 8.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर - 87.9500, अरुणा - 78.9433, कोर्ले- सातंडी - 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6480, नाधवडे – 2.8783, ओटाव – 3.9468, देंदोनवाडी – 1.0040, तरंदळे – 3.8630, आडेली – 1.2880, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 3.2000, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 2.4060, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 2.2840, दाभाचीवाडी – 2.4210, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.3850, धामापूर – 2.4410, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 1.324, ओझरम – 1.819, पोईप – 0.717, शिरगाव – 1.325, तिथवली – 1.7230, लोरे – 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे. 00000

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.) – आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपाताळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.200 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुोलाजवळ वाघोटन नदीची पातळी 2.700 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

आजअखेर 48 हजार 887 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 217 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 69.4 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 22 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 69.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 46.675 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3730.5325 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 29(3648), सावंतवाडी - 28(4027.1), वेंगुर्ला - 69.4(2985.2) कुडाळ - 63(3630), मालवण - 56(4009.96), कणकवली - 50(4076), देवगड - 47(3226), वैभववाडी - 31(4242) पाऊस झाला आहे. 00000

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 22 (जि.मा.का.) - तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 421.9380 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 94.32 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 28.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर - 87.1310, अरुणा - 78.9172, कोर्ले- सातंडी - 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6480, नाधवडे – 2.7633, ओटाव – 3.6463, देंदोनवाडी – 0.9080, तरंदळे – 3.7410, आडेली – 1.2880, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 3.2000, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 2.4060, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 2.2840, दाभाचीवाडी – 2.4210, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.3850, धामापूर – 2.4410, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 1.324, ओझरम – 1.819, पोईप – 0.717, शिरगाव – 1.325, तिथवली – 1.7230, लोरे – 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे. 00000

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 22 (जि.मा.का.) – आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपाताळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.200 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुोलाजवळ वाघोटन नदीची पातळी 2.900 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

आजअखेर 48 हजार 783 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 292 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांच्या पालकांना महिला व बाल विकास कार्यालयातर्फे मार्गदर्शन

सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.) – कोविड 19 मुळे एक पालक व दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या पालकांना महिला व बाल विकास कार्यालयातर्फे बाल संगोपन योजना तसेच कोविडच्या अनुषंगाने पूर्ण अनाथ झालेल्या कुटुंबांना आर्थिक लाभाबाबात समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळे, जिल्हा परिविक्षा अधिकारी भिकाजी काटकर, संस्था बाह्य संरक्षण अधिकारी दीपिका सावंत आदी उपस्थित होते. यावेळी एक व दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना व त्यांच्या पालकांना दत्तक बाल संगोपन, अनाथ प्रमाणपत्र, शैक्षणिक शुल्क माफी, बँक खाते यासह महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले. या बालक व पालकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. रसाळ यांनी केले. 00000

कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 44 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 44 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 21.625 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3683.8575 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 07(3619), सावंतवाडी - 16(3999.1), वेंगुर्ला - 25(2915.8) कुडाळ - 44(3567), मालवण - 12(3953.96), कणकवली - 19(4026), देवगड - 14(3179), वैभववाडी - 36(4211) पाऊस झाला आहे. 00000

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.) - तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 418.6870 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 93.59 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 23.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर - 86.8570, अरुणा - 78.8736, कोर्ले- सातंडी - 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6480, नाधवडे – 2.3870, ओटाव – 3.3398, देंदोनवाडी – 0.8760, तरंदळे – 3.6790, आडेली – 1.2880, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 3.2000, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 2.4060, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 2.2840, दाभाचीवाडी – 2.4210, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.3850, धामापूर – 2.4410, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 1.324, ओझरम – 1.819, पोईप – 0.717, शिरगाव – 1.336, तिथवली – 1.7230, लोरे – 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे. 00000

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.) – आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपाताळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.200 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.000 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुोलाजवळ वाघोटन नदीची पातळी 2.700 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

आजअखेर 48 हजार 724 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 334 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

भगवान महावीर पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का.): भगवान महावीर फाऊडेशन तर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या भगवान महावीर पुरस्कारासाठी इच्छूक उमेदवारांकडून नामनिर्देशने मागविण्यात आलेली असून या संस्थेमार्फत दरवर्षी सामाजिक विकासाकरिता अतुलनीय कामगिरी करणाऱ्या नि:स्वार्थी लोकांना अहिंसा व शाकाहार, शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र व सामाजसेवा अशा 4 क्षेत्रांसाठी प्रोत्साहानात्मक पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याची अंमिम तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे. पुरस्काराचे स्वरुप रुपये 10 लाख, मानपत्र व सन्माचिन्ह असे आहे. तरी इच्छुक उमेदवार, संस्था यांनी अधिक माहितीसाठी www.bmfawards.org या वेबसाईटला भेट द्यावी अथवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय 02362 228869 येथे संपर्क साधावा असे आवाहन व्ही.सी. म्हात्रे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे. --

जिल्हा माहिला व बालविकास अधिकारीपदी सोमनाथ रसाळ रुजू

Image
सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का.) – जिल्ह्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी पदावर सोमनाथ रसाळ आज रुजू झाले. यापूर्वी त्यांनी जिल्हा कार्यक्रम अधिकारी म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषद येथे कामकाज केले आहे. त्यापूर्वी ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी म्हणूनही काही महिने कार्यभार सांभाळला आहे. सर्वांनी मिळून जिल्ह्यातील वंचीत, पीडित महिला व बालकांसाठी काम करुया, असे आवाहन त्यांनी यावेळी कार्यालयातील उपस्थितांना केले. यावेळी प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे, जिल्हा पर्यावेक्षण अधिकारी बी.जी.काटकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळे, विधी सल्लागार श्रीनिधी देशपांडे, वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक पुजा काजरेकर, समुपदेशक रुपाली प्रभू, कार्यालयातील कर्मचारी संजय पवार, संगीता माळी आदी उपस्थित होते. * सोबत फोटो जोडला आहे. 00000