पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी, दि. 3 (जि.मा.का.) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 4, 5 व 6 जून 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार दिनांक 4 जून 2023 रोजी सकाळी 6.50 वाजता गोवा (दाबोलिम) विमानतळ येथे आगमन व केसरी ता.सावंतवाडी जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 9 वाजता केसरी ता. सावंतवाडी येथे आगमन व राखीव. सोमवार दि. 5 जून 2023 रोजी केसरी ता. सावंतवाडी येथे राखीव. मंगळवार दिनांक 6 जून 2023 सकाळी 8 वाजता केसरी ता. सावंतवाडी येथून कुडाळ कडे प्रयाण. सकाळी 9.30 कुडाळ येथे आगमन व राखीव. सकाळी 11 ते 1 वाजता ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ:- कुडाळ हास्कूल कुडाळ. दुपारी 1 वाजता कुडाळ येथून ओरसकडे प्रयाण. दुपारी 1.30 वाजता ओरोस येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वाजता डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत बैठक स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस दुपारी 2.30 वाजता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पंतप्रधान ग्रामसडक योजना अंतर्गत कामांचा आढावा. स्थळ : - जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस दुपारी 3 वाजता जिल्हा क्रीडा संकुल समिती बैठक स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस. रात्री 7.30 वाजता ओरोस येथून मोपा (गोवा) विमानतळकडे प्रयाण. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'