Posts

Showing posts from February, 2023

विभागीय चाचा नेहरु बाल महोत्सवात निरीक्षणगृह व बालगृह संस्थेतील बालकांचे दैदीप्यमान यश - अधीक्षक बी.जी. काटकर

सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.) : मुंबई येथे पार पडलेल्या विभागीय चाचा नेहरु बाल महोत्सवात जिल्ह्यातील चैतन्य परब गोळाफेक प्रथम क्रमांक, आदित्य राठोड (न्यु इंग्लिश स्कुल ओरोस) 100 मीटर धावणे प्रथम क्रमांक, निहीत मालवणकर व आदित्य राठोड कॅरम स्पर्धा व्दितीय क्रमांक, तसेच स्वराज पाटील (डॉन बॉस्को स्कुल ओरोस) याने वक्तृत्व स्पर्धमध्ये तृतीय क्रमांक पटकावला ही सर्व मुले शासकिय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह ओरोस या संस्थेतील आहेत.या सर्व बालकांनी बालमहोत्सवात दैदीप्यमान यश संपादन केले आहे, अशी माहिती शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृहाचे अधीक्षक बी.जी. काटकर यांनी दिली. विभागीय चाचा नेहरु बाल महोत्सव सन 2022-23 चे दि.23 फेब्रुवारी ते दि.25 फेब्रुवारी या कालावधीत दि चिल्ड्रेन एड सोसायटी संचलित चेंबुर चिल्ड्रेन्स होम, मानखुर्द मुंबई येथे विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास विभाग, कोकण विभाग, मुलुंड-मुंबई यांनी आयोजन केले होते. या बालमहोत्सव मध्ये कोकण विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील बालगृह व निरीक्षणगृह संस्थानी ...

सरोगसी नियमन कायदा 2021 व सहायक प्रजनन नियमन कायद्यातर्गंत नवीन केंद्र धारकांनी नॅशनल रजिस्ट्री पोर्टलवर नोंदणी करा- डॉ. बी.एस.नागरगोजे

सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.) : सरोगसी नियमन कायदा 2021 व सहायक प्रजनन नियमन कायद्यातर्गंत नवीन केंद्र धारकांनी तसेच ज्या केंद्रांची पूर्व नोंदणी पीसीपीएनडीटी कायद्यातर्गंत होती त्यांनी नॅशनल रजिस्ट्री पोर्टलवर https://registry.artsurrogacy.gov.in/ वर नोंदणी करणे बंधनकारक आहे त्यानुसार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.एस.नागरगोजे यांनी केले. गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र (लींग निवडीस प्रतिबंध कायदा 1994) सल्लागार समितीची बैठक आज झाली. बैठकीला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. जयसिंह रावराणे, डॉ. राजेश नवांगुळ, सचिन परुळकर, डॉ. सतीश पवार उपस्थित होते. वकील दिमख धुरी यांनी सर्वांचे स्वागत करुन विषय वाचन केले. गर्भलिंग निदान करणे हा पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे.गर्भलिंग निदान करणाऱ्यास तीन वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा व दहा हजार रुपये पर्यंत दंड याबाबतची तरतूद कायद्यामध्ये आहे.जर कोणतीही व्यक्ती, डॉक्टर गर्भलिंग निदान करीत असल्यास तात्काळ त्याबाबतची तक्रार जवळच्या ग्रामीण किंवा उपजिल्हा...

अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी 13 मार्च पर्यंत अर्ज सादर करा

सिंधुदुर्गनगरी दि. 28 (जि.मा.का) : मालवण तालुक्यातर्गंत अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी रिक्त पदासाठी संबंधित ग्रामपंचायत महसूल गावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत १३ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत (सार्वजनिक सुट्या वगळून) बाल विकास प्रकल्प अधिकारी,एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प मालवण यांच्या कार्यालयाकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन मालवण एकात्मिक बालविकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे. एकूण ७१ पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज स्वतःची स्वाक्षरी करून अर्ज सादर करणे आवश्यक आहे. (सोबत अर्जाचा नमुना) लहान कुटुंबाबाबत प्रतिज्ञापत्र जोडणे अनिवार्य आहे. अर्जासोबत जन्म नोंदीचा दाखला / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, सरपंचयांच्याकडील कायम रहिवाशी दाखला विवाहित असल्यास विवाह नोंदणी दाखला, तसेच खाली दर्शविले प्रमाणे अ ते फ पर्यत आवश्यक प्रमाणपत्राच्या सत्यप्रती करून जोडणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता- अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका पदासाठी १२ वी उत्ती...

शिष्यलवृत्तीि नवीन अर्ज नोंदणी व जुन्या अर्जाचे नुतनीकरणासाठी 15 मार्चपर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.) : भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी महाडिबीटी प्रणालीवर सन 2022-23 करिता महाविद्यालयातील अनु. जाती, इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवगासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नुतनीकरण करण्यासाठी 15 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे. भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नुतनीकरण्याची प्रक्रीया शासनाच्या आपले सरकार पोर्टलवरील https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सुरु आहे. जिल्हयातील सर्व कनिष्ठ ,वरिष्ठ महाविद्यालये तसेच संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य, विद्यार्थी व पालक यांना आवाहन करणेत येते की, जे विद्यार्थी स्कॉलरशिप योजनेपासून वंचित असतील अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जांचे नुतनीकरण त्वरीत करुन घ्यावेत. विद्यार्थ्यांचे अर्ज वेळेत भरून घेण्याची जबाबदारी संबधित महाविद्यालयाची आहे. महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले अर्जांची छाननी क...

बॅ. नाथ पै कॉलेज, पडोस येथे युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दि. 27 (जि.मा.का) : नेहरू युवा केंद्रच्या माध्यमातून बॅ. नाथ पै कॉलेज पडोस येथे युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन भारत सरकार युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र यांच्यामार्फत पडोस युवा संसद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. G20 राष्ट्रगटाचे अध्यक्षपद भारताकडे आल्याच्या निमित्ताने वसुधैव कुटुंबकम् एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य या पडोस युवा संसद योजने अंतर्गत संसदेचे आयोजन G20 च्या थीमवर करण्यात आले होते. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी युवांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन कुडाळ तहसीलदार अमोल पाठक, कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण धी कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. जिल्हा युवा अधिकारी मोहित कुमार सैनी यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक मांडले. यावेळी कसाल हायस्कूलचे प्राध्यापक शंकरराव कोकितकर यांनी व्यक्तिमत्व विकास याविषयी मार्गदर्शन करताना युवानी नव्या भारताचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम व्हावे, असे आवाहन केले. भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद देवधर यांनी Li...

मराठी भाषा गौरव दिन साजरा कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

सिंधुदुर्गनगरी दि. 27 (जि.मा.का) : मराठी भाषा गौरव दिनानिमीत्त जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा ग्रंथालय, यांच्या संयुक्त विद्यमानाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, यांच्या हस्ते ज्येष्ठ कवी वी.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अविशकुमार सोनोने, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, संदिप शिंदे, प्रतिभा ताटे व किशोर कांबळे यावेळी उपस्थित होते. मराठी भाषा व ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी भाषा साहित्यिक यांच्या ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन जिल्हा ग्रंथालय येथे करण्यात आले आहे. सदरचे प्रदर्शन सर्वांसाठी दि. 1 मार्च 2023 पर्यंत खुले राहणार आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमीत्त जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत ही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून शाळा वाचनालयात कथाकथन, मराठी गाण्यांच्या गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मराठी भाषेचे विविध प्रकारचे फलक लावून प्रसिध्दी करण्यात आली. त...

आरोग्यम् धनसंपदा हा सुविचार न राहता अंमल आवश्यक -आहार सल्लागार आनंद कुलकर्णी

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) : जगण्यासाठी पैसा लागतो पण पैसा नसेल तर जगता येत नाही असे अजिबात नाही. पैसा मिळविण्याच्या नादात आरोग्याचा किती बळी देतोय याचा हिशोब आपण कधी मांडणार आहोत की नाही? आरोग्यम् धनसंपदा हा केवळ सुविचार न राहता त्याचा खरा अंमल आवश्यक आहे, असे मौलीक मार्गदर्शन निसर्गोपचार, योग आहार शास्त्र सल्लागार आनंद कुलकर्णी यांनी केले. महिला व बाल विकास विभाग,महाराष्ट्र शासन अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाच्यावतीने 48 वा वर्धापन दिन सावंतवाडी येथील, काझी शहाबुद्दीन बहुउद्देशीय सभागृहात झाला. यावेळी आहार, योगाचे महत्त्व व ताणतणाव व्यवस्थापन या विषयावर श्री. कुलकर्णी मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्ज्वलाने झाली. यावेळी नाबार्ड जिल्हा प्रबंधक अजय थुटे, जिल्हा उद्योग केंद्रचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले, महिला व बाल विकास कार्यालयाचे संजय पवार, लुपिन फौंडेशनचे प्रकल्प अधिकार...

धान खरेदीसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी दि. 24 (जि.मा.का) : जिल्ह्यामध्ये शासकीय आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत माहे नोव्हेंबर 2022 पासून एकूण 39 धान खरेदी केंद्रावर धान खरेदी सुरु असून शासनाकडुन धान खरेदीसाठी दिनांक 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत अंतीम मुदतवाढ देण्यात आलेली आहे. शासनकाडून धान खरेदीची मुदत दिनांक 15 फेब्रुवारी 2023 अखेर देण्यात आलेली होती. शासनाकडुन यापुढे धान खरेदीस मुदतवाढ मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर नोंदणी केली आहे. त्या शेतकऱ्यांनी तात्काळ आपले धान खरेदी केंद्रावर विक्री करावे, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल देसाई यांनी केले आहे. 0000

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योंजनेसाठी 10 मार्च पर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी दि. 24 (जि.मा.का) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज ऑफलाईन पध्दीतीने भरण्यासाठी दिनांक 10 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्याच्या ठिकाणांच्या महाविद्यालयातील अनुचुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील गरजू विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन समाज कल्याणाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरीता जिल्हाच्या ठिकाणातील हद्दीपासून 05 कि.मी. परिसरात असलेल्या महाविद्यालयातील इ.11 वी व इ. 12 वी तसेच इ. 11 वी व इ.12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज ऑफलाईन (मॅन्युअली) पध्दतीने वाटप व स्विकृती करण्याची मुदतवाढ दि.10 मार्च 2023 अखेर करण्यात येत आहे. या विहित नमुन्यातील अर्ज या कार्यालयात व या कार्यालयाच्या अधिनस्त कार्यरत असलेल्या वसतिगृहात विनामूल्य उपलब्ध आहेत.अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त समाज कल्याण सिंधुदुर्ग या कार्यालयाकडे दूरध्वनी क्...

राष्ट्रीय युवा स्वयंसेवक पदासाठी ९ मार्चपर्यंत अर्ज करा

सिंधुदुर्गनगरी दि. 24 (जि.मा.का) : भारत सरकार युवा कार्य क्रीडा मंत्रालयतर्फे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक (National Youth Volunteers) या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील युवक व युवतीनी www.nyks.nic.in या वेबसाईटवर ऑनलाईन व नेहरु युवा केंद्र ओरोस येथे ऑफलाईन अर्ज ९ मार्च २०२३ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक यांनी केले आहे. या पदासाठी शिक्षण कमीत कमी १० वी पास व वयोमर्यादा दिनांक ०१/०४/२०२३ रोजी १८ पेक्षा जास्त व २९ पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. अर्जदार नियमित विद्यार्थी किंवा नोकरी कामगार असू नये. राष्ट्रीय युवा स्वयंसेवक मानधन दर महा रु.५०००/-आहे. स्वयंसेवक हा त्याच तालुक्यातील रहिवाशी असावा. पगाराची नोकरी नाही किंवा स्वयंसेवक कायदेशीररित्या सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या रोजगाराचा दावा करण्यास पात्र नसेल. अधिक माहिती व अर्ज www.nyks.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सदर करण्याची अंतिम तारीख ९ मार्च २०२३ असेल अधिक माहितीसाठी नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग येथे कार्यालयीन वेळेमध्ये (सकाळी ...

अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमासाठी 31 मार्चपर्यंत अर्ज सादर करा - प्र.प्राचार्य बी.पी.सोनवणे

सिंधुदुर्गनगरी दि. 23 (जि.मा.का) : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत बेरोजगार अल्पसंख्यांक युवक-युवतींसाठी Technician Instrumentation या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमासाठी 31 मार्च 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन दोडामार्गचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्र.प्राचार्य बी.पी.सोनवणे यांनी केले आहे. अभ्यासक्रम 420 तासांचा असून, अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण पूर्णतः निशुल्क आहे. अभ्यासक्रमाची प्रवेश पात्रता 10 वी पास आहे. अभ्यासक्रम हा NSQF level 4 चा असून मुस्लीम, शीख, पारसी, जैन, बुद्धिष्ठ व ख्रिश्चन इ. अल्पसंख्यांक उमेदवार हे या प्रशिक्षण प्रवेशास पात्र असतील. 10 वी गुणपत्रिका झेरॉक्स, अल्पसंख्यांक असल्याचा पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड व 2 पासपोर्ट साईज फोटो इ. कागदपत्रे प्रवेशासाठी आवश्यक आहेत. 1 एप्रिल 2023 पासून या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण सुरु होत आहे. प्रवेश मर्यादा 30 उमेदवार आहे. या प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी प्रशिक्षण समन्वयक आर. डी. जानवेकर मोब नं ९४२२४२७८३४ आणि एस. के चारी मोब. नं ८२६३८९८३८५ यांच्याशी संपर्क करावा...

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि. 23 (जि.मा.का) : वीरशैव- लिंगायत समाजाच्या सर्वागीण विकासाकरीता काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थेला महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी इच्छुक पात्रताधारक व्यक्ती य संस्थेने जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून 10 दिवसांच्या आत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयामध्ये रीतसर अर्ज करावेत. असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्टया विकास होण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, कलात्मक, सांस्कृतिक, समाज प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधनकार व समाज सेवक व त्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थानी विहीत नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालय येथे सादर करावा. अर्जाचा नमुना शासकीय सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत उपलब्ध होतील. तसेच अर्ज मुदतीतच सादर करावेत. उशिरा आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. व्यक्तीकरिता पात्रता:- योजनेनुसार वीरशैव लिंगायत समाजाकरीता समाज कल...

अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी 13 मार्च पर्यंत अर्ज सादर करा - बाल विकास प्रकल्प अधिकारी संध्या मोरे

सिंधुदुर्गनगरी दि. 23 (जि.मा.का) : सावंतवाडी तालुक्यातर्गंत अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदासाठी संबंधित ग्रामपंचायत महसूल गावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत १३ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत (सार्वजनिक सुट्या वगळून) बाल विकास प्रकल्प अधिकारी,एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प सावंतवाडी यांच्या कार्यालयाकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन सावंतवाडी एकात्मिक बालविकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी संध्या मोरे यांनी केले आहे. भरती प्रक्रीया ग्रामपंचायत कारिवडे, सावरवाड, चराठे, डिंगणे, पाडलोस, आजगाव, सरमळे, चौकूळ, इन्सुली, कुणकेरी, शेर्ले, निगुडे, बांदा, वेर्ले, आंबेगाव, माडखोल, तळवडे, निरवडे, मळगाव, आरोस, सोनुर्ली, गाळेल, वाफोली, तांबोळी, मडुरा या ग्रामपंचायत क्षेत्रातील असलेल्या अंगणवाडीतील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. 00000

जिल्ह्यात 4 मार्चपर्यंत मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का) : जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी. यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी, त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार दिनांक 4 मार्च 2023 रोजी 24.00 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते राज्यभरात आक्रमक झालेले असून काही राजकीय पक्षातील प्रतिस्पर्धी गट आपआपल्या कार्यकर्त्यांची जमवाजमव करुन एकमेकांना लक्ष्य करत असून त्यातून काही ठिकाणी आंदोलनात्मक घटना घडलेल्या आहेत. त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोकण विभागीय मंडळातर्फे फेब्रुवारी -मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी इयत्ता 12 वी उच्च माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र परीक्षा 2023 दिनांक 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 रोजीचे कालावधीत व इयत्ता 10 वी माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र परीक्षा 2023 दिनांक 2 मार्च ते 25 मार्च 2023 रोजीच्...

अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक संशयास्पद पार्सलची अचानकपणे तपासणी करावी - उपजिल्हाधिकारी अविशकुमार सोनोने

सिंधुदुर्गनगरी,दि.21 (जि.मा.का.) : अंमली पदार्थ खासगी कुरीयरने तसेच पोस्टाव्दारे देवाण-घेवाण करण्याची शक्यता गृहित धरुन अशा संशयास्पद पार्सलची अचानकपणे तपासणी करावी. यासाठी हॅन्डीस्कॅनर आवश्यक त्या ठिकाणी डॉग स्कॉडचाही वापर करावा, असे निर्देश उपजिल्हाधिकारी अविशकुमार सोनोने यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय नार्को कोऑडीनेशन सेंटर व जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची एकत्रित बैठक आज झाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक संदीप भोसले यांनी सर्वांचे स्वागत करुन विषय वाचन केले. तसेच विभाग निहाय आढावा घेतला. अंमली पदार्थ प्रतिबंधात्मक उपाय-योजना अंमलबजावणीबाबत गृह विभाग व सर्व संबंधित विभागाव्दारे सुरु असलेल्या कामाची माहिती दिली. उपजिल्हाधिकारी श्री. सोनोने म्हणाले, जिल्ह्यामध्ये सध्या ई-पिक पहाणी ॲपवर पीक नोंदणीचे काम सुरु आहे. ई-पीक नोंदणी करताना गांजा लागवड झाली असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांनी तात्काळ यंत्रणांना कळवावे. अंमली पदार्थाच्या सेवनाच्या दुष्पपरिणामांची माहिती व्हावी, यासाठी शाळा- महाविद्यालयांमध्ये जनजागृती करण्यात यावी....

अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप निवेदन संकेस्थळावरुन ऑनलाईन स्वरुपात नोंदवा - शिक्षणाधिकारी (प्राथमिक) महेश धोत्रे

सिंधुदुर्गनगरी, दि.20 (जि.मा.का.): पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.8 वी दि. 12 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे-1 या कार्यालयामार्फत घेण्यात आली. परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम उत्तरसुची परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेस्थळावर या परीक्षेचे परीक्षार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात आली आहे. अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप नोंदविण्याची कार्यपध्दती या अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन संकेस्थळावरुन ऑनलाईन स्वरुपात करता येईल. अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) महेश धोत्रे यांनी केले आहे. ऑनलाईन निवेदन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये Objection on Question paper & Interim Answer key या हेडिंगखाली उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. त्रुटी,आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरीता दि.17 ते 23 फेब्रुवारी रोजी- पर्यंत मुदत देण्यात येत आहे. दि. 23 फेब्रुवारी नंतर त्रुटी, आक...

निर्लेखित जडसंग्रह साहित्य खरेदी दरपत्रक 4 मार्च पर्यंत सादर करा

सिंधुदुर्गनगरी, दि.20 (जि.मा.का.): फोंडाघाट येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कार्यालयातील विविध प्रकारच्या निर्लेखित जडसंग्रह साहित्याची दरपत्रक पध्दतीने विक्री करावयाची आहे. साहित्य ज्या खरेदीदारास विकत घ्यावयाचे आहे. त्यांनी या कार्यालयात दिनांक 4 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत दरपत्रक सिलबंद लिफाप्यात पाठविण्यात यावीत. अशी माहिती फोंडाघाट येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थचे प्राचार्य यांनी दिली आहे. निविदेच्या बंद लिफाप्यावर स्वच्छ अक्षरात लॉट घेणाऱ्याचे नांव व संपूर्ण पत्ता नमूद करावा. दि. 4 मार्च नंतर आलेल्या निविदांच्या स्विकार केला जाणार नाही. निविदा दि.9 मार्च रोजी दुपारी 11 वाजता उघडण्यात येतील. या निर्लेखित जडसंग्रह साहित्य आहे त्या स्थितीत आपल्या स्वखार्चाने नेण्याची व्यवस्था करावी. अटी व शर्ती ज्या खरेदीदाराच्या साहित्याचा दर जास्त असेल अशा पात्र खरेदीदारास सदरहू साहित्याची विक्री केली जाईल. ज्याचा दर मंजूर होईल त्यांना ताबडतोब योग्य रक्कम भरुन साहित्य स्वखर्चाने घेवून जावे लागेल. कोणतीही निविदा राखून ठेवण्याचा आणि विक्री रद्द करण्याचा तसेच दरपत्रक स्वीकारणे अथवा न...

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनचे उद्घाटन पत्रकार भवन पत्रकारांना प्रेरणा व ऊर्जा देणारे बाळशास्त्री जांभेकरांच्या पत्रकारितेचा वारसा पुढे नेऊया - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Image
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि.20 - मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा पुढे नेण्याचे काम पत्रकारांनी करावे. हे पत्रकार भवन पत्रकारांना प्रेरणा व ऊर्जा देणारे ठरेल. या ज्ञान मंदिराचे पावित्र्यं जतन करुन बाळशास्त्री जांभेकराच्या पत्रकारितेचा वारसा पुढे नेऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीव्दारे सहभागी होत आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनच्या उद्घाटन प्रसंगी केले. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनाचे उद्घाटन आज झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृश्य प्रणालीव्दारे शुभेच्छा देताना म्हणाले, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण मधून मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. सामाजिक सुधारणेवर भर दिला. त्यांचं स्मारक मराठी पत्रकारांना, भावी पत्रकारांना प्रेरणा देणारं ऊर्जा देणारं ठरेल. ज्ञान मंदिर बनवून त्याचं पावित्र्यं जतन करुया. त्यांचा वारसा पुढे नेण्याचे काम पत्रकारांना करायचे आहे. हे स्मारक त्यासाठी प्रेरणा आणि स्फूर्ती देणारं ठरेल. भविष्यातही जे जे आवश्यक ...

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनचे उद्घाटन पत्रकार भवन पत्रकारांना प्रेरणा व ऊर्जा देणारे बाळशास्त्री जांभेकरांच्या पत्रकारितेचा वारसा पुढे नेऊया - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Image
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि.20 - मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा पुढे नेण्याचे काम पत्रकारांनी करावे. हे पत्रकार भवन पत्रकारांना प्रेरणा व ऊर्जा देणारे ठरेल. या ज्ञान मंदिराचे पावित्र्यं जतन करुन बाळशास्त्री जांभेकराच्या पत्रकारितेचा वारसा पुढे नेऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीव्दारे सहभागी होत आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनच्या उद्घाटन प्रसंगी केले. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनाचे उद्घाटन आज झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृश्य प्रणालीव्दारे शुभेच्छा देताना म्हणाले, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण मधून मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. सामाजिक सुधारणेवर भर दिला. त्यांचं स्मारक मराठी पत्रकारांना, भावी पत्रकारांना प्रेरणा देणारं ऊर्जा देणारं ठरेल. ज्ञान मंदिर बनवून त्याचं पावित्र्यं जतन करुया. त्यांचा वारसा पुढे नेण्याचे काम पत्रकारांना करायचे आहे. हे स्मारक त्यासाठी प्रेरणा आणि स्फूर्ती देणारं ठरेल. भविष्यातही जे जे आवश्यक आ...

शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास जिल्हाधिकाऱ्यांचे अभिवादन पोलीस बँडकडून ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ राज्यगीताची धून

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 19 - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. ओरोस फाटा येथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात ‘जय शिवाजी जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत कृषी महाविद्यालयाचे आणि गुरुकुल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत जिल्हाधिकाऱ्यांनी केले. यानंतर पोलीस बँड पथकाकडून ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताची धून वाजविण्यात आली. उपस्थितांनी देखील हे राज्यगीत म्हटले. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन केले. यानंतर पुष्पहार अर्पण करुन महाराजांना वंदन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक नितिन बगाटे, उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांनीही छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. उपजिल्हाधिकारी वर्षा शिंगण, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांच्...

छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनापासून महाराष्ट्राच्या राज्यगीताचा अंगीकार 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' महाराष्ट्राचे राज्यगीत

सिंधुदुर्गनगरी दि.18 (जि.मा.का):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राज्यातील तरूणाई तसेच समाजातील सर्वच नागरिकांना स्फूर्तीदायक असणारे जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा या कवीवर्य राजा निळकंठ बढे यांच्या गीतामधील दोन चरणांचे गीत महाराष्ट्राचे राज्य गीत म्हणून स्वीकारण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून हे गीत १९ फेब्रुवारी २०२३ पासून महाराष्ट्राचे राज्य गीत म्हणून अंगीकारण्यात येत आहे. हे राज्यगीत सुमारे १.४१ मिनिटात वाजविता किंवा गाता येईल. राज्य गीत गायन / वादनाच्या संदर्भातील औचित्याचे पालन करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. विचारार्थ राज्यगीत अंगीकारण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी राज्यगीताचा मान सन्मान व प्रतिष्ठा सर्वोच्च राहील. शासनाच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमात सुरूवातीला राज्यगीताचे गायन वादन हे ध्वनीमुद्रीत आवृत्तीसोबत अथवा स्वतंत्रपणे करण्यात यावे. १ मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत होताच राज्यगीत वाजविले अथवा गायले जाईल. राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरू होण्यापूर्वी...

वेंगुर्ला शहर नळ पाणी पुरवठा योजना टप्पा क्रमांक २ झुलता पुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

Image
सिंधुदुर्गनगरी दि.16 (जि.मा.का):- वेंगुर्ला शहर नळ पाणी पुरवठा योजना टप्पा क्रमांक २, निशाण धरणाची उंची २.५ मीटरने वाढविणे आणि वेंगुर्ला नवाबाग बीच येथील जलबांदेश्वर मंदिर जवळ बांधण्यात आलेल्या झुलता पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल,अधिक्षक अभियंता छाया नाईक,कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, उपविभागीय अभियंता संजय दहिफळे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, नागरिक व पर्यटक उपस्थित होते. माझा वेंगुर्ला पतंग महोत्सवाचे उद्घाटनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. ०००००

शिक्षकांच्या जुन्या पेन्शन बाबत सकारात्मक मध्यमार्ग काढू - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सिंधुदुर्गनगरी दि.16 (जि.मा.का):- शिक्षकांच्या जुन्या पेन्शन बाबत कायदेशीर, आर्थिक आणि तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक मध्यमार्ग काढू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन वेंगुर्ला येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७ व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनाची सुरुवात झाली. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्याध्यक्ष उदय शिंदे, माजी आमदार राजन तेली, निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, माजी राज्याध्यक्ष काळुजी बोरसे पाटील आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, वेंगुर्लामध्ये पार पडत असलेल्या दोन दिवसीय महाअधिवेशनात विचारमंथन होईल तसेच विचारांचे आदान-प्रदान होईल. त्यामुळे आपण या महाधिवेशनातून काहीतरी चांगलं घेऊन जाल. आपल्या राज्यात-देशात गुरुला फार महत्व आहे. आई-वडिलानंतर गुरुचं, शिक्षकांचं स्थान हे आयुष्यामध्ये ...

भेदभाव आणि असमानता याचा शोध घरापासून घेतला पाहिजे- आनंद पवार लिंग समभाव संचेतना कार्यशाळेचे कुडाळ येथे उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी, दि. 15(जि.मा.का.) : भेदभाव, असमानता हे शब्द जरी मोठे असले तरी या शब्दांचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे. आहे मुळात आपल्या घरापासून भेदभाव, असमानता याचा अर्थ आणि घरात होणाऱ्या घडामोडी यामधून शोधला पाहिजे, असे मत सम्यक संस्थेचे आणि जेंडर स्पेशालिस्ट सम्म्यक आनंद पवार यांनी येथे व्यक्त केले. महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र ग्रामीण उद्यम (नव तेजस्विनी) कार्यक्रमांतर्गत कुडाळ येथील दुर्वांकुर हॉल येथे पुरुष मास्टर ट्रेनर यांच्याकरिता लिंगसमभाव संचेतना या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन आज झाले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन आणि दीपप्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, जिल्हा परिविक्षा अधिकारी बी.जी.काटकर, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक नितीन काळे, स्वाधार सीएमआरसी संस्थेच्या अध्यक्ष मानसी धुरी तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संयोगिनी उपस्थित होत्या. कार्यशाळेचे मार्गदर्शक श्री.पवार म्हणाले, कुठेही परिवर्तन हे स्वतःच्या घरापासून सुरू होत असतं. लिंग समभाव संचेत...

नोंदणीकृत सेवा सोसायट्यांनी काम मिळण्याबाबतचे प्रस्ताव दिनांक 24 फेब्रुवारी पर्यंत सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी, दि.14 (जि.मा.का.): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे शिफारस पत्र घेऊन नाव नोंदणी झाल्या आहेत. अशा सेवा सोसायट्यांना कामाची आवश्यकता असल्यास काम मिळण्याबाबतचे प्रस्ताव दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सायं.5 वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयात स्वहस्ते सादर करावे. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त, यांनी केले आहे. आवश्यक अटी व शर्तीची पुर्तता करणे अनिवार्य आहे. उशिरा अर्ज प्राप्त झालेली तसेच अपुर्ण स्वरुपातील प्रस्ताव अपात्र ठरवून स्विकारण्यात येणार नाहीत यांची कृपया नोंद घ्यावी. बेरोजगारांच्य सहकारी सेवा सोसायट्याना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्दशाने रु.3 लाख इतक्या रक्कमेची कामे विनानिविदा उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे शासन निर्णय दि.11 डिसेंबर 2015 अन्वये जिल्हा स्तरावर काम वाटप समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने काम वाटप समितीकडे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयाकडून कंत्राटी कामाकरिता पत्रे प्राप्त झा...

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 20 फेब्रुवारी रोजी

सिंधुदुर्गनगरी, दि.14 (जि.मा.का.): माहे फेब्रुवारी 2023 चा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार दि.20 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 ते 1 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. तरी समस्याग्रस्त व पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग आपल्या अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांनी प्रश्न मांडून त्यांचे हक्कांचे संरक्षण व्हावे व त्यांना न्याय मिळावा या दृष्टीने महि्लांच्या तक्रारी व अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक होण्यासाठी महिला लोकशाही दिन हा एक उत्तम मार्ग आहे. अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी ओरोस येथून उपलब्धक करुन घ्यावेत. अर्ज स्विकृतीचे निकष-अर्ज विहीत नमुन्यात असावा. तक्रार, निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे असावे. तक्रार अर्ज दोन प्रतीत सादर करावा. पुढील विषयावरील अर्ज स्विकारले जाणार नाहीत,न्याय प्रविष्ठ प्रकरणे. विहीत नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्र न जोडलेले अर्ज. सेवा विषयक, ...

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची त्रैमासिक सभा 17 फेब्रुवारी रोजी

सिंधुदुर्गनगरी, दि.14 (जि.मा.का.): जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा समिती) समितीची त्रैमासिक सभा खासदार विनायक राऊत रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकस यंत्रणाचे प्रकल्प संचालक डॉ. उदय पाटील यांनी दिली आहे. 00000

खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्र अव्वल

सिंधुदुर्गनगरी, दि.13 (जि.मा.का.): देशातील प्रतिभासंपन्न युवा पिढीला त्यांचे क्रीडा कौशल्य प्रदर्शित करण्याकरीता हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत दरवर्षी खेलो इंडिया युथ गेम्स या क्रीडा स्पर्धेचे आयोजन देशात करण्यात येत आहे. या वर्षी 5 व्या खेलो इंडिया युथ गेम्स 2022-23 चे आयोजन मध्य प्रदेश राज्यामार्फत करण्यात आले. महाराष्ट्र राज्याने सहभाग घेतलेल्या एकूण 24 क्रौडा प्रकारांपैकी राज्यास 20 क्रीडा प्रकारामध्ये 56 सुर्वणपदके, 55 रौप्यपदके व 50 कांस्यपदके अशी एकुण 161 पदके प्राप्त झाली असून 5 व्या खेलो इंडिया. युथ गेम्समध्ये महाराष्ट्र राज्याने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करीत अव्वल स्थान प्राप्त केले आहे. मध्यप्रदेश मध्ये 08 व दिल्ली येथे 01 असे एकूण 09 ठिकाणी 27 क्रोडा प्रकाराच्या स्पर्धाचे दि. 30 जानेवारी ते 12 फेब्रुवारी 2023 या कालावधीत आयोजन करण्यात आले. 5व्या खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये समावेश करण्यात आलेल्या एकूण 27 क्रीडा प्रकारांपैकी महाराष्ट्र राज्याने 24 क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग नोंदविलेला होता. या 24 क्र...

यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कारांच्या नियमावलीत सुधारणा

सिंधुदुर्गनगरी, दि.13 (जि.मा.का.): मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०२२ करीता राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार स्पर्धेसाठीच्या प्रवेशिका पाठविण्यास २ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच या स्पर्धेच्या नियमावलीतील नियम क्रमांक २४ मध्ये बदल करण्यात आला असून या नियमात ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावरील शासन नियुक्त सदस्य वगळता इतरांना या पुरस्कारांसाठी पुस्तके सादर करता येतील’, अशी सुधारणा करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०२२ करीता राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय (मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून), महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली व पणजी, गोवा येथे तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात १ ते ३१ जानेवारी २०२३ पर्यंत पाठविता येणार होत्या. मात्र, या पु...

अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी 27 फेब्रुवारी पर्यंत अर्ज सादर करा - बालविकास प्रकल्प अधिकारी तारका साटम

सिंधुदुर्गनगरी, दि.13 (जि.मा.का.): दोडामार्ग तालुका अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील मानधनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस रिक्त पदासाठी संबंधित ग्रामपंचायत महसूल गावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवाराकडून दिनांक 27 फेब्रुवारी पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी तारका बाळाजी साटम यांनी केले आहे. सदर अर्ज सोमवार दिनांक 13 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत (सार्वजनिक सुट्या वगळून) कार्यालयीन वेळेत बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प दोडामार्ग कार्यालय यांजकडे स्विकारण्यात येणार आहेत. अधीक माहितीसाठी संबंधित सरपंच, गामपंपचायत कार्यालय व बाल विकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प कार्यालय दोडामार्ग 02363-256506,9421029556 दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. दोडामार्ग तालुका अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील मानधनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस रिक्त पदाची माहीती पुढीलप्रमाणे आहे. ग्रामपंचायतीचे नाव परमे- पणतुर्ली, महसूल गावाचे नाव, परमे, अंगणवाडी केंद्राची नाव परमे गावठण, रिक्त पद अंगणवाडी सेविका माधन 8 हजा...

महिलांचा संपत्तीवरील अधिकार विषयावर जागृती पर प्रशिक्षण संपन्न -जिल्हा समन्वय अधिकारी नितीन काळे

सिंधुदुर्गनगरी, दि.13 (जि.मा.का.): कणकवलीतील गोपुरी आश्रम येथे महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित अन्नपूर्णा लोकसंचालित साधन केंद्र देवगड आणि हिरकणी लोकसंचलीत साधन केंद्र, कणकवली व महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प (नव तेजस्विनी )अंतर्गत महिलांचा संपत्तीवरील अधिकार या विषयावर जागृती पर प्रशिक्षण संपन्न झाले. अशी माहिती माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी नितीन काळे यांनी दिली. यावेळी लेखाधिकारी श्रीमती.जमणे, कणकवली वकील संघटना कायदेविषयक ॲड. प्राजक्ता शिंदे, तसेच स्वाती तेली, उदयमती देसाई, देवरुखकर अधीक्षक पंचायत समिती कणकवली अनुजा ताई कुलकर्णी, तसेच कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम सावित्रीबाईंच्या फोटोला दीप प्रज्वलन आणि पुष्पहार अर्पण करून पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रशिक्षणामध्ये संयुक्त मालकी हक्क म्हणजे काय? विवाह नोंदणी कशी आणि कुठे करावी. वारसा हक्क कायदा, संयुक्त मालकी विषय परिपत्रक याबाबत अनुजाताई यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन हिरकणी व्यवस्थापीका सीमा गावंडे यांनी केले.

नाईट अंडर आर्म बॉक्स स्पर्धा उत्सहात संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि.13 (जि.मा.का.): जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांना रोजच्या दैनंदिन ताण तणावापासून काही काळ विरंगुळा मिळावा, त्यांच्यामध्ये सुसवांद व्हावा,एकोपा व्हावा, खिळाडू वृत्ती व कौशल्य याला वाव मिळावा. खेळाची भावना निर्माण व्हावी याकरिता सिंधुदुर्ग पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच मंत्रालयीन अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता अंडर आर्म बॉक्स स्पर्धाचे पोलीस परेड मैदान येथे आयोजन करण्यात आलेले होते. स्पर्धेमध्ये 22 संघांचे एकुण 176 खेळाडूंनी सहभाग घेतला. प्रत्येक संघामध्ये महिला 1 याप्रमाणे एकुण 22 महिलांनी सुध्दा भाग घेतलेला होता. या सर्व स्पर्धा उत्सहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये झालेल्या सामन्यांमधुन मोटार परिवहन विभाग, सिंधुदुर्ग व वैभववाडी पोलीस ठाणे यांची फायनलसाठी निवड झाली. अंतिम सामन्यांमध्ये वैभववाडी पोलीस ठाणे संघाने व मोटार परिवहन विभाग संघाचा पराजय करून विजेतेपद पटकावले. तर मोटार परिवहन विभाग संघ उप विजेता ठरला. एकंदरीत दोन दिवस चाललेल्या नाईट अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये विजेता संघ- वैभववाडी पोली...

कर्जाची एकरकमी परतफेड केल्यास ५० टक्के व्याज सवलतीचा लाभ - जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल

सिंधुदुर्गनगरी, दि. ९ (जि.मा.का.) : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ यांच्यामार्फत कर्ज घेतलेल्या कर्जाचा परतफेडीचा कालवधी संपलेल्या लाभार्थीसाठी महामंडळाकडून एकरकमी परतावा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार महामंडळाकडून घेतलेल्या मदुती कर्ज, बील भांडवल कर्ज, थेट कर्ज, या सर्व योजनांतर्गत असलेल्या थकीत कर्जाची एकरकमी परतफेड केल्यास व्याज रकमेत ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. अशी जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांनी दिली आहे. तरी संबधित सर्व कर्ज खातेधारकांना कळविण्यात येते की सदर योजना माहे मार्च २०२३ पर्यंतच असून या योजनेचा लाभ घेऊन थकीत कर्जाची परतफेड करावी व आपले कर्ज खाते बंद करावे, लाभार्थीने कर्ज खाते बंद केल्यावर महामंडळाच्या रुपये १०.०० लक्ष कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत विविध महामंडळाच्य योजनांचा लाभ घेता येईल. असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग येथे ०२३६२-२२८१५६/विजय पाटील मो.९०११२४२०३६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. 00000

कर्जाची एकरकमी परतफेड केल्यास थकीत व्याजावर 50 टक्के सवलत - जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल

सिंधुदुर्गनगरी, दि. ९ (जि.मा.का.) : इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ शामराव पेजे कोकण इतर मागास महामंडळ (ओबीसी महामंडळ) यांचेमार्फत कर्ज घेतलेल्या कर्जाचा परतफेडीचा कालावधी संपलेल्या लाभार्थीसाठी महामंडळाकडून एकरकमी परतावा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार महामंडळाकडून घेतलेल्या मुदती कर्ज,बीज भांडवल कर्ज, स्वर्णिमा कर्ज, मार्जिन मनी कर्ज, या सर्व योजनांतर्गत असलेल्या थकीत कर्जाची एकरकमी परतफेड केल्यास थकीत व्याज रकमेत 50 टक्के सवलतीचा लाभ घ्यावा. असे आवाहन शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विका महामंडळ मर्याचे जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांनी केले आहे. तरी संबंधित सर्व कर्ज खातेधारकांना कळविण्यात येते की सदर योजना माहे मार्च २०२३ पर्यंतच असून या योजनेचा लाभ घेऊन थकीत कर्जाची परतफेड करावी व आपले कर्ज खाते बंद करावे असे जिल्हा व्यवस्थापक प्रिती आर पटेल यांनी आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग येथे ०२३६२-२२८११९, ८६६८८९८९५० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा लाभार्थीने कर्ज खाते बंद केल्यावर महामंडळाच्या रूपये १०.०० लक्ष कर्ज व्याज परतावा योजनेत...

धान खरेदीला 15 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी, दि.9 (जि.मा.का.): जिल्ह्यामध्ये शासकीय आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गंत हंगाम 2022-23 मधील धान खरेदीला दि.15 फेब्रुवार पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी शासकीय धान खरेदी केंद्रावर नोंदणी केलेली आहे. अशा शेतकऱ्यांची तात्काळ धान खरेदी केंद्रावर विक्री करावे, असे आवाहन जिल्हा मार्केटींग अधिकारी अनिल देसाई यांनी केले आहे. माहे नोव्हेबर 2022 पासून एकुण 39 धान खरेदी केंद्रावर खरेदी सुरु असून शासनाकडून धान खरेदीची मुदत दिनांक 31 जानेवारी 2023 अखेर देण्यात आलेली होती. माहे जानेवारी 2023 अखेर जिल्ह्यातील 301 शेतकऱ्यांची धान खरेदी झालेली नाही. त्याकरीता शासनाकडून दिनांक 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. परंतू मागील दिनांक 3 फेब्रुवारी 2023 ते 8 फेब्रुवारी 2023 पर्यंत झालेली धान खरेदी पाहता धान खरेदीचे प्रमाण अत्यल्प आहे. शासनाकडून यापुढे धान खरेदीस मुदतवाढ मिळणार नाही. 00000

निपुण भारत अभियान यशस्वी होण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन करावे - कार्यकारी अधिकारी प्रजित नायर

सिंधुदुर्गनगरी, दि. ९ (जि.मा.का.) : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार पूर्व प्राथमिक ते इ.3 री पर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यास सन 2026-27 पर्यंत मूलभूत स्तरावर वाचन, लेखन व अंकगणिताच्या क्षमता प्राप्त करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार भारत सरकारने विपुण भारत अभियानाची सुरुवात केली आहे. निपुण भारत अभियान यशस्वी होण्यासाठी समाजाचा सहभागही आवश्यक आहे. याच उद्देशाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये शैक्षणिक ग्रामसभा आयोजित करण्यात येत आहे. सरपंच, ग्रामसेवक व जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांनी ग्रामसभेचे आयोजन करावयाचे आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली आहे. ग्रामसभा घेण्यापूर्वी शाळेतून इयत्तावार बालसभा व पालकसभा होणार असून पालक आपल्या मुलाची अध्ययन निष्पत्तीनुसार स्थिती जाणून घेतील. ग्रामसभेमध्ये निपुण भारत अभियान, शाळापूर्व शिक्षण, अध्ययन स्तर, अध्ययन निष्पत्ती, शाळेचा शैक्षणिक विकास आराखडा व भौतिक विकास आराखडा या विषयांवर चर्चा होणार आहे. या शैक्षणिक ग्रामसभेतून विकासाला पोषक ठरतील असे गाव पातळीवर काही निर्णय घेणे अपेक्षित ...

शिष्यवृत्ती नवीन अर्ज नोंदणी जुन्या अर्जाचे नुतनीकरणांसाठी 15फेब्रुवारी पर्यंत मुदवाढ

सिंधुदुर्गनगरी, दि. ९ (जि.मा.का.) : भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी महाडिबीटी प्रणालीवर सन 2022-23 करिता भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नुतनीकरण करण्यासाठी महाविद्यालयातील अनु. जाती, इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवगासाठी 15 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे,अशी माहिती जिल्हा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे. भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नुतनीकरण्याची प्रक्रीया शासनाच्या आपले सरकार पोर्टलवरील https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सुरु आहे. जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ ,वरिष्ठ महाविद्यालये तसेच संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य, विद्यार्थी व पालक यांना आवाहन करण्यात येते की, जे विद्यार्थी स्कॉलरशिप योजनेपासून वंचित असतील अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जांचे नुतनीकरण त्वरीत करुन घ्यावेत. वेळेत विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्याची जबाबदारी संबधित महाविद्यालयाची आहे. महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले अर्जांची छाननी ...