मालवण बंदरा येथील पोर्टा केबिनचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

सागरी सुरक्षेच्या दृष्टीने देखरेख ठेवण्याच्या दृष्टीने पोर्टा केबिन उपयुक्त सिंधुदुर्गनगरी दि. 31 (जिमाका): मालवण बंदर (जेट्टी) येथील सागरी गस्ती केंद्राच्या पोर्टा केबिनचे उद्घाटन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे पहिले पोर्टा केबिन असून यापुढे जिल्ह्यातील १४ संवेदनशील ठिकाणी पोर्टा केबिन बसवण्यात येणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, सागरी सुरक्षा शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम तसेच पोलीस विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते. मालवण बंदर हे संवेदनशील लँडिंग पॉईंट असून या ठिकाणी बोटींची ये - जा मोठ्या प्रमाणात सुरु असते. तसेच या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देत असतात. त्यामुळे सागरी सुरक्षेच्या दृष्टीने सागरी भागावर देखरेख ठेवण्यासाठी आणि सतर्कता निर्माण करण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशिक्षित मरीन होमगार्ड व सुरक्षा वॉर्डन यांच्यासाठी मालवण बंदर येथे पोर्टा केबिन बसवण्यात आले आहे. oooooo

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'