जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मुलांसाठी बालस्नेही कायदेशीर सेवा कार्यक्रम साजरा

सिंधुदुर्गनगरी (जिमाका) दि. 24: विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने भ. ता. चव्हाण हायस्कूल, चौके येथे मुलांसाठी बालस्नेही कायदेशीर सेवा योजना-2024 या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास पॅनल विधीज्ञ अॅड. हेमश्री तोरसकर, मुख्याध्यापिका रसिका गोसावी , शिक्षकवृंद, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कंत्राटी लिपिक श्वेता सावंत, विधी स्वयंसेवक हरी पांगम तसेच विधी स्वयंसेवक श्रावणी गावडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात करताना श्वेता सावंत यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध मोफत कायदेशीर सेवा, सहाय्य तसेच बालस्नेही कायदेशीर सेवा योजना-2024 विषयी माहिती दिली. यावेळी अॅड. हेमश्री तोरसकर यांनी बालकांचे हक्क संरक्षित करण्यासाठी, गरजू बालकांना मोफत व वेळेवर कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यासाठी तसेच त्यांचे कायदेशीर संरक्षण सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने बालस्नेही कायदेशीर सेवा योजना-2024 राबविण्यात येत असल्याचे सांगितले. न्यायदान व्यवस्थेत बालस्नेही व सुरक्षित वातावरण तयार केले आहे. जेणेकरुन मुले न घाबरता आपले मत मांडू शकतील याबाबत माहिती दिली तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक दत्तप्रसाद परूळेकर यांनी केले. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'