शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आरोग्य शिबिराचे आयोजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का):- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेसाठी आरोग्य तपासणी व विशेष आरोग्य शिबिर अभियानाचे आयोजन केले आहे. या शिबिराचे उद्घाटनपालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते दिनांक 22 जुलै 2026 रोजी सकाळी 9 वाजता बाह्यरुग्ण विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे होणार आहे. तसेच या शिबिरास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, लोकसभा सदस्य नारायण राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार सर्वश्री निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, प्रमोद जठार, अनिकेत तटकरे, दिपक केसरकर, निलेश राणे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम साईल, कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलींद नाईक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाचे सचिव धीरज कुमार, वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुषचे आयुक्त अनिल भंडारी, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांच्या विशेष उपस्थितीत हे शिबीर होणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांनी केले आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'