अजित पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तसेच त्यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन 22 जुलै ते 1 ऑगस्ट : आरोग्य तपासणी व जनजागृतीचा विशेष उपक्रम नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का):- वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने अजित पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तसेच त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नित रुग्णालयांमध्ये दि. 22 जुलै ते 1 ऑगस्ट 2026 या कालावधीत विशेष आरोग्य शिबिर अभियान आयोजित करण्यात आलेले आहे. या अभियानांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आणि जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्त, मुंबई यांनी राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना या विशेष अभियानाच्या आयोजनाबाबत निर्देश दिले आहेत. तसेच दि. 16 जुलै 2026 रोजी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. या अभियानांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत बाह्यरुग्ण विभागात विविध विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. रक्तदान शिबिर - दि. 22 ते 28 जुलै 2026, स्तन कर्करोग तपासणी शिबिर- दि. 22 ते 24 जुलै 2026, गर्भाशय मुख कर्करोग तपासणी शिबिर - दि. 25 ते 27 जुलै 2026, बोन मिनरल डेन्सिटी (BMD) तपासणी शिबिर - दि. 22 ते 24 जुलै 2026, नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर -दि. 22 ते 25 जुलै 2026. आरोग्य शिबिरांसोबतच विविध आजारांविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष अभियानही राबविण्यात येणार आहे. यात स्थूलता, हर्निया, व्हेरिकोज व्हेन्स, मुख कर्करोग, थॅलेसेमिया, टाइप-१ डायबेटीस मेलिटस, पॅलिएटिव्ह केअर, मानव दूध बँक (Human Milk Bank), कृत्रिम अवयव व पुनर्वसन, हृदयविकार तसेच असंसर्गजन्य आजार (NCD) यांविषयी बाबत जनजागृती करण्यात येणार आहे. 0000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'