शासकीय वसतिगृह प्रवेश व स्वाधार योजनेसाठी 22 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत

सिंधुदुर्गनगरी दि : 21 (जिमाका) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहांमध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठीही एकत्रित अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी दि. 22 जुलै 2026 पर्यंत https://hmasnew.mahait.org या ऑनलाइन पोर्टलवर अर्ज नोंदणी करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 11 वी, 12 वी तसेच 11 वी व 12 वी नंतरच्या बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत. याच अर्जाद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचाही लाभ घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे. ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही किंवा ज्या तालुक्यात शासकीय वसतिगृह उपलब्ध नाही, अशा पात्र विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा. महाविद्यालयातील इ. 11 वी, 12 वी तसेच 11 वी व 12 वी नंतरच्या बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला असावा. सर्व पात्र विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज भरावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्यातील शासकीय वसतिगृहाचे गृहपाल अथवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याशी 02362- 228882 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'