जिल्हाधिकारी कार्यालय येथे कोटपा 2003 व एफसीटीसी 5.3 अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि. 9 (जिमाका) : जिल्हा रुग्णालय व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 7 जुलै 2026 रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सुरगी हॉल जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे कोटपा 2003 व एफसीटीसी 5.3 अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत झाली. महसूलच्या उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत दवंगे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे, मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुका समन्यय समिती व जिल्हा समन्वय समिती यांची कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळे करीता मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे संचालक आप्पासाहेब उगले यांनी कोटपा 2003 कायदा या विषयी त्या मध्ये कलम 4 कलम 6 (अ), 6 (ब) तसेच कलम 5,7,8 या कलमान्वये सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच एफसीटीसी 5.30 (WHO Framework Convention on Tobacco Control) याबाबत जिल्हा व तालुका स्तरावरील समन्वय समिती यांना सविस्तर मार्गदर्शन केले त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते कामीस आल्मेडा यांनी राष्ट्रीय तंबाख नियंत्रण व तंबाखूमुक्त शाळा बाबत सविस्तर माहिती दिली. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे सदस्य सचिव तथा जिल्हा शल्यचिकित्सक सिंधुदुर्ग यांनी सेक्शन 4 सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी, सेक्शन 6 अ पॉईंट of सेल वर 18 वर्ष आतील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी, सेक्शन 6 ब शैक्षणिक संस्था 100 यार्ड परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी, सेक्शन 5 अंतर्गत, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची जाहिरात, प्रमोशन करण्यास बंदी अशा प्रकारे उलघन होत असल्यास कायदा प्रमाणे जबादारी निश्चित केलेल्या अधिकारी यांनी अनुपालन करावे. तसेच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान निषिद्ध बोर्ड लावावे. कलमांतर्गत उल्लघन झाल्यास आपण तालुका समन्यव समितीचे अध्यक्ष तहसिलदार व सदस्य सचिव जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सुचित करावे. या प्रशिक्षणाचे सूत्रसंचालन अदिती कशेळीकर यांनी केले. कार्यशाळा यशस्वी करण्याकरिता जिल्हा सल्लागार एनटीसीपी संतोष खानविलकर, सामाजिक कार्यकर्ता एनटीसीपी कार्मीस आल्मेडा, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे विभागीय व्यवस्थापक अनिल गुंजे, गणेश उगले व योगेश उगले यांनी महत्त्वाचे सहकार्य केले. 0000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'