शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे इन्टर्न डॉक्टरांचे प्रशिक्षण संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि. 8 (जिमाका): शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील जन औषध वैद्यकशास्त्र विभागामार्फत इन्टर्न डॉक्टर्सकरिता विविध वैद्यकीय विषयांवर आधारित एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी बोलताना अधिष्ठातांनी, "अशा कार्यशाळांमुळे तरुण डॉक्टरांच्या कौशल्यात वाढ होऊन ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना त्याचा मोठा फायदा होईल," असा विश्वास व्यक्त केला. या कार्यशाळेत तज्ज्ञ वरिष्ठ अध्यापक, डॉक्टरांनी इन्टर्न डॉक्टर्सना वैद्यकीय नीतिशास्त्र, तणाव व्यवस्थापन, वैद्यकीय शिष्टाचार, समुपदेशनाचे महत्व, इत्यादी महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर व प्रयोगात्मक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील वरिष्ठ अध्यापक, तज्ञ डॉक्टर्स, प्रशासकीय अधिकारी, अधिपरिचारिका आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रशिक्षणामुळे उपस्थित सर्व इन्टर्न डॉक्टर्सच्या वैद्यकीय ज्ञानात भर पडली आहे. याचा थेट लाभ जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना उत्तम रुग्णसेवा देण्यासाठी होणार असल्याचे सांगत, प्रशिक्षणार्थींनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. 0000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'