ज्येष्ठ नागरिकांसाठी 9 जुलै रोजी मोफत आरोग्य शिबीर

सिंधुदुर्गनगरी,दि. 7 (जिमाका):- सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय तसेच श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुर्नवसनविकास मंडळ यांच्या सयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक धोरण योजनेअंतर्गत मालवण तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीर गुरुवार दि 9 जुलै रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत भ. ता. च. म. माध्यमिक विद्यालय, चौके येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी ज्येष्ठ नागरीकांनी जास्तीत जास्त उपस्थित राहून वैद्यकीय शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. या शिबिराच्या सकाळच्या सत्रात योगशिबीर, ध्यानसत्र, मानसिक आरोग्य व समुपदेशन, आहार मार्गदर्शन, व्यायाम व प्रात्यक्षिके, आनंदी जीवनशैली याविषयी फिजिओथेरपिस्ट, योग प्रशिक्षक, आहारतज्ञ, आरोग्य समुपदेशक आदी मार्गदर्शन करणार आहेत. त्याच बरोबर तज्ञ डॉक्टर ज्येष्ठ नागरीकांची बीपी, शुगर, नाक, कान, डोळे, घसा तपासणी, इसीजी, सीबीसी, रक्ततपासणी आदी तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'