कायदेशीर पालकत्वासाठी स्थानिक स्तर समिती सदस्य पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 13 (जिमाका) : जिल्ह्यातील बौद्धिक अक्षम, स्वमग्न (ऑटिझम), सेरेब्रल पाल्सी तसेच बहुविकलांग व्यक्तींना नॅशनल ट्रस्ट अॅक्ट, 1999 च्या कलम 14 अन्वये कायदेशीर पालकत्व मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्थानिक स्तर समिती (LLC) गठित करण्यात येत आहे. या समितीवरील सदस्य पदांसाठी पात्र व्यक्ती व संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी दिनांक 17 जुलै 2026 या पर्यंत कार्यालयीन वेळेत आपले अर्ज जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, ओरस येथे प्रत्यक्ष सादर करावेत. दिव्यांग बांधवांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी ही समिती अत्यंत महत्त्वाची असल्याने, जिल्ह्यातील पात्र संस्था प्रतिनिधी तसेच दिव्यांग व्यक्तींनी या संधीचा लाभ घेत विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी गुरुराज परीट यांनी केले आहे. समितीवर नोंदणीकृत संस्था प्रतिनिधी (RO Member) म्हणून दिव्यांग क्षेत्रात कार्यरत असलेल्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीची निवड करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग व्यक्ती सदस्य (PwD Member) म्हणून पुनर्वसन, शिक्षण, रोजगार, क्रीडा किंवा आरोग्य या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या दिव्यांग व्यक्तीकडूनही अर्ज मागविण्यात आले आहेत. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'