विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी सैनिक, वीरपत्नी व पाल्यांचा विशेष गौरव

सिंधुदुर्गनगरी, दि. 16 (जिमाका) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत सन 2025-26 या वर्षात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय व अतिउत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी तसेच त्यांच्या पाल्यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. गौरवप्राप्त व्यक्तींना रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दपत्रकाद्वारे दिली आहे. या गौरव पुरस्कारासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, नृत्य, वादन इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजक, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पूर, जळीत, दरोडा, अपघात किंवा इतर नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी बहुमोल कार्य करणारे तसेच शैक्षणिक वर्ष 2025-26 शैक्षणिक क्षेत्रामध्ये इयत्ता 10 वी परीक्षेमध्ये 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण व 12 वी च्या परीक्षेमध्ये 85 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवुन उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी व पाल्यांना त्यांच्या कार्याबद्दल धनराशी व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तरी पात्र माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांनी संबंधीत कार्याबाबतची प्रमाणपत्रे, गुणपत्रे, सैन्यसेवा पुस्तक, माजी सैनिक ओळखपत्र या कागदपत्रासह दिनांक 15 सप्टेंबर 2026 पुर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे अर्ज सादर करावेत तसेच अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. 02362-228820 यावर संपर्क करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'